बलिदानाची सार्वत्रिक गरज

  • by

लोक ऋषी-मुनींना जुन्या काळापासून माहीत होते की लोक भ्रमात आणि पापात जगत आहेत. त्याचा परिणाम म्हणून सर्व धर्मातील, वयोगटातील आणि शैक्षणिक पात्रता असलेल्यांना अंतर्जात जाणीव आहे की त्यांना ‘शुद्ध होण्याची’ गरज आहे. म्हणूनच अनेक लोक कुंभमेळ्याच्या उत्सवात भाग घेतात आणि लोक पूजा करण्यापूर्वी प्रार्थस्नान (किंवा प्रतासना) मंत्र म्हणतात (“मी पापी आहे. मी पापाचा परिणाम आहे. मी पापात जन्मलो आहे. माझा आत्मा पापाच्या अधीन आहे. मी सर्वात दुष्ट पापी आहे. हे प्रभू ज्याचे डोळे सुंदर आहेत, मला वाचव, हे बलिदान करणार्‍या प्रभू”).  शुद्धीकरणाच्या ह्या अंतर्जात गरजेसोबतच आपल्या पापांसाठी अथवा आमच्या जीवनाच्या अंधकारासाठी (तमस) बलिदान करण्याच्या गरजेची जाणीव आहे. आणि पुन्हा एकदा बलिदान देण्याची ही अंतर्जात गरज पुरविण्यासाठी पूजेच्या बलिदानात, अथवा कुंभमेळाव्यात आणि इतर सणांत लोक वेळ, पैसा, तपश्चर्या यांचे बलिदान करतात. मी अशा लोकांविषयी ऐकले आहे जे नदीत पोहणार्‍या  गायीचे शेपूट धरतात. क्षमा प्राप्त करण्यासाठी पूजा अथवा यज्ञ म्हणून ते असे करतात.

सर्वात प्राचीन ग्रंथ जेव्हापासून अस्तित्वात आहेत अगदी तेव्हापासूनच बळी देण्याची ही गरज अस्तित्वात आहे. आणि आमची अंतःप्रेरणा आम्हाला जे सांगते त्याची हे ग्रंथ पुष्टी करतात – की बलिदान अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि ते दिलेच पाहिजे. उदाहरणार्थ खालील शिकवणींचा विचार करा :

कथोपनिषदात (हिंदू ग्रंथ) नायक नचिकेत म्हणतो :

”मला खरोखर माहीत आहे की अग्नीचा यज्ञ स्वर्गास नेतो आणि स्वर्गास जाण्याचा मार्ग आहे”

कथोपनिषद 1.14

हिंदूंचा ग्रंथ म्हणतो :

”बलिदानाद्वारेच मनुष्य स्वर्गास पोहोचतो” शतपथ

ब्राह्मण 8.6.1.10

”बलिदानाद्वारे, केवळ मनुष्यच नव्हे तर देवता सुद्धा अमरत्व प्राप्त करतात” शतपथ

ब्राह्मण 2.2.8-14.

अशाप्रकारे बलिदानाच्या द्वारे आपणास अमरत्व प्राप्त होते आणि स्वर्ग लाभतो (मोक्ष). पण तरीही प्रश्न तसाच राहतो की आमच्या पापांविरुद्ध/तमाविरुद्ध पुरेसे पूण्य कमविण्यासाठी अथवा ‘भरपाई’ करण्याची गरज पुरविण्यासाठी कुठल्याप्रकारचे बलिदान केले पाहिजे आणि किती पुरेसे होईल? 5 वर्षांची तपश्चर्या पुरेशी होईल काय? गरीबांस पैसा देणे पुरेसे बलिदान होईल काय? आणि असे असल्यास, किती?

प्रजापती/याहवे : परमेश्वर देव जो बलिदानाद्वारे तरतूद करतो

प्रारंभिक वेद ग्रंथांत, समस्त सृष्टीच्या प्रभू परमेश्वरास – ज्याने ब्रम्हांडाची उत्पत्ती केली आणि त्यावर नियंत्रण ठेविले – प्रजापती म्हटले होते. प्रजापतीद्वारे बाकी सर्वकाही अस्तित्वात आले.

वेद पुस्तकमच्या (बायबल) प्रारंभिक हिब्रू ग्रंथास तोरा म्हणतात. तोराचे लेखन सुमारे ई. पू. 1500 मध्ये झाले, ज्यावेळी ऋग्वेदाची रचना झाली त्यावेळी. तोराची सुरूवात ह्या घोषणेने होते की जिवंत परमेश्वर आहे जो समस्त विश्वासाचा उत्पन्नकर्ता आहे. मूळ हिब्रू ग्रंथाच्या लिप्यंतरणात या देवास एलोहीम किंवा याहवे म्हटले होते आणि ह्या हिब्रू ग्रंथात त्यांचा उपयोग आलटूनपालटून करण्यात आला आहे. अशाप्रकारे, ऋग्वेदातील प्रजापतीप्रमाणे, तोरातील याहवे, अथवा एलोहीम, समस्त सृष्टीचा प्रभू होता (आणि आहे).

प्रारंभी तोरामध्ये, यहोवा सुद्धा अब्राहाम नावाच्या ऋषीला दिलेल्या उल्लेखनीय भेटीत स्वतःला ‘तरतूद करणारा’ प्रभू म्हणून प्रकट करतो. तरतूद करणारा यहोवा (हिब्रू भाषेतून याव्हे-यिरे म्हणून लिप्यंतरित) आणि ऋग्वेदातील प्रजापती जो ‘सर्व प्राणीमात्रांचा रक्षक आणि पालनकर्ता’ आहे.

याहवे कशाप्रकारे तरतूद करतो? आम्ही आधीच बलिदान देण्यासाठी लोकांची अंतर्जात गरज पाहिली आहे, पण ह्या आश्वासनावाचून की जे बलिदान आपण घेऊन येतो ते पुरेसे आहे. मनोरंजक गोष्ट ही आहे की आमच्या गरजेच्या ह्या विशिष्ट क्षेत्रात तांड्यामहा ब्राम्हणा हे जाहीर करतो की प्रजापती कशाप्रकारे आमची गरज पुरवितो. त्यात म्हटले आहे : 

”स्वतःचे बलिदान केल्यानंतर प्रजापतीने (समस्त सृष्टीचा प्रभू) स्वतःस देवांकरिता अर्पण केले”

तांड्यामहा ब्राम्हणा, 2 र्‍या खंडाचा 7 वा अध्याय.

(संस्कृत लिप्यंतरण आहे ”प्रजापतिर्द्देवेभ्यम् अत्मनम्यज्नम्क्र्त्व प्रयच्चत“).

येथे प्रजापती एकवचन आहे. केवळ एकच प्रजापती आहे, जसे तोरामध्ये केवळ एकच यहोवा आहे. नंतर पुराण साहित्यात (सन 500 पासनू – 1000 पर्यंत लेखन) अनेक प्रजापतींची ओळख घडून येते. पण वर उद्धृत प्रारंभीच्या ग्रंथात प्रजापती एकवचन आहे. आणि ह्या वाक्यात आपण पाहतो की स्वतः प्रजापती बलिदान देतो अथवा बलिदान आहे आणि तो ते इतरांच्या वतीने देते. ऋग्वेद असे म्हणून या गोष्टीची पुष्टी करतो: 

”खरे बलिदान स्वतः प्रजापती आहे” (संस्कृत: ‘पाजपात्र्यज्ञः’)

संस्कृत विद्वान एच. अग्विलर यांनी खालीलप्रमाणे भाषांतर करून शतपथ ब्राम्हणावर आपले विचार व्यक्त केले आहेत :

“आणि खरोखर, एका प्रजापतीस सोडून बलिदानास योग्य असा दुसरा (बळी) कोणी नव्हता, आणि देवता त्याला बलिदान म्हणून अर्पण करण्याच्या कामी लागले. म्हणूनच या संदर्भात ऋषीने म्हटले आहे: ‘देवतांनी त्याला बलिदानाच्या मदतीने बलिदान म्हणून अर्पण केले – कारण बलिदानाच्या मदतीने – त्यांना त्याला (प्रजापती), बलिदान म्हणून अर्पण केले – हे पहिले नियम होते, कारण या नियमांची प्रथम स्थापना करण्यात आली” एच. अग्विलर, सॅक्रिफाईस इन ऋग्वेदा

आरंभापासूनच वेदग्रंथ ही घोषणा करतात की यहोवा अथवा प्रजापतीने आमची गरज ओळखली म्हणून त्याने आम्हासाठी स्वतःठायी बलिदानाची पूर्तता केली. त्याने हे कसे केले याविषयी आपण नंतरच्या लेखांत पाहू कारण आपण ऋग्वेदातील पुरुषसूक्ताच्या पुरुष-प्रजापती बलिदानावर लक्ष केन्द्रित करणार आहोत, पण सध्या विचार करू या की हे किती महत्वाचे आहे. श्वेताश्वतरोपनिषद् म्हणते

‘सार्वकालिक जीवनात जाण्याचा दुसरा कोणताही मार्ग नाही (संस्कृत: नान्यह्पन्थ विद्यते – अयनय)

श्वेताश्वतरोपनिषद् 3ः8

जर आपणास सार्वकालिक जीवनात रस असेल, जर आपणास मोक्षाची किंवा आत्मज्ञानाची इच्छा असेल तर प्रजापतीने (किंवा यहोवा) आपणास स्वर्गप्राप्ती व्हावी म्हणून स्वतःच्या बलिदानाद्वारे आपल्यासाठी कशी व का तरतूद केली याविषयी काय सांगितले गेले आहे हे पाहण्यासाठी पुढे प्रवास करणे शहाणपणाचे ठरेल. आणि वेद आपल्याला अनिश्चित स्थितीत सोडत नाही. ऋग्वेद हे पुरुषसुक्त आहे जे प्रजापतीचा देहावतार आणि त्याने आपल्यासाठी केलेल्या बलिदानाचे वर्णन करते. येथे आपण पुरूषसुक्ताची ओळख करून देतो जे पुरुषाचे वर्णन अगदी तसेच करते जसे बायबल (वेद पुस्तकम्) येशूसत्संगचे (नासरेथचा येशू) आणि आम्हास मोक्ष किंवा मुक्ति (अमरत्व) मिळावी म्हणून त्याने केलेल्या बलिदानाचे वर्णन करते. येथे आपण थेट येशूच्या (येशूसत्संग) बलिदानाकडे आणि त्याने आम्हास दिलेल्या देणगीकडे पाहू.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *