Skip to content

यॉम किप्पूर – मूळ दुर्गा पूजा

  • by

दक्षिण एशियाच्या बहुतांश भागात अश्विन (आश्विन) महिन्यात 6-10 दिवस दुर्गा पूजा (दुर्गोत्सव) साजरा केला जातो.  असूर महिषासूराविरुद्ध प्राचीन लढ्यात देवी दुर्गाच्या विजयाचे स्मरण करण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो. अनेक भक्तांस हे माहीत नाही की हा सण यॉम किप्पूर (अथवा प्रायश्चिताचा दिवस) नावाच्या आणखी प्राचीन सणाच्या वेळी येतो, ज्याची सुरूवात 3500 वर्षांपूर्वी झाली आणि हिब्रू वर्षात सातव्या चांद्रमासाच्या 10 व्या दिवशी तो साजरा केला जातो. हे दोन्ही सण पुरातन आहेत, दोन्ही एकाच दिवशी येतात (त्यांच्या पंचांगानुसार. हिंदू आणि हिब्रू दिनदर्शिकेत अतिरिक्त लीप-वर्ष वेगळ्या वर्षी येते, म्हणून ते नेहमी पाश्चात्य दिनदर्शिकेत एकाच वेळी येत नाहीत पण ते दोन्ही नेहमी सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात येतात), दोन्हींत बलिदानांचा समावेश आहे, आणि दोन्ही मोठ्या विजयाचे स्मरण करतात. दुर्गा पूजा आणि यॉम किप्पूर मधील साम्य आश्चर्यजनक आहे. काही बाबतींत फरकही उल्लेखनीय आहेत. 

 प्रायश्चिताच्या दिवसाचा परिचय 

मोशे आणि त्याचा भाऊ अहरोन हे इस्राएली लोकांचे नेतृत्व करीत होते आणि येशूच्या सुमारे 1500 वर्षांपूर्वी त्यांस नियमशास्त्र प्राप्त झाले.

आपण गुलामगिरीतून इस्राएली लोकांच्या (हिब्रू अथवा यहूदी) श्री मोशेच्या नेतृत्वाचे आणि दहा आज्ञा प्राप्त करण्याचे अनुसरण केले कलियुगात इस्राएली लोकांचे मार्गदर्शन करण्यासाठी आज्ञा या दहा आज्ञा अत्यंत कठोर आहेत, पापाचे आकर्षण असलेल्या व्यक्तीस त्याचे पालन करणे अशक्य आहे. या आज्ञा एका विशिष्ट पेटीत ठेवल्या जात, ज्याला कराराचा कोश म्हटले जाई. कराराचा कोश परम पवित्रस्थान म्हटलेल्या एका विशेष मंदिरात असे.

मोशेचा भाऊ, अहरोन, आणि त्याचे वंशज याजक होते जे या मंदिरात लोकांच्या पापांच्या प्रायश्चितासाठी, अथवा झाकून टाकण्यासाठी बलिदान अर्पण करीत. यॉम किप्पूर  – प्रायश्चिताच्या दिवशी विशेष बलिदान अर्पण केले जाई. आज हे आमच्यासाठी बहुमूल्य पाठ आहेत, आणि आपण दुर्गा पूजेच्या विधीसंस्कारांशी प्रायश्चिताच्या दिवसाची (यॉम किप्पूर) तुलना करून बरेच काही शिकू शकतो.  

प्रायश्चिताचा दिवस आणि पाप वाहून नेणारा बकरा

हिब्रू वेदाने, अर्थात आजचे बायबल, मोशेच्या काळापासून प्रायश्चिताच्या दिवसाचे बलिदान व विधि या संबंधाने निश्चित सूचना दिल्या. या सूचनांचा अर्थात आज्ञांचा आरंभ कसा होतो ते आपण पाहतो:

अहरोनाचे दोन मुलगे परमेश्वरासमोर धूप दाखविण्यासाठी गेले असताना मरण पावले. त्यानंतर परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला, “तुझा भाऊ अहरोन ह्याला सांग की त्याने वाटेल त्यावेळी परमपवित्रस्थानात अंतरपटाच्या आत पवित्र कोशावर असलेल्या दयासनापुढे जाऊ नये; तेथे दयासनावरील ढगात मी दर्शन देत असतो; अहरोन जर तेथे जाईल तर तो मरेल!

लेवीय 16:1-2

अहरोन महायाजकाच्या दोन मुलांनी परमेश्वराची उपस्थिती असतांना जेव्हा परम पवित्रस्थानी मंदिरात अनादराने प्रवेश केला तेव्हा त्यांना मरण आले. त्या पवित्र उपस्थितीत दहा आज्ञांचे पूर्णपणे पालन न केल्याचा परिणाम त्यांचा मृत्यू झाला.

म्हणून काळजीपूर्वक सूचना देण्यात आल्या होत्या, ज्यात संपूर्ण वर्षातील केवळ एका दिवसाचा समावेश होता जेव्हा प्रमुख याजक परम पवित्रस्थानी प्रवेश करू शकत असे – प्रायश्चिताच्या दिवशी. जर त्याने दुसऱ्या कुठल्या दिवशी प्रवेश केला, तर त्याला मरण निश्चित होते. पण या एके दिवशी सुद्धा, प्रमुख याजक कराराच्या कोशाच्या उपस्थितीत प्रवेश करण्यापूर्वी, त्याला : 

“परमपवित्रस्थानात जाण्यापूर्वी त्याने पापार्पणसाठी एक गोऱ्हा व होमार्पणासाठी एक मेंढा आणावा. त्याने पाण्याने स्नान करावे मग तागाचा पवित्र सदरा व तागाचे चोळणे आपल्या अंगात घालावे; तागाच्या कमरपट्ट्याने आपली कमर कसावी आणि तागाचा फेटा बांधावा; ही पवित्र वस्त्रे आहेत.

लेवीय 16:3-4

दुर्गापूजेच्या सप्तमीच्या दिवशी, प्राणप्रतिष्ठेद्वारे दुर्गेच्या प्रतिमांस जागृत केले जाते आणि प्रतिमेस स्नान देऊन वस्त्र घातले जातात. यॉम  किप्पूरमध्ये देखील स्नानाचा समावेश असे पण प्रमुख याजकास स्नान दिले जात असे आणि परमस्थानी प्रवेश करण्यासाठी तयार केले जाई, दैवतास नाही. प्रभु परमेश्वरास आवाहन करणे अनावश्यक होते – त्याची उपस्थिती अथवा सान्निध्य वर्षभर परम पवित्रस्थानी असे. त्याऐवजी गरज ह्या उपस्थितीची भेट करण्याची होती. स्नान केल्यानंतर व वस्त्र घातल्यानंतर प्रमुख याजकास बलिदानासाठी पशु आणावे लागत.  

“अहरोनाने इस्राएलाच्या मंडळीकडून पापार्पणाकरिता दोन बकरे व होमार्पणाकरित एक मेंढा घ्यावा. त्यांने पापार्पणाचा गोऱ्हा अर्पण करुन स्वतःसाठी व आपल्या घराण्यासाठी प्रायश्चित करावे.

लेवीय 16:5-6

अहरोनाच्या स्वतःच्या पापांसाठी, पाप झाकण्यासाठी, अथवा प्रायश्चित करण्यासाठी बैलाचे अर्पण केले जाई. दुर्गा पूजेच्या वेळी बैलाचा अथवा बकऱ्याचा बळी कधी कधी दिला जातो. यॉम  किप्पूरसाठी याजकाचे स्वतःचे पाप झाकण्यासाठी बैलाच्या बलिदानास पर्याय नव्हता. जर प्रमुख याजकाने बैलाच्या बलिदानाने आपले पाप झाकले नाही तर त्याला मरण येई.

मग लगेच त्यानंतर, याजक दोन बकऱ्याचा उल्लेखनीय विधी पूर्ण करीत असे.

“मग त्याने ते दोन बकरे घेऊन दर्शनमंडपाच्या दारापाशी परमेश्वरासमोर उभे करावेत.अहरोनाने त्या दोन बकऱ्यावर चिठ्ठ्या टाकाव्या; एक चिठ्ठी परमेश्वरासाठी व अजाजेलसाठी.“परमेश्वरासाठी म्हणून, चिठ्ठी निघालेला बकरा अहरोनाने पापार्पण म्हणून अर्पण करावा;

लेवीय 16:7-9

त्याच्या स्वतःच्या पापासाठी बैलाचे अर्पण केल्यानंतर, याजक दोन बकरे घेऊन चिट्ठ्या टाकत असे. एक बकरा पाप वाहून नेणारा बकरा नेमला जाई. दुसरा बकरा पापबली म्हणून अर्पण केला जाई. का?

15 “मग अहरोनाने लोकांसाठी आणलेला पापार्पणाचा बकरा वधावा; त्याचे रक्त अंतरपटाच्या आतल्या दालनात आणावे आणि त्याने गोऱ्ह्याच्या रक्ताचे जसे केले तसेच बकऱ्याच्या रक्ताचे करावे म्हणजे ते दयासनावर व दयासनासमोर शिंपडावे. 16 ह्या प्रकारे त्याने इस्राएल लोकांची अशुद्धता, त्यांचे अपराध व त्यांची पापे ह्या सर्वोबद्दल परमपवित्रस्थान पवित्र करावे; आणखी अशुद्ध लोकांच्या परिसरात मध्यभागी वसत असलेल्या दर्शनमंडपासाठीही त्याने असेच करावे.

लेवीय 16:15-16

पाप वाहून नेणाऱ्या बकऱ्याचे काय होई?

20 “तेव्हा परमपवित्रस्थान, दर्शनमंडप आणि वेदी ह्यांच्याकरिता प्रायश्चित करण्याचे संपविल्यावर त्याने जिवंत बकरा सादर करावा. 21 अहरोनाने आपले दोन्ही हात त्या जिवंत बकऱ्याच्या डोक्यावर ठेवून इस्राएल लोकांची सर्व पापे व अपराध ह्यांचा अंगिकार करावा; व ती त्या बकऱ्याच्या डोक्यावर ठेवून त्याला घेऊन जाण्यासाठी तयार असलेल्या माणसाच्या हाती रानात पाठवून द्यावे. 22 तेव्हा तो बकरा त्या लोकांच्या सर्व पापकर्माचा भार घेऊन निर्जन रानात वाहून नेईल; त्या माणसाने त्या बकऱ्याला रानात सोडून द्यावे.

लेवीय 16:20-22

बैलाचे बलिदान अहरोनाच्या स्वतःच्या पापासाठी होते. पहिल्या बकऱ्याचे बलिदान इस्राएली लोकांच्या पापासाठी होते. अहरोन पाप वाहून नेणाऱ्या जिवंत बकऱ्याच्या डोक्यावर आपले हात ठेवीत असे आणि – प्रतीकात्मकरित्या – लोकांची पापे पाप वाहून नेणाऱ्या बकऱ्यावर हस्तांतरित करीत असे. मग या चिन्हाच्या रूपात की लोकांची पापे आता त्यांच्यापासून फार दूर करण्यात आली आहेत या बकऱ्यास जंगलात सोडून दिले जाई. या बलिदानांद्वारे त्यांच्या पापांचे प्रायश्चित केले जाई. असे प्रायश्चिताच्या दिवशी आणि केवळ त्याचदिवशी दरवर्षी केले जात असे.

प्रायश्चिताचा दिवस आणि दुर्गा पूजा

दरवर्षी या दिवशी हा सण साजरा करण्याची आज्ञा देवाने का दिली? त्याचा काय अर्थ होता? दुर्गा पूजेद्वारे त्या समयाचे स्मरण केले जाते जेव्हा दुर्गेने म्हशीच्या रूपातील दानव महिषासूराचा वध केला. हे भूतकाळातील एका घटनेचे स्मरण करते.  प्रायश्चित्ताचा दिवस देखील विजयाच्या स्मरणार्थ होता परंतु वाईटावरील भविष्याच्या विजयाच्या प्रतीक्षेच्या दृष्टीने पाहता तो भविष्यसूचक होता. जरी प्राण्यांचे खरे अर्पण केले गेले, तरी ते सुद्धा प्रतीकात्मक होते. वेद पुस्तकम् (बायबल) असे स्पष्ट करते

कारण बैलांच्या किंवा बकऱ्याच्या रक्ताने पाप नाहीसे होणे शक्य नाही.

इब्री लोकांस पत्र 10:4

प्रायश्चिताच्या दिवसाचे बलिदान याजकाचे आणि भक्तांचे पाप वाहून नेण्यास समर्थ नव्हते, तर ते दरवर्षी का अर्पण केले जात असे? वेद पुस्तकम् (बायबल) स्पष्ट करते

कारण नियमशास्त्र हे भविष्यकाळात येणाऱ्या चांगल्या गोष्टींची केवळ एक छाया आहे. त्या सत्याचे ते खरे स्वरुप नव्हे, म्हणून देवाची उपासना करण्यासाठी जे त्याच्याजवळ येतात त्यांना नियमशास्त्र त्याच अर्पणांमुळे जी वर्षानुवर्षे पुन्हा पुन्हा केली जातात, ते कदापि परिपूर्ण करू शकत नाही. जर नियमशास्त्र लोकांना परिपूर्ण करू शकले असते तर यज्ञ अर्पण करण्याचे थांबले नसते का? कारण उपासना करणारे, कायमचेच शुद्ध झाले असते आणि त्यानंतर आपल्या पापांच्या बाबतीत दोषी ठरले नसते. पण त्याऐवजी ते यज्ञ दरवर्षी पापांची आठवण करून देतात.

इब्री लोकांस पत्र 10:1-3

जर बलिदानाद्वारे पापांचे शुद्धिकरण झाले असते, तर त्यांची पुनरावृत्ती करण्याची गरज नसती. पण ते दरवर्षी केले जात, याद्वारे हे दिसून येते की ते प्रभावी नव्हते.

पण जेव्हा येशू ख्रिस्ताने (येशूसत्संग) स्वतःस बलिदान म्हणून अर्पण केले तेव्हा हे सर्व बदलून गेले.

म्हणून ख्रिस्त जेव्हा या जगात आला, तेव्हा तो म्हणाला,

“तुला यज्ञ किंवा अर्पणे नको होती,
    पण तू माझ्यासाठी शरीर तयार केले.
होमार्पणांनी व पापार्पणांनी
    तुला आनंद वाटला नाही.
मग मी म्हणालो, ‘हा मी आहे!
    नियमशास्त्राच्या गुंडाळ्यामध्ये माझ्याबद्दल लिहून ठेवले आहे, देवा,
    तुझी इच्छा पूर्ण करण्यास मी आलो आहे.’”

इब्री लोकांस पत्र 10:5-7

तो स्वतःस बलिदान म्हणून अर्पण करावयास आला. आणि जेव्हा त्याने असे केले

…आपण येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देहार्पणाद्वारे पवित्र केलेले आहो

10 देवाच्या इच्छेनुसार येशू ख्रिस्ताच्या देहाच्या एकदाच झालेल्या अर्पणाद्वारे आपण शुद्ध करण्यात आलो.

इब्री लोकांस पत्र 10:10

दोन बकऱ्याचे बलिदान प्रतीकात्मकरित्या भविष्यातील बलिदानाकडे आणि येशूच्या विजयाकडे इशारा करते. तो अर्पण करण्यात आला म्हणून तो बलिदानाचा बकरा होता. तो पाप वाहून नेणारा बकराही होता, कारण त्याने जगभरातील समाजाची सारी पापे वाहून नेली आणि त्यांस आमच्यापासून फार दूर केले, जेणेकरून आम्ही शुद्ध व्हावे.

दुर्गा पूजा प्रायश्चिताच्या दिवसाचे कारण आहे का?

इस्राएली लोकांच्या इतिहासात आपण पाहिले की इस्राएलच्या बंदिवासामुळे ख्रि. पू. 700 च्या सुमारास इस्राएली लोक भारतात येऊ लागले, त्यांनी भारताच्या शिक्षणात व धर्मात अनेक गोष्टींची भर दिली. इस्राएली लोक दरवर्षी सातव्या महिन्याच्या 10 व्या दिवशी प्रायश्चिताचा दिवस साजरा करीत असावे. कदाचित, ज्याप्रमाणे त्यांनी भारताच्या भाषांत भर घातली, त्याचप्रमाणे त्यांनी प्रायश्चिताच्या दिवसाची देखील भर घातली असावी, जो दुर्गा पूजा ठरला, वाईटावर मोठ्या विजयाच्या स्मरणार्थ. दुर्गा पूजेच्या आमच्या ऐतिहासिक समजास हे अनुकूल ठरते, जो ख्रि. पू. 600 च्या सुमारास साजरा केला जाऊ लागला.   

जेव्हा प्रायश्चिताच्या दिवसाच्या बलिदानांचा शेवट करण्यात आला

 आमच्या वतीने येशूचे (येशूसत्संग) बलिदान प्रभावी व पुरेसे होते. वधस्तंभावर  (सन 33) येशूच्या बलिदानानंतर लगेच, रोमनांनी सन 70 मध्ये परम पवित्रस्थानासमवेत मंदिराचा नाश केला. तेव्हापासून यहूदी लोकांनी प्रायश्चिताच्या दिवशी पुन्हा कधीही बलिदान अर्पण केले नाही. आज, यहूदी लोक उपवासाच्या गंभीर दिवसाचे पालन करून हा सण साजरा करतात. जसे बायबलमध्ये स्पष्ट केले आहे, त्याप्रमाणे एकदा का प्रभावी बलिदान अर्पण करण्यात आले त्यानंतर वार्षिक बलिदान सुरू ठेवण्याची गरजच उरली नाही.  म्हणून देवाने ते थांबविले.

दुर्गा पूजेच्या प्रतिमा आणि प्रायश्चिताचा दिवस

दुर्गा पूजेत दुर्गेच्या प्रतिमेस आव्हान करण्याचा समावेश आहे जेणेकरून देवाने मूर्तीत वस्ती करावी. प्रायश्चिताचा दिवस येणाऱ्या बलिदानाचे भाकित होते आणि त्यात मूर्तिस आव्हान करण्याची गरज नव्हती. परम पवित्रस्थानी देव दृश्यमान होता आणि अशाप्रकारे मूर्तिची गरज नव्हती.

पण प्रभावी बलिदानाच्या वेळी, शेकडो वर्षे आधी प्रायश्चिताचे अनेक दिवस ज्याकडे अंगूलीनिर्देश करीत होते, त्यात एका प्रतिरूपास आव्हान केले गेले होते. जसे वेद पुस्तकात (बायबल) स्पष्ट केले आहे

15 तो अदृश्य देवाची प्रतिमा आहे
    आणि निर्माण केलेल्या
    सर्व गोष्टीत तो प्रथम आहे.

कलस्सै 1:15

प्रभावी बलिदानाच्या वेळी, अदृश्य परमेश्वराच्या स्वरूपास आव्हान केने जाई आणि तो मनुष्य येशू आहे असे दाखविले जाई. 

मागोवा घेणे

आपण वेद पुस्तकम् (बायबल) चे वाचन करीत आहोत. आपण पाहिले आहे की देवाने आपली योजना प्रकट करण्यासाठी अनेक चिन्हें दिली होती.  आरंभी त्याने येणाऱ्या ‘तो’ विषयी भाकित केले. त्यानंतर श्री अब्राहामाचे अर्पण, वल्हांडणाचे बलिदान आले, आणि तसेच प्रायश्चिताचा दिवस आला. इस्राएलवर मोशेचे आशीर्वाद आणि शाप वाचले आहेत. याद्वारे त्यांच्या इतिहासास गती प्राप्त होईल, इस्राएल लोकांची सर्व जगभर पांगापांग, भारतात सुद्धा, जसे येथे स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *