Skip to content

अंकुराची खूण : वटसावित्रीच्या आग्रही वटवृक्षाप्रमाणे

  • by

वटवृक्ष, बरगद किंवा वडाचे झाड हे दक्षिण आशियाई अध्यात्माच्या केन्द्रस्थानी आहे आणि हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे. याचा संबंध मृत्यूचे दैवत यम, याच्याशी आहे, म्हणूनच अनेकदा ते स्मशानभूमीजवळ लावलेले असते. पुन्हा अंकुरण्याची क्षमता असल्यामुळे त्यास दीर्घयुष्य आहे आणि ते अमरत्वाचे प्रतीक आहे. अशाच एका वटवृक्षाखाली सावित्रीने तिचा मृत पती आणि राजा सत्यवान यास परत मागण्यासाठी यमाशी सौदा केला होता यासाठी की तिला पुत्रप्राप्ती व्हावी – या घटनेचे स्मरण म्हणून वट पौर्णिमा आणि वट सावित्रीचा वार्षिक उत्सव साजरा केला जातो.

असेच एक वर्णन हिब्रू वेद (बायबल) मध्येही आढळते. एक मृत झाड आहे … जिवंत होत आहे … राजांच्या मृत वंशातूून नवीन पुत्राचे प्रतिनिधित्व करणारे आहे. मुख्य फरक हे आहे की हे वर्णन भविष्यात दिसणारी भविष्यवाणी आहे आणि शेकडो वर्षांपासून वेगवेगळ्या संदेष्ट्यांनी (ऋषींनी) तयार केली होती. त्यांच्या संमिश्र कथेत असे भाकित आहे की कोणीतरी येत आहे. यशया (इ.स.पू. 750) ने ह्या गोष्टीचा प्रारंभ केला ज्याचा पुढे ऋषी-संदेष्ट्यांनी विकास केला – मृत झाडाच्या फांदीमध्ये.

यशया आणि अंकुर

यशया यहूद्यांच्या इतिहासातून घेतलेल्या समयरेखेत दिसून येणाऱ्या, ऐतिहासिकदृष्ट्या सत्यापित करण्यायोग्य काळात जगला.

ऐतिहासिक समयरेखेत दाखविलेल्या यशयाने इस्राएलच्या दाविदाच्या वंशातील राजांच्या काळात जगत होता

यशयाने तेव्हा लिहिले जेव्हा राजा दाविदाचा राजवंश (इ.स.पू. १००० – 6००) यरूशलेमावर राज्य करीत होता. यशयाच्या काळात (इ.स.पू. 750) राजवंश आणि राज्य भ्रष्ट होते. यशयाने राजांना विनंती केली की त्यांनी देवाकडे परत यावे व मोशेच्या दहा आज्ञांचे पालन करावे. पण यशयाला ठाऊक होते की इस्राएल पश्चात्ताप करणार नाही, आणि म्हणूनच त्याने आधीच हे जाणले होते की हे राज्य नष्ट होईल व राजेशाहीचा अंत होईल.

त्याने शाही घराण्यासाठी एका कल्पनाचित्राचा उपयोग केला, मोठ्या वटवृक्षासारखे त्याचे चित्र मांडले. या झाडाच्या मुळाशी, दावीद राजाचा पिता, इशायआहे. यिश्शैच्या कुटूंबात राजांच्या राजघराण्याची सुरूवात दावीद राजापासून झाली, आणि त्याचा उत्तराधिकारी, राजा शलमोन याच्याबरोबर पुढे सुरू राहिली. खाली स्पष्ट केल्याप्रमाणे, हा राजवंशाचा पुढील पुत्र राज्य करीत असतांना हा वृक्ष वाढत गेला आणि विकसित झाला.

एक विशाल वटवृक्ष म्हणून राजवंशासाठी यशयाने ज्या कल्पनाचित्राचा उपयोग केला त्यात संस्थापक – इशाय मूळ असून त्यापासून वृक्षाच्या खोडापर्यंत राजाने राजे वाढत जात आहेत

प्रथम एक झाड…नंतर एक खोड़… नंतर एक अंकुर

यशयाने असा इशारा दिला की, हा ‘वृक्ष’ राजवंश लवकरच कापला जाईल आणि मृत खोड काय ते राहील. खोड आणि अंकुर यांचे कोडे म्हणून त्याने ही भविष्यवाणी कशाप्रकारे लिहिली ते पाहा :

शायाच्या बुंध्याला (वंशाला) अंकुर (मूल) फुटून वाढू लागेल. ती फांदी इशायाच्या मुळाची असेल.
परमेश्वराचा आत्मा त्या मुलात असेल. तो आत्मा त्याला सुज्ञपणा, समजूत, मार्गदर्शन आणि सामर्थ्य देईल. हा आत्मा परमेश्वराला जाणून घेण्यास व श्रध्दा ठेवण्यास त्या मुलाला शिकवील.

यशया 11:1-2
यशयाने इशारा दिला की राजवंश एक दिवस मृत खोड होईल

इ.स.पू. 6०० च्या सुमारास, यशयाच्या 150 वर्षांनंतर, जेव्हा बाबेलच्या लोकांनी यरूशलेमचा पाडाव केला, तेव्हा हा ‘वृक्ष’ पडला, राजांचा राजवंश उध्वस्त झाला, आणि इस्राएल लोकांना ओढून बॅबिलोनमध्ये (समयरेखेतील लाल कालखंड) बंदिवासात नेण्यात आले. हा पहिला यहूदी बंदिवास होता – त्यातील काही लोक भारतात गेले. सावित्री आणि सत्यवान यांच्या कथेत एक मृत राजाचा मुलगा होता – सत्यवान. खोडाच्या भविष्यवाणीत राजांचा संपूर्ण वंश नाहीसा होणार होता आणि राजघराणे मृत होणार होते.

अंकुर : ‘त्याचे’ दाविदाच्या वंशातून आगमन जो बुद्धिसंपन्न असणार होता

इशायाच्या बुंधाला धुमारा फुटेल

पण भविष्यवाणी फक्त राजांचा नाश करणे यापुढे भविष्यकाळातही पाहत होती. हे वटवृक्षाच्या एका सामान्य वैशिष्ट्याचा उपयोग करून करण्यात आले. जेव्हा वटवृक्षाचे बीज अंकुरित होतात तेव्हा ते इतर झाडांच्या बुंधावर अंकुरित होतात. बुंधा किंवा खोड वटवृक्षाच्या बियांचे पोषक आहे. एकदा वडाच्या बीपासून नुकतेच तयार झालेले रोप स्थापित झाल्यावर ते आणखी वाढत जाईल आणि त्या बुंधापेक्षा अधिक जगेल. यशयाने पाहिलेला हा अंकुर वडाच्या झाडासारखा असेल कारण नवीन अंकुर त्याच्या मुळापासून निघून वर जाईल व – एक अंकुर तयार करेल.

यशयाने या कल्पनाचित्राचा उपयोग केला आणि असे भाकीत केले की एक दिवस दूर भविष्यकाळात अंकुर म्हणून ओळखली जाणारी, एक अंकुर, झाडाच्या मृत बुंधापासून निघेल, अगदी तसेच जसे वटवृक्षाच्या फांद्या झाडाच्या बुंधापासून फुटतात. यशया ‘तो’ म्हणून अंकुराचा उल्लेख करतो, म्हणून यशया एका विशिष्ट व्यक्तीबद्दल बोलत आहे, जो राजवंशाचे पतन झाल्यानंतर दाविदाच्या घराण्यातून येईल. या व्यक्तीमध्ये बुद्धी, सामर्थ्य आणि ज्ञान यासारखे गुण असतील जणूकाही त्याच्यावर देवाचा आत्मा असेल.

एक वडाचे झाड त्याच्या यजमान वृक्षाच्या बुंधातून वाढत आहे. लवकरच उगवणारी मुळे आणि अंकुर यांचा गुंताळा तयार होईल.

अनेक लिखाणांत पौराणिक कथामध्ये वटवृक्षाचा उल्लेख अमरत्वाचे प्रतीक म्हणून करण्यात आला आहे. त्याची वायवी मुळे खाली मातीत वाढतात आणि अतिरिक्त खोड तयार करतात. हे दीर्घायुष्याचे प्रतीक आहे, आणि अशाप्रकारे ते दैवीय निर्मात्याचे प्रतिनिधित्व करते. यशयाने ई.पू. 750 मध्ये भविष्यवाणी केली की या अंकुरात असे अनेक दैवी गुण असतील,  आणि राजवंशाचा ‘बुंधा’ नाहीसा झाल्यानंतर फार काळ टिकेल.

यिर्मया आणि अंकुर

भविष्यकाळात घडणाऱ्या घटना लोकांना समजाव्या म्हणून ऋषी-संदेष्टा यशया याने एक साईन-पोस्ट उभारले. परंतु अनेक चिन्हांपैकी त्याचे चिन्ह फक्त पहिले होते. यशयानंतर 150 वर्षांनी, ई. पू. 600 मध्ये जेव्हा दाविदाचा राजवंश यिर्मयाच्या डोळ्यासमोर उध्वस्त झाला, तेव्हा त्याने लिहिले :

हा परमेश्वराचा संदेश आहे. “मी चांगला अंकुर निर्माण करण्याची वेळ येत आहे.” तो चांगला अंकुर सुज्ञपणे राज्य करणारा राजा असेल. देशात योग्य व न्याय्य गोष्टी तो करेल.
त्या चांगल्या ‘अंकुराच्या’ काळात यहूदातील लोक वाचतील आणि इस्राएल सुरक्षित राहील. त्याचे नाव असेल परमेश्वर आमचा चांगुलपणा.

यिर्मया 23:5-6

यिर्मयाने यशयाच्या  दावीद वंशाच्या अंकुराच्या कल्पनाचित्राविषयी आणखी लिहिले. हा अंकुर देखील एक राजा असेल. पण दाविदाच्या पूर्वीच्या राजांसारखा नाही जे मृत बुंधा बनून राहिले होते.

अंकुर : प्रभू आमचे नीतिमत्व

अंकुरातील फरक त्याच्या नावात दिसतो. तो परमेश्वर देवाचे नाव (‘प्रभू’ – देवाचे हिब्रू नाव) धारण करेल, म्हणून एका वटवृक्षाप्रमाणे हा अंकुर देवाचे प्रतिरूप प्रतिमा असेल. तो ‘आमचे’ (आम्हा मानवाचे) नीतिमत्व असेल.

जेव्हा सावित्रीने तिचा पति, सत्यवान, याच्या देहासाठी यमाशी वाद घातला, तेव्हा तिच्या नीतिमत्त्वाने तिला मृत्यूला (यम) सामोरे जाण्याची शक्ती दिली. कुंभमेळ्याबद्दल नमूद केल्यानुसार, आपली समस्या म्हणजे आपला भ्रष्टाचार किंवा पाप आहे, आणि म्हणून आपल्याकडे ‘नीतिमत्त्वाची’ उणीव आहे. बायबल आपल्याला सांगते की मरणास तोंड देण्याचे सामथ्र्य आपल्यात नाही. खरे म्हणजे त्यात म्हटले आहे की आपण असहाय आहोत:

1म्हणून मुले रक्त व मांस यांची बनलेली असल्याने त्यानेसुद्धा त्या रक्तात व मांसात त्यांच्यासमवेत भाग घेतला. येशूने हे यासाठी केले की, ज्याच्याकडे मरणाची सत्ता आहे, अशा सैतानाचा मरणाने नाश करावा.
15 आणि जे लोक त्यांच्या सर्व आयुष्यात मरणाचे भय मनात ठेवून त्याचे गुलाम असल्यासारखे जगत होते त्यांना मुक्त करावे.

इब्री लोकांस 2:14ब-15

बायबलमध्ये सैतान हा यमासारखा आहे कारण त्याने आम्हास मृत्यूच्या बंधनात ठेवले आहे. खरे म्हणजे जसा यम सत्यवानच्या शरीरासाठी वाद घालतो तसेच बायबल  दुसर्या समयाविषयी सांगते की कशाप्रकारे सैतानाने एका शरीराविषयी वाद घातला, जेव्हा

मीखाएल जो मुख्य देवदूत, यानेजेव्हा मोशेच्या शरीराविषयी सैतानाबरोबर वाद घातला तेव्हा त्यानेसुद्धा त्याच्याविरुद्ध अपमानस्पद आरोप करण्याचे धाडसकेले नाही. तो फक्त म्हणाला, “प्रभू तुला धमकावो.”

यहूदा 1:9

सावित्री आणि सत्यवान यांच्या कथेतल्या यमाप्रमाणे, सैतानालासुद्धा मोशेसारख्या थोर संदेष्ट्याच्या शरीरावर वाद घालण्याचे सामर्थ्य आहे, तर आमच्या पाप आणि भ्रष्टाचारामुळे, त्याला मृत्यूवर नक्कीच सामर्थ्य आहे. देवदूतसुद्धा हे जाणतात की केवळ परमेश्वर – निर्माणकर्ता देव – याला मरणात सैतानास फटकार लावण्याचे सामर्थ्य आहे.

येथे, ‘अंकुरा’ मध्ये असे अभिवचन आहे की भविष्यात परमेश्वर आम्हाला ‘नीतिमत्त्व’ देईल, जेणेकरून आम्हास मृत्यूवर विजय मिळविता येईल.

कसे?

जखऱ्या या विषयावर विचार मांडत असतांना पुढे आणखी माहिती देतो, येणाऱ्या अंकुराच्या नावाचे देखील सविस्तर भाकित सांगतो देखील जे सावित्री आणि सत्यवान यांच्या कथेशी समांतर आहे ज्यांनी मृत्यूचा (यम) धिक्कार केला, जे आपण पुढे पाहू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *