जेव्हा आपण आशीर्वादाचा आणि धनसंपत्तीचा विचार करतो तेव्हा आमचे मन भाग्य, यश आणि संपत्तीची देवी, लक्ष्मी हिच्याकडे जाते. लोभ न धरता सत्कृत्य केल्यास ती परिश्रमास यश आशीर्वाद देते. क्षीरसागर घुसळून काढण्याच्या गाथेत, इंद्राने पवित्र फुले फेकून देऊन अपमान केल्यामुळे लक्ष्मीने देवांस सोडून क्षीरसागरात प्रवेश केला. तथापि, तिने परत यावे म्हणून हजार वर्षे समुद्रमंथन केल्यानंतर, ती आपल्या पुनर्जन्माने विश्वासू लोकांस आशीर्वाद देते.
जेव्हा आपण विनाश, विध्वंस, आणि सर्वनाशाचा विचार करतो तेव्हा आमचे मन भैरवाकडे जाते, शिवाचा भयानक अवतार, किंवा शिवाच्या तिसऱ्या नेत्राकडे. ती बहुतेकदा बंद असते जेव्हा तो ते उघडतो तेव्हा ते दुष्कर्म करणाऱ्याच्या विनाशासाठी असते. लक्ष्मी आणि शिव दोघांकडे भक्तांचे बरेच लक्ष असते, कारण लोक एकाद्वारे आशीर्वाद प्राप्तीची इच्छा धरतात आणि दुसर्याकडून त्यांस शाप किंवा विनाशाचे भय असते.
आशीर्वाद आणि शाप … इस्राएली लोकांस … आम्हास शिक्षण देण्यासाठी
हिब्रू वेदात प्रकट करण्यात आलेला उत्पन्नकर्ता परमेश्वर आशीर्वादाचा कर्ता आहे तसेच लक्ष्मी आणि शाप आणि भैरवाच्या भयंकर विनाशासमान अथवा शिवाच्या तिसऱ्या नेत्रासमान विनाशाचा कर्ता आहे. हे त्याचे निवडलेले लोक – इस्राएली – जे त्याचे भक्त होते त्यांच्यासाठी निर्देशित होते. परमेश्वर देवाने इस्राएली लोकांस मिसर देशच्या गुलामीत बाहेर आणले आणि त्यांस दहा आज्ञा दिल्यानंतर देण्यात आले – दहा आज्ञा म्हणजे पापाचे त्यांच्यावर नियंत्रण आहे किंवा नाही हे जाणण्यासाठी मापदंड. हे आशीर्वाद आणि शाप इस्राएली लोकांकडे निर्देशित होते पण त्यांची घोषणा फार पूर्वी करण्यात आली होती यासाठी की इतर सर्व राष्ट्रांनी त्याकडे लक्ष ़द्यावे आणि हे जाणून घ्यावे की तो त्याच सामर्थ्याने आशीर्वाद देतो जसा त्याने इस्राएली लोकांस दिला होता. आम्ही सर्व जण जे समृद्धी आणि आशीर्वादाचा इच्छा धरतो आणि विनाश व शापापासून वाचू इच्छितो इस्राएली लोकांच्या अनुभवावरून शिकू शकतो.
श्री मोशे सुमारे 3500 वर्षांपूर्वी जगत होता आणि त्याने पहिले पुस्तक लिहिले ज्यांनी हिब्रू वेद बनतो. त्याचे मोठे पुस्तक, अनुवाद यात त्याच्या शेवटच्या वचनांचा समावेश आहे जी त्याने आपल्या मृत्यूपूर्वी लिहिली. ही वचने इस्राएली लोकांस – यहूद्यांस त्याचा आशीर्वाद होती, पण त्याचे शाप सुद्धा. मोशेने लिहिले की हे आशीर्वाद आणि शाप जगाचा इतिहास घडवितील आणि त्याकडे लक्ष पुरविण्यात आले पाहिजे, केवळ यहूद्यांद्वारेच नव्हे, तर इतर सर्व राष्ट्रांद्वारे सुद्धा त्यांकडे लक्ष दिले जावे. या आशीर्वादांनी आणि शापांनी भारताच्या इतिहासावर देखील प्रभाव टाकला आहे. म्हणून आमच्या मननासाठी हे लिहिण्यात आले होते. पूर्ण आशीर्वाद व शाप येथे आहेत. सारांश असा आहे.
श्री मोशेचे आशीर्वाद
जर इस्राएली लोक नियमशास्त्राचे (दहा आज्ञा) पालन करतील तर त्यांस जे आशीर्वाद प्राप्त होतील त्यांचे वर्णन करण्याद्वारे मोशेने सुरूवात केली. देवाकडून प्राप्त आशीर्वाद इतके प्रचंड असतील की इतर राष्ट्रे त्याचा आशीर्वाद ओळखतील. या आशीर्वादांचा परिणाम हा असेल :
10 परमेश्वराच्या नावाने तुम्ही ओळखले जाता हे पाहिल्यावर इतर राष्ट्रातील लोकांना तुमचा धाक वाटेल.
अनुवाद 28:10
… आणि शाप
तथापि, जर इस्राएली आज्ञापालन करावयास चुकले तर त्यांस शाप प्राप्त होतील जे आशीर्वादांच्या बरोबरीचे व त्याचे प्रतिबिंब असतील. सभोवतालची राष्ट्रे हे शाप पाहतील यासाठी की:
37 तुमच्यावर येणारी संकटे पाहून तेथील लोक विस्मयचकित होतील. त्यांच्या चेष्टेचा आणि निंदेचा तुम्ही विषय व्हाल.
अनुवाद 28:37
आणि हे शाप पूर्ण इतिहासात दिसून येतील.
46 तुम्हाला व तुमच्या वंशजांना हे परमेश्वराचे शाप कायमचे भोवतील. ते पाहून इतर लोक आश्चर्यचकित होतील.
अनुवाद 28:46
पण देवाने सावध केले आहे की सर्वात वाईट शाप इतर राष्ट्रांद्वारे येतील.
49 “दूरच्या राष्ट्रातील शत्रूला परमेश्वर तुमच्यावर पाठवील. त्यांची भाषा तुम्हाला समजणार नाही. गरुडांसारखे ते झेपावत येतील. 50 ते क्रूर असतील. वृद्धांचा ते मान राखणार नाहीत. लहानांना दया दाखवणार नाहीत. 51 तुमची जनावरे आणि तुम्ही काढलेले पीक ते नेतील. तुम्ही नष्ट होईपर्यंत ते तुमची लूट करतील. धान्य, द्राक्षारस, तेल, गुरेढोरे, शेळ्यामेंढ्या काही म्हणता काही तुम्हाला उरणार नाही. 52 “ते राष्ट्र तुमच्या नगरांना वेढा घालून हल्ला करील. आपल्या नगराभोवती असणारी उंच आणि भक्कम तटबंदी आपले रक्षण करील असे तुम्हाला वाटेल. पण ती तटबंदी कोसळून पडेल. तुमचा देव परमेश्वर तुम्हांला देणार असलेल्या प्रदेशातील तुमच्या सर्व नगरांना शत्रू वेढा घालेल.
अनुवाद 28:49-52
हे अधिकाधिक वाईट होत जाईल.
63 “तुमची भरभराट करायला आणि तुमची संख्या वाढवायला जसा त्याला आनंद वाटत होता तसाच आनंद त्याला तुमचा नाश करायला आणि तुम्हांला रसातळाला न्यायला वाटेल. तुम्ही जो देश काबीज करायला जात आहात तेथून तुम्हाला हुसकावून लावले जाईल. 64 परमेश्वर तुम्हाला पृथ्वीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत सर्व लोकांमध्ये विखरुन टाकील. तेथे तुम्ही काष्ठपाषाणाच्या मूर्तीची उपासना कराल. तुम्हाला आणि तुमच्या पूर्वजांना माहीत नसलेल्या खोट्यानाट्या देवांची उपासना कराल. 65 “या इतर राष्ट्रांमध्ये तुम्हाला शांती लाभणार नाही. परमेश्वर तुमचे मन काळजीने पोखरुन टाकील. तुमचे डोळे शीणतील तुम्ही बेचैन व्हाल. 66 तुम्ही नेहमी संकटग्रस्त आणि धास्तावलेले राहाल. तुम्हाला जिवाची खात्री वाटणार नाही. रात्रंदिवस तुम्ही झुरणीला लागाल.
अनुवाद 28:63-65
आशीर्वाद आणि शाप परमेश्वर देव आणि इस्राएली लोकांमधील औपचारिक कराराद्वारे स्थापन करण्यात आले होते :
13 त्याद्वारे तो तुम्हांला आपली खास प्रजा करणार आहे आणि तो तुमचा परमेश्वर बनणार आहे. त्याने हे तुम्हांला आणि अब्राहाम, इसहाक व याकोब या तुमच्या पूर्वजांना कबूल केले आहे. 14-15 हा शपथपूर्वक पवित्र करार फक्त आपल्याशी-आज इथे उपस्थित असलेल्यांबरोबरच नव्हे तर आज आपल्यामध्ये या ठिकाणी हजर नसलेल्या आपल्या वंशजांसाठीही आहे.
अनुवाद 29:13-15
हा करार मुलांवर, अथवा भावी पिढ़ीवर बंधनकारक असेल. खरे म्हणजे हा करार भावी पिढीसाठी होता – इस्राएली आणि विदेशी दोन्ही.
22 “या देशाची कशी वाट लागली हे पुढे तुमचे वंशज आणि दूरदूरच्या देशातील परकीय पाहतील. या देशातील विपत्ती आणि परमेश्वराने पसरवलेले रोग ते पाहतील. 23 येथील भूमी गंधक आणि खार यांच्यामुळे जळून वैराण होईल. तिच्यात गवताचे पाते देखील उगवणार नाही. सदोम, गमोरा, अदमा व सबोयीम ही शहरे परमेश्वराच्या कोपाने उद्ध्वस्त झाली तसेच या देशाचे होईल. 24 “‘परमेश्वराने या देशाचे असे का केले? त्याचा एवढा कोप का झाला?’ असे इतर राष्ट्रातील लोक विचारतील.
अनुवाद 29:22-24
उत्तर असेल :
25 त्याचे उत्तर असे की, आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्याशी केलेला करार इस्राएलांनी धुडकावून लावल्यामुळे परमेश्वराचा त्यांच्यावर कोप झाला. मिसरमधून या लोकांना बाहेर आणल्यावर परमेश्वराने त्यांच्याशी पवित्र करार केला होता तो यांनी मोडला. 26 हे इस्राएल इतर दैवतांची पूजा करु लागले. यापूर्वी त्यांना हे देव माहीत नव्हते. तसेच इतर दैवतांची पूजा करु नये असे परमेश्वराने त्यांना बजावले होते.27 म्हणून त्यांच्यावर तो क्रुद्ध झाला व या ग्रंथातील शापवाणी त्यांच्या बाबतीत खरी करुन दाखवली. 28 क्रोधायमान होऊन परमेश्वराने त्यांचे या देशातून उच्चाटन केले व आज ते जेथे आहेत तेथे त्यांची रवानगी केली?
अनुवाद 29:25-28
आशीर्वाद आणि शाप घडून आलेत का?
आशीर्वाद सुखकारक होते, आणि शाप भयानक होते, पण जो अत्यंत महत्वाचा प्रश्न आपण विचारू शकता तो आहे: ‘ते घडून आलेत का?’ हिब्रू वेदाच्या जुन्या कराराचा बहुतांश भाग इस्राएली इतिहासाची नोंद आहे म्हणून आपण त्यांचा भूतकाळ जाणतो. तसेच आपणाजवळ जुन्या कराराच्या बाहेरचा इतिहास आहे आणि अनेक पुरातत्वीय स्मारक आहेत. ते सर्व जण इस्राएली अथवा यहूदी इतिहासाचे संगतवार चित्र आहे.
हे येथे समयरेखेद्वारे देण्यात आले आहे. जर मोशेचे शाप घडून आलेत तर ते वाचा आणि त्याचे स्वतः मूल्यमापन करा. यावरून हे स्पष्ट होते की 2700 वर्षांपूर्वी यहूदी समूहांनी भारतात स्थलांतर का केले (उदाहरणार्थ, मिझोरामचे बेन मनश्शे). अश्शूरी आणि बेबिलोनियन विजयाचा परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणात तडीपार झाल्यामुळे ते भारतात पांगले – अगदी मोशेने सांगितल्याप्रमाणे.
मोशेचे आशीर्वाद आणि शाप यांचा उपसंहार
मोशेच्या वचनांचा शेवट शापाने झाला नाही. मोशेने अशाप्रकारे आपली अंतिम घोषणा केली.
“मी सांगितलेल्या या सर्व गोष्टी तुमच्याबाबतीत घडतील. आशीर्वाद तसेच शापही खरे होतील. तुमचा देव परमेश्वर तुम्हांला इतर राष्ट्रांमध्ये हद्दपार करील. तेव्हा तुम्हांला या सर्व गोष्टींची आठवण होईल. 2 तेव्हा तुम्ही तुमचे वंशज तुमचा देव परमेश्वर ह्याचा धावा कराल. त्याला मनःपूर्वक शरण जाल. आणि मी आज दिलेल्या सर्व आज्ञांचे नीट पालन कराल. 3-4 तेव्हा तुमचा देव परमेश्वर तुमच्यावर प्रसन्न होईल, आणि तो तुम्हांला मुक्त करील. तुमची त्याने जेथे जेथे पांगापांग करुन टाकली होती तेथून तो तुम्हाला परत आणील. मग ते देश किती का लांबचे असेनात! 5 पुन्हा आपल्या पूर्वजांच्या देशात तुम्ही याल आणि तो देश तुमचा होईल. परमेश्वर तुमचे कल्याण करील आणि पूर्वजांना मिळाले त्यापेक्षा कितीतरी अधिक तुम्हांला मिळेल. पूर्वी कधी नव्हती एवढी तुमची लोकसंख्या वाढेल.
अनुवाद 30:1-5
हजारों वर्षे बंदिवासात देशाबाहेर राहिल्यानंतर, सन 1948 मध्ये – आज जिवंत असलेल्यांच्या आयुष्यात – संयुक्त राष्ट्रसंघाच्या ठरावानुसार आधुनिक इस्राएल राष्ट्राचा नवा जन्म झाला आणि यहूदी लोक जगभरातील राष्ट्रांतून परत इस्राएलास स्थलांतर करू लागले – अगदी मोशेने भाकित केल्याप्रमाणे. आज भारतात, कोचिन, आंध्र प्रदेश आणि मिझोराम येथे हजारों-वर्षे वस्तीस असलेले यहूदी समुदाय कमी होऊ लागले आहेत कारण यहूदी लोक आपल्या मायदेशी परत जात आहेत. केवळ सुमारे 5000 यहूदी भारतात उरले आहेत. जसा शापाने त्यांच्या जीवनास आकार दिला, अगदी त्याचप्रमाणे मोशेचे आशीर्वाद आमच्या डोळ्यासमक्ष पूर्ण होत आहेत.
याचे आमच्यासाठी अनेक अर्थ आहेत. सर्वप्रथम, आशीर्वाद आणि शापांचा अधिकार व सामथ्र्य देवाकडून होते. मोशे फक्त प्रबोधन किंवा प्रकाशन प्राप्त दूत – ऋषी होता. हे आशीर्वाद आणि शाप हजारों वर्षांपर्यत, जगातील सर्व राष्ट्रांपर्यत पोहोचतात, आणि लक्षावधी लोकांवर त्यांचा परिणाम घडून येतो (इस्राएल देशात यहूद्यांच्या परत येण्यामुळे गोंधळा माजला आहे – नियमितपणे घडणार्या घटना जगभरच्या मथळ्यांचा विषय आहे) – हा या गोष्टीचा पुरावा आहे की परमेश्वर देवाजवळ ते सामथ्र्य आणि अधिकार आहे ते बायबल (वेद पुस्तकम्) म्हणते की त्याच्याजवळ आहे. त्याच हिब्रू वेदात त्याने हे अभिवचन सुद्धा दिले आहे की ‘पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे’ आशीर्वाद पावतील. ‘पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे’ म्हटल्यावर त्यात आमचाही समावेश आहे. तसेच अब्राहामाच्या पुत्राच्या बलिदानात, देवाने या गोष्टीची पुनरावृत्ती केली की ‘पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे आश्ीर्वाद पावतील’. त्या बलिदानाचे स्थान व पतशील आपणास हे जाणून घेण्यात मदत करतो की हा आशीर्वाद कसा प्राप्त करावा. मिझोराम, आंध्र प्रदेश आणि केरळमधून परत जाणार्या यहूद्यांवर ज्या आशीर्वादांची वृष्टी केली जात आहे ते या गोष्टीचे चिन्ह आहे की देव भारताच्या सर्व राज्यातील आणि जगभरातील इतर राष्ट्रांस समान आशीर्वाद देऊ इच्छितो आणि देऊ शकतो जसे त्याने अभिवचन दिले आहे. यहूद्यांप्रमाणे, आमच्या शापांत आम्हास देखील आशीर्वाद देण्यात आले आहेत. आशीर्वादाची देणगी का स्वीकार करू नये?