Skip to content

देवाच्या प्रतिरूपात

  • by

आपण पाहिले की कशाप्रकारे पुरुषसूक्ताचा आरंभ समयापूर्वी झाला आणि ते पुरुषाचे बलिदान करण्याचा परमेश्वर देवाचा (प्रजापती) मानस स्पष्ट करते. ह्या निर्णयातून सर्व गोष्टींची उत्पत्ती घडून आली – मानवजातीच्या उत्पत्तीचाही यात समावेश आहे.

आपण अनेकदा ‘अतिथिदेवो भव’ (अतिथी देव आहे) किंवा ‘नमस्ते’ (मी तुमच्यातील देवाला नमन करतो) हा वाक्प्रयोग सुद्धा ऐकतो आणि वापरतो. हे वाक्प्रयोग हे सत्य प्रतिबिंबित करतात की लोकांमध्ये काहीतरी दैवी आहे . आपल्यामध्ये दैवी कोणत्याप्रकारे आहे हे हिब्रू वेदांद्वारे स्पष्ट केले आहे आणि, त्याचे स्पष्टीकरण आपणास मानवजातीच्या निर्मितीप्रत नेते. हेच प्रत्येकाला मूल्य आणि सन्मान देते.

आता आपण विचार करू या की वेद पुस्तकम् (बायबल) मानवजातीच्या उत्पत्तीविषयी काय म्हणते यासाठी की बायबल याविषयी आम्हास काय शिकविते त्याचा समज आम्हास प्राप्त व्हावे. 

( 27 इसहाकाने विचारले, “तुम्ही या अगोदर माझ्याशी मित्रासारखे वागला नाही, एवढेच नव्हे तर माझ्यावर जोर करुन तुम्ही मला तुमचा देश सोडणे भाग पाडले; मग आता माझ्याकडे का आलात?”)

उत्पत्ती 1:26-27

देवाच्या प्रतिरूपात

मानव ‘देवाच्या प्रतिरूपात’ घडविला गेला याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ हा नाही की देव दोन हात, एक डोके, इत्यादी असलेला भौतिक जीव आहे. त्याऐवजी सखोल पातळीवर असे म्हटले जात आहे की लोकांची मूलभूत वैशिष्ट्ये देवाच्या तत्सम वैशिष्ट्यांपासून तयार केलेली आहेत. उदाहरणार्थ, देव (बायबलमध्ये) आणि लोक (निरीक्षणाद्वारे) दोघांमध्येही बुद्धी, भावना आणि इच्छाशक्ती आहे. बायबलमध्ये कधी कधी देवाचे चित्रण दुःखी, संतप्त अथवा आनंदी असे केले जाते – अगदी समान प्रकारच्या भावना ज्यांचा आपण मानव अनुभव करतो. आपण रोजच्या आधारे निवड करतो आणि निर्णय घेतो. त्याचप्रमाणे देव बायबलमध्ये निवडी करतो आणि निर्णयाप्रत पोहोचतो. तर्क करण्याची आणि अमूर्तपणे विचार करण्याची आपली क्षमता देवाकडून येते. आपल्याकडे बुद्धी, भावना आणि इच्छेची क्षमता आहे कारण देवाजवळ ती आहे आणि आपण त्याच्या प्रतिरूपात घडविलेले आहोत. 

सखोल स्तरावर आपण पाहतो की आपण संवेदनशील प्राणी आहोत, स्वतःप्रत जागरूक आणि ‘मी’ आणि ‘तुम्ही’ याविषयी जाणीव असलेले आहोत. आपण अव्यक्तिवाचक मूर्त ‘वस्तू’ नाही. आपण असे आहोत कारण देव असा आहे. या मूलभूत दृष्टीकोनातून, बायबलच्या परमेश्वराला सुप्रसिद्ध स्टार वार्स या सिनेमातील ‘शक्ती’ समान व्यक्तिमत्वहीन सर्वेश्वरवादी म्हणून चित्रित केलेले नाही. मानव ‘वस्तुनिष्ठ’ नसून संवेदनशील व्यक्ती आहेत हे सत्य देवाविषयीच्या ह्या प्रारंभिक शिकवणीच्या प्रकाशात अर्थपूर्ण वाटते. आपण असे आहोत कारण देव असा आहे, आणि आपण त्याच्या स्वरूपात घडविलेले आहोत.

आपणास सौंदर्यदृष्टी का आहे

आम्हाला कला आणि नाटक देखील आवडते. आम्ही नैसर्गिकरित्या सौंदर्याचे कौतुक करतो आणि त्याची आम्हाला गरज आहे. हे केवळ दृष्य सौंदर्यापलीकडे जाते ज्यात संगीत व साहित्याचा समावेश होतो. आमच्यासाठी संगीत किती महत्वाचे आहे याचा विचार करा – आम्हाला नृत्य करणे देखील कसे आवडते. संगीत आमचे जीवन समृद्ध बनविते. आम्हाला उत्तम कथागोष्टी आवडतात, मग कादंबरी असो वा नाटक, अधिक सामान्यतः आज, चित्रपटाची आम्हाला आवड असते. कथांमध्ये नायक, खलनायक, नाटक असते, आणि उत्कृष्ट कथा नायक, खलनायक आणि नाटक यांस आपल्या कल्पनांमध्ये रंगवून टाकतात. मनोरंजन करण्यासाठी, उत्साह जगविण्यासाठी आणि स्वतःला ताजेतवाने करण्यासाठी कलेचा तिच्या विविध रूपांमध्ये वापर करणे आणि त्यांचे रसग्रहण करणे इतके नैसर्गिक आहे कारण देव एक कलाकार आहे आणि आम्ही त्याच्या प्रतिरूपात घडविलेले आहोत.

हा प्रश्न विचारणे महत्वाचे वाटते. आपण स्वाभाविकरित्या सौंदर्यदृष्टी लाभलेले का आहोत, मग कला, नाटक, संगीत, नृत्य, अथवा साहित्य का असेना? मी जेव्हा कधी भारतात प्रवास केला मी नेहमीच भारतीय चित्रपट पाहून विस्मित झालो ज्यांत पाश्चात्यांद्वारे घडविलेल्या चित्रपटापेक्षा अधिक संगीत व नृत्यांचा समावेश असतो. डॅनियल डेनेट, एक स्पष्टवक्ता नास्तिक आणि संज्ञानात्मक प्रक्रियेच्या समजावर प्रभुत्व राखणारा, भौतिकवादी दृष्टीकोनातून उत्तर देतो :

”पण ह्या शोधात बहुतांशी भागात संगीताविषयी गंभीरतेने विचार केलेला नाही. ते क्वचितच विचारते :  संगीताचे अस्तित्व का आहे? एक संक्षिप्त उत्तर आहे, आणि त्याच्या मर्यादा लक्षात घेता, ते खरे आहे :  त्याचे अस्तित्व यासाठी आहे कारण आम्हास ते आवडते आणि म्हणून आपण ते अधिकाधिक अस्तित्वात आणत असतो. पण ते आम्हास का आवडते? कारण आम्हास आढळून येते की ते सुंदर आहे. पण ते आम्हास सुंदर का वाटते? हा अत्यंत उत्तम जैविक प्रश्न आहे, परंतु त्यास अद्याप उत्तम उत्तर नाही.” (डॅनियल डेनेट. ब्रेकिंग द स्पेल :

रिलिजन अॅज अ नॅचरल फनामेनन. पृ. 43

आमच्या मानव स्वभावाविषयीच्या ह्या मूलभूत प्रश्नास मानवजातीवरील भौतिकतावादी दृष्टिकोणाजवळ उत्तर नाही. बायबलच्या दृष्टिकोणातून याचे कारण हे आहे की देव कलात्मक आणि सौंदर्यदृष्टी असलेला आहे. त्याने सर्वकाही सुंदर बनविले आणि तो सौंदर्याचा आस्वाद घेतो. आपण, जे त्याच्या प्रतिरूपात घडविलेले आहोत, त्याच्यासमान आहोत.

आम्ही नैतिक का आहोत

याशिवाय, ‘देवाच्या प्रतिरूपात घडविले जाणे’ नैसर्गिक नैतिक क्षमतेचे स्पष्टीकरण करते जे सर्व संस्कृतींत अत्यंत सामान्य आहे, आणि ज्याविषयी आपण गुरू साई बाबाच्या नैतिक शिकवणींत पाहिले. आपण देवाच्या प्रतिरूपात घडविलेले आहोत आणि नैतिकता ही त्याच्यासाठी अंगभूत आहे, जसे चुंबकीय उत्तराशी संरेखित होकायंत्रासमान, कारण ‘चोख’, ‘चांगले’, आणि ‘योग्य’ यांच्याशी आमचा रचनाबंध असा आहे कारण तो देखील असा आहे. फक्त नीतिमान लोकांसच असे घडविण्यात आलेले नाही – तर प्रत्येकास तसे घडविण्यात आले आहे. ही गोष्ट न ओळखल्यामुळे गैरसमज उत्पन्न होतो. उदाहरणार्थ भौतिकतावादी अमेरिकन सॅम हॅरिसचे हे आव्हान घ्या.

”जर आपले हा विश्वास करणे बरोबर असेल की केवळ धार्मिक विश्वासाद्वारेच नैतिकतेस आधार लाभतो, तर नास्तिक लोक विश्वासणार्‍यापेक्षा कमी नैतिक असले पाहिजेत.”  

सॅम हॅरिस. 2005. लेटर टू अ क्रिश्चियन नेशन पृ. 38-39

हॅरिस येथे चुकत आहे. नैतिकतेची आमची जाणीव देवाच्या प्रतिरूपात घडविले गेल्यामुळे येते, धार्मिक असल्यामुळे नाही. आणि म्हणूनच नास्तिक लोकांसही, आमच्यासारख्या इतर लोकांप्रमाणे, ही नैतिक जाणीव असते आणि ते नैतिकतेने वागू शकतात. आमच्यात आपली नैतिकता का आहे याचे कारण सांगण्यात नास्तितावादास अडचण भासते – परंतु देवाच्या नैतिक प्रतिरूपात घडविले जाणे हे एक सोपे आणि सरळ स्पष्टीकरण आहे.

आपण संबंधप्रिय का आहोत

बायबलच्या दृष्टीत, स्वतःस समजून घेण्याचा आरंभबिंदू हे ओळखणे आहे की आम्ही देवाच्या प्रतिरूपात घडविले गेले आहोत. यामुळे, जशी आपण देवाविषयी (त्याच्याविषयी बायबलमध्ये जे प्रकट करण्यात आले आहे त्याद्वारे) आणि लोकांविषयी (निरीक्षण आणि चिंतन याद्वारे) अंतर्दृष्टी प्राप्त करतो, तशीच आपण इतरांबाबतही अंतर्दृष्टी प्राप्त करतो. उदाहरणार्थ, लोक नातेसंबंधांस जे महत्व देतात त्यावर चिंतन करा. चांगला चित्रपट पाहणे ठीक आहे, पण मित्रासोबत तो पाहणे हा आणखी उत्तम असा अनुभव आहे. आपण आपला अनुभव वाटण्यासाठी नैसर्गिकरित्या मित्रांच्या शोधात असतो. अर्थपूर्ण मैत्री आणि कौटुंबिक नाती आपल्या कल्याणकारी जाणीवेची किल्ली आहेत. उलटपक्षी, एकाकीपणा आणि/अथवा तुटलेले कौटुंबिक नातेसंबंध आणि मैत्रीत खंड पडणे यामुळे आम्हाला ताण येतो. इतरांशी असलेल्या नातेसंबंधाच्या स्थितीमुळे आपण तटस्थ आणि स्थिर राहत नाही. बालिवूड चित्रपट इतके लोकप्रिय असतात कारण ते पात्रांमधील संबंधांवर (प्रेमी, कुटुंबातील सदस्य इत्यादींवर) जास्त भर देतात.

आता, जर आपण देवाच्या प्रतिरूपात घडविलेले आहोत, तर देवासोबत हीच संबंधात्मक भर पाहण्याची आपण अपेक्षा करू, आधी खरे म्हणजे आम्ही असे करतो. बायबल म्हणते की “देव प्रीति आहे…” (1 योहान 4:8). देवाप्रत आणि इतरांप्रत आमच्या प्रीतीस देव जे महत्व देतो त्याच्याविषयी बायबलमध्ये बरेच काही लिहिलेले आहे – त्यांस खरे म्हणजे बायबलमध्ये येशूने (येशूसत्संग) दोन अत्यंत महत्वाच्या आज्ञा म्हटले आहे. जेव्हा आपण त्याविषयी विचार करता, तेव्हा प्रीति ही संबंधात्मक असली पाहिजे कारण त्यासाठी अशा व्यक्तीची गरज भासते जो प्रीति करतो (प्रियकर) और असा व्यक्ती जो ह्या प्रेमास पात्र आहे – प्राणप्रिय.

अशाप्रकारे आपण देवाविषयी प्रियकर म्हणून विचार करावा. जर आपण त्याचा विचार ‘मुख्य संचालक’, ‘पहिले कारण’, ‘सर्वज्ञानी परमेश्वर देव’, ‘परोपकारी जीव’ अथवा कदाचित ‘व्यक्तिमत्वरहित आत्मा’ म्हणून करतो तर आपण बायबलच्या देवाचा विचार करीत नाही – तर आम्ही आपल्या मनांत एक देव घडविला आहे. जरी त्याच्यात हे सर्व गुण आहेत, तरीही त्याचे चित्रण नातेसंबंधांबाबत जवळजवळ अत्यंत भावूक म्हणून केले जात आहे. त्याच्या ‘जवळ’ प्रीति नाही. तो प्रीति ‘आहे’. लोकांसोबत देवाच्या नात्याचे दोन सर्वात महत्वाचे बायबलचे रूपक म्हणजे पित्याचे मुलाशी नाते आणि पतिचे पत्नीशी नाते. हे अत्यंत तत्वज्ञानसंबंधी ‘प्रथम कारणाचे’ उदाहरण नाही तर अत्यंत सखोल आणि सर्वाधिक सलगीचे मानवनाते आहे.

म्हणून येथे तो पाया आहे जो आपण आतापर्यंत घातला आहे. लोक देवाच्या स्वरूपात घडविण्यात आले आहेत ज्यात मन, भावना आणि इच्छा यांचा समावेश आहे. आपण संवेदनशील आहोत आणि आम्हाला स्वतःची जाणीव आहे. आम्ही नैतिक प्राणी आहोत आणि आमचे ‘नैतिक व्याकरण’ आम्हाला ‘योग्य’ व ‘चोख’ याचे, आणि काय नाही त्याचे दिशानिदेशन करते. आमच्यात सौंदर्य, नाटक, कला आणि कथा यांच्या सर्व स्वरूपांचा विकास आणि गुणग्रहण करण्याची नैसर्गिक क्षमता आहे. आणि आम्ही इतरांसोबत नातेसंबंध आणि मैत्री जोडण्याचा सहज व स्वाभाविकरित्या प्रयत्न करणार. आम्ही हे सर्व आहो कारण देव हे सर्व आहे आणि आम्हास देवाच्या प्रतिरूपात घडविण्यात आले आहे. हा पाया घालत असतांना आम्ही स्वतःविषयी जे काही निरीक्षण करतो त्यांच्याशी हे सर्व निष्कर्ष कमीत कमी सुसंगत आहेत. आम्ही पुढील पोस्टमध्ये काही अडचणी पाहणे सुरू ठेवू.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *