परंतु भ्रष्ट झालेल्या…मध्य-पृथ्वीत राहणार्या ओर्कस् समान

  • by

आमच्या मागील लेखात आम्ही पाहिले की बायबल कशाप्रकारे स्वतःचे व इतरांवे चित्रण करते – की आम्ही देवाच्या प्रतिरूपात घडविलेले आहोत. पण वेद पुस्तकम् (बायबल) ह्या आधारे आणखी काही सांगते. स्तोत्र पवित्र गीतांचा आणि भजनांचा संग्रह आहे ज्याचा उपयोग जुन्या करारातील इब्री लोक देवाच्या उपासनेत करीत असत. स्तोत्र 14 चे लेखन राजा दाविदाने (जो ऋषीयुद्धा होता) सुमारे ख्रि. पू. 1000 मध्ये केले होते; आणि हे स्तोत्र सांगते की गोष्टी देवाच्या दृष्टिकोणातून कशा दिसतात.

2 परमेश्वर स्वर्गातून खाली पाहात होता. त्याला शहाणे लोक शोधायचे होते शहाणेलोक मदतीसाठी देवाकडे वळतात.
3 परंतु प्रत्येकजण देवापासून दूर गेला आहे. सर्वलोक वाईट झाले आहेत. एकही माणूस चांगली गोष्ट करत नव्हता.

स्तोत्र 14:2-3

‘भ्रष्ट झाले आहेत’ ह्या वाक्यप्रयोगाचा उपयोग अखिल मानवजातीचे वर्णन करण्यासाठी केला गेला आहे. कारण हे असे काही आहे जे आम्ही ‘झालो’ आहोत म्हणून भ्रष्ट होण्याचा उल्लेख ‘देवाच्या प्रतिरूपात’ असण्याच्या प्रारंभिक अवस्थेशी संबंधित आहेत. हे म्हणते की आमची भ्रष्टता परमेश्वरापासून जाणूनबुजून स्वतंत्र होण्यामध्ये दिसून येते (‘सर्व’ ‘देवाचा शोध’ घेण्यापासून ‘मार्गभ्रष्ट झाले’ आहेत) आणि तसेच ‘सत्कर्म’ न करण्याबाबतही.

एल्वज आणि ओर्कसविषयी विचार करणे

Orcs were hideous in so many ways. But they were simply corrupt descendants of elves

ओर्कस अनेक बाबतीत घृणास्पद होते. पण ते ओर्कसचे भ्रष्ट वंशज होते

The elves were noble and majestic

एल्वज उदात्त आणि दिमाखदार होते

मध्य पृथ्वीच्या ओर्कसचा हा विचार उत्तमप्रकारे समजून घेण्यासाठी लॉर्ड आफ रिंग्स् अथवा
हॉबिट ही चित्रपटे उदाहरण म्हणून घ्या. ओर्कस् दिसायला अगदी विक्राळ असतात, त्यांचे वागणे, आणि पृथ्वीशी त्यांचे वर्तन अगदी वाईट असते. तथापि ओर्कस् एल्व्जचे वंशज आहे ज्यांस सौरोनने भ्रष्ट केले होते. जेव्हा आपण एल्वजचे (लेगालोसचा विचार करा) भव्यदिव्य ऐश्वर्य, स्वरमेळ आणि निसर्गासोबत असलेले त्यांचे नाते पाहतो आणि आम्हास ही जाणीव होते की अधम ओर्कस् एकेकाळी एल्वज होते जे ‘भ्रष्ट झाले’ तेव्हा लोकांविषयी येथे जे काही म्हटले गेले आहे त्याची जाणीव होईल. देवाने एल्वजची उत्पत्ती केली पण ते ओर्कस् बनून गेले आहेत.

लोकांची सार्वत्रिक प्रवृत्ती म्हणून आपण जे पाहिले त्याच्याशी हे अगदी अनुरूप बसते आपल्या पापाची जाणीव असणे आणि शुद्धिकरणाची गरज – जसे कुंभ मेळाव्याच्या उत्सवात दाखविण्यात आले आहे. अशाप्रकारे आपण एका दृष्टिकोणाप्रत येऊन पोहोचतो जो अत्यंत उद्बोधक आहे : बायबलची सुरूवात संवदेनशील, वैय्यक्तिक, आणि नैतिक अशा लोकांसोबत होते, पण नंतर भ्रष्ट लोकांशी सुद्वा होते, आणि आम्ही स्वतःविषयी जे निरीक्षण करतो त्याच्याशी हे अनुरूप बसते. बायबल लोकांचे अगदी अचूक मूल्यमापन करते, आमच्यात अंगभूत असलेला नैतिक स्वभाव ओळखून ज्याच्याकडे सहज कानाडोळा केला जातो कारण आमचा स्वभाव आम्हास जी मागणी करतो त्याच्याशी खरे म्हणजे आमच्या कार्यांचा कधीही जम बसत नाही – या भ्रष्टतेमुळे. बायबलची विचारसरणी मानवास अगदी तंतोतत जुळते. तथापि, ती एक स्पष्ट प्रश्न उभा करते : देवाने आम्हास असे का घडविले – नैतिक होकायंत्रासोबत आणि तरीही त्यापासून भ्रष्ट झालेला? जसे प्रसिद्ध नास्तिक क्रिस्टोफर हिचेन्स तक्रार करतो :

“…लोकांनी अशा विचारांपासून मुक्त असले पाहिजे असे जर देवास खरोखर वाटले असते (अर्थात, भ्रष्ट विचार), तर वेगळ्या प्रजातीचा शोध लावण्याबाबत त्याला आणखी काळजी घ्यावयास हवी होती.” क्रिस्टोफर हिचेन्स. 2007. गाड इज नाट ग्रेट : हाऊ रिलिजन स्पाईल्स एव्हरीथिंग. पृ. 100

पण ह्याच ठिकाणी बायबलवर टीका करण्याची घाई केल्यामुळे तो एक महत्वाचा मुद्दा विसरून जातो. बायबल असे म्हणत नाही की देवाने आम्हास अशाप्रकारे घडविले, पण प्रारंभिक उत्पत्तीपासून ही कठीण परिस्थिती घडवून आणावी असे काहीतरी भयानक घडले होते. आमच्या उत्पत्तीनंतर मानव इतिहासात एक महत्वाची घटना घडली. प्रथम मनुष्यांनी देवाची अवहेलना केली, उत्पत्तीच्या पुस्तकात – बायबलमधील (वेद पुस्तक) प्रथम आणि सर्वात आरंभीचे पुस्तक – यात नमूद केल्याप्रमाणे, आणि ही अवहेलना करतांना ते बदलून गेले आणि भ्रष्ट झाले. म्हणूनच आपण तमस, अथवा अंधारात जगत आहोत.

मानवजातीचे पतन

मानवजातीच्या इतिहासातील या घटनेस बरेचदा पतन म्हटले जाते. प्रथम मानव, आदामास, देवाने घडविले. देव आणि मानव यांच्यामध्ये एक करार होता, वैवाहिक जीवनातील विश्वासूपणाच्या करारासमान, आणि आदामाने त्याचे उल्लंघन केले. बायबल नमूद करते की आदामाने जरी तो त्या झाडाचे फळ खाणार नाही असे कबूल केले होते तरी त्याने ‘बर्‍यावाइटाचे ज्ञान करून करून देणा र्‍या झाडाचे’ फळ खाल्ले. ह्या कराराने आणि स्वतः झाडाने, देवाप्रत विश्वासू राहावे किंवा नाही याविषयी स्वतंत्र निवड दिली होती. आदामास देवाच्या स्वरूपात घडविण्यात आले होते, आणि देवाशी मैत्रीचे नाते स्थापन करण्यात आले होते. पण आदामास त्याच्या उत्पत्तीसंबंधाने कुठलाही पर्याय नव्हता, म्हणून देवासोबत त्याच्या मैत्रीविषयी निवड करण्याचे स्वातंत्र्य देवाने त्याला दिले होते. ज्याप्रमाणे जर बसणे अशक्य असेल तर उभे राहण्याचा पर्याय खरा नाही, त्याचप्रमाणे देवासोबत आदामाच्या मैत्रीस व विश्वासास पर्याय नव्हता. ही निवड अथवा पर्याय ह्या आज्ञेवर केन्द्रित होता की त्याने त्या एका झाडाचे फळ खाता कामा नये. पण आदामाने बंड करण्याची निवड केली. ज्या बंडाची आदामाने सुरूवात केली ती न-थांबता सर्व पिढ्यांत पुढे वाढत आली आहे आणि आजही सुरू आहे. याचा अर्थ काय आहे हे आपण पुढे पाहू या.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *