Skip to content

राजप्रमाणे : येशू ख्रिस्ताच्या ‘ख्रिस्त’ चा अर्थ काय?

  • by

मी कधीकधी लोकांना विचारतो की येशूचे आडनाव काय होते. सामान्यतया ते उत्तर देतात,

“मला वाटते की त्याचे आडनाव‘ ख्रिस्त ’होते पण मला खात्री नाही”.

मग मी विचारतो,

“मग जेव्हा येशू लहान होता तेव्हा योसेफ ख्रिस्त आणि मेरी ख्रिस्त लहान येशू ख्रिस्ताला बाजारात घेऊन गेले काय?”

असे म्हटल्यास, ते समजतात की ‘ख्रिस्त’ हे येशूचे कौटुंबिक नाव नाही. तर, ‘ख्रिस्त’ काय आहे? ते कोठून येते? याचा अर्थ काय? अनेक लोकांस आश्चर्य वाटते, म्हणजे, ‘ख्रिस्त’ ही एक पदवी आहे जिचा अर्थ आहे ‘राज्यकर्ता’ किंवा ‘राज्य करणारा’. हे ‘राज’ या पदवीसारखे नव्हे, स्वातंत्र्यापूर्वी भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटीश राजप्रमाणे.

भाषांतर विरुद्ध लिप्यंतरण

आपण प्रथम भाषांतराच्या काही मुलभूत गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. भाषांतरकार कधीकधी अर्थाऐवजी, विशेषेकरून नावे आणि पदव्यांऐवजी समान ध्वनीद्वारे अनुवाद ध्वनीनसार भाषांतर करण्याची निवड करतात. यास लिप्यंतरण म्हटले जाते. उदाहरणार्थ, “कुंभमेला”  हे मराठी कुंभमेळा या शब्दाचे इंग्रजी लिप्यंतरण आहे. मेळा अर्थात मेला ’म्हणजे ‘फेअर’ किंवा ‘फेस्टिव्हल’ असले तरी कुंभफेअर ऐवजी कुंभमेला  हा शब्द इंग्रजीत आणला गेला आहे. “राज” हे हिंदी “राज” चे इंग्रजी लिप्यंतरण आहे. जरी राज या शब्दाचा अर्थ आहे ‘राज्य’ हा शब्द “ब्रिटिश रूल” ऐवजी “ब्रिटिश राज” च्या ध्वनीद्वारे इंग्रजी भाषेत आणला गेला. वेद पुस्तकम (बायबल) सह, भाषांतरकारांना हे ठरवावे लागत असे की कोणत्या नावांचे व पदव्यांचे भाषांतर (अर्थाने) आणि लिप्यंतरण (ध्वनीद्वारे) करायचे आहे. कोणताही विशिष्ट नियम नाही.

सेप्टुआजिंट

बायबलचे भाषांतर प्रथम ख्रिस्तपूर्व 250 मध्ये करण्यात आले होते जेव्हा हिब्रू वेदाचे (जुना करार) ग्रीक भाषेत भाषांतर करण्यात आले होते – त्यावेळची आंतरराष्ट्रीय भाषा. या भाषांतरास सेप्टुआजिंट (किंवा LXX) म्हणून ओळखले जाते आणि ते खूप प्रभावी होते. नवीन करार ग्रीक भाषेत लिहिलेला असल्याने, जुन्या करारातील त्याची अनेक अवतरणे सेप्टुआजिंटमधून घेतली आहेत. 

सेप्टुआजिंटमध्ये भाषांतर आणि लिप्यंतरण

ही प्रक्रिया तसेच आधुनिक काळातील बायबलवर तिचा कसा परिणाम घडतो हे खालील आकृतीत दाखविण्यात आले आहे

मूळभाषांतून आधुनिक बायबलमध्ये भाषांतर

मूळ हिब्रू जुना करार (ख्रि. पू. 1500 – 400 या दरम्यान लिहिलेले) हा चतुष्पाद  #1 मध्ये दाखविण्यात आला आहे. कारण सेप्टुआजिंट हे ख्रि. पू. 250 हिब्रू –> ग्रीक भाषांतर चतुष्पाद #1 ते #2 पर्यंत जाणाऱ्या बाणाच्या रूपात दाखविले गेले आहे. नवीन करार ग्रीक भाषेत (सन 50-90) लिहिण्यात आला होता, म्हणून #२ मध्ये जुना आणि नवीन करार दोन्हींचा समावेश आहे. तळाशी अर्ध्या भागात (#3) बायबलच्या आधुनिक भाषेचे भाषांतर आहे. जुना करार (हिब्रू वेद) मूळ हिब्रू (1 –> 3) मधून भाषांतरित केला गेला आहे आणि नवीन कराराचे ग्रीक (2 –> 3) भाषेतून भाषांतर करण्यात आले आहे. यापूर्वी स्पष्ट केल्याप्रमाणे भाषांतरकारांनी नावे व पदव्या याबाबतीत निर्णय घ्यावा. हे लिप्यंतरण आणि भाषांतर असे नाव दिलेल्या निळ्या बाणांनी दाखविलेले आहे, हे दाखविण्यासाठी की भाषांतरकार दोन्हींपैकी कोणत्याही एकाचा उपयोग करू शकतात.

‘ख्रिस्त’ चे मूळ

आता ‘ख्रिस्त’ या शब्दावर लक्ष केंद्रित करून, वरील प्रक्रियेचे अनुसरण करा.

बायबलमध्ये ‘ख्रिस्त’ कोठून आला आहे?

हिब्रू जुन्या करारात ‘מָשִׁיחַ’ (mashiyach ) पदवी आहे, जिचा अर्थ आहे ‘अभिषिक्त’ किंवा ‘समर्पित व्यक्ति’ जसे की राजा किंवा राज्यकर्ता. त्या काळातील इब्री राजांना राजा होण्यापूर्वी अभिषेक करण्यात येत असे (विधियुक्त पद्धतीने तेलाचा अभ्यंग केला जात असे), अशाप्रकारे ते अभिषिक्त किंवा मसियाच होते. मग ते राज्यकर्ते बनत, परंतु त्यांचे राज्य देवाच्या स्वर्गीय शासनाच्या अधीन असे, त्याच्या नियमानुसार. या अर्थाने जुन्या करारातील इब्री राजे राजसारखे होते. या राजने दक्षिण आशियातील ब्रिटीश प्रांतांवर राज्य केले, परंतु ब्रिटेनमधील सरकारच्या अधीन राहून, त्याच्या कायद्यानुसार.

जुन्या करारामध्ये एका विशिष्ट मशियाच्या (अर्थात ’ख्रिस्त’) येण्याची भविष्यवाणी केली गेली होती जो एक अद्वितीय राजा असणार होता. जेव्हा ख्रि. पू. 250 मध्ये सेप्टुआजिंटचे भाषांतर झाले, तेव्हा भाषांतरकारांनी ग्रीक भाषेतील समान अर्थाचा शब्द  Χριστός  निवडला,  (क्रिस्टॉससारखा वाटतो), chrio क्रिओच्या आधारे, ज्याचा अर्थ विधियुक्त पद्धतीने तेल लावणे असा आहे.  म्हणून हिब्रू ‘मशिया’ चे भाषांतर ग्रीक सेप्टुआजिंटमधील  Χριστός च्या अर्थाने (ध्वनीद्वारे लिप्यंतरित नाही) केले गेले. नव्या कराराच्या लेखकांनी ख्रिस्त हा भविष्यवाणी केलेला ‘मशिया’ म्हणून ज्याविषयी भविष्यवाणी करण्यात आली होती त्या येशूस ओळखण्यासाठी क्रिस्टॉस या शब्दाचा उपयोग सुरू ठेवला.

युरोपियन भाषांमध्ये, समान अर्थ असलेला कोणताही स्पष्ट शब्द नव्हता म्हणून नवीन कराराचा ग्रीक ‘क्रिस्टॉस’ याचे ‘ख्रिस्त’ असे लिप्यंतरण करण्यात आले. ‘ख्रिस्त’ हा शब्द जुन्या करारात मूळ असलेले एक अत्यंत विशिष्ट नाव आहे, हिब्रूमधून ग्रीकमध्ये भाषांतर झालेले, आणि नंतर ग्रीकमधून आधुनिक भाषांमध्ये लिप्यंतरणाद्वारे आले. जुना कराराचे भाषांतर थेट हिब्रूमधून आधुनिक भाषांमध्ये करण्यात आले आहे आणि भाषांतरकार मूळ हिब्रू ‘मशिया’ संबंधाने भिन्न निवड करतात. काही बायबल ‘मशिया’ चे रूपांतर ‘मशिया’ च्या रूपात करतात, तर काहीजण “अभिषिक्त” असा अर्थ लावून भाषांतर करतात. ख्रिस्तासाठी हिंदी भाषेचा एक शब्द (मसीह) अरबीमधून लिप्यंतरित आहे, जो मूळ हिब्रूमधून लिप्यंतरित केला गेला. म्हणून त्याचा उच्चार ‘मसीह’ मूळ शब्दाच्या अगदी जवळ आहे.

ग्रीक सेप्टुआजिंटमध्ये हिब्रू शब्द מָשִׁיחַ (मसिया, मसिहा) चे भाषांतर “क्रिस्टॉस” म्हणून केले गेले आहे. यावरून मराठीत हे “ख्रिस्त” म्हणून भाषांतरित केले गेले आहे आणि ते “क्राईस्ट” सारखे वाटते. ख्रिस्तासाठी दिलेला मराठी शब्द ग्रीक शब्द “ख्रिस्तोस” मधून लिप्यंतरित केला गेला आहे आणि म्हणूनच त्याचा उच्चा क्रिस्तू (kristū) असा केला जातो.

जुन्या करारात आपण सामान्यतः ‘ख्रिस्त’ हा शब्द पाहत नाही, त्यामुळे जुन्या कराराशी त्याचा संबंध नेहमीच स्पष्ट असत नाही. परंतु या अभ्यासावरून आपण हे जाणतो की ‘ख्रिस्त’ = ‘मशीहा’ = ‘अभिषिक्त’ आणि ती एक विशिष्ट पदवी होती.

ख्रिस्ताची  1 ल्या शतकात प्रतीक्षा

आता आपण शुभवर्तमानावरून काही निरीक्षणे करू या. खाली राजा हेरोदची प्रतिक्रिया आहे जेव्हा मागी लोक यहूद्यांच्या राजाचा शोध करीत आले, हा नाताळाच्या कथेचा एक भाग आहे.  लक्ष द्या, जरी येशूविषयी विशेष उल्लेख नसला तरी, ख्रिस्ताच्या आधी इंग्रजीत ‘निश्चयवाचक उपपद’ येते.

हे ऐकून हेरोद राजा तसेच यरुशलेम नगराचे रहिवासी घाबरुन गेले.
मग त्याने यहूदी लोकांचे सर्व मुख्य याजक व नियमशास्त्राचे शिक्षक यांना बोलाविले आणि विचारले की, “ख्रिस्ताचा जन्म कोठे होणार होता?”

मत्तय 2:3-4

हेरोद आणि त्याचे सल्लागार यांस ‘हा ख्रिस्त’ ही कल्पना चांगली समजली होती हे तुम्ही पाहताच – आणि येथे तो शब्द येशूचा विशिष्टरित्या उल्लेख करीत नाही. यावरून दिसून येते की ‘ख्रिस्त’ जुन्या करारातून येतो, जसे 1 ल्या शतकातील लोक ग्रीक सेप्टुआजिंटमध्ये वाचत ( हेरोद आणि त्याच्या सल्लागाराप्रमाणे). ‘ख्रिस्त’ ही एक पदवी होती (आणि आहे), नाव नव्हते, जी शासक किंवा राजास दर्शविते. यामुळेच हेरोद ‘घाबरला’ कारण दुस‍ऱ्या राजाच्या आगमनाच्या शक्यतेने तो भयभीत झाला. आपण ही कल्पना मनातून काढून टाकू शकतो की ‘ख्रिस्त’ हा ख्रिस्ती लोकांद्वारे केलेला शोध होता. त्यांच्या ख्रिस्ती होण्यापूर्वी शेकडो वर्षे आधी ही पदवी वापरली जात असे.

ख्रिस्ताच्या अधिकाराचा विरोधाभास

येशूच्या प्रारंभिक अनुयायांना ही खात्री होती की येशू हा येणारा ख्रिस्त आहे ज्याच्याविषयी हिब्रू वेदात भविष्यवाणी केली होती, तर इतरांनी या विश्वासाला विरोध केला.

का?

प्रेम किंवा सामर्थ्यावर आधारित नियमांबद्दल हे उत्तर विरोधाभास ठरविते. ब्रिटिश राजवटीखाली भारतावर राज्य करण्याचा अधिकार राजला होता. पण भारतावर राज्य करण्याचा अधिकार त्यांना मिळाला कारण राज प्रथम सैन्यशक्तीनिशी आला आणि त्याने आपल्या सामर्थ्याने बाह्य अधीनता अमलात आणली. जनतेला राजविषयी प्रेम नव्हते आणि गांधीसारख्या पुढाऱ्याद्वारे राज संपुष्टात आले.

ख्रिस्त म्हणून येशूला जरी अधिकार असला तरीही, तो अधीनतेची मागणी करावयास आला नाही. तो प्रेम अथवा भक्तीवर आधारित सार्वकालिक राज्याची स्थापना करावयास आला होता, आणि यासाठी एका बाजूला सत्ता आणि अधिकार यांच्यातील विरोधाभास तर दुस‍ऱ्या बाजूला प्रेमाची गरज होती. ‘ख्रिस्ताचे’ आगमन समजून घेण्यात आम्हाला मदत करण्यासाठी हिब्रू ऋषींनी हा विरोधाभास शोधून काढला. आम्ही हिब्रू वेदांतील ‘ख्रिस्ता’ च्या पहिल्या आगमनावरून आपण त्यांच्या अंतर्दृष्टींचे अनुसरण करतो, हिब्रू राजा दावीद याजपासून ख्रि.पू. 1000 च्या सुमारास.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *