कैलाश (अथवा कैलासा) पर्वत चीनच्या तिबेट क्षेत्रात भारताच्या सीमेच्या अगदी पलीकडे आहे. हिंदू, बौद्ध आणि जैन कैलाश पर्वतास पवित्र मानतात. हिंदूंसाठी कैलास पर्वत हा भगवान शिव (किंवा महादेव) याचे निवासस्थान आहे, त्याच्या पत्नीसोबत, पार्वती देवी (उमा, गौरी असेही म्हणतात) आणि त्यांचा पुत्र गणेश (गणपती किंवा विनायक) यांच्यासोबत. हजारो हिंदू आणि जैन कैलास पर्वतावर पवित्र विधी म्हणून त्याची परिक्रमा करण्यासाठी आणि त्याद्वारे आशीर्वाद प्राप्तीसाठी तीर्थयात्रा करतात.
कैलाश ते ठिकाण आहे जेव्हा पार्वती स्नान करीत असतांना तिला पाहण्यापासून गणेशाने शिवास थांबविले तेव्हा जेथे भगवान शिवने गणेशाचे डोके कापून त्याचा बध केला. अशाप्रकारे ही सुप्रसिद्ध गाथा सुरू राहते की जेव्हा गणेशाच्या धडावर हत्तीचे डोके लावण्यात आले तेव्हा तो मरणातून जिवंत झाला आणि शिवकडे परतला. आपले डोके गणेशाला देण्यासाठी बलिदान केल्यामुळे हत्तीला मरण आले म्हणूनच भगवान शिवला त्याचा पुत्र मरणातून परत मिळाला. हे बलिदान र्कलाश पर्वतावर घडून आले, आणि त्यामुळे हा पर्वत पवित्र झाला आहे आजही आहे. काही लोक असाही विचार करतात की कैलास पर्वत हा मेरू पर्वताचे भौतिक प्रकटीकरण आहे -विश्वाचे आध्यात्मिक व लौकिक केंद्र आहे. मेरू पर्वत ते कैलास पर्वत या अध्यात्म केन्द्राचे प्रतिनिधित्व करणारी चिन्हे म्हणून बरीच मंदिरे सममध्य क्षेत्रात उभारण्यात आली आहेत.
डोंगरावरील बलिदानाद्वारे मुलास मरणातून पुन्हा प्राप्त करण्याच्या या प्रकटीकरणाचा नमूना दुसऱ्या डोंगरावर – मोरीया पवर्तावर – श्री अब्राहामाने सुद्धा आपल्या पुत्राच्या बाबतीत अनुभव केला. हे बलिदान एक चिन्ह देखील होते जे येशूसत्संग – येशूच्या येणाऱ्या देहधारणाकडे एक गंभीर लौकिक वास्तविकता म्हणून इशारा करते. हिंब्रू वेद 4000 वर्षांपूर्वीच्या श्री अब्राहामाच्या अनुभवांचे आमच्यासाठी वर्णन करणे सुरू ठेवतो आणि त्याचे महत्व विशद करतो. त्यात हे घोषित केले आहे की हे चिन्ह समजून घेतल्यामुळे केवळ इब्री लोकच नव्हे तर ‘सर्व राष्ट्रांना’ आशीर्वाद मिळेल. म्हणून ही गोष्ट जाणून घेणे आणि तिचे महत्त्व समजून घेणे योग्य ठरते.
श्री अब्राहामाच्या बलिदानाचे पर्वत चिन्ह
आपण पाहिले की कशाप्रकारे, फार पूर्वी, अब्राहामास राष्ट्रांचे अभिवचन देण्यात आले होते. यहूदी व अरब लोक आज अब्राहामापासून आलेले आहेत, त्यामुळे आम्ही हे जाणतो की हे वचन खरे ठरले आहे आणि तो इतिहासात महत्वाची भूमिका बजावत आहे. कारण अब्राहमाला असा विश्वास होता की त्याला नीतिमत्त्व देण्यात आले आहे – कठोर पूण्यकर्माद्वारे त्याने मोक्ष प्राप्त केला नाही तर ते त्याला विनामूल्य भेट म्हणून प्राप्त झाले.
काही काळानंतर, ज्याची अनेक वर्षांपासून प्रतीक्षा होती तो पुत्र, इसहाक अब्राहामास प्राप्त झाला (ज्यास यहूदी लोक आज आपला पूर्वज मानतात). इसहाक तरूण झाला. पण मग देवाने अत्यंत नाट्यपूर्णरित्या त्याची परीक्षा घेतली. आपण येथे पूर्ण वर्णन वाचू शकता आणि आपण या रहस्यमय परीक्षेच्या अर्थाचा उलगडा करण्यासाठी मुख्य तपशीलाची उजळणी करू – हे समजून घेण्यासाठी की नीतिमत्वास कशी प्राप्त होतो.
अब्राहामाची परीक्षा
एका गंभीर आज्ञेद्वारे या परीक्षेची सुरूवात झाली :
2 देव म्हणाला, “तुझा एकुलता एक प्रिय पुत्र इसहाक याला घेऊन तू मोरिया देशात जा आणि तेथे, मी सांगेन त्या डोंगरावर माझ्यासाठी त्याचे होमार्पण कर.”
उत्पत्ती 22:2
त्या आज्ञेचे पालन करण्यासाठी, अब्राहाम ‘मोठ्या पहाटेस उठला’ आणि ‘तिसरे दिवशी’ ते पर्वतावर जाऊन पोहोचले. मग
9 व देवाने सांगिलेल्या ठिकाणी ते जाऊन पोहोंचले, तेथे अब्राहामाने एक वेदी बांधली, त्याने वेदीवर लाकडे रचली; नंतर त्याने आपला पुत्र इसहाक याला बांधून वेदीवरील लाकडावर ठेवले;
उत्पत्ती 22:9-10
10 मग अब्राहामाने आपल्या मुलाचा बळी देण्यासाठी हातातील सुरा उंचावला.
अब्राहाम देवाच्या आज्ञेचे पालन करावयास तत्पर झाला. मग काहीतरी असामान्य असे घडले :
11 परंतु तेवढ्यात, त्याच क्षणाला परमेश्वराच्या दूताने त्याला थांबवले; तो स्वर्गातून ओरडून त्याला म्हणाला,“अब्राहामा! अब्राहामा!”अब्राहामाने उत्तर दिले, “मी येथे आहे.”
उत्पत्ती 22:11-13
12 देवदूत म्हणाला, “तू आपल्या मुलाला मारु नकोस, किंवा त्याला कोणत्याही प्रकारची इजा करु नकोस; कारण आता मला खात्रीने समजले की तू देवाला घाबरतोस आणि त्याचा आदर करतोस; कारण तू माझ्यासाठी आपल्या एकुलत्या एका लाडक्या पुत्रालाही, अर्पण करावयास मागेपुढे न पाहता तयार झालास.”
13 आणि मग अब्राहामाने वर दृष्टि करुन सभोंवार पाहिले तेव्हा त्याला एका झुडपात शिंगे अडकलेला एक एडका दिसला; मग त्याने
अगदी शेवटच्या क्षणी इसहाकास मरणापासून वाचविण्यात आले आणि अब्राहामाने एक एडका पाहिला व त्याऐवजी त्यास अर्पण केले. देवाने एडका पुरविला व एडक्याने इसहाकाची जागा घेतली.
भविष्याकडे पाहणारे : बलिदान
अब्राहामाने मग त्या जागेस नाव दिले. त्याने त्याला काय नाव दिले ते पहा.
आणि अब्राहामाने त्या ठिकाणाचे नाव ‘परमेश्वर पाहून घेईल’ असे ठेविले. त्यावरून “परमेश्वराच्या गिरीवर पाहून देण्यात येईल” असे आजवर बोलतात.
उत्पत्ती 22:14
अब्राहामाने त्याचे नाव ‘परमेश्वर पाहून घेईल’ असे ठेविले. येथे एक प्रश्न आहे. हे नाव भूतकाळात आहे, की वर्तमान काळात आहे की भविष्यकाळात आहे? हे स्पष्टपणे भविष्यकाळात आहे. सर्व शंका दूर करण्यासाठी नंतरचे टिपणे त्याची पुनरावृत्ती करते “…पाहून देण्यात येईल.” हे सुद्धा भविष्यकाळात आहे – अशाप्रकारे भविष्याकडे पाहते. पण हे नाव ठेवणे इसहाकाच्या जागी एडक्याच्या (मेंढा) बलिदानानंतर घडून आले. अनेक लोक असा विचार करतात की, अब्राहामाने जेव्हा त्या ठिकाणाचे नाव ठेविले, तेव्हा तो झुडपात अडकलेल्या एडक्याचा उल्लेख करीत होता आणि त्याने त्यास आपल्या पुत्राऐवजी अर्पण केले.
पण यावेळी त्याला आधीच अर्पण व होम करण्यात आले होते. जर अब्राहाम एडक्याविषयी विचार करीत असता – जो आधीच मेलेला, अर्पण केलेला व होम केलेला होता – तर त्याने त्या ठिकाणाचे नाव ‘देवाने दिले आहे’ असे ठेविले असते; अर्थात भूतकाळात. आणि पुढील टिपणात लिहिलेले असते “परमेश्वराच्या गिरीवर पाहून देण्यात आले होते”. पण अब्राहामाने स्पष्टपणे त्याचे नाव भविष्यकाळात ठेविले आणि म्हणून तो आधीच मेलेल्या व अर्पण करण्यात आलेल्या एडक्याचा विचार करीत नव्हता. त्याला वेगळेच प्रकटीकरण लाभले होते. त्याला भविष्याविषयी अंतर्दृष्टी प्राप्त झाली होती. पण काय?
जेथे बलिदान झाले
लक्षात ठेवा की या बलिदानासाठी अब्राहम ज्या डोंगरावर गेला होता तो होता :
देव म्हणाला, “तुझा पुत्र, तुझा एकुलता एक, प्रिय, इसहाक, यास घेऊन मोरिया देशात जा”
वचन 2
‘मोरिया’ मध्ये हे घडले. ते कोठे आहे? जरी हा अब्राहमच्या दिवसात (ख्रि. पू.. 2000) हे जंगल होते, तरी एक हजार वर्षांनंतर (ख्रि. पू. 1000) राजा दाविदाने तेथे यरूशलेम नगर स्थापित केले आणि त्याचा पुत्र शलमोनाने तेथे पहिले मंदिर बांधले. आम्ही जुन्या कराराच्या ऐतिहासिक पुस्तकांमध्ये नंतर वाचतो की
शल्मो इच्छा यरु सान्माता मोरिया पर्वतावार नमस्कार मंदिर बांधायला. पृथ्वीवरील देवाचा पिता राहिला
2 इतिहास 3:1
दृसर्या शब्दांत, अब्राहामाच्या प्रारंभिक जुन्या कराराच्या काळात ‘मोरिया पर्वत’ जंगलातील वेगळे पर्वत शिखर होते पण 1000 वर्षानंतर दाविदाद्वारे आणि शलमोनाद्वारे ते इस्राएलचे मुख्य नगर बनले जेथे त्यांनी उत्पन्नकर्त्यासाठी मंदिर बांधले. आजच्या दिवसापर्यंत ते यहूदी लोकांचे पवित्र स्थान आणि इस्राएलची राजधानी आहे.
येशू – येशू सत्संग – आणि अब्राहामाचे
आता नव्या करारातील येशूच्या पदव्यांविषयी विचार करा. येशूच्या नावाशी अनेक पदव्या जुळलेल्या होत्या. कदाचित सर्वात प्रसिद्ध आहे ‘ख्रिस्त’. पण त्याला दुसरी पदवी देण्यात आली होती जी महत्वपूर्ण आहे. आपण हे योहानकृत शुभवर्तमानात पाहतो जेव्हा बापतिस्मा करणारा योहान त्याच्याविषयी म्हणतो:
29 दुसऱ्या दिवशी योहानाने येशूला आपणांकडे येताना पाहिले. योहान म्हणाला, “पाहा, हा देवाचा कोकरा. जगाचे पाप वाहून नेणारा.
योहान 1:29 30
30 याच्याविषयी मी बोलत होतो. मी म्हणालो, ‘माझ्यानंतर एक मनुष्य येणार आहे. परंतु तो माझ्याहून थोर आहे. तो माझ्या अगोदरपासून आहे. तो सदाजीवी आहे.’
दुसऱ्या शब्दात, येशूला देखील ‘देवाचा कोंकरा’ म्हणून ओळखले जात असे. आता येशूच्या जीवनाच्या शेवटावर विचार करा. त्याला कोठे अटक करण्यात आली व वधस्तंभावर खिळण्यात आले? यरूशलेमेत (ज्यास आम्ही = ‘मोरिया पर्वताच्या’ रूपात पाहिले). हे अत्यंत स्पष्ट शब्दांत सांगण्यात आले आहे की त्याला अटक झाली असतांना :
7 जेव्हा त्याला समजले की, येशू हेरोदाच्या अंमलाखाली येतो. तेव्हा त्याने त्याला हेरोदाकडे पाठविले. तो त्या दिवसांत यरुशलेमामध्येच होता.
लूक 23:7
येशूची अटक, खटला आणि त्यास वधस्तंभी खिळणे हे सर्व यरूशलेमात घडले (= मोरिया पर्वत). समयरेखा मोरिया पर्वतावर घडलेल्या घटना दाखविते.
जुन्या करारातून नव्या करारापर्यंत मोरिया पर्वतावर घडलेल्या मुख्य घटना
आता परत अब्राहामाचा विचार करा. त्याने त्या ठिकाणाचे नाव भविष्यकाळात का दिले ”परमेश्वर पाहून घेईल“? त्याला हे कसे माहीत होते की त्याच्या भविष्यात काहीतरी ‘पुरविले’ जाईल जे इतक्या निश्चितपणे त्याने मोरिया पर्वतावर मांडलेल्या नाट्याचे नक्की प्रतिबिंब ठरेल? त्याचा विचार करा – त्याच्या परीक्षेत अगदी शेवटच्या क्षणी इसहाक (त्याचा पुत्र) वाचला कारण त्याच्या जागी कोंकराचे अर्पण करण्यात आले. दोन हजार वर्षांनतर, येशूला ‘देवाचा कोंकरा’ म्हटले जाते आणि त्याच ठिकाणी त्याला अर्पण केले जाते! हे ते ‘ठिकाण’ असेल हे अब्राहामास कसे माहीत होते? जर त्याला प्रजापतीकडून, स्वतः उत्पन्नकत्र्या परमेश्वराकडून प्रकाशन अथवा ज्ञानप्राप्ती झाली असेल, तरच त्याला हे जाणता आले असेल आणि असे उल्लेखनीय काही भाकित करता आले असेल.
दैवीय बुद्धी प्रकट झाली
जणूकाही एक बुद्धी आहे जिच्याद्वारे या दोन घटना स्थानपरत्वे देखील जोडण्यात आल्या ज्या 2000 वर्षांच्या इतिहासाद्वारे वेगळ्या करण्यात आल्या होत्या.
अब्राहामाचे बलिदान किंवा अर्पण एक चिन्ह होते – जे पुढे 2000 वर्षांकडे इशारा करीत होते – आम्हास येशूच्या बलिदानाविषयी विचार करावयास भाग पाडावे.
ही आकृती दाखविते की कशाप्रकारे प्रारंभीच्या घटना (अब्राहामाचे बलिदान) नंतरच्या बलिदानाचा उल्लेख करते (येशूच्या बलिदानाचा) आणि आम्हास या नंतरच्या घटनेचे स्मरण करून देण्यासाठी त्याची मांडणी करण्यात आली. हा या गोष्टीचा पुरावा आहे की ही बुद्धी (उत्पन्नकर्ता परमेश्वर) हजारो वर्षांनी एकमेकांपासून पृथक अशा घटनांच्या समन्वयाद्वारे स्वतःस आम्हावर प्रकट करीत आहे. हे या गोष्टीचे चिन्ह आहे की देव अब्राहामाद्वारे बोलला.
आपणासाठी व माझ्यासाठी सुवार्ता
हा वृत्तांत आणखी वैयक्तिक कारणामुळे आपणासाठी देखील महत्वाचा आहे. शेवटी, देवाने अब्राहामास सांगितले्र की,
“…तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तृझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील”
उत्पत्ती 22:18
आपण ‘पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपैकी’ एकामधून आहात – आपली भाषा, धर्म, शिक्षण, वय, लिंग, अथवा संपत्ती काहीही का असेना! तर हे अभिवचन जे विशिष्टरित्या आपणासाठी दिलेले आहे. लक्ष द्या अभिवचन काय आहे – स्वतः देवाकडून ‘आशीर्वाद’! हा केवळ यहूद्यांसाठी नव्हता, परंतु संपूर्ण जगातील लोकांसाठी होता.
हा ‘आशीर्वाद’ कसा दिला जातो? येथे दिलेला ‘संतति’ हा शब्द एकवचनी आहे. हा अनेक वंश अथवा राष्ट्रांप्रमाणे ‘संतति’ नाही, पण एकवचनी शब्द आहे जसा ‘तो’. हा अनेक लोकांद्वारे अथवा लोकसमूहांद्वारे नाही जसा ‘ते’. इतिहासाच्या आरंभी दिलेल्या अभिवचनाच्या हे अगदी नंतर येते जेव्हा ‘तो’ सापाचे ‘डोके फोडील’ जसे हिब्रू वेदांत सांगितले आहे तसेच पुरुषसूक्तात दिलेल्या पुरुषाच्या बलिदानाच्या अभिवचनास समांतर आहे (‘तो’). या चिन्हासोबत अगदी तेच स्थान – मोरिया पर्वताचे (= यरूशलेम) – भाकित करण्यात आले आहे ज्यात ह्या प्राचीन अभिवचनात आणखी तपशील दिलेला आहे. अब्राहामाच्या अर्पणाच्या अथवा बलिदानाच्या नाट्याद्वारे आम्हास हे समजण्यास मदत मिळते की हा आशीर्वाद कसा दिला गेला, आणि नीतिमत्वाची किंमत कशी चुकविली जाईल.
हा आशीर्वाद कसा प्राप्त करता येतो?
ज्याप्रमाणे इसहाकाच्या जागी आपल्या प्राणाचे बलिदान करण्याद्वारे कोंकराने इसहाकास मृत्यूपासून वाचविले, त्याचप्रमाणे देवाचा कोंकरा, आपल्या बलिदानात्मक मृत्यूने, आम्हास पापाच्या सामथ्र्यापासून व भुर्दंडापासून वाचवितो. बायबल घोषणा करते की
…पापाचे वेतन मरण आहे
मकरांस पत्र 6:23
हे असे म्हणण्याची दुसरी पद्धत आहे की आपण करीत असलेली पापे कर्मास जन्म देतात ज्याचा परिणाम मृत्यूमध्ये होतो. पण मृत्यूचा भुर्दंड इसहाकाच्या जागी कोंकराने चुकविला. अब्राहाम आणि इसहाक यांस त्याचा केवळ स्वीकार करावा लागला. तो त्यास पात्र नव्हता आणि ती पात्रता मिळवूही शकत नव्हता. पण भेट म्हणून तो त्याचा स्वीकार करू शकत होता. त्याने मोक्ष अशाच प्रकारे मिळविला.
हा असा नमुना दर्शवितो ज्याचे आपण अनुसरण करू शकता. येशू हा ‘जगाचे पाप वाहून घेणारा देवाचा कोकरा’ होता. यात आपल्या स्वतःच्या पापाचा समावेश आहे. म्हणून कोकरू, येशू, आपले पाप वाहून देतो कारण किंमत त्याने चुकविली आहे. आपण यास पात्र नाही परंतु आपण ते भेट म्हणून प्राप्त करू शकता. येशूचा धावा करा, पुरुषाचा धावा करा आणि त्याला विनंती करा की त्याने आपली पापे दूर करावी. त्याचे बलिदान त्याला ते सामर्थ्य देते. आम्हास हे माहीत आहे कारण मोरिया पर्वतावर अब्राहामाच्या पुत्राच्या बलिदानाच्या अद्भुत वर्णनात त्याची पूर्वछाया आहे, तेच ठिकाण जेथे 2000 वर्षांनंतर येशूद्वारे त्याची ‘तरतूद करण्यात आली’.
त्यानंतर वल्हांडणाच्या सणाच्या चिन्हामध्ये हे केव्हा होईल याचे भाकित करण्यात येते.