ऋग्वेद पुरुषसुक्ताच्या आरंभी येणाऱ्या पुरुषाचे पूर्वचित्र वेदांनी पाहिले. त्यानंतर आपण हिब्रू वेद पुढे सुरू ठेवले, जे हे सूचविते की संस्कृत आणि हिब्रू वेद (बायबल) दोन्ही येशू सत्संगने (नासरेथकर येशू) पूर्ण केले.
तर हा येशू भविष्यवचनांत सांगितलेला पुरुष किंवा ख्रिस्त होता का? त्याचे आगमन फक्त एका निश्चित गटासाठी होते की सर्वांसाठी – सर्व जातीधर्मांसाठी, वर्गापासून सवर्णापर्यंत सुद्धा.
पुरुषसुक्तामध्ये जात (वर्ण)
पुरुषसुक्ताने पुरुषाविषयी म्हटले की:
पुरुषसुक्त श्लोक 11-12 – संस्कृत | संस्कृत लिप्यंतरण | भाषांतर |
यत पुरुषं वयदधुः कतिधा वयकल्पयन | मुखं किमस्य कौ बाहू का ऊरू पादा उच्येते || बराह्मणो.अस्य मुखमासीद बाहू राजन्यः कर्तः | ऊरूतदस्य यद वैश्यः पद्भ्यां शूद्रो अजायत || | 11 yat puruṣaṃ vyadadhuḥ katidhā vyakalpayan | mukhaṃ kimasya kau bāhū kā ūrū pādā ucyete || 12 brāhmaṇo.asya mukhamāsīd bāhū rājanyaḥ kṛtaḥ | ūrūtadasya yad vaiśyaḥ padbhyāṃ śūdro ajāyata | 11 जेव्हा त्यांनी पुरुषास विभागले तेव्हा त्यांनी किती भाग केले? त्याच्या मुखांस, त्याच्या बाहूस ते काय म्हणतात? त्याच्या मांडीस आणि पायांस ते काय म्हणतात? 12 ब्राम्हण त्यांचे तोंड होता, त्याच्या दोन्हीं बाहूंपासून राजण्य घडविला गेला. त्याच्या मांडया वैश्य झाल्या, त्याच्या पायांपासून शुद्र निर्माण झाले. |
संस्कृत वेदांमध्ये जात किंवा वर्णाचा हा सर्वात प्रथम उल्लेख आहे. त्यात वर्णन आहे की चार जाती पुरुषाच्या देहातून वेगळ्या करण्यात आल्या: ब्राम्हण जात/वर्ण त्याच्या मुखातून, राजण्य (ज्यांस आज क्षत्रिय जात/वर्ण म्हटले जाते) त्याच्या बाहूंतून, वैश्य जात/वर्ण त्याच्या मांडीतून, आणि शुद्र जात त्याच्या पायापासून निघाली. पुरुष होण्यासाठी येशूने प्रत्येकाचे प्रतिनिधित्व केले पाहिजे.
तो करतो का?
ब्राम्हण आणि क्षत्रियाच्या रूपात येशू
आम्ही पाहिले की ‘ख्रिस्त’ प्राचीन इब्री पदवी आहे ज्याचा अर्थ आहे ‘शासक’ – राजांचा राजा. ‘ख्रिस्त’ म्हणून येशूचे क्षत्रियाशी पूर्णपणे साम्य आहे आणि तो त्यांचे प्रतिनिधित्व करतो. आम्ही पाहिले की ‘अंकुर’ म्हणून येशूविषयी अशी भविष्यवाणीही करण्यात आली होती की तो पुरोहित म्हणून येईल, म्हणून त्याचे ब्राम्हणाशी पूर्णपणे साम्य आहे आणि तो त्यांचे प्रतिनिधित्व करतो. खरे म्हणजे, इब्री भविष्यवाणीत हे दाखविलेले आहे की तो पुरोहित आणि राजा या दोन्ही भूमिका एका व्यक्तीमध्ये पार पाडील.
13 तो परमेश्वराचे मंदिर बांधून गौरव प्राप्त करील. स्वत:च्या सिंहासनावर बसून तो राज्य करील. त्याच्या सिंहासनाजवळ याजक उभे राहतील. ते दोघे एकत्रितपणे, शांतपणे काम करतील.’
जखऱ्या 6:13
वैश्य म्हणून येशू
हिब्रू ऋषी/संदेष्ट्यांनी देखील अशी भविष्यवाणी केली की येणारा, व्यापाऱ्याप्रमाणे, उदमी असेल.
त्यांनी भविष्यवाणी केली की:
3 का? कारण मी स्वत: तुझा परमेश्वर आहे. मी, इस्राएलचा पवित्र देव तुझा तारणहार आहे. मी तुझ्या मोबदल्यात मिसर देश दिला. तुला माझा करण्यासाठी मी इथिओपिआ व सेबा यांचे दान केले.
यशया 43:3
परमेश्वर येणाऱ्याविषयी भविष्यवाणीच्या रूपाने बोलत आहे, तो म्हणत आहे की तो वस्तूंचा व्यापार करील, पण तो लोकांसाठी व्यापार करील – त्यांच्या जीवनाचा विनिमय करण्याद्वारे. म्हणून येणारा व्यापारी असेल, लोकांस मुक्तता देण्याचा व्यापार करील. व्यापारी म्हणून त्याचे वैश्याशी पूर्णपणे साम्य आहे आणि तो त्यांचे प्रतिनिधित्व करतो.
शुद्र – सेवक
ऋषी/संदेष्ट्यांनी सेवक, किंवा शुद्र म्हणून त्याच्या येणाऱ्या भूमिकेविषयी सुद्धा सविस्तर भविष्यवाणी केली. आपण पाहिले की कशाप्रकारे संदेष्ट्यांनी भविष्यवाणी केली की अंकुर एक सेवक असेल ज्याची सेवा पाप दूर करणे ही असेल:
8 तेव्हा यहोशवा मुख्ययाजका, तू स्वत: व तुझ्या समोर बसलेल्या सहकारी याजकांनी ऐकले पाहिजे. माझा खास सेवक मी आणल्यावर काय घडणार आहे, ह्याची ही माणसे म्हणजे नमुने आहेत. त्याला कोंब म्हणतील.
जखऱ्या 3:8-9
9 पाहा! मी यहोशवापुढे विशेष दगड ठेवतो. त्याला सात बाजूआहेत. मी त्यावर खास संदेश कोरीन. तो संदेश, मी एका दिवसात पृथ्वीवरीलसर्व पाप नाहीसे करीत असल्याचे दाखवील.”
येणारी शाखा, जो पुरोहित, राजा आणि व्यापारी होता, तो सेवक – शुद्र देखील होता. यशयाने सेवक (शुद्र) म्हणून त्याच्या भूमिकेविषयी सविस्तर भविष्यवाणी केली. त्याच्या भविष्यवाणीत देव सर्व ‘दूरच्या’ राष्ट्रांस (अर्थात आम्हास!) हा सल्ला देतो की आम्ही या शुद्राच्या सेवेकडे लक्ष द्यावे.
रदूरच्या ठिकाणी राहणाऱ्या सर्व लोकांनो, माझे म्हणणे ऐका. जगातील सर्व लोकांनो, माझे ऐका माझ्या जन्मापूर्वीच परमेश्वराने त्याची सेवा करण्यासाठी मला निवडले मी आईच्या गर्भात असतानाच त्याने माझी निवड केली.
यशया 49:1-6
2 परमेश्वर त्याचे म्हणणे माझ्याकडून वदवितो. तो माझा उपयोग धारदार तलवारीसारखा करतो. त्याच्या ओंजळीत मला लपवून तो माझे रक्षणही करतो. परमेश्वर टोकदार बाणाप्रमाणे माझा उपयोग करतो, पण तो त्याच्या भाल्यात मला लपवितोही.
3 परमेश्वर मला म्हणाला, “इस्राएल, तू माझा सेवक आहेस. मी तुझ्याबाबत विस्मयकारक गोष्टी करीन.”
4 मी म्हणालो, “मी निरर्थक मेहनत केली. स्वत: झिजून झिजून निरूपयोगी झालो पण काहीही उपयोगी पडणारे केले नाही. मी माझी सर्व शक्ती खर्च केली पण माझ्याहातून काहीच झाले नाही. तेव्हा आता काय करायचे. ते परमेश्वरानेच ठरविले पाहिजे. देवानेच मला काय फळ द्यायचे ते निश्चित केले पाहिजे.
5 मी परमेश्वराचा सेवक व्हावे, याकोबला आणि इस्राएलला मी परत देवाकडे न्यावे, म्हणून मला देवाने जन्माला घातले. परमेश्वर माझा सन्मान करील. मला देवाकडून शक्ती मिळेल.”परमेश्वर मला म्हणाला,
6 “तू माझा फार महत्वाचा सेवक आहेस. इस्राएलचे लोक कैदी आहेत. पण त्यांना माझ्याकडे परत आणले जाईल. याकोबच्या वंशजांचा गोतावळा माझ्याकडे परत येईल. पण तुझे काम दुसरेच आहे, ते ह्या कामा पेक्षा महत्वाचे आहे. मी तुला सर्व राष्ट्रांना प्रकाश देणारा दिवा करीन. जगातील सर्व माणसांचे रक्षण करण्याचा माझा मार्ग तू होशील.”
जरी तो हिब्रू/यहूदी वंशातून आला, तरी ह्या भविष्यवाणीत हे सांगितले होते की या सेवकाची सेवा ‘पृथ्वीच्या शेवटापर्यंत सुवार्ता गाजवणे’ ही असेल. येशूच्या सेवेने खरोखर भविष्यवाणीत सांगितल्याप्रमाणे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांस स्पर्श केला. सेवक या नात्याने, येशूचे शुद्रांशी पूर्ण साम्य आहे आणि त्यांचे तो प्रतिनिधित्व करतो.
अवर्णसुद्धा…
सर्व लोकांसाठी मध्यस्थी करण्याकरिता येशूला अवर्णांचे, किंवा अनुसूचित जातींचे, आदिवासी आणि दलितांचे सुद्धा प्रतिनिधित्व करावयाचे आहे. ते तो कसे करील? हिब्रू वेदात भविष्यवाणी करण्यात आली की अवर्ण म्हणून आम्हा बाकींच्याद्वारे त्यास पूर्णपणे भग्न आणि तुच्छ, असे पाहिले जाईल.
कशाप्रकारे?
येथे पूर्ण भविष्यवाणी दिलेली आहे व सोबत स्पष्टीकरण सुद्धा आहे. निरीक्षण करा की ती ‘त्याच्याविषयी’ आणि ‘त्यास’ बोलते म्हणून ती येणाऱ्या मनुष्याविषयी भविष्यवाणी करते. ही भविष्यवाणी ‘कोबींच्या’ प्रतिमेचा उपयोग करते म्हणून आम्हास माहीत आहे की ती अंकुराचा उल्लेख करते जो पुरोहित आणि राजा होता. पण वर्णन अवर्ण आहे.
येणारा तुच्छ व्यक्ती
म्ही जाहीर केलेल्या गोष्टींवर खरा विश्वास कोणी ठेवला? परमेश्वराने केलेली शिक्षा खरोखरी कोणी स्वीकारली?
यशया 53:1-3
2 तो एखाद्या रोपट्याप्रमाणे परमेश्वरासमोर वाढला. ओसाड जमिनीवर वाढणाऱ्या अंकुराप्रमाणे तो होता. त्याच्यात काही विशेष नव्हते. त्याला विशेष शोभा नव्हती. आपण त्याच्याकडे पाहिल्यावर तो आपल्याला आवडावा असे त्याच्यात काहीही वैशिष्ट्य नव्हते.
3 लोकांनी त्याची चेष्टा केली. आणि त्याचे मित्र त्याला सोडून गेले. तो खूप दु:खी व व्यथित माणूस होता. घृणा व दु:ख म्हणजे काय हे त्याला चांगले समजले होते. लोक त्याच्याकडे साधे पाहण्याचेही कष्ट घेत नव्हते. तो आमच्या लक्षातही आला नाही.
जरी तो देवासमोर ‘अंकुर’ होता (अर्थात वडाची शाखा), तरी हा मनुष्य ‘तुच्छ’ ठरेल व ‘त्यागला’ जाईल, ‘क्लेशित’ असेल आणि इतर जण त्याला ‘तिरस्कृत समजतील.’ त्याला अक्षरशः अस्पृश्य मानले जाईल. मग येणारा अनुसूचित जमातींचा (वनवासी) आणि मागासवर्गीय जातींचा अस्पृश्य म्हणून दुःखी – दलितांचा प्रतिनिधित्व करावयास सक्षम आहे.
4 पण त्याने आमचा त्रास स्वत:चा मानला. त्याने आमचे दु:ख आणि वेदना स्वत: भोगल्या आम्हाला वाटले की देव त्यालाच शिक्षा करीत आहे, त्याने केलेल्या कर्मांबद्दल त्याला ताडन करीत आहे.
यशया 53:4-5
5 पण आमच्या दुष्कृत्यांबद्दल त्याला दु:ख भोगावे लागले. आमच्या अपराधांमुळे तो भरडला गेला. आमचे कर्ज, आमची शिक्षा, त्याच्यावर लादली गेली. त्याने दु:ख सहन केले. म्हणून आम्ही बरे झालो.
आम्ही कधीकधी इतरांच्या दुःखद परिस्थितींचा न्याय करतो, किंवा समाजातील निम्न पदावरील लोकांकडे त्यांच्या पापांचा, किंवा कर्माचा परिणाम म्हणून, पाहतो. त्याचप्रमाणे, या माणसाचे क्लेश इतके अधिक असतील की आपण असे समजतो की त्याला देव शिक्षा देत आहे. म्हणूनच त्याला तुच्छ लेखिले जाईल. पण त्याला त्याच्या स्वतःच्या पापांची शिक्षा दिली जाणार नाही, तर आमच्या पापांची शिक्षा मिळेल. तो आमच्या आरोग्यासाठी व शांतीसाठी भयंकर ओझे वाहिल.
ही भविष्यवाणी नासरेथच्या येशूला वधस्तंभावर दिल्याने पूर्ण झाली, ज्याला वधस्तंभावर ‘खिळण्यात’ आले, मारण्यात आले आणि क्लेशित करण्यात आले. तरीही त्याच्या जगण्यापूर्वी 750 वर्षे आधी ही भविष्यवाणी लिहिण्यात आली. तुच्छ समजल्या गेल्यामुळे, आणि त्याच्या क्लेशात, येशूने ही भविष्यवाणी पूर्ण केली आणि आता सर्व मागासलेल्या जातींचे व जमातींचे तो प्रतिनिधित्व करतो.
6 पण त्याने एवढे सगळे केल्यानंतरही आपण मेंढ्यांप्रमाणे भरकटत गेलो. आम्ही प्रत्येकजण स्वत:च्या मार्गाने गेलो परमेश्वराने आपल्याला अपराधातून मुक्त केल्यावर आणि आपले अपराध त्याच्या नावावर केल्यावर आपण असे वागलो.
यशया 53:6-7
7 त्याला इजाही झाली आणि शिक्षाही झाली. पण त्याने कधीही तक्रार केली नाही. ठार मारायला नेणाऱ्या मेंढीप्रमाणे तो अगदी गप्प राहिला. मेंढ्यांची लोकर कापताना तो जसा शांत असतो तसा तो शांत होता. स्वत:चा बचाव करण्यासाठी त्याने कधीही तोंड उघडले नाही.
आमचे पाप आणि धर्मापासून आमचे भटकून जाणे यामुळे गरजेचे हे आहे की या माणसाने आमचे अपराध अथवा आमची पापे वाहून न्यावीत. तो आमच्या जागी वध होण्यासाठी शांतीपूर्वक जाण्यास तयार होईल, तो विरोध करणार नाही किंवा ‘आपले तोंडही उघडणार नाही’. हे अगदी तसेच पूर्ण झाले ज्याप्रकारे येशू स्वेच्छेने वधस्तंभावर गेला.
8 लोकांनी बळजबरीने त्याला नेले आणि त्याला योग्य न्याय दिला नाही. त्याला मृत्युलोकातून उचलून आणल्यामुळे त्याच्या वारसांविषयी कोणी काहीही सांगू शकत नाही. माझ्या लोकांच्या पापाची किंमत मोजण्यासाठी त्याला शिक्षा केली गेली.
यशया 53:8
भविष्यवाणीत म्हटले आहे की ‘जिवतांच्या भूमीतून त्याला काढून’ टाकतील, ही भविष्यवाणी तेव्हा पूर्ण झाली जेव्हा तो वधस्तंभावर मरण पावला.
9 तो मेल्यावर त्याला श्रीमंताबरोबर पुरले. त्याने काहीही चूक केली नव्हती. तो कधीही खोटे बोलला नाही पण तरीही त्याच्या बाबतीत हे घडून आले.
यशया 53:9
जरी त्याने ‘काही अधर्म केला नव्हता’ आणि ‘त्याच्या मुखात काही कपट नव्हते’ तरी त्याला ‘दुष्ट’ मनुष्य म्हणून मृत्यूदण्ड देण्यात आला. तरीही, त्याला श्रीमंत पुरोहित, अरमथियाच्या योसेफाच्या कबरेत पुरण्यात आले. येशूने ‘त्याची कबर दुर्जनांच्या कबरांमध्ये नेमिली होती’ ही भविष्यवाणी तर पूर्ण केलीच पण ‘धनवंताची कबर त्यास प्राप्त झाली’ ही भविष्यवाणी सुद्धा पूर्ण केली.
10 परमेश्वराने त्याला चिरडून टाकण्याचे ठरविले आणि परमेश्वराने दु:ख भोगलेच पाहिजे असे निश्चित केले. म्हणून सेवक स्वत:चा बळी देण्यास तयार झाला. पण त्याला नवे जीवन मिळेल आणि तो खूप खूप जगेल. तो त्याच्या लोकांना पाहील. परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे, सेवकाने करायच्या, सर्व गोष्टी तो पूर्ण करील.
यशया 53:10
दुष्ट मृत्यु एखादी भयंकर दुर्घटना किंवा दुर्भाग्य नव्हते. ही ‘प्रभूची इच्छा’ होती.
का?
कारण ह्या पुरुषाचा ‘जीव’ ‘दोषार्पण’ ठरेल.
कोणाचे पाप?
‘अनेक राष्ट्रांतील’ आम्ही लोक जे ‘बहकून गेलो होतो’. जेव्हा येशू वधस्तंभावर मेला, ते सर्व आम्हास, पापापासून शुद्ध करण्यासाठी होते, आमचे राष्ट्रीयत्व, धर्म अथवा सामाजिक परिस्थितीचा विचार न करता.
तुच्छ ठरलेला विजयी आहे
11 त्याच्या आत्म्याला खूप क्लेश होतील. पण चांगल्या गोष्टी घडताना तो पाहील. तो जे शिकेल त्याबद्दल तो समाधान पावेल. माझा सज्जन सेवक, अनेक लोकांना त्यांच्या अपराधांतून, मुक्त करील. आणि त्यांच्या पापांचे ओझे स्वत:च्या खांद्यावर घेईल.
यशया 53:11
भविष्यवाणीचा स्वर आता बदलून विजयाचा स्वर होत आहे. भयंकर ‘दुःख’ (‘तुच्छ’ समजले जाण्याचै आणि ‘जिवतांच्या भूमीतून त्याला काढून’ टाकले जाण्याचे आणि ‘कबर’ नेमली जाण्याचे) सहल्यानंतर, हा सेवक ‘जीवनाचा प्रकाश’ पाहील.
तो जिवंत होईल! आणि असे करतांना सेवक अनेकांस ‘नीतिमान’ ठरवील.
‘नीतिमान ठरविणे’ ‘नीतिमत्व’ प्राप्त करण्यासारखे आहे. ऋषी अब्राहम याला ‘नीतिमत्व’ देण्यात आले होते अथवा त्याचे ‘श्रेय देण्यात आले होते’. ते केवळ त्याच्या विश्वासामुळे त्याला देण्यात आले होते. त्याचप्रमाणे हा सेवक इतका दीन असणार होता की तो अस्पृश्य ठरल्यामुळे ‘अनेकांस’ नीतिमान ठरविणार होता, किंवा नीतिमत्व देणार होता. वधस्तंभारोहणानंतर मरणातून जिवंत होण्याद्वारे येशूने अगदी हेच साध्य केले आणि आता आम्हास नीतिमान ठरवितो.
12 ह्यामुळेच मी त्याला सर्व लोकांत श्रेष्ठ बनवीन. बलवान माणसांबरोबर त्याला प्रत्येक गोष्टीत वाटा मिळेल. मी त्याच्यासाठी हे सर्व करीन कारण तो लोकांसाठी जगला आणि मेला. लोकांनी त्याला गुन्हेगार म्हटले. पण त्याने पुष्कळ लोकांच्या पापांचे ओझे स्वत: वाहिले. आणि तो पापी लोकांकरीता बोलतो आहे.”
यशया 53:12
जरी येशू जगण्यापूर्वी हे 750 वर्षे आधी लिहिण्यात आले होते, तरीही ही देवाची योजना होती हे दाखविण्यासाठी ते सविस्तर लिहिण्यात आले. त्यावरून असे सुद्धा दिसून येते की येशू अवर्णांचे प्रतिनिधित्व करू शकतो, ज्यांस अनेकदा तुच्छ समजले जाते. वस्तुतः, तो त्यांचे प्रतिनिधित्व करावयास, त्यांची पापे सहावयास व शुद्ध करावयास, तसेच ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्रांची पापे प्रक्षालन करावयास आला.
तो तुम्हाला व मला जीवनाचे वरदान द्यावयास आला – दोष व पापकर्मापासून शुद्ध करावयास आला. इतक्या बहुमूल्य वरदानावर पूर्णपणे विचार करणे व समजून घेणे योग्य नाही का? येथे हे करण्याच्या अनेक पद्धती आहेत: