Skip to content

कुंभमेळा महोत्सव: पापाची कुवार्ता आणि शुद्धीकरणाची आमची गरज दाखविणे

  • by

मानवी गंगा नदीत 10 इतिहासामधील सर्वात मोठा मेळावा भारतात होतो आणि तोही दर बारा वर्षांतून एकदाच. 55 दिवसांच्या कुंभमेळा महोत्सवाच्या काळात अलाहाबाद शहरात गंगा नदीच्या काठावर  100 दशलक्ष लोक येऊन पोहोचतात. मागील अशा महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी दशलक्ष लोकांनी स्नान केले होते.

Devotees at Ganges for Kumbh Mela Festival

कुंभमेळा महोत्सवासाठी गंगेच्या काठावर आलेले भक्तगण

एनडीटीव्हीच्या मते, कुंभ मेळाव्याच्या स्नानाच्या दिवशी आयोजकांना सुमारे 20 दशलक्ष स्नान करणाऱ्याची अपेक्षा असते. मुस्लिम लोकांच्या मक्का येथे येणाऱ्या वार्षिक हज यात्रेकरूंच्या संख्येवर – दरवर्षी  ‘केवळ’ 3-4 दशलक्ष – कुंभ मेळाव्यासाठी येणाऱ्या लोकांची संख्या मात करते.

मी अलाहाबादला गेलो आहे आणि मी कल्पनाही करू शकत नाही की सर्व पायाभूत सुविधा ताब्यात घेतल्याशिवाय हे लक्षावधी लोक एकाच वेळी येथे कसे येऊ शकतात, कारण हे शहर इतके मोठे नाही. गेल्या उत्सवात या लोकांच्या दैनंदिन गरजांची पूर्तता करण्यासाठी शौचालय आणि डाक्टरांसारख्या सोयी आणण्याचा प्रचंड प्रयत्न करण्यात आला असल्याचे बीबीसीने कळविले आहे.

तर 100 दशलक्ष लोक गंगा नदीत स्नान करण्यासाठी 120 अब्ज रूपये का खर्च करतात? नेपाळमधील एका भाविकाने बीबीसीला सांगितले की

 “मी माझी पातके धुऊन टाकली आहेत”.

रूटर्सने माहिती दिली आहे की

“मी ह्या जीवनातील आणि मागील जीवनातील माझ्या सर्व पापांचे प्रक्षालन केले आहे,” 77 वर्षांचे भ्रमंती तपस्वी स्वामी शंकरानंद सरस्वती थंडीने थरथर कापत म्हणाले.

एनडीटीव्ही आम्हाला सांगते की

उपासक, ज्यांना विश्वास आहे की पवित्र  पाण्यात डुबकी लावल्याने ते त्यांच्या पापांपासून शुद्ध होतील,

मागच्या एका उत्सवात बीबीसीच्या मुलाखातीत यात्रेकरू मोहन यांनी म्हटले की  “आम्ही केलेली पापे येथे वाहून जातात.”

पापाचासार्वत्रिक मानवी बोध

दुसऱ्या शब्दांत, कोटयावधी लोक पैसे खर्च करतील, गर्दी असलेल्या गाड्यांमधून प्रवास करतील, दाटीवाटीची परिस्थिती सहन करतील आणि आपली पापे ‘धुऊन काढली’ जावीत म्हणून गंगा नदीत स्नान करतील. हे भक्त काय करीत आहेत हे पाहण्यापूर्वी, आपण त्यांच्या स्वतःच्या जीवनात ते ओळखत असलेल्या समस्येचा – ‘पापाच्या’ समस्येचा विचार करू  या.

सत्य साईबाबा आणि  ‘योग्यअयोग्य

एक हिंदू शिक्षक ज्याच्या लेखनांचा मी अभ्यास केला आहे, तो आहे सत्य साईबाबा. मला त्यांच्या नैतिकतेवरील शिकवणी वाखाणण्याजोग्या वाटल्या. मी खाली त्यांच्या शिकवणीचा सारांश मांडत आहे. आपण हे वाचत असतांना स्वतःला विचारा, “हे उत्तम नैतिक नियम जीवनात आचरणासाठी आहेत काय? मी त्यानुसार जगावे काय?”

“आणि धर्म (आपले नैतिक कर्तव्य) काय आहे? आपण जो उपदेश देता त्यानुसार आचरण करणे, असे केले पाहिजे हे जे आपण म्हणता ते करणे, जसे बोलणे तसे चालणे. सन्मार्गाने कमविणे, भक्तिभावाने आस धरणे, देवापर्यंत पोहोचण्यासाठी जगणे: हा धर्म आहे” 

सत्य साई म्हणतो. 4,पृ. 339

“आपले कर्तव्य नक्की काय आहे?”

  • आपल्या आईबापांशी प्रेमाने आणि आदराने आणि कृतज्ञतेने वागा.
  • दुसरे, सत्य बोला आणि सद्वर्तन करा.
  • तिसरे, आपल्याकडे जेव्हा कधी फावला वेळ असला की प्रभुस आपल्या अतःकरणात ठेवून त्याच्या नावाचा जप करा.
  • चैथे, दुसऱ्याविषयी कधीही वाईट बोलू नका अथवा इतरांचे दोष धुंडाळण्याचा प्रयत्न करू नका.
  • आणि शेवटी, इतरांस कसल्याही प्रकारे दुःख देऊ नका” सत्य साई म्हणतो. 4,पृ. 348- 349

“जो कोणी आपल्या अहंकारावर नियंत्रण करतो, त्याच्या स्वार्थी अभिलाषांवर विजय मिळवितो, त्याच्या पाश्विक भावना आणि आवेगांचा नाश करतो आणि शरीराला स्वतःचा मानण्याची नैसर्गिक प्रवृत्ती त्यागतो, तो निश्चितच धर्मांच्या मार्गावर आहे,” धर्म वाहिनी,पृ. 4

हे वाचत असताना मला आढळले की मी ह्या नियमांनुसार जगले पाहिजे – साधे नैतिक कर्तव्य म्हणून आपण सहमत होणार नाही का? परंतु आपण खरोखरच त्याच्याद्वारे जगत आहात काय? आपण (आणि मी) मोजमाप केली आहे का? आणि जेव्हा आपण अयशस्वी होतो किंवा अशा चांगल्या शिक्षणास अनुरूप ठरत नाही तेव्हा काय होते? सत्य साई बाबा खालीलप्रमाणे ह्या प्रश्नांचे उत्तर देत पुढे जातात.

“सर्वसाधारण मी गोड बोलतो, परंतु या शिस्तीच्या बाबतीत मी कोणतीही सूट देणार नाही…. मी काटेकोरपणे आज्ञापालन करण्याचा आग्रह धरीन. तुमच्या पातळीस अनुरूप ठरावे म्हणून मी सक्ती कमी करणार नाही,”

सत्य साई म्हणतो 2, पृ. 186

सक्तीची ती पातळी ठीक आहे – जर आपण पात्रता पूर्ण करू शकत असाल तर. पण आपण जर पात्रता पूर्ण केल्या नाहीत तर काय? येथूनच ‘पाप’ ही संकल्पना येते. जेव्हा आपण लक्ष्य गमावतो, किंवा मला जे केले पाहिजे असे मी जाणतो ते करण्यास जेव्हा मी उणा पडतो तेव्हा मी ‘पाप’ करतो  आणि मी पापी आहे. कोणालाही  ‘पापी’ असल्याचे सांगितलेले आवडत नाही – ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला अस्वस्थ करते आणि दोषी ठरविते आणि खरे म्हणजे आपण हे सर्व विचार टाळण्याच्या प्रयत्नात बरीच मानसिक आणि भावनिक उर्जा खर्ची घालतो. कदाचित आपण सत्य साई बाबाव्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्यातरी शिक्षकाकडे पाहू शकतो, परंतु जर जो ‘चांगला’ शिक्षक असेल तर त्याचे नैतिक नियम अत्यंत समान असतील आणि व्यवहारात उपयोग करण्यासाठी तितकेच कठीण असतील.

बायबल (वेद पुस्तकम्) म्हणते की आपल्या सर्वांना ह्या पापाची भावना अनुभवास येते, मग धर्म किंवा शैक्षणिक पातळी काहीही असेना कारण हा पापाचा बोध आपल्या विवेकबुद्धिने येतो, मग पुस्तकम् हे अशाप्रकारे व्यक्त करते.

कारण ज्यांना नियमशास्त्र नाही असे परराष्ट्रीय (म्हणजे गैर-यहूदी लोक) जेव्हां नियमशास्त्रांत (बायबलमधील दहा आज्ञा आहेत) जे आहे ते स्वभावतः करीत असतात तेव्हां, त्यांना नियमशास्त्र नाही तरी, ते स्वतःच आपले नियमशास्त्र आहेत. म्हणजे ते नियमशास्त्रातील आचार आपल्या अंतःकरणांत  लिहिलेला आहे असे दाखवितात; त्यांच्याबरोबर त्यांची सद्सद्विवेकबुद्धिही त्यांना साक्ष देते आणि त्यांचे एकमेकांविषयीचे विचार दोष लावणारे किंवा दोषमुक्त करणारे असे असतात.

रोमकरांस पत्र 2ः14-15

म्हणूनच लक्षावधी यात्रेकरूंना त्यांच्या पापांची जाणीव होते. बायबल (वेद पुस्तकम्) म्हणते त्याप्रमाणे हे आहे

सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत

रोमकरांस पत्र 3:23

प्रतासन मंत्रात पाप व्यक्त केले आहे

ही कल्पना सुप्रसिद्ध प्रार्थस्नान (किंवा प्रतासन) मंत्रात व्यक्त केली गेली आहे जी मी खाली मांडत आहे

मी पापी आहे. मी पापाचा परिणाम आहे. मी पापात जन्मलो आहे. माझा आत्मा पापात आहे. मी पापी सर्वात वाईट आहे. हे सुदंर डोळे असलेल्या देवा, हे बलिदानाच्या प्रभू, तू मला वाचव.

ह्या विधानाशी आणि या प्रार्थनेच्या विनंतीशी आपण साम्य बाळगत नाही का?

सुवार्ता ‘आपली पापे धुऊन टाकते’

कुंभमेळा यात्रेकरू आणि प्रतासनाचे भक्त ज्या समस्येचा – उपाय शोधत आहेत त्याच समस्येस शुभवर्तमान संबोधित करते. जे त्यांचे ‘झगे’(म्हणजेच त्यांची नैतिक कृत्ये) धुतात त्यांना शुभवर्तमान आशीर्वादाचे अभिवचन देते. हा आशीर्वाद स्वर्गातील (‘नगर) अमरत्वाचा (जीवनाचे झाड) आहे.

आपल्याला ‘जीवनाच्या झाडावर’अधिकार मिळावा व वेशींतून नगरींत आपले जाणे व्हावे म्हणून जे आपले ‘झगे धुतात’ते धन्य.

प्रकटीकरण 22:14

कुंभमेळा उत्सव आपल्या पापांच्या वास्तविकतेची ‘वाईट बातमी’आपल्याला दाखवितो, आणि अशाप्रकारे शुद्धीकरण शोधण्यासाठी त्याने आपल्याला जागृत केले पाहिजे. जरी अशी केवळ दूरवर शक्यता असली तरीही शुभवर्तमानातील हे अभिवचन खरे आहे, ते अत्यंत महत्वाचे आहे, निश्चितच त्याद्दल अधिक सखोलपणे तपास करणे फायदेशीर आहे. या वेबसाइटचा हाच हेतू आहे.

जर आपल्याला सार्वकालिक जीवनात रस असेल तर, जर आपणास पापापासून मुक्त होण्याची इच्छा असेल तर प्रजापती – जगाची आणि आमची उत्पत्ती करणाऱ्या परमेश्वराने – कसे आणि का प्रकट केले आहे, आम्हास स्वर्ग मिळावा म्हणून आम्हास काय दिले आहे यासाठी प्रवास करणे सुज्ञपणाचे ठरेल. आणि वेद आम्हास हे शिकवितात. ऋग्वेदात पुरुषसुक्त आहे जे प्रजापतीच्या देहधारणाचे आणि त्याने आम्हासाठी केलेल्या बलिदानाचे वर्णन करते. बायबल (वेद पुस्तकम) अधिक सविस्तरपणे वर्णन करते की देहधारणाद्वारे मानव इतिहासात ही योजना कशी पूर्ण करण्यात आली, तसेच येशू सत्संगाचे (येशू ख्रिस्त) जीवन व मृत्यू. आपली देखील “पापे धुतली जावी” हे पाहण्यासाठी ह्या योजनेची पडताळणी करण्यासाठी व ती योजना समजून घेण्यासाठी  आपण वेळ का काढू नये?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *