Skip to content

स्वर्गलोक : अनेकांस आमंत्रण आहे…

  • by

येशू, येशू सत्संगने, स्वर्गातील नागरिकांनी एकमेकांशी कसे वागावे हे दाखवले. ज्याला त्याने ‘स्वर्गाचे राज्य’ म्हणून संबोधिले त्याची पूर्वकल्पना घडवून देण्यासाठी त्याने लोकांचे आजार सुद्धा बरे केले आणि दुरात्म्यांस काढले. त्याच्या राज्याचे स्वरूप दाखविण्यासाठी त्याने बोलून निसर्गास आज्ञा दिली.

या राज्याची ओळख करून देण्यासाठी आपण विविध शब्दांचा उपयोग करतो. बहुधा सर्वात सामान्य म्हणजे स्वर्ग किंवा स्वर्गलोक. इतर शब्द आहेत वैकुंठ, देवलोक, ब्रह्मलोक, सत्यलोक, कैलास, ब्रह्मपूर, सत्य बेगेचा, वैकुंठलोक, विष्णुलोक, परमम पदम, नित्य विभूती, तिरुप्परमपादम किंवा वैकुंठ सागर. विविध देवांसोबतच्या असलेल्या संबंधावर जोर देऊन वेगवेगळया परंपरा वेगवेगळे शब्द वापरतात, परंतु हे फरक मूलभूत नाहीत. मूलभूत हे आहे की स्वर्ग हे एक आनंददायक आणि शांततामय ठिकाण आहे, जे येथील जीवनाशी परिचित असलेल्या दुःखापासून आणि अज्ञानापासून मुक्त आहे आणि जेथे देवाशी नातेसंबंध साकार केला जातो. बायबलमध्ये स्वर्गातील मूलभूत गोष्टींचा सारांश असा आहे :

4 तो त्यांच्या डोळ्यांतील अश्रु पूसून टाकील. आणि येथून पुढे मरण असणार नाही. शोक करणे, रडणे आणि अथवादु:खसहन् करणे राहणार नाही. कारण सर्व जुन्या गोष्टी नाहीशा झालेल्या आहेत.”

प्रकटीकरण 21:4

स्वतः येशूने देखील स्वर्गासाठी वेगवेगळ्या शब्दांचा उपयोग केला. तो नेहमी स्वर्गापूर्वी ‘राज्य’ (‘लोका’ पेक्षा ‘राज्या’स अधिक जवळ) या शब्दाचा उपयोग करीत असे. त्याने स्वर्गाच्या राज्यासोबत ‘सुखलोक’ आणि ‘देवाचे राज्य’ या शब्दांचा सुद्धा एकाच वेळी उपयोग केला. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, स्वर्गाच्या आमच्या समजात सुधार करण्यासाठी त्याने सामान्य, दैनंदिन जीवनाच्या गोष्टींचा देखील उपयोग केला. स्वर्गाविषयी समजावण्यासाठी त्याने एका अद्वितीय उदाहरणाचा उपयोग केला अर्थात मोठ्या मेजवानीचे किंवा समारंभाचे उदाहरण दिले. त्याच्या गोष्टीत तो ‘आम्ही देवाचे अतिथी म्हणजे पाहुणे आहोत’ यापेक्षा ‘देव अतिथी आहे’ (अतिथी देवो भव) या सुप्रसिद्ध वाक्यप्रचाराची उजळणी करतो.

स्वर्गाच्या मोठ्या मेजवानीची गोष्ट

स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करण्याचे निमंत्रण किती विस्तृत आहे हे समजावण्यासाठी येशूने मोठ्या मेजवानीचा दाखला शिकविला.पण ही गोष्ट आपल्या अपेक्षेनुसार घडत नाही. शुभवर्तमान सांगते :

15 आता जेव्हा मेजाभोवती बसलेल्यांपैकी एकाने हे ऐकले, तेव्हा तो येशूला म्हणाला, “देवाच्या राज्यात जेवतो, तो प्रत्येक जण धन्य!”
16 मग येशू त्याला म्हणाला, “एक मनुष्य एका मोठ्या मेजवानीची तयारी करीत होता. त्याने पुष्कळ लोकांना आमंत्रण दिले.
17 भोजनाच्या वेळी ज्यांना आमंत्रण दिले होते त्यांना “या, कारण सर्व तयार आहे’ हे सांगण्यासाठी नोकराला पाठविले.
18 ते सर्वजण सबब सांगू लागले. पाहिला त्याला म्हणाला, “मी शेत विकत घेतले आहे आणि मला जाऊन ते पाहिले पाहिजे. कृपा करुन मला क्षमा कर.’
19 दुसरा म्हणाला, “मी बैलाच्या पाच जोड्या विकत घेतल्या आहोत व त्या कशा आहेत हे बघण्यासाठी मी चाललो आहे, कृपा करुन मला क्षमा कर.’
20 आणखी तिसरा म्हणाला, “मी लग्न केले आहे, व त्यामुळे मी येऊ शकणार नाही.’
21 म्हणून जेव्हा तो नोकर परत आला, तेव्हा त्याने आपल्या मालकाला या गोष्टी सांगितल्या. मग घराचा मालक रागावला आणि नोकराला म्हणाला, “लवकर बाहेर रस्त्यावर आणि नगारातल्या गल्ल्यांमध्ये जा व गरीब, आंधळे, असहाय्य, लंगडे यांना घेऊन इकडे ये!’
22 नोकर म्हणाला, “आपल्या आज्ञेप्रमाणे केले आहे. आणि तरीही जागा आहे.’
23 मालक नोकराला म्हणाला, “रस्त्यावर जा, कुंपणाजवळ जा आणि तेथे असलेल्या लोकांना आग्रहाने आत येण्यास सांग म्हणजे माझे घर भरुन जाईल.
24 कारण मी तुम्हांस सांगतो की, त्या आमंत्रित केलेल्या कोणालाही माझ्या मेजवानीतली चव पाहायला मिळणार नाही.”

‘लूक 14:15-24

या गोष्टीत – अनेकदा – आमच्या अन्य समजुती उलट-सुलट होतात. सर्वप्रथम, आपण असे मानू शकतो की देव लोकांना स्वर्गात (मेजवानी) आमंत्रण देत नाही कारण तो फक्त योग्य लोकांस आमंत्रण देतो, हे चुकीचे आहे. मेजवानीचे आमंत्रण अनेक, अनेक लोकांस जाते. स्वामीची (देव) इच्छा आहे की मेजवानीचे ठिकाण पूर्णपणे भरून जावे.

पण येथे एक अनपेक्षित वळण लाभते! आमंत्रित लोकांपैकी खरोखर फारच कमी लोक येऊ इच्छितात. त्यांना यावे लागू नये म्हणून त्याऐवजी ते सबबी सांगू लागतात! आणि विचार करा की या सबबी किती अनुचित आहेत. आधी पारख केल्यावाचून कोण बैल विकत घेईल? आधीच पहिल्यांदा निरीक्षण केल्यावाचून कोण शेत विकत घेईल? नाही, या सबबींनी आमंत्रित अतिथींच्या अंतःकरणाचे खरे हेतू प्रगट झाले – इतर गोष्टींची आवड असल्यामुळे त्यांना स्वर्गाची आवड नव्हती.

आपण असा विचार करणार की इतके कमी लोक मेजवानीस येणार म्हणून कदाचित स्वामी निराश होईल, इतक्यातच गोष्टीस दुसरे वळण लाभते. ‘असंभाव्य’ लोक, ज्यांना आपण आमच्या उत्सवात आमंत्रण देणार नाही, जे लोक रस्त्यात “रस्त्यात आणि गल्ल्यांत” आणि “दूरच्या मार्गांवर आणि बोळांत” राहणारे, “दरिद्री, व्यंग आंधळे व लंगडे” – जे बहुधा अशा गोष्टींपासून दूर राहतात – त्यांना मेजवानीचे आमंत्रण मिळते. या मेजवानीचे आमंत्रण बरेच पुढे जाते, आणि त्यात आणखी लोकांना समाविष्ट करण्यात येते ज्याची तुम्ही व मी कल्पनाच करू शकत नाही. स्वामीला त्याच्या मेजवानीत लोक हवे आहेत आणि तो अशा लोकांना आमंत्रण देतो ज्यांना आम्ही आमच्या स्वतःच्या घरात आमंत्रण देणार नाही.

आणि हे लोक येतात! त्यांना त्यांच्या प्रेमापासून विचलित करणाऱ्या इतर आवडी नाहीत जसे शेत अथवा बैल म्हणून ते मेजवानीस येतात. स्वर्ग भरून जातो आणि स्वामींची इच्छा पूर्ण होते!

आम्ही हा प्रश्न विचारावा म्हणून येशूने ही गोष्ट सांगितली : “मला स्वर्गाचे आमंत्रण मिळाले तर मी ते स्वीकार करणार का?” किंवा दुसऱ्या कुठल्यातरी आवडीमुळे किंवा पसंतीमुळे तुम्हाला सबब सांगण्यास प्रेरणा मिळेल आणि तुम्ही आमंत्रणास नाकार देणार? सत्य हे आहे की तुम्हाला स्वर्गाच्या मेजवानीस आमंत्रण देण्यात आले आहे, पण वास्तविकता ही आहे की आमच्यापैकी बहुतांशी लोक कुठल्या ना कुठल्या कारणास्तव या आमंत्रणाचा नाकार करतील. आम्ही कधीही सरळपणे ‘नाही’ म्हणणार नाही तर आपला नकार लपविण्यासाठी आम्ही सबबी सांगू. अंतःकरणाच्या गाभाऱ्यात आमच्याजवळ ‘प्रेमाचे’ इतर विषय असतात जे आमच्या नाकाराच्या मुळाशी असतात. या गोष्टीत नाकाराचे मूळ इतर गोष्टींबद्दल प्रेम होते. ज्यांना प्रथम आमंत्रण देण्यात आले होते त्यांनी स्वर्ग आणि देवापेक्षा या जगाच्या टाकाऊ गोष्टींवर अधिक प्रेम केले. (‘शेत’, ‘बैल’ आणि ‘लग्न’ याद्वारे प्रतीक रूपात दाखविण्यात आले आहे).

अन्यायी आचार्याची गोष्ट

आमच्यापैकी काही जण स्वर्गापेक्षा या जगातील गोष्टींना अधिक महत्व देतात आणि म्हणून आपण या आमंत्रणास नाकार देऊ. आमच्यापैकी इतर जण आपल्या स्वतःच्या नीतिमत्वावर प्रेम किंवा विश्वास करतात. एका आदरणीय पुढाऱ्याचे उदाहरण देऊन येशूने दुसऱ्या गोष्टीत याविषयी सुद्धा शिकविले :

9 अशा लोकांना जे स्वत:नीतिमान असल्याचा अभिमान बाळगत होते व इतरांना कमी लेखत होते, अशा लोकांसाठी येशूने ही गोष्ट सांगितली.
10 ʇदोघे जण प्रार्थना करावयास वर मंदिरात गेले. एक परुशी होता व दुसरा जकातदार होता.
11 परुशी उभा राहिला व त्याने अशी प्रार्थना केली, “हे देवा, मी तुझे उपकार मानतो कारण, इतर लोकांसारखा म्हणजे चोर, फसविणारा, व्यभिचारी व या जकातदारासरखा मी नाही.
12 उलट मी आठवड्यातून दोनदा उपास करतो, व माझ्या सर्व उत्पन्राचा दहावा भाग देतो.’
13 “परंतु जकातदार दूर अंतरावर उभा राहिला व आपले डोळे स्वर्गाकडे वर न उचलता आपली छाती बडवीत म्हणाला, “हे देवा, मज पापी माणसावर दया कर!’
14 मी तुम्हांला सांगतो हा मनुष्य, त्या दुसऱ्याया माणसापेक्षा नितीमान ठरुन घरी गेला. कारण जो कोणी स्वत:ला उंच करतो त्याला नीच केले जाईल आणि जो कोणी स्वत:ला नीच करतो त्याला उंच केले जाईल.”

लूका 18:9-14

येथे एक परुशी (आचार्यासारखा धार्मिक पुढारी) जो त्याच्या धार्मिक प्रयत्नात आणि गुणात सिद्ध दिसत होता. त्याचे उपवास आणि पूजा सिद्ध होते आणि गरजेपेक्षा जास्त सुद्धा. पण या आचार्याने आपला भरवंसा त्याच्या स्वतःच्या गुणवत्तेवर ठेवला होता. श्री अब्राहामाने असे केले नव्हते जेव्हा त्याने फार पूर्वी देवाच्या अभिवचनात नम्रपणे केवळ विश्वास ठेवण्याद्वारे नीतिमत्व प्राप्त केले. खरे म्हणजे कर घेणाऱ्याने (त्या संस्कृतीतील अनैतिक व्यवसाय) नम्रपणे दयेची याचना केली, आणि हा विश्वास धरला की जेव्हा तोनीतिमान ठरून’ – देवासोबत योग्य स्थानघरी गेला तेव्हा त्याला दयादान देण्यात आले, तर परूशी (आचार्य), ज्याच्याविषयी आम्हाला वाटले की त्याने पुरेसे गुण कमाविले आहेत, त्याची पापे अद्याप त्याच्याविरुद्ध गणली गेली आहेत

म्हणून येशू तुम्हाला व मला विचारतो की आम्हाला खरोखर स्वर्गाच्या राज्याची इच्छा आहे काय, किंवा इतर अनेक गोष्टींच्या आवडींपैकी ही एक आवड आहे. तो आम्हास हे देखील विचारतो की आमचा विश्वास कोणत्या गोष्टीवर आहे – आमची गुणवत्ता किंवा देवाची दया आणि प्रीति.

हे अत्यंत महत्वाचे आहे की आम्ही प्रामाणिकपणे स्वतःस हे प्रश्न विचारावेत कारण अन्यथा आम्हाला त्याची पुढील शिकवण समजणार नाही – की आम्हाला आंतरिक शुद्धतेची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *