Skip to content

संस्कृत आणि हिब्रू वेदांचे अभिसरण: का?

  • by

आपण संस्कृत वेदात मनूचा वृत्तांत आणि हिब्रू वेदात नोहाचा वृत्तांत यांतील साम्य पाहिले. त्यांतील साम्य जलप्रलयाच्या वृत्तांतापेक्षा अधिक सखोल जाते. तसेच समयाच्या पहाटे पुरुषाच्या बलिदानाचे अभिवचन आणि उत्पत्तीच्या हिब्रू पुस्तकात देण्यात आलेले संततीचे अभिवचन यांत सुद्धा साम्य आहे. आपण हे साम्य का पाहतो? योगायोग? एक वृत्तांत येणार्‍या सिद्धांतातून घेतो अथवा चोरी करतो? एक सूचना देण्यात आली आहे.

बाबेलचा बुरूज जलप्रलयानंतर

नोहाच्या वृत्तांतानंतर, वेद पुस्तकम् (बायबल) त्याच्या तीन पुत्रांच्या संततीची नोंद करते आणि सांगते “जलप्रलयानंतर त्याची पृथ्वीवर भिन्न भिन्न राष्ट्रे झाली.” . संस्कृत वेद सुद्धा जाहीर करते की मनूला तीन मुले होती ज्यांच्यापासून सर्व मानवजात उत्पन्न झाली. पण हे ‘पसरणे’ कसे घडले?

उत्पत्ती 10:32

प्राचीन हिब्रू वेदात नोहाच्या ह्या तीन पुत्रांच्या संततीच्या नावांची मांडलेली आहे – येथे यादी संपूर्ण आहे. हा वृत्तांत पुढे वर्णन करतो की कशाप्रकारे ह्या वंशाजांनी परमेश्वराच्या (प्रजापति) – उत्पन्नकर्ता, ज्याने ज्यांस आज्ञा दिली की त्यांनी पृथ्वी ‘व्यापून टाकावी (उत्पत्ती 9:1) आज्ञेचे उल्लंघन केले. त्याऐवजी हे लोक बुरूज बांधण्यासाठी एकत्र राहिले. ते येथे आपण वाचू शकता. हा बुरूज ‘आकाशास पोहोचला’ (उत्पत्ती 11:4) ज्याचा अर्थ हा आहे की नोहाचे हे वंशज उत्पन्नकर्त्याऐवजी तारांगण आणि सूर्य, चंद्रमा, ग्रह इत्यादींची उपासना करण्याच्या हेतूने बुरूज बांधत होते. हे सुप्रसिद्ध आहे की तारकांच्या उपासनेचा आरंभ मेसोपोटेमिया (जेथे हे वंशज राहत होते) झाला आणि मग ती उपासना सर्व जगभर पसरली.

म्हणून उत्पन्नकर्त्याची उपासना करण्याऐवजी, आमचे पूर्वज ताऱ्याची उपासना करू लागले. हा वृत्तांत पुढे म्हणतो की हे विफल करण्यासाठी, जेणेकरून उपासनेची भ्रष्टता अपरिवर्तनीय होऊ नये, म्हणून उत्पन्नकर्त्याने हे ठरविले

…आपण खाली जाऊन यांच्या भाषेचा घोटाळा करू म्हणजे यांस एकमेकांची भाषा समजावयाची नाही.

उत्पत्ती 11:7

याचा परिणाम म्हणून, नोहाच्या ह्या एकमेकांचे समजेना आणि अशाप्रकारे उत्पन्नकत्र्या देवाने

तेथून त्यांस सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगविले

उत्पत्ती 11:8

या लोकांस एकमेकांशी बोलता येईना, म्हणून ते एकमेकांपासून दूर झाले, आपल्या नवीन भाषागटांत, आणि अशाप्रकारे ते ‘पांगले’. यावरून हे स्पष्ट होते की आज जगातील वेगवेगळे जनसमूह अत्यंत वेगवेगळ्या भाषा का बोलतात, कारण प्रत्येक जनसमूह मेसोपोटेमियातील (कधी कधी अनेक पिढ्यानंतर) त्यांच्या मूळ केंद्रातून अशा ठिकाणी पसरला जेथे आज ते आढळतात. अशाप्रकारे,  ह्या बिंदुपासून पुढे त्यांचे क्रमशः इतिहास भिन्न होतात. पण ह्या क्षणापर्यंत प्रत्येक भाषागटाचा (ज्याद्वारे ही पहिली राष्ट्रे घडून आलीत) सामान्य इतिहास होता. ह्या सामान्य इतिहासात पुरुषाच्या बलिदानाद्वारे मोक्षाचे अभिवचन आणि मनूचा (नोहा) जलप्रलयाचा वृत्तांत यांचा समावेश होता. संस्कृत ऋषींना त्यांच्या वेदांद्वारे ह्या घटनांचे स्मरण राहिले आणि हिब्रू लोकांना त्यांच्या वेदाद्वारे (ऋषी मोशेचा तोरा) समान घटनांचे स्मरण राहिले.

जलप्रलयाच्या वेगवेगळ्या वृत्तांतांची साक्ष – जगभरातून

मजेशीर गोष्ट ही आहे की, जलप्रलयाचे वर्णन केवळ प्राचीन हिब्रू आणि संस्कृत वेदांतच स्मरण केले जात नाही. जगभरातील विविध जनसमूह आपापल्या इतिहासांत एका मोठ्या पुराचे अथवा जलप्रलयाचे स्मरण करतात. खालील चार्ट हे स्पष्ट करतो. 

जगभरातील संस्कृतींतील जलप्रलयाच्या वृत्तांताची बायबलमधील जलप्रलयाच्या वृत्तांताशी तुलना

वरच्या भागात हा चार्ट जगभरात राहणारे विविध भाषासमूह दाखवितो – प्रत्येक खंडातील. चार्टच्या सेलमध्ये हे दाखविण्यात आले आहे की हिब्रू जलप्रलयाच्या वर्णनाचा विशेष तपशील (चार्टच्या डाव्या बाजूस यादीबद्ध केलेला) त्यांच्या स्वतःच्या वृत्तांतात देखील समाविष्ट आहे किंवा नाही. काळ्या सेल्स दर्शवितात की हा तपशील त्यांच्या जलप्रलयाच्या वृत्तांतात आहे, तर रिकाम्या सेल्स दर्शवितात की हा तपशील त्यांच्या स्थानिक जलप्रलयाच्या वर्णनात नाही. आपण हे पाहू शकता की जवळजवळ ह्या सर्व भाषासमूहाजवळ कमीत कमी हे ‘स्मरण’ सामान्य होते की हा जलप्रलय उत्पन्नकर्त्या परमेश्वराद्वारे न्यायदंड होता परंतु काही मनुष्य मोठ्या तारवात बचावली. दुसऱ्या शब्दांत, ह्या जलप्रलयाची आठवण केवळ संस्कृत आणि हिब्रू वेदातच नव्हे, तर जगभरातील आणि खंडातील इतर संस्कृतीच्या इतिहासांत आढळून येते. हा या घटनेकडे संकेत करतो जी दूरच्या भूतकाळात घडली.

हिंदी पंचांगाची साक्ष

हिंदी पंचाग – महिन्याचे दिवस वरून खाली आहेत, पण 7 दिवसांचा आठवडा आहे

हिंदी पंचाग आणि पाश्चात्य पंचाग यांच्यातील फरक आणि साम्य दूर भूतकाळातील या सामायिक स्मृतीचा पुरावा आहे. बहुतेक हिंदी पंचागांची अशाप्रकारे रचना करण्यात आली आहे जेणेकरून दिवस रांगेनुसार (डावीकडून उजवीकडे) जाण्याऐवजी वरून खाली स्तंभांत (वरून खाली) जातात, जी पाश्चात्य देशांच्या दिनदर्शिकांची सार्वत्रिक रचना आहे. भारतातील काही दिनदर्शिका संख्येसाठी हिंदी लिपीचा उपयोग करतात (1,2,3…) आणि काही पाश्चात्य संख्येचा उपयोग करतात (1,2,3…). ह्या तफावतीची आपण अपेक्षा करू शकतो कारण दिनदर्शिका किंवा पंचांग दाखविण्याची कुठलीही ‘योग्य’ पद्धत नाही. पण सर्वच पंचांगात एक केंद्रिय साम्य असते. हिंदी पंचांग 7 दिवसाच्या आठवड्याचा उपयोग करते – पाश्चात्य जगताप्रमाणे. का? आपण समजू शकतो की पंचांगाचे विभाजन पाश्चात्य पंचांगासमान वर्षांत आणि महिन्यात का करण्यात आले आहे कारण हे सूर्याभोवती पृथ्वीच्या भ्रमणावर आणि पृथ्वीभोवती चंद्राच्या भ्रमणावर आधारित आहे – अशाप्रकारे सर्व लोकांस समान असा खगोलीय आधार देते. पण 7 दिवसांच्या आठवड्यासाठी खगोलीय वेळेचा कुठलाच आधार नाही. हे त्या प्रथेवरून व परंपरेवरून येते जी इतिहासात आढळून येते (किती पूर्वी हे कोणासही माहीत नसावे असे वाटते).

आणि बौद्ध थाई पंचांग

थाई पंचांग डावीकडून उजवीकडे आहे, पण त्यात पश्चिमेच्या तुलनेत वेगळे वर्ष आहे – पण यातही 7 दिवसांचा आठवडा

बौद्ध देश असल्यामुळे, बौद्ध त्यांच्या वर्षांची गणना बौद्धाच्या जीवनापासून करतात म्हणून त्यांची वर्षे नेहमीच पश्चिमेच्या तुलनेत 543 वर्षे मोठी असतात (अर्थात सन 2019 हे वर्ष बीई – बौद्ध युगात – थाई पंचांगात 2562 आहे). पण पुन्हा ते सुद्धा 7 दिवसांच्या आठवड्याचा उपयोग करतात. हे त्यांस कोठून प्राप्त झाले? वेगवेगळ्या दिवसातील अनेकप्रकारे भिन्न असलेल्या दिनदर्शिका अर्थात पंचांग ह्या समय एककासाठी कुठलाही वास्तविक खगोलीय आधार नसतांना 7 दिवसांच्या आठवड्यावर का आधारित आहेत?

आठवड्यासंबंधी प्राचीन ग्रीक लोकांची साक्ष

प्राचीन ग्रीक लोकसुद्धा त्यांच्या पंचांगात 7 दिवसांच्या आठवड्याचा उपयोग करीत.

प्राचीन ग्रीक वैद्य हिप्पोक्रेटस, जो ख्रि.पू. 400च्या सुमारास जगत असे त्यास आधुनिक चिकित्साविज्ञानाचा जनक मानले जाते आणि त्याने लिहिलेली पुस्तके, जी अद्याप सुरक्षित आहेत, त्याच्या वैद्यकीय निरीक्षणांची नोंद करते. असे करतांना त्याने समय एककाच्या रूपात ‘आठवड्याचा’ उपयोग केला. एका विशिष्ट रोगाच्या वाढत्या लक्षणांविषयी लिहितांना त्याने म्हटले :  

चौथा दिवस सातव्याचा दर्शक आहे; आठवा दिवस दुसर्‍या आठवड्याची सुरूवात आहे; आणि म्हणून, अकरावा दिवस दुसर्‍या आठवड्याचा सुद्धा निदर्शक आहे; आणि पुन्हा, सतरावा निदर्शक आहे, जसा चौदाव्यापासून चौथ्या क्रमांकावर असल्यामुळे, आणि अकराव्यापासून सातव्या क्रमांकावर (हिप्पोक्रेटस, एफोरिजम. #24)

ख्रि.पू. 350 मध्ये लिहित असतांना, अॅरिस्टाटल वेळ चिन्हाकित करण्यासाठी नियमितपणे ‘आठवड्याचा’ उपयोग करतो. एक उदाहरण देण्यासाठी तो लिहितो :

शिशु अवस्थेत घडून येणारे अनेक मृत्यू मूल एक आठवड्याचे होण्यापूर्वी घडून येतात, म्हणून त्या वयात मुलाचे नाव ठेवण्याची प्रथा आहे, ह्या विश्वासावरून की त्याच्या वाचण्याची आता उत्तम संधी आहे.

अॅरिस्टाटल, हिस्ट्री आफ अॅनिमल्स, भाग 12, ख्रि.पू. 350

तर या भारतापासून आणि थायलंडपासून दूर, प्राचीन ग्रीक लेखकांस, ‘आठवड्याची’ कल्पना कोठून आली जेणेकरून त्यांनी ह्या अपेक्षेने त्याचा उपयोग केला की त्यांच्या ग्रीक वाचकांस हे माहीत असावे की ‘आठवडा’ म्हणजे काय? कदाचित ह्या सर्व संस्कृतींत त्यांच्या भूतकाळात (जरी त्यांस त्या घटनेचा विसर पडला असावा) एखादी ऐतिहासिक घटना घडली असावी ज्याने 7 दिवसांचा आठवडा ठरविण्यात आला?

हिब्रू वेद अगदी अशा एका घटनेचे वर्णन करतो – जगाची प्रारंभिक उत्पत्ती. त्या तपशीलात आणि पुरातन वृत्तांतात सृष्टीकर्ता परमेश्वर जगाची उत्पत्ती करतो आणि 7 दिवसांत पहिल्या लोकांस घडवितो (6 दिवस आणि विश्रांतीचा 7वा दिवस). त्यामुळे, प्रथम मानवांनी त्यांच्या दिनदर्शिकेत 7 दिवसाच्या आठवड्याचे समय एकक वापरले. जेव्हा त्यानंतर भाषेच्या गोंधळामुळे मानवजातीची पांगापांग झाली तेव्हा ह्या ‘पांगापांगीच्या’ पूर्वीच्या घटना ह्या विविध भाषासमूहांपैकी अनेकांद्वारे लक्षात ठेवण्यात आल्या, ज्यात येणार्‍या बलिदानाचे अभिवचन, सर्वनाशक जलप्रलयाचा वृत्तांत, तसेच 7 दिवसांच्या आठवड्याचा समावेश होतो. ह्या आठवणी प्रारंभिक मानवजातीच्या जिवंत कलाकृति आहेत आणि ह्या वेदांत नमूद करण्यात आलेल्या या घटनांच्या इतिहासाची साक्ष ठरतात. हे स्पष्टीकरण निश्चितच हिब्रू आणि संस्कृत वेदांतील साम्य स्पष्ट करण्याची सर्वात सरळ पद्धत आहे. आज अनेक जण ह्या पुरातन लिखाणांस केवळ अंधश्रद्धात्मक पुराण कथा म्हणून दूर करतात पण त्यातील साम्य पाहून त्याविषयी त्यांनी गंभीरपणे विचार करावा.

प्रारंभिक मानवजातीचा सामान्य इतिहास होता ज्यात उत्पन्नकर्त्याद्वारे मोक्षाचे अभिवचन होते. पण ते अभिवचन कसे पूर्ण होणार होते? आपण एका पवित्र व्यक्तीचा वृत्तांत सुरू ठेवू जो भाषांतील गोंधळानंतर उत्पन्न झालेल्या पांगापांगीनंतर जगला. आपण याविषयी पुढे वाचू.

[अशाच प्रकारचे अभिसरण दर्शविणार्‍या प्राचीन आठवणींबद्दल पुढील माहितीसाठी – परंतु यावेळी चीनी भाषेतील सुलेखनाच्या माध्यमातून येथे पहा]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *