पुरुषाचे बलिदान : सर्व वस्तुमात्रांची उत्पत्ति

3 र्या   4 थ्या श्लोकानंतर पुरुषसूक्त आपले लक्ष पुरुषाच्या गुणावरून त्याच्या बलिदानावर लावते. श्लोक 6 7 ते खालीलप्रमाणे करतात. (संस्कृत लिप्यंतरण आणि पुरुषसूक्तावरील माझे अनेक विचार जोसेफ पडिनजरेकर यांच्या क्राईस्ट इन एन्शन्ट वेदाज (पृ. 346. 2007) या पुस्तकाच्या अभ्यासाद्वारे प्राप्त झाले आहेत.)

पुरुषसूक्तामधील श्लोक 6-7 

मराठी भाषांतर संस्कृत लिप्यंतरण
जेव्हा देवतांनी पुरुषाचा यज्ञ म्हणून बळी दिला, तेव्हा वंसत वितळलेले तूप होता, उन्हाळा त्याचे इंधन आणि शरद ऋतू त्याचा यज्ञ होता. त्यांनी पेंढीच्या बलिदानाच्या रूपात, आरंभी जन्मलेल्या पुरुषास शिंपडले. देवता, साध्या, आणि ऋषींनी त्याला बळी म्हणून अर्पण केले. यत्पुरुसेन हविसादेवा यज्नम् अतन्वतावासन्तो अस्यसिद् अज्यम् ग्रिस्मा इध्माह् सरद्धविह् तम् यज्नम् बर्हिसि पुरूषाकान्पुरूषाम् जतम्ग्रतह् तेना देवा अयाजन्त साध्य रास्यास च ये

जरी सर्वकाही लगेच स्पष्ट होत नाही, तरी जे स्पष्ट आहे ते म्हणजे लक्ष पुरुषाच्या बलिदानावर केन्द्रित आहे. प्राचीन वेदभाष्यकार सयानाचार्य यांनी हा विचार व्यक्त केला आहे :

“ऋषी – संत आणि देवता – यांनी पुरुषास, बलिदानाच्या बळीस बलिपशू म्हणून बलिदानस्तंभास बांधले आणि आपल्या मनांद्वारे बलिदान म्हणून त्याला अर्पण केले” ऋग्वेदावरील सयानाचार्यांची

समीक्षा 10.90.7

श्लोक 8-9ची सुरूवात ”तस्मद्यज्नत्सर्वहुतह्…“ ह्या वाक्यप्रयोगाने होते ज्याचा अर्थ हा आहे की पुरुषाने त्याच्या बलिदानात ते सर्व काही अर्पण केले जे त्याच्याजवळ होते – त्याने काहीही रोखून धरले नाही. त्याच्या बलिदानाद्वारे पुरुषाने त्याच्याठायी असलेले प्रेम प्रकट केले. केवळ प्रीतीद्वारे आपण स्वतःस पूर्णपणे इतरांसाठी देऊ शकतो. जसे येशूसत्संगने (येशू ख्रिस्त) वेद पुस्तकममध्ये (बायबल) म्हटले

“आपल्या मित्रांकरिता आपला प्राण द्यावा: ह्यापेक्षा कोणाची प्रीति मोठी नाही“”

योहान 15:13

येशू सत्संग (येशू ख्रिस्ताने) हे म्हटले की कारण तो स्वतःस वधस्तंभाच्या बलिदानासाठी स्वतःस वाहून द्यावयास पूर्णपणे समर्पित होता. पुरुषाचे बलिदान आणि येशूसत्संगचे बलिदान यांत संबंध आहे काय? पुरुषसूक्ताचा 5 वा श्लोक संकेत करतो (जो आम्ही आतापर्यंत सोडून दिला आहे) – पण हा संकेत रहस्यमय आहे. येथे 5 वा श्लोक दिलेला आहे

पुरुषसूक्तामधील श्लोक 5

मराठी भाषांतर संस्कृत लिप्यंतरण
त्यापासून – पुरुषाच्या एका भागातून – ब्रम्हांडाचा जन्म झाला आणि यास पुरुषाचे सिंहासन ठरविण्यात आले आणि तो सर्वव्यापी झाला. तस्मद् विरालजयत विराजो अधि पुरूषाह्

पुरुषसुक्तानुसार, पुरूषास काळाच्या सुरूवातीस बलिदान केले गेले आणि परिणामी विश्वाची निर्मिती झाली. अशाप्रकारे हे बलिदान पृथ्वीवर करता आले नसते कारण ह्या बलिदानाद्वारे पृथ्वी उद्भवली. श्लोक 13 हे स्पष्टपणे दर्शविते की या सृष्टीची उत्पत्ती पुरुषाच्या बलिदानाच्या परिणामी झाली आहे. असे म्हटले आहे की

पुरुषसूक्तामधील श्लोक 13

मराठी भाषांतर संस्कृत लिप्यंतरण
चंद्राचा जन्म त्याच्या मनातून झाला. त्याच्या डोळ्यातून सूर्य बाहेर पडला. त्याच्या तोंडातून वीज, पाऊस आणि आग ही उत्पन्न झाली. वायुचा जन्म त्याच्या श्वासातून झाला. चन्द्रम मनसो जतस् चक्सोह् सुर्यो अजयत्मुखद्

वेद पुस्तकम (बायबलच्या) सखोल आकलनामध्ये ते सर्व स्पष्ट होते. जेव्हा आपण ऋषी (संदेष्टा) मीखा यांचे लिखाण वाचतो तेव्हा आम्हास हे दिसून येते. तो खि. पू. 750 च्या सुमारास जगला आणि जरी तो येशू ख्रिस्ताच्या (येशू सत्संग) येण्याच्या 750 वर्षे आधी जगला, तरी ज्या नगरात येशू जन्माला येणार होता त्या नगराविषयी लिहून त्याने त्याच्या आगमनाविषयी आधीच जाणून घेतले. त्याने भविष्यवाणी केली :

हे, बेथलेहेम एफ्राता,

यहूदाच्या हजारांमध्ये तुझी गणना अल्प आहे,

तरी तुजमधून एक जण निघेल

तो मजसाठी इस्राएलाचा शास्ता होईल,

त्याचा उद्भव प्राचीन काळापासून,

अनादि काळापासून आहे.

मीखा 5:2

मीखाने ही भविष्यवाणी केली की शास्ता (अथवा ख्रिस्त) बेथलेहेम नगरातून निघेल. 750 वर्षांनंतर येशू ख्रिस्त (येशूसत्संग) ह्या दृष्टांताची परिपूर्णता म्हणून बेथलेहेमात जन्मास आला. सर्वसामान्यतः सत्याचा शोध घेणारे मीखाच्या दृष्टांताच्या ह्या पैलूकडे विस्मयाने लक्ष देतात. तथापि, या येणार्याच्या उद्भवावर आम्ही आपले लक्ष केन्द्रित करण्याची गरज आहे. मीखा भविष्यातील आगमनाचे भाकित सांगतो, पण तो म्हणतो की या आगमनाचे मूळ भूतकाळात खोलवर रुतलेले आहे. त्याचा ‘उद्भव प्राचीन काळापासून आहे’. पृथ्वीवर त्याच्या प्रकट होण्याआधीच या येण्याचे उद्भव आहे!  ‘प्राचीन काळापासून’ किती भूतकाळात जाते? ते अनादी काळापर्यंत जाते. वेद पुस्तकम् (बायबल) मध्ये दिलेली खरी ज्ञानाची इतर लिखाणे हे आणखी स्पष्ट करतात. कलस्सैकरांस पत्र 1:15 मध्ये ऋषी पौलाने (ज्याने इ.स. 50 च्या सुमारास लिहिले) येशूविषयी (येशू) घोषणा केली की:

 तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे, तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे

कलस्सैकरांस पत्र 1:15

येशूला ‘अदृश्य देवाचे प्रतिरूप’ आणि ‘सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ’ म्हटले गेले आहे. दुसर्या शब्दात, जरी येशूचे देहधारण इतिहासात एका निश्चित समयी होते (सन 4 – सन 33), तरी तो सर्व काही निर्माण होण्याआधी अस्तित्वात होता – अगदी सनातन काळापासून. त्याने असे केले कारण परमेश्वर देव (प्रजापती) सदैव सनातन भूतकाळात अस्तित्वात आहे आणि त्याचे ‘प्रतिरूप’ असल्यामुळे येशू (येशूसत्संग) देखील नेहमी अस्तित्वात असता.

जगाच्या स्थापनेपासून बलिदानसर्व वस्तुमात्रांची उत्पत्ती

परंतु तो केवळ सनातन काळापासून अस्तित्वात नाही, तर ऋषी (संदेष्टा) योहान याने स्वर्गाच्या दृष्टांतात ह्या येशूचे (येशूसत्संग) वर्णन

”जगाच्या स्थापनेपासून वधलेला कोंकरा“ म्हणून केले आहे . 

प्रकाशितवाक्य 13:8

हा विरोधाभास आहे का? येशू (येशूसत्संग) सन 33 मध्ये वध केला नव्हता का गेला? जर तो तेव्हा वध केला गेला, तर तो ”जगाच्या स्थापनेपासून’ कसा वध केला गेला असावा?“ ह्या विरोधाभासात आपण पाहतो की पुरुषसूक्त आणि वेदपुस्तकम् सारख्याच गोष्टीचे वर्णन करीत आहेत. आम्ही पाहिले की पुरुषसूक्त म्हणते की पुरुषाचे बलिदान आरंभी होते. जोसेफ पडिनजरेकर क्राईस्ट इन एन्शन्ट वेदाज (पृ. 346. 2007) या नावाच्या त्यांच्या पुस्तकात दाखवितात की पुरुषसूक्तावरील संस्कृत भाष्य आम्हास सांगते की ह्या पुरुषाचे बलिदान आरंभी ‘देवाच्या अंतःकरणात’ होते (त्यांनी संस्कृत ‘मानसायज्ञम’ चा अर्थ म्हणून हे भाषांतर केले). ते संस्कृत विद्वान एन जे शेंडे यांचाही असे म्हणून संदर्भ घेतात की आरंभीचे हे बलिदान एक मानसिक अथवा सांकेतिक होते.” *

अशाप्रकारे आता पुरुषसूक्ताचे रहस्य स्पष्ट होते. म्हणून भूतकाळातील अनादी काळापासून पुरुष देव आणि देवाचे प्रतिरूप होता. तो इतर सर्व गोष्टींपूर्वी होता. तो सर्वात प्रथम जन्मलेला आहे. देवाने, आपल्या सर्वज्ञानानाने, जाणले की मानवजातीच्या उत्पत्तीसाठी बलिदान आवश्यक ठरेल – ज्याच्यासाठी त्या सर्वाची गरज भासेल जे तो देऊ शकतो – पापाच्या प्रक्षालनासाठी अथवा शुद्धीकरणासाठी बलिदान होण्यासाठी जगात पुरुषाचे देहधारण अथवा अवतार. याक्षणी देवास हा निर्णय घ्यावयाचा होता की विश्वाच्या अथवा ब्रम्हांडाच्या आणि मानवजातीच्या उत्पत्तीसाठी पुढे जावे किंवा नाही. त्या निर्णयात पुरुषाने बलिदान होण्यास इच्छुक होण्याचे ठरविले. मानसिकरित्या, अथवा देवाच्या अंतःकरणात, पुरुष ‘जगाच्या स्थापनेपासून वधला’ गेला जसे वेद पुस्तकम् घोषित करते.

एकदा का हा निर्णय घेण्यात आला – समयाचा आरंभ होण्यापूर्वी – देव (प्रजापति – सर्व सृष्टीचा प्रभू) समय, विश्व आणि मानवजातीची उत्पत्ती करावयाच्या कामी लागला. अशाप्रकारे पुरुषाने स्वच्छेने केलेल्या बलिदानामुळे ‘विश्वाची अर्थात ब्रम्हांडाची’ (श्लोक 5), चंद्र, सूर्य, वीज आणि पाऊस (श्लोक 13) यांची उत्पत्ती घडून आली, आणि समयाचा सुद्धा (श्लोक 6 मध्ये उल्लेखिलेले वसंत, ग्रीष्म आणि शरद) आरंभ घडून आला. पुरुष या सर्वांत आधी  जन्मलेला होता.

पुरुषाचे बलिदान करणारेदेवकोण आहेत?

पण एक कोडे अद्याप सोडवावयाचे आहे. पुरुषसूक्त श्लोक 6 म्हणते की ‘देवांनी’ (देव) पुरुषाचे बलिदान केले? हे देव कोण आहेत? वेद पुस्तकम् (बायबल) ते स्पष्ट करते. एक ऋषी, दावीदाने, खि. पू. 1000 मध्ये एक पवित्र स्तोत्र लिहिले ज्यात हे प्रकट करण्यात आले आहे की देव (प्रजापती) पुरुषांशी व स्त्रियांशी कशाप्रकारे बोलला :

 “मी म्हणालो, ‘तुम्ही ”देव“ आहा; तुम्ही सर्व परात्पराचे पुत्र आहा’ ()

स्तोत्र 82:6

येशूसत्संग (येशू ख्रिस्त) याने 1000 वर्षांनंतर ऋषी दाविदाच्या ह्या पवित्र स्तोत्रावर असे म्हणून आपले विचार व्यक्त केले :

येशूने त्यांस म्हटले, ”‘तुम्ही देव आहा असे मी म्हणालो’, हे तुमच्या शास्त्रात लिहिले नाही काय? ज्यांना देवाचे वचन प्राप्त झाले त्यांना जर त्याने ”देव “ म्हटले – आणि शास्त्रलेखाचा भंग होत नाही – तर ज्याला पित्याने पवित्र कार्यास्तव नेमून जगात पाठविले त्या मला मी देवाचा पुत्र आहे असे म्हटल्यावरून तुम्ही दुर्भाषण करिता असे तुम्ही म्हणता काय?

योहान 10:34-36

येशूसत्संग (येशू ख्रिस्त) ऋषी दाविदाने खरे शास्त्र म्हणून ‘देवता’ हा शब्द वापरला होता याची पुष्टी करतो. कोणत्या अर्थाने हे असे आहे? वेद पुस्तकमच्या (बायबल) उत्पत्तीच्या वर्णनात आपण पाहतो की आपणास ‘देवाच्या प्रतिरूपात घडविण्यात आले’ (उत्पत्ती 1:27). त्याच अर्थाने, कदाचित आपण ‘देव’ मानले जाऊ शकते कारण आपण परमेश्वराच्या स्वरूपात घडविण्यात आलो आहोत. पण वेद पुस्तकम् (बायबल) पुढे या गोष्टीचे स्पष्टीकरण देते. हे घोषित करते की जे लोक हे बलिदान स्वीकारतात ते :

त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे, म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वीं आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले; त्याने आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरिता प्रेमाने पूर्वींच नेमिले होते

इफिसकरांस पत्र 1:4-5

जगाच्या उत्पत्तीपूर्वी जेव्हा प्रजापती-पुरुषाने पुरुषाचा सिद्ध बलिदान अथवा यज्ञ म्हणून अर्पण करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा देवाने आपल्या लोकांनाही निवडले होते, त्याने कोणत्या हेतूने त्यांना निवडले? त्यात स्पष्टपणे सांगितले आहे की त्याने आम्हाला त्याचे ‘पुत्र’ होण्यासाठी निवडले.

दुसर्या शब्दांत, वेद पुस्तकम् (बायबल) असे घोषित करते की जेव्हा देवाने सिद्ध बलिदानाद्वारे स्वतःस पूर्णपणे अर्पण करण्याची निवड केली तेव्हा त्याने ह्या बलिदानाद्वारे देवाची मुले होण्यासाठी पुरुष व स्त्रियांची निवड केली. या पूर्ण अर्थाने, आम्हाला ”देव“ म्हटले गेले आहे. हे त्यांच्यासाठी सत्य आहे (ज्याप्रमाणे येशूसत्संगने वर घोषित केले)ज्यांच्यासाठी देवाचे वचन आले – जे त्याचे वचन स्वीकारतात त्यांच्यासाठी. आणि या अर्थाने देवाच्या भावी मुलांची ही गरज होती जिने पुरुषास बलिदान करण्यास भाग पाडले. जसे पुरुषसूक्ताच्या 6 व्या श्लोकात म्हटले आहे की, ””देवतांनी पुरुषाचे यज्ञ म्हणून बलिदान केले.” पुरुषाचे बलिदान म्हणजे आपले शुद्धीकरण होते.

पुरुसाचे बलिदानस्वर्गाचा मार्ग

आपण प्राचीन पुरुषसूक्ताच्या आणि वेद पुस्तकमच्या ज्ञानभंडारात देवाची योजना प्रकट झालेली पाहतो. ही अद्भुत योजना आहे – अशी योजना जिची आपण कल्पनाही केली नसती. ती आमच्यासाठी फार महत्वाची सुद्धा आहे जसे पुरुषसूक्त 16 व्या वचनात म्हणते.

मराठी भाषांतर संस्कृत लिप्यंतरण
देवतांनी यज्ञपशू म्हणून पुरुषाचे बलिदान केले. हे पहिले प्रस्थापित तत्त्व आहे. याद्वारे ऋषींना स्वर्ग प्राप्त होतो. यज्ञनान यज्नमजयन्त देवस्तनि धर्मनि प्रथमन्यसन् तेह नकम् महिमनह् सचन्त यतर् पुर्वे सध्यह् सन्तिदेवह्

ऋषी म्हणजे ज्ञानीपुरुष. आणि स्वर्गप्राप्तीची आस बाळगणे ही खरोखर शहाणपणाची गोष्ट आहे. हे आपल्या आवाक्याबाहेरचे नाही. हे अशक्य नाही. हे केवळ अत्यंत तपस्वी पवित्र लोकांसाठीच नाही ज्यांना त्यांच्या अत्यंत शिस्त व चिंतनातून मोक्ष प्राप्त करण्याची इच्छा आहे. हे फक्त गुरुंसाठीच नाही. उलटपक्षी हा स्वतः पुरुषाद्वारे येशू ख्रिस्ताच्या (येशू सत्संग) त्याच्या देहधारणात पुरविलेला मार्ग होता.

पुरुसाचे बलिदानस्वर्गात जाण्याचा दुसरा मार्ग नाही

सत्य हे आहे की हे केवळ आपल्यासाठी देण्यातच आलेले नाही परंतु सयानाचार्याद्वारे लिखित संस्कृत भाष्यात 15 आणि 16 व्या श्लोकाच्या माध्यमाने पुरुषसूक्त म्हणते

मराठी भाषांतर संस्कृत लिप्यंतरण
अशाप्रकारे, ज्याला हे माहीत आहे तो मृत्यूहीन अवस्थेत पोहोचण्यास सक्षम होतो. यासाठी इतर कोणताही मार्ग ज्ञात नाही. तमेव विद्वनम्र्त इह भवति णन्यह् पन्त अयनय वेद्यते

सार्वकालिक जीवनात (मृत्यूविहीनता) प्रवेश करण्याचा दुसरा कुठलाही मार्ग ज्ञात नाही! निश्चितच ह्या बाबीचा आणखी अभ्यास करणे समंजसपणाचे ठरते. आतापर्यंत आपण वेद पुस्तकम् (बायबल) मध्ये हे दाखवीत उडी मारत फिरलो की ते कशाप्रकारे देव, मानवजातीची अतिशय महत्वपूर्ण गोष्ट सांगते आणि हे सत्य पुरुषसूक्तात सांगितलेल्या गोष्टीबरोबर प्रतिध्वनित होते. पण आपण ही गोष्ट सविस्तर अथवा क्रमाने पाहिलेली नाही. म्हणून, मी आपणास निमंत्रण देतो की, आरंभापासून सुरूवात करून, वेद पुस्तकममध्ये आमच्यासोबत शोध घेत, उत्पत्तीविषयी शिकू या, की असे काय घडले ज्याच्यासाठी पुरुषाच्या ह्या बलिदानाची गरज भासली, जगाचे काय झाले ज्यामुळे मनूचा जलप्रलय (वेद पुस्तकममध्ये पुस्तकम्मध्ये नोहा) आला आणि जगातील राष्ट्रे त्यांस मृत्यूपासून मुक्त करून स्वर्गात सार्वकालिक जीवन देणार्‍या सिद्ध बलिदानाच्या अभिवचनाविषयी कशी शिकली आणि हे अभिवचन त्यांनी कसे सुरक्षित ठेविले.

*(एन जे शेंडे. पुरुषसूक्त (आर व्ही 10-90) इन वेदिक लिट्रेचर (पब्लिकेशन्स आफ द सेंटर आफ एडवान्स्ड स्टडी इन संस्कृत, पुणे विद्यापीठ) 1965.

श्लोक 3 और 4 – पुरुषाचा देहावतार

पुरुषसूक्त श्लोक 2 पासून पुढे खालील गोष्टी सांगते. (संस्कृत लिप्यंतरण, आणि पुरुषसूक्तावरील माझे विचार जोसेफ पडिनजरेकर यांच्या क्राईस्ट इन एन्शन्ट वेदाज (पृ. 346. 2007) या पुस्तकाच्या अभ्यासाद्वारे प्राप्त झाले आहेत.

मराठी भाषांतर संस्कृत लिप्यंतरण
सृष्टी ही पुरुषाचा गौरव आहे – म्हणून त्याचे वैभव थोर आहे. तरीही तो ह्या सृष्टीपेक्षा थोर आहे. पुरुषाचा एक चतुर्थांश (व्यक्तिमत्वाचा) भाग जगात आहे. त्याचा तीन चतुर्थांश भाग अद्याप सार्वकालिकरित्या स्वर्गात जगत आहे. पुरुष स्वतःच्या एक चतुर्थांश भागानिशी वर स्वर्गात चढला. तेथून त्याने सर्व प्राणीमात्रात जीवन पसरविले.  इतवन् अस्य महिम अतो ज्ययम्स्च पुरूषरूपादो-अस्य विस्व भ् उ तनि त्रिपद् अस्यम्र्त्म् दिवित्रिपद् उर्ध्व उदैत् पुरुषः पदोउ-अस्येह अ भवत् पुनरू ततो विस्वन्न्वि अक्रमत् ससननसने अभि

येथे जी प्रतिमासृष्टी वापरली आहे ती समजणे कठीण आहे. तथापि हे स्पष्ट आहे की हे श्लोक पुरुषाच्या महानतेबद्दल आणि गौरवाबद्दल बोलत आहे. तो सृष्टीपेक्षा श्रेष्ठ आहे हे त्यात स्पष्टपणे सांगितलेले आहे. आपण हे सुद्धा समजू शकतो की त्याच्या महानतेचा केवळ एक भाग या जगात प्रकट करण्यात आला आहे. पण ते त्याच्या देहधारणाविषयी म्हणजे अवताराविषयी देखील सांगते – लोकांचे जग जेथे तुम्ही आणि मी राहतो (‘त्याचा एक चतुर्थांश येथे जन्मला’). म्हणून जेव्हा देव त्याच्या देहस्वरूपात खाली आला तेव्हा त्याने या जगात त्याच्या गौरवाचा फक्त एक भाग प्रकट केला. जेव्हा त्याने जन्म घेतला तेव्हा त्याने स्वतःला रिक्त केले. श्लोक 2 मध्ये पुरुषाचे जसे वर्णन करण्यात आले होते त्याच्याशी हे सुसंगत आहे – ‘स्वतःला दहा बोटांपर्यंत मर्यादित केले.’ 

ज्याप्रकारे वेद पुस्तकात (बायबल) नासरेथच्या येशूच्या देहधारणाविषयी  अथवा अवताराविषयी वर्णन करण्यात आले आहे त्याच्याशी सुद्धा हे सुसंगत आहे. त्याच्याविषयी ते म्हणते की

ते परिश्रम ह्यासाठी की… ज्ञानाची पूर्ण खातरी ही संपत्ति त्यांना विपुल मिळावी;  व देवाचे रहस्य म्हणजे ख्रिस्त ह्यांचे पूर्ण ज्ञान त्यांस व्हावे. त्या ख्रिस्तामध्ये ‘ज्ञानाचे’ व   बुध्दीचे सर्व ‘निधि गुप्त आहेत.’

कलस्सैकरांस पत्र 2:2-3

म्हणून ख्रिस्त हा देवाचा अवतार होता पण त्याचे प्रकटीकरण मोठ्या प्रमाणात ‘गुप्त’ होते. ते कसे गुप्त होते. ते पुढे स्पष्ट करते:

अशी जी चित्तवृत्ति ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायीहि असो:

 6 तो, देवाच्या स्वरूपाचा असूनहि,

देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने

मानिले नाही,

7 तर त्याने स्वतःला रिक्त केले,

म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन,

दासाचे स्वरूप धारण केले.

8 आणि मनुष्यप्रकृतीचे असे प्रगट होऊन,

 त्याने मरण –

आणि तेंहि वधस्तंभावरचे मरण सोशिले!

येथपर्यंत आज्ञापालन करून

त्याने स्वतःला लीन केले. 

9 ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले,

आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नांव ते त्याला दिले,

फिलिप्पैकरांस पत्र 2:5-9

अशाप्रकारे येशूने जेव्हा देहधारण केले तेव्हा त्याने ‘स्वतःला रिक्त केले’ आणि त्या स्थितीत स्वतःला त्याच्या बलिदानासाठी तयार केले. त्याने प्रकट केलेले गौरव केवल आंशिक होते, अगदी जसे पुरुषसूक्त सांगते. हे त्याच्या येणार्‍या बलिदानासमान होते. पुरुषसूक्तात तोच विषय घेतलेला आहे कारण ह्या श्लोकानंतर पुरुषाच्या आंशिक गौरवाचे वर्णन करण्यापासून  ते त्याच्या बलिदानावर लक्ष देण्याकडे वळते. आपण आपल्या पुढील पोस्टमध्ये ते पाहू या

श्लोक 2 – पुरुष अमरत्वाचा स्वामी आहे

आम्ही पुरुषसूक्ताच्या पहिल्या श्लोकात पाहिले की पुरुष सर्वज्ञानी, सर्वसमर्थ आणि सर्वत्र उपस्थित असल्याचे वर्णन करण्यात आले आहे. त्यानंतर आम्ही हा प्रश्न मांडला की पुरूष येशूसत्संग (येशू ख्रिस्त) असू शकतो का आणि हा प्रश्न मनात ठेवून पुरुषसूक्ताद्वारे प्रवासास निघालो. तर आपण पुरुषसूक्ताच्या दुसर्या श्लोकात आलो आहोत ज्यात मनुष्य पुरुषाचे वर्णन अगदी विलक्षण शब्दांत केले आहे. येथे संस्कृत लिप्यंतरण आणि मराठी भाषांतर आहे (संस्कृत लिप्यंतरण जोसेफ पडिनजरेकर यांच्या क्राईस्ट इन एन्शन्ट वेदाज (पृ. 346. 2007) या पुस्तकाच्या अभ्यासाद्वारे प्राप्त झाले आहे

पुरुषसुक्ताचा दुसरा श्लोक
संस्कृत लिप्यंतरण मराठी भाषांतर
पुरूष हे सर्व विश्व आहे, काय होते आणि काय होईल. आणि तो अमरत्वाचा स्वामी आहे, जे तो अन्नावाचून पुरवितो (नैसर्गिक पदार्थ) पुरुषैएवेदं सर्व यद्भूतं यच्च भाव्यम् द्य उतामृतत्यस्येशानो यदन्नेनातिरोहति

पुरुषाचे गुण

पुरुष ब्रम्हांडापेक्षा श्रेष्ठ आहे (अंतराळ आणि समस्त पदार्थमात्र) संपूर्ण मर्यादा) आणि काळाचा प्रभू आहे (‘जे होते आणि असेल’) तसेचअमरत्वाचा प्रभू’ – सार्वकालिक जीवन आहे. हिंदू पौराणिक कथांमध्ये बर्याच देवता आहेत पण कोणालाही असे अनंत गुण दिलले नाहीत.

हे असे चित्तथरारक गुण आहेत की ते फक्त एका खर्या देवाचेच असू शकतातस्वतः सृष्टीचा प्रभू. हा ऋग्वेदाचा प्रजापती (हिब्रू जुन्या करारातील याहवेचा समानार्थी) असेल. अशाप्रकारे ह्या मनुष्यास, पुरुषास, केवळ ह्या एकच देवाचा अवतारसर्व सृष्टीचा प्रभू म्हणून समजू शकतो.

परंतु आमच्यासाठी यापेक्षाही उपयुक्त हे आहे की पुरुष आम्हास हे अमरत्व (सार्वकालिक जीवन) ‘देतो.’ अर्थात, तो नैसर्गिक पदार्थ वापरून असे करीत नाही. तो सार्वकालिक जीवन देण्यासाठी अथवा पुरविण्यासाठी विश्वातील नैसर्गिक प्रक्रिया किंवा नैसर्गिक पदार्थ/उर्जा यांचा उपयोग करीत नाही. आम्ही सर्व मृत्यू आणि कर्माच्या शापाखाली आहोत. ही आपल्या अस्तित्वाची निरर्थकता आहे ज्यापासून आपण सुटू इच्छितो आणि ज्यासाठी आपण पूजा, स्नान आणि इतर जपतप करण्याचे कष्ट करतो. जरी ही लहानशी संधी असेल की हे सत्य आहे आणि हे की पुरुषाकडे अमरत्व देण्याचे सामर्थ्य  आणि इच्छा दोन्ही आहेत तर त्याबद्दल कमीतकमी अधिक माहिती प्राप्त करून घेणे शहाणपणाचे ठरेल.

वेद पुस्तकम् (बायबल) च्या ऋषींच्या तुलनेत

हे लक्षात घेऊन आपण मानवी इतिहासातील सर्वात प्राचीन पवित्र लेखनांपैकी एकाचा विचार करू या. हे हिब्रू करारात सापडते (बायबलचा जुना करार किंवा वेद पुस्तकम्). हे पुस्तक, ऋग्वेदाप्रमाणेच, अनेक वेगवेगळ्या ऋषींची देववचने, स्तोत्रे, इतिहास आणि भविष्यवाण्या यांचा संग्रह आहे जे जरी फार पूर्वी जगत असले, तरीही ते इतिहासाच्या वेगवेगळ्या युगात जगले आणि त्या युगात लेखन केले. म्हणून जुन्या करारास वेगवेगळ्या ईश्वरप्रेरित लेखनांचा एका पुस्तकात संकलित केलेला संग्रह अथवा पुस्तकालय असे मानले जाते. या ऋषींची बहुतेक लिखाणे इब्री भाषेत होती आणि थोर ऋषी अब्राहाम जो ख्रि. पू. 2000 वर्षांपूर्वी जगला त्याचे वंशज असे आहेत. तथापि एक लिखाण आहे, ऋषी ईयोबाद्वारे लिहिलेले जो अब्राहामापूर्वी जगला. जेव्हा तो जगत होता तेव्हा हिब्रू राष्ट्र अद्याप अस्तित्वात नव्हते. ज्यांनी ईयोबाच्या पुस्तकाचा अभ्यास केला आहे त्यांच्या अंदाजानुसार तो सुमारे ख्रि. पू. 2200 वर्षांपूर्वी, 4000वर्षांपेक्षा अधिक समयापूर्वी जगला.

ईयोबाच्या पुस्तकात

त्याच्या नावाप्रमाणे ईयोब म्हटलेल्या, आपल्या पवित्र पुस्तकात, आम्ही त्याला आपल्या सोबत्यांस असे म्हणतांना पाहतो:

मला तर ठाऊक आहे की माझा उद्धारक जिवंत आहे,

तो अंती पृथ्वीवर उभा राहील.

तो माझी त्वचा छिन्नभिन्न होऊन नष्ट झाली,

तरी मी देवाला देहविरहित पाहीन;

अन्याचे नव्हे तर माझेच नेत्र त्याला पाहतील.

माझा अंतरात्मा झुरत आहे.!

ईयोब 19:25-27

ईयोब येणार्याउद्धारकाविषयीबोलतो. आम्हास माहीत आहे की ईयोब भविष्याकडे पाहतो कारण उद्धारक पृथ्वीवर उभाराहील’ (अर्थात भविष्यकाळ). पण हा उद्धारक सांप्रतसमयी सुद्धाजिवंतआहेजरी पृथ्वीवर नसला तरीही. म्हणून हा उद्धारक, पुरुषसूक्ताच्या ह्या श्लोकातील पुरुषाप्रमाणेकाळाचा स्वामी आहे कारण त्याचे अस्तित्व आमच्यासमान काळाने बांधलेले नाही. नंतर ईयोब अशी घोषणा करतो कीमाझी त्वचा छिन्नभिन्न होऊन नष्ट झाली तरी“, (अर्थात त्याच्या मृत्यूनंतर) तोत्यास’ (ह्या उद्धारकास) पाहील आणि त्याचवेळीदेवास पाहील.दुसर्या शब्दात हा येणारा उद्धारक देहधारी परमेश्वर आहे, जसा पुरुष प्रजापतीचा अवतार आहे. पण ईयोब त्याच्या स्वतःच्या मृत्यूनंतर त्याला कसा पाहू शकतो? आणि हे निश्चित करण्यासाठी की आम्ही हा मुद्दा चुकता कामा नये ईयोब की घोषणा करतो कीअन्याचे नव्हे तर माझेच नेत्रह्या उद्धारकास पृथ्वीवर उभे राहतांना पाहतील.

याचे एकमेव स्पष्टीकरण हे आहे की ह्या उद्धारकाने ईयोबास अमरत्व दिले आहे आणि तो त्या दिवसाची वाट पाहत आहे जेव्हा हा उद्धारक, जो देव आहे, ह्या पृथ्वीवर चालेल आणि त्याने ईयोबास अमरत्व दिलेले असेल म्हणजे तो देखील पुन्हा पृथ्वीतलावर वावरू लागेल आणि आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी उद्धारकास पाहील. ह्या आशेने ईयोबास इतके आकर्षित केले की ह्या दिवसाच्या अपेक्षेने त्याचाअंतरात्मा झुरत आहे’.  एका मंत्राने त्याच्यात बदल घडवून आणला.

आणि यशया

हिब्रू ऋषी सुद्धा येणार्या पुरुषाविषयी बोलले जे ह्या पुरुषाच्या आणि ईयोबाच्या उद्धारकाच्या वर्णनासारखे वाटते. यशया असाच एक ऋषी होता जो सुमारे ख्रि. पू. 750 मध्ये जगला. त्याने दैवी प्रेरणेने अनेक देववचने लिहिली. त्याने ह्या येणार्या पुरुषाविषयी कसे वर्णन केले ते येथे पाहा:

तथापि आता ज्या भूमीत  विपत्ति आहे तेथे हा अंधकार राहणार नाही; त्याने मागील काळी जबुलून प्रांत नफताली प्रांत यांची अप्रतिष्ठा केली तरी पुढील काळी समुद्रतीरींचा प्रदेश, यार्देनेच्या पलीकडील प्रांत, विदेशी लोकांचे मंडळ गालील यांची तो प्रतिष्ठा करील.

2 अंधकारात चालणार्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे; मृत्युच्छायेच्या प्रदेशात बसणार्यावर प्रकाश पडला आहे.

6 कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे. आम्हास पुत्र दिला आहे; त्याच्या खांद्यावर सत्ता राहील; त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपति म्हणतील.

यशया9:1-2,6

दुसर्या शब्दात ऋषी यशया एका पुत्राची पूर्वसूचना देतो आणि त्याची घोषणा करतो आणि या पुत्राससमर्थ देवम्हणतील.’ ही बातमी विशेषेकरूनमृत्युच्छायेच्या प्रदेशात बसणार्यानाउपयुक्त ठरेल. याचा अर्थ काय आहे? आपण येणार्या मृत्यूपासून आणि आमच्यावर राज्य करीत असलेल्या कर्मापासून वाचू शकत नाही हे जाणून आपण आपले आयुष्य जगलो आहोत. म्हणून आपण अक्षरशःमृत्यूच्या सावलीतजगतो. अशाप्रकारे हा येणारा पुत्र, ज्यालासमर्थ देवम्हटले जाईल, आपल्या आगामी मृत्यूच्या छायेत राहणार्या आपणास एक मोठा प्रकाश किंवा आशा असेल.

आणि मीखा

दुसरा ऋषी मीखा, जो यशयाचा समकालीन होता (ख्रि. पू. 750) त्याला देखील या येणार्या व्यक्तीविषयी देववाणी प्राप्त झाली. त्याने लिहिले,

हे, बेथलेहेम एफ्राता,

यहूदाच्या हजारांमध्ये

तुझी गणना अल्प आहे,

तरी तुजमधून एक जण निघेल

तो मजसाठी इस्राएलाचा शास्ता होईल,

त्याचा उद्भव प्राचीन काळापासून,

अनादि काळापासून आहे.

मीखा5:2

मीखाने सांगितले की एक पुरुष एफ्राथाच्या प्रदेशातील बेथलेहेम नगरातून निघेल जेथे यहूदाचे कुळ (म्हणजे यहूदी) राहत असे. या मनुष्याबद्दल अगदी अनन्यसाधारण गोष्ट ही आहे की जरी तो इतिहासातील एका विशिष्ट काळात बेथलहेमाहूननिघेल“, तरी काळाच्या सुरुवातीपासूनच तो या उत्पत्तीच्या पूर्वीपासून अस्तित्वात आहे. अशाप्रकारे, पुरुषसूक्ताच्या श्लोक 2 प्रमाणे, आणि ईयोबाच्या येणार्या उद्धारकाप्रमाणे, हा मनुष्य आपल्यासारखा काळाच्या बंधनात नसेल. तो काळाचा प्रभू असेल. ही एक दैवी क्षमता आहे, मानवी नाही, आणि म्हणूनच ते सर्व एकाच व्यक्तीचा उल्लेख करीत आहेत.

येशू सत्संगाठायी (येशू ख्रिस्त) पूर्ण झाले

पण ही व्यक्ती कोण आहे? येथे मीखा आम्हाला एक महत्त्वाचा ऐतिहासिक संकेत देतो. येणारी व्यक्ती बेथलहेमातून येणार. बेथलहेम हे एक वास्तविक शहर आहे जे हजारो वर्षे अस्तित्वात होते ज्यास आज इस्रायल/वेस्ट बँक म्हणून ओळखले जाते. आपण ते गुगल करू शकता आणि नकाशावर पाहू शकता. हे एक मोठे शहर नाही, आणि कधीही नव्हते. परंतु हे जगविख्यात आहे आणि जागतिक बातम्यांमध्ये दरवर्षी असते. का? कारण हे येशू ख्रिस्ताचे (किंवा येशू सत्संग) जन्मस्थान आहे. 2000 वर्षांपूर्वी त्याचा जन्म याच नगरात झाला. यशयाने आपल्याला आणखी एक सूचना दिली कारण तो म्हणाला की ही व्यक्ती गालीलवर प्रभाव पाडेल. आणि जरी येशूसत्संगाने (येशू ख्रिस्त) बेथलेहमात (जसे मीखाने आधीच सांगितले होते) जन्म घेतला असला, तरी यशयाने भाकीत केल्याप्रमाणे, तो गालीलात मोठा झाला   शिक्षक म्हणून येथे त्याने सेवा केली. येशूचे जन्मस्थान म्हणून बेथलेहेम आणि त्याचे सेवास्थान म्हणून गालील ही येशसत्संग (येशू ख्रिस्त) याच्या जीवनातील दोन सर्वात प्रसिद्ध पैलू आहेत. अशाप्रकारे येथे आपण येशू ख्रिस्ताठायी (येशूसत्संग) वेगवेगळ्या ऋषींच्या भविष्यवाण्या पूर्ण झाल्याचे पाहतो. येशू हा पुरुष/तारणारा/राजा असू शकतो का ज्याविषयी ह्या प्राचीन ऋषींनी भविष्यवाणी केली? हे लक्षात घेता की या प्रश्नाचे उत्तर देणे ही एक महत्त्वाची किल्ली असू शकते जी हे प्रकट करू शकते कीमृत्यूच्या सावलीत’ (आणि कर्माच्या) जगत असलेल्या आपणासअमरत्वकशाप्रकारे दिले जाईल याचा विचार करणे योग्य ठरेल. म्हणून आपण पुरूषसूक्ताच्या माध्यमातून पुढे जात असताना त्याची तुलना हिब्रू पुस्तकमच्या ऋषींशी करू या.

पुरुषसुक्तावर विचार करणे – मानवाचे स्तुतीगान

कदाचित ऋग्वेदातील (किंवा रिग वेद) सर्वात प्रसिद्ध कविता किंवा प्रार्थना ही पुरुषसुक्त (पुरुषसुक्तम्) आहे. हे 10 व्या मंडळांत आणि 90 व्या अध्यायात आढळते. हे विशेष पुरुषासाठी गीत आहेपुरुसा (याचा उच्चार पुरुष असा आहे). ऋग्वेदात आढळल्यामुळे तो जगातील सर्वात प्राचीन मंत्रांपैकी एक आहे, आणि म्हणूनच आपण मुक्ति किंवा मोक्षाच्या (उद्बोधन) मार्गाविषयी काय शिकू शकतो हे पाहण्यासाठी अभ्यास करणे योग्य आहे.

तर पुरुष कोण आहे? वैदिक ग्रंथ आम्हास सांगतात की

“पुरुष व प्रजापति एक समान व्यक्ती आहेत” (संस्कृत लिप्यंतरण पुरुसोहीप्रजापती)

मध्यान्यदियासथपथ ब्राह्मण खंड 4:1.156

याच धर्तीवर उपनिषद पुढे असे म्हणते की

“पुरुष सर्व गोष्टींपेक्षा श्रेष्ठ आहे. काहीही (कोणीही), पुरुसापेक्षा श्रेष्ठ नाही. तो शेवट आणि सर्वोच्च ध्येय आहे” (अव्यक्त पुरुषाः पराः पुरुसन्ना परम् किंकिटसकस्थासा परा गती)

कथोपनिषद 3:11

”खरोखर अप्रकट अशा पलीकडे सर्वश्रेष्ठ पुरुष आहे… जो त्याला जाणतो तो स्वतंत्र होतो आणि अमरत्व प्राप्त करतो (अव्याकत अ परहापुरुसा … यज्नतवामुक्यतेजनतुरामतत्वम का गच्छती)

कथोपनिषद कठोपनिषद 6:8:

म्हणून पुरुष हा प्रजापती (अखिल पृथ्वीचा प्रभू) आहे. पण कदाचित आणखी महत्वाचे हे आहे की, त्याला प्रत्यक्षपणे जाणणे तुम्हाला व मला प्रभावित करते. उपनिषद म्हणते:

’सार्वकालिक जीवनात प्रवेश करण्याचा दुसरा कुठलाच मार्ग नाही (पुरुषावाचून) (नान्यःपंथविद्यते – अयानाय)

स्वेतस्वतारोपनिषद 3:8

म्हणून आपण पुरुषसुक्त, म्हणजे ऋगवेदातील स्तोत्राचा अभ्यास करू या जो पुरुषाचे वर्णन करतो. असे करीत असतांना, मी आपल्यापुढे कदाचित एक विचित्र आणि नवीन कल्पना मांडणार आहे ज्याचा आपण विचार करावयाचा आहे: हा पुरुष ज्याच्याविषयी पुरुषसुक्तामध्ये जे म्हटले गेले आहे ते सुमारे 2000 वर्षापूर्वी येशूसत्संगाच्या (नासरेथच्या येशूच्या) देहधारणामध्ये पूर्ण झाले आहे का? मी म्हटल्याप्रमाणे, ही कदाचित एक विचित्र कल्पना आहे, परंतु येशूसत्संग (नासरेथचा येशू) हा सर्व धर्मांमध्ये पवित्र मनुष्य म्हणून ओळखला जातो आणि त्याने देवाचा अवतार असल्याचा दावा केला, आणि त्याने आणि पुरुष या दोघांचेही बलिदान करण्यात आले आहे (जसे आपण पाहू या) म्हणून आम्हाला या कल्पनेवर विचार करण्यास आणि त्याचा शोध घेण्यास चांगले कारण प्राप्त होते. संस्कृत लिप्यंतरण, आणि पुरुषसुक्तावरील माझे बरेचसे विचार, जोसेफ पडीनजरेकर (पृ.  346, 2007) यांच्या प्राचीन वेदांमधील ख्रिस्त क्राईस्ट इन एन्शन्ट वेदाज  या पुस्तकाच्या अभ्यासानंतर आले आहेत.

पुरुषसूक्ताचा पहिला श्लोक

संस्कृत लिप्यंतरण मराठी भाषांतर
षहस्र सिर्सापुरूषाह्षहस्र क्सह् सह्स्रपत्ष भुमिम् विस्वतो व् र्त्वात्यतिस्थद्दसन्गुलम् पुरुषाचे एक हजार डोके, एक हजार डोळे आणि एक हजार पाय आहेत. पृथ्वीस सर्व बाजूंनी वेढलेले, तो प्रकाशित होतो. आणि त्याने स्वतःला दहा बोटांवर मर्यादित केले.

आम्ही वर पाहिले की पुरुष हा प्रजापती सारखाच आहे. प्रजापती, येथे स्पष्ट केल्याप्रमाणे, अगदी प्रारंभीच्या वेदांत सर्वकाही निर्माण करणारा देव मानला जात होता – तो “सर्व सृष्टीचा प्रभु” होता.

आपण पुरूषसुक्ताच्या सुरूवातीस पाहतो की पुरुषाची ‘हजार डोकी, एक हजार डोळे आणि हजार पाय’ आहेत, याचा अर्थ काय? ‘हजार’ म्हणजे येथे एक विशिष्ट मोजलेली संख्या नाही, तर त्याचा अर्थ अधिक ‘असंख्य’ किंवा ‘अमर्याद’ असा आहे. तर पुरुषाकडे अमर्याद बुद्धिमत्ता (‘डोके’) आहे  आजच्या भाषेत आम्ही म्हणू की तो सर्वज्ञानी किंवा सर्वज्ञ आहे. हा परमेश्वराचा (प्रजापती) एक गुण आहे जो केवळ एकमेव आहे जो सर्वज्ञ आहे. देव सर्व काही पाहतो व जाणतो. पुरुषाचे ‘हजार डोळे’ आहेत असे म्हणणे म्हणजे पुरुष सर्वव्यापी आहे – त्याला सर्व गोष्टींचे ज्ञान आहे कारण तो सर्वत्र उपस्थित आहे. अशाच प्रकारे, ‘एक हजार पाय’ हा वाक्प्रयोग – अमर्याद सामर्थ्य  दर्शवितो.

अशाप्रकारे आपण पुरुषसुक्ताच्या सुरूवातीस पाहतो की पुरूषाचा परिचय सर्वज्ञानी, सर्वव्यापी आणि सर्वशक्तिमान मानव असा करण्यात आला आहे. असा व्यक्ती केवळ देवाचा अवतार असू शकतो. तथापि श्लोकवचन असे म्हणून समाप्त करते की ‘त्याने स्वतःला दहा बोटांप्रत मर्यादित केले’. याचा अर्थ काय? एक अवतारपुरुष म्हणून, पुरुषाने स्वतःला शून्य केले म्हणजे आपल्या दैवी सामर्थ्याचा त्याग करून स्वतःला सामान्य मनुष्यापुरते मर्यादित केले – ‘दहा बोटे’ असलेला.. अशाप्रकारे, जरी हा पुरुष दैवी होता तरीही, त्या सर्व गोष्टींबरोबरच, त्याने स्वतःला आपल्या अवतारात रिकामे केले.

वेद पुस्तकम् (बायबल), येशू सत्संगविषयी (नासरेथच्या येशूविषयी) बोलतांना अगदी हीच कल्पना व्यक्त करते. ते म्हणते :

…अशी जी चित्तवृत्ति ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायींहि असो :

तो, देवाच्या स्वरूपाचा असूनहि,

 6 देवाच्या बरोबरीचें असणें हा लाभ आहे असे

 त्याने मानिले नाही.

7 तर, त्याने स्वतःला रिक्त केले

 म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचें होऊन,

दासाचे स्वरूप धारण केले.

8 आणि मनुष्यप्रकृतीचे असे प्रगट होऊन त्यानें मरण,

आणि तेंहि वधस्तंभावरचे मरण सोशिले

 येथपर्यंत आज्ञापालन करून  –   

त्याने स्वतःला लीन केले!

फिलिप्पैकरांस पत्र 2:5-8

आपण पाहू शकता की वेद पुस्तकम् (बायबल) अगदी तोच विचार व्यक्त करते जसा मर्यादित मानव म्हणून देहधारण करणार्‍या पुरुषाचा – अनंत परमेश्वराचा परिचय घडवून देत असतांना पुरुषसुक्त व्यक्त करते. परंतु बायबलमधील हा परिच्छेद लगेच त्याच्या बलिदानाचे वर्णन करण्याकरिता पुढे सरकतो – जसे पुरुषसुक्तही करील. म्हणून मोक्षाची इच्छा बाळगणार्‍या

 कोणालाही ह्या देववचनांचा पुढे शोध घेणे उचित ठरेल, कारण, जसे उपनिषदात म्हटलेले आहे:

’सार्वकालिक जीवनात प्रवेश करण्याचा दुसरा कुठलाच मार्ग नाही (पुरुषावाचून) (नान्यःपंथविद्यते – अयानाय)

स्वेतस्वतारोपनिषद 3:8

आपण पुरुषसुक्ताचे 2 रे वचन येथे पुढे सुरू ठेवू या.