सूर्याखाली जीवनाचे समाधान शोधण्याची माया

  • by

माया संस्कृत अर्थावरून येतेजे नाहीआणि म्हणूनभ्रम. अनेक विद्वानांनी आणि विचारवंतांनी वेगवेगळ्या प्रकारे मायेच्या भ्रमावर जोर दिला पण सामान्यतः ही कल्पना व्यक्त करतात की ऐहिक अथवा भौतिक आमच्या प्राणास चुकीच्या मार्गाने नेऊ शकते आणि अशाप्रकारे आम्हास बंधनात गुंतवून आणि फसवून टाकते. आमचा प्राण पदार्थांवा नियंत्रण करू इच्छितो त्याचा आस्वाद घेऊ इच्छितो.

तथापि, असे करीत असतांना आपण वासना, लोभ, आणि क्रोधास शेवटी बळी पडतो. बरेचदा मग आपण आपले प्रयत्न दुप्पट करतो आणि चुकांवर चूका करीत जातो, सखोल भ्रमात पडतो अथवा मायेत फसतो. अशाप्रकारे माया वावटळीप्रमाणे कार्य करते, वाढत्या शक्तीनिशी , आम्हास अधिकाधिक फसविते, नैराश्यात ढकलते. मायेचा परिणाम म्हणून आम्ही त्या गोष्टीचा स्वीकार करतो जी तात्पुरती आहे कारण स्थायी मूल्य प्राप्त करण्यासाठी, आणि या जगात क्षणिक सुखाचा शोध घेतो, जे ते देऊ शकत नाही.

ज्ञानाचे भंडार असे उत्कृष्ट तमिल पुस्तक, तिरूकुरल, माया आमच्यावर तिचा प्रभाव याचे अशाप्रकारे वर्णन करते :

जर व्यक्ती आपल्या जिव्हाळ्याच्या विषयास बिलगून राहत असेल, सोडावयास तयार नसेल, तर दुःख त्याच्यावरील आपली पकड सैल करणार नाही.”

तिरूकुरल 35:347-348

हिब्रू वेदातील बुद्धिसाहित्य आणि तिरूक्कल यांत बरेच साम्य आहे. बौद्धिक काव्याचा लेखक शलमोन होता. ‘सूर्याखाली म्हणजे भूतलावर’ राहत असतांना – त्याने मायाचा आणि त्याच्या परिणामांचा कसा अनुभव केला याचे तो वर्णन करतो, अर्थात, असे जगणे की केवळ भौतिक वस्तूंस मोल आहे, आणि सूर्यपथाखाली या भौतिक जगात स्थायी सुखाच्या शोधात फिरणे.

भूतलावर अर्थात सूर्याखालीमायेचा शलमोनाचा अनुभव

आपल्या बुद्धीसाठी सुप्रसिद्ध पुरातन राजा, शलमोन, याने ख्रि. पू. 950 च्या सुमारास अनेक कविता लिहिल्या ज्या बायबलमधील जुन्या कराराचा भाग आहेत. उपदेशकात, जीवनात समाधान शोधण्यासाठी त्याने जे काही त्याचे त्याने वर्णन केले आहे. त्याने लिहिले : 

स्वत:शी म्हणालो, “मी मौज-मजा करायला हवी. जितका शक्य होईल तितका आनंद मी उपभोगायला हवा.” पण हेही अगदीच टाकाऊ आहे हे मला समजले.
2 सतत हसत राहणे हाही एक मूर्खपणाच आहे. मौजमजा करण्यातून काहीही चांगले घडत नाही.
3 म्हणून माझे मन शहाणपणाने भरता भरता माझे शरीर मद्याने (द्राक्षारसाने) भरायचे असे मी ठरवले. मी हा मूर्खपणा करायचे ठरवले कारण मला सुखी व्हायचा मार्ग शोधायचा होता. लोकांना त्यांच्या छोट्याशा आयुष्यात चांगले करण्यासारखे असे काय आहे ते मला शोधायचे होते.
4 नंतर मी महान गोष्टी करायला सुरुवात केली. मी घरे बांधली, मी स्वत:साठी द्राक्षाचे मळे लावले.
5 मी बागा लावल्या आणि मोठमोठे बगिचे केले. मी सर्व प्रकारची फळझाडे लावली.
6 मी माझ्यासाठी तळी निर्माण केली. आणि त्या तव्व्यांचा उपयोग मी माझ्या वाढणाऱ्या झाडांना पाणी देण्यासाठी केला.
7 मी पुरुष आणि स्त्री गुलामांना विकत घेतले, आणि माझ्या घरातही गुलामांचा जन्म झाला. माझ्याजवळ खूप मोठया गोष्टी होत्या. माझ्याजवळ जनावरांची खिल्लारे आणि मेंढ्यांचे ढकळप होते. यरुशलेममधील कोणाही माणसाजवळ नसतील इतक्या गोष्टी माझ्याजवळ होत्या.
8 मी स्वत:साठी सोने आणि चांदी गोळा केली. मी राजांकडून, त्याच्या देशांकडून संपत्ती घेतली. माझ्यासाठी गाणे म्हणणारे स्त्री पुरुष माझ्याजवळ होते. कोणालाही हव्याहव्याशा वाटणाऱ्य गोष्टी माझ्याजवळ होत्या.
9 मी खूप श्रीमंत आणि प्रसिद्ध झालो. माझ्या आधी यरुशलेममध्ये राहणाऱ्य कोणाही माणसा पेक्षा मी मोठा होतो आणि माझे शहाणपण मला मदत करण्यासाठी नेहमी तयार होते.
10 माझ्या डोव्व्यांना जे जे दिसे आणि हवेसे वाटे ते मी मिळवले. मी जे केले त्यामुळे माझे मन प्रसन्न असे आणि हा आनंद माझ्या कष्टांचे फळ होते.

उपदेशक 2:1-10

धन, ख्याति, ज्ञान, प्रकल्प, स्त्रियां, सुखभोग, राज्य, व्यवसाय, दाक्षरस… शलमोनाने सर्वांचा आस्वाद घेतला – आणि त्याच्या व आमच्या काळातील लोकांपेक्षा जास्तच. आइन्स्टाईनची कुशाग्र बुद्धी, लक्ष्मी मित्तलची अमाप संपत्ती, बाॅलिवूड तारकांचे सामाजिक/लैंगिक जीवन, ब्रिटिश राजघराण्याच्या राजकुमार विलियमसारखे राजकीय कुळ – हे सर्वकाही त्याला एकट्याने लाभले होते. हा संयोग कोण पराजित करू शकतो? आपण विचार केला असता, सर्व लोकांत त्यानेच काय ते समाधान प्राप्त केले असेल.

त्याच्या इंतर कवितांपैकी, गीतरत्न, हे सुद्धा बायबलमध्ये आढळते, त्यात तो आपल्या शृंगारिक, तप्त प्रेमप्रसंगाविषयी लिहितो – असे वाटते की हीच गोष्ट काय ती आयुष्यभर समाधान पुरविते. पूर्ण कविता येथे आहे. पण खाली तो आणि त्याची प्रेमिका यांच्यातील प्रेमकाव्याचा भाग खाली दिला आहे

गीतरत्नातील पद्यांश

लमोनाचे सर्वांत सुंदर गीत
2 चुंबनांनी मला झाकून टाक कारण तुझे प्रेम द्राक्षरसापेक्षा चांगले आहे.
3 तुझ्या अत्तराचा खूप चांगला वास येत आहे, पण तुझे नाव मात्र उत्तम अत्तरापेक्षाही गोड आहे. त्यामुळेच तरुणी तुझ्यावर प्रेम करतात.
4 मला तुझ्याबरोबर ने. आपण पळून जाऊ.राजाने मला त्याच्या खोलीत नेले.आम्ही आनंदोत्सव करु आणि तुझ्यासाठी आनंदित होऊ. तुझे प्रेम द्राक्षारसापेक्षा चांगले आहे हे लक्षात ठेव. तरुणी तुझ्यावर योग्य कारणासाठी प्रेम करतात.
5 यरुशलेमच्या मुलींनो, मी काळी आणि सुंदर आहे. मी तेमान आणि शलमोनाच्या तंबूंसारखी काळी आहे.
6 मी किती काळी आहे, सूर्याने मला किती काळे केले आहे याकडे बघू नका. माझे भाऊ माझ्यावर रागावले होते. त्यांनी माझ्यावर त्यांच्या द्राक्षांच्या मळ्याची काळजी घ्यायची सक्ती केली. त्यामुळे मला स्वत:चीकाळजी घेता आली नाही.
7 मी माझ्या आत्म्यासकट तुझ्यावर प्रेम करते. मला सांग: तू तुझ्या मेंढ्यांना कुठे खायला दिलेस? तू त्यांना दुपारी कुठे विश्रांती घेऊ दिलीस? मी तुझ्याबरोबर यायला हवे. नाही तर मी तुझ्या मित्रांच्या मेंढ्यांची काळजी घेणारी, अशी भाडोत्री स्त्रीसारखी ठरेन
8 तू खूप सुंदर स्त्री आहेस. काय करायचे ते तुला नक्कीच माहीत आहे. मेंढ्यांच्या मागे मागे जा. तुझ्या लहान बकऱ्यांना मेंढपाळाच्या तंबूंजवळ खाऊ घाल.
9 फारोचा रथ ओढणाऱ्या घोड्यांना घोडीजशी उद्दीपित करते त्यापेक्षाही जास्त तू मला उद्दीपित करतेस.त्या घोडड्यांच्या चेहेऱ्यांच्या बाजूंवर आणि गळ्यात सुंदर अलंकार आहेत.
10 हे तुझ्यासाठी केलेले अलंकार: डोक्याभोवतीचा सोन्याचा पट्टा आणि चांदीच्या हार. तुझे सुंदर गाल सोन्याने अलंकृत केले आहेत. तुझा गळा चांदीच्या अलंकारांनी सुंदर दिसत आहे.
11
12 माझ्या अत्तराचा वास बिछान्यावर लवंडलेल्या राजापर्यंत जातो.
13 माझ्या वक्षस्थळांमध्ये रात्रभर विसावलेला माझा प्रियकर माझ्या गळ्यात असलेल्या सुंगधी द्रव्याच्या पिशवीसारखा आहे
14 माझा प्रियकर एन – गेदीमधील द्राक्षाच्या मळ्याजवळील मेंदीच्या फुलांच्या गुच्छा सारखा आहे.
15 प्रिये, तू किती सुंदर आहेस! तू फारच सुंदर आहेस. तुझे डोळे कबुतरासारखे आहेत.
16 प्रियकरा, तू सुध्दा सुस्वरुप आहेस आणि मोहक आहेस. आपला बिछाना किती आल्हाददायक आणि सुखावह आहे.
17 आपल्या घराच्या तुळ्या गंधसरुच्या लाकडाच्या आहेत. छताचे वासे देवदारुच्या लाकडाची आहे.

श्रेष्ठगीत 1:9-2:17

जवळजवळ 3000 वर्षे जुन्या, या कवितेत बाॅलिवूडच्या उत्कृष्ट प्रेम चित्रपटात आढळून येणार्या शृंगाररसाची तीव्रता आहे. बायबलमध्ये लिहिले आहे की आपल्या अमाप संपत्तीने त्याने 700 प्रेमिका प्राप्त केल्या! बाॅलिवूड किंवा हाॅलिवूडच्या अत्यंत यशस्वी प्रियकरांपेक्षाही हे फार अधिक झाले. म्हणून आपण विचार कराल की या सर्व प्रेमप्रकरणांनी तो संतुष्ट असावा. पण हे सर्व प्रेम, सर्व धनसंपत्ती, सर्व ख्याति आणि बुद्धी ही असतांनाही – त्याने लिहिले  :

गुरूकडून आलेले शब्द आहेत. हा गुरू दाविदाचा मुलगा आणि यरुशलेमचा राजा होता. 14 मी पृथ्वीवर केल्या गेलेल्या सर्व गोष्टींकडे पाहिले आणि त्या सर्व गोष्टी वेळ वाया घालवण्यासारख्या आहे असे मला वाटले. त्या वारा पकडण्यासारख्याआहे असे वाटले. 15 या गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही. जर एखादी वस्तू वाकडी असली तर ती सरळ आहे असे तुम्ही म्हणू शकत नाही. आणि एखादी वस्तु हरवली असली, तर ती आहे तुम्ही म्हणू शकत नाही.

उपदेशक 1:1-14

11 परंतु नंतर मी ज्या ज्या गोष्टी केल्या त्यांच्याकडे पाहिले. मी जे कष्ट केले त्यांच्याकडे पाहिले. आणि ते सर्व म्हणजे वेळेचा अपव्यय होता असे मी ठरवले. वाऱ्याला पकडण्यासारखेच ते होते. आपण जीवनात जे काही करतो त्यापासून काहीही लाभ होत नाही.
12 कोठलाही माणूस राजापेक्षा अधिक काही करू शकत नाही एखाद्या राजाने तुम्हाला जे करावेसे वाटते ते आधीच केलेले असते. आणि राजा ज्या गोष्टी करतो त्या करणे म्हणजेही वेळेचा अपव्यय आहे हेही मला समजले. म्हणून मी पुन्हा पुन्हा शहाणे व मूर्ख होण्याचा आणि वेड्या गोष्टी करण्याच्या बाबतीत विचार करू लागलो.
13 शहणपण हे मूर्खपणापेक्षा चांगले आहे. जसा प्रकाश अंधारापेक्षा चांगला आहे.
14 ते असे आहे: शहाणा माणूस त्याच्या मनाचा उपयोग डोव्व्यांप्रमाणे, त्याला जिथे जायचे आहे तिथे जाण्यासाठी करतो. परंतु मूर्ख मात्र अंधारात चालणाऱ्या माणसासारखा असतो.परंतु मूर्ख आणि शहाणा हे दोघेही सारख्याच रीतीने नाश पावतात. दोघेही मरतात.
15 मी स्वत:शीच विचार केला, “‘मूर्खाच्या बाबतीत ज्या गोष्टी घडतील त्याच माझ्याही बाबतीत घडतील तर मग मी शहाणा होण्यासाठी एवढी पराकाष्ठा का केली?” मी स्वत:शीच म्हणालो, “शहाणे असणेही निरुपयोगीच आहे.”
16 शहाणा आणि मूर्ख दोघेही मरणारच आणि लोक शहाण्या माणसाचे अथवा मूर्ख माणसाचे सदैव स्मरण कधीच ठेवणार नाहीत. त्यांनी जे जे केले ते सर्व लोक भविष्यात विसरून जातील. म्हणून शहाणा माणूस आणि मूर्ख माणूस दोघेही समान आहेत.
17 यामुळे मला जीवनाचा तिरस्कार वाटायला लागला. जीवनातील सर्व गोष्टी वाऱ्याला पकडण्याचा प्रयत्न करण्यासारख्या निरुपयोगी आहेत या विचाराने मला खूप दु:ख झाले.
18 मी जे अपार कष्ट केले त्याचा मी किरस्कार करू लागलो. मी खूप कष्ट केले. परंतु त्या कष्टांनी मी जे मिळवले ते माझ्यानंतर जे लोक राहतील त्याना मिळणार आहे. मी त्या गोष्टी माझ्याबरोबर नेऊ शकणार नाही.
19 मी जो अभ्यास केला आणि काम करून जे मिळवले त्याच्यावर इतरांचीच सत्ता राहणार आहे आणि तो माणूस शहाणा आहे की मूर्ख ते मला माहीत नाही. हेही निरर्थकच आहे.
20 म्हणून मी माझ्या सर्व कामांबद्दल दु:खी झालो.
21 माणूस आपले सर्व ज्ञान, शहाणपण आणि कौशल्य वापरून कष्ट करू शकतो. पण तो माणूस मरेल आणि इतरांना त्याच्या कष्टाचा फायदा मिळेल. त्या लोकांनी कष्ट केले नाहीत तरी त्यांना सगळे काही मिळेल. त्यामुळे मला खूप दु:ख झाले. ते योग्य नाही आणि शहाणपणाचेही नाही.
22 माणसाने खुप कष्ट केल्यावर आणि भांडल्यावर त्याला आयुष्यात खरोखर काय मिळते?
23 आयुष्यभर त्याला दु:ख, मनस्ताप आणि कष्टच मिलतात. त्याचे मन रात्रीदेखील स्वस्थ नसते. हे सुध्दा शहाणपणाचे नाही.

उपदेशक 2:11-23

शेवटी  समाधान देण्याकरिता सुख, संपत्ती, काम, प्रगती, शृंगारिक प्रेमाचे अभिवचन हे सर्वकाही भ्रम अथवा मायाजाल असल्याचे त्याने दर्शविले. परंतु आज हाच संदेश आहे की आपण आणि मी अद्याप समाधानाचा एक निश्चित मार्ग म्हणून ऐकत आहोत. शलमोनच्या कवितांनी आम्हाला आधीच सांगितले आहे की त्याला या प्रकारांनी समाधान मिळवता आले नाही.

मृत्यू तसेच जीवन यावर चिंतन करण्यासाठी शलमोन आपल्या काव्यात पुढे म्हणतो:

 19 माणूस पशूपेक्षा चांगला आहे का? नाही! का? कारण सर्वच निरर्थक आहे. पशूंच्या आणि माणसांच्या बाबतीत सारख्याच गोष्टी घडतात. ते दोघे ही मरतात. माणूस आणि पशू यांचा श्वास सारखाच आहे. मेलेला पशू मेलेल्या माणसापेक्षा वेगळा आहे का?
20 माणसांच्या आणि पशूंच्या शरीराचा नाश सारख्याच प्रकारे होतो. ते जमीनीतून आले आणि शेवटी ते तिथेच जातील.
21 माणसाच्या आत्म्याचे काय होते हे कोणाला माहीत आहे? माणसाचा आत्मा वर देवाकडे जातो की पशूचा आत्मा खाली जमिनीत जातो हे कुणाला माहीत आहे?()

उपदेशक 3:19-21

2 पण एक गोष्ट मात्र सर्वांच्या बाबतीत घडते ती म्हणजे आपण सर्व मरतो. मरण वाईट माणसांना आणि चांगल्या माणसांनाही येते. जी माणसे शुध्द आहेत त्यांनाही मरण येते आणि जी शुध्द नाहीत त्यांनाही येते. जे लोक यज्ञ करतात त्यांनाही मरण येते आणि जे यज्ञ करत नाहीत त्यांनाही मरण येते. चांगला माणूस पापी माणसासारखाच मरेल. जो मणूस देवाला काही खास वचने देतो, जो अशी वचने द्यायला घाबरतो त्या माणसासारखाच मरेल.
3 या आयुष्यात ज्या गोष्टी घडतात त्यातली सगव्व्यात वाईट गोष्ट म्हणजे सर्वांचा शेवट सारखाच होतो. लोक नेहमी दुष्ट आणि मूर्खपणाचा विचार करतात. ही गोष्ट सुध्दा वाईटच आहे हे विचार मरणाकडे नेतात.
4 जो माणूस अजून जिवंत आहे त्याच्याबाबतीत आशेला जागा आहे. तो कोण आहे याला महत्व नाही. पण हे म्हणणे खरे आहे:“जिवंत कुत्रा मेलेल्या सिंहापेक्षा चांगला असतो.”
5 जिवंत माणसांना ते मरणार आहेत हे माहीत असते. पण मेलेल्यांना काहीच माहीत नसते. मेलेल्यांना कुठलेच बक्षिस मिळत नाही. लोक त्यांना लवकरच विसरतात.

उपदेशक 9:2-5

पवित्र पुस्तक, बायबलमध्ये, संपत्ती आणि प्रेम याविषयीच्या कवितांचा समोवश का आहे – ज्यांचा संबंध आपण पवित्रतेशी जोडत नाही अशा गोष्टी? आमच्यापैकी अनेक जणांची अपेक्षा असते की पवित्र ग्रंथांनी वैराग्य, धर्म आणि जगण्यासाठी नैतिक नियम याविषयी चर्चा करावी. आणि बायबलमधील शलमोन  अशा निर्णायक आणि निराशावादी पद्धतीने मृत्युविषयी का लिहितो?

शलमोनाने घेतलेला मार्ग, ज्याचा सामान्यतः जगभर पाठपुरावा केला जातो, स्वार्थासाठी जगणे होता, ज्या अर्थाचा, सुखाचा अथवा आदर्शांचा पाठपुरावा करण्याची त्याने निवड केली होती त्यांचा निर्माण करणे. पण तो शेवट शलमोनासाठी चांगला नव्हता – समाधान क्षणिक आणि भ्रम होता. त्याच्या कविता बायबलमध्ये सावधगिरीचा मोठा इशारा म्हणून आहेत – “येथे जाऊ नका – आपल्या पदरी नैराश्य येईल!” आमच्यापैकी जवळजवळ सर्व जण त्याच मार्गाने खाली जाण्याचा प्रयत्न करतील जो शलमोनाने घेतला होता आणि जर आपण त्याचे ऐकाल तर आपण बुद्धिमान आहात.

सुवार्ताशलमोनाच्या कवितांस उत्तर देणे 

येशू ख्रिस्त (येशू सत्संग) कदाचित बायबलमध्ये लिहिलेला सर्वात प्रसिद्ध मनुष्य आहे. त्यानेही जीवनाबद्दल वक्तव्य केले. खरं तर तो म्हणाला

“… मी आलो आहे की त्यांना जीवन मिळावे आणि त्यांनी ते पूर्ण करावे”

जॉन १०:१०

28 जे थकलेले व ओझ्याने लादलेले असे सर्व तुम्ही मजकडे या आणि मी तुम्हांला विश्रांति देईन.
29 माझे जू आपणांवर घ्या, माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या आत्म्यास विश्रांति मिळेल.
30 कारण माझे जू सोपे आहे आणि माझे ओझे हलके आहे.”

मत्तय11:28-30

जेव्हा येशू हे म्हणतो तेव्हा तो त्या व्यर्थतेचे आणि नैराश्याचे उत्तर देतो ज्याविषयी शलमोनाने आपल्या कवितांत लिहिले आहे. कदाचितअगदी कदाचितशलमोनाच्या बंद मार्गाचे हे उत्तर आहे. शेवटी, सुवार्तेचा शाब्दिक अर्थ आहेचांगली बातमी. सुवार्ता खरोखर चांगली बातमी आहे का? याचे उत्तर देण्यासाठी आम्हाला सुवार्तेची माहिती असणे आवश्यक आहे. तसेच आपणास सुवार्तेच्या दाव्यांचे परीक्षण करणे आवश्यक आहेअविचाराने टीका करता, सुवार्तेबद्दल गंभीरपणे विचार करणे.

माझी गोष्ट सांगत असतांना, मला हे बोलावेसे वाटते की मी घेतलेला हा एक प्रवास होता. या वेबसाइटमधील लेख येथे यासाठी आहेत जेणेकरुन आपण देखील शोध घ्यावयास सुरूवात करावी. येशूच्या देहधारणाने आपण उत्तम सुरूवात करू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *