भ्रष्ट (भाग 2) … लक्ष्य चुकणे

  • by

मागे आपण पाहिले की कशाप्रकारे वेद पुस्तकम् (बायबल) आमचे वर्णन आम्हास घडविण्यात आलेल्या देवाच्या मूळ प्रतिरूपापासून भ्रष्ट असे करते. ज्या चित्राने हे उत्तमप्रकारे ‘पाहण्यात’ माझी मदत केली ते होते मध्य पृथ्वीचे ओर्कस्, एल्वजपासून भ्रष्ट झालेले. पण हे कसे घडले?

पापाचा उगम

याची नोंद बायबलमध्ये उत्पत्तीच्या पुस्तकात करण्यात आली आहे. देवाच्या प्रतिरूपात घडविण्यात आल्यानंतर लवकरच प्रथम मानवांची कसोटी घेण्यात आली. या वर्णनात ‘सर्पासोबत’ अदलाबदलीविषयी लिहिण्यात आले आहे. सर्पास नेहमीच सार्वत्रिकरित्या सैतान समजले गेले आहे – देवाचा शत्रू असा आत्मा. बायबलद्वारे, सैतान सामान्यतः दुसर्‍या  व्यक्तीच्या द्वारे बोलून आम्हास पापात पाडण्यासाठी परीक्षा घेतो. या ठिकाणी तो सर्पाद्वारे बोलला. हे अशाप्रकारे नमूद करण्यात आले आहे.

रमेश्वर देवाने निर्माण केलेल्या सर्व वन्य प्राण्यांमध्ये सर्प हा अतिशय धूर्त आणि हुषार होता. त्याला स्त्रीची फसवणूक करायची होती. त्यावेळी सर्प त्या स्त्रीशी बोलला व तो तिला म्हणाला, “स्त्रिये, बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नको असे देवाने तुला खरोखरच सांगितले आहे काय?”
2 स्त्रीने सर्पाला उत्तर दिले, “नाही. देवाने तसे म्हटले नाही बागेतल्या झाडांची फळे आम्ही खाऊ शकतो.
3 परंतु असे एक झाड आहे की ज्याचे फळ आम्ही खाता कामा नये देवाने आम्हाला सांगितले, ‘बागेच्या मधोमध असलेल्या झाडाचे फळ तुम्ही मुळीच खाऊ नका. त्या झाडाला स्पर्शही करु नका. नाहीतर तुम्ही मराल.”
4 परंतु सर्प त्या स्त्रीला म्हणाला, “तुम्ही खरोखर मरणार नाही.
5 कारण देवाला हे माहीत आहे की जर तुम्ही त्या झाडाचे फळ खाल तर बरे व वाईट काय आहे हे तुम्हांला समजेल आणि तुम्ही देवासारखे व्हाल.”
6 स्त्रीने पाहिले की ते झाड दिसण्यात सुंदर, त्याचे फळ खाण्यास चांगले व शहाणपण देणारे आहे म्हणून तिने त्या झाडाचे फळ तोडून घेतले व खाल्ले. तिचा नवरा तिच्याबरोबर तेथे होता; तेव्हा तिने त्या फळातून त्याला थोडे दिले व त्याने ते खाल्ले.

उत्पत्ती 3:1-6

त्यांच्या निवडीचे मूळ, आणि अशाप्रकारे परीक्षा, ही होती की ते देवासमान होऊ’ शकतात. आतापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनी देवावर विश्वास ठेवला होता आणि सर्व गोष्टींसाठी त्याच्या वचनावर फक्त विश्वास धरला होता. पण आता त्यांच्याजवळ ते मागे सोडून जाण्याचा, ‘देवासमान’ बनण्याचा, आणि स्वतःवर भरवंसा ठेवण्याचा आणि स्वतःच्या शब्दावर अवलंबून राहण्याचा पर्याय होता. ते स्वतः ‘देव’ बनू शकत होते, स्वतःच्या नावेचे कप्तान, आपल्या भविष्याचे स्वामी, स्वायत्त आणि केवळ स्वतःस उत्तरदायी.

देवाविरुद्ध बंड केल्यामुळे त्यांच्यात काहीतरी बदलले. जसे त्या परिच्छेदात वर्णन करण्यात आले आहे, त्यांना लाज वाटली आणि त्यांनी आपली नग्नता लपविण्याचा प्रयत्न केला. खरे म्हणजे, अगदी त्यानंतर, जेव्हा देवाने आदामास त्याच्या अवज्ञेविषयी विचारपूस केली, तेव्हा आदामाने हव्वेस दोष दिला (आणि तिला घडविणार्‍या देवास). त्या उलट तिने सर्पास दोष दिला. कोणीही जबाबदारी स्वीकारावयास तयार नव्हते.

आदामाच्या बंडाचा परिणाम

आणि त्या दिवशी ज्या गोष्टीची सुरूवात झाली ती आजवर सुरू आहे कारण आम्हास तोच अंगभूत स्वभाव वारश्याने मिळाला आहे. म्हणून आम्ही आदामाप्रमाणे वागतो – कारण आम्हास त्याचा स्वभाव वारश्याने लाभला आहे. काही लोक बायबलचा असा चुकीचा अर्थ लावतात की आदामाच्या बंडासाठी आमच्यावर दोष लावण्यात आला आहे. वस्तुतः, ज्याच्यावर दोष लावण्यात आला आहे तो केवळ आदाम हा एकच व्यक्ती आहे पण आम्ही त्या बंडाच्या परिणामांत जगत आहोत. आपण याचा अनुवांशिकदृष्ट्या विचार करू शकतो. मुले त्यांच्या पालकांची – चांगले आणि वाईट – गुणवैशिष्ट्ये वारश्याने त्यांच्या जीन्सद्वारे प्राप्त करतात. आम्हाला आदामाच्या विद्रोही स्वभावाचा वारसा लाभला आहे आणि अशाप्रकारे जन्मापासून, जवळजवळ नकळत, पण त्याने आरंभ केलेले बंड आपण हेकेखोरपणे सुरू ठेवतो. होऊ शकते आम्हाला विश्वाचा परमेश्वर व्हावयाचे नसेल, पण   आम्ही आपल्या परिस्थितींत देव बनू इच्छितो, देवापासून स्वायत्त.

पापाचे परिणाम जे आज इतके स्पष्ट दिसत आहेत

मानव जीवनाविषयी हे इतके काही स्पष्ट करते की आपण ते अगदी सहज समजतो. याच कारणास्तव सर्व ठिकाणी लोकांस आपल्या दारांना कुलुपे लावावी लागतात, त्यांना पोलिसांची, वकीलांची, त्यांच्या बँकेसाठी सांकेतिकरित्या लिपिबद्ध पासवर्डची गरज भासते – कारण आमच्या वर्तमान स्थितीत आम्ही एकमेकांचे चोरून घेतो. म्हणूनच साम्राज्यांचा आणि समाजांचा र्‍हास होतो आणि ती उन्मळून पडतात – कारण ह्या सर्व साम्राज्यांतील नागरिकांची र्‍हास होण्याची प्रवृत्ती असते.  म्हणूनच सर्वप्रकारच्या शासनपद्धतींचा आणि अर्थप्रणालींचा प्रयत्न केल्यानंतर, आणि जरी काही इतरांपेक्षा बर्‍या असल्या तरीही प्रत्येक राज्यव्यवस्था अथवा अर्थव्यवस्था शेवटी ढासळून पडते – कारण ह्या आदर्शवादानुसार जगणार्‍या लोकांची अशी प्रवृत्ती असते ज्यामुळे सर्व कार्यव्यवस्था कोलमडते. म्हणूनच जरी आमची पीढी अतिशय सुशिक्षित असली तरीही आमच्याजवळ अद्याप ह्या समस्या आहेत, कारण ही समस्या आमच्या शिक्षणाच्या पातळीपलीकडे सखोल जाते. म्हणूनच प्रतासना मंत्राच्या प्रार्थनेशी  आम्हाला इतके तादात्म्य वाटते – कारण ती आमचे अत्यंत उत्तमरित्या वर्णन करते.   

पाप – लक्ष्य ‘चुकविणे’

म्हणूनच कोणत्याही धर्मासाठी त्यांची दृष्टी समाजासाठी पूर्णपणे अस्तित्त्वात नाही – परंतु नास्तिकही नाही (स्टॅलिनच्या सोव्हिएत युनियनचा विचार करा, माओचा चीन, पोल पॉट कंबोडिया) – कारण आपण ज्या मार्गाने आहोत त्यादृष्टीने आपल्याला आपली दृष्टी चुकवण्यास प्रवृत्त करते. . खरं तर, हा शब्द ‘मिस’ आपल्या परिस्थितीचा बडबड करतो. बायबलमधील एका वचनात असे चित्र दिले गेले आहे जे आम्हाला हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यात मदत करते. ते म्हणतात

16 बन्यामीनांकडे युध्दाचे खास प्रशिक्षण घेतलेले सव्वीस हजारांचे सैन्य होते. शिवाय गिबाचे सातशै सैनिक होते.

शास्ते 20:16

हे वचन त्या सैनिकांचे वर्णन करते जे गोफणीचा वापर करण्यात तरबेज होते आणि कधीही चुकत नसत. ज्याचे वर ‘चुकणे’ असे भाषांतर करण्यात आले आहे तो मूळ हिब्रू शब्द आहे יַחֲטִֽא ׃.  ह्याच हिब्रू शब्दाचे भाषांतर बायबलच्या बहुतेक भागात पाप सुद्धा करण्यात आलेले आहे. उदाहरणार्थ, योसेफ, ज्याला मिसर देशात गुलाम म्हणून विकण्यात आले होते, आपल्या स्वामीच्या पत्नीशी, तिने मनधरणी केल्यानंतरही तिच्याशी व्याभिचार करावयास तयार होईना, तेव्हा हाच हिब्रू शब्द आला आहे ‘पाप.’ तो तिला म्हणाला :

9 माझ्या स्वामीने मला या घरात जवळ जवळ त्याच्या समान मोठपणा दिला आहे; असे असताना अशा उदार स्वामीच्या बायकोपाशी निजणे मला योग्य नाही. ते चुकीचे आहे; ते परमेश्वराच्या विरुद्ध घोर पाप आहे!”

उत्पत्ती 39:9

दहा आज्ञा दिल्यानंतर लगेच त्यात म्हटले आहे :

  20 मग मोशे लोकांना म्हणाला, “भिऊ नका! कारण परमेश्वर तुम्हावर प्रीती करतो हे दाखविण्यासाठी आणि तुम्ही त्याचा मान राखून त्याचे भय धरावे व पाप करु नये हे दाखविण्यासाठी तो आला आहे.”

निर्गम 20:20

या दोन्ही ठिकाणी समान हिब्रू शब्द आला आहे יַחֲטִֽא׃  ज्याचे भाषांतर ‘पाप’ करण्यात आले आहे. लक्ष्यावर गोफणीचा दगड फेकणार्‍या सैनिकांसाठी वापरण्यात येणारा तोच शब्द आहे ‘चुकणे’  जसा या वचनांत आहे ज्याचा अर्थ आहे ‘पाप’ म्हणजे लोक एकमेकाशी जसे वागतात त्याच्याशी संबंधित. हे आमच्यापुढे एक चित्र मांडते ज्याच्यामुळे हे समजण्यात मदत होते की ‘पाप’ काय आहे. सैनिक एक दगड घेतो आणि लक्ष्यावर मारण्यासाठी त्याला गोफणीत टाकतो. जर तो चुकला तर त्याचा हेतू विफल झाला. त्याचप्रकारे, आम्हास देवाच्या प्रतिरूपात घडविण्यात आले होते की त्याच्याशी कसे वागावे आणि इतरांशी कसे वागावे याविषयी आम्ही आपले लक्ष्य साधावे. ‘पाप’ करणे म्हणजे हेतू, अथवा लक्ष्य चुकणे, जो आमच्यासाठी योजिलेला होता, आणि जो आमच्या विविध प्रणालींत, धर्मांत आणि आदर्शवादांत सुद्धा आम्हास स्वतःसाठी हवा असतो.

पापाचीवाईट बातमीप्राधान्याचा नव्हे तर सत्याचा विषय

मानवजातीचे हे भ्रष्ट आणि लक्ष्य चुकलेले चित्र सुंदर नाही, ते चांगले वाटणारे चित्र नाही, ते आशावादीही नाही. मागील वर्षांत या विशिष्ट शिकवणीविरुद्ध लोकांची कठोर प्रतिक्रिया प्राप्त झाली आहे. मला आठवते की येथे कॅनडात एका विद्यापीठाच्या विद्यार्थ्याने माझ्याकडे रागाने पाहत म्हटले, “मी आपणावर विश्वास करीत नाही कारण आपण जे म्हणत आहा ते मला आवडत नाही.” आपणास ते आवडत नसेल, पण यावर लक्ष्य केन्द्रित करणे म्हणजे लक्ष्य गमावून बसणे. एखादी गोष्ट ‘आवडण्याचा’ संबंध याच्याशी आहे की ते खरे आहे किंवा नाही? मला कर, युद्ध, एड्स आणि भूकम्प आवडत नाहीत – कोणालाही आवडत नाही – पण त्यामुळे ते दूर होत नाहीत, आणि आपण त्यांच्यापैकी एकाकडेही दुर्लक्ष करू शकत नाही.

एकमेकांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी आपण सर्व समाजांत तयार केलेल्या कायदा, पोलिस, कुलूप, किल्ल्या, सुरक्षा इत्यादी सर्व व्यवस्था सुचवितात की काहीतरी चूक आहे. ही वस्तुस्थिती की कुंभमेळाव्यासारखे सण ‘आपल्या पापांचे प्रक्षालन’ करण्यासाठी लक्षावधी लोकांस आकर्षित करतात हे या गोष्टीचे निदर्शक आहे की आपण स्वतःप्रेरणेने हे जाणतो की आप कुठेतरी लक्ष्य ‘गमावले’ आहे. ही वस्तुस्थिती की स्वर्गात जाण्याची अट म्हणून बलिदानाची संकल्पना सर्व धर्मांत आढळून येते या गोष्टीचा संकेत आहे की आमच्या बाबतीत असे काही आहे जे योग्य नाही. कमीत कमी, ह्या सिद्धांतावर निष्पक्षपणे विचार करणे योग्य ठरेल. 

परंतु सर्व धर्म, भाषा आणि राष्ट्रांमध्ये अस्तित्त्वात असलेल्या पापांचा हा सिद्धांत – जो आपल्या सर्वांना लक्ष्य ‘गमावण्यास’ कारणीभूत ठरतो एक महत्वाचा प्रश्न उभा करतो. देव त्याबद्दल काय करणार होता? आम्ही आमच्या पुढच्या लेखात देवाच्या प्रतिसादाचे अवलोकन करू – जेथे आपण येणार्‍या  तारणार्‍या पहिले अभिवचन पाहतो – पुरूष जो आमच्यासाठी पाठविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *