Skip to content

येणारा थोर राजा: शेकडो वर्षांपूर्वीच नाव देण्यात आले होते

  • by

विष्णू पुराणात राजा वेणाविषयी सांगितलेले आहे. जरी वेनाने चांगला राजा म्हणून सुरुवात केली असली, तरी भ्रष्ट प्रभावामुळे तो इतका वाईट झाला की त्याने यज्ञ आणि प्रार्थना करण्यास बंदी घातली. त्याने असाही दावा केला की तो विष्णूपेक्षा श्रेष्ठ आहे. ऋषीमुनींनी आणि ब्राह्मण/पुजारी यांनी त्याच्याशी असे म्हणून वाद घालण्याचा प्रयत्न केला की, राजा म्हणून त्याने योग्य धर्माचे शिक्षण व उदाहरण मांडले पाहिजे, त्यांचा क्षय करता कामा नये. तथापि वेणा ऐकेना. धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी आणि त्याला पश्चात्ताप करण्यास समजावू न शकल्यामुळे, पुजाऱ्यानी त्याने घडविलेल्या वाईटापासून राज्यास मुक्त करण्यासाठी त्याला ठार मारले.

याकारणास्तव राज्य राजावाचून राहिले. म्हणून पुजार्यांनी राजाचा उजवा हात चोळला आणि प्रिथू/पृथू नावाची एक उदात्त व्यक्ती उदयास आली. प्रिथूला वेनाचा वारसदार म्हणून नेमले गेले. प्रत्येक जण आनंदात होता की असा नैतिक व्यक्ती राजा होणार आहे आणि ब्रह्मासुद्धा प्रिथूच्या राज्याभिषेक समारंभासाठी उपस्थित राहिला. प्रिथूच्या कारकिर्दीत या राज्याने एका सुवर्ण युगात प्रवेश केला.

याद्वारे यशया आणि यिर्मया या इब्री ऋषीमुनींनी देखील अशाच प्रकारच्या पेचप्रसंगास तोंड दिल्याचे स्पष्ट होते. त्यांनी इस्राएलच्या राजांना, जे सुरुवातीला उदात्त आणि दहा आज्ञांचे पालन करणारे होते, भ्रष्ट झाल्याचे पाहिले होते. त्यांनी भविष्यवाणी केली की जसा वृक्ष कापला जातो, तसा राजवंश पडेल. पण त्यांनी भावी महान राजाविषयीही भाकीत केले. पडलेल्या झाडाच्या बुंधास धुमारा फुटेल.

वेनाची कहाणी देखील पुजारी आणि राजे यांच्यातील भूमिकेचे स्पष्ट वेगळेपण दर्शवते. जेव्हा राजा वेना यास पुजाऱ्यानी काढून टाकले तेव्हा ते राज्य करू शकले नाहीत कारण हा त्यांचा हक्क नव्हता. यशया आणि यिर्मयाच्या काळातही राजा आणि पुजारी यांच्यातील भूमिकेचे हेच वेगळेपण लागू होते. या कथांमधील फरक हा आहे की प्रिथूचे नाव त्याच्या जन्मानंतर ठेवण्यात आले होते, तर इब्री ऋषींनी येणाऱ्या थोर राजाच्या जन्माच्या शेकडो वर्षांपूर्वी त्याचे नाव कसे ठेवले ते आपण पाहू.

यशयाने सर्वप्रथम येणाऱ्या ”अंकुराबद्दल“ लिहिले. दाविदाच्या पतन पावलेल्या राजघराण्यातून, बुद्धी व सामर्थ्याने युक्त असा ‘तो’ येणार होता. त्यानंतर यिर्मयाने असे सांगितले की हा अंकुर परमेश्वर म्हणून ओळखला जाईल – उत्पन्नकर्त्या परमेश्वराचे इब्री नाव, आणि तो आमचे नीतिमत्व ठरेल.

जखऱ्या कोंब अर्थात अंकुराविषयी  बोलणे सुरू ठेवतो

जखऱ्या बाबेलच्या बंदिवासानंतर मंदिर परत बांधण्यासाठी परतला

ऋषी जखऱ्या ई. पू. 520 मध्ये जगला, जेव्हा यहूदी त्यांच्या पहिल्या बंदिवासातून यरूशलेमास परत येऊ लागले. ते परत आल्यानंतर, त्यांनी त्यांचे नष्ट झालेले मंदिर पुन्हा बांधायला सुरुवात केली. त्यावेळी असलेल्या मुख्य याजकाचे नाव यहोशवा होते, आणि तो मंदिराच्या याजकांचे काम पुन्हा सुरू करीत होता. ऋषी-संदेष्टा, जखऱ्याने, प्रमुख याजक, यहोशवाबरोबर सहभागी होऊन परत येत असलेल्या यहुदी लोकांचे नेतृत्व केले. परमेश्वराने – जखऱ्याद्वारे – या यहोशवाबद्दल असे म्हटले:

तेव्हा यहोशवा मुख्ययाजका, तू स्वत: व तुझ्या समोर बसलेल्या सहकारी याजकांनी ऐकले पाहिजे. माझा खास सेवक मी आणल्यावर काय घडणार आहे, ह्याची ही माणसे म्हणजे नमुने आहेत. त्याला कोंब म्हणतील.
पाहा! मी यहोशवापुढे विशेष दगड ठेवतो. त्याला सात बाजूआहेत. मी त्यावर खास संदेश कोरीन. तो संदेश, मी एका दिवसात पृथ्वीवरीलसर्व पाप नाहीसे करीत असल्याचे दाखवील.”

जखऱ्या 3:8-9

अंकुर किंवा कोंब! 200 वर्षांपूर्वी यशयाने सुरूवात केली, 60 वर्षांपूर्वी यिर्मयाने ते सुरू ठेवले, जखऱ्या तो विषय अर्थात ‘कोंब’ पुढे सुरू ठेवतो जरी आता राजवंशाचा नायनाट झाला होता. वटवृक्षाप्रमाणे ही कोंब मृत बुंधापासून आपली मुळे पसरवू लागते. या कोंबीस आता ‘माझा सेवक’ – देवाचा सेवक म्हटले गेले आहे. काही बाबतीत ई. पू. 520 मध्ये यरूशलेमात जखऱ्याचा सोबती, मुख्य याजक यहोशवा, या येणाऱ्या कोंबीचे प्रतीक होता. पण कसे?

पण कसे?

‘एका दिवसातच’ देव पाप दूर कसे करेल?

कोंब याजक व राजा यांस एक करणे

समजून घेण्यासाठी आम्हाला हे माहीत असले पाहिजे की हिब्रू वेदांमध्ये पुरोहित आणि राजाच्या भूमिका पूर्णतः विभक्त होत्या. कोणीही राजे पुरोहित होऊ शकत नव्हते, आणि पुरोहितही राजा होऊ शकत नव्हते. देवाला बलिदान देऊन देव आणि मनुष्यामध्ये मध्यस्थी करणे हे पुरोहिताचे कर्तव्य होते आणि सिंहासनावरून न्यायाने राज्य करणे ही राजाची जबाबदारी होती. दोघेही महत्वपूर्ण होते; दोघेही वेगळे होते. तरीही जखऱ्याने भविष्यात असे लिहिले की:

मग मला परमेश्वराचा आणखी एक संदेश मिळाला. तो म्हणाला,
10 “हेल्दय, तोबीया व यदया हे बाबेलच्या बंद्यांकडून आले आहेत. त्याच्याकडून सोने आणि चांदी घेऊन, सफन्याचा मुलगा, यहोशवाकडे जा.
11 त्या सोन्या – चांदीपासून मुकुट कर. तो योशीयाच्या डोक्यावर ठेव. (यहोशवा मुख्याजक होता. तो यहोसादाकचा मुलगा होता.) मग त्याला पुढील गोष्टी सांग:
12 सर्व शक्तिमान परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो: ‘कोंब’ नावाचा एक माणूस आहे. तो सामर्थ्यवान बनेल. तो परमेश्वराचे मंदिर बांधील.
13 तो परमेश्वराचे मंदिर बांधून गौरव प्राप्त करील. स्वत:च्या सिंहासनावर बसून तो राज्य करील. त्याच्या सिंहासनाजवळ याजक उभे राहतील. ते दोघे एकत्रितपणे, शांतपणे काम करतील.’

जखऱ्या 6:9; 11-13

पूर्वीच्या उदाहरणाविरुद्ध, जखऱ्याच्या दिवसाचा मुख्य याजक (यहोशवा) यास अंकुर किंवा कोंब म्हणून राजाचा मुकुट घालावयाचा होता. (लक्षात ठेवा यहोशवा हा ‘येणाऱ्या गोष्टींचे प्रतीक’ होता). मुख्य याजक, यहोशवाने, राजमुकूट घालतांना, भविष्यात राजा आणि पुजारी म्हणजे याजक यांचे एका व्यक्तीमध्ये जोडले जाण्याचे पूर्वचित्र पाहिले होते- राजाच्या सिंहासनावर पुजारी. शिवाय, जखऱ्याने लिहिले की “यहोशवा” हे कोंबीचे नाव होते. याचा अर्थ काय होता?

‘यहोशवा’ आणि ‘येशू’ ही नावे

बायबलच्या अनुवादाचा काही इतिहास आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. मूळ इब्री वेदांचे ग्रीक भाषांतर 250 ईसापूर्व मध्ये करण्यात आले होते, आणि त्याला सेप्टुआजिंट किंवा LXX म्हटले गेले. अद्यापही ते व्यापक प्रमाणात वाचले जाते, आम्ही पाहिले की एलएक्सएक्समध्ये ‘ख्रिस्त’ प्रथम कसा वापरला गेला आणि आम्ही येथे ‘यहोशवा’ साठी त्याच विश्लेषणाचे अनुसरण करतो.

‘यहोशवा’ = ‘येशू.  हे दोन्ही शब्द हिब्रू नाव ‘यहोशवा’पासून येतात.

यहोशवा हे [मराठी] ‘यहोशुवा’ या मूळ हिब्रू नावाचे लिप्यंतरण आहे. चतुर्थांश #1 दाखवतो की ई.पू. 520 मध्ये जखऱ्याने इब्री भाषेत ‘यहोशवा’ कसे लिहिले.  हे (#1=> #3)  [मराठी]मध्ये त्याचे ‘यहोशवा’  असे लिप्यंतरण करण्यात आले आहे.  हिब्रू भाषेतील ‘यहोशवा’  हे [मराठी] ‘यहोशवा’ आहे. जेव्हा 250 इ.स.पू मध्ये हिब्रू भाषेतून ग्रीक भाषेत  LXX भाषांतर करण्यात आले, तेव्हा यहोशुवाचे हे इसूस (#1 => #2) असे लिप्यंतर करण्यात आले.  हिब्रू भाषेतील ‘यहोशुवा’ हे [मराठी] ‘यहोशवा’ ग्रीक भाषेत इसूस आहे. जेव्हा ग्रीकचे [मराठी] भाषांतर करण्यात आले, तेव्हा इसूसचे लिंप्यंतरण (#2 => #3) मध्ये ‘येशू’ असे केले गेले. ग्रीक भाषेतील इसूस [मराठी] येशू असे आहे.

इब्री भाषेत येशूशी बोलताना येशूला ‘यहोशवा’ म्हटले जात असे, परंतु ग्रीक नवीन करारामध्ये त्याचे नाव ‘इसूस’ असे लिहिले गेले – अगदी ग्रीक जुना करार LXX ने ते नाव जसे लिहिले तसे. जेव्हा नवीन कराराचे भाषांतर ग्रीकमधून [मराठी] (#2 => #3)  केले गेले तेव्हा ‘इसूस’चे लिप्यंतरण परिचित ‘येशू’ मध्ये करण्यात आले. म्हणून ‘येशू’ = ‘जोशुआ’ हे नाव, ज्यामध्ये ‘येशू’ मध्यंतरी ग्रीक टप्प्यातून आले आणि ‘यहोशवा’ हे थेट हिब्रूमधून आले.

थोडक्यात, नासरेथचा येशू आणि ई.स. पू. 520चा मुख्य याजक यहोशवा यांचे सारखेच नाव होते, जे त्यांच्या मूळ इब्री भाषेत ‘यहोशुवा’ असे संबोधले जाते. ग्रीक भाषेत, दोघांनाही ‘इसूस’ म्हटले जात असे.

नासरेथचा येशू कोंब किंवा अंकुर आहे

आता जखऱ्याची भविष्यवाणी अर्थपूर्ण वाटते. भविष्यवाणी, जी ई. स. पू. 520 मध्ये करण्यात आली होती, ती ही होती की येणाऱ्या कोंबीचे नाव ‘येशू’ असेल, जी थेट नासरेथच्या येशूकडे इशारा करते.

यिश्शै व दावीद हे त्याचे पूर्वज असल्यामुळे येशू हा ‘यिश्शेच्या बुंधापासून’ येतो. येशूजवळ बुद्धी व समज होती जी त्यास वेगळी करते. त्याचे चातुर्य, आत्मसंयम आणि अंतर्दृष्टी समीक्षक आणि अनुयायी दोघांनाही प्रभावित करीत आहे. शुभवर्तमानातील चमत्कारांद्वारे त्याचे सामथ्र्य नाकारता येत नाही. आपण त्यांच्यावर विश्वास न ठेवण्याची निवड करू शकतो, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. एक दिवस या अंकुरात असलेला अपवादात्मक शहाणपणा व सामर्थ्याचे गुण ज्याचे भाकित यशयाने केले होते येशूला अनुरूप बसते.

नासरेथच्या येशूच्या जीवनाचा विचार करा. त्याने खरोखर राजा असल्याचा दावा केला – खरोखर राजा. ‘ख्रिस्त’ या शब्दाचा अर्थ हाच आहे. पण पृथ्वीवर असताना त्याने जे केले ते खरोखर याजकीय कार्य म्हणजे पुरोहिताचे कार्य होते. पुरोहित लोकांच्या वतीने मान्य यज्ञार्पण करीत असे. येशूचा मृत्यू त्या दृष्टीने महत्त्वपूर्ण होता, तेसुद्धा, आपल्या वतीने देवाला अर्पण होते. त्याचा मृत्यू कोणत्याही व्यक्तीच्या पापाबद्दल आणि अपराधाबद्दल प्रायश्चित करतो. ज्या दिवशी येशू मरण पावला आणि त्याने सर्व पापांची भरपाई केली – त्या दिवशी जखऱ्याने भविष्यवाणी केली होती त्याप्रमाणे “एका दिवसात” त्या देशाची पापे अक्षरशः मिटवून टाकली गेली. जसे त्याला बरेचदा ‘ख्रिस्त’/राजा म्हटले जाते, त्यानुसार त्याने आपल्या मरणात पुरोहिताच्या सर्व पात्रता पूर्ण केल्या. त्याने आपल्या पुनरुत्थानामध्ये, मृत्यूवर आपले सामर्थ्य व अधिकार दाखवला. त्याने दोन्ही भूमिका एकत्र आणल्या. ज्यास, दावीदाने फार पूर्वी “ख्रिस्त” म्हटले होते, तो अंकुर पुरोहित-राजा आहे.  आणि त्याच्या जन्माच्या 500 वर्षांपूर्वी जखऱ्याने त्याच्या नावाची भविष्यवाणी केली होती.

भविष्यसूचक पुरावा

त्याच्या दिवसात, आजच्याप्रमाणे, येशूच्या अधिकाराविषयी प्रश्न करणारे टीकाकार होते. त्याचे उत्तर आधी आलेल्या संदेष्ट्यांकडे लक्ष वेधण्यासाठी होते, असा दावा त्यांनी केला की त्यांनी त्याच्या जीवनाविषयी पूर्वी पाहिले होते. येथे एक उदाहरण आहे जेथे येशूने त्याच्या विरोधकांस म्हटले :

…तेच माझ्याविषयी साक्ष देणारे आहेत…

योहान 5:39

दुसऱ्या शब्दांत, येशूने असा दावा केला की त्याच्या जीवनाविषयी शेकडो वर्षांपूर्वी हिब्रू वेदांमध्ये भविष्यवाणी करण्यात आली होती. मानवी अंतर्दृष्टी भविष्यकाळात शेकडो वर्षांची भविष्यवाणी करू शकत नसल्यामुळे, तो मानवजातीसाठी देवाची योजना म्हणून खरोखर आला आहे हे सत्यापित करण्यासाठी हा पुरावा असल्याचे येशूने म्हटले. हे वैयक्तिकरित्या सत्यापित करण्यासाठी आज आपल्यासाठी हिब्रू वेद उपलब्ध आहेत.

आतापर्यंत इब्री संदेष्ट्यांनी काय भविष्यवाणी केली आहे ते सारांश रूपात पाहू या. येशूच्या आगमनाचा इशारा मानवी इतिहासाच्या सुरूवातीला देण्यात आला होता. नंतर अब्राहामाने त्या ठिकाणाविषयी भाकित केले होते तर वल्हांडण सणाने त्या वर्षाच्या दिवसाविषयी भाकित केले. आपण पाहिले की स्तोत्र २ मध्ये ‘ख्रिस्त’ ही पदवी येणाऱ्या राजाविषयी भविष्यवाणी करतांना उपयोग करण्यात आली होती. आम्ही आत्ताच पाहिले आहे की त्याची वंशावळ, याजकीय कारकीर्द, आणि नावाचे भाकीत करण्यात आले होते. नासरेथच्या येशूसारखी ज्याच्या आयुष्याविषयी अनेक संदेष्ट्यांनी इतक्या पूर्वी भविष्यवाणी केली होती अशा इतिहासातील आणखी कोणाबद्दल विचार करता येईल का?

उपसंहार: सर्वांना देऊ करण्यात आलेले जीवनाचे झाड

वटवृक्षासारख्या, अमर व टिकाऊ झाडाचे प्रतिबिंब, बायबलच्या अगदी शेवटच्या अध्यायापर्यंत दिलेले आहे, ते पुन्हा भविष्याकडे पाहते, पुढील विश्वाकडे, ज्यात अजूनही “जीवनाच्या पाण्याची नदी” आहे.

आणि नगराच्या रस्त्यांच्या मधोमध वाहत होती. नदीच्या दोन्हीकाठांवर उगवलेली झाडे जीवनाची झाडे होती. त्यांच्यातील प्रत्येक झाड दरमहा आपले फळ देते. झाडांची पाने राष्ट्रांनाआरोग्य देण्यासाठी उपयोगी पडत होती.

प्रकटीकरण २२:२

सर्व राष्ट्रांतील लोकांना – यात आपला समावेश आहे – मृत्यूपासून मुक्ती आणि जीवनाच्या झाडाच्या समृद्धीचा अनुभव घेण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे – खरोखर अमर वटवृक्ष. परंतु हिब्रू संदेष्टे भविष्यवाणी करतात की यासाठी कशाप्रकारे हे जरूरी असेल आधी तो अंकूर “कापून” टाकला जावा, जे आपण पुढे पाहू.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *