दहा आज्ञा : कलियुगातील कोरोना व्हायरस चाचणीसमान

सर्वसामान्यतः असे समजले जाते की आपण कलियुगात अथवा कालीच्या युगात जगत आहोत. हे चार युगांतील शेवटचे युग आहे, ज्याची सुरूवात सत्य युग, त्रेता युग आणि द्वापर युग यापासून होते. या चार युगांमध्ये जे सामान्य आहे ते म्हणजे पहिल्या सत्य युगापासून (सत्ययुग) सांप्रत कलियुगापर्यंत स्थिर नैतिक आणि सामाजिक पतन.

महाभारतात मार्कंडेय कलियुगातील मानवी वर्तनाचे वर्णन अशाप्रकारे वर्णन केले आहे :

क्रोध, संताप आणि अज्ञानात वाढ होईल

धर्म, सत्यता, स्वच्छता, सहनशीलता, दया, शारीरिक बळ आणि स्मरणशक्ती ही प्रत्येक दिवसानुसार कमी होत जातील.

लोकांच्या मनात हत्येचे विचार असतील ज्याचे समर्थन करता येत नाही आणि त्यात त्यांना काहीही चुकीचे दिसणार नाही.

वासनेस सामाजिक दृष्टिकोनातून स्वीकार्य मानले जाईल आणि लैंगिक संभोगाकडे जीवनाची मुख्य आवश्यकता म्हणून पाहिले जाईल.

पापाची मोठ्या प्रमाणात वाढ होईल, तर पुण्य कमी होत जाईल आणि त्याची भरभराट थांबेल.

लोकांना मादक पेयपदार्थांचे आणि मादक औषधांचे व्यसन लागेल.

गुरुजनांचा यापुढे मान राखला जाणार नाही आणि त्यांचे विद्यार्थी त्यांना इजा करण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्या शिकवणीचा अपमान केला जाईल आणि कामाचे अनुयायी सर्व मानवांकडून मनावरील नियंत्रण बळकावून घेतील.

सर्व माणसे स्वतःला देवता किंवा देवतांनी दिलेले वरदान घोषित करतील आणि शिकवणीऐवजी त्याला व्यवसाय बनवतील.

लोक यापुढे लग्न करणार नाहीत आणि फक्त लैंगिक सुखासाठी एकमेकांसोबत राहतील.

मोशे दहा आज्ञा

इब्री वेद आपल्या सांप्रत युगाचे वर्णन बहुंताशी त्याचप्रकारे करतात. आपल्या पातकी प्रवृत्तीमुळे, वल्हांडण सणानिमित्त मिसर देशातून बाहेर गेल्यानंतर लवकरच देवाने मोशेला दहा आज्ञा दिल्या. मोशेचे ध्येय इस्राएल लोकांना फक्त मिसर देशातून बाहेर काढून नेणे नव्हते, तर त्यांना जीवन जगण्याच्या नवीन पद्धतीकडे मार्गदर्शन करणे हे होते. म्हणून इस्राएली लोकांची सुटका करणार्‍या वल्हांडणाच्या पन्नास दिवसानंतर,  मोशेने त्यांना सीनाय पर्वताकडे (होरेब पर्वत) नेले जेथे त्यांना देवाकडून नियमशास्त्र प्राप्त झाले. कलियुगातील अडचणी दूर करण्यासाठी हे नियमशास्त्र कलियुगात प्राप्त झाले होते.

मोशेला कोणत्या आज्ञा देण्यात आल्या? संपूर्ण नियमशास्त्र बरेच लांब होते, पण मोशेला प्रथम दगडी पाट्यांवर देवाने लिहिलेल्या विशिष्ट नैतिक आज्ञेचा एक संच प्राप्त झाला, ज्याला दहा आज्ञा (किंवा डेकॅलाग) म्हणतात. ह्या दहा आज्ञांद्वारे नियमशास्त्राचा सारांश तयार झाला – अगदी लहान तप शीलांपूर्वी नैतिक धर्म – आणि ते आता कलियुगातील सामान्य पापांबद्दल पश्चाताप करण्यासाठी प्रवृत्त करणारे देवाचे सक्रिय  सामर्थ्य आहेत.

दहा आज्ञा

दगडावर देवाने लिहिलेल्या, दहा आज्ञांची संपूर्ण यादी येथे आहे, जी नंतर मोशेने हिब्रू वेदांमध्ये नोंदविली.

ग देव म्हणाला,
2 “मी याव्हे तुझा प्रभू, तुझा देव आहे. तुम्ही मिसरमध्ये गुलाम होता तेव्हा मीच तुम्हाला तेथून गुलामगिरीतून सोडवून आणले.
3 “माझ्या शिवाय इतर कोणत्याही दैवतांची तू उपासना करु नयेस.
4 “तू आपल्यासाठी कोरीव मूर्ती करु नकोस; वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वीखालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करु नकोस;
5 त्यांची उपासना करू नको; किंवा त्यांची सेवा करु नकोस; कारण मी परमेश्वर तुझा देव आहे;मी ईर्ष्यावान देव आहे, जे माझ्याविरुद्ध पाप करतात, माझा द्वेष करतात ते माझे शत्रू बनतात; मी त्यांना शिक्षा करीन; मी त्यांच्या मुलांना तिसऱ्या चौथ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अपराधाबद्दल शिक्षा करतो;
6 परंतु जे माझ्यावर प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करतो.
7 “परमेश्वर देवाचे नांव तू व्यर्थ घेऊ नकोस; परमेश्वराच्या नांवाचा उपयोग तू अयोग्य गोष्टीसाठी करु नकोस; जर कोणी तसे करील तर तो दोषी ठरेल आणि परमेश्वर त्याला निर्दोष ठरविणार नाही.
8 “शब्बाथ दिवस हा पवित्र दिवस म्हणून पाळण्याची आठवण ठेव;
9 आठवड्यातील सहा दिवस तू तुझे कामकाज करावेस;
10 परंतु सातवा दिवस तुझा देव परमेश्वर याच्या सन्मानासाठी विसाव्याचा दिवस आहे म्हणून त्या दिवशी तू, तुझे मुलगे तुझ्या मुली, तुझे गुलाम व तुझ्या गुलाम स्त्री यांनी तसेच तुझी गुरेढोरे व तुझ्या गावात राहाणाऱ्या परकीयांनीही कोणतेही कामकाज करु नये;
11 कारण परमेश्वराने सहा दिवस काम करून आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यांतील सर्व काही उत्पन्न केले आणि त्यानंतर सातव्या दिवशी विसावा घेतला; या प्रमाणे परमेश्वराने शब्बाथ दिवस हा विसाव्याचा विशेष दिवस म्हणून आशीर्वाद देऊन तो पवित्र केला आहे.
12 “तू आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख म्हणजे त्यामुळे परमेश्वर तुझा देव जो देश तुला देत आहे त्या देशात तुला दीर्घायुष्य लाभेल.
13 “कोणाचाही खून करु नकोस.
14 “व्यभिचार करु नकोस.
15 “चोरी करु नकोस.
16 “तू आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नकोस.
17 “तू आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरु नकोस; त्याच्या बायकोचा लोभ धरु नकोस; त्याचा गुलाम, त्याची स्त्री गुलाम, बैल, गाढव किंवा त्याच्या मालकीचे जे काही असेल त्या कशाचाही लोभ धरु नकोस.”

निर्गम 20:1-18

दहा आज्ञाचा मानक

आज आपण कधीकधी विसरून जातो की ह्या आज्ञा आहेत. त्या सूचविण्यात आलेल्या बाबी नाहीत. किंवा त्या शिफारसी देखील नाहीत. परंतु या आज्ञा आपण किती प्रमाणात पाळल्या पाहिजेत? दहा आज्ञा देण्याच्या अगदी आधी खालील वचन येते.

  3 मग मोशे पर्वतावर देवाला भेटावयास गेला तो पर्वतावर असताना देव त्याला म्हणाला, “तू या इस्राएल लोकांना म्हणजे याकोबाच्या वंशजांना सांग,
4 ‘मी माझ्या शत्रुंचे काय करतो ते तुम्ही पाहिले आहे. मिसरच्या लोकांचे मी काय केले आहे आणि गरुड पक्षी आपल्या पिल्लांना सुरक्षित जागी जसा नेतो तसेच मिसरच्या लोकांच्या तावडीतून सुरक्षितपणे तुम्हाला येथे आणले तेही तुम्ही पाहिले आहे.
5 म्हणून मी आता तुम्हाला सांगतो की तुम्ही माझ्या आज्ञांचे व माझ्या कराराचे पालन करावे; असे तुम्ही कराल तर तुम्ही खास माझे लोक व्हाल हे सर्व जग माझे आहे परंतु त्यातील सर्व लोकांतून मी तुम्हाला निवडून घेईन आणि तुम्ही खास माझे लोक व्हाल.

निर्गम 19:3,5

हे दहा आज्ञेच्या अगदी नंतर देण्यात आले

  7 मग मोशेने गुंडाळी पत्रात लिहिलेला विशेष करार सर्वानी ऐकावा म्हणून वाचून दाखविला आणि मग लोक म्हणाले, “परमेश्वराने दिलेल्या आज्ञा आम्ही ऐकल्या आहेत; त्या आम्ही पाळू असे आम्ही कबूल करतो.”

निर्गम 24:7

कधीकधी शालेय परीक्षांमध्ये, शिक्षक अनेक प्रश्न (उदाहरणार्थ 20) देतात परंतु त्यानंतर फक्त काही प्रश्नांची उत्तरे द्यावयाची असतात. आम्ही, उदाहरणार्थ, उत्तर देण्यासाठी 20 पैकी कोणतेही 15 प्रश्न निवडू शकतो. प्रत्येक विद्यार्थी त्याचे/तिचे उत्तर देण्यासाठी सर्वात सोपे 15 प्रश्न निवडू शकतो. अ शाप्रकारे शिक्षक परीक्षा आणखी सुलभ करतो.

अनेक जण दहा आज्ञांविषयी असाच विचार करतात. त्यांना वाटते की दहा आज्ञा दिल्यानंतर, देवाचा असा अर्थ होता की, “या दहांपैकी कोणत्याही सहांची निवड करण्याचा प्रयत्न करा”. आम्ही अ शाप्रकारे विचार करतो कारण आपण अशी कल्पना करतो की देव आपल्या ‘वाईट कृत्यांच्या’ तुलनेत आपल्या ‘सत्कृत्यांची’ मोजमाप करीत आहे. जर आपली सत्कृत्ये वजनात अधिक असली अथवा त्यांनी आमच्या वाईट उणीवांस रद्द केले, तर आम्ही आशा करतो की हे देवाची कृपा मिळविण्यासाठी पुरेसे आहे.

तथापि, प्रामाणिकपणे दहा आज्ञा वाचताना असे दिसून येते की ते असे देण्यात आले नव्हते. लोकांस सर्व  आज्ञा पाळावयाच्या आहेत आणि त्यांचे पालन करावयाचे आहे – सर्व वेळ. यात आलेल्या निव्वळ अडचणीमुळे बरेच जण दहा आज्ञा खारीज करतात. परंतु कलियुगात येणार्‍या परिस्थितींसाठी त्या कलियुगात देण्यात आल्या होत्या.

दहा आज्ञा कोरोनाव्हायरस चाचणी

२0२0 मध्ये जगभर पसरलेल्या कोरोनाव्हायरस संक्रमणाशी तुलना करून कलियुगातील कठोर दहा आज्ञांचा हेतू कदाचित आपल्याला अधिक चांगल्याप्रकारे समजू शकतो. कोविड -19 ह्या आजारात ताप, खोकला आणि श्वास घेण्यात त्रास ही लक्षणे दिसून येतात जी कोरोनाव्हायरसमुळे  येतात – इतके लहान असे काही जे आम्ही पाहू शकत नाही.

समजा एखाद्याला ताप वाटत असेल व त्याला खोकला असेल. या व्यक्तीच्या मनात विचार येतो की समस्या काय आहे. त्याला/तिला सामान्य ताप आहे की कोरोनाव्हायरसचा संसर्ग झाला आहे? तसे असल्यास ही एक गंभीर समस्या आहे – अगदी जीवघेणी समस्या. कोरोनाव्हायरस इतक्या वेगाने पसरत आहे आणि प्रत्येकजण संवेदनाक्षम असावा ही खरी शक्यता आहे. हे जाणून घेण्यासाठी ते एक विशेष तपासणी करतात जे कोरेनाव्हायरस त्यांच्या शरीरात आहे किंवा नाही हे ठरविते. कोरोनाव्हायरस चाचणी त्यांचा आजार बरा करीत नाही, तर केवळ निश्चितपणे हे सांगते की त्यांना सामान्य ताप आहे, किंवा त्यांच्यात कोरोनाव्हायरस आहे ज्यामुळे कोविड – 19 होईल.

दहा आज्ञांचे देखील तसेच आहे. कलियुगात नैतिक पतन तितकेच प्रचलित आहे जितका की २0२0 मध्ये कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव आहे. सर्वसाधारण नैतिक दुर्गुणाच्या या युगात आपण स्वतः नीतिमान आहोत का अथवा पापाने कलंकित आहोत हे जाणून घेऊ इच्छितो. दहा आज्ञा यासाठी देण्यात आल्या होत्या की त्यांच्या मदतीने आम्ही आपल्या जीवनाचे परीक्षण करावे व त्याद्वारे हे जाणून घ्यावे की आपण पापापासून आणि त्यासोबत येणार्‍या कर्मापासून मुक्त आहोत का, अथवा पापाचा आपल्यावर पगडा आहे. दहा आज्ञा कोरोनाव्हायरस चाचणी प्रमाणेच कार्य करतात – यासाठी की आपण हे जाणावे की आपल्याला हा रोग (पाप) आहे का किंवा आपण त्यापासून मुक्त आहात.

पापाचा शब्दशःअर्थ आहे लक्ष्य ‘चुकणे’ ज्याविषयी देव आपल्याकडून अपेक्षा करतो की आपण इतरांस कसे वागवितो, स्वतःशी आणि देवाशी कसे वर्तन करतो. पण आपली समस्या ओळखण्याऐवजी आपण स्वतःची तुलना इतरां शी (चुकीच्या निकषाच्या विरोधात स्वतःचे मूल्यमापन करण्याद्वारे) करण्याची प्रवृत्ती बाळगतो, धार्मिक गुणवत्ता मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतो, अथवा ते सोडून फक्त सुखविलासासाठी जगतो. म्हणून देवाने दहा आज्ञा दिल्या यासाठी की :

20 नियमशास्त्राच्या कर्मांनी कोणीही देवासमोर नीतिमान ठरणार नाही. कारण नियमशास्त्राद्वारे पापाची जाणीव होते.

रोम. 3:20

जर आपण दहा आज्ञांच्या मानकांविरुद्ध आपल्या जीवनाचे परीक्षण केले तर ते अंतर्गत समस्या दाखविणार्‍या कोरोनाव्हायरस चाचणी घेण्यासारखे ठरते. दहा आज्ञा आपल्या समस्येचे ‘निराकरण’ करीत नाहीत,  परंतु त्या समस्या स्पष्टपणे प्रकट करतात ज्यायोगे देवाने दिलेला उपाय आपण स्वीकारू. स्वतःची फसवणूक करून घेण्याऐवजी, नियमशास्त्र आम्हाला स्वतःला अचूकपणे पाहण्याची परवानगी देतो.

पश्चातापाठायी देवाने दिलेले कृपादान                                      

देवाने केलेला उपाय म्हणजे येशू ख्रिस्ताचा मृत्यू आणि पुनरुत्थान याद्वारे पापक्षमेची देणगी – येशूसत्संग. जर आपला विश्वास अथवा भरवंसा येशूच्या कार्यावर असेल तर जीवनाचे हे दान आपल्याला देण्यात आलेले आहे.  

16 तरीही आम्हांला माहीत होते की, मनुष्यनियमशास्त्रातील कृत्यांनी नीतिमान ठरत नाही, तर येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याने ठरतो, म्हणून आम्ही आमचा विश्वासयेशू ख्रिस्तावर ठेवला आहे. यासाठी की, ख्रिस्तावरील विश्वासाने आम्ही नीतिमान ठरावे, नियमशास्त्रातील कृत्यांनी नव्हे.कारण कोणीही देहधारी मनुष्य नियमाशास्त्रातील कृत्यांनी नीतिमान ठरणार नाही.

गलतीकरांस पत्र 2:16

जसा श्री अब्राहाम हा देवासमोर नीतिमान ठरला तसे आपणासही नीतिमत्त्व मिळू शकते. पण त्यासाठी हे जरूरी आहे की आम्ही पश्चाताप करावा. पश्चातापाबाबत आपण बरेचदा गैरसमज बाळगतो, परंतु पश्चाताप म्हणजे ‘आपली मने बदलणे’ आहे ज्यात  पापांपासून दूर जाणे आणि देवाकडे आणि तो देत असलेल्या देणगीकडे वळणे होय. वेद पुस्तकम् (बायबल) स्पष्ट करते :

19 म्हणून तुम्ही तुमची ह्रदये व जीवने बदलली पाहिजेत! देवाकडे परत या आणि तो तुमच्या पापांची क्षमा करील.

प्रेषितांची कृत्ये 3:19

आपणासाठी आणि माझ्यासाठी अभिवचन हे आहे की जर आपण  पश्चाताप केला, आणि देवाकडे वळलो, तर आमची पापे आमच्या लेखी जोडली जाणार नाहीत आणि आम्हास जीवन प्राप्त होईल. देवाने, आपल्या थोर दयेस स्मरून, आपल्याला कलियुगातील पापाची चाचणी व लस ही दोन्ही दिली आहेत.

सूर्याखाली जीवनाचे समाधान शोधण्याची माया

माया संस्कृत अर्थावरून येतेजे नाहीआणि म्हणूनभ्रम. अनेक विद्वानांनी आणि विचारवंतांनी वेगवेगळ्या प्रकारे मायेच्या भ्रमावर जोर दिला पण सामान्यतः ही कल्पना व्यक्त करतात की ऐहिक अथवा भौतिक आमच्या प्राणास चुकीच्या मार्गाने नेऊ शकते आणि अशाप्रकारे आम्हास बंधनात गुंतवून आणि फसवून टाकते. आमचा प्राण पदार्थांवा नियंत्रण करू इच्छितो त्याचा आस्वाद घेऊ इच्छितो.

तथापि, असे करीत असतांना आपण वासना, लोभ, आणि क्रोधास शेवटी बळी पडतो. बरेचदा मग आपण आपले प्रयत्न दुप्पट करतो आणि चुकांवर चूका करीत जातो, सखोल भ्रमात पडतो अथवा मायेत फसतो. अशाप्रकारे माया वावटळीप्रमाणे कार्य करते, वाढत्या शक्तीनिशी , आम्हास अधिकाधिक फसविते, नैराश्यात ढकलते. मायेचा परिणाम म्हणून आम्ही त्या गोष्टीचा स्वीकार करतो जी तात्पुरती आहे कारण स्थायी मूल्य प्राप्त करण्यासाठी, आणि या जगात क्षणिक सुखाचा शोध घेतो, जे ते देऊ शकत नाही.

ज्ञानाचे भंडार असे उत्कृष्ट तमिल पुस्तक, तिरूकुरल, माया आमच्यावर तिचा प्रभाव याचे अशाप्रकारे वर्णन करते :

जर व्यक्ती आपल्या जिव्हाळ्याच्या विषयास बिलगून राहत असेल, सोडावयास तयार नसेल, तर दुःख त्याच्यावरील आपली पकड सैल करणार नाही.”

तिरूकुरल 35:347-348

हिब्रू वेदातील बुद्धिसाहित्य आणि तिरूक्कल यांत बरेच साम्य आहे. बौद्धिक काव्याचा लेखक शलमोन होता. ‘सूर्याखाली म्हणजे भूतलावर’ राहत असतांना – त्याने मायाचा आणि त्याच्या परिणामांचा कसा अनुभव केला याचे तो वर्णन करतो, अर्थात, असे जगणे की केवळ भौतिक वस्तूंस मोल आहे, आणि सूर्यपथाखाली या भौतिक जगात स्थायी सुखाच्या शोधात फिरणे.

भूतलावर अर्थात सूर्याखालीमायेचा शलमोनाचा अनुभव

आपल्या बुद्धीसाठी सुप्रसिद्ध पुरातन राजा, शलमोन, याने ख्रि. पू. 950 च्या सुमारास अनेक कविता लिहिल्या ज्या बायबलमधील जुन्या कराराचा भाग आहेत. उपदेशकात, जीवनात समाधान शोधण्यासाठी त्याने जे काही त्याचे त्याने वर्णन केले आहे. त्याने लिहिले : 

स्वत:शी म्हणालो, “मी मौज-मजा करायला हवी. जितका शक्य होईल तितका आनंद मी उपभोगायला हवा.” पण हेही अगदीच टाकाऊ आहे हे मला समजले.
2 सतत हसत राहणे हाही एक मूर्खपणाच आहे. मौजमजा करण्यातून काहीही चांगले घडत नाही.
3 म्हणून माझे मन शहाणपणाने भरता भरता माझे शरीर मद्याने (द्राक्षारसाने) भरायचे असे मी ठरवले. मी हा मूर्खपणा करायचे ठरवले कारण मला सुखी व्हायचा मार्ग शोधायचा होता. लोकांना त्यांच्या छोट्याशा आयुष्यात चांगले करण्यासारखे असे काय आहे ते मला शोधायचे होते.
4 नंतर मी महान गोष्टी करायला सुरुवात केली. मी घरे बांधली, मी स्वत:साठी द्राक्षाचे मळे लावले.
5 मी बागा लावल्या आणि मोठमोठे बगिचे केले. मी सर्व प्रकारची फळझाडे लावली.
6 मी माझ्यासाठी तळी निर्माण केली. आणि त्या तव्व्यांचा उपयोग मी माझ्या वाढणाऱ्या झाडांना पाणी देण्यासाठी केला.
7 मी पुरुष आणि स्त्री गुलामांना विकत घेतले, आणि माझ्या घरातही गुलामांचा जन्म झाला. माझ्याजवळ खूप मोठया गोष्टी होत्या. माझ्याजवळ जनावरांची खिल्लारे आणि मेंढ्यांचे ढकळप होते. यरुशलेममधील कोणाही माणसाजवळ नसतील इतक्या गोष्टी माझ्याजवळ होत्या.
8 मी स्वत:साठी सोने आणि चांदी गोळा केली. मी राजांकडून, त्याच्या देशांकडून संपत्ती घेतली. माझ्यासाठी गाणे म्हणणारे स्त्री पुरुष माझ्याजवळ होते. कोणालाही हव्याहव्याशा वाटणाऱ्य गोष्टी माझ्याजवळ होत्या.
9 मी खूप श्रीमंत आणि प्रसिद्ध झालो. माझ्या आधी यरुशलेममध्ये राहणाऱ्य कोणाही माणसा पेक्षा मी मोठा होतो आणि माझे शहाणपण मला मदत करण्यासाठी नेहमी तयार होते.
10 माझ्या डोव्व्यांना जे जे दिसे आणि हवेसे वाटे ते मी मिळवले. मी जे केले त्यामुळे माझे मन प्रसन्न असे आणि हा आनंद माझ्या कष्टांचे फळ होते.

उपदेशक 2:1-10

धन, ख्याति, ज्ञान, प्रकल्प, स्त्रियां, सुखभोग, राज्य, व्यवसाय, दाक्षरस… शलमोनाने सर्वांचा आस्वाद घेतला – आणि त्याच्या व आमच्या काळातील लोकांपेक्षा जास्तच. आइन्स्टाईनची कुशाग्र बुद्धी, लक्ष्मी मित्तलची अमाप संपत्ती, बाॅलिवूड तारकांचे सामाजिक/लैंगिक जीवन, ब्रिटिश राजघराण्याच्या राजकुमार विलियमसारखे राजकीय कुळ – हे सर्वकाही त्याला एकट्याने लाभले होते. हा संयोग कोण पराजित करू शकतो? आपण विचार केला असता, सर्व लोकांत त्यानेच काय ते समाधान प्राप्त केले असेल.

त्याच्या इंतर कवितांपैकी, गीतरत्न, हे सुद्धा बायबलमध्ये आढळते, त्यात तो आपल्या शृंगारिक, तप्त प्रेमप्रसंगाविषयी लिहितो – असे वाटते की हीच गोष्ट काय ती आयुष्यभर समाधान पुरविते. पूर्ण कविता येथे आहे. पण खाली तो आणि त्याची प्रेमिका यांच्यातील प्रेमकाव्याचा भाग खाली दिला आहे

गीतरत्नातील पद्यांश

लमोनाचे सर्वांत सुंदर गीत
2 चुंबनांनी मला झाकून टाक कारण तुझे प्रेम द्राक्षरसापेक्षा चांगले आहे.
3 तुझ्या अत्तराचा खूप चांगला वास येत आहे, पण तुझे नाव मात्र उत्तम अत्तरापेक्षाही गोड आहे. त्यामुळेच तरुणी तुझ्यावर प्रेम करतात.
4 मला तुझ्याबरोबर ने. आपण पळून जाऊ.राजाने मला त्याच्या खोलीत नेले.आम्ही आनंदोत्सव करु आणि तुझ्यासाठी आनंदित होऊ. तुझे प्रेम द्राक्षारसापेक्षा चांगले आहे हे लक्षात ठेव. तरुणी तुझ्यावर योग्य कारणासाठी प्रेम करतात.
5 यरुशलेमच्या मुलींनो, मी काळी आणि सुंदर आहे. मी तेमान आणि शलमोनाच्या तंबूंसारखी काळी आहे.
6 मी किती काळी आहे, सूर्याने मला किती काळे केले आहे याकडे बघू नका. माझे भाऊ माझ्यावर रागावले होते. त्यांनी माझ्यावर त्यांच्या द्राक्षांच्या मळ्याची काळजी घ्यायची सक्ती केली. त्यामुळे मला स्वत:चीकाळजी घेता आली नाही.
7 मी माझ्या आत्म्यासकट तुझ्यावर प्रेम करते. मला सांग: तू तुझ्या मेंढ्यांना कुठे खायला दिलेस? तू त्यांना दुपारी कुठे विश्रांती घेऊ दिलीस? मी तुझ्याबरोबर यायला हवे. नाही तर मी तुझ्या मित्रांच्या मेंढ्यांची काळजी घेणारी, अशी भाडोत्री स्त्रीसारखी ठरेन
8 तू खूप सुंदर स्त्री आहेस. काय करायचे ते तुला नक्कीच माहीत आहे. मेंढ्यांच्या मागे मागे जा. तुझ्या लहान बकऱ्यांना मेंढपाळाच्या तंबूंजवळ खाऊ घाल.
9 फारोचा रथ ओढणाऱ्या घोड्यांना घोडीजशी उद्दीपित करते त्यापेक्षाही जास्त तू मला उद्दीपित करतेस.त्या घोडड्यांच्या चेहेऱ्यांच्या बाजूंवर आणि गळ्यात सुंदर अलंकार आहेत.
10 हे तुझ्यासाठी केलेले अलंकार: डोक्याभोवतीचा सोन्याचा पट्टा आणि चांदीच्या हार. तुझे सुंदर गाल सोन्याने अलंकृत केले आहेत. तुझा गळा चांदीच्या अलंकारांनी सुंदर दिसत आहे.
11
12 माझ्या अत्तराचा वास बिछान्यावर लवंडलेल्या राजापर्यंत जातो.
13 माझ्या वक्षस्थळांमध्ये रात्रभर विसावलेला माझा प्रियकर माझ्या गळ्यात असलेल्या सुंगधी द्रव्याच्या पिशवीसारखा आहे
14 माझा प्रियकर एन – गेदीमधील द्राक्षाच्या मळ्याजवळील मेंदीच्या फुलांच्या गुच्छा सारखा आहे.
15 प्रिये, तू किती सुंदर आहेस! तू फारच सुंदर आहेस. तुझे डोळे कबुतरासारखे आहेत.
16 प्रियकरा, तू सुध्दा सुस्वरुप आहेस आणि मोहक आहेस. आपला बिछाना किती आल्हाददायक आणि सुखावह आहे.
17 आपल्या घराच्या तुळ्या गंधसरुच्या लाकडाच्या आहेत. छताचे वासे देवदारुच्या लाकडाची आहे.

श्रेष्ठगीत 1:9-2:17

जवळजवळ 3000 वर्षे जुन्या, या कवितेत बाॅलिवूडच्या उत्कृष्ट प्रेम चित्रपटात आढळून येणार्या शृंगाररसाची तीव्रता आहे. बायबलमध्ये लिहिले आहे की आपल्या अमाप संपत्तीने त्याने 700 प्रेमिका प्राप्त केल्या! बाॅलिवूड किंवा हाॅलिवूडच्या अत्यंत यशस्वी प्रियकरांपेक्षाही हे फार अधिक झाले. म्हणून आपण विचार कराल की या सर्व प्रेमप्रकरणांनी तो संतुष्ट असावा. पण हे सर्व प्रेम, सर्व धनसंपत्ती, सर्व ख्याति आणि बुद्धी ही असतांनाही – त्याने लिहिले  :

गुरूकडून आलेले शब्द आहेत. हा गुरू दाविदाचा मुलगा आणि यरुशलेमचा राजा होता. 14 मी पृथ्वीवर केल्या गेलेल्या सर्व गोष्टींकडे पाहिले आणि त्या सर्व गोष्टी वेळ वाया घालवण्यासारख्या आहे असे मला वाटले. त्या वारा पकडण्यासारख्याआहे असे वाटले. 15 या गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही. जर एखादी वस्तू वाकडी असली तर ती सरळ आहे असे तुम्ही म्हणू शकत नाही. आणि एखादी वस्तु हरवली असली, तर ती आहे तुम्ही म्हणू शकत नाही.

उपदेशक 1:1-14

11 परंतु नंतर मी ज्या ज्या गोष्टी केल्या त्यांच्याकडे पाहिले. मी जे कष्ट केले त्यांच्याकडे पाहिले. आणि ते सर्व म्हणजे वेळेचा अपव्यय होता असे मी ठरवले. वाऱ्याला पकडण्यासारखेच ते होते. आपण जीवनात जे काही करतो त्यापासून काहीही लाभ होत नाही.
12 कोठलाही माणूस राजापेक्षा अधिक काही करू शकत नाही एखाद्या राजाने तुम्हाला जे करावेसे वाटते ते आधीच केलेले असते. आणि राजा ज्या गोष्टी करतो त्या करणे म्हणजेही वेळेचा अपव्यय आहे हेही मला समजले. म्हणून मी पुन्हा पुन्हा शहाणे व मूर्ख होण्याचा आणि वेड्या गोष्टी करण्याच्या बाबतीत विचार करू लागलो.
13 शहणपण हे मूर्खपणापेक्षा चांगले आहे. जसा प्रकाश अंधारापेक्षा चांगला आहे.
14 ते असे आहे: शहाणा माणूस त्याच्या मनाचा उपयोग डोव्व्यांप्रमाणे, त्याला जिथे जायचे आहे तिथे जाण्यासाठी करतो. परंतु मूर्ख मात्र अंधारात चालणाऱ्या माणसासारखा असतो.परंतु मूर्ख आणि शहाणा हे दोघेही सारख्याच रीतीने नाश पावतात. दोघेही मरतात.
15 मी स्वत:शीच विचार केला, “‘मूर्खाच्या बाबतीत ज्या गोष्टी घडतील त्याच माझ्याही बाबतीत घडतील तर मग मी शहाणा होण्यासाठी एवढी पराकाष्ठा का केली?” मी स्वत:शीच म्हणालो, “शहाणे असणेही निरुपयोगीच आहे.”
16 शहाणा आणि मूर्ख दोघेही मरणारच आणि लोक शहाण्या माणसाचे अथवा मूर्ख माणसाचे सदैव स्मरण कधीच ठेवणार नाहीत. त्यांनी जे जे केले ते सर्व लोक भविष्यात विसरून जातील. म्हणून शहाणा माणूस आणि मूर्ख माणूस दोघेही समान आहेत.
17 यामुळे मला जीवनाचा तिरस्कार वाटायला लागला. जीवनातील सर्व गोष्टी वाऱ्याला पकडण्याचा प्रयत्न करण्यासारख्या निरुपयोगी आहेत या विचाराने मला खूप दु:ख झाले.
18 मी जे अपार कष्ट केले त्याचा मी किरस्कार करू लागलो. मी खूप कष्ट केले. परंतु त्या कष्टांनी मी जे मिळवले ते माझ्यानंतर जे लोक राहतील त्याना मिळणार आहे. मी त्या गोष्टी माझ्याबरोबर नेऊ शकणार नाही.
19 मी जो अभ्यास केला आणि काम करून जे मिळवले त्याच्यावर इतरांचीच सत्ता राहणार आहे आणि तो माणूस शहाणा आहे की मूर्ख ते मला माहीत नाही. हेही निरर्थकच आहे.
20 म्हणून मी माझ्या सर्व कामांबद्दल दु:खी झालो.
21 माणूस आपले सर्व ज्ञान, शहाणपण आणि कौशल्य वापरून कष्ट करू शकतो. पण तो माणूस मरेल आणि इतरांना त्याच्या कष्टाचा फायदा मिळेल. त्या लोकांनी कष्ट केले नाहीत तरी त्यांना सगळे काही मिळेल. त्यामुळे मला खूप दु:ख झाले. ते योग्य नाही आणि शहाणपणाचेही नाही.
22 माणसाने खुप कष्ट केल्यावर आणि भांडल्यावर त्याला आयुष्यात खरोखर काय मिळते?
23 आयुष्यभर त्याला दु:ख, मनस्ताप आणि कष्टच मिलतात. त्याचे मन रात्रीदेखील स्वस्थ नसते. हे सुध्दा शहाणपणाचे नाही.

उपदेशक 2:11-23

शेवटी  समाधान देण्याकरिता सुख, संपत्ती, काम, प्रगती, शृंगारिक प्रेमाचे अभिवचन हे सर्वकाही भ्रम अथवा मायाजाल असल्याचे त्याने दर्शविले. परंतु आज हाच संदेश आहे की आपण आणि मी अद्याप समाधानाचा एक निश्चित मार्ग म्हणून ऐकत आहोत. शलमोनच्या कवितांनी आम्हाला आधीच सांगितले आहे की त्याला या प्रकारांनी समाधान मिळवता आले नाही.

मृत्यू तसेच जीवन यावर चिंतन करण्यासाठी शलमोन आपल्या काव्यात पुढे म्हणतो:

 19 माणूस पशूपेक्षा चांगला आहे का? नाही! का? कारण सर्वच निरर्थक आहे. पशूंच्या आणि माणसांच्या बाबतीत सारख्याच गोष्टी घडतात. ते दोघे ही मरतात. माणूस आणि पशू यांचा श्वास सारखाच आहे. मेलेला पशू मेलेल्या माणसापेक्षा वेगळा आहे का?
20 माणसांच्या आणि पशूंच्या शरीराचा नाश सारख्याच प्रकारे होतो. ते जमीनीतून आले आणि शेवटी ते तिथेच जातील.
21 माणसाच्या आत्म्याचे काय होते हे कोणाला माहीत आहे? माणसाचा आत्मा वर देवाकडे जातो की पशूचा आत्मा खाली जमिनीत जातो हे कुणाला माहीत आहे?()

उपदेशक 3:19-21

2 पण एक गोष्ट मात्र सर्वांच्या बाबतीत घडते ती म्हणजे आपण सर्व मरतो. मरण वाईट माणसांना आणि चांगल्या माणसांनाही येते. जी माणसे शुध्द आहेत त्यांनाही मरण येते आणि जी शुध्द नाहीत त्यांनाही येते. जे लोक यज्ञ करतात त्यांनाही मरण येते आणि जे यज्ञ करत नाहीत त्यांनाही मरण येते. चांगला माणूस पापी माणसासारखाच मरेल. जो मणूस देवाला काही खास वचने देतो, जो अशी वचने द्यायला घाबरतो त्या माणसासारखाच मरेल.
3 या आयुष्यात ज्या गोष्टी घडतात त्यातली सगव्व्यात वाईट गोष्ट म्हणजे सर्वांचा शेवट सारखाच होतो. लोक नेहमी दुष्ट आणि मूर्खपणाचा विचार करतात. ही गोष्ट सुध्दा वाईटच आहे हे विचार मरणाकडे नेतात.
4 जो माणूस अजून जिवंत आहे त्याच्याबाबतीत आशेला जागा आहे. तो कोण आहे याला महत्व नाही. पण हे म्हणणे खरे आहे:“जिवंत कुत्रा मेलेल्या सिंहापेक्षा चांगला असतो.”
5 जिवंत माणसांना ते मरणार आहेत हे माहीत असते. पण मेलेल्यांना काहीच माहीत नसते. मेलेल्यांना कुठलेच बक्षिस मिळत नाही. लोक त्यांना लवकरच विसरतात.

उपदेशक 9:2-5

पवित्र पुस्तक, बायबलमध्ये, संपत्ती आणि प्रेम याविषयीच्या कवितांचा समोवश का आहे – ज्यांचा संबंध आपण पवित्रतेशी जोडत नाही अशा गोष्टी? आमच्यापैकी अनेक जणांची अपेक्षा असते की पवित्र ग्रंथांनी वैराग्य, धर्म आणि जगण्यासाठी नैतिक नियम याविषयी चर्चा करावी. आणि बायबलमधील शलमोन  अशा निर्णायक आणि निराशावादी पद्धतीने मृत्युविषयी का लिहितो?

शलमोनाने घेतलेला मार्ग, ज्याचा सामान्यतः जगभर पाठपुरावा केला जातो, स्वार्थासाठी जगणे होता, ज्या अर्थाचा, सुखाचा अथवा आदर्शांचा पाठपुरावा करण्याची त्याने निवड केली होती त्यांचा निर्माण करणे. पण तो शेवट शलमोनासाठी चांगला नव्हता – समाधान क्षणिक आणि भ्रम होता. त्याच्या कविता बायबलमध्ये सावधगिरीचा मोठा इशारा म्हणून आहेत – “येथे जाऊ नका – आपल्या पदरी नैराश्य येईल!” आमच्यापैकी जवळजवळ सर्व जण त्याच मार्गाने खाली जाण्याचा प्रयत्न करतील जो शलमोनाने घेतला होता आणि जर आपण त्याचे ऐकाल तर आपण बुद्धिमान आहात.

सुवार्ताशलमोनाच्या कवितांस उत्तर देणे 

येशू ख्रिस्त (येशू सत्संग) कदाचित बायबलमध्ये लिहिलेला सर्वात प्रसिद्ध मनुष्य आहे. त्यानेही जीवनाबद्दल वक्तव्य केले. खरं तर तो म्हणाला

“… मी आलो आहे की त्यांना जीवन मिळावे आणि त्यांनी ते पूर्ण करावे”

जॉन १०:१०

28 जे थकलेले व ओझ्याने लादलेले असे सर्व तुम्ही मजकडे या आणि मी तुम्हांला विश्रांति देईन.
29 माझे जू आपणांवर घ्या, माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या आत्म्यास विश्रांति मिळेल.
30 कारण माझे जू सोपे आहे आणि माझे ओझे हलके आहे.”

मत्तय11:28-30

जेव्हा येशू हे म्हणतो तेव्हा तो त्या व्यर्थतेचे आणि नैराश्याचे उत्तर देतो ज्याविषयी शलमोनाने आपल्या कवितांत लिहिले आहे. कदाचितअगदी कदाचितशलमोनाच्या बंद मार्गाचे हे उत्तर आहे. शेवटी, सुवार्तेचा शाब्दिक अर्थ आहेचांगली बातमी. सुवार्ता खरोखर चांगली बातमी आहे का? याचे उत्तर देण्यासाठी आम्हाला सुवार्तेची माहिती असणे आवश्यक आहे. तसेच आपणास सुवार्तेच्या दाव्यांचे परीक्षण करणे आवश्यक आहेअविचाराने टीका करता, सुवार्तेबद्दल गंभीरपणे विचार करणे.

माझी गोष्ट सांगत असतांना, मला हे बोलावेसे वाटते की मी घेतलेला हा एक प्रवास होता. या वेबसाइटमधील लेख येथे यासाठी आहेत जेणेकरुन आपण देखील शोध घ्यावयास सुरूवात करावी. येशूच्या देहधारणाने आपण उत्तम सुरूवात करू शकतो.

बलिदानाची सार्वत्रिक गरज

लोक ऋषी-मुनींना जुन्या काळापासून माहीत होते की लोक भ्रमात आणि पापात जगत आहेत. त्याचा परिणाम म्हणून सर्व धर्मातील, वयोगटातील आणि शैक्षणिक पात्रता असलेल्यांना अंतर्जात जाणीव आहे की त्यांना ‘शुद्ध होण्याची’ गरज आहे. म्हणूनच अनेक लोक कुंभमेळ्याच्या उत्सवात भाग घेतात आणि लोक पूजा करण्यापूर्वी प्रार्थस्नान (किंवा प्रतासना) मंत्र म्हणतात (“मी पापी आहे. मी पापाचा परिणाम आहे. मी पापात जन्मलो आहे. माझा आत्मा पापाच्या अधीन आहे. मी सर्वात दुष्ट पापी आहे. हे प्रभू ज्याचे डोळे सुंदर आहेत, मला वाचव, हे बलिदान करणार्‍या प्रभू”).  शुद्धीकरणाच्या ह्या अंतर्जात गरजेसोबतच आपल्या पापांसाठी अथवा आमच्या जीवनाच्या अंधकारासाठी (तमस) बलिदान करण्याच्या गरजेची जाणीव आहे. आणि पुन्हा एकदा बलिदान देण्याची ही अंतर्जात गरज पुरविण्यासाठी पूजेच्या बलिदानात, अथवा कुंभमेळाव्यात आणि इतर सणांत लोक वेळ, पैसा, तपश्चर्या यांचे बलिदान करतात. मी अशा लोकांविषयी ऐकले आहे जे नदीत पोहणार्‍या  गायीचे शेपूट धरतात. क्षमा प्राप्त करण्यासाठी पूजा अथवा यज्ञ म्हणून ते असे करतात.

सर्वात प्राचीन ग्रंथ जेव्हापासून अस्तित्वात आहेत अगदी तेव्हापासूनच बळी देण्याची ही गरज अस्तित्वात आहे. आणि आमची अंतःप्रेरणा आम्हाला जे सांगते त्याची हे ग्रंथ पुष्टी करतात – की बलिदान अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि ते दिलेच पाहिजे. उदाहरणार्थ खालील शिकवणींचा विचार करा :

कथोपनिषदात (हिंदू ग्रंथ) नायक नचिकेत म्हणतो :

”मला खरोखर माहीत आहे की अग्नीचा यज्ञ स्वर्गास नेतो आणि स्वर्गास जाण्याचा मार्ग आहे”

कथोपनिषद 1.14

हिंदूंचा ग्रंथ म्हणतो :

”बलिदानाद्वारेच मनुष्य स्वर्गास पोहोचतो” शतपथ

ब्राह्मण 8.6.1.10

”बलिदानाद्वारे, केवळ मनुष्यच नव्हे तर देवता सुद्धा अमरत्व प्राप्त करतात” शतपथ

ब्राह्मण 2.2.8-14.

अशाप्रकारे बलिदानाच्या द्वारे आपणास अमरत्व प्राप्त होते आणि स्वर्ग लाभतो (मोक्ष). पण तरीही प्रश्न तसाच राहतो की आमच्या पापांविरुद्ध/तमाविरुद्ध पुरेसे पूण्य कमविण्यासाठी अथवा ‘भरपाई’ करण्याची गरज पुरविण्यासाठी कुठल्याप्रकारचे बलिदान केले पाहिजे आणि किती पुरेसे होईल? 5 वर्षांची तपश्चर्या पुरेशी होईल काय? गरीबांस पैसा देणे पुरेसे बलिदान होईल काय? आणि असे असल्यास, किती?

प्रजापती/याहवे : परमेश्वर देव जो बलिदानाद्वारे तरतूद करतो

प्रारंभिक वेद ग्रंथांत, समस्त सृष्टीच्या प्रभू परमेश्वरास – ज्याने ब्रम्हांडाची उत्पत्ती केली आणि त्यावर नियंत्रण ठेविले – प्रजापती म्हटले होते. प्रजापतीद्वारे बाकी सर्वकाही अस्तित्वात आले.

वेद पुस्तकमच्या (बायबल) प्रारंभिक हिब्रू ग्रंथास तोरा म्हणतात. तोराचे लेखन सुमारे ई. पू. 1500 मध्ये झाले, ज्यावेळी ऋग्वेदाची रचना झाली त्यावेळी. तोराची सुरूवात ह्या घोषणेने होते की जिवंत परमेश्वर आहे जो समस्त विश्वासाचा उत्पन्नकर्ता आहे. मूळ हिब्रू ग्रंथाच्या लिप्यंतरणात या देवास एलोहीम किंवा याहवे म्हटले होते आणि ह्या हिब्रू ग्रंथात त्यांचा उपयोग आलटूनपालटून करण्यात आला आहे. अशाप्रकारे, ऋग्वेदातील प्रजापतीप्रमाणे, तोरातील याहवे, अथवा एलोहीम, समस्त सृष्टीचा प्रभू होता (आणि आहे).

प्रारंभी तोरामध्ये, यहोवा सुद्धा अब्राहाम नावाच्या ऋषीला दिलेल्या उल्लेखनीय भेटीत स्वतःला ‘तरतूद करणारा’ प्रभू म्हणून प्रकट करतो. तरतूद करणारा यहोवा (हिब्रू भाषेतून याव्हे-यिरे म्हणून लिप्यंतरित) आणि ऋग्वेदातील प्रजापती जो ‘सर्व प्राणीमात्रांचा रक्षक आणि पालनकर्ता’ आहे.

याहवे कशाप्रकारे तरतूद करतो? आम्ही आधीच बलिदान देण्यासाठी लोकांची अंतर्जात गरज पाहिली आहे, पण ह्या आश्वासनावाचून की जे बलिदान आपण घेऊन येतो ते पुरेसे आहे. मनोरंजक गोष्ट ही आहे की आमच्या गरजेच्या ह्या विशिष्ट क्षेत्रात तांड्यामहा ब्राम्हणा हे जाहीर करतो की प्रजापती कशाप्रकारे आमची गरज पुरवितो. त्यात म्हटले आहे : 

”स्वतःचे बलिदान केल्यानंतर प्रजापतीने (समस्त सृष्टीचा प्रभू) स्वतःस देवांकरिता अर्पण केले”

तांड्यामहा ब्राम्हणा, 2 र्‍या खंडाचा 7 वा अध्याय.

(संस्कृत लिप्यंतरण आहे ”प्रजापतिर्द्देवेभ्यम् अत्मनम्यज्नम्क्र्त्व प्रयच्चत“).

येथे प्रजापती एकवचन आहे. केवळ एकच प्रजापती आहे, जसे तोरामध्ये केवळ एकच यहोवा आहे. नंतर पुराण साहित्यात (सन 500 पासनू – 1000 पर्यंत लेखन) अनेक प्रजापतींची ओळख घडून येते. पण वर उद्धृत प्रारंभीच्या ग्रंथात प्रजापती एकवचन आहे. आणि ह्या वाक्यात आपण पाहतो की स्वतः प्रजापती बलिदान देतो अथवा बलिदान आहे आणि तो ते इतरांच्या वतीने देते. ऋग्वेद असे म्हणून या गोष्टीची पुष्टी करतो: 

”खरे बलिदान स्वतः प्रजापती आहे” (संस्कृत: ‘पाजपात्र्यज्ञः’)

संस्कृत विद्वान एच. अग्विलर यांनी खालीलप्रमाणे भाषांतर करून शतपथ ब्राम्हणावर आपले विचार व्यक्त केले आहेत :

“आणि खरोखर, एका प्रजापतीस सोडून बलिदानास योग्य असा दुसरा (बळी) कोणी नव्हता, आणि देवता त्याला बलिदान म्हणून अर्पण करण्याच्या कामी लागले. म्हणूनच या संदर्भात ऋषीने म्हटले आहे: ‘देवतांनी त्याला बलिदानाच्या मदतीने बलिदान म्हणून अर्पण केले – कारण बलिदानाच्या मदतीने – त्यांना त्याला (प्रजापती), बलिदान म्हणून अर्पण केले – हे पहिले नियम होते, कारण या नियमांची प्रथम स्थापना करण्यात आली” एच. अग्विलर, सॅक्रिफाईस इन ऋग्वेदा

आरंभापासूनच वेदग्रंथ ही घोषणा करतात की यहोवा अथवा प्रजापतीने आमची गरज ओळखली म्हणून त्याने आम्हासाठी स्वतःठायी बलिदानाची पूर्तता केली. त्याने हे कसे केले याविषयी आपण नंतरच्या लेखांत पाहू कारण आपण ऋग्वेदातील पुरुषसूक्ताच्या पुरुष-प्रजापती बलिदानावर लक्ष केन्द्रित करणार आहोत, पण सध्या विचार करू या की हे किती महत्वाचे आहे. श्वेताश्वतरोपनिषद् म्हणते

‘सार्वकालिक जीवनात जाण्याचा दुसरा कोणताही मार्ग नाही (संस्कृत: नान्यह्पन्थ विद्यते – अयनय)

श्वेताश्वतरोपनिषद् 3ः8

जर आपणास सार्वकालिक जीवनात रस असेल, जर आपणास मोक्षाची किंवा आत्मज्ञानाची इच्छा असेल तर प्रजापतीने (किंवा यहोवा) आपणास स्वर्गप्राप्ती व्हावी म्हणून स्वतःच्या बलिदानाद्वारे आपल्यासाठी कशी व का तरतूद केली याविषयी काय सांगितले गेले आहे हे पाहण्यासाठी पुढे प्रवास करणे शहाणपणाचे ठरेल. आणि वेद आपल्याला अनिश्चित स्थितीत सोडत नाही. ऋग्वेद हे पुरुषसुक्त आहे जे प्रजापतीचा देहावतार आणि त्याने आपल्यासाठी केलेल्या बलिदानाचे वर्णन करते. येथे आपण पुरूषसुक्ताची ओळख करून देतो जे पुरुषाचे वर्णन अगदी तसेच करते जसे बायबल (वेद पुस्तकम्) येशूसत्संगचे (नासरेथचा येशू) आणि आम्हास मोक्ष किंवा मुक्ति (अमरत्व) मिळावी म्हणून त्याने केलेल्या बलिदानाचे वर्णन करते. येथे आपण थेट येशूच्या (येशूसत्संग) बलिदानाकडे आणि त्याने आम्हास दिलेल्या देणगीकडे पाहू.

कुंभमेळा महोत्सव: पापाची कुवार्ता आणि शुद्धीकरणाची आमची गरज दाखविणे

मानवी गंगा नदीत 10 इतिहासामधील सर्वात मोठा मेळावा भारतात होतो आणि तोही दर बारा वर्षांतून एकदाच. 55 दिवसांच्या कुंभमेळा महोत्सवाच्या काळात अलाहाबाद शहरात गंगा नदीच्या काठावर  100 दशलक्ष लोक येऊन पोहोचतात. मागील अशा महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी दशलक्ष लोकांनी स्नान केले होते.

Devotees at Ganges for Kumbh Mela Festival

कुंभमेळा महोत्सवासाठी गंगेच्या काठावर आलेले भक्तगण

एनडीटीव्हीच्या मते, कुंभ मेळाव्याच्या स्नानाच्या दिवशी आयोजकांना सुमारे 20 दशलक्ष स्नान करणाऱ्याची अपेक्षा असते. मुस्लिम लोकांच्या मक्का येथे येणाऱ्या वार्षिक हज यात्रेकरूंच्या संख्येवर – दरवर्षी  ‘केवळ’ 3-4 दशलक्ष – कुंभ मेळाव्यासाठी येणाऱ्या लोकांची संख्या मात करते.

मी अलाहाबादला गेलो आहे आणि मी कल्पनाही करू शकत नाही की सर्व पायाभूत सुविधा ताब्यात घेतल्याशिवाय हे लक्षावधी लोक एकाच वेळी येथे कसे येऊ शकतात, कारण हे शहर इतके मोठे नाही. गेल्या उत्सवात या लोकांच्या दैनंदिन गरजांची पूर्तता करण्यासाठी शौचालय आणि डाक्टरांसारख्या सोयी आणण्याचा प्रचंड प्रयत्न करण्यात आला असल्याचे बीबीसीने कळविले आहे.

तर 100 दशलक्ष लोक गंगा नदीत स्नान करण्यासाठी 120 अब्ज रूपये का खर्च करतात? नेपाळमधील एका भाविकाने बीबीसीला सांगितले की

 “मी माझी पातके धुऊन टाकली आहेत”.

रूटर्सने माहिती दिली आहे की

“मी ह्या जीवनातील आणि मागील जीवनातील माझ्या सर्व पापांचे प्रक्षालन केले आहे,” 77 वर्षांचे भ्रमंती तपस्वी स्वामी शंकरानंद सरस्वती थंडीने थरथर कापत म्हणाले.

एनडीटीव्ही आम्हाला सांगते की

उपासक, ज्यांना विश्वास आहे की पवित्र  पाण्यात डुबकी लावल्याने ते त्यांच्या पापांपासून शुद्ध होतील,

मागच्या एका उत्सवात बीबीसीच्या मुलाखातीत यात्रेकरू मोहन यांनी म्हटले की  “आम्ही केलेली पापे येथे वाहून जातात.”

पापाचासार्वत्रिक मानवी बोध

दुसऱ्या शब्दांत, कोटयावधी लोक पैसे खर्च करतील, गर्दी असलेल्या गाड्यांमधून प्रवास करतील, दाटीवाटीची परिस्थिती सहन करतील आणि आपली पापे ‘धुऊन काढली’ जावीत म्हणून गंगा नदीत स्नान करतील. हे भक्त काय करीत आहेत हे पाहण्यापूर्वी, आपण त्यांच्या स्वतःच्या जीवनात ते ओळखत असलेल्या समस्येचा – ‘पापाच्या’ समस्येचा विचार करू  या.

सत्य साईबाबा आणि  ‘योग्यअयोग्य

एक हिंदू शिक्षक ज्याच्या लेखनांचा मी अभ्यास केला आहे, तो आहे सत्य साईबाबा. मला त्यांच्या नैतिकतेवरील शिकवणी वाखाणण्याजोग्या वाटल्या. मी खाली त्यांच्या शिकवणीचा सारांश मांडत आहे. आपण हे वाचत असतांना स्वतःला विचारा, “हे उत्तम नैतिक नियम जीवनात आचरणासाठी आहेत काय? मी त्यानुसार जगावे काय?”

“आणि धर्म (आपले नैतिक कर्तव्य) काय आहे? आपण जो उपदेश देता त्यानुसार आचरण करणे, असे केले पाहिजे हे जे आपण म्हणता ते करणे, जसे बोलणे तसे चालणे. सन्मार्गाने कमविणे, भक्तिभावाने आस धरणे, देवापर्यंत पोहोचण्यासाठी जगणे: हा धर्म आहे” 

सत्य साई म्हणतो. 4,पृ. 339

“आपले कर्तव्य नक्की काय आहे?”

  • आपल्या आईबापांशी प्रेमाने आणि आदराने आणि कृतज्ञतेने वागा.
  • दुसरे, सत्य बोला आणि सद्वर्तन करा.
  • तिसरे, आपल्याकडे जेव्हा कधी फावला वेळ असला की प्रभुस आपल्या अतःकरणात ठेवून त्याच्या नावाचा जप करा.
  • चैथे, दुसऱ्याविषयी कधीही वाईट बोलू नका अथवा इतरांचे दोष धुंडाळण्याचा प्रयत्न करू नका.
  • आणि शेवटी, इतरांस कसल्याही प्रकारे दुःख देऊ नका” सत्य साई म्हणतो. 4,पृ. 348- 349

“जो कोणी आपल्या अहंकारावर नियंत्रण करतो, त्याच्या स्वार्थी अभिलाषांवर विजय मिळवितो, त्याच्या पाश्विक भावना आणि आवेगांचा नाश करतो आणि शरीराला स्वतःचा मानण्याची नैसर्गिक प्रवृत्ती त्यागतो, तो निश्चितच धर्मांच्या मार्गावर आहे,” धर्म वाहिनी,पृ. 4

हे वाचत असताना मला आढळले की मी ह्या नियमांनुसार जगले पाहिजे – साधे नैतिक कर्तव्य म्हणून आपण सहमत होणार नाही का? परंतु आपण खरोखरच त्याच्याद्वारे जगत आहात काय? आपण (आणि मी) मोजमाप केली आहे का? आणि जेव्हा आपण अयशस्वी होतो किंवा अशा चांगल्या शिक्षणास अनुरूप ठरत नाही तेव्हा काय होते? सत्य साई बाबा खालीलप्रमाणे ह्या प्रश्नांचे उत्तर देत पुढे जातात.

“सर्वसाधारण मी गोड बोलतो, परंतु या शिस्तीच्या बाबतीत मी कोणतीही सूट देणार नाही…. मी काटेकोरपणे आज्ञापालन करण्याचा आग्रह धरीन. तुमच्या पातळीस अनुरूप ठरावे म्हणून मी सक्ती कमी करणार नाही,”

सत्य साई म्हणतो 2, पृ. 186

सक्तीची ती पातळी ठीक आहे – जर आपण पात्रता पूर्ण करू शकत असाल तर. पण आपण जर पात्रता पूर्ण केल्या नाहीत तर काय? येथूनच ‘पाप’ ही संकल्पना येते. जेव्हा आपण लक्ष्य गमावतो, किंवा मला जे केले पाहिजे असे मी जाणतो ते करण्यास जेव्हा मी उणा पडतो तेव्हा मी ‘पाप’ करतो  आणि मी पापी आहे. कोणालाही  ‘पापी’ असल्याचे सांगितलेले आवडत नाही – ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला अस्वस्थ करते आणि दोषी ठरविते आणि खरे म्हणजे आपण हे सर्व विचार टाळण्याच्या प्रयत्नात बरीच मानसिक आणि भावनिक उर्जा खर्ची घालतो. कदाचित आपण सत्य साई बाबाव्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्यातरी शिक्षकाकडे पाहू शकतो, परंतु जर जो ‘चांगला’ शिक्षक असेल तर त्याचे नैतिक नियम अत्यंत समान असतील आणि व्यवहारात उपयोग करण्यासाठी तितकेच कठीण असतील.

बायबल (वेद पुस्तकम्) म्हणते की आपल्या सर्वांना ह्या पापाची भावना अनुभवास येते, मग धर्म किंवा शैक्षणिक पातळी काहीही असेना कारण हा पापाचा बोध आपल्या विवेकबुद्धिने येतो, मग पुस्तकम् हे अशाप्रकारे व्यक्त करते.

कारण ज्यांना नियमशास्त्र नाही असे परराष्ट्रीय (म्हणजे गैर-यहूदी लोक) जेव्हां नियमशास्त्रांत (बायबलमधील दहा आज्ञा आहेत) जे आहे ते स्वभावतः करीत असतात तेव्हां, त्यांना नियमशास्त्र नाही तरी, ते स्वतःच आपले नियमशास्त्र आहेत. म्हणजे ते नियमशास्त्रातील आचार आपल्या अंतःकरणांत  लिहिलेला आहे असे दाखवितात; त्यांच्याबरोबर त्यांची सद्सद्विवेकबुद्धिही त्यांना साक्ष देते आणि त्यांचे एकमेकांविषयीचे विचार दोष लावणारे किंवा दोषमुक्त करणारे असे असतात.

रोमकरांस पत्र 2ः14-15

म्हणूनच लक्षावधी यात्रेकरूंना त्यांच्या पापांची जाणीव होते. बायबल (वेद पुस्तकम्) म्हणते त्याप्रमाणे हे आहे

सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत

रोमकरांस पत्र 3:23

प्रतासन मंत्रात पाप व्यक्त केले आहे

ही कल्पना सुप्रसिद्ध प्रार्थस्नान (किंवा प्रतासन) मंत्रात व्यक्त केली गेली आहे जी मी खाली मांडत आहे

मी पापी आहे. मी पापाचा परिणाम आहे. मी पापात जन्मलो आहे. माझा आत्मा पापात आहे. मी पापी सर्वात वाईट आहे. हे सुदंर डोळे असलेल्या देवा, हे बलिदानाच्या प्रभू, तू मला वाचव.

ह्या विधानाशी आणि या प्रार्थनेच्या विनंतीशी आपण साम्य बाळगत नाही का?

सुवार्ता ‘आपली पापे धुऊन टाकते’

कुंभमेळा यात्रेकरू आणि प्रतासनाचे भक्त ज्या समस्येचा – उपाय शोधत आहेत त्याच समस्येस शुभवर्तमान संबोधित करते. जे त्यांचे ‘झगे’(म्हणजेच त्यांची नैतिक कृत्ये) धुतात त्यांना शुभवर्तमान आशीर्वादाचे अभिवचन देते. हा आशीर्वाद स्वर्गातील (‘नगर) अमरत्वाचा (जीवनाचे झाड) आहे.

आपल्याला ‘जीवनाच्या झाडावर’अधिकार मिळावा व वेशींतून नगरींत आपले जाणे व्हावे म्हणून जे आपले ‘झगे धुतात’ते धन्य.

प्रकटीकरण 22:14

कुंभमेळा उत्सव आपल्या पापांच्या वास्तविकतेची ‘वाईट बातमी’आपल्याला दाखवितो, आणि अशाप्रकारे शुद्धीकरण शोधण्यासाठी त्याने आपल्याला जागृत केले पाहिजे. जरी अशी केवळ दूरवर शक्यता असली तरीही शुभवर्तमानातील हे अभिवचन खरे आहे, ते अत्यंत महत्वाचे आहे, निश्चितच त्याद्दल अधिक सखोलपणे तपास करणे फायदेशीर आहे. या वेबसाइटचा हाच हेतू आहे.

जर आपल्याला सार्वकालिक जीवनात रस असेल तर, जर आपणास पापापासून मुक्त होण्याची इच्छा असेल तर प्रजापती – जगाची आणि आमची उत्पत्ती करणाऱ्या परमेश्वराने – कसे आणि का प्रकट केले आहे, आम्हास स्वर्ग मिळावा म्हणून आम्हास काय दिले आहे यासाठी प्रवास करणे सुज्ञपणाचे ठरेल. आणि वेद आम्हास हे शिकवितात. ऋग्वेदात पुरुषसुक्त आहे जे प्रजापतीच्या देहधारणाचे आणि त्याने आम्हासाठी केलेल्या बलिदानाचे वर्णन करते. बायबल (वेद पुस्तकम) अधिक सविस्तरपणे वर्णन करते की देहधारणाद्वारे मानव इतिहासात ही योजना कशी पूर्ण करण्यात आली, तसेच येशू सत्संगाचे (येशू ख्रिस्त) जीवन व मृत्यू. आपली देखील “पापे धुतली जावी” हे पाहण्यासाठी ह्या योजनेची पडताळणी करण्यासाठी व ती योजना समजून घेण्यासाठी  आपण वेळ का काढू नये?

दिवाळी आणि प्रभु येशू

भारतात काम करीत असतांना प्रथमच मी ‘अगदी जवळून’ दिवाळीचा अनुभव घेतला. मी महिनाभर मुक्काम करायला आलो होतो आणि माझ्या मुक्कामाच्या आरंभी आजूबाजूला दिवाळी साजरी केली जात होती. मला सर्वात जास्त जी गोष्ट आठवत असेल ती म्हणजे सर्व प्रकारचे फटाके – वातावरण धुरामुळे भरले होते आणि त्यामुळे माझ्या डोळ्यांची किंचित आग होऊ लागली होती.  माझ्या सभोवतालच्या त्या उत्साहपूर्ण वातावरणात मला दिवाळीविषयी शिकावयाचे होते, ती काय होती आणि याचा कार्य अर्थ होता हे सर्व मला जाणून घ्यावयाचे होते आणि मी त्याच्या प्रेमात पडलो.

ह्या ‘दीपोत्सवाने’ मला प्रेरणा मिळाली कारण मी येशू सत्संगवर विश्वास ठेवणारा आहे आणि त्याचा अनुयायी आहे ज्याला प्रभु येशूच्या नावाने सुद्धा ओळखले जाते. आणि त्याच्या शिकवणीचा मुख्य संदेश हा होता की त्याचा प्रकाश आमच्यातील अंधार दूर करील. तर दिवाळी खूपशी प्रभु येशूसमान आहे म्हणावयाचे.

आपल्यात अंधाराची समस्या आहे हे आपल्यापैकी अनेकांस समजते. म्हणूनच इतके लक्षावधी लोक कुंभमेळा उत्सवात भाग घेतात – कारण आमच्यापैकी लाखो लोकांना हे माहीत आहे की आमच्या जीवनात पातके आहेत आणि आपण ही पातके धुऊन टाकण्याची आणि स्वतःस शुद्ध करण्याची आम्हास गरज आहे. तसेच, सुप्रसिद्ध प्रार्थस्नान (किंवा प्रतासन) मंत्राची पुरातन प्रार्थना आपल्यात हे पाप अथवा अंधकार असल्याचे मान्य करते.

मी पापी आहे. मी पापाचा परिणाम आहे. मी पापात जन्मलो आहे. माझा आत्मा पापात आहे. मी पापी सर्वात वाईट आहे. हे सुदंर डोळे असलेल्या देवा, हे बलिदानाच्या प्रभु, तू मला वाचव.

परंतु आमच्यात असलेले हे अंधकाराचे, किंवा पापाचे विचार प्रोत्साहनदायक नाहीत. खरे म्हणजे आम्ही कधीकधी त्यास ‘वाईट बातमी’ म्हणून समजतो. म्हणूनच अंधारावर मात करण्यासाठी प्रकाशाचा विचार आपल्याला बरीच आशा व उत्सव देतो. आणि म्हणून, मेणबत्त्या, मिठाई आणि फटाके यांच्यासह दिवाळी अंधारावर विजय मिळवील ही आशा व्यक्त  करते.

प्रभु येशू – जगातील प्रकाश

प्रभु येशूने अगदी हेच केले आहे. वेद पुस्तकम् (किंवा बायबल) मधील शुभवर्तमान येशूचे खालीलप्रमाणे वर्णन करते:

1आदि में शब्द [a] था। शब्द परमेश्वर के साथ था। शब्द ही परमेश्वर था।यह शब्द ही आदि में परमेश्वर के साथ था। दुनिया की हर वस्तु उसी से उपजी। उसके बिना किसी की भी रचना नहीं हुई। उसी में जीवन था और वह जीवन ही दुनिया के लोगों के लिये प्रकाश (ज्ञान, भलाई) था। प्रकाश अँधेरे में चमकता है पर अँधेरा उसे समझ नहीं पाया।

योहान 1:1-5

तर आपण पाहा, हा ‘शब्द’ त्या आशेची परिपूर्तता आहे जी दिवाळी व्यक्त करते. आणि ही आशा देवाकडून आलेल्या या ‘शब्दा’ मध्ये येते, ज्याची योहान नंतर प्रभु येशू म्हणून ओळख करून देतो. सुवार्ता असे म्हणून पुढे सुरू राहते

 उस प्रकाश की, जो सच्चा था, जो हर मनुष्य को ज्ञान की ज्योति देगा, जो धरती पर आने वाला था।10 वह इस जगत में ही था और यह जगत उसी के द्वारा अस्तित्व में आया पर जगत ने उसे पहचाना नहीं। 11 वह अपने घर आया था और उसके अपने ही लोगों ने उसे अपनाया नहीं। 12 पर जिन्होंने उसे अपनाया उन सबको उसने परमेश्वर की संतान बनने का अधिकार दिया। 13 परमेश्वर की संतान के रूप में वह कुदरती तौर पर न तो लहू से पैदा हुआ था, ना किसी शारीरिक इच्छा से और न ही माता-पिता की योजना से। बल्कि वह परमेश्वर से उत्पन्न हुआ।

योहान 1:9-13

याद्वारे हे स्पष्ट होते की प्रभु येशू ‘प्रत्येकाला प्रकाश देण्यासाठी’ कसा आला. काहींस असे वाटते की हे केवळ ख्रिस्ती लोकांसाठी आहे परंतु लक्षात घ्या की यात म्हटले आहे की हा प्रस्ताव ‘जगातील’ प्रत्येकासाठी आहे की त्यांनी ‘देवाची मुले’ ठरावे. हा प्रस्ताव असा आहे की प्रत्येकाला, कमीत कमी प्रत्येकाला ज्यांना स्वारस्य आहे, ते दिवाळीसमान, त्यांच्या आतील अंधारावर मात करतात.

प्रभु येशूच्या जीवनाची भविष्यवाणी शेकडो वर्षांपूर्वी करण्यात आली होती

प्रभु येशूबद्दल असामान्य गोष्ट ही आहे की त्याच्या देहधारणाविषयी वेगवेगळ्याप्रकारे भविष्यद्वाणी करण्यात आली होती आणि भाकीत करण्यात आले होते आणि त्याच्या सुरुवातीच्या मानवी इतिहासातील घटनांविषयी भाकीत करण्यात आले होते आणि त्यांची नोंद इब्री वेदांमध्ये करण्यात आली आहे. अशाप्रकारे तो या पृथ्वीवर येण्यापूर्वीच त्याच्याबद्दल लिहिलेले होते. आणि त्याच्या देहधारणाच्या काही भविष्यवाण्या ऋगवेदातील अत्यंत पुरातन स्तोत्रांत स्मरण करण्यात आलेल्या आहेत, ज्यात पुरुषाच्या आगमनाचे स्तवन करण्यात आले आहे आणि आणि मनूच्या महापुरासारख्या मानवजातीच्या पुरातन घटना नोंदवल्या आहेत. ह्यास मनू म्हणजे बायबलमध्ये – वेद पुस्तकात – ‘नोहा’ म्हटलेले आहे. पुरुष किंवा प्रभु येशूच्या आगमनाची आशा देत या प्राचीन अहवालांमध्ये लोकांच्या पापांच्या अंधाराचे वर्णन करण्यात आलेले आहे.

ऋग्वेदाच्या भविष्यवाणीत, पुरुस, म्हणजे परमेश्वराचा व परिपूर्ण मानवाचा अवतार पुरुष यज्ञ केला जाणार होता. आपल्या पापांच्या कर्माचा दंड चुकविण्यासाठी आणि आपणास आतून शुद्ध करण्यासाठी हा यज्ञ किंवा बलिदान पुरेसे होते. प्रक्षालन आणि पूजा चांगली आहेत, परंतु ती बाहेरील भागात मर्यादित आहेत. आम्हाला आतून शुद्ध करण्यासाठी त्यापेक्षा चांगल्या बलिदानाची गरज आहे.

प्रभु येशूविषयी हिब्रू वेदांमध्ये भविष्यवाणी केलेली आहे.

ऋग्वेदातील या स्तोत्रांसह, हिब्रू वेदांनी सुद्धा येणाऱ्याच्या आगमनाची भविष्यवाणी केली. इब्री वेदांमधील प्रमुख म्हणजे यशया (जो इ.स.पू. 750 च्या आसपासच्या काळात जगला, दुसऱ्या शब्दांत, प्रभु येशू या पृथ्वीवर येण्याच्या 750 वर्षे पूर्वी). येणाऱ्याबद्दल त्याला बरीच अंतर्दृष्टि होती. जेव्हा त्याने प्रभु येशूविषयी घोषणा केली तेव्हा तो दिवाळीची अपेक्षा करतो:

यद्यपि आज ये लोग अन्धकार में निवास करते हैं, किन्तु इन्हें महान प्रकाश का दर्शन होगा। ये लोग एक ऐसे अन्धेरे स्थान में रहते हैं जो मृत्य़ु के देश के समान है। किन्तु वह “अद्भुत ज्योति” उन पर प्रकाशित होगा।

यशया 9:2

असे का होईल? तो पुढे म्हणतो,

यह सब कुछ तब घटेगा जब उस विशेष बच्चे का जन्म होगा। परमेश्वर हमें एक पुत्र प्रदान करेगा। यह पुत्र लोगों की अगुवाई के लिये उत्तरदायी होगा। उसका नाम होगा: “अद्भुत, उपदेशक, सामर्थी परमेश्वर, पिता—चिर अमर और शांति का राजकुमार।”

यशया 9:6

परंतु जरी तो अवतार होता, तरीही आपल्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी तो आमचा सेवक बनला.

किन्तु उसने हमारे पाप अपने ऊपर ले लिए। उसने हमारी पीड़ा को हमसे ले लिया और हम यही सोचते रहे कि परमेश्वर उसे दण्ड दे रहा है। हमने सोचा परमेश्वर उस पर उसके कर्मों के लिये मार लगा रहा है। किन्तु वह तो उन बुरे कामों के लिये बेधा जा रहा था, जो हमने किये थे। वह हमारे अपराधों के लिए कुचला जा रहा था। जो कर्ज़ हमें चुकाना था, यानी हमारा दण्ड था, उसे वह चुका रहा था। उसकी यातनाओं के बदले में हम चंगे (क्षमा) किये गये थे। किन्तु उसके इतना करने के बाद भी हम सब भेड़ों की तरह इधर—उधर भटक गये। हममें से हर एक अपनी—अपनी राह चला गया। यहोवा द्वारा हमें हमारे अपराधों से मुक्त कर दिये जाने के बाद और हमारे अपराध को अपने सेवक से जोड़ देने पर भी हमने ऐसा किया।

यशया 53:4-6

यशया प्रभु येशूच्या वधस्तंभावर चढविले जाण्याचे वर्णन करीत आहे. घडण्याआधी 750 वर्षांपूर्वी तो असे करतो आणि तो वधस्तंभाचे वर्णन आम्हास आरोग्य देणारे बलिदान म्हणून करतो. आणि हे कार्य जे तो सेवक करील ते असे असेल की परमेश्वर त्याला म्हणेल

“तू मेरे लिये मेरा अति महत्त्वपूर्ण दास है।इस्राएल के लोग बन्दी बने हुए हैं।उन्हें मेरे पास वापस लौटा लाया जायेगा और तब याकूब के परिवार समूह मेरे पास लौट कर आयेंगे।किन्तु तेरे पास एक दूसरा काम है। वह काम इससे भी अधिक महत्त्वपूर्ण हैमैं तुझको सब राष्ट्रों के लिये एक प्रकाश बनाऊँगा। तू धरती के सभी लोगों की रक्षा के लिये मेरी राह बनेगा।”7 इस्राएल का पवित्र यहोवा, इस्राएल की रक्षा करता है और यहोवा कहता है, “मेरा दास विनम्र है।वह शासकों की सेवा करता है, और लोग उससे घृणा करते है किन्तु राजा उसका दर्शन करेंगे और उसके सम्मान में खड़े होंगे महान नेता भी उसके सामने झुकेंगे।”ऐसा घटित होगा क्योंकि इस्राएल का वह पवित्र यहोवा ऐसा चाहता है, और यहोवा के भरोसे रहा जा सकता है। वह वही है जिसने तुझको चुना।

यशया 49:6-7

तर आपण हे पाहा! हे माझ्यासाठी आहे आणि हे तुमच्यासाठी सुद्धा आहे. हे प्रत्येकासाठी आहे.

पौलाचे उदाहरण

वस्तुतः, असा व्यक्ती ज्याने प्रभु येशूचे बलिदान त्याच्यासाठी आहे असा नक्कीच नाही विचार केला नव्हता तो होता पौल, हा येशूच्या नावाचा विरोध करणारा होता. परंतु, प्रभु येशूबरोबर त्याची भेट घडून आली ज्यामुळे त्याला नंतर लिहावे लागले

क्योंकि उसी परमेश्वर ने, जिसने कहा था, “अंधकार से ही प्रकाश चमकेगा” वही हमारे हृदयों में प्रकाशित हुआ है, ताकि हमें यीशु मसीह के व्यक्तित्व में परमेश्वर की महिमा के ज्ञान की ज्योति मिल सके।

2 करिंथ 4:6

प्रभुसोबत पौलाची व्यक्तिगत भेट घडून आली ज्यामुळे ”त्याच्या अंतःकरणात प्रकाश पडला.“

आपणासाठी येशूच्या प्रकाशाचा अनुभव करणे

मग यशयाने ज्याविषयी भविष्यवाणी केेली होती, आणि ज्याचा पौलाने अनुभव घेतला होता त्या अंधकारापासून ‘तारण’ मिळविण्यासाठी व पापाची जागा प्रकाशाने घ्यावी म्हणून आपण काय केले पाहिजे? पौल या प्रश्नाचे उत्तर दुसऱ्या पत्रात देतो जेथे तो लिहितो

 23 क्योंकि पाप का मूल्य तो बस मृत्यु ही है जबकि हमारे प्रभु यीशु मसीह में अनन्त जीवन, परमेश्वर का सेंतमेतका वरदान है।

रोमकरांस पत्र 6:23

लक्ष द्या की तो म्हणतो की ही एक ‘देणगी’ अथवा बक्षिस आहे. व्याख्या म्हणून, देणगी किंवा बक्षिस हे कमविता येत नाही. आपण न कमविता किंवा ज्याच्या लायक नसतांनाही कोणीतरी आपणास बक्षिस देतो. परंतु देणगीचा अथवा बक्षिसाचा आपल्याला तोवर फायदा होणार नाही, किंवा ती आपल्या ताब्यात तोवर येणार नाही जोवर आपण तिचा ‘स्वीकार’ करणार नाही. हे येथे अधिक तपशीलाने स्पष्ट केले आहे, परंतु म्हणूनच योहानाने पूर्वी लिहिले आहे, ज्याचा आधी उल्लेख करण्यात आला आहे

12 पर जिन्होंने उसे अपनाया उन सबको उसने परमेश्वर की संतान बनने का अधिकार दिया।

योहान 1:12

म्हणून आपण त्याचा फक्त स्वीकार करता. असे आपण विनामूल्य देणगी  म्हणून देण्यात आलेल्या भेटीसाठी त्याला विनंती करून करू शकता. आपण विनंती करू शकण्याचे कारण तो जिवंत आहे. होय, त्याने आमच्या पापांसाठी बलिदान दिले होते, परंतु तीन दिवसांनंतर तो पुन्हा जिवंत झाला, जशी दुःख सहणाऱ्या त्या सेवकांबद्दल लिहितांना यशयाने शेकडो वर्षांपूर्वी भविष्यवाणी केली होती

11 वह अपनी आत्मा में बहुत सी पीड़ाएँ झेलेगा किन्तु वह घटने वाली अच्छी बातों को देखेगा। वह जिन बातों का ज्ञान प्राप्त करता है, उनसे संतुष्ट होगा।मेरा वह उत्तम सेवक बहुत से लोगों को उनके अपराधों से छुटकारा दिलाएगा। वह उनके पापों को अपने सिर ले लेगा।

यशया 53:11

म्हणून प्रभु येशू जिवंत आहे आणि जेव्हा जेव्हा आपण त्याला हाक देता तेव्हा तो आपले ऐकू शकतो. आपण त्यापुढे प्रार्थनास्नान (किंवा प्रतासन) मंत्र म्हणू शकता आणि तो ऐकेल आणि आपले तारण करील कारण त्याने आपणासाठी स्वतःला बलिदान केले आणि आता त्याला सर्व अधिकार आहेत. येथे पुन्हा ती प्रार्थना आहे जी आपण त्याच्यापुढे करू शकता:

मी पापी आहे. मी पापाचा परिणाम आहे. मी पापात जन्मलो आहे. माझा आत्मा पापात आहे. मी पापी सर्वात वाईट आहे. हे सुदंर डोळे असलेल्या देवा, हे बलिदानाच्या प्रभु, तू मला वाचव

कृपया येथे आपण इतर लेख ब्राउझ करा. ते मानवी इतिहासाच्या सुरूवातीस आरंभ होतात आणि आपणास अंधारापासून वाचवण्यासाठी आणि प्रकाशात आणण्यासाठी संस्कृत आणि हिब्रू वेदांमधून परमेश्वराची ही योजना दाखवितात, जी आपणास देणगी म्हणून देण्यात आली.

या दिवाळीत, आपण दिवे लावत असतांना आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण करीत असतांना, प्रभु येशूकडून मिळालेल्या आतील प्रकाशाच्या ह्या देणगीचा आपण अनुभव करावा जसा पौलाने अनेक वर्षांपूर्वी अनुभव केला होता आणि त्याच्यात बदल घडून आला व हा प्रकाश आपणासही देऊ करण्यात आला आहे. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा