Skip to content

दहा आज्ञा : कलियुगातील कोरोना व्हायरस चाचणीसमान

  • by

सर्वसामान्यतः असे समजले जाते की आपण कलियुगात अथवा कालीच्या युगात जगत आहोत. हे चार युगांतील शेवटचे युग आहे, ज्याची सुरूवात सत्य युग, त्रेता युग आणि द्वापर युग यापासून होते. या चार युगांमध्ये जे सामान्य आहे ते म्हणजे पहिल्या सत्य युगापासून (सत्ययुग) सांप्रत कलियुगापर्यंत स्थिर नैतिक आणि सामाजिक पतन.

महाभारतात मार्कंडेय कलियुगातील मानवी वर्तनाचे वर्णन अशाप्रकारे वर्णन केले आहे :

क्रोध, संताप आणि अज्ञानात वाढ होईल

धर्म, सत्यता, स्वच्छता, सहनशीलता, दया, शारीरिक बळ आणि स्मरणशक्ती ही प्रत्येक दिवसानुसार कमी होत जातील.

लोकांच्या मनात हत्येचे विचार असतील ज्याचे समर्थन करता येत नाही आणि त्यात त्यांना काहीही चुकीचे दिसणार नाही.

वासनेस सामाजिक दृष्टिकोनातून स्वीकार्य मानले जाईल आणि लैंगिक संभोगाकडे जीवनाची मुख्य आवश्यकता म्हणून पाहिले जाईल.

पापाची मोठ्या प्रमाणात वाढ होईल, तर पुण्य कमी होत जाईल आणि त्याची भरभराट थांबेल.

लोकांना मादक पेयपदार्थांचे आणि मादक औषधांचे व्यसन लागेल.

गुरुजनांचा यापुढे मान राखला जाणार नाही आणि त्यांचे विद्यार्थी त्यांना इजा करण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्या शिकवणीचा अपमान केला जाईल आणि कामाचे अनुयायी सर्व मानवांकडून मनावरील नियंत्रण बळकावून घेतील.

सर्व माणसे स्वतःला देवता किंवा देवतांनी दिलेले वरदान घोषित करतील आणि शिकवणीऐवजी त्याला व्यवसाय बनवतील.

लोक यापुढे लग्न करणार नाहीत आणि फक्त लैंगिक सुखासाठी एकमेकांसोबत राहतील.

मोशे दहा आज्ञा

इब्री वेद आपल्या सांप्रत युगाचे वर्णन बहुंताशी त्याचप्रकारे करतात. आपल्या पातकी प्रवृत्तीमुळे, वल्हांडण सणानिमित्त मिसर देशातून बाहेर गेल्यानंतर लवकरच देवाने मोशेला दहा आज्ञा दिल्या. मोशेचे ध्येय इस्राएल लोकांना फक्त मिसर देशातून बाहेर काढून नेणे नव्हते, तर त्यांना जीवन जगण्याच्या नवीन पद्धतीकडे मार्गदर्शन करणे हे होते. म्हणून इस्राएली लोकांची सुटका करणार्‍या वल्हांडणाच्या पन्नास दिवसानंतर,  मोशेने त्यांना सीनाय पर्वताकडे (होरेब पर्वत) नेले जेथे त्यांना देवाकडून नियमशास्त्र प्राप्त झाले. कलियुगातील अडचणी दूर करण्यासाठी हे नियमशास्त्र कलियुगात प्राप्त झाले होते.

मोशेला कोणत्या आज्ञा देण्यात आल्या? संपूर्ण नियमशास्त्र बरेच लांब होते, पण मोशेला प्रथम दगडी पाट्यांवर देवाने लिहिलेल्या विशिष्ट नैतिक आज्ञेचा एक संच प्राप्त झाला, ज्याला दहा आज्ञा (किंवा डेकॅलाग) म्हणतात. ह्या दहा आज्ञांद्वारे नियमशास्त्राचा सारांश तयार झाला – अगदी लहान तप शीलांपूर्वी नैतिक धर्म – आणि ते आता कलियुगातील सामान्य पापांबद्दल पश्चाताप करण्यासाठी प्रवृत्त करणारे देवाचे सक्रिय  सामर्थ्य आहेत.

दहा आज्ञा

दगडावर देवाने लिहिलेल्या, दहा आज्ञांची संपूर्ण यादी येथे आहे, जी नंतर मोशेने हिब्रू वेदांमध्ये नोंदविली.

ग देव म्हणाला,
2 “मी याव्हे तुझा प्रभू, तुझा देव आहे. तुम्ही मिसरमध्ये गुलाम होता तेव्हा मीच तुम्हाला तेथून गुलामगिरीतून सोडवून आणले.
3 “माझ्या शिवाय इतर कोणत्याही दैवतांची तू उपासना करु नयेस.
4 “तू आपल्यासाठी कोरीव मूर्ती करु नकोस; वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वीखालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करु नकोस;
5 त्यांची उपासना करू नको; किंवा त्यांची सेवा करु नकोस; कारण मी परमेश्वर तुझा देव आहे;मी ईर्ष्यावान देव आहे, जे माझ्याविरुद्ध पाप करतात, माझा द्वेष करतात ते माझे शत्रू बनतात; मी त्यांना शिक्षा करीन; मी त्यांच्या मुलांना तिसऱ्या चौथ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अपराधाबद्दल शिक्षा करतो;
6 परंतु जे माझ्यावर प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करतो.
7 “परमेश्वर देवाचे नांव तू व्यर्थ घेऊ नकोस; परमेश्वराच्या नांवाचा उपयोग तू अयोग्य गोष्टीसाठी करु नकोस; जर कोणी तसे करील तर तो दोषी ठरेल आणि परमेश्वर त्याला निर्दोष ठरविणार नाही.
8 “शब्बाथ दिवस हा पवित्र दिवस म्हणून पाळण्याची आठवण ठेव;
9 आठवड्यातील सहा दिवस तू तुझे कामकाज करावेस;
10 परंतु सातवा दिवस तुझा देव परमेश्वर याच्या सन्मानासाठी विसाव्याचा दिवस आहे म्हणून त्या दिवशी तू, तुझे मुलगे तुझ्या मुली, तुझे गुलाम व तुझ्या गुलाम स्त्री यांनी तसेच तुझी गुरेढोरे व तुझ्या गावात राहाणाऱ्या परकीयांनीही कोणतेही कामकाज करु नये;
11 कारण परमेश्वराने सहा दिवस काम करून आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यांतील सर्व काही उत्पन्न केले आणि त्यानंतर सातव्या दिवशी विसावा घेतला; या प्रमाणे परमेश्वराने शब्बाथ दिवस हा विसाव्याचा विशेष दिवस म्हणून आशीर्वाद देऊन तो पवित्र केला आहे.
12 “तू आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख म्हणजे त्यामुळे परमेश्वर तुझा देव जो देश तुला देत आहे त्या देशात तुला दीर्घायुष्य लाभेल.
13 “कोणाचाही खून करु नकोस.
14 “व्यभिचार करु नकोस.
15 “चोरी करु नकोस.
16 “तू आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नकोस.
17 “तू आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरु नकोस; त्याच्या बायकोचा लोभ धरु नकोस; त्याचा गुलाम, त्याची स्त्री गुलाम, बैल, गाढव किंवा त्याच्या मालकीचे जे काही असेल त्या कशाचाही लोभ धरु नकोस.”

निर्गम 20:1-18

दहा आज्ञाचा मानक

आज आपण कधीकधी विसरून जातो की ह्या आज्ञा आहेत. त्या सूचविण्यात आलेल्या बाबी नाहीत. किंवा त्या शिफारसी देखील नाहीत. परंतु या आज्ञा आपण किती प्रमाणात पाळल्या पाहिजेत? दहा आज्ञा देण्याच्या अगदी आधी खालील वचन येते.

  3 मग मोशे पर्वतावर देवाला भेटावयास गेला तो पर्वतावर असताना देव त्याला म्हणाला, “तू या इस्राएल लोकांना म्हणजे याकोबाच्या वंशजांना सांग,
4 ‘मी माझ्या शत्रुंचे काय करतो ते तुम्ही पाहिले आहे. मिसरच्या लोकांचे मी काय केले आहे आणि गरुड पक्षी आपल्या पिल्लांना सुरक्षित जागी जसा नेतो तसेच मिसरच्या लोकांच्या तावडीतून सुरक्षितपणे तुम्हाला येथे आणले तेही तुम्ही पाहिले आहे.
5 म्हणून मी आता तुम्हाला सांगतो की तुम्ही माझ्या आज्ञांचे व माझ्या कराराचे पालन करावे; असे तुम्ही कराल तर तुम्ही खास माझे लोक व्हाल हे सर्व जग माझे आहे परंतु त्यातील सर्व लोकांतून मी तुम्हाला निवडून घेईन आणि तुम्ही खास माझे लोक व्हाल.

निर्गम 19:3,5

हे दहा आज्ञेच्या अगदी नंतर देण्यात आले

  7 मग मोशेने गुंडाळी पत्रात लिहिलेला विशेष करार सर्वानी ऐकावा म्हणून वाचून दाखविला आणि मग लोक म्हणाले, “परमेश्वराने दिलेल्या आज्ञा आम्ही ऐकल्या आहेत; त्या आम्ही पाळू असे आम्ही कबूल करतो.”

निर्गम 24:7

कधीकधी शालेय परीक्षांमध्ये, शिक्षक अनेक प्रश्न (उदाहरणार्थ 20) देतात परंतु त्यानंतर फक्त काही प्रश्नांची उत्तरे द्यावयाची असतात. आम्ही, उदाहरणार्थ, उत्तर देण्यासाठी 20 पैकी कोणतेही 15 प्रश्न निवडू शकतो. प्रत्येक विद्यार्थी त्याचे/तिचे उत्तर देण्यासाठी सर्वात सोपे 15 प्रश्न निवडू शकतो. अ शाप्रकारे शिक्षक परीक्षा आणखी सुलभ करतो.

अनेक जण दहा आज्ञांविषयी असाच विचार करतात. त्यांना वाटते की दहा आज्ञा दिल्यानंतर, देवाचा असा अर्थ होता की, “या दहांपैकी कोणत्याही सहांची निवड करण्याचा प्रयत्न करा”. आम्ही अ शाप्रकारे विचार करतो कारण आपण अशी कल्पना करतो की देव आपल्या ‘वाईट कृत्यांच्या’ तुलनेत आपल्या ‘सत्कृत्यांची’ मोजमाप करीत आहे. जर आपली सत्कृत्ये वजनात अधिक असली अथवा त्यांनी आमच्या वाईट उणीवांस रद्द केले, तर आम्ही आशा करतो की हे देवाची कृपा मिळविण्यासाठी पुरेसे आहे.

तथापि, प्रामाणिकपणे दहा आज्ञा वाचताना असे दिसून येते की ते असे देण्यात आले नव्हते. लोकांस सर्व  आज्ञा पाळावयाच्या आहेत आणि त्यांचे पालन करावयाचे आहे – सर्व वेळ. यात आलेल्या निव्वळ अडचणीमुळे बरेच जण दहा आज्ञा खारीज करतात. परंतु कलियुगात येणार्‍या परिस्थितींसाठी त्या कलियुगात देण्यात आल्या होत्या.

दहा आज्ञा कोरोनाव्हायरस चाचणी

२0२0 मध्ये जगभर पसरलेल्या कोरोनाव्हायरस संक्रमणाशी तुलना करून कलियुगातील कठोर दहा आज्ञांचा हेतू कदाचित आपल्याला अधिक चांगल्याप्रकारे समजू शकतो. कोविड -19 ह्या आजारात ताप, खोकला आणि श्वास घेण्यात त्रास ही लक्षणे दिसून येतात जी कोरोनाव्हायरसमुळे  येतात – इतके लहान असे काही जे आम्ही पाहू शकत नाही.

समजा एखाद्याला ताप वाटत असेल व त्याला खोकला असेल. या व्यक्तीच्या मनात विचार येतो की समस्या काय आहे. त्याला/तिला सामान्य ताप आहे की कोरोनाव्हायरसचा संसर्ग झाला आहे? तसे असल्यास ही एक गंभीर समस्या आहे – अगदी जीवघेणी समस्या. कोरोनाव्हायरस इतक्या वेगाने पसरत आहे आणि प्रत्येकजण संवेदनाक्षम असावा ही खरी शक्यता आहे. हे जाणून घेण्यासाठी ते एक विशेष तपासणी करतात जे कोरेनाव्हायरस त्यांच्या शरीरात आहे किंवा नाही हे ठरविते. कोरोनाव्हायरस चाचणी त्यांचा आजार बरा करीत नाही, तर केवळ निश्चितपणे हे सांगते की त्यांना सामान्य ताप आहे, किंवा त्यांच्यात कोरोनाव्हायरस आहे ज्यामुळे कोविड – 19 होईल.

दहा आज्ञांचे देखील तसेच आहे. कलियुगात नैतिक पतन तितकेच प्रचलित आहे जितका की २0२0 मध्ये कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव आहे. सर्वसाधारण नैतिक दुर्गुणाच्या या युगात आपण स्वतः नीतिमान आहोत का अथवा पापाने कलंकित आहोत हे जाणून घेऊ इच्छितो. दहा आज्ञा यासाठी देण्यात आल्या होत्या की त्यांच्या मदतीने आम्ही आपल्या जीवनाचे परीक्षण करावे व त्याद्वारे हे जाणून घ्यावे की आपण पापापासून आणि त्यासोबत येणार्‍या कर्मापासून मुक्त आहोत का, अथवा पापाचा आपल्यावर पगडा आहे. दहा आज्ञा कोरोनाव्हायरस चाचणी प्रमाणेच कार्य करतात – यासाठी की आपण हे जाणावे की आपल्याला हा रोग (पाप) आहे का किंवा आपण त्यापासून मुक्त आहात.

पापाचा शब्दशःअर्थ आहे लक्ष्य ‘चुकणे’ ज्याविषयी देव आपल्याकडून अपेक्षा करतो की आपण इतरांस कसे वागवितो, स्वतःशी आणि देवाशी कसे वर्तन करतो. पण आपली समस्या ओळखण्याऐवजी आपण स्वतःची तुलना इतरां शी (चुकीच्या निकषाच्या विरोधात स्वतःचे मूल्यमापन करण्याद्वारे) करण्याची प्रवृत्ती बाळगतो, धार्मिक गुणवत्ता मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतो, अथवा ते सोडून फक्त सुखविलासासाठी जगतो. म्हणून देवाने दहा आज्ञा दिल्या यासाठी की :

20 नियमशास्त्राच्या कर्मांनी कोणीही देवासमोर नीतिमान ठरणार नाही. कारण नियमशास्त्राद्वारे पापाची जाणीव होते.

रोम. 3:20

जर आपण दहा आज्ञांच्या मानकांविरुद्ध आपल्या जीवनाचे परीक्षण केले तर ते अंतर्गत समस्या दाखविणार्‍या कोरोनाव्हायरस चाचणी घेण्यासारखे ठरते. दहा आज्ञा आपल्या समस्येचे ‘निराकरण’ करीत नाहीत,  परंतु त्या समस्या स्पष्टपणे प्रकट करतात ज्यायोगे देवाने दिलेला उपाय आपण स्वीकारू. स्वतःची फसवणूक करून घेण्याऐवजी, नियमशास्त्र आम्हाला स्वतःला अचूकपणे पाहण्याची परवानगी देतो.

पश्चातापाठायी देवाने दिलेले कृपादान                                      

देवाने केलेला उपाय म्हणजे येशू ख्रिस्ताचा मृत्यू आणि पुनरुत्थान याद्वारे पापक्षमेची देणगी – येशूसत्संग. जर आपला विश्वास अथवा भरवंसा येशूच्या कार्यावर असेल तर जीवनाचे हे दान आपल्याला देण्यात आलेले आहे.  

16 तरीही आम्हांला माहीत होते की, मनुष्यनियमशास्त्रातील कृत्यांनी नीतिमान ठरत नाही, तर येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याने ठरतो, म्हणून आम्ही आमचा विश्वासयेशू ख्रिस्तावर ठेवला आहे. यासाठी की, ख्रिस्तावरील विश्वासाने आम्ही नीतिमान ठरावे, नियमशास्त्रातील कृत्यांनी नव्हे.कारण कोणीही देहधारी मनुष्य नियमाशास्त्रातील कृत्यांनी नीतिमान ठरणार नाही.

गलतीकरांस पत्र 2:16

जसा श्री अब्राहाम हा देवासमोर नीतिमान ठरला तसे आपणासही नीतिमत्त्व मिळू शकते. पण त्यासाठी हे जरूरी आहे की आम्ही पश्चाताप करावा. पश्चातापाबाबत आपण बरेचदा गैरसमज बाळगतो, परंतु पश्चाताप म्हणजे ‘आपली मने बदलणे’ आहे ज्यात  पापांपासून दूर जाणे आणि देवाकडे आणि तो देत असलेल्या देणगीकडे वळणे होय. वेद पुस्तकम् (बायबल) स्पष्ट करते :

19 म्हणून तुम्ही तुमची ह्रदये व जीवने बदलली पाहिजेत! देवाकडे परत या आणि तो तुमच्या पापांची क्षमा करील.

प्रेषितांची कृत्ये 3:19

आपणासाठी आणि माझ्यासाठी अभिवचन हे आहे की जर आपण  पश्चाताप केला, आणि देवाकडे वळलो, तर आमची पापे आमच्या लेखी जोडली जाणार नाहीत आणि आम्हास जीवन प्राप्त होईल. देवाने, आपल्या थोर दयेस स्मरून, आपल्याला कलियुगातील पापाची चाचणी व लस ही दोन्ही दिली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *