Skip to content

सर्व समयांसाठी आणि सर्व लोकांसाठी तीर्थयात्रा: अब्राहामाद्वारे आरंभ

  • by

कटारागम उत्सवाकडे नेणारी तीर्थयात्रा (पदयात्रा) भारताच्या पलीकडे जाते. ही तीर्थयात्रा भगवान मुरूगमच्या (भगवान कटारामग, कार्तिकेय अथवा स्कंद) तीर्थयात्रेचे स्मरण घडवून देते जेव्हा त्याने आपल्या आईवडिलांचे (शिव आणि पार्वती) हिमालयातील घर सोडले, आणि स्थानिक वल्ली नांवाच्या मुलीच्या प्रेमाखातर श्री लंकेचा प्रवास केला. त्यांचे प्रेम आणि लग्न यांचे स्मरण श्री लंकेतील कटारामग मंदिराच्या कटारागमपरहेरा नावाच्या उत्सवात केले जाते.

भक्तगण कधीकधी या सणाच्या 45 दिवसाआधी या तीर्थयात्रेस सुरूवात करून कटारागम येथे जाण्यासाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास करतात. युद्धाची देवता, भगवान मुरूगम याच्या स्मरणार्थ, अनेक जण त्यांना माहीत असलेले सुरक्षित स्थान सोडून या तीर्थयात्रेद्वारे अज्ञात ठिकाणी जात असतांना आपल्यासोबत बल्लम (भाला) घेऊन जातात.

पौर्णिमेच्या दिवशी कटारागम उत्सव आरंभ करण्यासाठी कटारागम पर्वतावर पायपीट करून यात्रेकरू आपली तीर्थयात्रा पूर्ण करतात. 14 सायंकाळी मुरूगमच्या स्मरणार्थ वल्लीच्या मंदिरात रात्रीचा परहेरा साजरा केला जातो. पौर्णिमेच्या शेवटच्या पहाटे जल कापण्याचा सोहळा साजरा करण्याद्वारे कळस गाठला जातो जेथे मुरूगनची मूर्ती मेनिक गंगा नदीत बुडविली जाते आणि तिचे पवित्र जल भक्तांवर ओतले जाते. या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अग्नीवर चालण्याचा सोहळा जेथे भक्तगण कोळश्याने तप्त केलेल्या अग्नीतून जातात, त्याद्वारे महातत्वांवर विजय मिळविण्याचा त्यांचा विश्वास ते दर्शवितात.

वेगवेगळी भाषा, धर्म आणि वंशाचे लोक या वार्षिक तीर्थयात्रेत एकत्र येऊन मार्गदर्शन, आशीर्वाद, आरोग्य मिळविण्याचा प्रयत्न करतात, आणि आपल्या विश्वासाची पारख करतात. या दृष्टीने पाहता ते 4000 वर्षांपूर्वी अब्राहामाद्वारे घालून दिलेल्या नमून्याचे अनुसरण करतात. तो तीर्थयात्रेस निघाला तो फक्त अनेक महीने नव्हेत, पण त्याच्या आयुष्यभर तो प्रवास त्याला पुरला. त्याच्या तीर्थयात्रेचा प्रभाव 4000 वर्षानंतरही तुमच्या आणि माझ्या जीवनावर पडला आहे. त्याच्या तीर्थयात्रेसाठी त्याला देवाठायी आपला विश्वास दाखवावा लागला, एका पवित्र डोंगरावर एक अविश्वसनीय बलिदान अर्पण करावयास जावे लागले. त्याद्वारे एका राष्ट्राचा उदय झाला ज्याचा जन्म समुद्राचे विभाजन करण्याद्वारे आणि अग्नीत चालण्याद्वारे झाला – मग त्याचा प्रभाव संपूर्ण दक्षिण एशियात घडून आला. त्याच्या तीर्थयात्रेद्वारे असे काही सुरू झाले ज्याद्वारे आज आम्हास आशीर्वाद आणि मार्गदर्शन कसे प्राप्त होते हे समजणे आमच्या ज्ञानप्राप्तीची सुरूवात असू शकते. अब्राहामाच्या तीर्थयात्रेचा शोध घेण्यापूर्वी, आपण वेद पुस्तकातून काही संदर्भ मिळवू या, ज्यात त्याच्या तीर्थयात्रेविषयी लिहिले आहे.

मानवाची समस्यादेवाची योजना  

आपण पाहिले की मानवजातीने सृष्टीकर्त्या प्रजापतीच्या उपासनेस भ्रष्ट केले आणि तो तारांगणांची व ग्रहांची उपासना करू लागला. या कारणास्तव प्रजापतीने भाषेत गोंधळ घालून मनू/नोहाच्या तीन मुलांच्या वंशजांची पांगापांग केली. यामुळे आज भाषेने विभाजित केलेली अनेक राष्ट्रे आहेत. मानवजातीच्या सामान्य भूतकाळाचे पडसाद 7-दिवसांच्या पंचांगात दिसून येतात ज्यांचा उपयोग आज संपूर्ण जगभर आणि जलप्रलयाच्या विविध आठवणींत केला जातो.

इतिहासाच्या आरंभीच प्रजापतीने हे अभिवचन दिले होते की सिद्ध पुरुषाच्या बलिदानाद्वारे ‘बुद्धिजनांस अमरत्व प्राप्त होईल.’ हे बलिदान आम्हास केवळ बाहेरून शुद्ध करण्याऐवजी आतून शुद्ध करण्यासाठी कार्य करील. तथापि, उत्पन्नकर्त्याची उपासना भ्रष्ट झाल्यामुळे, नव्याने पांगलेली राष्ट्रे हे आरंभीचे अभिवचन विसरून गेली. अगदी काही मूठभर स्रोतांच्या माध्यमाने त्यांचे स्मरण केले जाते ज्यात पुरातन ऋग्वेद आणि वेद पुस्तकम् – बायबलचा समावेश आहे.

पण प्रजापति/परमेश्वराजवळ एक योजना होती. ही योजना अशी नव्हती ज्याची तुम्ही व मी अपेक्षा केली असती कारण ती (आम्हाला) फार लहान व महत्वहीन वाटली असती. पण या योजनेची त्याने निवड केली. या योजनेत ख्रि. पू. 2000च्या सुमारास (अर्थात 4000 वर्षांपूर्वी) एका पुरुषास आणि त्याच्या कुटूंबास पाचारण करण्याचा आणि जर तो आशीर्वादाचा स्वीकार करण्याचा निर्णय घेत असेल तर त्याला आणि त्याच्या वंशजांस आशीर्वादित करण्याचा समावेश आहे.

अब्राहामास अभिवचन

परमेश्वर अब्रामाला म्हणाला होता, “मी तुला दाखवीन त्या देशातून परत जा. तुझे लोक आणि तुझ्या बापाचे घर.

“मी तुला एक मोठे राष्ट्र बनवीन आणि मी तुला आशीर्वाद देईन; मी तुझे नाव मोठे करीन आणि तुला आशीर्वाद देईल. जे लोक तुला आशीर्वाद देतील त्यांना मी आशीर्वाद देईन आणि जे लोक तुला शाप देतील त्याना मी शाप देईन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व लोक आशीर्वादित होतील. ”

4 तेव्हा अब्रामाने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले. लोट त्याच्या बरोबर गेला. जेव्हा हारान सोडले तेव्हा अब्राम पंच्याहत्तर वर्षांचा होता. 5 त्याने आपली बायको साराय, त्याचा पुतण्या लोट आणि त्यांनी हरान येथे ताब्यात घेतलेली सर्व माणसे आणि कनान देश सोडले आणि ते तेथे पोचले…

रमेश्वर अब्रामाला म्हणाला,“तू आपला देश, आपले गणगोत व आपल्या बापाचे घर सोड; आणि मी दाखवीन त्या देशात जा.
2 मी तुला आशीर्वाद देईन; तूझ्या पासून मोठे राष्ट्र निर्माण करीन; मी तुझे नाव मोठे करीन, लोक तुझ्या नावाने इतरांना आशीर्वाद देतील,
3 जे लोक तुला आशीर्वाद देतील त्यांना मी आशीर्वाद देईन, आणि जे लोक तुला शाप देतील त्यानां मी शाप देईन. तुझ्यामुळे पृथ्वीवरील सर्वलोक आशीर्वादित होतील.”
4 तेव्हा अब्रामाने परमेश्वराची आज्ञा मानली. त्याने हारान सोडले लोट त्याच्या बरोबर गेला. या वेळी अब्राम पंच्याहत्तर वर्षांचा होता.
5 हारान सोडताना तो एकटा नव्हता तर त्याने आपली बायको साराय, पुतण्या लोट आणि हारानमध्ये त्यांनी मिळवलेली मालमत्ता तसेच गुलाम या सर्वांना बरोबर घेऊन त्याने हारान सोडले व तो कनान देशाच्या प्रवासास निघाला आणि कनान देशात आला.
6 अब्राम कनान देशातून प्रवास करीत शखेम गावला आला आणि मोरेच्या मोठ्या वृक्षांपर्यंत गेला. याकाळी त्या देशात कनानी लोक राहात होते.
7 परमेश्वर अब्रामास दर्शन देऊन म्हणाला, “हा देश मी तुझ्या वंशाजांना देईन.”ज्या जागेवर परमेश्वराने अब्रामाला दर्शन दिले त्या जागी त्याने परमेश्वराची उपासना करण्यासाठी एक वेदी बांधली.

उत्पत्ती 12:1-7

आज काही लोकांच्या मनात हा विचार येतो की खरोखर एक वैयक्तिक परमेश्वर आहे का जो आम्हास आशा देण्यासाठी आमच्या त्रस्त जीवनात आमचे सहाय्य करण्याइतकी आमची निगा राखतो.ह्या वृत्तांतात आपण या प्रश्नाची तपासणी करू शकतो कारण त्यात एका विशिष्ट व्यक्तीस एक वैयक्तिक अभिवचन देण्यात आले आहे, ज्याच्या भागांचे आपण सत्यापन करू शकतो. हा वृत्तांत नमूद करतो की परमेश्वर देवाने प्रत्यक्ष अब्राहामास हे अभिवचन दिले की ‘मी तुझे नाव मोठे करीन’. आपण 21 व्या शतकात जगत  आहोत – 4000 वर्षांनंतर – आणि अब्राहामाचे/अब्रामाचे नाव जगभरात इतिहासात ओळखल्या जाणार्या सर्व नामांत सुप्रसिद्ध आहे. हे अभिवचन अक्षरशः, ऐतिहासिकदृष्ट्या, आणि पडताळा केल्यावर सत्य ठरले आहे.

बायबलची सर्वात आरंभीची अस्तित्वातील प्रत मृत सागर चर्मपत्रांत आढळून येते ज्याची तिथी ख्रि. पू. 200-100 इतकी आहे. याचा अर्थ हा आहे की अगदी अलीकडे म्हटल्यास, हे अभिवचन, कमीत कमी त्या काळापासून लिखित स्वरूपात आहे. पण ख्रि. पू. 200 मध्ये सुद्धा अब्राहामाचे व्यक्तिमत्व आणि नाव अद्याप सुविख्यात नव्हते – केवळ अल्पसंख्या यहूदी लोकांस परिचित होते. अशाप्रकारे आपण जाणतो की अभिवचनाची परिपूर्णता ते लिहिल्यानंतरच पूर्ण झाली. अभिवचन घडून आल्यानंतर ते लिहिण्यात आले व त्यानंतर ‘पूर्ण’ झाले असे नाही. 

ह्या थोर राष्ट्राद्वारे

सारखीच आश्चर्याची बाब ही आहे की अब्राहामाने खरोखर आपल्या जीवनात उल्लेखनीय असे काहीही केले नाही – अशाप्रकारचे काही ज्यामुळे सर्वसाधारणतः व्यक्तीचे नाव ‘मोठे’ होते. त्याने असामान्य असे काहीही लिहिले नाही (जसे व्यासाने केले ज्याने महाभारताचे लेखन केले), त्याने काहीही विशेष असे निर्माणकार्य केले नाही (शहाजहान समान ज्याने ताजमहाल बांधला), त्याने छाप बसेल अशा सैन्य कौशल्य प्राप्त सेनेचे नेतृत्व केले नाही (भगवदगीतेतील अर्जूनासमान). त्याने राजा म्हणून एखाद्या राज्यावर शासनही केले नाही. त्याने जंगलात तम्बू उभारून प्रार्थना करण्यावाचून आणि नंतर पुत्रास जन्म देण्यावाचून दुसरे काहीही केले नाही. 

हजारों वर्षानंतर कोणाला सर्वाधिक स्मरण केले जाईल असे आपण त्याच्या दिवसांत भाकित केले असते, तर आपण तत्कालीन राजे, सेनापती, योद्धा, आणि राजदरबारातील कबि यांस इतिहासात स्मरण केले जाईल अशी शर्यत लावली असती. पण त्यांची नावे विस्मरणात आहेत – पण ज्या माणसाने जंगलात जेमतेम आपले कुटूंब स्थापन केले त्याच्या घराण्याचे नाव जगभरात सुविख्यात आहे. त्याचे नाव थोर आहे याचे कारण केवळ हे आहे की ज्या राष्ट्राचा (राष्ट्रांचा) तो पिता होता त्यांनी त्याच्या वृत्तांताची नोंद केली – आणि मग त्याजपासून निघालेल्या व्यक्ती आणि राष्ट्रे  महान झालीत. फार पूर्वी अगदी असेच अभिवचन देण्यात आले होते (“मी तुजपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन…मी तुझे नाव मोठे करीन”). मी संपूर्ण इतिहासात आणखी कोणाचाही विचार करू शकत नाही जो त्याने स्वतःच्या जीवनात केलेल्या महत्कृत्यांद्वारे नामांकित झाला नाही तर केवळ त्याजपासून जन्मलेल्या वंशजांमुळे सुप्रसिद्ध झाला. 

अभिवचन देणाऱ्याच्या इच्छेद्वारे

आणि आज जे लोक अब्राहामाच्या वंशात जन्मलेले आहेत – यहूदी – खरोखर कधीही राष्ट्र नव्हते ज्यास आपण मोठी थोरवी देतो. त्यांनी मिसर देशच्या पिरॅमीडसमान मोठ्या वास्तुशिल्पांची निर्मिती केली नाही – आणि निश्चितच ताजमहालासारखे काही उभारले नाही, त्यांनी ग्रीकांसमान तत्वज्ञान लिहिले नाही, किंवा ब्रिटिशांसमान दूरदूरच्या प्रदेशांत राज्य केले नाही. ह्या सर्व राष्ट्रांनी विश्व-शक्ती साम्राज्यांच्या संदर्भात असे केले ज्यांनी असामान्य सैन्य शक्तीद्वारे आपल्या विस्तृत सीमांत वृद्धी केली – यहूद्यांजवळ असे काही नव्हते. यहूदी लोकांची थोरवी बहुतांशी नियमशास्त्रामुळे आणि पुस्तकामुळे (वेद पुस्तकम् किंवा बायबल) आहे ज्यास त्यांनी जन्म दिला; काही विशिष्ट व्यक्तींद्वारे जे त्यांच्या राष्ट्रातून आले; आणि ही हजारों वर्षे ते विशिष्ट आणि काहीसे भिन्न लोकजाती म्हणून अस्तित्वात राहिले. त्यांची थोरवी त्यांनी केलेल्या एखाद्या कार्यामुळे खरोखर नव्हे, तर त्यांच्यासाठी आणि त्यांच्याद्वारे जे करण्यात आले त्यामुळे आहे.  

आता त्या व्यक्तीकडे पाहा जो हे अभिवचन पूर्ण करणार होता. काळ्या-पांढऱ्या अक्षरांत, वारंवार, असे म्हटलेले आहे की “मी करणार…” तो अद्वितीय मार्ग ज्याद्वारे त्यांची थोरवी इतिहासात प्रकट झाली आहे पुन्हा एकदा अद्भुतरित्या ह्या घोषणेस अनुकूल ठरते की या ‘राष्ट्राचे’ कुठलेतरी जन्मजात सामर्थ्य, विजय अथवा शक्ति हे घडवून आणू शकत नाही तर हे घडवून आणणारा सृष्टीकर्ता परमेश्वर होता. आधुनिक यहूदी राष्ट्र, इस्राएलातील घटनांकडे आज जगातील संचार माध्यमांचे लक्ष लागलेले आहे, ही विचारात घेण्यासारखी बात आहे. आपण जगातील सर्व समान आकाराच्या देशांच्या – हंगेरी, नार्वे, पापुआ न्यू गिनी, बोलिव्हिया किंवा मध्य आफ्रिकन रिपब्लिकमधील बातम्या नियमितपणे ऐकता का? पण इस्राएल, 80 लाख लोकांचा हा लहानसा देश, सतत व नियमितपणे बातम्यांचा विषय असतो. 

इतिहासात किंवा मानवी घटनांमध्ये असे काहीही नाही जे या प्राचीन अभिवचनाच्या अगदी तसेच प्रकट होण्यास कारणीभूत ठरेल जसे या प्राचीन व्यक्तीस घोषित करण्यात आले होते, कारण या अभिवचनावर विश्वास ठेवून त्याने एक विशेष मार्ग निवडला. हे अभिवचन कुठल्यातरी प्रकारे अपयशी ठरण्याची कशी शक्यता होती याचा विचार करा. परंतु त्याऐवजी ते प्रकट झाले, आणि प्रकट होत जात आहे, जसे हजारो वर्षांपूर्वी घोषित केले गेले होते. ही बाब खरोखरच दृढ आहे की केवळ अभिवचन देणाऱ्याच्या सामर्थ्यावर आणि अधिकारावर ते पूर्ण झाले आहे.

अजूनही जगास हादरवून सोडणारा प्रवास

This map shows the route of Abraham's Journey

हा नकाशा अब्राहामाच्या प्रवासाचा मार्ग दर्शवितो

बायबलमध्ये असे लिहिले आहे की “परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राम निघून गेला” (वचन 4). नकाशावर दाखविलेल्या, प्रवासास तो निघाला जो अद्याप इतिहास घडवत आहे.

आम्हाला आशीर्वाद

परंतु त्याचा शेवट तेथे होत नाही कारण आणखी अभिवचन दिले गेले आहे. हा आशीर्वाद फक्त अब्राहामासाठी नव्हता कारण ते असेही सांगते

“पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील”

वचन 4

हे पाहून आपण व मी दखल घ्यावयास हवी. आपण आर्य, द्रविड, तमिळ, नेपाळी किंवा आणखी काही असो; आपली जात काय आहे याची पर्वा नाही; आमचा धर्म काहीही असो, मग तो हिंदू, मुस्लिम, जैन, शीख किंवा ख्रिश्चन असोत; आपण श्रीमंत किंवा गरीब, निरोगी किंवा आजारी का असेना; सुशिक्षित असो वा नसो – पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे  यात आम्हा सर्वांचा समावेश आहे. आशीर्वादाच्या या अभिवचनात पूर्वीपासून आजपर्यंत जिवंत अशा प्रत्येकाचा समावेश आहे – याचा अर्थ आपण आहात. कसे? कधी? कशा प्रकारचा आशीर्वाद? हे फक्त केवळ येथे स्पष्टपणे सांगितलेले नाही परंतु हे अशा गोष्टीचा जन्म आहे ज्याचा आपणावर व माझ्यावर परिणाम होतो.

आपण इतक्यात ऐतिहासिकरित्या व अक्षरशः हे सत्यापित केले की अब्राहामास दिलेल्या अभिवचनाचा पहिला भाग खरा ठरला आहे. तर मग आपल्याजवळ हा विश्वास धरण्याचे कारण नाही का की या अभिवचनाचा पहिला भाग आपल्यासाठी व माझ्यासाठी खरा ठरेल? हे अभिवचन सार्वत्रिक आणि न बदलणारे आहे म्हणून ते सत्य आहे. पण आपणास ते उघडण्याची गरज आहे – ह्या अभिवचनाचे सत्य समजण्याची गरज आहे. आम्हास प्रबोधनाची गरज आहे यासाठी की आम्हास हे समजावे की हे अभिवचन आम्हास कसे ‘स्पर्श करते.’ अब्राहामाच्या यात्रेचे अनुसरण करणे सुरू ठेवल्यास आम्हास हे प्रबोधन प्राप्त होते. जगभरातील अनेक लोक ज्या मोक्षाच्या प्राप्तीसाठी  झटत आहेत, त्या मोक्षाची किल्ली, ह्या अदभुत इसमाचे अनुसरण करणे सुरू ठेवित असतांना आम्हा सर्वांसाठी प्रगट करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *