Skip to content

दक्ष यज्ञ, येशू आणि “हरविलेले”

  • by

विविध लिखाण दक्ष यज्ञाची कथा सांगतात पण त्याचा सार असा आहे की शक्ती भक्त जिला शुद्ध आदिम ऊर्जा मानतात त्या आदि पराशक्तीचा अवतार दक्षायन/सती हिच्याशी शिवने विवाह केला होता. (आदि पराशक्ती ही परमशक्ती, आदिशक्ती, महाशक्ती, महादेवी, महागौरी, महाकाली किंवा सत्यम शक्ती म्हणूनही ओळखली जाते).

दक्षायनचे वडील दक्ष याने शिवाच्या अति तपस्वीपणामुळे तिचे शिवाशी लग्न करण्यास नकार दिला. म्हणून जेव्हा दक्षने यज्ञाचा विधी केला तेव्हा त्याने आपली मुलगी सती आणि शिव वगळता संपूर्ण कुटूंबास आमंत्रण दिले. पण सती, यज्ञ सोहळ्याविषयी ऐकून तेथे गेली. ती तेथे हजर झाली म्हणून तिच्या वडिलांना राग आला आणि तो तिने जावे म्हणून सतत तिच्यावर ओरडत होता. यामुळे सतीला राग आला म्हणून तिने आपल्या आदिशक्तीचे रूप धारण केले आणि तिने सतीचा नश्वर देह यज्ञाच्या अग्नीत बळी केला आणि तो देह अग्नीच्या ज्वालांमध्ये भस्म होऊन जमिनीवर कोसळला.

दक्ष यज्ञामध्येहानिशोधणे

सतीच्या बलिदानामुळे शिवाला दुख झाले.  त्याने आपली लाडकी सती गमावली होती. म्हणून शिवाने भयंकर “तांडव”, किंवा विनाशाचे नृत्य केले आणि शिवाने जितके नृत्य केले तितकाच विनाश होत गेला. त्याच्या तांडवामुळे पुढील दिवसांत व्यापक नाश व मृत्यू घडून आला. त्याच्या झालेल्या हानिमुळे दुःखी व संतप्त होऊन, शिव सतीचे शरीर घेऊन त्यासह विश्वाच्या भोवती फिरला. विष्णूने त्या शरीराचे 51 तुकडे केले आणि ते पृथ्वीवर पडले आणि शक्तिपीठांची पवित्र ठिकाणे बनली. ही 51 पवित्र स्थळे विविध शक्ती मंदिरे म्हणून आज शिवाने सतीला गमाविल्यामुळे जी हानि अनुभव केली त्यास साजरी करतात.

दक्ष यज्ञात देव व देवी जेव्हा एकमेकांना मृत्यूमुळे गमावतात तेव्हा आपण त्यांनी अनुभवलेल्या हानिस मूल्यवान समजतो. पण आपण सर्वजण आपल्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूमुळे हानि सहन करीत असतो? आपल्या प्रिय व्यक्तीला गमावल्यास आपण काय करता? आपण निराश होता का? रागाच्या भरात येऊन मारहाण करता का? त्यांना परत मिळवण्याचा प्रयत्न करता का?

देवाचे काय? आपल्यापैकी एखादा त्याच्या राज्यास गमावल्यास त्याला काळजी वाटते का किंवा त्याचे त्याकडे लक्ष जाते का?

येशूहानिच्याभिंगाद्वारे शिकवितो

जेव्हा देव आपल्यापैकी एकालाही गमावतो तेव्हा त्याला कसे वाटते आणि तो काय करतो हे दाखवण्यासाठी येशूने अनेक दृष्टांत सांगितले.

त्याच्या शिकवणुकीमागील भावना जाणण्याकरता आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की पवित्र लोक आपण अशुद्ध होऊ नये म्हणून अशा लोकांपासून जे पवित्र नसतात, बरेचदा वेगळे राहतात. हे येशूच्या काळातील धर्मनियमांच्या शिक्षकांबाबत खरे होते. परंतु येशूने शिकवले होते की आपली शुद्धता आणि स्वच्छता ही आपल्या अंतःकरणाची सर्वात महत्त्वाची बाब आहे, आणि जे विधीदृष्ट्या शुद्ध नव्हते त्यांच्याबरोबर राहण्याचा त्याने सक्रिय प्रयत्न केला. अशुद्ध व्यक्तींबरोबर त्याची संगत आणि धार्मिक शिक्षकांच्या प्रतिक्रियेविषयी शुभवर्तमान कसे लिहिते ते येथे दिलेले आहे.

र्व पापी लोक त्याचे ऐकायला त्याच्याकडे येत होते.
2 तेव्हा परुशी व नियमशास्त्राचे शिक्षक कुरकुर करु लागले. ते म्हणू लागले, “हा पाप्यांचे स्वागत करतो आणि त्यांच्याबरोबर जेवतो!”

लूक 15:1-2

येशूने पापी लोकांचे स्वागत का करावे व त्यांच्यासोबत भोजन का करावे? तो पापाचा आनंद घेत असे का? येशूने तीन दृष्टांत सांगून आपल्या टीकाकारांना उत्तर दिले.

हरवलेल्या मेंढराचा दृष्टांत

3 मग येशूने त्यांना ही गोष्टी सांगितली.
4 “जर तुमच्यापैकी कोणा एकाजवळ शंभर मेंढरे असून त्यातील एक हरवले, तर तो नव्याण्णव रानांत सोडून हरवलेल्या मेंढरामागे ते सापडेपर्यंत जाणार नाही काय?
5 आणि जेव्हा त्याला ते सापडते तेव्हा तो आनंदाने ते खांद्यांवर घतो.
6 आणि घरी येतो, तेव्हा मित्रांना आणि शेजाऱ्याना एकत्र करुन म्हणतो, “माइयाबरोबर आनंद करा कारण माझे हरवलेले मेंढरु सापडले आहे.’
7 मी तुम्हांस सांगतो, त्याचप्रमाणे ज्यांना पश्चात्तापाची गरज नाही अशा नव्याण्णव नीतिमानांपेक्षा पश्चात्ताप करणार्या एका पाप्याबद्दल स्वर्गात अधिक

आनंद होईल.लूक 15:3-7

या कथेत येशू स्वतःस मेंढपाळ म्हणून आमची मेंढरांशी तुलना करतो. हरवलेल्या मेंढराचा शोध घेणार्या कोणत्याही मेंढपाळाप्रमाणे, तो स्वतः हरवलेल्या माणसांना शोधण्यासाठी बाहेर पडतो. कदाचित कुठल्यातरी पापाने – अगदी एक गुप्त पापदेखील – आपल्याला फसवले असेल, ज्यामुळे आपणास हरवलेल्यासारखे वाटत असेल. किंवा कदाचित आपले आयुष्य, सर्व समस्यांसह, इतके गोंधळलेले आहे की आपणास हरवलेले असल्यासारखे वाटते. ही कथा आशा देते कारण आपण हे जाणू शकता की येशू आपल्याला शोधत आहे. आपणास हानि पोहोचण्यापूर्वीच त्याला तुमची सुटका करावयाची आहे. तो असे करतो कारण जेव्हा आपण हरवलेले असता तेव्हा त्याची हानि होते.

मग त्याने दुसरी कथा सांगितली.

हरवलेल्या नाण्याचा दृष्टांत

8 “समजा एका बाईजवळ चांदीची दहा नाणी आहेत. जर तिचे एक नाणे हरवले तर ती दिवा लावून घर झाडून ते मिळेपर्यंत काळजीपूर्वक शोधणार नाही काय?
9 आणि जेव्हा तिला ते नाणे सापडते तेव्हा ती मैत्रिणींना आणि शेजाऱ्याना बोलाविते आणि म्हणते, “माइयाबरोबर आनंद करा कारण माझे हरवलेले नाणे सापडले आहे.’
10 त्याचप्रमाणे पश्चात्ताप करणाऱ्या एका पाप्याबद्दल देवाच्या दूतासमोर आनंद होतो हे मी तुम्हांस सांगतो.”

लूक 15:8-10

या कथेत आम्ही एक मौल्यवान परंतु हरवलेले नाणे आहोत आणि त्याचा शोध घेणारा तो आहे. नाणे हरवले असले तरी त्याला ‘माहीत’ नाही की ते हरवले आहे. त्याला तोटा जाणवत नाही. त्या स्त्रीला हानिचा बोध होतो आणि म्हणूनच ती प्रत्येक वस्तूच्या खाली आणि मागे काळजीपूर्वक घर झाडून काढते, जोवर तिला ते मौल्यवान नाणे सापडत नाही तोवर तिला समाधान होत नाही. कदाचित आपणास हरवलेले असल्याचे ‘जाणवत’ नसेल. परंतु सत्य हे आहे की आपण सर्वजण हरवलेले आहोत, आपल्याला हे वाटत असो किंवा नसो. येशूच्या दृष्टीत आपण एक मौल्यवान परंतु हरवलेले नाणे आहात आणि त्याला तोटा जाणवतो म्हणून तो आपला शोध घेतो आणि आपणास शोधण्याचा प्रयत्न करतो.

त्याची तिसरी कथा सर्वप्रसिद्ध आहे.

हरवलेल्या पुत्राचा दृष्टांत

11 मग येशू म्हणाला, “एका मनुष्याला दोन मुलगे होते.
12 त्यापैकी धाकटा म्हणाला, “बाबा, मलामत्तेचा माझा वाटा मला द्या.’ आणि वडिलांनी आपली संपत्ती दोघा मुलांमध्ये विभागली.
13 नंतर फार दिवस झाले नाहीत तोच धाकट्या मुलाने आपले सर्व गोळा केले आणि तो दूरदेशी निघून गेला. तेथे त्याने सर्व संपत्ती चैनीचे जीवन जगून उधळून टाकली.
14 त्याने सर्व पैसे खर्च केल्यावर, त्या देशांत भयंकर दुष्काळ पडला व त्याला गरज भासू लागली.
15 मग तो गेला आणि त्या देशातील एका नागरिकाजवळ नोकरी करु लागला. त्या नागरिकाने त्याला डुकरे चारावयास पाठविले.
16 तेव्हा डुकरे खातात त्या शेंगा तरी खाव्यात अशी त्याला इच्छा होई, पण कोणी त्याला काहीही दिले नाही.
17 नंतर तो शुद्धीवर आला आणि म्हणाला, “माझ्या पित्याच्या घरी किती तरी मजुरांना पुरुन उरेल इतके अन्न आहे आणि येथे मी भुकेने मरतो आहे!
18 मी उठून आपल्या वडिलांकडे जाईन आणि त्यांना म्हणेन, बाबा, मी स्वार्गाविरुद्ध (देवाविरुद्ध) आणि तुमच्याविरुद्ध पाप केले आहे.
19 तुमचा मुलगा म्हणवून घेण्यास मी योग्य नाही. मला आपल्या रोजंदारीवरील मजुरांसारखे ठेवा.”
20 मग तो उठला आणि आपल्या पित्याकडे गेला. तो दूर असतानाच पित्याने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळा आला. वडील पळत गेले आणि त्याच्या गळ्या पडले आणि त्याचे मुके घेतले.
21 ʇमुलगा त्यांना म्हणाला, “बाबा, मी स्वार्गाविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केले आहे. तुमचा मुलगा म्हणवून घेण्यास मी योग्य नाही.’
22 परंतु वडील आपल्या नोकरांस म्हणाले, “त्वरा करा, चांगला झगा आणून त्याला घाला. त्याच्या हातात अंगठी आणि पायात जोडे घाला.
23 आणि पुष्ट वासरु आणून कापा, आपण खाऊ आणि आनंद करु!
24 कारण हा माझा मुलगा मेला होता पण जिवंत झाला आहे! तो हरवला होता, पण आता सापडला आहे.’ व ते आनंद करु लागले.
25 ʇत्याचा मोठा मुलगा शेतात होता. तो घराकडे निघाला. जेव्हा तो घराजवळ आला, तेव्हा त्याने गायनवादन व नाचण्याचा आवाज ऐकला.
26 त्याने एका नोकराला बोलावून विचारले, “हे सर्व काय चालले आहे?’
27 तो नोकर त्याला म्हणाला. “तुमचा भाऊ आला आहे. तो सुखरुप आला म्हणून तुमच्या वडिलांनी पुष्ट वासरु कापले आहे.’
28 मोठा मुलगा रागावला त्याला आत जाण्याची इच्छा होईना. तेव्हा वडिलांनी येऊन त्याची समजूत काढली.
29 परंतु त्याने वडिलांना उत्तर दिले, “पाहा, इतकी वर्षे मी तुमचीसेवा केली आहे व कधीही तुमची आज्ञा मोडली नाही! मित्रांबरोबर आनंद करण्यासाठी तुम्ही मला कधी बकरीसुद्धा दिली नाही.
30 ज्याने तुमची सर्व संपत्ती वेश्यांसाठी उधळली तो तुमचा मुलगा परत आला तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी पुष्ट वासरु कापले!
31 वडील त्याला म्हणाले, “माझ्या मुला, तू नेहमीच माझ्याबरोबर आहेस आणि जे माझे आहे ते सर्व तुझे आहे.
32 आपण आनंद आणि उत्सव केला पाहिजे कारण हा तुझा भाऊ मेला होता तो जिवंत झाला आहे. तो हरवला होता, तो सापडला आहे.”‘

लूक 15:11-32

या कथेत आम्ही एकतर मोठा, धार्मिक मुलगा आहोत, किंवा लहान मुलगा जो खूप दूर निघून जातो. जरी मोठ्या मुलाने सर्व धार्मिक पूजांचे पालन केले तरी त्याला वडिलांचे प्रेमळ हृदय कधीच कळले नाही. धाकट्या मुलाने विचार केला की आपण घर सोडून स्वातंत्र्य मिळवीत आहोे पण त्याने स्वतःला उपासमार व अपमानाच्या बंधनात टाकले. मग आपण परत आपल्या घरी जाऊ शकतो हे जाणून, तो ‘भानावर’ आला. परत गेल्यास हे स्पष्ट होईल की सर्वप्रथम त्याचे जाणे चुकीचे होते, आणि हे मान्य करण्यासाठी नम्रता लागेल. स्वामी योहानाने शिकवलेला ‘पश्चात्ताप’ म्हणजे काय, हे यावरून स्पष्ट होते.

जेव्हा त्याने आपला अभिमान गिळून टाकला आणि आपल्या वडिलांकडे परत गेला तेव्हा त्याचे प्रेम आणि स्वीकृती त्याच्या कल्पनेपेक्षा कितीतरी अधिक असल्याचे त्याने पाहिले. जोडे, अंगरखा, अंगठी, मेजवानी, आशीर्वाद, स्वीकृती – हे सर्व प्रेमपूर्ण स्वागताविषयी सांगते. यावरून आम्हाला हे समजून घेण्यास मदत मिळते की देव आपल्यावर तितकीच प्रीति करतो, आपण त्याजकडे परत यावे अशी त्याची इच्छा आहे. यासाठी आपण ‘पश्चात्ताप’ करणे आवश्यक आहे परंतु जेव्हा आम्ही तो करू तेव्हा आपण त्याला आपणास स्वीकारण्यास तयार असल्याचे पाहू.

दक्ष यज्ञात आपण पाहतो की शिव आणि आदि पराशक्तीचे शक्तीसामथ्र्यदेखील मृत्यूच्या विभक्तीवर मात करू शकले नाही. सतीच्या 51 शक्तींच्या विखुरलेल्या शरीराचे अवयव आजपर्यंत या गोष्टीची साक्ष देतात. हे अंतिम ‘हरवलेल्या’ चे वर्णन करते. ह्या अशाप्रकारच्या ‘हरवण्यापासून’ येशू आपल्याला सोडवण्यासाठी आला. जेव्हा तो त्या अंतिम शत्रूचा – स्वतः मृत्यूचा सामना करतो तेव्हा आपण हे पाहतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *