Skip to content

ब्रम्ह आणि आत्मा यांस समजण्यासाठी लोगोसचा अवतार

  • by

भगवान ब्रह्मा हे विश्वाच्या निर्मात्याची ओळख करून देणारे सामान्य नाव आहे. प्राचीन ऋग्वेदात (इ.स.पू. 15००) प्रजापती हे नाव विशेषेकरून निर्मात्यासाठी वापरले जात असे पण पुराणात त्याची जागा ब्रह्म या नावाने घेतली. आजच्या उपयोगात, निर्माता म्हणून, भगवान ब्रह्म, विष्णू, (संरक्षक) आणि शिव (विनाशक) यांच्यासह, दैवीय त्रिमूर्तीच्या (त्रिएक परमेश्वर) तीन पैलूंपैकी एक आहे. ईस्वर (ईश्वर) हे ब्रह्माचे समानार्थी आहे कारण ते सृष्टीला कारणीभूत असलेल्या उच्च आत्म्यास देखील सूचित करते.

जरी ब्रह्मास समजणे हे एक प्राथमिक ध्येय असले तरी, प्रत्यक्षात हे मायावी आहे. भक्ती आणि पूजनांच्या बाबतीत शिव आणि विष्णू, यांस त्यांच्या पत्नी आणि अवतार या सोबत भगवान ब्रह्मापेक्षा जास्त लक्ष दिले जाते. आम्ही शिव आणि विष्णूचा अवतार आणि पत्नींची नावे लवकर सांगू शकतो, परंतु देव ब्रह्मासाठी आपण गडबडतो.

का?

ब्रह्म, ब्रह्मा किंवा ईश्वर, जरी निर्माता आहे, तरी आपण जे पाप, अंधार आणि ऐहिक जगाशी आसक्ती यांच्याशी धडपडत आहेत, त्यांस फार दूरचा व प्रवेश न करता येण्यासारखा वाटतो. जरी ब्रह्मा हा सर्व वस्तूचे व प्राणीमात्रांचे स्त्रोत आहे, आणि आपल्याला या स्त्रोताकडे परत जाण्याची गरज आहे, तरी या दैवी तत्वास समजण्याची आमची क्षमता अनाकलनीय वाटते. म्हणून आपण सहसा आपली भक्ती देवतांवर अर्पण करतो ज्या आपल्याला अधिक मानवीय, जवळच्या वाटतात, आणि आपल्यास प्रतिसाद देऊ शकतात. आपण ब्रह्माच्या स्वरूपाविषयी दूरवरूनच अनुमान काढतो. व्यावहारिकदृष्ट्या, ब्रह्म एक अज्ञात देव आहे, ब्रह्माचे पुतळे तुलनात्मकदृष्ट्या दुर्मिळ आहेत.

त्या अटकळीचा एक भाग देवाशी (ब्रह्म) प्राणाच्या (आत्म्याच्या) नात्याभोवती फिरतो. या प्रश्नावर अनेक ऋषीमुनींनी वेगवेगळ्या विचारसरणी मांडल्या आहेत. या अर्थाने, मानसशास्त्राचा अभ्यास, आपला प्राण किंवा आत्मा यांचा अभ्यास, ईश्वरविज्ञान अथवा ब्रह्मज्ञानाशी, ईश्वर किंवा ब्रह्म यांच्या अभ्यासाशी संबंधित आहे. जरी विविध मते अस्तित्त्वात आहेत, कारण आपण देवाचे वैज्ञानिक पद्धतीने परीक्षण करू शकत नाही, आणि देव दूर आहे म्हणून, अत्यंत बुद्धिसंपन्न तत्त्वज्ञानसुद्धा बहुधा अंधारात चाचपडणे होय.

दूरवरच्या दैवी निर्मात्याशी संपर्क साधण्याची ही असमर्थता व्यापक प्राचीन जगात ओळखण्यात आली होती. प्राचीन ग्रीक लोक जगाच्या तत्त्वाचे किंवा कारणाचे वर्णन करण्यासाठी लोगोस या शब्दाचा वापर करीत असत, आणि त्यांच्या लिखाणांत लोगोसची चर्चा होती. लॉजिक हा शब्द लोगोसपासून व्युत्पन्न झाला आहे, आणि प्रत्यय – लॉजी (उदा. ईश्वरविज्ञान अथवा ब्रह्मज्ञान, मानसशास्त्र, जीवशास्त्र इ.) असलेल्या अभ्यासाच्या सर्व शाखा लोगोसपासून आल्या आहेत. लोगोस ब्रह्म किंवा ब्रह्माच्या समतुल्य आहे.

इब्री लोकांशी (किंवा यहूदी लोकांशी) त्यांच्या राष्ट्राचा पूर्वज श्री. अब्राहम याच्यापासून दहा आज्ञा प्राप्त झालेल्या श्री मोशेपर्यंत निर्माणकर्त्याने केलेल्या व्यवहारांचे वर्णन इब्री वेदांमध्ये आहे. त्यांच्या इतिहासात, आमच्याप्रमाणेच, इब्री लोकांना वाटत असे की निर्माणकर्ता त्यांच्यापासून दूर झाला होता, आणि म्हणूनच ते अधिक जवळ आणि अधिक वैयक्तिक वाटणा‍ऱ्या इतर देवतांच्या उपासनेकडे आकृष्ट झाले. म्हणून इब्री वेद बरेचदा या इतर देवतांपासून वेगळे दाखविण्याकरिता निर्मात्याला परात्पर परमेश्वर म्हणीत. इ.स.पू. 7०० पूर्वी भारतात हद्दपार म्हणून आलेल्या इस्राएली लोकांनी, प्रजापती ते ब्रह्मापर्यंत स्थित्यंतर सुलभ केले असा आमचा अनुमान आहे, कारण हा देव त्यांचा पूर्वज, अब्राहम याने दर्शविला होता, आणि त्याच्याशी संबंधित देव (अ) ब्राहम झाला.

आपण आपल्या इंद्रियांनी ब्रह्मास पाहू शकत नाही, किंवा आपल्या आत्म्याचे स्वरूप समजू शकत नाही, आपल्या मनाने देव ब्रह्मास समजणे तर दूरची गोष्ट, त्यामुळे निश्चित ज्ञान मिळवण्याचा एकमेव मार्ग उरतो तो म्हणजे ब्रह्मचे स्वतःला आमच्यावर प्रकट करणे.

शुभवर्तमानात येशूला (येशूसत्संग) निर्माणकर्ता, किंवा परात्पर देव, ब्रह्म किंवा लोगोस याचा देहावतार असे दाखविले आहे. वेळोवेळी आणि विविध संस्कृतीतील सर्व लोकांद्वारे अनुभव केलेल्या या मर्यादांमुळे तो अगदी आपल्या जगात आला. योहानाच्या शुभवर्तमानात अशाप्रकारे येशूचा परिचय करून देण्यात आला आहे. जेथे आपण वाचतो की शब्द हाच तो लोगोस आहे जो मूळ ग्रीक ग्रंथातून भाषांतरित करण्यात आला आहे. शब्द/लोगोस यासाठी वापरण्यात आला की आम्हाला हे समजावे की  राष्ट्रीय देवतांची चर्चा केली जात नाही, परंतु त्या तत्त्वाची किंवा कारणाची ज्यापासून सर्व उत्पन्न झाले आहे. जेथे शब्द दिसेल तेथे आपण ब्रह्म शब्द घालू शकता आणि या पाठाचा संदेश बदलणार नाही.

गाची उत्पत्ति होण्यापूर्वी शब्दअस्तित्वात होता. तो शब्द देवाबरोबर होता. आणि शब्द देव होता.
तो शब्द सुरूवातीपासूनच देवाबरोबर होता.
त्याच्याद्वारे (शब्दाच्या) सर्व काही निर्माण करण्यात आले त्याच्याशिवाय काहीच निर्माण करण्यात आले नाही.
त्याच्यामध्ये जीवन होते. ते जीवन जगातील लोकांसाठी प्रकाश (समजबुद्धी, चांगुलपण) असे होते.
हा प्रकाश अंधारात प्रकाशतो. पण त्या प्रकाशाला अंधाराने पराभूतकेले नाही.
योहाननावाचा एक मनुष्य होता. देवाने त्याला पाठवीले.
तो लोकांना प्रकाशाविषयी (ख्रिस्ताविषयी) सांगण्यासाठी आला. यासाठी की, योहानाकडून प्रकाश विषयी ऐकून लोकांनी विश्वास ठेवावा.
योहान तो प्रकाश नव्हता, परंतु लोकांना प्रकाशाविषयी सांगण्यासाठी योहान आला.
खरा प्रकाश जगात येणार होता. हा प्रकाश सर्व लोकांना प्रकाश देतो.
10 शब्द अगोदरच जगात होता. त्याच्याद्वारेच जग निर्माण झाले. परंतु जगाने त्याला ओळखले नाही.
11 तो जगात आला, जे त्याचे स्वत:चे होते त्या लोकांकडे आला, परंतु त्याच्या स्वत:च्याच लोकांनी त्याला आपले मानले नाही.
12 काही लोकांनी त्याला आपले मानले. त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना त्याने देवाची मुले होण्याचा हक्क दिला.
13 ही मुले लहान बालके जन्मतात तशी जन्मली नाहीत. त्यांचा जन्म आईवडिलांच्या इच्छेने किंवा योजनेमुळे झाला नाही, तर त्यांचा जन्म देवाकडून झाला.
14 शब्द मनुष्य झाला आणि आमच्यामध्ये राहिला. आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते देवपित्याच्या एकमेव अशा पुत्राचे गौरव ख्रिस्ताशिवाय दुसरे असू शकत नाही. तो शब्द कृपा (दयाळूपणा) आणि सत्य यांनी पूर्णपणे भरला होता.
15 योहानाने त्याच्याविषयी लोकांना सांगितले. योहान म्हणाला, “ज्याच्याविषयी मी सांगत आहे तो हाच. मी म्हणालो, माझ्यानंतर येणारा माझ्याहून थोर आहे, तो मोझ्या अगोदरपासुन आहे.”
16 शब्द (ख्रिस्त) हा कृपा (दयाळूपणा) व सत्य यांनी पूर्णपणे भरला होता. त्याच्याकडून आम्हांला भरपूर आशीर्वाद मिळाले.
17 मोशेद्वारे नियमशास्त्र दिले, पण दया व सत्याचा मार्ग ही येशू ख्रिस्ताद्वारे प्राप्त झाली.
18 कोणाही मनुष्याने आतापर्यत देवाला कधी पाहिले नाही. परंतु एकमेव देव (येशू) जो बापाच्या उराशी आहे, तो पुत्राद्वारे आम्हांला प्रकट झाला आहे.

योहान 1:1-18

शुभवर्तमानात येशूचे संपूर्ण वर्णन रेखाटले आहे जेणेकरून तो कोण आहे त्याचे ध्येय काय आहे आणि आपल्यासाठी याचा काय अर्थ आहे  हे आपण समजावे. (“योहान” चे स्पष्टीकरण येथे देण्यात आले आहे.) शुभवर्तमान येशूचा परिचय देवाचा लोगोस म्हणून देते त्यामुळे आपल्याला माहित आहे की हे केवळ ख्रिस्ती लोकांसाठी नाही तर जे देवास, किंवा ब्रह्मास, अधिक साकार रूपात आणि स्वतःला अधिक चांगल्याप्रकारे समजू इच्छितात त्या सर्वांसाठी हे लिखाण आहे. थियॉलॉजी म्हणजे ईश्वरविज्ञान आणि सायकॉलॉजी अर्थात मानसशास्त्र या शब्दांमध्ये लोगोस हा शब्द एम्बेड केलेला असल्याने आणि ‘कोणीही देवाला कधी पाहिले’ नसल्यामुळे, आपला प्राण (आत्मा) आणि देव (ब्राह्मण) यांस समजून घेण्यासाठी येशूच्या व्यक्तित्वाचा विचार करण्यापेक्षा दुसरा कोणता चांगला मार्ग असू शकेल? तो जगला, चालला आणि सत्यापित करता येईल अशा इतिहासात त्याने शिकविले. आम्ही त्याच्या जन्मापासून सुरुवात करतो, ज्याची शुभवर्तमानांत नोंद आहे ज्याद्वारे “शब्द देह झाला”.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *