Skip to content

येशू ख्रिस्ताचा जन्म : ऋषींद्वारे भाकीत करण्यात आले, देवांनी घोषणा केली, दुष्टांनी धमकी दिली

  • by

येशूचा जन्म (येशुसत्संग) बऱ्या बहुतेक मोठ्या प्रमाणात साजरा केल्या जाणाऱ्या जागतिक सुट्टीमागील कारण आहे –  ख्रिसमस. जरी अनेकांना ख्रिसमसविषयी माहीत असले, तरीही, फारच कमी लोकांना शुभवर्तमानातील येशूच्या जन्माची माहिती आहे. ही जन्मगाथा आधुनिक काळातील ख्रिसमसपेक्षा खूपच चांगली आहे ज्यात सांटा आणि भेटवस्तूंचा समावेश आहे, आणि म्हणून हे जाणून घेण्यासारखे आहे.

बायबलमध्ये येशूच्या जन्माविषयी जाणून घेण्याचा एक उपयुक्त मार्ग म्हणजे कृष्णाच्या जन्माशी त्याची तुलना करणे कारण या दोन कथांमध्ये बरेच साम्य आहे.

कृष्णाचा जन्म

विविध शास्त्रांमध्ये कृष्णाच्या जन्माची वेगवेगळी माहिती देण्यात आली आहे. हरिवंशामध्ये, विष्णूला माहिती मिळाली आहे की कलानेमिन राक्षस हा दुष्ट राजा कंस म्हणून पुन्हा जन्माला आला. कंसाचा नाश करण्याचा संकल्प करून, विष्णूने कृष्णाचा अवतार म्हणून वासुदेव (पूर्वीचा ऋषी ज्याचा गोरक्षक म्हणून पुन्हा जन्म झाला) आणि त्याची पत्नी देवकी यांच्या घरात जन्म घेतला.

पृथ्वीवर, कंस-कृष्णाचा संघर्ष भविष्यवाणीद्वारे सुरू झाला जेव्हा आकाशवाणीद्वारे कंसाला अशी घोषणा करण्यात आली की देवकीचा मुलगा कंसाला मारेल. म्हणून कंसाला देवकीच्या संततीची भीती वाटत होती, आणि त्याने तिला व तिच्या कुटूंबाला तुरूंगात टाकले, आणि विष्णूच्या अवतारास मारण्यास चुकू नये म्हणून जन्माला आलेल्या तिच्या मुलांचा त्याने वध केला.  

कृष्णाचा जन्म देवकीच्या पोटी झाला आणि, वैष्णव भक्तांच्या मते, ग्रह त्याच्या जन्मासाठी आपोआप अनुकूल असल्यामुळे त्यावेळी समृद्धी व शांततेचे वातावरण होते.

मग त्याच्या नवजात शिशूचा कंसाद्वारे वध होऊ नये म्हणून पुराण वासुदेवाच्या पलायनाचे वर्णन करते (कृष्णाचा जगिक पिता). दुष्ट राजाने त्याला व देवकीला कैद केले होते तो तुरुंग सोडून वासुदेव बाळाला घेऊन नदीच्या पलीकडे निघाला. एकदा गावात सुरक्षित पोहोचल्यावर कृष्ण बाळाला देऊन त्याने एका स्थानिक मुलीस आपल्यासोबत घेतले. नंतर कंसाला ती मुलगी सापडली आणि त्याने तिचा वध केला. बाळांत झालेल्या देवाणघेवाणीस विसरून नंद आणि यशोदाने (मुलीचे आईवडील) कृष्णाचे आपला दीन गोरक्षक म्हणून संगोपन केले. कृष्णाचा जन्मदिवस कृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो.

हिब्रू वेद येशूच्या जन्माविषयी भविष्यवाणी करतात

कंसाला भविष्यवाणी केल्यानुसार देवकीचा मुलगा त्याला ठार करणार होता, तसेच हिब्रू ऋषींना येणाऱ्या मशीहा/ख्रिस्ताविषयी भविष्यवाण्या प्राप्त झाल्या. तथापि, या भविष्यवाण्या येशूच्या जन्मापूर्वी शेकडो वर्षें आधी, अनेक संदेष्ट्यांनी प्राप्त केल्या व लिहून ठेवल्या. ही समयरेखा  हिब्रू वेदांच्या अनेक संदेष्ट्यांस दाखविते, या त्यांच्या भविष्यवाण्या केव्हा प्रकट झाल्या व नमूद करण्यात आल्या ते दर्शविते. त्यांनी येणाऱ्यास मृत धुमाऱ्यातून फुटणाऱ्या अंकुरासमान आधीच पाहिले आणि त्याच्या नावाचे भाकित केले – येशू.

यशया आणि इतिहासातील इतर हिब्रू ऋषी (संदेष्टे). यशयाचा समकालीन मीखावर लक्ष द्यावे

यशयाने या येणाऱ्या व्यक्तीच्या जन्माच्या स्वरूपाविषयी आणखी एक उल्लेखनीय भविष्यवाणी नोंदविली असे लिहिले आहे :

ह्यास्तव प्रभू स्वत: तुम्हांला चिन्ह देत आहे; पाहा, ‘कुमारी’ गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव ‘इम्मानुएल’ (आमच्यासन्निध देव) असे ठेवील.

यशया 7:14

प्राचीन इब्री लोक गोंधळात पडले. कुमारीला मुलगा कसा होऊ शकतो? ते अशक्य होते. तथापि भविष्यवाणीत हा मुलगा इम्मानुएल असेल असे भाकित करण्यात आले, ज्याचा अर्थ आहे ‘आमच्याबरोबर परमेश्वर’. परात्पर देव, ज्याने जग निर्माण केले, तो जर जन्माला येणार होता तर ते विचार करण्यासारखे होते. म्हणून हिब्रू वेदांची प्रत बनविणारे ऋषी आणि शास्त्री यांनी वेदांमधून ही भविष्यवाणी काढून टाकण्याचे धारिष्ट्य केले नाही, आणि ते पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत, शतकानुशतके टिकून राहिले.

यशयाने कुमारिकेद्वारे जन्माची भविष्यवाणी केली त्याचवेळी, दुसरा संदेष्टा मीखा याने भाकित केले :

बेथलहेम एफ्राथा, तू यहूदातील सर्वात लहान गाव आहेस. तू इतका लहान आहेस की तुझ्या कुटुंबाची मोजदाद करणेही अशक्य आहे. पण “इस्राएलचा राज्याकर्ता” माझ्यासाठी तुझ्यातून येईल. त्याचा प्रारंभ प्राचीन काळापासून, अनंत काळापासून, झाला आहे.

मीखा 5:2

थोर राजा दाविदाच्या पूर्वजांचे नगर, बेथलेहेमाहून, शासक येणार होता ज्याचा आरंभ ‘प्राचीन काळापासून’ होता – त्याच्या जन्माच्या फार पूर्वी.

ख्रिस्ताचा जन्म – देवांनी केलेली घोषणा

शेकडो वर्षांपासून यहूदी/इब्री लोक या भविष्यवाण्यांच्या घडण्याची वाट पाहत होते. अनेकांनी आशा सोडली आणि इतर लोक त्याबद्दल विसरले, परंतु भविष्यवाण्या आगामी दिवसाची वाट बघणारे मौन साक्षीदार राहिले. शेवटी, इ.स.पू. 5 च्या सुमारास एक खास दूत एका युवतीजवळ एक गोंधळात पाडणारा संदेश घेऊन आला. जशी कंसाने आकाशवाणी ऐकली, या स्त्रीजवळ  स्वर्गातून एक दूत, गब्रिएल नावाचा देव किंवा देवदूत आला. शुभवर्तमानात लिहिलेले आहे :

26 अलीशिबाच्या सहाव्या महिन्यात, देवाने गब्रीएल दूताला गालीलातील नासरेथ गावी पाठविले.
27 योसेफ नावाच्या मनुष्याशी ज्या कुमारीची मागणी झाली होती, तिच्याकडे गब्रीएलाला पाठविण्यात आले. योसेफ हा दाविदाच्याघराण्यातील होता. तिचे नाव मरीया होते.
28 गब्रीएल तिच्याकडे आला आणि म्हणाला, “अभिवादन! तुझ्यावर कृपा झालेली आहे. प्रभु तुझ्याबरोबर आहे.”
29 परंतु या शब्दांनी ती अस्वस्थ झाली, आणि या अभिवादनाचा अर्थ काय असावा याचे ती नवल करु लागली.
30 देवदूत तिला म्हणाला, “मरीये, भिऊ नकोस, देवाने तुझ्यावर कृपा केली आहे.
31 ऐक! तू गरोदर राहशील, आणि तुला मुलगा होईल, त्याचे नाव तू येशू ठेव.
32 तो महान होईल व त्याला सर्वोच्य देवाचा पुत्र म्हणतील. आणि प्रभु देव त्याला त्याचा पिता दावीद याचे सिंहासन देईल.
33 याकोबाच्या घराण्यावर सर्वकाळासाठी तो सत्ता चालवील त्याच्या राज्याचा कधीही अंत होणार नाही.”
34 तेव्हा मरीया दूताला म्हणाली, “मी कुमारी असल्याने हे असे कसे घडेल?”
35 देवदूत तिला म्हणाला, “पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, आणि सर्वोच्च देवाचे सामर्थ्य तुझ्यावर सावली करील. आणि म्हणून जे पवित्र बाळ जन्मास येईल, त्याला देवाचा पुत्र म्हणतील.
36 आणि याकडे लक्ष दे: तुझी नातेवाईक अलीशिबा जरी वांझ असली तरी तीसुद्धा गरोदर आहे व तिच्या पोटी पुत्र आहे. आणि ज्या स्त्रीला ते म्हणाले की तुला मूल होणार नाही तिला आता सहावा महिना आहे!
37 कारण देवाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही.”
38 मरीया म्हणाली, “मी प्रभूची दासी आहे, आपण म्हणालात तसे माझ्याबाबतीत घडो.” मग देवदूत तिला सोडून गेला.

लूक 1:26-38

गब्रिएलाच्या संदेशानंतर नऊ महिन्यांनी, कुमारी मरीयेच्या पोटी येशूचा जन्म होईल, ज्याद्वारे यशयाची भविष्यवाणी पूर्ण होईल. पण मीखाने बेथलेहेममध्ये जन्म होणार असल्याचे भाकीत केले होते, आणि मरीया नासरेथ येथे राहत होती. मीखाची भविष्यवाणी अपयशी ठरली असती का? शुभवर्तमानात पुढे सांगितले आहे:

दिवसात कैसर औगुस्तकडून हुकुम झाला की, रोमन जगातील सर्व लोकांच्या नावांची नोंद झालीच पाहिजे.
ही पहिली नावनोंदणी होती. क्वीरीनिय हा सूरिया प्रांताचा राज्यपाल होता त्यावेळेस ही नावनोंदणी झाली.
प्रत्येक जण नावनोंदणी करण्यासाठी आपापल्या गावी गेला.
मग योसेफसुद्धा गालीलातील नासरेथ गावाहून यहूदीयातील दाविदाच्या बेथलेहेम या गावी गेला. कारण तो दाविदाच्या घराण्यातील व कुळातील होता.
जिच्याशी त्याचे लग्न ठरले होते व जी गरोदर होती, त्या मरीयेसह तो तेथे नावनोंदणी करण्यासाठी गेला.
ते तेथे असतानाच तिची बाळंतपणाची वेळ आली.
आणि तिने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला. तिने त्याला फडक्यंामध्ये गुंडाळले व गोठ्यात ठेवले, कारण धर्मशाळेत उतरण्यासाठी त्यांना जागा मिळाली नाही.
आणि तेथे काही मेंढपाळ रात्रीच्या वेळी शेतामध्ये राहून आपले कळप राखीत होते.
आणि देवाचा एक दूत त्यांच्यामोर प्रगट झाला व प्रभूचे तेज त्यांच्याभोवती पसरले. आणि ते मेंढपाळ घाबरुन गेले.
10 देवदूत त्यांना म्हणाला: “भिऊ नका, कारण मी तुम्हांला आनंदाची बातमी सांगणार आहे, जिच्यामुळे सर्व लोकांना आनंद होणार आहे.
11 कारण आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभु आहे.
12 आणि तुमच्यासाठी ही खूण असेल : फडक्यात गुंडाळलेले आणि गोठ्यात निजविलेले बाळ तुम्हांला आढळेल.”
13 आणि अचानक तेथे देवदूताबरोबर स्वर्गातील सैन्याचा समुदाय जमला. ते देवाची स्तुति करीत होते आणि म्हणत होते;
14 “स्वर्गात देवाला गौरव आणि ज्यांच्याबद्दल देव समाधानी आहे, त्या पृथ्वीवरील मनुष्यांत शांति”
15 जेव्हा देवदूत त्यांना सोडून परत स्वर्गात गेले, तेव्हां मेंढपाळ एकमेकांना म्हणाले, ‘चला, बेथलेहेमला जाऊ या आणि घडलेली जी गोष्ट देवाने आम्हांला कळविली ती पाहू या.”
16 ते घाईने गेले आणि त्यांना मरीया व योसेफ आढळले आणि त्यांनी गोठ्यात ठेवलेले बाळ पाहिले.
17 जेव्हा मेंढपाळांनी त्याला पाहिले तेव्हा देवदूताने त्यांना त्या बाळविषयी जे सांगितले होते ते सर्वांना सांगितले.
18 ज्यांनी हे ऐकले ते सर्व मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टीमुळे चकित झाले.
19 पण मरीयेने या गोष्टी स्वत:जवळच ठेवल्या, व सतत त्याविषयी विचार करु लागली.
20 त्यांनी पाहिलेल्या आणि ऐकलेल्या सर्व गोष्टीविषयी देवाचे गौरव आणि स्तुति करीत मेंढपाळ घरी गेले: त्यांना जसे सांगण्यात आले तसेच सर्व घडले.

लूक 2:1-20

जगातील सर्वात सामर्थ्यवान व्यक्ती, स्वतः रोमन सम्राटाने, एक साम्राज्यिक हुकूम जारी केला ज्यामुळे मरीया व योसेफ यांना नासरेथहून बेथलेहेमाला प्रवास करावा लागला, आणि ते अगदी येशूच्या जन्माच्या वेळेस तेथे येऊन पोचले. मीखाची भविष्यवाणी देखील पूर्ण झाली.

दीन गुराखी म्हणून आलेल्या कृष्णासमान, येशू दीन अवस्थेत जन्माला आला – गव्हाणीत ज्या ठिकाणी गाई व इतर प्राणी ठेवण्यात आले होते, आणि दीन मेंढपाळांनी त्याची भेट घेतली. तरीही स्वर्गातील देवदूत किंवा देव यांनी त्याच्या जन्माविषयी गाणे गायले.

दुष्टाद्वारे धमकी

कृष्णाच्या जन्माच्या वेळी त्याच्या आगमनामुळे घाबरलेल्या राजा कंसामुळे त्याचे आयुष्य धोक्यात आले होते. त्याचप्रमाणे, येशूच्या जन्माच्या क्षणी स्थानिक राजा हेरोदामुळे त्याचे जीवन धोक्यात आले होते. त्याच्या राज्यास धमकी देणारा इतर कोणताही राजा (“ख्रिस्ताचा” हाच अर्थ आहे) हेरोदाला नको होता. शुभवर्तमान स्पष्ट करते:

हूदीयातील बेथलहेम गावात येशूचा जन्म झाला. त्यावेळी हेरोद राजा राज्य करीत होता. येशूच्या जन्मानंतर पूर्वेकडून काही ज्ञानी लोक यरूशलेमाला आले.
आणि त्यांनी विचारले, “यहूद्यांचा नुकताच जन्मलेला राजा कोठे आहे? कारण त्याचा जन्म सूचित करणारा तारा आम्ही पूर्व दिशेस पाहिला म्हाणून त्याला नमन करण्यास आलो आहोत.”
हे ऐकून हेरोद राजा तसेच यरुशलेम नगराचे रहिवासी घाबरुन गेले.
मग त्याने यहूदी लोकांचे सर्व मुख्य याजक व नियमशास्त्राचे शिक्षक यांना बोलाविले आणि विचारले की, “ख्रिस्ताचा जन्म कोठे होणार होता?”
त्यांनी उत्तर दिले, “यहूदीयातील बेथलेहेम गावात. कारण देवाच्या संदेष्टयांनी त्याविषयी असे लिहिले आहे की:
“हे बेथलहेमा, यहूद्यांच्या भूमिप्रदेशा, तू यहूद्यांच्या राज्यकर्त्यामध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही कारण माझ्या इस्राएल लोकांचा सांभाळ करील, असा राज्यकर्ता तुझ्यातून येईल.”
मग हेरोदाने पूर्वेकडील ज्ञानी लोकांची गुप्तपणे भेट घेतली आणि तारा दिसल्याची नक्की वेळ माहीत करून घेतली.
नंतर त्याने त्यांना बेथलहेमला पाठविले. हेरोद त्यांना म्हणाला, “तुम्ही जाऊन त्या बालकाचा नीट शोध करा. आणि तुम्हांला ते सापडल्यावर मला सांगायला या. म्हणजे मी सुद्धा जाऊन त्याला नमन करू शकेन.”
ज्ञानी लोकांनी राजाचे म्हणणे ऐकले व ते निघाले, त्यांनी जो तारा पूर्वेला होता तोच त्यांना परत दिसला. ज्ञानी लोक त्या ताऱ्याच्या मागे गेले. जेथे बाळ होते ते ठिकाण येईपर्यंत तारा त्यांच्यासमोर जात होता. मग त्या ठिकाणावर तो थांबला.
10 ज्ञानी लोकांना ते पाहून फार आनंद झाला.
11 ज्ञानी लोक बाळ होते त्या गोठ्यात आले. त्यांनी बाळ व त्याची आई मरीया हिला पाहिले. त्यांनी लवून त्या बालकाला नमन केले. नंतर त्यांनी बाळासाठी आणालेल्या भेटवस्तु काढल्या. त्यांनी बाळाला सोने, ऊद व गंधरस ह्या बहुमोल वस्तु दिल्या.
12 पण देवाने स्वप्नाद्वारे त्या ज्ञानी लोकांना सावध केले आणि हेरोदाकडे परत जाऊ नका असे सांगिले. तेव्हा ते ज्ञानी लोक वेगव्व्या मार्गाने आपल्या देशास परतले.
13 ज्ञानी लोक गेल्यानंतर, प्रभूचा दूत स्वप्नात येऊन योसेफाला म्हणाला, “ऊठ! बालकाला आणि त्याच्या आईला घेऊन निसटून इजिप्त देशास जा. कारण बाळाचा घात करण्यासाठी हेरोद त्याचा शोध घेणार आहे, तेव्हा मी तुला धोका टळल्याची सूचना देईपर्यंत इजिप्तमध्येच राहा.”
14 तेव्हा तो उठाला व रात्रीच बाळाला व त्याच्या आईला घेऊन इजिप्त देशास गेला.
15 आणि हेरोद मरेपर्यंत तेथेच राहिला. प्रभु देवाने संदेष्ट्याच्या द्वारे सांगितले होते की, ‘मी माझ्या मुलाला इजिप्त देशातून बोलाविले आहे’ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले.
16 तेव्हा ज्ञानी लोकांनी आपल्याला फसविले, हे पाहून हेरोद अतिशय रागावाला. त्याने ज्ञानी लोकांकडून त्या बालकाच्या जन्माची वेळ नीट समजून घेतली होती. त्यानुसार बालक जन्मल्याला आता दोन वर्षे उलटली होती. म्हणून त्याने माणसे पाठवून बेथलहेम व त्याच्या आसपासच्या प्रदेशातील दोन वर्षाच्या व त्याहून कमी वयाच्या मुलांची कत्तल करण्याची आज्ञा केली.
17 यिर्मया संदेष्ट्यांच्या द्वारे देवाने जे सांगितले होते ते अशा प्रकारे पूर्ण झाले. ते वचन असे होते:
18 रामा येथे आकांत ऐकू आला. दु:खदायक रडण्याचा हा आकांत होता. राहेल आपल्या मुलांसाठी रडत आहे, पण तिचे सांत्वन करणे अशक्य झाले कारण तिची मुले मरण पावली आहेत.”

मत्तय 2:1-18

येशू आणि कृष्ण यांच्या जन्मात बरेच साम्य आहे. कृष्णास विष्णूचा अवतार म्हणून स्मरण केले जाते. लोगोस म्हणून, येशूचा जन्म हा जगाचा निर्माता, सर्वोच्च परात्पर परमेश्वराचा अवतार होता. दोन्ही जन्माच्या अगोदर भविष्यवाण्या केल्या गेल्या होत्या, स्वर्गीय संदेशवाहकांचा उपयोग करण्यात आला होता, आणि दुष्ट राजांनी त्यांच्या येण्याच्या विरोधात धमकावले होते.

पण येशूच्या विस्तृत जन्मामागील हेतू काय होता? तो का आला होता? मानवी इतिहासाच्या सुरूवातीपासूनच, परात्पर देवाने घोषित केले की तो आपल्या सर्वात खोल गरजा भागवेल. जसा कृष्ण कलानेमिनाचा नाश करायला आला, तसाच तेव्हा येशू आपल्या शत्रूचा नाश करायला आला, ज्याने आपणास बंदिवासात ठेवले होते. शुभबर्तमानात सांगितलेल्या येशूच्या जीवनाचा आढावा घेत असताना हे कसे होते आणि आज आपल्याकरिता त्याचा काय अर्थ आहे हे आपण शिकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *