येशूचे पुनरुत्थान: मिथक की इतिहास?

पुराण, रामायण, आणि महाभारत या ग्रंथांत असे वर्णन आहे की आठ चिरंजीवी लोक युगाच्या समाप्तीपर्यंत जिवंत राहतील अशी ख्याती आहे. जर या पुराणकथा ऐतिहासिक आहेत तर हे चिरंजीवी आज पृथ्वीवर जगत आहेत, आणि हजारों वर्षे जगत राहतील.

हे चिरंजीवी आहेत:

  • त्रेता युगाच्या शेवटी जन्मलेल्या महाभारताची रचना करणारे वेद व्यास.
  • रामायणात वर्णन केल्याप्रमाणे ब्रह्मचारींपैकी एक हनुमानाने रामाची सेवा केली.
  • परशुराम, याजक-योद्धा आणि विष्णूचा सहावा अवतार, सर्व युद्धात कुशल.
  • रामला शरण गेलेला रावणाचा भाऊ विभीषण. रावणाला मारल्यानंतर रामाने विभीषणास लंकेचा राजा म्हणून मुकुट घातला त्याला दीर्घायुष्याचा वर मिळाला होता की तो महायुगाच्या शेवटापर्यंत जिवंत राहील.
  • कुरुक्षेत्र युद्धात एकट्याने वाचलेले अश्वत्थामा, आणि कृपा अजूनही जिवंत आहेत. अश्वत्थामाने काही लोकांना बेकायदेशीरपणे मारले म्हणून कृष्णाने त्याला पृथ्वीवर भटकण्याचा व असाध्य फोडांनी त्याचे शरीर झाकलेले असेल असा शाप दिला.
  • महाबली, (राजा बाली चक्रवर्ती) केरळच्या आसपास कुठेतरी राक्षस-राजा होता. तो इतका शक्तिशाली होता की देवांना त्याची भिती वाटत असे. तर विष्णूचा ठेंगणा अवतार वामनाने त्यालाफसवून त्याला पाताळात पाठविले.
  • महाभारतात राजकुमारांचा गुरु कृपा हा कुरुक्षेत्र युद्धात वाचलेल्या तीन कौरवांपैकी एक होता. असा अद्भुत गुरू असल्याने कृष्णाने त्यांना अमरत्व दिले आणि तो आजही जिवंत आहे.
  • महाभारतात उल्लेखिलेला मार्कंडेय हा एक प्राचीन ऋषी आहे, ज्याला शिवाने त्याच्यावरील भक्तीमुळे अमरत्वाचा वर दिलाण्

चिरंजीव ऐतिहासिक आहेत?

प्रेरणादाक म्हणून जरी त्यांचा आदर केला जात असला तरीही इतिहासामध्ये चिरंजीवांची स्वीकृती असमर्थित आहे. कोणत्याही इतिहासकाराने त्यांच्याबरोबर प्रत्यक्षदर्शी भेट घेतल्याचे नोंदविले नाही. पौराणिक कथांमध्ये उल्लेखिलेली कोणतीही ठिकाणे भौगोलिकदृष्ट्या आढळलेली नाहीत. महाभारत, रामायण आणि पुराणांसारखे लेखी स्रोत ऐतिहासिकदृष्ट्या सत्यापित करणे अवघड आहेत. उदाहरणार्थ, विद्वानांचे मूल्यांकन आहे की रामायण इ.स.पू. 5 व्या शतकात लिहिले गेले होते. परंतु मांडणी 870000 वर्षांपूर्वीच्या त्रेता युगात आहे, जो या घटनांस क्वचितच प्रत्यक्षदर्शी स्त्रोत ठरवितो. त्याचप्रमाणे महाभारतही ई. स. पू. 3 रे शतक आणि ईस्वी 3 रे शतक या दरम्यान रचले गेले होते, पण त्यात शक्यतः ई. स. पू. 8-9 व्या शतकातील घटनांचे वर्णन आहे. लेखकांनी वर्णन केलेल्या घटना त्यांनी पाहिल्या नव्हत्या कारण त्या शेकडो वर्षांपूर्वी घडल्या होत्या.

येशूच्या पुनरुत्थानाची ऐतिहासिकदृष्ट्या तपासणी केली गेली.

येशूच्या पुनरुत्थानाच्या आणि नवीन जीवनाच्या बायबलच्या दाव्याबद्दल काय? येशूचे पुनरुत्थान हे चिरंजीवींप्रमाणे पौराणिक आहे की ते ऐतिहासिक आहे?

याचा थेट परिणाम आपल्यावर होत असल्याने याची तपासणी करण्यासारखे आहे. आपण कितीही पैसा, शिक्षण, आरोग्य आणि इतर उद्दिष्टे साध्य केली तरी आपण मरणार आहोत. जर येशूने मृत्यूला पराभूत केले असेल तर आपल्याला जवळ असलेल्या मृत्यूस तोंड देत असतांना हे आशा देते. त्याच्या पुनरुत्थानाचे समर्थन करणारी काही ऐतिहासिक माहिती येथे आपण पाहतो.

येशूची ऐतिहासिक पार्श्वभूमी

येशू अस्तित्वात होता आणि इतिहासाच्या मार्गात बदल घडवून आणणारा सार्वजनिक मृत्यू मरण पावला हे निश्चित आहे. जगीक इतिहासामध्ये येशूविषयी आणि त्याच्या दिवसातील जगावरील त्याच्या प्रभावाचे अनेक उल्लेख नोंदवले गेले आहेत. त्यापैकी दोन पाहू या.

टॅसिटस

रोमन सम्राट नीरोने 1 ल्या शतकातील ख्रिस्ती लोकांना (ईस्वी सन 65 मध्ये) कसे मारले याची नोंद करीत असतांना रोमन राज्यपाल-इतिहासकार टॅसिटस याने येशूचा एक उल्लेखनीय संदर्भ लिहिला. टॅसिटसने जे लिहिले ते येथे आहे.

‘सामान्यतः ख्रिस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकांस ‘नीरोने अतोनात यातनांसह शिक्षा दिली, ज्यांचा त्यांच्या विशाल संख्येमुळे द्वेष केला जात असे. या नावाचा संस्थापक ख्रिस्त याचा टाइबेरियसच्या कारकिर्दीतील यहूदियाचा राज्यपाल पंतय पिलात याने वध केला; परंतु काही काळासाठी दडपलेली धोकादायक अंधश्रद्धा पुन्हा केवळ यहूदियात नव्हे, जेथे हा उपद्रव उद्भवला होता, तर रोमच्या नगरातही पसरली.’टॅसिटस.

बखर 15. 44. 112 ईस्वी सन्

टॅसिटस या गोष्टींची पुष्टी करतो:

1. येशू अस्तित्वात होता,

2. पंतय पिलाताने त्याला मरणदंड दिला

3. यहूदिया/यरूशलेम

4. सन 65 पर्यंत येशूवरील विश्वास इतक्या प्रबळतेने भूमध्यक्षेत्र ओलांडून रोमपर्यंत पसरला होता की रोमचा सम्राट नीरो याला वाटले की त्याला त्याचा नायनाट करावा लागेल.

हे लक्षात घ्या की टॅसिटस या चळवळीचा विचार प्रतिकूल साक्षीदार म्हणून करीत असल्याने असे बोलत आहे कारण त्याला येशूने सुरू केलेली चळवळ ‘दुष्ट अंधश्रद्धा’ वाटते. तो याला विरोध करतो, पण त्याचे ऐतिहासिकत्व नाकारत नाही.

जोसेफस

पहिल्या शतकातील यहूदी लष्करी नेता/इतिहासकार जोसेफस याने पहिल्या शतकात लेखन केले व यहूदी इतिहासाच्या सुरुवातीपासूनच त्याच्या काळापर्यंत सारांश दिला. असे करीत असतांना त्याने येशूची वेळ आणि कारकीर्द याविषयी खालील शब्दांत मांडले:

‘यावेळी एक बुद्धिमान इसम होता…येशू…चांगले आणि…सद्गुणी. आणि यहूदी तसेच इतर देशातील अनेक लोक येशूचे शिष्य झाले. पिलाताने त्याला वधस्तंभावर खिळून मारण्याची शिक्षा दिली. आणि जे त्याचे शिष्य झाले होते त्यांनी त्याचे शिष्यत्व सोडले नाही. त्यांनी सांगितले की त्याच्या वधस्तंभारोहणाच्या तीन दिवसानंतर त्याने त्यांस दर्शन दिले आणि हे की तो जिवंत होता.

जोसेफस. 90 .. पुरातन वस्तू 18.33

जोसेफस याची पुष्टी करतो की:

1. येशू अस्तित्वात होता,

2. तो एक धार्मिक शिक्षक होता,

3. त्याच्या शिष्यांनी जाहीरपणे येशूच्या पुनरुत्थानाची घोषणा केली.

या ऐतिहासिक झलकांवरून हे दिसून येते की ख्रिस्ताचा मृत्यू ही एक सुप्रसिद्ध घटना होती आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्या पुनरुत्थानाचा मुद्दा ग्रीक-रोमन जगावर ठसवून टाकला.

जोसेफसआणिटॅसिटसयांनीपुष्टीकेलीकीयेशूचीचळवळयहूदियातसुरुझालीहोतीपणलवकरचरोममध्येपसरली

बायबलमधील ऐतिहासिक पार्श्वभूमी

इतिहासकार लूक पुढे समजावितो की प्राचीन जगामध्ये हा विश्वास कसा वाढला. बायबलच्या प्रेषितांच्या कृत्यांच्या पुस्तकातील त्याचा उतारा येथे आहे:

त्र व योहान लोकांशी बोलत असताना, काही लोक त्यांच्याकडे आले. त्यातील काही यहूदी याजक, मंदिराचे रक्षण करणाऱ्या शिपायांचा कप्तान व काही सदूकी लोक होते.
2 ते चिडले होते. कारण दोन प्रेषित लोकांना शिकवीत होते. पेत्र व योहान लोकांना शिकवीत होते की, येशूच्या सामर्थ्याने मेलेली माणसे पुन्हा उठतील.
3 यहूदी पुढाऱ्यानी व नियमास्त्र शिक्षकांनी पेत्र व योहानाला धरले व तुरुंगात टाकले. अगोदरच रात्र झाली होती, म्हणून त्यांनी पेत्र व योहान यांना दुसऱ्या दिवसापर्यंत तुरुंगात ठेवले.
4 परंतु पेत्र व योहान यांचा संदेश ऐकणाऱ्या पुष्कळ लोकांनी, त्यांनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवला. विश्वासणाऱ्यांच्या गटामध्ये सुमारे पाच हजार लोक होते.
5 दुसऱ्या दिवशी यहूदी लोकांचे पुढारी, वडीलजन, व नियमशास्त्र शिकविणारे शिक्षक यरुशलेममध्ये एकत्र जमले.
6 हन्ना (प्रमख याजक), केफा, योहान आणि अलेक्यांद्र हे तेथे होते. तसेच प्रमुख याजकाच्या घरातील प्रत्येक जण हजर होता.
7 त्यांनी पेत्र व योहान यांना सर्वांसमोर उभे राहण्यास सांगितले, यहूदी पुढाऱ्यांनी पुष्कळ वेळ त्यांना विचारले. “या लंगड्या माणसाला तुम्ही कसे बरे केले? कोणत्या शक्तीचा उपयोग तुम्ही केला? कोणाच्या अधिकाराने हे तुम्ही केले?”
8 मग पेत्र पवित्र आत्म्याने भरला गेला. तो त्यांना म्हणाला, “अहो पुढाऱ्यांनो आणि वडीलधारी लोकांनो;
9 या लंगड्या माणासाच्या बाबतीत जी चांगली गोष्ट झाली त्याबद्दल तुम्ही आम्हांला प्रश्न विचारीत आहात काय? तुम्ही आम्हांला विचारीत आहात का की याला कोणी बरे केले?
10 तुम्ही सर्वांनी आणि यहूदी लोकांनी समजून घ्यावे अशी आमची इच्छा आहे, ती ही की, नासरेथच्या येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याने हा मनुष्य बरा झाला! तुम्ही येशूला वधस्तंभावर खिळले. देवाने त्याला मरणातून उठविले. हा मनुष्य लंगडा होता, पण आता तो चांगला झाला आहे. आणि येशूच्या सामर्थ्यामुळे तुमच्यासमोर उभा राहू शकत आहे!
11 ‘तुम्ही बांधणारांनी जो दगड नापसंत केला, जो पुढे कोनशिल झाला तोच हा येशू होय.’
12 येशू हा एकमेव आहे जो लोकांना तारु शकेल. त्याचे नाव हेच सामर्थ्य फक्त जगामध्ये आहे जे लोकांना तारण्यासाठी दिले आहे, आमचे तारण येशूद्वारे झालेच पाहिजे!”
13 यहूदी लोकांना समजले की, पेत्र व योहान यांचे खास प्रशिक्षण किंवा शिक्षण झालेले नाही. पण पुढाऱ्यांनी हे सुद्धा पाहिले की, पेत्र व योहान बोलायला घाबरत नव्हते. म्हणून पुढारी आश्चर्यचकित झाले. मग त्यांना उमगले की, पेत्र व योहान येशूबरोबर होते.
14 त्यांनी पाहिले की, तो लंगडा मनुष्य तेथे दोन प्रेषितांसह उभा आहे. त्यांनी पाहिले की, तो मनुष्य बरा झालेला आहे. म्हणून ते प्रेषितांविरुद्ध काही बोलू शकत नव्हते.
15 यहूदी पुढारी त्यांना म्हणाले की, त्यांनी सभा सोडून जावे. मग पुढारी काय करायला हवे याविषयी एकमेकांमध्ये विचारविनिमय करु लागले.
16 ते म्हणाले, “या मनुष्यांचे आपण काय करावे? यरुशलेममधील प्रत्येक व्यक्ति हे जाणतो की, त्यांनी एक महान चमत्कार केला आहे, हे स्पष्ट आहे. आपण असे म्हणू शकत नाही की ते खरे नाही.
17 परंतु आपण त्यांना त्या माणसाविषेयी (येशूविषयी) सांगण्यास (प्रतिबंध करु) घाबरुन सोडू. मग ही समस्या लोकांमध्ये पसरणार नाही.”

प्रेषितांचीकृत्ये 4:1-17 ईस्वीसन 63

अधिकाऱ्याचा आणखी विरोध

17 प्रमुख याजक आणि त्याचे सर्व मित्र (सदूकी नावाचा एक गट) यांना फार हेवा वाट लागला.
18 त्यांनी प्रेषितांना धरले आणि तुरुंगात टाकले.
19 पण रात्रीच्या वेळी देवाच्या दूताने तुरुंगाचा दरवाजा उघडला. देवदूताने प्रेषितांना बाहेर आणले आणि म्हणाला,
20 “जा आणि मंदिरात उभे राहा. येशू रिव्रस्तामधील जे नवीन जीवन आहे त्याविषयी लोकांना सांगा.”
21 जेव्हा प्रेषितांनी हे ऐकले, त्यांनी ती आज्ञा पाळली आणि मंदिरात गेले. ती पहाटेची वेळ होती, आणि तेथे लोकांना शिक्षण देऊ लागले, प्रमुख याजक व त्याचे मित्र सभास्थानात आले. त्यांनी यहूदी पुढाऱ्यांची सभा आणि सर्व वडीलजन, जे यहूदी लोकांचे नेते होते यांची एकत्र सभा बोलाविली. मग प्रेषितांना तेथे घेऊन येण्यासाठी काही जणांना तुरुंगात पाठविले.
22 जेव्हा शिपाई तुरुंगामध्ये त्यांना पाहावयास गेले, तेव्हा त्यांना आतमध्ये प्रेषित आढळले नाहीत. म्हणून त्यांनी परत जाऊन यहूदी पुढाऱ्यांना त्याविषयी सांगितले.
23 शिपाई म्हणाले, “तुरुंगाची दारे बंद केलेली व त्यांसा कुलुप लावलेले होते. तसेच पहारेकरीही दारावर पहारा देत आहेत. परंतु आम्ही जेव्हा दार उघडले, तेव्हा आतमध्ये कोणीच आढळले नाही!”
24 मंदिराच्या पहारेकऱ्यांच्या सरदाराने आणि प्रमुख याजकाने हे शब्द ऐकले. ते गोंधळात पडले, व यानंतर काय होईल याबद्दल बुचकळ्यात पडले.
25 नंतर कोणी एक आला आणि म्हणाला, “ज्या लोकांना तुम्ही तुरुंगात टाकले ते तर मंदिरात उभे राहून लोकांना शिक्षण देत आहेत!”
26 तेव्हा कप्तान व त्याचे लोक बाहेर गेले व प्रेषितांना पुन्हा घेऊन आले. त्यावेळी त्यांनी बळाचा वापर केला नाही, कारण त्यांना लोकांचे भय वाटले व असे वाटले की लोक कदाचित त्यांना दगडमार करतील.
27 त्यांनी प्रेषितांना आणून सभेपुढे उभे केले. प्रमुख याजकाने प्रेषितांना प्रश्न विचारले.
28 तो म्हणाला, “आम्ही तुम्हांला (येशू) या मनुष्याच्या नावाने शिक्षण देऊ नका म्हणून ताकीद दिली होती. आणि तरीही तुम्ही तुमच्या शिकवणुकीचा प्रसार सर्व यरुशलेमभर केलात. आणि या मनुष्याच्या (येशूच्या) मरणाचा दोष आमच्यावर ठेवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करीत आहात.”
29 पेत्र व इतर प्रेषितांनी उत्तर दिले, “आम्हांला देवाची आज्ञा पाळलीच पाहिजे, तुमची नाही!
30 तुम्ही येशूला मारले. तुम्ही त्याला वधस्तंभावर खिळले. परंतु त्याच देवाने, जो आमच्या वाडवडिलांचा (पूर्वजांचा) देव होता, त्याने येशूला मरणातून उठविले!
31 देवाने त्याला उठविले व आपल्या उजवीकडे बसाविले. देवाने येशूला राजपुत्र व उद्धारकर्ता म्हणून उजवीकडे बसविले. देवाने हे यासाठी केले की, यहूदी लोकांनी त्यांची ह्रदये व जीविते बदलावीत. ह्या गोष्टी घडताना आम्ही पाहिल्या.
32 पवित्र आत्मासुद्धा हे खरे आहे हे दर्शवितो. जे लोक देवाची आज्ञा पाळतात त्या सर्वांना त्याने पवित्र आत्मा दिलेला आहे.”
33 जेव्हा यहूदी सभेच्या पुढाऱ्यांनी हे शब्द ऐकले, तेव्हा ते खूप रागावले. त्यांनी प्रेषितांना जिवे मारण्यासंबधी विचार सुरु केला.
34 सभेमध्ये गमलीएल नावाचा एक परुशी उभा राहिला. नियमशास्त्राचा तो शिक्षक होता. आणि सर्व लोक त्याला मान देत असत, त्याने लोकांना सांगितले की, काही वेळासाठी प्रेषितांना बाहेर पाठवा.
35 नंतर तो त्यांना म्हणाला, “इस्राएलच्या लोकांनो, या लोकांना जे काही करण्याचा विचार तुम्ही करीत आहात त्याबद्दल सावधगिरी बाळगा.
36 काही काळापूर्वी थुदासचा जन्म झाला. आपण कोणी थोर असल्याचा दावा त्याने केला. सुमारे चारशे जण त्याला जाऊन मिळाले, पण त्याला ठार मारण्यात आले त्याचवेळी त्याचे अनुयायीही पांगले, ते काहीच करु शकले नाहीत.
37 नंतर, गालीलातून यहूदा नावाचा माणूस आला. ती वेळ जनगणनेची होती. त्यानेही काही अनुयायांचे नेतृत्व केले. त्यालासुद्धा मारण्यात आले. व त्याचे सर्व अनुयायी पांगले व पळून गेले.
38 म्हणून आता मी तुम्हांला सांगतो: या लोकांपासून दूर राहा. त्यांना एकटे सोडा. जर त्यांच्या योजना मनुष्यांच्या असतील तर ते अपयशी ठरतील.
39 पण जर हे देवापासून असतील तर तुम्ही त्यांना रोखू शकणार नाही. उलट तुम्ही देवाविरुद्ध लढत आहात असे होईल!”यहूदी लोकांनी गमलीएलचा सल्ला मानला.
40 त्यांनी पेषितांना पुन्हा बोलाविले, त्यांना फटके मारले. आणि येशूच्या नावाने पुन्हा त्यांनी काही बोलू नये असा आदेश दिला. आणि त्यांनी प्रेषितांना सोडून दिले.
41 प्रेषित सभा सोडून गेले. येशूच्या नावासाठी आपण निंदानालस्ती सहन करण्याच्या योग्यतेचे ठरलो यामुळे ते आंनदी झाले.

प्रेषितांचीकृत्ये 5:17-41

हा नवीन विश्वास रोखण्यासाठी यहूदी नेते कोणत्या सीमेपर्यंत गेले ते पहा. हे प्रारंभिक वादविवाद यरूशलेमात झाले, त्याच शहरात, जेथे काही आठवड्यांपूर्वीच त्यांनी येशूला जाहीरपणे मारले होते.

या ऐतिहासिक माहितीवरून आपण पऱ्यायांचे मूल्यमापन करून पुनरुत्थानाचे परीक्षण करू शकतो, काय अर्थ प्राप्त होतो ते पाहून तपासू शकतो.

येशूचे शरीर आणि थडगे

मृत ख्रिस्ताच्या थडग्याविषयी दोनच पर्याय अस्तित्वात आहेत. एकतर त्या ईस्टर रविवारी सकाळी थडगे रिकामे होते किंवा त्यात त्याचा मृतदेह आहे. इतर कोणतेही पर्याय नाहीत.

पुनरुत्थानास विरोध असलेल्या यहूदी नेत्यांनी संदेशास एखाद्या देहाद्वारे त्याचे खंडन केले नाही

थडगे जेथे येशूचा मृतदेह होता मंदिरापासून दूर नव्हते जेथे येशूचे शिष्य गर्दीत ओरडत होते की तो मेलेल्यातून उठला आहे. यहूदी नेत्यांना थडग्यात मृतदेह दाखवून त्यांच्या पुनरुत्थानाच्या संदेशास असत्य ठरविणे सोपे झाले असते. इतिहास दर्शवितो की पुनरुत्थानाचा संदेश (जो थडग्यात अजूनही  शरीर आहे असे म्हणून सिद्ध केलेला नाही) स्वतः थडग्याजवळ सुरू झाला जिथे पुरावा प्रत्येकासाठी उपलब्ध होता. यहूदी नेत्यांनी मृतदेह दाखवून त्यांच्या संदेशाचे खंडन केले नाही कारण दाखविण्यासाठी थडग्यात शरीर नव्हते.

यरूशलेमेमध्ये पुनरुत्थानाच्या संदेशावर हजारो लोकांनी विश्वास केला

यावेळी यरूशलेमेमध्ये येशूच्या शारीरिक पुनरुत्थानावर विश्वास ठेवण्यासाठी हजारो लोकांनी तारण प्राप्त केले. जर आपण पेत्राचे व्याख्यान ऐकणाऱ्यापैकी  एक असता, आणि असा विचार केला असता की, त्याचा संदेश खरा आहे काय, तर आपण किमान जेवणाची सुट्टी घेऊन थडग्याजवळ जाऊन तेथे मृतदेह आहे काय याचा शोध घेतला नसता काय? येशूचा मृतदेह थडग्यात असता तर कोणीही प्रेषितांच्या संदेशावर विश्वास ठेवला नसता. परंतु यरूशलेमापासून सुरूवात करून त्यांनी हजारो अनुयायी मिळविल्याची इतिहासाची नोंद आहे. यरूशलेमात त्याचे शरीर असतांना हे अशक्य झाले असते. येशूचे शरीर थडग्यात असते तर हास्यप्रद ठरले असते. ह्याला काही अर्थ नाही.

गूगल मॅप यरूशलेम ले-आऊट. येशूच्या थडग्यासाठी (शरीरासाठी सुद्धा नाही) संभाव्य दोन जागा यरूशलेमच्या मंदिरापासून फारशी दूर नाहीत जिथे अधिकार््यांनी प्रेषितांचा संदेश थांबवण्याचा प्रयत्न केला

शिष्यांनी शरीर चोरून नेले का?

तर शरीरावर काय झाले? सर्वात गंभीर स्पष्टीकरण असे आहे की शिष्यांनी कबरेतूून शरीर चोरून नेले, ते कोठेतरी लपवले आणि त्यानंतर ते इतरांना दिशाभूल करण्यास सक्षम झाले.

असे समजा की त्यांनी हे यशस्वीरित्या केले आणि नंतर त्यांनी त्यांच्या फसवेगिरीवर आधारित धार्मिक श्रद्धा सुरू केली. पण प्रेषितांची कृत्ये आणि जोसेफस या दोहोंच्या वर्णनाकडे नजर टाकल्यास लक्षात येते की हा वाद होता “प्रेषित लोकांना शिक्षण देऊन, येशूच्या द्वारे मेलेल्यांतून पुन्हा उठणे आहे असे प्रसिद्धपणे सांगत होते.”

हाच विषय त्यांच्या लेखनात सर्वत्र आहे. दुसरा प्रेषित पौल ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे महत्त्व कसे देतो यावर लक्ष द्या :

3 कारण मलासुद्धा पहिल्यांदा जे मिळाले ते मी तुमच्या स्वाधीन केले: ते हे की ख्रिस्त आमच्या पापांसाठी मरण पावला, हे जे वचनात लिहिले आहे.
4 व त्याला पुरण्यात आले. व तिसऱ्या दिवशी त्याला उठविण्यात आले.
5 व तो पेत्राला दिसला, नंतर बारा प्रेषितांना,
6 नंतर तो एकाच वेळी पाचशे हून अधिक बांधवांना दिसला. त्यांच्यापैकी बहुसंख्य अजूनही जिवंत आहेत, तर काही मेले आहेत.
7 नंतर तो याकोबाला दिसला, मग पुन्हा तो सर्व प्रेषितांना दिसला.
8 आणि शेवटी मी जो अवेळी जन्मलो, त्या मलासुद्धा तो दिसला.
9 कारण प्रेषितांमध्ये मी कनिष्ठ आहे, मी प्रेषित म्हणून घेण्याच्यासुद्धा योग्यतेचा नाही, कारण देवाच्या मंडळीचा मी छळ केला.
10 पण देवाच्या दयेने मी जो आहे तो मी (प्रेषित) आहे. आणि त्याची माझ्यावरची कृपा व्यर्थ गेली नाही, उलट त्या सर्वांपेक्षा अधिक काम मी केले आहे, करणारा मी नव्हतो, तर देवाची दया जी माझ्याबरोबर होती, ती करीत होती.
11 म्हणून, जरी मी तुम्हांला उपदेश केला किंवा त्यांनी उपदेश केला, तरी आम्ही सर्व हाच उपदेश करु, आणि तुम्ही यावरच विश्वास ठेवला.
12 पण जर आम्ही ख्रिस्त मेलेल्यांतून उठविला गेला आहे अशी सुवार्ता गाजवितो, तर मृतांचे पुनरुत्थान नाही असे तुमच्यातील काहीजण म्हणतात हे कसे?
13 जर मृतांचे पुनरुत्थान नाही, तर ख्रिस्त मरणातून उठविला गेला नाही,
14 आणि जर ख्रिस्त मरणातून उठविला गेला नाही तर आमचा संदेश व्यर्थ आहे आणि तुमचा विश्वासही व्यर्थ आहे.
15 आणि आम्हीसुद्धा देवाविषयीचे खोटे साक्षीदार ठरु कारण आम्ही देवासमोर शपथपूर्वक साक्ष दिली आहे की, ख्रिस्ताला मेलेल्यांतून त्याने उठविले, पण जसे ते म्हणतात त्याप्रमाणे जर देवाने ख्रिस्ताला उठविले नाही, तर मेलेले मरणातून उठविले जात नाहीत.
16 आणि जर मृतांना उठविले जात नाही, तर ख्रिस्ताला मरणातून उठविण्यात आले नाही.
17 आणि जर ख्रिस्त मरणातून उठविला गेला नाही, तर तुमचा विश्वास व्यर्थ आहे; तुम्ही अजूनसुद्धा पापातच आहात;
18 होय, आणि जे ख्रिस्तात मेलेले आहेत, त्यांचा नाश झाला आहे.
19 जर ख्रिस्तावर असलेली आमची आशा ही, फक्त या पृथ्वीवरील जीवनासाठीच असली, तर सर्व मनुष्यात आम्ही दयनीय असे आहोत.

1 करिंथ15:3-19 इ.स. 57

30 आम्हीसुद्धा प्रत्येक घटकेला धोक्याला का तोंड देतो?
31 बंधूजनहो, मी शपथपूर्वक सांगतो की, ख्रिस्त येशूमध्ये माझा तुमच्याविषयी अभिमान आहे, मी दररोज मरतो
32 इफिसात मी रानटी प्राण्याबरोबर लढलो, तर मी काय मिळविले? जर मेलेले उठविले जात नाहीत तर “आपण खाऊ पिऊ, कारण आपण उद्या मरुन जाऊ!”

1 करिंथ15:30-32

जे खोटे आहे असे आपणास माहीत आहे त्यासाठी कोणी का मरेल?

स्पष्टपणे, शिष्यांनी ख्रिस्ताच्या पुनरुत्थानास त्यांच्या संदेशाच्या केन्द्रस्थानी  ठेवले. हे खरोखर खोटे होते असे समजाकी या शिष्यांनी त्यांच्या संदेशातील प्रतिपुराव्यांनी त्यांचे असत्य उघडीस आणू नये म्हणून खरोखरच येशूचे शरीर चोरी केले होते. त्यानंतर त्यांनी जगाला यशस्वीरित्या मूर्ख बनविले असेल, परंतु जे ते स्वतः उपदेश करीत होते, लिहित होते आणि जबरदस्त उलथापालथ करतात ते खोटे आहे हे त्यांना स्वतःला माहीत असते. तरीही त्यांनी या मोहिमेसाठी त्यांचे जीवन (अक्षरशः) दिले. ते हे का करतीलजर त्यांना हे माहित होते की ते खोटे आहे?

लोक काही कारणास्तव आपला प्राण देतात कारण ज्या कारणास्तव ते लढा देतात त्या कारणावर त्यांचा विश्वास असतो किंवा कारण त्यांना त्या कारणापासून काही फायद्याची अपेक्षा असते. जर शिष्यांनी शरीर चोरले असते आणि ते लपवून ठेवले असते तर पुनरुत्थान खरे नाही हे सर्व लोकांना समजले नसते. त्यांच्या संदेशाचा प्रसार करण्यासाठी शिष्यांनी काय किंमत दिली हे त्यांच्या स्वतःच्या शब्दांमधून विचार करा. स्वतःस विचारा की जे खोटे आहे असे आपण जाणता त्यासाठी आपण अशी वैयक्तिक किंमत मोजाल का:

8 आम्हांवर चारी दिशांनी संकटे येतात, पण आम्ही अजून चिरडले गेलो नाही, गोंधळलेलो आहोत, पण निराश झालो नाही.
9 छळ झालेले असे आहोत पण टाकून दिलेले असे आम्ही नाही, खाली पडलेलो असलो तरी आमचा नाश झालेला नाही.

2 करिंथ 4:8-9

4 उलट सर्व प्रकारच्या परिस्थितीत आम्ही देवाचे सेवक होतो हे आम्ही दाखवून दिले. मग आम्हांला त्रास सोसावा लागो, नाहीतर अडचणी येवोत, छळ होवो नाहीतर वेदना होवोत. छळात, आणि दु:खात
5 फटके खाण्यात, तुंरुगवासात आणि दंग्यात, कठोर श्रमात, जागून काढलेल्या रात्रीत, भुकेले असताना,

2 करिंथ 6:4-5

24 पाच वेळेला यहूंद्याकडून मला एकोणचाळीस फटके बसले.
25 तीन वेळा काठीने मारण्यात आले, एकदा मला दगडमार करण्यात आला, तीन वेळा माझे जहाज फुटले, खुल्या समुद्रात मी एक रात्र व एक दिवास घालविला.
26 मी सातत्याने फिरत होतो, नदीच्या प्रवासात धोका होता. लुटारुंकडून धोका होता. माझ्या स्वत:च्या देशबांधवांकडून धोका होता. विदेशी लोकांकडून, शहरांमध्ये धोका होता. डोंगराळ प्रदेशात धोका होता. समुद्रात धोका होता, खोठ्या बंधूंकडून धोका होता.
27 मी कष्ट केले आणि घाम गाळला, व पुष्कळ वेळा जागरण केले. मला भूक माहीत आहे. तहान माहीत आहे. पुष्कळ वेळा मी अन्नाशिवाय राहिलो, थंडीत व उघडा असा मी राहिलो

,2 करिंथ 11:24-27

प्रेषितांचे अतूट धैर्य

जर आपण त्यांच्या आयुष्यभर अढळ वीरतेचा विचार केला तर त्यांनी स्वतःच्या संदेशावर मनापासून विश्वास ठेवला नाही ते आणखी अविश्वसनीय वाटते. परंतु जर त्यांनी त्यांवर विश्वास ठेवला असेल तर त्यांनी ख्रिस्ताचे शरीर चोरून व लपवून टाकले नाही. दारिद्र्य, मारहाण, कारावास, कठोर विरोध आणि शेवटी मृत्यूदंड (योहानास वगळता इतर सर्व प्रेषितांना शेवटी त्यांच्या संदेशाकरिता फाशी दिली गेली) या गोष्टींनी त्यांच्या हेतूंचा आढावा घेण्यासाठी दररोज संधी उपलब्ध करून दिल्या. परंतु येशूला जिवंत झालेले पाहिले आहे असा दावा करणाऱ्या प्रेषितांपैकी कोणीही आपले शब्द पुन्हा परत घेतले नाही. त्यांनी सर्व विरोधांस अतुलनीय धैऱ्याने तोंड दिले.

बागेचे रिकामे थडगे
गे बागेला थडगे टाकले

बागेतील थडगे: सुमारे 130 वर्षांपूर्वी ढिगाऱ्यातून उघडून काढलेली कबर येशूचे थडगे असणे शक्य आहे

शिष्यांचे अतूट धैर्य आणि वैमनस्यपूर्ण अधिका ऱ्यांचे मौन यामुळे वास्तविक इतिहासात येशू जिवंत झाला ही एक शक्तिशाली घटना ठरते. त्याच्या पुनरुत्थानावर आपण भरवसा ठेवू शकतो.

राजप्रमाणे : येशू ख्रिस्ताच्या ‘ख्रिस्त’ चा अर्थ काय?

मी कधीकधी लोकांना विचारतो की येशूचे आडनाव काय होते. सामान्यतया ते उत्तर देतात,

“मला वाटते की त्याचे आडनाव‘ ख्रिस्त ’होते पण मला खात्री नाही”.

मग मी विचारतो,

“मग जेव्हा येशू लहान होता तेव्हा योसेफ ख्रिस्त आणि मेरी ख्रिस्त लहान येशू ख्रिस्ताला बाजारात घेऊन गेले काय?”

असे म्हटल्यास, ते समजतात की ‘ख्रिस्त’ हे येशूचे कौटुंबिक नाव नाही. तर, ‘ख्रिस्त’ काय आहे? ते कोठून येते? याचा अर्थ काय? अनेक लोकांस आश्चर्य वाटते, म्हणजे, ‘ख्रिस्त’ ही एक पदवी आहे जिचा अर्थ आहे ‘राज्यकर्ता’ किंवा ‘राज्य करणारा’. हे ‘राज’ या पदवीसारखे नव्हे, स्वातंत्र्यापूर्वी भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटीश राजप्रमाणे.

भाषांतर विरुद्ध लिप्यंतरण

आपण प्रथम भाषांतराच्या काही मुलभूत गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. भाषांतरकार कधीकधी अर्थाऐवजी, विशेषेकरून नावे आणि पदव्यांऐवजी समान ध्वनीद्वारे अनुवाद ध्वनीनसार भाषांतर करण्याची निवड करतात. यास लिप्यंतरण म्हटले जाते. उदाहरणार्थ, “कुंभमेला”  हे मराठी कुंभमेळा या शब्दाचे इंग्रजी लिप्यंतरण आहे. मेळा अर्थात मेला ’म्हणजे ‘फेअर’ किंवा ‘फेस्टिव्हल’ असले तरी कुंभफेअर ऐवजी कुंभमेला  हा शब्द इंग्रजीत आणला गेला आहे. “राज” हे हिंदी “राज” चे इंग्रजी लिप्यंतरण आहे. जरी राज या शब्दाचा अर्थ आहे ‘राज्य’ हा शब्द “ब्रिटिश रूल” ऐवजी “ब्रिटिश राज” च्या ध्वनीद्वारे इंग्रजी भाषेत आणला गेला. वेद पुस्तकम (बायबल) सह, भाषांतरकारांना हे ठरवावे लागत असे की कोणत्या नावांचे व पदव्यांचे भाषांतर (अर्थाने) आणि लिप्यंतरण (ध्वनीद्वारे) करायचे आहे. कोणताही विशिष्ट नियम नाही.

सेप्टुआजिंट

बायबलचे भाषांतर प्रथम ख्रिस्तपूर्व 250 मध्ये करण्यात आले होते जेव्हा हिब्रू वेदाचे (जुना करार) ग्रीक भाषेत भाषांतर करण्यात आले होते – त्यावेळची आंतरराष्ट्रीय भाषा. या भाषांतरास सेप्टुआजिंट (किंवा LXX) म्हणून ओळखले जाते आणि ते खूप प्रभावी होते. नवीन करार ग्रीक भाषेत लिहिलेला असल्याने, जुन्या करारातील त्याची अनेक अवतरणे सेप्टुआजिंटमधून घेतली आहेत. 

सेप्टुआजिंटमध्ये भाषांतर आणि लिप्यंतरण

ही प्रक्रिया तसेच आधुनिक काळातील बायबलवर तिचा कसा परिणाम घडतो हे खालील आकृतीत दाखविण्यात आले आहे

मूळभाषांतून आधुनिक बायबलमध्ये भाषांतर

मूळ हिब्रू जुना करार (ख्रि. पू. 1500 – 400 या दरम्यान लिहिलेले) हा चतुष्पाद  #1 मध्ये दाखविण्यात आला आहे. कारण सेप्टुआजिंट हे ख्रि. पू. 250 हिब्रू –> ग्रीक भाषांतर चतुष्पाद #1 ते #2 पर्यंत जाणाऱ्या बाणाच्या रूपात दाखविले गेले आहे. नवीन करार ग्रीक भाषेत (सन 50-90) लिहिण्यात आला होता, म्हणून #२ मध्ये जुना आणि नवीन करार दोन्हींचा समावेश आहे. तळाशी अर्ध्या भागात (#3) बायबलच्या आधुनिक भाषेचे भाषांतर आहे. जुना करार (हिब्रू वेद) मूळ हिब्रू (1 –> 3) मधून भाषांतरित केला गेला आहे आणि नवीन कराराचे ग्रीक (2 –> 3) भाषेतून भाषांतर करण्यात आले आहे. यापूर्वी स्पष्ट केल्याप्रमाणे भाषांतरकारांनी नावे व पदव्या याबाबतीत निर्णय घ्यावा. हे लिप्यंतरण आणि भाषांतर असे नाव दिलेल्या निळ्या बाणांनी दाखविलेले आहे, हे दाखविण्यासाठी की भाषांतरकार दोन्हींपैकी कोणत्याही एकाचा उपयोग करू शकतात.

‘ख्रिस्त’ चे मूळ

आता ‘ख्रिस्त’ या शब्दावर लक्ष केंद्रित करून, वरील प्रक्रियेचे अनुसरण करा.

बायबलमध्ये ‘ख्रिस्त’ कोठून आला आहे?

हिब्रू जुन्या करारात ‘מָשִׁיחַ’ (mashiyach ) पदवी आहे, जिचा अर्थ आहे ‘अभिषिक्त’ किंवा ‘समर्पित व्यक्ति’ जसे की राजा किंवा राज्यकर्ता. त्या काळातील इब्री राजांना राजा होण्यापूर्वी अभिषेक करण्यात येत असे (विधियुक्त पद्धतीने तेलाचा अभ्यंग केला जात असे), अशाप्रकारे ते अभिषिक्त किंवा मसियाच होते. मग ते राज्यकर्ते बनत, परंतु त्यांचे राज्य देवाच्या स्वर्गीय शासनाच्या अधीन असे, त्याच्या नियमानुसार. या अर्थाने जुन्या करारातील इब्री राजे राजसारखे होते. या राजने दक्षिण आशियातील ब्रिटीश प्रांतांवर राज्य केले, परंतु ब्रिटेनमधील सरकारच्या अधीन राहून, त्याच्या कायद्यानुसार.

जुन्या करारामध्ये एका विशिष्ट मशियाच्या (अर्थात ’ख्रिस्त’) येण्याची भविष्यवाणी केली गेली होती जो एक अद्वितीय राजा असणार होता. जेव्हा ख्रि. पू. 250 मध्ये सेप्टुआजिंटचे भाषांतर झाले, तेव्हा भाषांतरकारांनी ग्रीक भाषेतील समान अर्थाचा शब्द  Χριστός  निवडला,  (क्रिस्टॉससारखा वाटतो), chrio क्रिओच्या आधारे, ज्याचा अर्थ विधियुक्त पद्धतीने तेल लावणे असा आहे.  म्हणून हिब्रू ‘मशिया’ चे भाषांतर ग्रीक सेप्टुआजिंटमधील  Χριστός च्या अर्थाने (ध्वनीद्वारे लिप्यंतरित नाही) केले गेले. नव्या कराराच्या लेखकांनी ख्रिस्त हा भविष्यवाणी केलेला ‘मशिया’ म्हणून ज्याविषयी भविष्यवाणी करण्यात आली होती त्या येशूस ओळखण्यासाठी क्रिस्टॉस या शब्दाचा उपयोग सुरू ठेवला.

युरोपियन भाषांमध्ये, समान अर्थ असलेला कोणताही स्पष्ट शब्द नव्हता म्हणून नवीन कराराचा ग्रीक ‘क्रिस्टॉस’ याचे ‘ख्रिस्त’ असे लिप्यंतरण करण्यात आले. ‘ख्रिस्त’ हा शब्द जुन्या करारात मूळ असलेले एक अत्यंत विशिष्ट नाव आहे, हिब्रूमधून ग्रीकमध्ये भाषांतर झालेले, आणि नंतर ग्रीकमधून आधुनिक भाषांमध्ये लिप्यंतरणाद्वारे आले. जुना कराराचे भाषांतर थेट हिब्रूमधून आधुनिक भाषांमध्ये करण्यात आले आहे आणि भाषांतरकार मूळ हिब्रू ‘मशिया’ संबंधाने भिन्न निवड करतात. काही बायबल ‘मशिया’ चे रूपांतर ‘मशिया’ च्या रूपात करतात, तर काहीजण “अभिषिक्त” असा अर्थ लावून भाषांतर करतात. ख्रिस्तासाठी हिंदी भाषेचा एक शब्द (मसीह) अरबीमधून लिप्यंतरित आहे, जो मूळ हिब्रूमधून लिप्यंतरित केला गेला. म्हणून त्याचा उच्चार ‘मसीह’ मूळ शब्दाच्या अगदी जवळ आहे.

ग्रीक सेप्टुआजिंटमध्ये हिब्रू शब्द מָשִׁיחַ (मसिया, मसिहा) चे भाषांतर “क्रिस्टॉस” म्हणून केले गेले आहे. यावरून मराठीत हे “ख्रिस्त” म्हणून भाषांतरित केले गेले आहे आणि ते “क्राईस्ट” सारखे वाटते. ख्रिस्तासाठी दिलेला मराठी शब्द ग्रीक शब्द “ख्रिस्तोस” मधून लिप्यंतरित केला गेला आहे आणि म्हणूनच त्याचा उच्चा क्रिस्तू (kristū) असा केला जातो.

जुन्या करारात आपण सामान्यतः ‘ख्रिस्त’ हा शब्द पाहत नाही, त्यामुळे जुन्या कराराशी त्याचा संबंध नेहमीच स्पष्ट असत नाही. परंतु या अभ्यासावरून आपण हे जाणतो की ‘ख्रिस्त’ = ‘मशीहा’ = ‘अभिषिक्त’ आणि ती एक विशिष्ट पदवी होती.

ख्रिस्ताची  1 ल्या शतकात प्रतीक्षा

आता आपण शुभवर्तमानावरून काही निरीक्षणे करू या. खाली राजा हेरोदची प्रतिक्रिया आहे जेव्हा मागी लोक यहूद्यांच्या राजाचा शोध करीत आले, हा नाताळाच्या कथेचा एक भाग आहे.  लक्ष द्या, जरी येशूविषयी विशेष उल्लेख नसला तरी, ख्रिस्ताच्या आधी इंग्रजीत ‘निश्चयवाचक उपपद’ येते.

हे ऐकून हेरोद राजा तसेच यरुशलेम नगराचे रहिवासी घाबरुन गेले.
मग त्याने यहूदी लोकांचे सर्व मुख्य याजक व नियमशास्त्राचे शिक्षक यांना बोलाविले आणि विचारले की, “ख्रिस्ताचा जन्म कोठे होणार होता?”

मत्तय 2:3-4

हेरोद आणि त्याचे सल्लागार यांस ‘हा ख्रिस्त’ ही कल्पना चांगली समजली होती हे तुम्ही पाहताच – आणि येथे तो शब्द येशूचा विशिष्टरित्या उल्लेख करीत नाही. यावरून दिसून येते की ‘ख्रिस्त’ जुन्या करारातून येतो, जसे 1 ल्या शतकातील लोक ग्रीक सेप्टुआजिंटमध्ये वाचत ( हेरोद आणि त्याच्या सल्लागाराप्रमाणे). ‘ख्रिस्त’ ही एक पदवी होती (आणि आहे), नाव नव्हते, जी शासक किंवा राजास दर्शविते. यामुळेच हेरोद ‘घाबरला’ कारण दुस‍ऱ्या राजाच्या आगमनाच्या शक्यतेने तो भयभीत झाला. आपण ही कल्पना मनातून काढून टाकू शकतो की ‘ख्रिस्त’ हा ख्रिस्ती लोकांद्वारे केलेला शोध होता. त्यांच्या ख्रिस्ती होण्यापूर्वी शेकडो वर्षे आधी ही पदवी वापरली जात असे.

ख्रिस्ताच्या अधिकाराचा विरोधाभास

येशूच्या प्रारंभिक अनुयायांना ही खात्री होती की येशू हा येणारा ख्रिस्त आहे ज्याच्याविषयी हिब्रू वेदात भविष्यवाणी केली होती, तर इतरांनी या विश्वासाला विरोध केला.

का?

प्रेम किंवा सामर्थ्यावर आधारित नियमांबद्दल हे उत्तर विरोधाभास ठरविते. ब्रिटिश राजवटीखाली भारतावर राज्य करण्याचा अधिकार राजला होता. पण भारतावर राज्य करण्याचा अधिकार त्यांना मिळाला कारण राज प्रथम सैन्यशक्तीनिशी आला आणि त्याने आपल्या सामर्थ्याने बाह्य अधीनता अमलात आणली. जनतेला राजविषयी प्रेम नव्हते आणि गांधीसारख्या पुढाऱ्याद्वारे राज संपुष्टात आले.

ख्रिस्त म्हणून येशूला जरी अधिकार असला तरीही, तो अधीनतेची मागणी करावयास आला नाही. तो प्रेम अथवा भक्तीवर आधारित सार्वकालिक राज्याची स्थापना करावयास आला होता, आणि यासाठी एका बाजूला सत्ता आणि अधिकार यांच्यातील विरोधाभास तर दुस‍ऱ्या बाजूला प्रेमाची गरज होती. ‘ख्रिस्ताचे’ आगमन समजून घेण्यात आम्हाला मदत करण्यासाठी हिब्रू ऋषींनी हा विरोधाभास शोधून काढला. आम्ही हिब्रू वेदांतील ‘ख्रिस्ता’ च्या पहिल्या आगमनावरून आपण त्यांच्या अंतर्दृष्टींचे अनुसरण करतो, हिब्रू राजा दावीद याजपासून ख्रि.पू. 1000 च्या सुमारास.

यहूद्यांचा इतिहास? भारतात आणि जगभरात

भारतात यहूदी लोकांचा दीर्घकालीन इतिहास आहे, येथे हजारों वर्षे राहून, त्यांनी भारतीय समाजजीवनाच्या संकीर्ण रचनेत एक लहानसा समाज स्थापन केला. इतर अल्पसंख्यकांपेक्षा भिन्न (जसे जैन्, शीख, बौद्ध), आपले निवासस्थान बनविण्यासाठी भारताबाहेरून आले. 2017च्या उन्हाळ्यात भारताचे पंतप्रधान मोदी यांनी इस्राएलास भेट देण्यापूर्वी त्यांनी इस्राएलचे पंतप्रधान, नेतनयाहूसोबत एक सहसंपादकीय लिहिले. आपल्या लिखाणात त्यांनी भारतात यहूद्यांच्या या स्थलांतराविषयी लिहिले :

भारतात यहूदी समाजाचे नेहमीच स्नेहपूर्ण व आदराने स्वागत करण्यात आले आणि त्यांना कधीही छळास तोंड द्यावे लागले नाही. 

खरे म्हणजे, भारताच्या इतिहासावर यहूद्यांचा एक गंभीर प्रभाव पडला आहे, त्यांनी भारतीय इतिहासाच्या हट्टी रहस्याचे समाधान केले आहे – भारतात लेखनाचा उदय कसा झाला? या प्रश्नाचे उत्तर भारतीय संस्कृतीच्या सर्व उत्कृष्ट साहित्यावर छाप बसविते.

भारतातील यहूदी इतिहास

जरी भिन्न असले, तरीही परंपरागत भारतीय पोशाखाचा स्वीकार करण्याद्वारे यहूद्यांनी स्वतःस भारतात शामिल करून घेतले

यहूदी समुदाय भारतात केव्हापासून आहेत? टाईम्स ऑफ इस्राएलने अलीकडे प्रकाशित एका लेखात या गोष्टीवर जोर दिला की ‘27 शतकांनंतर मनश्शेचा वंश (बेने मनश्शे) मिझोराममधून इस्राएलास परतत आहे. याचा अर्थ त्यांचे पूर्वज मूलतः येथे ख्रि.पू. 700च्या सुमारास आले. आंध्र प्रदेशात राहणारे एफ्राईम वंशातील (बेने एफ्राईम) तेलुगू भाषा बोलणाऱ्या त्यांच्या चुलत बंधूजनांस सामुहिक स्मरण आहे की पर्शिया, अफगानस्थान, तिब्बेट, आणि मग चीनमधून भ्रमण केल्यानंतर, ते 1000 वर्षांपेक्षा अधिक काळपर्यंत भारतात राहिले आहेत. केरळमधील, कोचीन येथील यहूदी तेथे जवळजवळ 2600 वर्षांपासून आहेत. मागील शतकांत यहूदी लोकांनी भारतात लहान परंतु विशिष्ट समुदायांची स्थापना केली. पण आता ते इस्राएल जाण्यासाठी भारत सोडून जात आहेत.

कोचीन येथील यहूदी सिनेगागवरील शिलालेख. मागील शेकडो वर्षे तो तेथे आहे

यहूदी लोक भारतात येऊन कसे राहू लागले? इतक्या वर्षांनंतर ते इस्राएलास का परत जात आहेत? दुसऱ्या कुठल्याही राष्ट्राच्या तुलनेत आम्हास त्यांच्या इतिहासाची अधिक तथ्ये माहीत आहेत. समयरेखेचा उपयोग करून त्यांच्या इतिहासाचा सारांश मांडण्यासाठी आपण या माहितीचा उपयोग करू.

अब्राहाम : यहूदी कुटूंबाची सुरूवात होते

समयरेखेची सुरूवात अब्राहामाने होते. त्याला राष्ट्रांचे अभिवचन देण्यात आले होते आणि परमेश्वराशी त्याची भेट घडून आली ज्याचा शेवट त्याचा पुत्र इसहाक याच्या प्रतीकात्मक बलिदानाने झाला. त्याच्या बलिदानाचे भविष्यातील स्थान चिन्हित करून हे चिन्ह येशूकडे (येशूसत्संग) अंगुलीनिर्देश करीत होते. इसहाकाच्या पुत्रास परमेश्वराने इस्राएल हे नाव दिले. ही समयरेखा हिरव्या रंगात पुढे वाढते जेव्हा इस्राएलचे वंशज मिसर देशात गुलाम होते. ह्या समयाची सुरूवात त्यावेळी झाली जेव्हा इस्राएलाचा पुत्र, योसेफाने (वंशावळी अशी होती : अब्राहाम ->  इसहाक -> इस्राएल (ज्यास याकोबही म्हटले जाते) -> योसेफ), इस्राएली लोकांस मिसर देशात आणले, जेथे नंतर त्यांस गुलाम बनविण्यात आले.

फारोचे गुलाम म्हणून मिसर देशात राहणे

मोशे : देवाच्या मार्गदर्शनाखाली इस्राएल राष्ट्र बनते

मोशेने, वल्हांडणाच्या वेळी आलेल्या पीडेने इस्राएलास मिसर देशाबाहेर नेण्यात नेतृत्व केले, ह्या पीडेने मिसर देशाचा नाश केला आणि इस्राएली लोकांस मिसर देशातून बंधमुक्त करून इस्राएल देशात आणले. त्याच्या मृत्यूपूर्वी, मोशेने इस्राएली लोकांसमोर आशीर्वाद व शाप यांची घोषणा केली (जेव्हा समयरेखा हिरव्या रंगापासून पिवळ्या रंगाकडे जाते). जर त्यांनी देवाच्या आज्ञेचे पालन केले असते तर त्यांना आशीर्वाद प्राप्त झाला असता, पण जर आज्ञापालन केले नाही तर ते शापित ठरले असते. तेव्हापासून इस्राएलचा इतिहास ह्या आशीर्वाद आणि शापाशी जुळलेला होता.

अनेक वर्षे इस्राएली लोक त्यांच्या देशात राहिले पण त्यांस राजा नव्हता, त्यांस यरूशलेमही राजधानीही नव्हती – ती यावेळी इतर लोकांच्या ताब्यात होती. तथापि, ख्रि.पू. 1000च्या सुमारास राजा दाविदाच्या वेळी यात बदल झाला
यरूशलेमाहून राज्य करणाऱ्या दाविदाच्या राजांसोबत जगणे

दावीद यरूशलेमात आपले राजघराणे स्थापन करतो

दाविदाने यरूशलेम जिंकून घेतला आणि त्यास आपले राजधानीचे नगर बनविले. त्याला येणाऱ्या ‘ख्रिस्ताचे’ अभिवचन प्राप्त झाले आणि त्यावेळेपासून यहूदी लोक येणाऱ्या ‘खिस्ताची’ प्रतीक्षा करू लागले. त्याचा श्रीमंत आणि सुप्रसिद्ध, पुत्र शलमोन, त्याच्या जागी राजा झाला आणि त्याने यरूशलेमात मोरिया पर्वतावर पहिले यहूदी मंदिर बनविले. राजा दाविदाचे वंशज सुमारे 400 वर्षांपर्यंत राज्य करीत राहिले आणि हा काळ फिकट निळया रंगात दाखविलेला आहे (ख्रि.पू. 1000-600). हा इस्राएलच्या वैभवाचा काळ होता – त्यांनी अभिवचनांनुसार आशीर्वाद प्राप्त केला. ते एक सामर्थी राष्ट्र होते, त्यांचा समाज प्रगत होता, त्यांची समृद्ध संस्कृती, आणि त्यांचे मंदिरही होते. पण जुना करार ह्या काळात त्यांच्या वाढत्या भ्रष्टाचाराचे देखील वर्णन करतो. या काळात अनेक ऋषींनी इस्राएली लोकांस सावध केले की जर त्यांच्यात बदल झाला नाही तर मोशेचे शाप त्यांच्यावर येऊन पडतील. ह्या ताकिदींकडे त्यांनी दुर्लक्ष केले. या काळात इस्राएलची दोन राज्यांत फूट पडली : इस्राएलचे किंवा एफ्राईमाचे उत्तरेकडील राज्य, आणि यहूदाचे दक्षिण राज्य (आजच्या कोरियनप्रमाणे, एका देशचे लोक दोन देशांत विभाजित – उत्तर आणि दक्षिण कोरिया).

पहिला यहूदी बंदिवास : अश्शूर आणि बेबिलोन

शेवटी, दोन अवस्थांत शाप त्यांच्यावर आला. ख्रि.पू. 722मध्ये अश्शूरी लोकांनी उत्तरी राज्याचा पाडाव केला आणि इस्राएली लोकांस त्यांच्या विशाल साम्राज्याबाहेर हद्द पारपार केले. मिजोराममधील बेने मनश्शे आणि आंध्र प्रदेशातील बेने एफ्राईन या हद्दपार केलेल्या इस्राएली लोकांचे वंशज आहेत. त्यानंतर ख्रि.पू. 586 मध्ये नबूकद्नेस्सर, बेबिलोनचा शक्तिशाली राजा आला – आपल्या शापवाणीत 900 वर्षांपूर्वी मोशेने भाकित केल्याप्रमाणे: 

49 “दूरच्या राष्ट्रातील शत्रूला परमेश्वर तुमच्यावर पाठवील. त्यांची भाषा तुम्हाला समजणार नाही. गरुडांसारखे ते झेपावत येतील. 50 ते क्रूर असतील. वृद्धांचा ते मान राखणार नाहीत. लहानांना दया दाखवणार नाहीत. 51 तुमची जनावरे आणि तुम्ही काढलेले पीक ते नेतील. तुम्ही नष्ट होईपर्यंत ते तुमची लूट करतील. धान्य, द्राक्षारस, तेल, गुरेढोरे, शेळ्यामेंढ्या काही म्हणता काही तुम्हाला उरणार नाही. 52 “ते राष्ट्र तुमच्या नगरांना वेढा घालून हल्ला करील. आपल्या नगराभोवती असणारी उंच आणि भक्कम तटबंदी आपले रक्षण करील असे तुम्हाला वाटेल. पण ती तटबंदी कोसळून पडेल. तुमचा देव परमेश्वर तुम्हांला देणार असलेल्या प्रदेशातील तुमच्या सर्व नगरांना शत्रू वेढा घालेल.

अनुवाद 28:49-52

नबूकद्नेस्सराने यरूशलेम जिंकून घेतले, त्याला आग लावली, आणि मोशेने बांधलेल्या मंदिराचा नाश केला. नंतर त्याने इस्राएली लोकांस बेबिलोन येथे बंदिवासात नेले.

याद्वारे मोशेचे भाकित पूर्ण झाले की

63 “तुमची भरभराट करायला आणि तुमची संख्या वाढवायला जसा त्याला आनंद वाटत होता तसाच आनंद त्याला तुमचा नाश करायला आणि तुम्हांला रसातळाला न्यायला वाटेल. तुम्ही जो देश काबीज करायला जात आहात तेथून तुम्हाला हुसकावून लावले जाईल. 64 परमेश्वर तुम्हाला पृथ्वीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत सर्व लोकांमध्ये विखरुन टाकील. तेथे तुम्ही काष्ठपाषाणाच्या मूर्तीची उपासना कराल. तुम्हाला आणि तुमच्या पूर्वजांना माहीत नसलेल्या खोट्यानाट्या देवांची उपासना कराल.

अनुवाद 28:63-64
जिंकल्या गेले आणि बेबिलोन येथे बंदिवासात

केरळमधील कोचीन येथील यहूदी ह्या बंदिवासातील इस्राएली लोकांचे वंशज आहेत. 70 वर्षे, लाल रंगाने दाखविलेला कालावधी, या इस्राएली लोकांस (अथवा यहूदी जसे त्यांस आज म्हटले जाते) अब्राहामास व त्याच्या वंशजांस अभिवचन म्हणून देण्यात आलेल्या देशाबाहेर हद्दपार करण्यात आले होते.

भारतीय समाजात यहूद्यांचा वाटा

आपण लेखनाचा प्रश्न घेतला ज्याच्या उदय भारतात झाला. भारताच्या आधुनिक भाषा ज्यात हिन्दी, बंगाली, मराठी, गुजराथी, तेलूगू, कन्नड, मलयालम आणि तमिळ तसेच प्राचीन संस्कृत ज्यात ऋग्वेदाचे तसेच इतर उत्कृष्ट साहित्याचे लेखन करण्यात आले होते त्यांस ब्राम्ही लिपी  ब्राम्ही लिपी म्हणून वर्गीकरण करण्यात येते कारण त्या सर्वांची व्युत्पत्ती ब्राम्ही लिपी म्हटलेल्या मूळ लिपीपासून होते. आज ब्राम्ही लिपी फक्त अशोक सम्राटाच्या काळातील काही थोडक्या प्राचीन स्मारकांत दिसते.

ब्राम्ही लिपी आधुनिक लिपींमध्ये कशी बदलून गेली हे जरी समजले असले तरीही, हे स्पष्ट नाही की भारताने प्रथम ब्राम्ही लिपीचा स्वीकार कसा केला. विद्वानांचे हे म्हणणे आहे की ब्राम्ही लिपीचा संबंध हिब्रू-फिनिशियन लिपीशी आहे, भारतातील बंदिवासाच्या आणि स्थलांतराच्या काळात इस्राएलचे यहूदी लोक याच लिपीचा उपयोग करीत असत. इतिहासकार अविगडोर सचन (1)असे सूचवितात की जे इस्राएली भारतात स्थिर झाले ते आपल्यासोबत हिब्रू-फिनिशियन घेऊन आले. याद्वारे या रहस्याचे देखील समाधान होते की ब्राम्ही लिपीस तिचे नाव कसे प्राप्त झाले. हा केवळ योगायोग आहे का की ब्राम्ही लिपी फक्त उत्तर भारतात त्याचवेळी प्रकट होते जेव्हा यहूदी त्यांच्या पूर्वजांच्या देशातून, अब्राहामाच्या देशातून हद्दपार केले जाऊन तेथे स्थायी झाले? अब्राहामाच्या वंशजांच्या लिपीचा ज्या स्थानिक लोकांनी स्वीकार केला त्यांनी त्यास (अ) ब्राम्हण लिपी हे नाव दिले. अब्राहामाचा धर्म एका देवाठायी विश्वास होता ज्याची भूमिका मर्यादित नाही. तो प्रथम, अंतिम, आणि सनातन आहे. याच ठिकाणी कदाचित ब्रम्हावरील विश्वासाची देखील सुरूवात झाली, (अ) अब्राहामाच्या लोकांच्या धर्मावरून. यहूदी लोकांनी, आपली लिपी व धर्म भारतात आणून, भारतास जिंकण्याचा आणि तिच्यावर राज्य करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक आक्रमणकर्त्यापेक्षा तिच्या विचारास आणि इतिहासास अधिक मौलिकरित्या आकार दिला.

आधि हिब्रू वेद, मूलतः हिब्रू फिनिशियन/ब्राम्ही लिपीत, येणाऱ्याविषयी सांगितले आहे, जसे संस्कृत ऋग्वेदात येणाऱ्या पुरुषाचा विषय. पण आपण मध्यपूर्वेतील यहूद्यांच्या पूर्वजांच्या देशातून त्यांच्या बंदिवासानंतर आपण त्यांच्या इतिहासाकडे वळतो.

पर्शियनांच्या बंदिवासातून परतणे

त्यानंतर, पर्शियन सम्राट सायरस याने बेबिलोनचा पाडाव केला आणि सायरस जगातील सर्वात सामथ्र्यवान व्यक्ती बनला. त्याने यहूदी लोकांस त्यांच्या मायदेशी परतण्याची परवानगी दिली.

पर्शियन साम्राज्याचा भाग म्हणून देशात राहणे

तथापि तो आता स्वतंत्र देश नव्हता, ते आता पर्शियातील एक प्रांत बनून राहिले होते. असे 200 वर्षेपर्यंत सुरू राहिले आणि समयरेखेत गुलाबी रंगाने दाखविण्यात आले आहे. या काळात यहूदी मंदिर (ज्यास 2 रे मंदिर म्हटले जाते) आणि यरूशलेम नगर पुन्हा उभारण्यात आले. जरी यहूदी लोकांस इस्राएलास परतण्याची संधी देण्यात आली, तरी अनेक लोक विदेशात बंदिवासात राहिले.

ग्रीकांचा काळ

महान सिकंदरने पर्शियन साम्राज्यावर विजय मिळविला आणि ग्रीक साम्राज्यात दुसरी 200 वर्षे इस्राएलास एक प्रांत बनविण्यात आले. हे गर्द निळ्या रंगाने दाखविण्यात आले आहे.

ग्रीक साम्राज्याचा भाग म्हणून देशात राहणे

रोमी लोकांचा काळ

मग रोमने ग्रीक साम्राज्याचा पाडाव केला आणि ते प्रबळ विश्वशक्ति बनले. यहूदी पुन्हा या साम्राज्यात एक प्रांत बनून राहिले आणि हे हलक्या पिवळ्या रंगाने दाखविले आहे. याच काळात येशू जगला. यावरून हे स्पष्ट होते की रोमी सैनिक शुभवर्तमानाच्या पुस्तकांत का आहेत – कारण येशूच्या जीवनकाळात इस्राएलात यहूदी लोकांवर रोमी लोकांनी राज्य केले.

रोमी साम्राज्याचा भाग म्हणून देशात राहणे

रोमच्या शासनकाळात यहूदी लोकांचा दुसरा बंदिवास

बंबिलोनियनच्या काळापासून (ख्रि. पू. 586) यहूदी लोक जसे दावीद राज्याच्या काळात होते तसे स्वतंत्र नव्हते. त्यांच्यावर इतर साम्राज्यांचे राज्य होते, जसे स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिशांनी भारतावर राज्य केले होते तसे. यहूदी लोक यामुळे संतप्त झाले आणि त्यांनी रोमी राज्याविरुद्ध उठाव केला. रोमने येऊन यरूशलेमाचा नाश केला (ईस्वी सन 70), 2 रे मंदिर जाळून टाकले, आणि यहूदी लोकांस रोमी साम्राज्यभर गुलाम म्हणून तडीपार केले. हा दुसरा यहूदी बंदिवास होता. रोम इतके मोठे साम्राज्य होते त्यामुळे शेवटी यहूदी लोकांची संपूर्ण जगात पांगापांग झाली.

सन 70 मध्ये रोमी लोकांनी यरूशलेमाचा आणि मंदिराचा नाश केला.

यहूदी लोकांस जगभर बंदिवासात पाठविण्यात आले. अशाप्रकारे यहूदी लोक जवळजवळ 2000 वर्षे जगले: विदेशात त्यांची पांगापांग झाली आणि त्यांचा या देशांत कधीही स्वीकार करण्यात आला नाही. या वेगवेगळ्या देशांत त्यांनी नियमितपणे मोठ्या छळास तोंड दिले. यहूद्यांचा हा छळ विशेषेकरून यूरोपात खरा ठरला. पश्चिम यूरोपातील, स्पेनमधून, रशियापर्यंत यहूदी लोक बरेचदा अतयंत जोखिमीच्या परिस्थितीत जगले. या छळापासून वाचण्यासाठी यहूदी लोक कोचिनमध्ये येत राहिले.

डेविड सॅसन आणि पुत्र – भारतातील धनसंपन्न बगदादी

17 व्या आणि 18 व्या शतकात यहूदी लोक मध्यपूर्वेतून भारताच्या इतर भागात येऊन पोहोचले, आणि त्यांस बगदादी यहूदी म्हटले जाते, त्यांच्यापैकी बहुतेक लोक मुंबई, दिल्ली आणि कलकत्ता येथे जाऊन वसले. ख्रि. पू. 1500 वर्षांपूर्वीचे मोशेचे शाप या गोष्टीचे यथार्थ वर्णन होते की ते कसे जगले.

65 “या इतर राष्ट्रांमध्ये तुम्हाला शांती लाभणार नाही. परमेश्वर तुमचे मन काळजीने पोखरुन टाकील. तुमचे डोळे शीणतील तुम्ही बेचैन व्हाल.

अनुवाद 28:65

इस्राएलविरुद्ध देण्यात आलेले शाप लोकांस हे विचारण्यासाठी देण्यात आले होते :

24 “‘परमेश्वराने या देशाचे असे का केले? त्याचा एवढा कोप का झाला?’ असे इतर राष्ट्रातील लोक विचारतील. 

अनुवाद 29:24

आणि त्याचे उत्तर होते :

25 त्याचे उत्तर असे की, आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्याशी केलेला करार इस्राएलांनी धुडकावून लावल्यामुळे परमेश्वराचा त्यांच्यावर कोप झाला. मिसरमधून या लोकांना बाहेर आणल्यावर परमेश्वराने त्यांच्याशी पवित्र करार केला होता तो यांनी मोडला. 26 हे इस्राएल इतर दैवतांची पूजा करु लागले. यापूर्वी त्यांना हे देव माहीत नव्हते. तसेच इतर दैवतांची पूजा करु नये असे परमेश्वराने त्यांना बजावले होते.27 म्हणून त्यांच्यावर तो क्रुद्ध झाला व या ग्रंथातील शापवाणी त्यांच्या बाबतीत खरी करुन दाखवली. 28 क्रोधायमान होऊन परमेश्वराने त्यांचे या देशातून उच्चाटन केले व आज ते जेथे आहेत तेथे त्यांची रवानगी केली?

अनुवाद 29;25-28

खाली दिलेली समयरेखा हा 1900 वर्षांचा कालावधी दर्शविते. हा कालावधी लांब रंगाच्या लाल गजाने दाखविलेला आहे. 

त्यांच्या बंदिवासाचे दोन काळ दर्शविणारी – मोठ्या प्रमाणात यहूद्यांची ऐतिहासिक समयरेखा

आपण पाहू शकता की यहूदी लोकांना त्यांच्या इतिहासात बंदिवासाच्या दोन काळांतून जावे लागले पण दुसरा बंदिवास पहिल्या बंदिवासापेक्षा फार लांब होता.

20 व्या शतकातील नरसंहार

यहूद्यांविरुद्ध छळाची पराकष्ठा त्यावेळी झाली जेव्हा हिटलरने, नाझी जर्मनीच्या माध्यमाने, यूरोपमध्ये वस्ती करून राहत असलेल्या सर्व यहूद्यांचा नायनाट करण्याचा प्रयत्न केला. त्याला लगभग यश आले होते पण त्याचा पराजय झाला आणि शेष यहूदी बचावले गेले.

आधुनिक इस्राएलचा पुनर्जन्म

ही वस्तुस्थिती की हजारो वर्षांनंतर स्वतःची मायभूमी नसतांनाही स्वतःची ओळख ‘यहूदी’ म्हणून टिकवून ठेवणे उल्लेखनीय आहे. पण याने 3500 वर्षांपूर्वी लिहिलेल्या, मोशेच्या शेवटच्या शब्दांस सत्यापित केले. 1948 मध्ये, संयुक्त राष्ट्रसंघाच्या माध्यमाने, आधुनिक इस्राएल राज्याचा पुनर्जन्म पाहिला, जसे मोशेने अनेक शतकांपूर्वी लिहिले होते:

3-4 तेव्हा तुमचा देव परमेश्वर तुमच्यावर प्रसन्न होईल, आणि तो तुम्हांला मुक्त करील. तुमची त्याने जेथे जेथे पांगापांग करुन टाकली होती तेथून तो तुम्हाला परत आणील. मग ते देश किती का लांबचे असेनात! पुन्हा आपल्या पूर्वजांच्या देशात तुम्ही याल आणि तो देश तुमचा होईल. परमेश्वर तुमचे कल्याण करील आणि पूर्वजांना मिळाले त्यापेक्षा कितीतरी अधिक तुम्हांला मिळेल. पूर्वी कधी नव्हती एवढी तुमची लोकसंख्या वाढेल.

अनुवाद 30:3-5

प्रचंड विरोध असतांनाही ह्या राज्याची स्थापना झाली हे देखील लक्षात घेण्यासारखे होते. शेजारच्या बहुसंख्य राष्ट्रांनी 1948मध्ये… 1956 मध्ये …1967 मध्ये आणि पुन्हा 1973 मध्ये इस्राएल विरुद्ध युद्ध केले. अतिशय लहान देश, इस्राएलने, कधी कधी एकाच वेळी पाच राष्ट्रांस लढा दिला. तरीही इस्राएलचा केवळ बचावच झाला नाही, तर त्याचा भूभाग वाढला. 1967 मध्ये सहा दिवसांच्या युद्धात, दाविदाने 3000 वर्षांपूर्वी स्थापन केलेले ऐतिहासिक राजधानीचे शहर, यरूशलेम इस्राएलने पुन्हा काबिज केले. इस्राएल राज्याच्या निर्मितीचा परिणाम, आणि या युद्धाच्या परिणामांनी आज आमच्या जगात सर्वात कठीण राजकीय समस्यांपैकी एक उत्पन्न केली आहे. 

मोशेने भाकित केल्याप्रमाणे आणि येथे पूर्णपणे शोध घेतल्याप्रमाणे, इस्राएलच्या पुनर्जन्माने भारतातील यहूदी लोकांस इस्राएल देशास परतण्याची प्रेरणा दिली. इस्राएल देशात आता 80000 यहूदी राहत आहेत ज्याची आई किंवा वडील भारतातून आहे आणि भारतात केवळ 5000 यहूदी वाचले आहेत. मोशेच्या आशीर्वादाप्रमाणे त्यांस ‘दूर देशातून’ (मिझोरामसारख्या) ‘एकत्र’ करून आणत आहे. मोशेने लिहिले की यहूदी आणि गैरयहूदी दोघांनी या अर्थाकडे लक्ष द्यावे.

(1) डॉ. अविगडोर सचन, इन द फुटस्टेप्स ऑ फ द लॉस्ट टेन ट्राईब्ज पृ. 261

संस्कृत आणि हिब्रू वेदांचे अभिसरण: का?

आपण संस्कृत वेदात मनूचा वृत्तांत आणि हिब्रू वेदात नोहाचा वृत्तांत यांतील साम्य पाहिले. त्यांतील साम्य जलप्रलयाच्या वृत्तांतापेक्षा अधिक सखोल जाते. तसेच समयाच्या पहाटे पुरुषाच्या बलिदानाचे अभिवचन आणि उत्पत्तीच्या हिब्रू पुस्तकात देण्यात आलेले संततीचे अभिवचन यांत सुद्धा साम्य आहे. आपण हे साम्य का पाहतो? योगायोग? एक वृत्तांत येणार्‍या सिद्धांतातून घेतो अथवा चोरी करतो? एक सूचना देण्यात आली आहे.

बाबेलचा बुरूज जलप्रलयानंतर

नोहाच्या वृत्तांतानंतर, वेद पुस्तकम् (बायबल) त्याच्या तीन पुत्रांच्या संततीची नोंद करते आणि सांगते “जलप्रलयानंतर त्याची पृथ्वीवर भिन्न भिन्न राष्ट्रे झाली.” . संस्कृत वेद सुद्धा जाहीर करते की मनूला तीन मुले होती ज्यांच्यापासून सर्व मानवजात उत्पन्न झाली. पण हे ‘पसरणे’ कसे घडले?

उत्पत्ती 10:32

प्राचीन हिब्रू वेदात नोहाच्या ह्या तीन पुत्रांच्या संततीच्या नावांची मांडलेली आहे – येथे यादी संपूर्ण आहे. हा वृत्तांत पुढे वर्णन करतो की कशाप्रकारे ह्या वंशाजांनी परमेश्वराच्या (प्रजापति) – उत्पन्नकर्ता, ज्याने ज्यांस आज्ञा दिली की त्यांनी पृथ्वी ‘व्यापून टाकावी (उत्पत्ती 9:1) आज्ञेचे उल्लंघन केले. त्याऐवजी हे लोक बुरूज बांधण्यासाठी एकत्र राहिले. ते येथे आपण वाचू शकता. हा बुरूज ‘आकाशास पोहोचला’ (उत्पत्ती 11:4) ज्याचा अर्थ हा आहे की नोहाचे हे वंशज उत्पन्नकर्त्याऐवजी तारांगण आणि सूर्य, चंद्रमा, ग्रह इत्यादींची उपासना करण्याच्या हेतूने बुरूज बांधत होते. हे सुप्रसिद्ध आहे की तारकांच्या उपासनेचा आरंभ मेसोपोटेमिया (जेथे हे वंशज राहत होते) झाला आणि मग ती उपासना सर्व जगभर पसरली.

म्हणून उत्पन्नकर्त्याची उपासना करण्याऐवजी, आमचे पूर्वज ताऱ्याची उपासना करू लागले. हा वृत्तांत पुढे म्हणतो की हे विफल करण्यासाठी, जेणेकरून उपासनेची भ्रष्टता अपरिवर्तनीय होऊ नये, म्हणून उत्पन्नकर्त्याने हे ठरविले

…आपण खाली जाऊन यांच्या भाषेचा घोटाळा करू म्हणजे यांस एकमेकांची भाषा समजावयाची नाही.

उत्पत्ती 11:7

याचा परिणाम म्हणून, नोहाच्या ह्या एकमेकांचे समजेना आणि अशाप्रकारे उत्पन्नकत्र्या देवाने

तेथून त्यांस सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगविले

उत्पत्ती 11:8

या लोकांस एकमेकांशी बोलता येईना, म्हणून ते एकमेकांपासून दूर झाले, आपल्या नवीन भाषागटांत, आणि अशाप्रकारे ते ‘पांगले’. यावरून हे स्पष्ट होते की आज जगातील वेगवेगळे जनसमूह अत्यंत वेगवेगळ्या भाषा का बोलतात, कारण प्रत्येक जनसमूह मेसोपोटेमियातील (कधी कधी अनेक पिढ्यानंतर) त्यांच्या मूळ केंद्रातून अशा ठिकाणी पसरला जेथे आज ते आढळतात. अशाप्रकारे,  ह्या बिंदुपासून पुढे त्यांचे क्रमशः इतिहास भिन्न होतात. पण ह्या क्षणापर्यंत प्रत्येक भाषागटाचा (ज्याद्वारे ही पहिली राष्ट्रे घडून आलीत) सामान्य इतिहास होता. ह्या सामान्य इतिहासात पुरुषाच्या बलिदानाद्वारे मोक्षाचे अभिवचन आणि मनूचा (नोहा) जलप्रलयाचा वृत्तांत यांचा समावेश होता. संस्कृत ऋषींना त्यांच्या वेदांद्वारे ह्या घटनांचे स्मरण राहिले आणि हिब्रू लोकांना त्यांच्या वेदाद्वारे (ऋषी मोशेचा तोरा) समान घटनांचे स्मरण राहिले.

जलप्रलयाच्या वेगवेगळ्या वृत्तांतांची साक्ष – जगभरातून

मजेशीर गोष्ट ही आहे की, जलप्रलयाचे वर्णन केवळ प्राचीन हिब्रू आणि संस्कृत वेदांतच स्मरण केले जात नाही. जगभरातील विविध जनसमूह आपापल्या इतिहासांत एका मोठ्या पुराचे अथवा जलप्रलयाचे स्मरण करतात. खालील चार्ट हे स्पष्ट करतो. 

जगभरातील संस्कृतींतील जलप्रलयाच्या वृत्तांताची बायबलमधील जलप्रलयाच्या वृत्तांताशी तुलना

वरच्या भागात हा चार्ट जगभरात राहणारे विविध भाषासमूह दाखवितो – प्रत्येक खंडातील. चार्टच्या सेलमध्ये हे दाखविण्यात आले आहे की हिब्रू जलप्रलयाच्या वर्णनाचा विशेष तपशील (चार्टच्या डाव्या बाजूस यादीबद्ध केलेला) त्यांच्या स्वतःच्या वृत्तांतात देखील समाविष्ट आहे किंवा नाही. काळ्या सेल्स दर्शवितात की हा तपशील त्यांच्या जलप्रलयाच्या वृत्तांतात आहे, तर रिकाम्या सेल्स दर्शवितात की हा तपशील त्यांच्या स्थानिक जलप्रलयाच्या वर्णनात नाही. आपण हे पाहू शकता की जवळजवळ ह्या सर्व भाषासमूहाजवळ कमीत कमी हे ‘स्मरण’ सामान्य होते की हा जलप्रलय उत्पन्नकर्त्या परमेश्वराद्वारे न्यायदंड होता परंतु काही मनुष्य मोठ्या तारवात बचावली. दुसऱ्या शब्दांत, ह्या जलप्रलयाची आठवण केवळ संस्कृत आणि हिब्रू वेदातच नव्हे, तर जगभरातील आणि खंडातील इतर संस्कृतीच्या इतिहासांत आढळून येते. हा या घटनेकडे संकेत करतो जी दूरच्या भूतकाळात घडली.

हिंदी पंचांगाची साक्ष

हिंदी पंचाग – महिन्याचे दिवस वरून खाली आहेत, पण 7 दिवसांचा आठवडा आहे

हिंदी पंचाग आणि पाश्चात्य पंचाग यांच्यातील फरक आणि साम्य दूर भूतकाळातील या सामायिक स्मृतीचा पुरावा आहे. बहुतेक हिंदी पंचागांची अशाप्रकारे रचना करण्यात आली आहे जेणेकरून दिवस रांगेनुसार (डावीकडून उजवीकडे) जाण्याऐवजी वरून खाली स्तंभांत (वरून खाली) जातात, जी पाश्चात्य देशांच्या दिनदर्शिकांची सार्वत्रिक रचना आहे. भारतातील काही दिनदर्शिका संख्येसाठी हिंदी लिपीचा उपयोग करतात (1,2,3…) आणि काही पाश्चात्य संख्येचा उपयोग करतात (1,2,3…). ह्या तफावतीची आपण अपेक्षा करू शकतो कारण दिनदर्शिका किंवा पंचांग दाखविण्याची कुठलीही ‘योग्य’ पद्धत नाही. पण सर्वच पंचांगात एक केंद्रिय साम्य असते. हिंदी पंचांग 7 दिवसाच्या आठवड्याचा उपयोग करते – पाश्चात्य जगताप्रमाणे. का? आपण समजू शकतो की पंचांगाचे विभाजन पाश्चात्य पंचांगासमान वर्षांत आणि महिन्यात का करण्यात आले आहे कारण हे सूर्याभोवती पृथ्वीच्या भ्रमणावर आणि पृथ्वीभोवती चंद्राच्या भ्रमणावर आधारित आहे – अशाप्रकारे सर्व लोकांस समान असा खगोलीय आधार देते. पण 7 दिवसांच्या आठवड्यासाठी खगोलीय वेळेचा कुठलाच आधार नाही. हे त्या प्रथेवरून व परंपरेवरून येते जी इतिहासात आढळून येते (किती पूर्वी हे कोणासही माहीत नसावे असे वाटते).

आणि बौद्ध थाई पंचांग

थाई पंचांग डावीकडून उजवीकडे आहे, पण त्यात पश्चिमेच्या तुलनेत वेगळे वर्ष आहे – पण यातही 7 दिवसांचा आठवडा

बौद्ध देश असल्यामुळे, बौद्ध त्यांच्या वर्षांची गणना बौद्धाच्या जीवनापासून करतात म्हणून त्यांची वर्षे नेहमीच पश्चिमेच्या तुलनेत 543 वर्षे मोठी असतात (अर्थात सन 2019 हे वर्ष बीई – बौद्ध युगात – थाई पंचांगात 2562 आहे). पण पुन्हा ते सुद्धा 7 दिवसांच्या आठवड्याचा उपयोग करतात. हे त्यांस कोठून प्राप्त झाले? वेगवेगळ्या दिवसातील अनेकप्रकारे भिन्न असलेल्या दिनदर्शिका अर्थात पंचांग ह्या समय एककासाठी कुठलाही वास्तविक खगोलीय आधार नसतांना 7 दिवसांच्या आठवड्यावर का आधारित आहेत?

आठवड्यासंबंधी प्राचीन ग्रीक लोकांची साक्ष

प्राचीन ग्रीक लोकसुद्धा त्यांच्या पंचांगात 7 दिवसांच्या आठवड्याचा उपयोग करीत.

प्राचीन ग्रीक वैद्य हिप्पोक्रेटस, जो ख्रि.पू. 400च्या सुमारास जगत असे त्यास आधुनिक चिकित्साविज्ञानाचा जनक मानले जाते आणि त्याने लिहिलेली पुस्तके, जी अद्याप सुरक्षित आहेत, त्याच्या वैद्यकीय निरीक्षणांची नोंद करते. असे करतांना त्याने समय एककाच्या रूपात ‘आठवड्याचा’ उपयोग केला. एका विशिष्ट रोगाच्या वाढत्या लक्षणांविषयी लिहितांना त्याने म्हटले :  

चौथा दिवस सातव्याचा दर्शक आहे; आठवा दिवस दुसर्‍या आठवड्याची सुरूवात आहे; आणि म्हणून, अकरावा दिवस दुसर्‍या आठवड्याचा सुद्धा निदर्शक आहे; आणि पुन्हा, सतरावा निदर्शक आहे, जसा चौदाव्यापासून चौथ्या क्रमांकावर असल्यामुळे, आणि अकराव्यापासून सातव्या क्रमांकावर (हिप्पोक्रेटस, एफोरिजम. #24)

ख्रि.पू. 350 मध्ये लिहित असतांना, अॅरिस्टाटल वेळ चिन्हाकित करण्यासाठी नियमितपणे ‘आठवड्याचा’ उपयोग करतो. एक उदाहरण देण्यासाठी तो लिहितो :

शिशु अवस्थेत घडून येणारे अनेक मृत्यू मूल एक आठवड्याचे होण्यापूर्वी घडून येतात, म्हणून त्या वयात मुलाचे नाव ठेवण्याची प्रथा आहे, ह्या विश्वासावरून की त्याच्या वाचण्याची आता उत्तम संधी आहे.

अॅरिस्टाटल, हिस्ट्री आफ अॅनिमल्स, भाग 12, ख्रि.पू. 350

तर या भारतापासून आणि थायलंडपासून दूर, प्राचीन ग्रीक लेखकांस, ‘आठवड्याची’ कल्पना कोठून आली जेणेकरून त्यांनी ह्या अपेक्षेने त्याचा उपयोग केला की त्यांच्या ग्रीक वाचकांस हे माहीत असावे की ‘आठवडा’ म्हणजे काय? कदाचित ह्या सर्व संस्कृतींत त्यांच्या भूतकाळात (जरी त्यांस त्या घटनेचा विसर पडला असावा) एखादी ऐतिहासिक घटना घडली असावी ज्याने 7 दिवसांचा आठवडा ठरविण्यात आला?

हिब्रू वेद अगदी अशा एका घटनेचे वर्णन करतो – जगाची प्रारंभिक उत्पत्ती. त्या तपशीलात आणि पुरातन वृत्तांतात सृष्टीकर्ता परमेश्वर जगाची उत्पत्ती करतो आणि 7 दिवसांत पहिल्या लोकांस घडवितो (6 दिवस आणि विश्रांतीचा 7वा दिवस). त्यामुळे, प्रथम मानवांनी त्यांच्या दिनदर्शिकेत 7 दिवसाच्या आठवड्याचे समय एकक वापरले. जेव्हा त्यानंतर भाषेच्या गोंधळामुळे मानवजातीची पांगापांग झाली तेव्हा ह्या ‘पांगापांगीच्या’ पूर्वीच्या घटना ह्या विविध भाषासमूहांपैकी अनेकांद्वारे लक्षात ठेवण्यात आल्या, ज्यात येणार्‍या बलिदानाचे अभिवचन, सर्वनाशक जलप्रलयाचा वृत्तांत, तसेच 7 दिवसांच्या आठवड्याचा समावेश होतो. ह्या आठवणी प्रारंभिक मानवजातीच्या जिवंत कलाकृति आहेत आणि ह्या वेदांत नमूद करण्यात आलेल्या या घटनांच्या इतिहासाची साक्ष ठरतात. हे स्पष्टीकरण निश्चितच हिब्रू आणि संस्कृत वेदांतील साम्य स्पष्ट करण्याची सर्वात सरळ पद्धत आहे. आज अनेक जण ह्या पुरातन लिखाणांस केवळ अंधश्रद्धात्मक पुराण कथा म्हणून दूर करतात पण त्यातील साम्य पाहून त्याविषयी त्यांनी गंभीरपणे विचार करावा.

प्रारंभिक मानवजातीचा सामान्य इतिहास होता ज्यात उत्पन्नकर्त्याद्वारे मोक्षाचे अभिवचन होते. पण ते अभिवचन कसे पूर्ण होणार होते? आपण एका पवित्र व्यक्तीचा वृत्तांत सुरू ठेवू जो भाषांतील गोंधळानंतर उत्पन्न झालेल्या पांगापांगीनंतर जगला. आपण याविषयी पुढे वाचू.

[अशाच प्रकारचे अभिसरण दर्शविणार्‍या प्राचीन आठवणींबद्दल पुढील माहितीसाठी – परंतु यावेळी चीनी भाषेतील सुलेखनाच्या माध्यमातून येथे पहा]

येशूच्या बलिदानाद्वारे शुद्धिकरणाचे कृपादान कसे प्राप्त करावे?

येशू स्वतःस सर्व लोकांसाठी बलिदान म्हणून देण्यासाठी आला. ह्या संदेशाची पूर्वछाया प्राचीन ऋग्वेदांच्या स्तोत्रांमध्ये तसेच प्राचीन हिब्रू वेदांतील अभिवचनांमध्ये व उत्सवांमध्ये आढळून येते. जेव्हा आम्ही प्रार्थस्नान (किंवा प्रतसन) मंत्राची प्रार्थना जपतो.  तेव्हा प्रत्येक वेळी आम्ही विचारीत असलेल्या प्रश्नाचे उत्तर येशू आहे. हे कसे आहे? बायबलमध्ये (वेद पुस्तकम्) एका कर्मिक नियमाची घोषणा करण्यात आली आहे जो आपल्या सर्वांना प्रभावित करतो:

क्योंकि पाप का मूल्य तो बस मृत्यु ही है जबकि हमारे प्रभु यीशु मसीह में अनन्त जीवन, परमेश्वर का सेंतमेतका वरदान है। पापाचे वेतन मरण आहे…

रोमकरांस पत्र 6:23

खाली मी एका चित्राद्वारे हा कर्माचा नियम दाखविला आहे. “मृत्यू” म्हणजे विभक्त होणे. जेव्हा आपला आत्मा आपल्या शरीरापासून विभक्त होतो तेव्हा आपण शारीरिकरित्या मृत होतो. त्याचप्रकारे आपण आध्यात्मिकरित्या देवापासून विभक्त झालो आहोत. हे सत्य आहे कारण देव पवित्र आहे (निष्पाप अथवा पापरहित).

पर्वताच्या दोन कडयांमधील दरीप्रमाणे पाप आम्हाला देवापासून विभक्त करते.

आपण स्वतःविषयी कल्पना करू शकतो की आपण पर्वताच्या एका कड्यावर आहोत आणि परमेश्वर देव दुसऱ्या कड्यावर आहे आणि पापाची मोठी दरी आम्हास देवापासून विभक्त करते.

या वेगळेपणामुळे दोषभावना व भय निर्माण होते. म्हणून आपण नैसर्गिकरित्या काही करण्याचा प्रयत्न करतो अर्थात् एक पूल बांधतो जो आम्हाला आपल्या बाजूने (मृत्यूच्या) देवापासून बाजूला घेऊन जाईल. आपण बळी देतो, पूजा करतो, तपस्या करतो, सणांमध्ये भाग घेतो, मंदिरांत जातो, प्रार्थना करतो आणि आपली पाप कमी करण्याचा किंवा थांबविण्याचा प्रयत्न करतो. गुणवत्ता किंवा पात्रता मिळविण्यासाठी केलेल्या कर्मांची ही यादी आपल्यापैकी काहींसाठी फार लांब असू शकते. समस्या ही आहे की आमचे प्रयत्न, गुण, बलिदान आणि तपस्वी पद्धती इत्यादी, जरी स्वतःमध्ये वाईट नसल्या, तरी अपुऱ्या आहेत कारण आपल्या पापांसाठी आवश्यक मोबदला (‘वेतन’)  म्हणजे ‘मृत्यू’  आहे. हे पुढील चित्रात स्पष्ट केले आहे.

धार्मिक गुण- जरी ते चांगले असले तरीही – आपण आणि देव यांच्यातील विभक्ती कमी करू शकत नाहीत

आपल्या धार्मिक प्रयत्नांद्वारे आपण आम्हाला देवापासून विभक्त करणारी दुफळी ओलांडण्यासाठी एक ‘पूल’ बांधण्याचा प्रयत्न करतो. जरी हे वाईट नसले, तरीही ते आपली समस्या सोडवणार नाही कारण आम्ही पूर्णपणे दुसर्या बाजूला जाण्यात यशस्वी होत नाही. आमचे प्रयत्न पुरेसे नाहीत. हे फक्त शाकाहारी अन्न खाऊन कर्करोग बरे करण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे (ज्याचा परिणाम मृत्यू होतो). पालेभाज्या खाणे खूप चांगले आहे – परंतु यामुळे कर्करोग बरा होणार नाही. त्यासाठी आपल्याला पूर्णपणे भिन्न उपचारांची गरज आहे. आपण ह्या प्रयत्नांचे स्पष्टीकरण धार्मिक गुणवत्तेच्या ‘सेतू’ च्या सहाय्याने करू शकतो जो केवळ अर्धा मार्ग जातो – दरी ओलांडून – आणि आम्हाला अद्याप देवापासून विभक्त सोडतो.

कर्मिक नियम ही एक वाईट बातमी आहे – हे इतकी वाईट बातमी आहे की आम्हाला बहुतेकदा ती ऐकायला देखील आवडत नाही आणि आम्ही बहुतेकदा आपले जीवन क्रियाकलापांनी आणि इतर गोष्टींनी भरतो या आशेने की हा नियम दूर होईल -परंतु आमच्या परिस्थितीचे गांभीर्य आमच्या अंतःकरणात खोलवर बुडून जाते. परंतु बायबलचा शेवट या कर्मिक नियमाने होत नाही.

क्योंकि पाप का मूल्य तो बस मृत्यु ही है जबकि हमारे प्रभु यीशु मसीह में अनन्त जीवन, परमेश्वर का सेंतमेतका वरदान है। कारण पापाचे वेतन मरण आहे पण..

रोमकरांस पत्र 6:23

पण’ हा छोटासा शब्द दर्शवितो की नियमशास्त्राची दिशा आता दुसरीकडे सुवार्तेकडे – शुभवर्तमानाकडे जाणार आहे. हा कर्माचा नियम मोक्ष आणि प्रबोधनाच्या नियमाकडे वळला आहे. तर मोक्षाची ही चांगली बातमी काय आहे ?.

कारण पापाचे वेतन मरण आहे पण पण देवाचे कृपादान प्रभु येशू ख्रिस्तामध्ये  सार्वकालिक जीवन आहे

रोमकरांस पत्र 6:23

सुसमाचार की अच्छी खबर यह है कि यीशु की मृत्यु का बलिदान हमारे और परमेश्वर के बीच इस अलगाव को पाटने के लिए पर्याप्त है। हम यह जानते हैं क्योंकि उनकी मृत्यु के तीन दिन बाद यीशु शारीरिक रूप से जीवित हुए, फिर से एक भौतिक पुनरुत्थान में जीवित हुए। हालाँकि आज कुछ लोग यीशु के पुनरुत्थान को अविश्वास करने के लिए चुनते हैं, लेकिन इसके लिए एक बहुत मजबूत मामला बनाया जा सकता है, जो इस सार्वजनिक व्याख्यान में दिखाया गया है जो मैंने एक विश्वविद्यालय में किया था (वीडियो लिंक यहाँ)। प्रभु यीशु ने स्वर्ग में प्रवेश किया और स्वयं को भगवान को अर्पित कर दिया। एक अर्थ में, उसने सभी लोगों की ओर से, पाप की सफाई के लिए स्वयं को अर्पित करके, भगवान द्वारा स्वीकार की गई पूजा की।

यीशु पूर्ण बलिदान देने वाला पुरु है। चूँकि वह एक आदमी था, वह एक ऐसा पुल बनाने में सक्षम था, जो चैस को फैलाता है और मानवीय पक्ष को छूता है और चूँकि वह परिपूर्ण था और वह ईश्वर के पक्ष को भी छूता था। वह जीवन के लिए एक पुल है और इसे नीचे के रूप में चित्रित किया जा सकता है

येशू हा पूल आहे जो देव आणि मानव यांच्यातील अंतर दूर करतो. त्याचे बलिदान आपल्या पापांची भरपाई करते.

येशू हा परिपूर्ण बलिदान करणारा पुरुष आहे. मनुष्य असल्याने तो पूल बनण्यास सक्षम आहे जो मधले अंतर दूर करतो आणि मानवी बाजूला स्पर्श करतो आणि परिपूर्ण असल्यामुळे तो देवाच्या बाजूला देखील स्पर्श करतो. तो जीवनाचा पूल आहे आणि हे खालीलप्रमाणे आकृतीद्वारे स्पष्ट करता येते.

येशूचे हे बलिदान आपल्याला कसे दिले गेले त्याकडे लक्ष द्या. हे एक… देणगी  म्हणून देण्यात आले. भेटवस्तूंचा विचार करा. भेटवस्तू काय आहे हे महत्त्वाचे नाही, जर ते खरोखर एखादे कृपादान अथवा देणगी असेल तर त्यासाठी आपण कार्य करीत नाही आणि आपण गुणवत्तेने ते कमवत नाही. आपण ते कमविले तर देणगी यापुढे देणगी राहणार नाही! त्याचप्रकारे आपण येशूच्या बलिदानाची योग्यता मिळवू शकत नाही किंवा कमवू शकत नाही. ते आपल्याला देणगी म्हणून दिले जाते.

आणि ही देणगी किंवा कृपादान काय आहे? ते म्हणजे सार्वकालिक जीवन  आहे. याचा अर्थ असा की आपणास मरण आणणारे पाप आता रद्द केले गेले आहे. येशूचे बलिदान हा एक पूल आहे ज्यावरून आपण देवाशी संपर्क साधण्यासाठी आणि जीवन प्राप्त करण्यासाठी पार जाऊ शकता आणि जीवन प्राप्त करू शकता – ते कायमचे टिकते. ही देणगी येशूने दिली आहे, जो मरणातून उठून, स्वतःला ‘प्रभु’ असल्याचे दाखवतो.

तर येशू आपल्याला देणगी म्हणून देत असलेल्या त्या जीवनाच्या या पुलावर आपण आणि मी कसे ‘ओलांडून’ जाल? पुन्हा, भेटवस्तूंचा विचार करा. जर कोणी येऊन आपल्याला बक्षिस किंवा भेटवस्तू दिली तर ती अशी वस्तू आहे जिच्यासाठी आपण काम करीत नाही. परंतु भेटवस्तूचा अथवा देणगीचा फायदा मिळविण्यासाठी आपण तिचा ‘स्वीकार’  केला पाहिजे. जेव्हा जेव्हा एखादी देणगी दिली जाते तेव्हा तेथे दोन पर्याय असतात. एकतर देणगी नाकारली जाऊ शकते (“धन्यवाद नाही”) किंवा तिचा स्वीकार केला जातो (“तुझ्या देणगीबद्दल धन्यवाद. मी तिचा स्वीकार करीत आहे”). म्हणून येशू जी देणगी देत आहे तिचा स्वीकार केला पाहिजे. यावर फक्त ‘विश्वास ठेवणे’, ‘तिचा अभ्यास करणे’  किंवा ‘समजून घेणे’ पुरेसे असू शकत नाही. पुढील चित्रात हे स्पष्ट केले आहे जेथे आपण देवाकडे वळून आणि त्याने आपल्याला देऊ केलेल्या देणगीचा स्वीकार करून पुलावरून ‘चालून’  जातो.

येशूचे बलिदान ही एक देणगी अथवा कृपादान आहे ज्याचा स्वीकार करण्याची आपण प्रत्येकाने निवड केली पाहिजे.

तर आपण ह्या देणगीचा कसा स्वीकार करतो? बायबल असे म्हणते की

 यह इसलिए है कि यहूदियों और ग़ैर यहूदियों में कोई भेद नहीं क्योंकि सब का प्रभु तो एक ही है। और उसकी दया उन सब के लिए, जो उसका नाम लेते है, अपरम्पार है।

रोमकरास 10:12

लक्षात घ्या की हे अभिवचन  “प्रत्येकासाठी”  आहे, विशिष्ट धर्म, वंश किंवा देशासाठी नाही. येशू मेलेल्यांतून उठला म्हणून तो आताही जिवंत आहे आणि तो ‘प्रभु’ आहे. म्हणून जर आपण त्याला हाक माराल तर तो ऐकेल आणि आपले जीवनाचे कृपादान तो आपणास देईल. आपणास त्याला हाक मारण्याची आणि त्याला मागणी करण्याची गरज आहे – त्याच्याशी संभाषण करण्याद्वारे. कदाचित आपण हे कधीही केले नसेल. येथे मार्गदर्शन करण्यात आले आहे ज्याद्वारे आपणास त्याच्याशी संवाद साधण्यात  आणि प्रार्थना करण्यात मदत मिळू शकेल. हा जादूचा मंत्र नाही. हे विशिष्ट शब्द नाहीत जे सामथ्र्य देतात. हा देणगी देण्याच्या त्याच्या क्षमतेवर आणि इच्छेवर आमचा विश्वास आहे. जेव्हा आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू तेव्हा तो आमचे ऐकेल व उत्तर देईल. म्हणून उंच आवाजात अथवा आपल्या आत्म्यात येशूशी बोलण्यासाठी ह्या मार्गदर्शिकेचा मोकळ्या मनाने उपयोग करावा.

प्रिय प्रभु येशू. मला हे समजते की माझ्या आयुष्यातील पापांमुळे मी देवापासून विभक्त झालो आहे. मी कितीही प्रयत्न केला तरीही, कोणत्याही प्रयत्नांमुळे अथवा बलिदानाने हा विभक्तपणा मला साधता येणार नाही. परंतु मला हे समजते की तुझा मृत्यू हा सर्व पाप धुऊन टाकण्यासाठी बलिदान होताअगदी माझी पापेसुद्धा. माझा असा विश्वास आहे की तू बलिदान दिल्यानंतर मेलेल्यांतून उठला म्हणून मी हे समजू शकतो की तुझे बलिदान पुरेसे होते. मी तुला विनंती करतो की कृपा करून मला माझ्या पापांपासून शुद्ध कर आणि मला देवाशी माझे नाते जोड यासाठी की मला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावेमी पापाचा गुलाम म्हणून जीवन जगू इच्छित नाही म्हणून कृपया मला कर्माच्या जाळ्यात अडकवून ठेवणार्या या पापांपासून मुक्त करा. धन्यवाद, प्रभु येशू, माझ्यासाठी हे सर्व केल्याबद्दल आणि तरीही माझ्या जीवनात माझे मार्गदर्शन करीत राहा जेणेकरून माझा प्रभु म्हणून मी तुझे अनुसरण करीत राहावे.