Skip to content

मोक्षाचे अभिवचन – अगदी आरंभापासून

  • by

आपण पाहिले की प्रारंभीच्या सृष्ट अवस्थेतून कशाप्रकारे मानवजातीचे पतन झाले. परंतु बायबल (वेद पुस्तकम्) एका योजनाविषयी पुढे सांगते जी देवाने आरंभापासून तयार केली होती. ही योजना एका अभिवचनावर केंद्रित होती जी त्यावेळी तयार करण्यात आली आणि याच योजनेचे पडसाद पुरुषसुक्तात दिसून येतात.

बायबलखरोखर एक पुस्तकालय

बायबल – खरोखर ह्या अभिवचनाचे महत्व समजून घेण्यासाठी आम्ही बायबलसंबंधी काही मौलिक तथ्ये जाणून घेतली पाहिजेत. जरी ते पुस्तक आहे, आणि आम्ही त्याविषयी असा विचार करतो, तरी त्यास चालते-फिरते वाचनालय मानणे अधिक योग्य ठरेल. याचे कारण हे आहे की हा पुस्तकांचा संग्रह आहे, जे 1500 वर्षांपेक्षा अधिक समय कालावधीत, विविध लेखकांनी लिहिले आहे. आज ह्या पुस्तकांस एकाच खंडात बांधण्यात आले आहे – बायबल. केवळ ही वस्तुस्थिती बायबलला ऋग्वेदासमान जगातील सर्वात मोठ्या पुस्तकांत स्थान देते. विविध लेखकांव्यतिरिक्त, बायबलची वेगवेगळी पुस्तके  अशी विधाने, घोषणा आणि भाकिते करतात  ज्याचे नंतरचे लेखक अनुसरण करतात. जर बायबल फक्त एका लेखकाद्वारे, अथवा एकमेकांस ओळखत असलेल्या लेखकांच्या एक समूहाद्वारे लिहिण्यात आले असते, तर ते महत्वाचे ठरले नसते. पण बायबलच्या लेखकांत शेकडो आणि कदाचित हजारों वर्षांचे अंतर आहे, ज्यांनी वेगवेगळ्या संस्कृतींत, भाषांत, सामाजिक स्तरावर, आणि साहित्यशैलीत लेखन केले – तरीही त्यांचे संदेश आणि भाकिते पुढे नंतरच्या लेखकांनी विकसित केली अथवा बाइबल बाहेर प्रमाणित ऐतिहासिक तथ्याद्वारे पूर्ण करण्यात आली आहेत. ही गोष्ट बायबलला अगदी वेगळ्या पातळीवर अद्वितीय ठरविते – आणि तिचा संदेश समजण्यासाठी तिने आम्हास प्रेरित करावे. जुन्या कराराच्या पुस्तकांच्या (येशूपूर्वीची पुस्तके) अस्तित्वातील हस्तलिखिताच्या प्रतींच्या तारखा ख्रि. पू. 200 च्या सुमाराच्या आहेत म्हणून, बायबलच्या मूलपाठाचा आधार, आतापर्यंतच्या, जगातील इतर सर्व प्राचीन पुस्तकांपेक्षा उत्तम आहे.

बागेत मोक्षाचे अभिवचन

आपण  यास बायबलमध्ये उत्पत्तीच्या अगदी आरंभी सृष्टीरचनेच्या व पतनाच्या वृत्तांतातील नंतरच्या घटनांच्या ‘पूर्वचित्राच्या’ रूपात पाहतो. दुसर्‍या शब्दांत, जरी ते आरंभाचे वर्णन करीत असले, तरीही शेवट लक्षात घेऊन लिहिण्यात आले होते. येथे आपण एक अभिवचन पाहतो जेव्हा देव त्याचा शत्रू सैतान, वाईटाचे मूर्त रूप जो सर्पाच्या रूपात होता, सामना करतो, आणि सैतानाने मानवाचे पतन घडवून आणल्यानंतर लगेच त्याच्याशी कुटप्रश्नाच्या रूपात बोलतो :

“…आणि तू (सैतान) व स्त्री, तुझी संतती व तुझी संतती यामध्ये मी (परमेश्वर) परस्पर वैर स्थापिन. तो तुझे डोके फोडील, व तू त्याची टाच फोडशील.”

उत्पत्ती 3:15

काळजीपूर्वक वाचल्यास आपणास दिसून येईल की येथे पाच वेगवेगळ्या पात्रांचा उल्लेख करण्यात आला आहे आणि हे भविष्यसूचक आहे कारण  ते येणाऱ्या समयाची प्रतीक्षा करते (जसे भविष्यकाळ दर्शक ‘करील’ या शब्दाच्या वारंवार उपयोगाने दिसून येते). ही पात्रे आहेत :

1. देव/प्रजापति

2. सैतान/सर्प

3. स्त्री

4. स्त्रीची संतती

5. सैतानाची संतती

आणि हे कोडे भाकित करते की भविष्यात ही पात्रे एकमेकांशी कसा व्यवहार करतील. हे खाली दाखविण्यात आले आहे

उत्पत्तीच्या अभिवचनातील पात्रांमध्ये नाती

देव अशी व्यवस्था करील की सैतान आणि स्त्री दोघांस ‘संतती’ व्हावी. ह्या संततींमध्ये आणि स्त्री व सैतान यांच्यात ‘शत्रूत्व’ अथवा हेवा असेल. सैतान स्त्रीच्या संततीच्या ‘एडीस डसेल’ ती स्त्रीची संतती सैतानाचे ‘डोके ठेचील.’

संततीवर कपातएकतो

आतापर्यंत आपण सरळ वचनातून निरीक्षणे केली आहेत. आता काही तर्कयुक्त कपाती. स्त्रीच्या ‘संततीचा’ उल्लेख ‘तो’ व ‘त्याचे’ या शब्दांनी केलेला आहे म्हणून आम्ही जाणतो की हा एकमेव पुरुष मानव – पुरुष आहे. यासोबतच आपण काही संभवनीय अर्थ दूर करू शकतो. ‘तो’ असल्यामुळे ही संतती ‘ती’ नाही आणि अशाप्रकारे स्त्री असू शकत नाही.  ‘तो’ असल्यामुळे ही संतती ‘ते’ नाही, जे कदाचित शक्य होते, कदाचित एका लोकसमूहाबाबत, अथवा वंश, अथवा संघ, अथवा राष्ट्रासोबत. वेगवेगळ्या समयी आणि वेगवेगळ्या प्रकारे लोकांस वाटले की ‘ते’ उत्तर असू शकते. पण ही संतती, ‘तो’ असल्यामुळे लोकांचा समूह नाही मग जो राष्ट्राचा उल्लेख करीत असो वा एखाद्या धर्माचा जसे हिंदू, बौद्ध, ख्रिस्ती, मुस्लिम, किंवा एखादी जात देखील. ‘तो’ असल्यामुळे ही संतती ‘वस्तूही’ नाही (संतती ही एक व्यक्ती आहे). ही शक्यता देखील दूर होते की संतती विशिष्ट तत्वज्ञान, शिकवण, तंत्रविज्ञान, राजकीय पद्धती, अथवा धर्म आहे. शक्यतः अशाप्रकारची ‘वस्तू’ जगात सुधारणा घडवून आणण्याचा आमचा आवडीचा पर्याय असेल, आणि अद्याप, आहे. आम्ही असा विचार करतो की आमच्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणणारी कुठल्यातरी प्रकारची ‘वस्तू’ असेल, म्हणूनच मागील शतकातील अत्युत्तम मानव विचारवंतांनी विविध राज्यपद्धती, शिक्षणपद्धती, तंत्रविज्ञान, धर्म इत्यादींविषयी वाद घातला आहे. पण हे अभिवचन  पूर्णपणे वेगळ्या दिशेकडे संकेत करते. देवाच्या अंतःकरणात आणखी काही होते – ‘तो’. आणि हा ‘तो’ सर्पाचे डोके ठेचणार होता.

तसेच, याकडे लक्ष देणे मजेशीर आहे की काय म्हटलेले नाही. परमेश्वर पुरुषास संततीचे अभिवचन देत नाही जसे तो स्त्रीस अभिवचन देतो. विशेषेकरून संपूर्ण बायबलमध्ये, आणि संपूर्ण पुरातन जगात पित्यांकडून येणार्‍या पुत्रांवर दिलेला भर पाहता हे अत्यंत असामान्य आहे. पण या ठिकाणी पुरुषाकडून येणार्‍या संततीचे (‘तो’) मुळीच अभिवचन नाही. त्यात पुरुषाचा उल्लेख न करता, केवळ हे म्हटले आहे की स्त्रीपासून एक संतती जन्मास येईल.

ऐतिहासिकदृष्ट्या अथवा पौराणिकदृष्ट्या, आतापर्यंत अस्तित्वात असलेल्या सर्व मानवांपैकी, केवळ एकाने त्याला आई असल्याचा हा दावा केला पण त्याचवेळी त्याचा भौतिक पिता कधीच नव्हता. हा येशू (येशूसत्संग) होता ज्याविषयी नवा करार (हे अभिवचन दिल्यावर हजारो वर्षानंतर लिहिण्यात आला) घोषणा करतो की तो कुमारिकेद्वारे जन्मास आला – अशाप्रकारे आई होती पण मानव पिता नव्हता. समयाच्या अगदी आरंभी ह्या कुटप्रश्नात येथे येशूची पूर्वच्छाया दिली जात आहे का? हे या निरीक्षणाशी अनुरूप ठरते की संतती ‘तो’ आहे, ‘ती’, ‘ते’ अथवा ‘वस्तुवाचक ते’ नाही. ह्या दृष्टिकोणातून, कुटप्रश्नाचे काही भाग अगदी व्यवस्थित जुळतात.

टाच फोडशील’??

सैतान/सर्प ‘त्याची टाच’ फोडील याचा अर्थ काय? जोवर मी आफ्रिकेच्या जंगलात काम केले नाही तोवर मला हे समजले नाही. आम्हाला दमट उष्णतेतही जाड रबरी बूट घालावे लागत असत – कारण तेथे उंच गवतात सर्प असायचे आणि आपल्या पायास दंश करीत – अर्थात आपल्या टाचेस – आणि आपला जीव घेत. तेथे पहिले दिवशी मी एका सर्पावर जवळजवळ पाय दिला होता, आणि शक्यतः मला त्यामुळे मरण आले असते. त्यानंतर मला ह्या कुटप्रश्नाचा अर्थ समजला. ‘तो’ सर्पाचा नाश करील (‘तुझे डोके फोडील’), पण जी किंमत त्याला चुकवावी लागेल, ती ही असेल की तो मारला जाईल (‘त्याची टाच फोडशील’). हे येशूच्या बलिदानाद्वारे प्राप्त विजयाची पूर्वच्छाया दर्शविते.

सर्पाची संतती?

पण त्याचा दुसरा शत्रू कोण, सैतानाची ही संतती? जरी आमच्याजवळ याविषयी सविस्तर तपास लावण्यासाठी जागा नाही, तरीही नंतरची पुस्तके येणार्या व्यक्तीविषयी सांगतात. खालील वर्णनाकडे लक्ष द्या :

आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताचे आगमन व त्याच्याजवळ आपले एकत्र होणे ह्यासंबंधाने …कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका, कारण त्या दिवसाच्या अगोदर विश्वासाचा त्याग होऊन तो अनीतिमान् पुरूष प्रगट होईल, तो नाशाचा पुत्र. विरोधी व ज्याला देव किंवा भजनीय म्हणून म्हणतात त्या सर्वांपेक्षा स्वतःला उंच करणारा, म्हणजे मी देव आहे असे स्वतःचे प्रदर्शन करीत, देवाच्या मंदिरात बसणारा असा आहे.

2 थेस्सलनीकाकरांस पत्र 2:1-4; सन 50 मध्ये पौलाद्वारे ग्रीसमध्ये लिखित

ही नंतरची पुस्तके स्त्रीची संतती आणि सैतानाची संतती यांच्यात झालेल्या संघर्षाच्या उलट गिनतीविषयी स्पष्टपणे सांगतात. परंतु मानवजातीच्या इतिहासाच्या अगदी सुरूवातीस, उत्पत्तीच्या या अभिवचनात भ्रूणासारख्या रूपात त्याचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे, आणि तपशील अद्याप भरण्याच्या प्रतीक्षेत आहे. तर इतिहासाचा कळस, म्हणजे सैतान आणि देव यांच्यातील अंतिम लढ्याची उलट गणना, अगदी प्रारंभीच्या पुस्तकात आधीच दिसून येते.

पूर्वी आपण पुरुषसूक्ताच्या प्राचीन स्तोत्रातून प्रवास केला. आपण पाहिले की ह्या स्तोत्रात किंवा श्लोकात सुद्धा येणारा सिद्ध पुरुषाविषयी भाकित करण्यात आले आहे – पुरुष – असा मनुष्य जो ‘मानवी सामर्थ्याद्वारे’ येणार नाही . ह्या पुरुषाचे बलिदान देखील केले जाईल. वस्तुतः आपण पाहिले की हे काळाच्या आरंभीच देवाच्या मनात आणि अंतःकरणात ठरविण्यात आणि संकल्पित करण्यात आले होते. ही दोन्ही पुस्तके एकाच व्यक्तीविषयी बोलत आहेत का? माझा विश्वास आहे की होय. पुरुषसूक्त आणि उत्पत्तीचे अभिवचन एकाच घटनेचे स्मरण करतात – जेव्हा देवाने हे ठरविले की तो एके दिवशी मनुष्याच्या रूपात देहधारण करील यासाठी की ह्या मनुष्यास बलिदान म्हणून देता यावे – अखिल मानवजातीची सार्वत्रिक गरज मग त्यांचा धर्म कोणताही का असेना. पण केवळ हेच अभिवचन ऋग्वेद आणि बायबलमधील एकमेव साम्य नाही. कारण ते अगदी प्रारंभिक इतिहासाची नोंद करतात म्हणून ते सोबतच इतर घटनांची सुद्धा नोंद करतात ज्याचे आपण पुढे अवलोकन करू.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *