Skip to content

कुरुक्षेत्रातील युद्धासमान : येणाऱ्या ‘अभिषिक्त’ शासकाविषयी भविष्यवाणी झाली

  • by

भगवद्गीता ही महाभारत महाकाव्याच्या बुद्धीमत्तेचा केन्द्रबिंदू आहे. गीता किंवा गीत (गाणे) म्हणून लिहिण्यात आले असले तरीही आज सामन्यतया त्याचे वाचन केले जाते. गीतेत कुरुक्षेत्र येथे झालेल्या महायुद्धाच्या आधी – राजघराण्याच्या दोन पक्षामध्ये  झालेल्या युद्धाच्या आधी – भगवान श्रीकृष्ण आणि शाही योद्धा अर्जुन यांच्यातील संभाषण दिलेले आहे. पुरातन शाही राजवंशाचा संस्थापक, राजा कुरु याच्या राजघराण्याच्या दोन शाखांचे योद्धे व राज्याधीश या आगामी युद्धात एकमेकांचा सामना करीत उभे ठाकले होते. पांडव आणि कौरव हे चुलतभाऊ राजवंशाच्या कोणत्या पक्षास राज्य करण्याचा अधिकार आहे – पांडव राजा युधिष्ठिर किंवा कौरव राजा दुर्योधन, याविषयी युद्ध करणार होणार होते. दुर्योधनाने युधिष्ठिराचे सिंहासन बळकावले होते म्हणून युधिष्ठिर आणि त्याचे पांडव सहयोगी ते परत मिळवण्यासाठी युद्धावर निघाले होते. पांडव योद्धा अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यामधील भगवद्गीता संभाषण कठीण परिस्थितींत खरी बुद्धी यावर लक्ष केंद्रित करते ज्याद्वारे आध्यात्मिक स्वातंत्र्य आणि आशीर्वाद लाभतो.

स्तोत्रे हे बायबलमधील हिब्रू वेद पुस्तक महाकाव्यातील बुद्धिमत्ता साहित्याचे केंद्रबिंदू आहेत. जरी गाणे (गीता) म्हणून लिहिलेले असले तरीही आज सामान्यतया त्याचे वाचन केले जाते. स्तोत्र दोनमध्ये दोन विरोधी शक्तींमध्ये होणाऱ्या युद्धाच्या आधी, परमोच्च परमेश्वर आणि त्याचा अभिषिक्त ख्रिस्त (= शासक) यांच्यातील संभाषणाचे वर्णन केले आहे. या आगामी युद्धाच्या दोन्ही बाजूंस महान योद्धे आणि राज्यकर्ते आहेत. एकीकडे एक राजा आहे जो  पूर्वज राजवंशाचा संस्थापक राजा दावीद याचा वंशज आहे. कोणत्या पक्षाला राज्य करण्याचा अधिकार आहे या विषयावरून दोन्ही पक्ष युद्धास उभे ठाकले आहेत. प्रभू आणि त्याचा शासक यांच्यातील स्तोत्र 2 चे संभाषण स्वातंत्र्य, बुद्धी आणि आशीर्वाद यांस स्पर्शून जाते.

यात साम्य आहे असे तुम्हाला वाटत नाही?

जसे भगवद्गीता हे संस्कृत वेदांचे बौद्धिक ज्ञान समजण्याचे प्रवेशद्वार आहे, तसेच स्तोत्रे हे हिब्रू वेदाचे (बायबल) बौद्धिक ज्ञानप्राप्तीचे प्रवेशद्वार आहे. हे ज्ञान प्राप्तत करण्यासाठी आपल्याला स्तोत्र आणि त्याचा मुख्य रचनाकार राजा दावीद यांच्याविषयी पार्श्वभूमीची थोडी माहिती हवी.

दावीद राजा कोण होता आणि स्तोत्रे काय आहेत?

राजा दावीद, स्तोत्रे आणि इतर हिब्रू ऋषी आणि ऐतिहासिक समयरेखेतील लेखनकार्य

इस्त्राएलींच्या इतिहासामधून घेतलेल्या समयरेखेवरून आपण पाहू शकता की दावीद  इ.स.पू. सुमारे 1000 वर्षे, श्री अब्राहमानंतर हजार वर्षांनंतर आणि श्री मोशेनंतर 500 वर्षांनंतर जगला. दावीद मेंढपाळ म्हणून आपल्या कुटुंबाची मेंढरे पाळत असे. एक मोठा शत्रू, राक्षस म्हणावा असा, गल्याथ याने इस्राएलींवर विजय मिळवण्यासाठी सैन्याचे नेतृत्व केले, आणि त्यामुळे इस्राएली लोक निराश व पराभूत झाले. दाविदाने गल्याथाला आव्हान केले आणि युध्दात त्याला ठार केले. एका थोर योद्ध्यावरील एका तरुण मेंढपाळ मुलाच्या या उल्लेखनीय विजयामुळे दावीद प्रसिद्ध झाला.

तथापि, दीर्घ आणि कठीण अनुभवांनंतरच तो राजा झाला कारण त्याचे अनेक शत्रू होते, परदेशात तसेच इस्राएली लोकांमध्ये देखील, जे त्याचा विरोध करीत होते.. दावीदाने शेवटी त्याच्या सर्व शत्रूंवर विजय मिळविला कारण त्याचा देवावर विश्वास होता आणि देवाने त्याला मदत केली. बायबलमधील हिब्रू वेदांमधील अनेक पुस्तके दाविदाच्या या संघर्षाचे व विजयाचे विजयाचे वर्णन करतात.

देवासाठी सुंदर गीते आणि कविता लिहिणारा संगीतकार म्हणून देखील दावीद प्रसिद्ध होता. ही गीते व कविता ईश्वरप्रेरित आहेत आणि वेद पुस्तकांमधील स्तोत्रांचे पुस्तक म्हणून ओळखले जातात.

स्तोत्रांमध्ये ‘ख्रिस्ताविषयी’ भविष्यवाणी

एक महान राजा आणि योद्धा असला तरी, दाविदाने स्तोत्रात ‘ख्रिस्ताविषयी’ लिहिले आहे की तो त्याच्या राजवंशातून येईल जो सामर्थ्य व अधिकार याबाबत त्याच्या पेक्षा श्रेष्ठ असेल. हिब्रू वेदाच्या (बायबल) स्तोत्र २ मध्ये ख्रिस्ताचा परिचय  अशाप्रकारे करण्यात आला आहे, भगवद्गगीतेच्या शाही युद्धाच्या दृष्यासमान दृष्य येथे मांडण्यात आले आहे.

1राष्ट्रांनी दंगल का मांडली आहे? लोक व्यर्थ योजना का करीत आहेत?

2परमेश्वराविरुद्ध व त्याच्या ‘अभिषिक्ता’ विरुद्ध पृथ्वीवरील राजे उठले आहेत, सत्ताधीश एकत्र जमून मसलत करीत आहेत की,

3“चला, आपण त्यांची बंधने तोडून टाकू, आपणांवरील त्यांचे पाश फेकून देऊ.”

4स्वर्गात जो राजासनारूढ आहे तो हसत आहे; प्रभू त्यांचा उपहास करीत आहे.

5पुढे तो त्यांच्याशी क्रोधयुक्त होऊन बोलेल, तो संतप्त होऊन त्यांना घाबरे करील.

6तो म्हणेल, “मी आपल्या पवित्र सीयोन डोंगरावर आपला ‘राजा’ अधिष्ठित केला आहे.”

7मी परमेश्वराचा निर्णय कळवतो; तो मला म्हणाला, “तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे;

8माझ्याजवळ माग म्हणजे मी तुला राष्ट्रे वतनादाखल देईन, पृथ्वीच्या दिगंतापर्यंतचे स्वामित्व तुला देईन;

9लोहदंडाने तू त्यांना फोडून काढशील; कुंभाराच्या मडक्यासारखा त्यांचा चुराडा करशील.”

10राजांनो, आता शहाणे व्हा, पृथ्वीवरील न्यायाधीशांनो, बोध घ्या.

11भीड धरून परमेश्वराची सेवा करा, कंपित होऊन हर्ष करा.

12पुत्राने रागावू नये आणि तुम्ही वाटेने नाश पावू नये, म्हणून त्याचे चुंबन घ्या; कारण त्याचा क्रोध त्वरित पेटेल; त्याला शरण जाणारे सगळे धन्य होत.

स्तोत्र 2 – ‘ख्रिस्त’ राजा

येथे समान परिच्छेद आहे परंतु ग्रीक भाषेत पूर्वी सांगितल्याप्रमाणे आहे.

तर राष्ट्रांचे लोक इतके का रागावले आहेत? ती राष्ट्रे अशा मूर्खासारख्या योजना का आखीत आहेत?
त्यांचे राजे आणि पुढारी एकत्र येऊन परमेश्वराशी आणि त्याने निवडलेल्या राजांशी भांडले.

स्तोत्र 2:1-2 – मूळ भाषेत हिब्रू आणि ग्रीक (LXX)

[Photo]

कुरुक्षेत्राच्या युद्धाचे परिणाम

आपण पाहू शकता की, स्तोत्र २ मधील ‘ख्रिस्त’/‘अभिषिक्त’ याचा संदर्भ प्रसंग भगवद्गीतेतील कुरुक्षेत्राच्या युद्धाप्रमाणे आहे. परंतु जेव्हा आपण इतक्या पूर्वी लढण्यात आलेल्या कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या परिणामाबद्दल विचार केला असता काही फरक दिसून येतात. अर्जुन आणि पांडव यांनी युद्ध जिंकले, आणि म्हणून सत्ता व राज्यकारभार बदलून कौरवांकडून पांडवांकडे गेला आणि युधिष्ठिर योग्य राजा बनला. पाचही पांडव बंधू आणि कृष्ण 18 दिवसांच्या लढाईत जिवंत वाचले, परंतु केवळ काही मोजकेच लोक वाचले – इतर सर्व मारले गेले. पण युद्धाच्या नंतर युद्धानंतर केवळ 36 वर्षे राज्य केल्यावर, युधिष्ठिराने सिंहासनाचा त्याग केला, आणि अर्जुनाचा नातू, परीक्षित याला राजाची पदवी बहाल केली. त्यानंतर तो द्रौपदी आणि त्याच्या भावांसोबत हिमालयास रवाना झाला. द्रौपदी आणि भीम, अर्जुन, नकुलसहदेव ह्या चार पांडवांस प्रवासादरम्यान मरण आले. युधिष्ठिरास स्वतःस स्वर्गात प्रवेश देण्यात आला. कौरवांची आई, गांधारी, युद्ध न थांबविल्याबद्दल कृष्णावर संतापली होती, म्हणून तिने त्याला शाप  दिला आणि युध्दानंतर 36 वर्षांनंतर दोन कुळांतील लढाईमुळे चुकून बाण लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. कुरुक्षेत्रातील युद्ध आणि त्यानंतर कृष्णाच्या हत्येमुळे जगाचा कलीयुगात प्रवेश झाला.

तर कुरुक्षेत्रातील युद्धापासून आपल्याला काय मिळाले?

आमच्यासाठी कुरुक्षेत्राच्या युद्धाची फळे

आमच्यासाठी, जे हजारो वर्षांनंतर जगत आहेत, आम्ही आम्हाला स्वत:ला जास्त गरजवंत म्हणून पाहतो. आपण संसारात राहतो, सतत वेदना, आजार, वृद्धत्व आणि मृत्यूच्या छायेखाली जगत असतो. आम्ही अशा शासनाधीन राहतो जे सामान्यतया भ्रष्ट असतात आणि राज्यकर्त्यांच्या श्रीमंत आणि वैयक्तिक मित्रांना मदत करतात. कलियुगाचे परिणाम आपल्याला अनेकप्रकारे जाणवतात.

अशा शासनासाठी जे भ्रष्टाचाराला चालना देणार नाही, असा समाज जो कलियुगाच्या अधीन नाही, आणि संसारातील कधीही न संपणारे पाप आणि मृत्यू यापासून वैयक्तिक सुटका मिळावी म्हणून आपण तळमळत आहोत.

स्तोत्र 2 च्या येणाऱ्या ‘ख्रिस्तापासून’ आमच्यासाठी फळे

स्तोत्र २ मध्ये परिचय केलेला ‘ख्रिस्त’ आपल्या गरजा कशा पूर्ण करील हे हिब्रू ऋषींनी स्पष्ट केले आहे. या गरजा भागविण्यासाठी युद्ध आवश्यक ठरेल, पण हे कुक्षेत्राच्या युद्धापेक्षा वेगळे आणि स्तोत्र २ मध्ये चित्रित करण्यात आलेल्या युद्धापेक्षा देखील वेगळे युद्ध आहे. हे असे युद्ध आहे जे केवळ ‘ख्रिस्त’ करू शकतो. हे संदेष्टे हे सांगतात की सामर्थ्याने व बळाने सुरुवात करण्याऐवजी ख्रिस्त पाप व मृत्यूपासून आपली मुक्तता करण्यासाठी आमच्या गरजेत आमची सेवा करण्याद्वारे सुरूवात करतो. ते दाखवतात की स्तोत्र 2 कडे जाण्याच्या मार्गाकडे, जेथे एके दिवशी ते जाऊन पोहोचतील, राज्य बळकावणाऱ्या दुसऱ्या शत्रूस पराभूत करण्यासाठी दुसऱ्या लढाईचा लांब वळणदार मार्ग घेण्याची गरज होती,  सैन्य शक्तीद्वारे नव्हे, तर संसाराचे कैदी असलेल्यांसाठी प्रेम व बलिदान याद्वारे. आम्ही दाविदाच्या राजकीय वंशवृक्षाच्या मृत मूळातून फुटलेल्या शाखेसोबत या प्रवासास प्रारंभ करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *