भारतात यहूदी लोकांचा दीर्घकालीन इतिहास आहे, येथे हजारों वर्षे राहून, त्यांनी भारतीय समाजजीवनाच्या संकीर्ण रचनेत एक लहानसा समाज स्थापन केला. इतर अल्पसंख्यकांपेक्षा भिन्न (जसे जैन्, शीख, बौद्ध), आपले निवासस्थान बनविण्यासाठी भारताबाहेरून आले. 2017च्या उन्हाळ्यात भारताचे पंतप्रधान मोदी यांनी इस्राएलास भेट देण्यापूर्वी त्यांनी इस्राएलचे पंतप्रधान, नेतनयाहूसोबत एक सहसंपादकीय लिहिले. आपल्या लिखाणात त्यांनी भारतात यहूद्यांच्या या स्थलांतराविषयी लिहिले :
भारतात यहूदी समाजाचे नेहमीच स्नेहपूर्ण व आदराने स्वागत करण्यात आले आणि त्यांना कधीही छळास तोंड द्यावे लागले नाही.
खरे म्हणजे, भारताच्या इतिहासावर यहूद्यांचा एक गंभीर प्रभाव पडला आहे, त्यांनी भारतीय इतिहासाच्या हट्टी रहस्याचे समाधान केले आहे – भारतात लेखनाचा उदय कसा झाला? या प्रश्नाचे उत्तर भारतीय संस्कृतीच्या सर्व उत्कृष्ट साहित्यावर छाप बसविते.
भारतातील यहूदी इतिहास
यहूदी समुदाय भारतात केव्हापासून आहेत? टाईम्स ऑफ इस्राएलने अलीकडे प्रकाशित एका लेखात या गोष्टीवर जोर दिला की ‘27 शतकांनंतर मनश्शेचा वंश (बेने मनश्शे) मिझोराममधून इस्राएलास परतत आहे. याचा अर्थ त्यांचे पूर्वज मूलतः येथे ख्रि.पू. 700च्या सुमारास आले. आंध्र प्रदेशात राहणारे एफ्राईम वंशातील (बेने एफ्राईम) तेलुगू भाषा बोलणाऱ्या त्यांच्या चुलत बंधूजनांस सामुहिक स्मरण आहे की पर्शिया, अफगानस्थान, तिब्बेट, आणि मग चीनमधून भ्रमण केल्यानंतर, ते 1000 वर्षांपेक्षा अधिक काळपर्यंत भारतात राहिले आहेत. केरळमधील, कोचीन येथील यहूदी तेथे जवळजवळ 2600 वर्षांपासून आहेत. मागील शतकांत यहूदी लोकांनी भारतात लहान परंतु विशिष्ट समुदायांची स्थापना केली. पण आता ते इस्राएल जाण्यासाठी भारत सोडून जात आहेत.
यहूदी लोक भारतात येऊन कसे राहू लागले? इतक्या वर्षांनंतर ते इस्राएलास का परत जात आहेत? दुसऱ्या कुठल्याही राष्ट्राच्या तुलनेत आम्हास त्यांच्या इतिहासाची अधिक तथ्ये माहीत आहेत. समयरेखेचा उपयोग करून त्यांच्या इतिहासाचा सारांश मांडण्यासाठी आपण या माहितीचा उपयोग करू.
अब्राहाम : यहूदी कुटूंबाची सुरूवात होते
समयरेखेची सुरूवात अब्राहामाने होते. त्याला राष्ट्रांचे अभिवचन देण्यात आले होते आणि परमेश्वराशी त्याची भेट घडून आली ज्याचा शेवट त्याचा पुत्र इसहाक याच्या प्रतीकात्मक बलिदानाने झाला. त्याच्या बलिदानाचे भविष्यातील स्थान चिन्हित करून हे चिन्ह येशूकडे (येशूसत्संग) अंगुलीनिर्देश करीत होते. इसहाकाच्या पुत्रास परमेश्वराने इस्राएल हे नाव दिले. ही समयरेखा हिरव्या रंगात पुढे वाढते जेव्हा इस्राएलचे वंशज मिसर देशात गुलाम होते. ह्या समयाची सुरूवात त्यावेळी झाली जेव्हा इस्राएलाचा पुत्र, योसेफाने (वंशावळी अशी होती : अब्राहाम -> इसहाक -> इस्राएल (ज्यास याकोबही म्हटले जाते) -> योसेफ), इस्राएली लोकांस मिसर देशात आणले, जेथे नंतर त्यांस गुलाम बनविण्यात आले.
मोशे : देवाच्या मार्गदर्शनाखाली इस्राएल राष्ट्र बनते
मोशेने, वल्हांडणाच्या वेळी आलेल्या पीडेने इस्राएलास मिसर देशाबाहेर नेण्यात नेतृत्व केले, ह्या पीडेने मिसर देशाचा नाश केला आणि इस्राएली लोकांस मिसर देशातून बंधमुक्त करून इस्राएल देशात आणले. त्याच्या मृत्यूपूर्वी, मोशेने इस्राएली लोकांसमोर आशीर्वाद व शाप यांची घोषणा केली (जेव्हा समयरेखा हिरव्या रंगापासून पिवळ्या रंगाकडे जाते). जर त्यांनी देवाच्या आज्ञेचे पालन केले असते तर त्यांना आशीर्वाद प्राप्त झाला असता, पण जर आज्ञापालन केले नाही तर ते शापित ठरले असते. तेव्हापासून इस्राएलचा इतिहास ह्या आशीर्वाद आणि शापाशी जुळलेला होता.
दावीद यरूशलेमात आपले राजघराणे स्थापन करतो
दाविदाने यरूशलेम जिंकून घेतला आणि त्यास आपले राजधानीचे नगर बनविले. त्याला येणाऱ्या ‘ख्रिस्ताचे’ अभिवचन प्राप्त झाले आणि त्यावेळेपासून यहूदी लोक येणाऱ्या ‘खिस्ताची’ प्रतीक्षा करू लागले. त्याचा श्रीमंत आणि सुप्रसिद्ध, पुत्र शलमोन, त्याच्या जागी राजा झाला आणि त्याने यरूशलेमात मोरिया पर्वतावर पहिले यहूदी मंदिर बनविले. राजा दाविदाचे वंशज सुमारे 400 वर्षांपर्यंत राज्य करीत राहिले आणि हा काळ फिकट निळया रंगात दाखविलेला आहे (ख्रि.पू. 1000-600). हा इस्राएलच्या वैभवाचा काळ होता – त्यांनी अभिवचनांनुसार आशीर्वाद प्राप्त केला. ते एक सामर्थी राष्ट्र होते, त्यांचा समाज प्रगत होता, त्यांची समृद्ध संस्कृती, आणि त्यांचे मंदिरही होते. पण जुना करार ह्या काळात त्यांच्या वाढत्या भ्रष्टाचाराचे देखील वर्णन करतो. या काळात अनेक ऋषींनी इस्राएली लोकांस सावध केले की जर त्यांच्यात बदल झाला नाही तर मोशेचे शाप त्यांच्यावर येऊन पडतील. ह्या ताकिदींकडे त्यांनी दुर्लक्ष केले. या काळात इस्राएलची दोन राज्यांत फूट पडली : इस्राएलचे किंवा एफ्राईमाचे उत्तरेकडील राज्य, आणि यहूदाचे दक्षिण राज्य (आजच्या कोरियनप्रमाणे, एका देशचे लोक दोन देशांत विभाजित – उत्तर आणि दक्षिण कोरिया).
पहिला यहूदी बंदिवास : अश्शूर आणि बेबिलोन
शेवटी, दोन अवस्थांत शाप त्यांच्यावर आला. ख्रि.पू. 722मध्ये अश्शूरी लोकांनी उत्तरी राज्याचा पाडाव केला आणि इस्राएली लोकांस त्यांच्या विशाल साम्राज्याबाहेर हद्द पारपार केले. मिजोराममधील बेने मनश्शे आणि आंध्र प्रदेशातील बेने एफ्राईन या हद्दपार केलेल्या इस्राएली लोकांचे वंशज आहेत. त्यानंतर ख्रि.पू. 586 मध्ये नबूकद्नेस्सर, बेबिलोनचा शक्तिशाली राजा आला – आपल्या शापवाणीत 900 वर्षांपूर्वी मोशेने भाकित केल्याप्रमाणे:
49 “दूरच्या राष्ट्रातील शत्रूला परमेश्वर तुमच्यावर पाठवील. त्यांची भाषा तुम्हाला समजणार नाही. गरुडांसारखे ते झेपावत येतील. 50 ते क्रूर असतील. वृद्धांचा ते मान राखणार नाहीत. लहानांना दया दाखवणार नाहीत. 51 तुमची जनावरे आणि तुम्ही काढलेले पीक ते नेतील. तुम्ही नष्ट होईपर्यंत ते तुमची लूट करतील. धान्य, द्राक्षारस, तेल, गुरेढोरे, शेळ्यामेंढ्या काही म्हणता काही तुम्हाला उरणार नाही. 52 “ते राष्ट्र तुमच्या नगरांना वेढा घालून हल्ला करील. आपल्या नगराभोवती असणारी उंच आणि भक्कम तटबंदी आपले रक्षण करील असे तुम्हाला वाटेल. पण ती तटबंदी कोसळून पडेल. तुमचा देव परमेश्वर तुम्हांला देणार असलेल्या प्रदेशातील तुमच्या सर्व नगरांना शत्रू वेढा घालेल.
अनुवाद 28:49-52
नबूकद्नेस्सराने यरूशलेम जिंकून घेतले, त्याला आग लावली, आणि मोशेने बांधलेल्या मंदिराचा नाश केला. नंतर त्याने इस्राएली लोकांस बेबिलोन येथे बंदिवासात नेले.
याद्वारे मोशेचे भाकित पूर्ण झाले की
63 “तुमची भरभराट करायला आणि तुमची संख्या वाढवायला जसा त्याला आनंद वाटत होता तसाच आनंद त्याला तुमचा नाश करायला आणि तुम्हांला रसातळाला न्यायला वाटेल. तुम्ही जो देश काबीज करायला जात आहात तेथून तुम्हाला हुसकावून लावले जाईल. 64 परमेश्वर तुम्हाला पृथ्वीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत सर्व लोकांमध्ये विखरुन टाकील. तेथे तुम्ही काष्ठपाषाणाच्या मूर्तीची उपासना कराल. तुम्हाला आणि तुमच्या पूर्वजांना माहीत नसलेल्या खोट्यानाट्या देवांची उपासना कराल.
अनुवाद 28:63-64
केरळमधील कोचीन येथील यहूदी ह्या बंदिवासातील इस्राएली लोकांचे वंशज आहेत. 70 वर्षे, लाल रंगाने दाखविलेला कालावधी, या इस्राएली लोकांस (अथवा यहूदी जसे त्यांस आज म्हटले जाते) अब्राहामास व त्याच्या वंशजांस अभिवचन म्हणून देण्यात आलेल्या देशाबाहेर हद्दपार करण्यात आले होते.
भारतीय समाजात यहूद्यांचा वाटा
आपण लेखनाचा प्रश्न घेतला ज्याच्या उदय भारतात झाला. भारताच्या आधुनिक भाषा ज्यात हिन्दी, बंगाली, मराठी, गुजराथी, तेलूगू, कन्नड, मलयालम आणि तमिळ तसेच प्राचीन संस्कृत ज्यात ऋग्वेदाचे तसेच इतर उत्कृष्ट साहित्याचे लेखन करण्यात आले होते त्यांस ब्राम्ही लिपी ब्राम्ही लिपी म्हणून वर्गीकरण करण्यात येते कारण त्या सर्वांची व्युत्पत्ती ब्राम्ही लिपी म्हटलेल्या मूळ लिपीपासून होते. आज ब्राम्ही लिपी फक्त अशोक सम्राटाच्या काळातील काही थोडक्या प्राचीन स्मारकांत दिसते.
ब्राम्ही लिपी आधुनिक लिपींमध्ये कशी बदलून गेली हे जरी समजले असले तरीही, हे स्पष्ट नाही की भारताने प्रथम ब्राम्ही लिपीचा स्वीकार कसा केला. विद्वानांचे हे म्हणणे आहे की ब्राम्ही लिपीचा संबंध हिब्रू-फिनिशियन लिपीशी आहे, भारतातील बंदिवासाच्या आणि स्थलांतराच्या काळात इस्राएलचे यहूदी लोक याच लिपीचा उपयोग करीत असत. इतिहासकार अविगडोर सचन (1)असे सूचवितात की जे इस्राएली भारतात स्थिर झाले ते आपल्यासोबत हिब्रू-फिनिशियन घेऊन आले. याद्वारे या रहस्याचे देखील समाधान होते की ब्राम्ही लिपीस तिचे नाव कसे प्राप्त झाले. हा केवळ योगायोग आहे का की ब्राम्ही लिपी फक्त उत्तर भारतात त्याचवेळी प्रकट होते जेव्हा यहूदी त्यांच्या पूर्वजांच्या देशातून, अब्राहामाच्या देशातून हद्दपार केले जाऊन तेथे स्थायी झाले? अब्राहामाच्या वंशजांच्या लिपीचा ज्या स्थानिक लोकांनी स्वीकार केला त्यांनी त्यास (अ) ब्राम्हण लिपी हे नाव दिले. अब्राहामाचा धर्म एका देवाठायी विश्वास होता ज्याची भूमिका मर्यादित नाही. तो प्रथम, अंतिम, आणि सनातन आहे. याच ठिकाणी कदाचित ब्रम्हावरील विश्वासाची देखील सुरूवात झाली, (अ) अब्राहामाच्या लोकांच्या धर्मावरून. यहूदी लोकांनी, आपली लिपी व धर्म भारतात आणून, भारतास जिंकण्याचा आणि तिच्यावर राज्य करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक आक्रमणकर्त्यापेक्षा तिच्या विचारास आणि इतिहासास अधिक मौलिकरित्या आकार दिला.
आधि हिब्रू वेद, मूलतः हिब्रू फिनिशियन/ब्राम्ही लिपीत, येणाऱ्याविषयी सांगितले आहे, जसे संस्कृत ऋग्वेदात येणाऱ्या पुरुषाचा विषय. पण आपण मध्यपूर्वेतील यहूद्यांच्या पूर्वजांच्या देशातून त्यांच्या बंदिवासानंतर आपण त्यांच्या इतिहासाकडे वळतो.
पर्शियनांच्या बंदिवासातून परतणे
त्यानंतर, पर्शियन सम्राट सायरस याने बेबिलोनचा पाडाव केला आणि सायरस जगातील सर्वात सामथ्र्यवान व्यक्ती बनला. त्याने यहूदी लोकांस त्यांच्या मायदेशी परतण्याची परवानगी दिली.
तथापि तो आता स्वतंत्र देश नव्हता, ते आता पर्शियातील एक प्रांत बनून राहिले होते. असे 200 वर्षेपर्यंत सुरू राहिले आणि समयरेखेत गुलाबी रंगाने दाखविण्यात आले आहे. या काळात यहूदी मंदिर (ज्यास 2 रे मंदिर म्हटले जाते) आणि यरूशलेम नगर पुन्हा उभारण्यात आले. जरी यहूदी लोकांस इस्राएलास परतण्याची संधी देण्यात आली, तरी अनेक लोक विदेशात बंदिवासात राहिले.
ग्रीकांचा काळ
महान सिकंदरने पर्शियन साम्राज्यावर विजय मिळविला आणि ग्रीक साम्राज्यात दुसरी 200 वर्षे इस्राएलास एक प्रांत बनविण्यात आले. हे गर्द निळ्या रंगाने दाखविण्यात आले आहे.
रोमी लोकांचा काळ
मग रोमने ग्रीक साम्राज्याचा पाडाव केला आणि ते प्रबळ विश्वशक्ति बनले. यहूदी पुन्हा या साम्राज्यात एक प्रांत बनून राहिले आणि हे हलक्या पिवळ्या रंगाने दाखविले आहे. याच काळात येशू जगला. यावरून हे स्पष्ट होते की रोमी सैनिक शुभवर्तमानाच्या पुस्तकांत का आहेत – कारण येशूच्या जीवनकाळात इस्राएलात यहूदी लोकांवर रोमी लोकांनी राज्य केले.
रोमच्या शासनकाळात यहूदी लोकांचा दुसरा बंदिवास
बंबिलोनियनच्या काळापासून (ख्रि. पू. 586) यहूदी लोक जसे दावीद राज्याच्या काळात होते तसे स्वतंत्र नव्हते. त्यांच्यावर इतर साम्राज्यांचे राज्य होते, जसे स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिशांनी भारतावर राज्य केले होते तसे. यहूदी लोक यामुळे संतप्त झाले आणि त्यांनी रोमी राज्याविरुद्ध उठाव केला. रोमने येऊन यरूशलेमाचा नाश केला (ईस्वी सन 70), 2 रे मंदिर जाळून टाकले, आणि यहूदी लोकांस रोमी साम्राज्यभर गुलाम म्हणून तडीपार केले. हा दुसरा यहूदी बंदिवास होता. रोम इतके मोठे साम्राज्य होते त्यामुळे शेवटी यहूदी लोकांची संपूर्ण जगात पांगापांग झाली.
यहूदी लोकांस जगभर बंदिवासात पाठविण्यात आले. अशाप्रकारे यहूदी लोक जवळजवळ 2000 वर्षे जगले: विदेशात त्यांची पांगापांग झाली आणि त्यांचा या देशांत कधीही स्वीकार करण्यात आला नाही. या वेगवेगळ्या देशांत त्यांनी नियमितपणे मोठ्या छळास तोंड दिले. यहूद्यांचा हा छळ विशेषेकरून यूरोपात खरा ठरला. पश्चिम यूरोपातील, स्पेनमधून, रशियापर्यंत यहूदी लोक बरेचदा अतयंत जोखिमीच्या परिस्थितीत जगले. या छळापासून वाचण्यासाठी यहूदी लोक कोचिनमध्ये येत राहिले.
17 व्या आणि 18 व्या शतकात यहूदी लोक मध्यपूर्वेतून भारताच्या इतर भागात येऊन पोहोचले, आणि त्यांस बगदादी यहूदी म्हटले जाते, त्यांच्यापैकी बहुतेक लोक मुंबई, दिल्ली आणि कलकत्ता येथे जाऊन वसले. ख्रि. पू. 1500 वर्षांपूर्वीचे मोशेचे शाप या गोष्टीचे यथार्थ वर्णन होते की ते कसे जगले.
65 “या इतर राष्ट्रांमध्ये तुम्हाला शांती लाभणार नाही. परमेश्वर तुमचे मन काळजीने पोखरुन टाकील. तुमचे डोळे शीणतील तुम्ही बेचैन व्हाल.
अनुवाद 28:65
इस्राएलविरुद्ध देण्यात आलेले शाप लोकांस हे विचारण्यासाठी देण्यात आले होते :
24 “‘परमेश्वराने या देशाचे असे का केले? त्याचा एवढा कोप का झाला?’ असे इतर राष्ट्रातील लोक विचारतील.
अनुवाद 29:24
आणि त्याचे उत्तर होते :
25 त्याचे उत्तर असे की, आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्याशी केलेला करार इस्राएलांनी धुडकावून लावल्यामुळे परमेश्वराचा त्यांच्यावर कोप झाला. मिसरमधून या लोकांना बाहेर आणल्यावर परमेश्वराने त्यांच्याशी पवित्र करार केला होता तो यांनी मोडला. 26 हे इस्राएल इतर दैवतांची पूजा करु लागले. यापूर्वी त्यांना हे देव माहीत नव्हते. तसेच इतर दैवतांची पूजा करु नये असे परमेश्वराने त्यांना बजावले होते.27 म्हणून त्यांच्यावर तो क्रुद्ध झाला व या ग्रंथातील शापवाणी त्यांच्या बाबतीत खरी करुन दाखवली. 28 क्रोधायमान होऊन परमेश्वराने त्यांचे या देशातून उच्चाटन केले व आज ते जेथे आहेत तेथे त्यांची रवानगी केली?
अनुवाद 29;25-28
खाली दिलेली समयरेखा हा 1900 वर्षांचा कालावधी दर्शविते. हा कालावधी लांब रंगाच्या लाल गजाने दाखविलेला आहे.
आपण पाहू शकता की यहूदी लोकांना त्यांच्या इतिहासात बंदिवासाच्या दोन काळांतून जावे लागले पण दुसरा बंदिवास पहिल्या बंदिवासापेक्षा फार लांब होता.
20 व्या शतकातील नरसंहार
यहूद्यांविरुद्ध छळाची पराकष्ठा त्यावेळी झाली जेव्हा हिटलरने, नाझी जर्मनीच्या माध्यमाने, यूरोपमध्ये वस्ती करून राहत असलेल्या सर्व यहूद्यांचा नायनाट करण्याचा प्रयत्न केला. त्याला लगभग यश आले होते पण त्याचा पराजय झाला आणि शेष यहूदी बचावले गेले.
आधुनिक इस्राएलचा पुनर्जन्म
ही वस्तुस्थिती की हजारो वर्षांनंतर स्वतःची मायभूमी नसतांनाही स्वतःची ओळख ‘यहूदी’ म्हणून टिकवून ठेवणे उल्लेखनीय आहे. पण याने 3500 वर्षांपूर्वी लिहिलेल्या, मोशेच्या शेवटच्या शब्दांस सत्यापित केले. 1948 मध्ये, संयुक्त राष्ट्रसंघाच्या माध्यमाने, आधुनिक इस्राएल राज्याचा पुनर्जन्म पाहिला, जसे मोशेने अनेक शतकांपूर्वी लिहिले होते:
3-4 तेव्हा तुमचा देव परमेश्वर तुमच्यावर प्रसन्न होईल, आणि तो तुम्हांला मुक्त करील. तुमची त्याने जेथे जेथे पांगापांग करुन टाकली होती तेथून तो तुम्हाला परत आणील. मग ते देश किती का लांबचे असेनात! 5 पुन्हा आपल्या पूर्वजांच्या देशात तुम्ही याल आणि तो देश तुमचा होईल. परमेश्वर तुमचे कल्याण करील आणि पूर्वजांना मिळाले त्यापेक्षा कितीतरी अधिक तुम्हांला मिळेल. पूर्वी कधी नव्हती एवढी तुमची लोकसंख्या वाढेल.
अनुवाद 30:3-5
प्रचंड विरोध असतांनाही ह्या राज्याची स्थापना झाली हे देखील लक्षात घेण्यासारखे होते. शेजारच्या बहुसंख्य राष्ट्रांनी 1948मध्ये… 1956 मध्ये …1967 मध्ये आणि पुन्हा 1973 मध्ये इस्राएल विरुद्ध युद्ध केले. अतिशय लहान देश, इस्राएलने, कधी कधी एकाच वेळी पाच राष्ट्रांस लढा दिला. तरीही इस्राएलचा केवळ बचावच झाला नाही, तर त्याचा भूभाग वाढला. 1967 मध्ये सहा दिवसांच्या युद्धात, दाविदाने 3000 वर्षांपूर्वी स्थापन केलेले ऐतिहासिक राजधानीचे शहर, यरूशलेम इस्राएलने पुन्हा काबिज केले. इस्राएल राज्याच्या निर्मितीचा परिणाम, आणि या युद्धाच्या परिणामांनी आज आमच्या जगात सर्वात कठीण राजकीय समस्यांपैकी एक उत्पन्न केली आहे.
मोशेने भाकित केल्याप्रमाणे आणि येथे पूर्णपणे शोध घेतल्याप्रमाणे, इस्राएलच्या पुनर्जन्माने भारतातील यहूदी लोकांस इस्राएल देशास परतण्याची प्रेरणा दिली. इस्राएल देशात आता 80000 यहूदी राहत आहेत ज्याची आई किंवा वडील भारतातून आहे आणि भारतात केवळ 5000 यहूदी वाचले आहेत. मोशेच्या आशीर्वादाप्रमाणे त्यांस ‘दूर देशातून’ (मिझोरामसारख्या) ‘एकत्र’ करून आणत आहे. मोशेने लिहिले की यहूदी आणि गैरयहूदी दोघांनी या अर्थाकडे लक्ष द्यावे.
(1) डॉ. अविगडोर सचन, इन द फुटस्टेप्स ऑ फ द लॉस्ट टेन ट्राईब्ज पृ. 261