Skip to content

इस्रायलवरील न्यायासाठी चित्र काढण्यासाठी हिब्रू वेदांनी अंजीर वृक्षाचा उपयोग केला

वेली सुकून गेल्या आहेत,
    अंजिराचे झाड वठत आहे,
डाळींब, खजूर, सफस्चंद अशी
    सर्वच बागेतील झाड सुकत आहेत
आणि लोकांमधील आनंद लोपला आहे.

योएल 1:12

“उष्णता व रोग ह्यांनी मी तुमची पिके मारली. मी तुमच्या बागांचा व द्राक्षमळ्यांचा नाश केला. टोळांनी तुमची अंजिराची व जैतुनाची झाडे फस्त केली. पण तरीही तुम्ही मदतीसाठी माझ्याकडे आला नाहीत.” परमेश्वर ह्या गोष्टी बोलला.

आमोस 4:9

19 कोठारात अजून काही धान्य आहे का? नाही. केली, अंजीर, डाळिंबे, जैतुन ह्या झाडांकडे पाहा. त्यांना फळे धरत आहेत का? नाही. पण आजपासून मी तुम्हाला आशीर्वाद देईन.”

हाग्गय 2:19

आकाश कागदाच्या गुंडाळीप्रमाणे गुंडाळले जाईल. द्राक्षाच्यावेलीवर ची सुकलेलीपाने वा सुकलेलीअंजिरे अंजिराच्या झाडावरून गळून पडावीत त्या प्रमाणे तारे गळून पडतील. आकाशातील सर्व तारे वितळून जातील.

यशया 34:4

“मी त्यांची फळे व पिके काढून घेईन.
    मग तेथे सुगीचा हंगाम होणार नाही.”
    हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
“वेलींवर एकही द्राक्ष नसेल.
अंजिराच्या झाडांवर एकही अंजिर नसेल.
    एवढेच नाही तर झाडांची पानेही सुकतील व गळतील.
    मी त्यांना दिलेल्या गोष्टी काढून घेईन. [a]

यिर्मया 8:13