Skip to content

काली, मृत्यू आणि वल्हांडणाचे चिन्ह

  • by

काली सामान्यतः मृत्यूची देवी म्हणून ओळखली जाते, परंतु अधिक अचूकरित्या संस्कृत शब्द काल म्हणजे समय या अर्थाने. कालीच्या प्रतिमा भयंकर असतात कारण सामान्यतः तिने गळ्यात कापलेल्या डोक्यांची माळ घातलेली असते आणि तुटलेल्या हातांचा घागरा घातलेला असतो, तिचा एक पाय तिचा पती शिव याच्या प्रवण शरीरावर असतो. काली आपल्याला हिब्रू वेद – बायबलमधील मृत्यूची दुसरी गोष्ट समजण्यात  मदत करते.

शिवाच्या प्रवण शरीरावर कापलेली डोकी आणि अंगांनी सजलेली काली

काली पौराणिक कथा सांगते की दैत्यांचा राजा महिषासूर याने देवतांविरूद्ध युद्ध करण्याची धमकी दिली होती. म्हणून त्यांनी त्यांच्या सत्वातून कालीस घडविले. कालीने दैत्यसैन्यात रक्तपात करीत धुमाकूळ माजविला, आणि तिच्या मार्गात येणार्‍या सर्वांचा नाश केला. युद्धाचा चरमोत्कर्ष म्हणजे दैत्यांचा राजा महिषासुर याच्याशी तिची लढाई होती जिचा तिने एका हिंसक लढ्यात नाश केला. कालीने तिच्या विरोधकांच्या रक्तरंजित अवयवांस आपल्या ताब्यात घेतले, पण ती त्या सर्व रक्ताने मादक झाली आणि मृत्यू व विनाश यांचा मार्ग थांबवू शकली नाही. तिला कसे थांबवावे हे देवतांना कळेना म्हणून शिवाने स्वेच्छेने युद्धाच्या मैदानावर निश्चल पडून राहण्याचे ठरविले. अशाप्रकारे, आपल्या मृत विरोधकांच्या डोक्यांनी व हातांनी सजलेल्या, कालीने, प्रवण शिवाच्या पाठीवर एक पाय ठेवला आणि त्याच्याकडे पाहिले तेव्हा ती परत भानावर आली आणि विनाश संपुष्टात आला.

इब्री वेदातील वल्हांडणाच्या वर्णनात काली आणि शिव यांच्या या कथेचे प्रतिबिंब आहे. वल्हांडणाच्या गोष्टीत एका दूताविषयी  लिहिले आहे, जो कालीप्रमाणे, एका दुष्ट राजाचा विरोध करण्यासाठी मृत्यूचे थैमान माजवितो. कालीला रोखण्यासाठी आपले स्थान ग्रहण करणार्‍या मृत्यूचा दूत, शिव याला ज्या घरात असहाय कोकरू अर्पण केले गेले आहे अशा कोणत्याही घरात प्रवेश करण्यापासून रोखले गेले आहे. वल्हांडणाच्या कथेचा देखील अर्थ आहे जो  नासरेथच्या येशूच्या – येशू सत्संग – आगमनाकडे आणि स्वतःस शून्य करून आमच्या वतीने आपल्या प्राणाचे बलिदान करण्याकडे संकेत करतो. वल्हांडणाची कथा जाणून घेण्यासारखी आहे.

निर्गम वल्हांडण      

आम्ही पाहिले की कशाप्रकारे ऋषी अब्राहामाद्वारे त्याच्या पुत्राचे बलिदान हे येशूच्या बलिदानास सूचित करणारे एक चिन्ह होते. अब्राहामानंतर, त्याचा हा पुत्र इसहाक याच्याद्वारे उत्पन्न त्याचे वंशज, ज्यांना इस्राएली म्हटले जाते, त्यांची संख्येत वाढ झाली परंतु ते इजिप्त देशात गुलामही बनले.

आता आपण इस्राएली नेता मोशे याने हाती घेतलेल्या नाट्यमय संघर्षाविषयी पाहणार आहोत ज्याबद्दल बायबलमध्ये निर्गमच्या इब्री वेदात लिहिलेले आहे. त्यात नमूद करण्यात आले आहे की कशाप्रकारे इ.स.पू. 15०० च्या सुमारास, अब्राहामाच्या 5०० वर्षांनंतर मोशेने इस्राएली लोकांना इजिप्शियन लोकांच्या गुलामगिरीतून सोडवले.इजिप्तच्या फारोचा (राज्यकर्ता) मुकाबला करण्यासाठी निर्मात्या परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती आणि त्याचा परिणाम म्हणून उत्पन्न झालेल्या संघर्षामुळे इजिप्तवर नऊ पीडा किंवा आपत्ती आणण्यात आल्या. परंतु फारो इस्राएली लोकांना सोडण्यास तयार झाला नाही म्हणून देव दहावी आणि शेवटचा पीडा आणणार होता. 10 व्या पीडेचे संपूर्ण वर्णन येथे आहे.

देवाने सांगितले की दहाव्या पीडेसाठी इजिप्तमधील सर्व घरांमधून मृत्यूचा एक देवदूत (आत्मा) जाईल. संपूर्ण देशातील प्रत्येक घराचा प्रत्येक पहिला मुलगा एका विशिष्ट रात्री मरण पावेल त्यांस सोडून जे अशा घरांत असतील जेथे कोकरू अर्पण केले गेले असेल आणि कोंकराचे रक्त त्या घराच्या कपाळपट्टीवर लावलेले असेल. फारोच्या नाशाचे कारण हे असेल की, जर त्याने आज्ञा पाळली नाही आणि कोंकराचे रक्त त्याच्या दाराच्या कपाळपट्टीवर लावले नाही, तर त्याचा मुलगा आणि सिंहासनाचा वारस मरेल. आणि इजिप्तमधील प्रत्येक घर आपला पहिला मुलगा गमावेल – जर बळी दिलेल्या कोंकराचे रक्त घराच्या कपाळपट्टीवर लावले नाही तर. इजिप्तला राष्ट्रव्यापी संकटाचा सामना करावा लागला.

परंतु ज्या घरात कोकरू अर्पण केला जाईल आणि त्याचे रक्त दरवाजाच्या कपाळपट्टीवर रंगवले जाईल त्यांस हे अभिवचन देण्यात आले होते की तेथे प्रत्येक जण सुरक्षित असेल. मृत्यूचा देवदूत त्या घरापासून निघून जाईल. म्हणून त्या दिवसाला वल्हांडण म्हटले गेले (कोंकराचे रक्त ज्या घरांवर लावण्यात आले होते त्या सर्व घरांस मृत्यू ओलांडून गेला).

वल्हांडण सणाचे चिन्ह

ज्यांनी ही गोष्ट ऐकली आहे ते असे गृहित धरतात की दारावरील रक्त मृत्यूच्या दूतासाठी चिन्ह होते. परंतु 3500 वर्षांपूर्वी लिहिलेल्या वर्णनातून घेतलेला तपशील पहा.

परमेश्वर मोशेला म्हणाला, “आणि ज्या घरांत तुम्ही असाल त्या घरांत ते रक्त तुमच्याकरिता खूण असे होईल. रक्त पाहीन तेव्हा मी तुम्हाला ओलांडून जाईन

निर्गम 12:13

जरी देव दारात रक्ताच्या शोधात होता, आणि जेव्हा त्याने पाहिले की मृत्यू ओलांडून जाणार आहे, तरी रक्त देवासाठी चिन्ह नव्हते. हे अगदी स्पष्टपणे सांगते की, रक्ततुमच्यासाठी खूनम्हणजे चिन्हलोकांसाठी होते. हे वर्णन वाचणाऱ्या आपल्या सर्वांसाठी देखील एक चिन्ह आहे. पण हे चिन्ह कसे आहे? त्यानंतर परमेश्वराने त्यांना आज्ञा केली:

 24 तुम्ही या आज्ञेची आठवण ठेवली पाहिजे की तुम्ही व तुमचे वंशज यानी पाळावयासाठी हा नियम कायमचा नियम आहे.
25 परमेश्वर त्याच्या वचनानुसार जो देश तुम्हाला देणार आहे त्यात तुम्ही गेला तर तेथेही तुम्ही हा नियम पाळण्याची आठवण ठेवावी.
26 जेव्हा तुमची मुलेबाळे तुम्हाला विचारतील की हा विधी आपण का करीत आहोत?
27 तेव्हा तुम्ही त्यांना सांगा, ‘हा परमेश्वराच्या वल्हांडणाचा यज्ञ आहे; कारण आम्ही जेव्हा मिसरमध्ये होतो तेव्हा या दिवशी परमेश्वराने मिसरच्या लोकांना मारले परंतु इस्राएल लोक राहात असलेली घरे ओलाडूंन तो पुढे गेला व त्या घरातील आम्हा सर्वाना त्याने वाचवले’ त्यानंतर इस्राएल लोकांनी परमेश्वरापुढे नतमस्तक होऊन त्याची उपासना केली. ()

निर्गम 12:24-27
वल्हांडण सणाच्या वेळी कोकरू आणि यहूदी मनुष्य

दरवर्षी त्याच दिवशी वल्हांडण सण साजरा करण्याची इस्राएल लोकांना आज्ञा होती. यहूदी दिनदर्शिका, हिंदू कॅलेंडरसारखी चंद्र दिनदर्शिका आहे, म्हणूनच ती पाश्चात्य दिनदर्शिकेपेक्षा थोडी वेगळी आहे, आणि प्रत्येक वर्षी पाश्चात्य दिनदर्शिकेद्वारे सणाचा दिवस बदलला जातो. परंतु आजपर्यंत, 35०० वर्षांनंतर, यहूदी लोक या घटनेच्या स्मरणार्थ आणि त्या वेळी दिलेल्या आज्ञेचे पालन म्हणून त्यांच्या वर्षाच्या त्याच तारखेला वल्हांडण सणाचा उत्सव साजरा करीत असतात.

प्रभु येशूकडे अंगुलीनिर्देश करणारा वल्हांडणाचा सण

इतिहासाद्वारे या उत्सवाचा मागोवा घेताना आपण काहीतरी विलक्षण पाहू शकतो. आपण हे शुभवर्तमानात पाहू शकता ज्यात येशूची अटक खटला याविषयी लिहिण्यात आले आहे (त्या पहिल्या वल्हांडणाच्या पीडेच्या 1500 वर्षांनंतर) :

28 नंतर यहूदी येशूला कयफाच्या घरातून रोमन राजवाड्याकडे घेऊन गेले. तेव्हा पहाट झाली होती. आपण विटाळले जाऊ नये व वल्हांडणाचे भोजन करता यावे म्हणून ते राजवाड्यात गेले

नाहीत.योहान 18:28

39 पण वल्हांडण सणात मी तुम्हांसाठीएकाला सोडावे अशी तुमच्यामध्ये रीत आहे. म्हणून मी तुमच्यासाठी यहूद्यांच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे काय?”

योहान 18:39

दुसऱ्या शब्दांत, येशूला अटक करण्यात आली आणि यहूदी कॅलेंडरमधील वल्हांडणाच्या दिवशीच त्याला वधस्तंभावर पाठविण्यात आले. येशूला दिलेली एक पदवी होती

  29 दुसऱ्या दिवशी योहानाने येशूला आपणांकडे येताना पाहिले. योहान म्हणाला, “पाहा, हा देवाचा कोकरा. जगाचे पाप वाहून नेणारा.
30 याच्याविषयी मी बोलत होतो. मी म्हणालो, ‘माझ्यानंतर एक मनुष्य येणार आहे. परंतु तो माझ्याहून थोर आहे. तो माझ्या अगोदरपासून आहे. तो सदाजीवी आहे.’

योहान 1:29-30

येथे आपण पाहतो की वल्हांडण सण आपल्यासाठी कसे एक चिन्ह आहे. येशू, देवाचा कोकरा वधस्तंभावर खिळविण्यात आला (म्हणजे बलिदान देण्यात आला) वर्षाच्या त्याच दिवशी जेव्हा 1500 वर्षांपूर्वी घडलेल्या वल्हांडणाच्या पहिल्या दिवसाचे स्मरण करण्यासाठी सर्व यहूदी एक कोकरू अर्पण करीत होते. हे दरवर्षी पुन्हा येणाऱ्या दोन सुट्टीच्या वार्षिक वेळेचे स्पष्टीकरण देते. यहूदी वल्हांडणाचा सण जवळजवळ प्रत्येक वर्षी ईस्टरच्या वेळीच येतो – कॅलेंडर तपासा. (यहूदी कॅलेंडरमध्ये चंद्र-आधारित लीप वर्षांच्या चक्रांमुळे प्रत्येक 19 व्या वर्षी एका महिन्याचे अंतर पडते). म्हणूनच दरवर्षी इस्टर पुढे वाढतो कारण तो वल्हांडण सणावर आधारित आहे, वल्हांडण सणाची वेळ यहूदी दिनदर्शिकेद्वारे ठरविली जाते व ही गणना पाश्चात्यांच्या कॅलेंडरपेक्षा वेगळ्या पद्धतीने केली जाते.

आता ‘चिन्हे’ काय करतात याचा एक मिनिट विचार करा. आपण खाली काही चिन्हे पाहू शकता.

भारताचे चिन्ह
आम्हाला मॅकडोनल्ड्स आणि नायकेचा विचार करण्यासाठी वाणिज्यिक चिन्हे

 

ध्वज हे भारताचे चिन्ह किंवा प्रतीक आहे. आम्ही फक्त त्यावरील नारंगी आणि हिरव्या रंगाची पट्टी असलेला फक्त एक आयत ‘पाहत’ नाही. नाही, जेव्हा आम्ही ध्वज पाहतो तेव्हा आपण भारताचा विचार करतो. ‘सोन्याच्या कमानीं’ चे चिन्ह आम्हाला मॅकडोनल्ड्सबद्दल विचार करण्यास प्रवृत्त करते. नादालच्या हेडबँडवरील ‘√’ चिन्ह नायकेसाठी चिन्ह आहे. नायकेस वाटते की जेव्हा आपण नादालच्या डोक्यावर हे चिन्ह पाहतो तेव्हा आपण त्यांचा विचार करावा. चिन्हे आमच्या मनांतील निदर्शक आहेत

आपला विचार इच्छित वस्तूकडे निर्देशित करण्यासाठी.

निर्गमच्या इब्री वेदातील वल्हांडण सणाच्या वर्णनात स्पष्टपणे म्हटले आहे की हे चिन्ह लोकांसाठी होते, निर्मात्या परमेश्वरासाठी नाही (जरी तो अद्याप त्या रक्ताकडे पाहत असेल आणि जर ते दिसले तर घरास ओलांडून जाईल). सर्व चिन्हांप्रमाणेच, जेव्हा आपण वल्हांडणाकडे पाहतो तेव्हा आपण काय विचार करावा अशी त्याची इच्छा होती? ज्या दिवशी येशूने बलिदान दिले त्याच दिवशी कोंकऱ्यांचा बळी देण्याची उल्लेखनीय वेळ असल्याने, ते येशूच्या बलिदानाचे सूचक आहे.

हे खाली दर्शविल्याप्रमाणे आपल्या मनामध्ये कार्य करते. चिन्ह आपणास येशूच्या बलिदानाकडे इशारा करते.

वल्हांडण सणाच्या येशूच्या बलिदानाची नेमकी वेळ ही एक चिन्ह आहे

 त्या पहिल्या वल्हांडण सणाच्या दिवसात मेंढरांचे बळी अर्पण केले गेले आणि रक्त पसरविले गेले यासाठी की लोकांस जिवंत राहता यावे. आणि अशाप्रकारे, येशूकडे संकेत करणारे हे चिन्ह आपल्याला सांगते की, ‘देवाचा कोंकरादेखील’ मृत्यूचे बलिदान म्हणून देण्यात आला होता आणि त्याचे रक्त सांडले यासाठी की आपणास जीवन प्राप्त व्हावे.

अब्राहामाच्या चिन्हात ज्या ठिकाणी अब्राहामास त्याच्या मुलाच्या बलिदानाची परीक्षा द्यावी लागली ते स्थान मोरिया पर्वत होते. एक कोंकरू मेले यासाठी की अब्राहामाच्या मुलाने जगावे.

अब्राहामाचे चिन्ह त्या ठिकाणाकडे इशारा करीत होते.

मोरिया पर्वत तेच स्थान होते जेथे येशूला बलिदान करण्यात आले होते. त्या जागेकडे इशारा करून त्याच्या मृत्यूचा अर्थ आपल्याला ‘पाहण्यास’ लावणारे हे एक ‘चिन्ह’ होते. वल्हांडण सणात आपल्याला येशूच्या बलिदानाकडे इशारा करणारी आणखी एक गोष्ट आढळते – वर्षातील त्याच दिवसाकडे इशारा करण्याद्वारे.  हा कोकराचा यज्ञ पुन्हा एकदा वापरला जातो – येशूच्या बलिदानाकडे लक्ष वेधण्यासाठी – हा फक्त एका घटनेचा योगायोग नाही हे दाखविण्याद्वारे.  दोन वेगवेगळ्या पद्धतींनी (स्थानाद्वारे आणि वेळेद्वारे) पवित्र हिब्रू वेदांमधील दोन सर्वात महत्वाचे उत्सव थेट येशूच्या बलिदानास सूचित करतात. इतिहासातील इतर कोणत्याही व्यक्तीचा मी विचार करू शकत नाही ज्याचा मृत्यू अशा नाट्यमय शैलीत अशा समानतेने दर्शविला गेला आहे. आपण दाखवू शकता काय?

ही चिन्हे यासाठी दिली गेली आहेत जेणेकरून आपणास हा विश्वास व्हावा की येशूच्या बलिदानाची योजना खरोखरच देवाने केली होती. येशूचे बलिदान आपल्याला मृत्यूपासून कसे वाचविते आणि पापांपासून आम्हाला कसे शुद्ध करते याविषयी आपल्याला कल्पना करण्यास मदत करणारे हे एक उदाहरण होते – जे त्याचा स्वीकार करणाऱ्या सर्वांसाठी देवाची देणगी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *