आम्ही पुरुषसूक्ताच्या पहिल्या श्लोकात पाहिले की पुरुष सर्वज्ञानी, सर्वसमर्थ आणि सर्वत्र उपस्थित असल्याचे वर्णन करण्यात आले आहे. त्यानंतर आम्ही हा प्रश्न मांडला की पुरूष येशूसत्संग (येशू ख्रिस्त) असू शकतो का आणि हा प्रश्न मनात ठेवून पुरुषसूक्ताद्वारे प्रवासास निघालो. तर आपण पुरुषसूक्ताच्या दुसर्या श्लोकात आलो आहोत ज्यात मनुष्य पुरुषाचे वर्णन अगदी विलक्षण शब्दांत केले आहे. येथे संस्कृत लिप्यंतरण आणि मराठी भाषांतर आहे (संस्कृत लिप्यंतरण जोसेफ पडिनजरेकर यांच्या क्राईस्ट इन द एन्शन्ट वेदाज (पृ. 346. 2007) या पुस्तकाच्या अभ्यासाद्वारे प्राप्त झाले आहे
पुरुषसुक्ताचा दुसरा श्लोक | |
संस्कृत लिप्यंतरण | मराठी भाषांतर |
पुरूष हे सर्व विश्व आहे, काय होते आणि काय होईल. आणि तो अमरत्वाचा स्वामी आहे, जे तो अन्नावाचून पुरवितो (नैसर्गिक पदार्थ) | पुरुषैएवेदं सर्व यद्भूतं यच्च भाव्यम् द्य उतामृतत्यस्येशानो यदन्नेनातिरोहति |
पुरुषाचे गुण
पुरुष ब्रम्हांडापेक्षा श्रेष्ठ आहे (अंतराळ आणि समस्त पदार्थमात्र) संपूर्ण मर्यादा) आणि काळाचा प्रभू आहे (‘जे होते आणि असेल’) तसेच ‘अमरत्वाचा प्रभू’ – सार्वकालिक जीवन आहे. हिंदू पौराणिक कथांमध्ये बर्याच देवता आहेत पण कोणालाही असे अनंत गुण दिलले नाहीत.
हे असे चित्तथरारक गुण आहेत की ते फक्त एका खर्या देवाचेच असू शकतात – स्वतः सृष्टीचा प्रभू. हा ऋग्वेदाचा प्रजापती (हिब्रू जुन्या करारातील याहवेचा समानार्थी) असेल. अशाप्रकारे ह्या मनुष्यास, पुरुषास, केवळ ह्या एकच देवाचा अवतार – सर्व सृष्टीचा प्रभू म्हणून समजू शकतो.
परंतु आमच्यासाठी यापेक्षाही उपयुक्त हे आहे की पुरुष आम्हास हे अमरत्व (सार्वकालिक जीवन) ‘देतो.’ अर्थात, तो नैसर्गिक पदार्थ वापरून असे करीत नाही. तो सार्वकालिक जीवन देण्यासाठी अथवा पुरविण्यासाठी विश्वातील नैसर्गिक प्रक्रिया किंवा नैसर्गिक पदार्थ/उर्जा यांचा उपयोग करीत नाही. आम्ही सर्व मृत्यू आणि कर्माच्या शापाखाली आहोत. ही आपल्या अस्तित्वाची निरर्थकता आहे ज्यापासून आपण सुटू इच्छितो आणि ज्यासाठी आपण पूजा, स्नान आणि इतर जप–तप करण्याचे कष्ट करतो. जरी ही लहानशी संधी असेल की हे सत्य आहे आणि हे की पुरुषाकडे अमरत्व देण्याचे सामर्थ्य आणि इच्छा दोन्ही आहेत तर त्याबद्दल कमीतकमी अधिक माहिती प्राप्त करून घेणे शहाणपणाचे ठरेल.
वेद पुस्तकम् (बायबल) च्या ऋषींच्या तुलनेत
हे लक्षात घेऊन आपण मानवी इतिहासातील सर्वात प्राचीन पवित्र लेखनांपैकी एकाचा विचार करू या. हे हिब्रू करारात सापडते (बायबलचा जुना करार किंवा वेद पुस्तकम्). हे पुस्तक, ऋग्वेदाप्रमाणेच, अनेक वेगवेगळ्या ऋषींची देववचने, स्तोत्रे, इतिहास आणि भविष्यवाण्या यांचा संग्रह आहे जे जरी फार पूर्वी जगत असले, तरीही ते इतिहासाच्या वेगवेगळ्या युगात जगले आणि त्या युगात लेखन केले. म्हणून जुन्या करारास वेगवेगळ्या ईश्वरप्रेरित लेखनांचा एका पुस्तकात संकलित केलेला संग्रह अथवा पुस्तकालय असे मानले जाते. या ऋषींची बहुतेक लिखाणे इब्री भाषेत होती आणि थोर ऋषी अब्राहाम जो ख्रि. पू. 2000 वर्षांपूर्वी जगला त्याचे वंशज असे आहेत. तथापि एक लिखाण आहे, ऋषी ईयोबाद्वारे लिहिलेले जो अब्राहामापूर्वी जगला. जेव्हा तो जगत होता तेव्हा हिब्रू राष्ट्र अद्याप अस्तित्वात नव्हते. ज्यांनी ईयोबाच्या पुस्तकाचा अभ्यास केला आहे त्यांच्या अंदाजानुसार तो सुमारे ख्रि. पू. 2200 वर्षांपूर्वी, 4000वर्षांपेक्षा अधिक समयापूर्वी जगला.
…ईयोबाच्या पुस्तकात
त्याच्या नावाप्रमाणे ईयोब म्हटलेल्या, आपल्या पवित्र पुस्तकात, आम्ही त्याला आपल्या सोबत्यांस असे म्हणतांना पाहतो:
मला तर ठाऊक आहे की माझा उद्धारक जिवंत आहे,
तो अंती पृथ्वीवर उभा राहील.
तो माझी त्वचा छिन्नभिन्न होऊन नष्ट झाली,
तरी मी देवाला देहविरहित पाहीन;
अन्याचे नव्हे तर माझेच नेत्र त्याला पाहतील.
माझा अंतरात्मा झुरत आहे.!
ईयोब 19:25-27
ईयोब येणार्या ‘उद्धारकाविषयी’ बोलतो. आम्हास माहीत आहे की ईयोब भविष्याकडे पाहतो कारण उद्धारक पृथ्वीवर उभा ‘राहील’ (अर्थात भविष्यकाळ). पण हा उद्धारक सांप्रतसमयी सुद्धा ‘जिवंत’ आहे – जरी पृथ्वीवर नसला तरीही. म्हणून हा उद्धारक, पुरुषसूक्ताच्या ह्या श्लोकातील पुरुषाप्रमाणे, काळाचा स्वामी आहे कारण त्याचे अस्तित्व आमच्यासमान काळाने बांधलेले नाही. नंतर ईयोब अशी घोषणा करतो की ”माझी त्वचा छिन्नभिन्न होऊन नष्ट झाली तरी“, (अर्थात त्याच्या मृत्यूनंतर) तो ‘त्यास’ (ह्या उद्धारकास) पाहील आणि त्याचवेळी ‘देवास पाहील.’ दुसर्या शब्दात हा येणारा उद्धारक देहधारी परमेश्वर आहे, जसा पुरुष प्रजापतीचा अवतार आहे. पण ईयोब त्याच्या स्वतःच्या मृत्यूनंतर त्याला कसा पाहू शकतो? आणि हे निश्चित करण्यासाठी की आम्ही हा मुद्दा चुकता कामा नये ईयोब की घोषणा करतो की ‘अन्याचे नव्हे तर माझेच नेत्र’ ह्या उद्धारकास पृथ्वीवर उभे राहतांना पाहतील.
याचे एकमेव स्पष्टीकरण हे आहे की ह्या उद्धारकाने ईयोबास अमरत्व दिले आहे आणि तो त्या दिवसाची वाट पाहत आहे जेव्हा हा उद्धारक, जो देव आहे, ह्या पृथ्वीवर चालेल आणि त्याने ईयोबास अमरत्व दिलेले असेल म्हणजे तो देखील पुन्हा पृथ्वीतलावर वावरू लागेल आणि आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी उद्धारकास पाहील. ह्या आशेने ईयोबास इतके आकर्षित केले की ह्या दिवसाच्या अपेक्षेने त्याचा ‘अंतरात्मा झुरत आहे’. एका मंत्राने त्याच्यात बदल घडवून आणला.
…आणि यशया
हिब्रू ऋषी सुद्धा येणार्या पुरुषाविषयी बोलले जे ह्या पुरुषाच्या आणि ईयोबाच्या उद्धारकाच्या वर्णनासारखे वाटते. यशया असाच एक ऋषी होता जो सुमारे ख्रि. पू. 750 मध्ये जगला. त्याने दैवी प्रेरणेने अनेक देववचने लिहिली. त्याने ह्या येणार्या पुरुषाविषयी कसे वर्णन केले ते येथे पाहा:
तथापि आता ज्या भूमीत विपत्ति आहे तेथे हा अंधकार राहणार नाही; त्याने मागील काळी जबुलून प्रांत व नफताली प्रांत यांची अप्रतिष्ठा केली तरी पुढील काळी समुद्रतीरींचा प्रदेश, यार्देनेच्या पलीकडील प्रांत, विदेशी लोकांचे मंडळ गालील यांची तो प्रतिष्ठा करील.
2 अंधकारात चालणार्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे; मृत्युच्छायेच्या प्रदेशात बसणार्यावर प्रकाश पडला आहे.
6 कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे. आम्हास पुत्र दिला आहे; त्याच्या खांद्यावर सत्ता राहील; त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपति म्हणतील.
यशया9:1-2,6
दुसर्या शब्दात ऋषी यशया एका पुत्राची पूर्वसूचना देतो आणि त्याची घोषणा करतो आणि या पुत्रास ‘समर्थ देव…म्हणतील.’ ही बातमी विशेषेकरून ‘मृत्युच्छायेच्या प्रदेशात बसणार्याना’ उपयुक्त ठरेल. याचा अर्थ काय आहे? आपण येणार्या मृत्यूपासून आणि आमच्यावर राज्य करीत असलेल्या कर्मापासून वाचू शकत नाही हे जाणून आपण आपले आयुष्य जगलो आहोत. म्हणून आपण अक्षरशः ‘मृत्यूच्या सावलीत’ जगतो. अशाप्रकारे हा येणारा पुत्र, ज्याला ‘समर्थ देव’ म्हटले जाईल, आपल्या आगामी मृत्यूच्या छायेत राहणार्या आपणास एक मोठा प्रकाश किंवा आशा असेल.
…आणि मीखा
दुसरा ऋषी मीखा, जो यशयाचा समकालीन होता (ख्रि. पू. 750) त्याला देखील या येणार्या व्यक्तीविषयी देववाणी प्राप्त झाली. त्याने लिहिले,
हे, बेथलेहेम एफ्राता,
यहूदाच्या हजारांमध्ये
तुझी गणना अल्प आहे,
तरी तुजमधून एक जण निघेल
तो मजसाठी इस्राएलाचा शास्ता होईल,
त्याचा उद्भव प्राचीन काळापासून,
अनादि काळापासून आहे.
मीखा5:2
मीखाने सांगितले की एक पुरुष एफ्राथाच्या प्रदेशातील बेथलेहेम नगरातून निघेल जेथे यहूदाचे कुळ (म्हणजे यहूदी) राहत असे. या मनुष्याबद्दल अगदी अनन्यसाधारण गोष्ट ही आहे की जरी तो इतिहासातील एका विशिष्ट काळात बेथलहेमाहून ”निघेल“, तरी काळाच्या सुरुवातीपासूनच तो या उत्पत्तीच्या पूर्वीपासून अस्तित्वात आहे. अशाप्रकारे, पुरुषसूक्ताच्या श्लोक 2 प्रमाणे, आणि ईयोबाच्या येणार्या उद्धारकाप्रमाणे, हा मनुष्य आपल्यासारखा काळाच्या बंधनात नसेल. तो काळाचा प्रभू असेल. ही एक दैवी क्षमता आहे, मानवी नाही, आणि म्हणूनच ते सर्व एकाच व्यक्तीचा उल्लेख करीत आहेत.
येशू सत्संगाठायी (येशू ख्रिस्त) पूर्ण झाले
पण ही व्यक्ती कोण आहे? येथे मीखा आम्हाला एक महत्त्वाचा ऐतिहासिक संकेत देतो. येणारी व्यक्ती बेथलहेमातून येणार. बेथलहेम हे एक वास्तविक शहर आहे जे हजारो वर्षे अस्तित्वात होते ज्यास आज इस्रायल/वेस्ट बँक म्हणून ओळखले जाते. आपण ते गुगल करू शकता आणि नकाशावर पाहू शकता. हे एक मोठे शहर नाही, आणि कधीही नव्हते. परंतु हे जगविख्यात आहे आणि जागतिक बातम्यांमध्ये दरवर्षी असते. का? कारण हे येशू ख्रिस्ताचे (किंवा येशू सत्संग) जन्मस्थान आहे. 2000 वर्षांपूर्वी त्याचा जन्म याच नगरात झाला. यशयाने आपल्याला आणखी एक सूचना दिली कारण तो म्हणाला की ही व्यक्ती गालीलवर प्रभाव पाडेल. आणि जरी येशूसत्संगाने (येशू ख्रिस्त) बेथलेहमात (जसे मीखाने आधीच सांगितले होते) जन्म घेतला असला, तरी यशयाने भाकीत केल्याप्रमाणे, तो गालीलात मोठा झाला व शिक्षक म्हणून येथे त्याने सेवा केली. येशूचे जन्मस्थान म्हणून बेथलेहेम आणि त्याचे सेवास्थान म्हणून गालील ही येशसत्संग (येशू ख्रिस्त) याच्या जीवनातील दोन सर्वात प्रसिद्ध पैलू आहेत. अशाप्रकारे येथे आपण येशू ख्रिस्ताठायी (येशूसत्संग) वेगवेगळ्या ऋषींच्या भविष्यवाण्या पूर्ण झाल्याचे पाहतो. येशू हा पुरुष/तारणारा/राजा असू शकतो का ज्याविषयी ह्या प्राचीन ऋषींनी भविष्यवाणी केली? हे लक्षात घेता की या प्रश्नाचे उत्तर देणे ही एक महत्त्वाची किल्ली असू शकते जी हे प्रकट करू शकते की ‘मृत्यूच्या सावलीत’ (आणि कर्माच्या) जगत असलेल्या आपणास ‘अमरत्व’ कशाप्रकारे दिले जाईल याचा विचार करणे योग्य ठरेल. म्हणून आपण पुरूषसूक्ताच्या माध्यमातून पुढे जात असताना त्याची तुलना हिब्रू पुस्तकमच्या ऋषींशी करू या.