Skip to content

येशू शिकवितो प्राण आम्हास द्विजापर्यंत आणतो

  • by

द्विज (द्विज) म्हणजे ‘दोनदा जन्म’ किंवा ‘पुन्हा जन्म’. हे एखाद्या व्यक्तीचा प्रथम जन्म शारीरिकदृष्ट्या होतो आणि नंतर तो दुसऱ्यांदा आत्मिकरित्या जन्माला येतो या कल्पनेवर आधारित आहे. हा आत्मिक जन्म परंपरागतरित्या पवित्र धागा (यज्ञोपवीत, उपवित्त किंवा जनेऊ) घालताना उपनयन सोहळ्यादरम्यान घडण्याचे प्रतीक आहे. तथापि, बौद्धायन गृह्यसूत्रा सारख्या प्राचीन वैदिक (इ.स.पू.1000-600) ग्रंथांमध्ये उपनयनवर चर्चा झाली असली तरी द्विजांचा उल्लेख प्राचीन ग्रंथात नाही. विकिपीडिया सांगते

याविषयीचा वाढता उल्लेख मध्य काळापासून तो 1ल्या-सहस्राब्दीच्या उत्तरार्धापर्यंच्या धर्मशास्त्रांच्या मूलग्रंथांत आढळून येतो.द्विज या शब्दाची उपस्थिति या गोष्टीचे चिन्ह आहे की मूळपाठ शक्यतः भारताच्या मध्ययुगीन काळातील मूलग्रंथ आहे.

म्हणून, आज द्विज ही एक ज्ञात् संकल्पना आहे, तथापि, सापेक्षदृष्ट्या नवीन आहे. द्विज कोठून आला?

येशू आणि थोमाद्वारे द्विज

द्विजावर जर कोणत्याही व्यक्तीद्वारे दिलेली शिकवण जर सर्वात आधी नमूद करण्यात आली असेल तर ती येशूद्वारे मिळते. योहानकृत शुभवर्तमान (ईस्वी सन् 50-100 मध्ये लिखित) द्विजासंबंधी येशूद्वारे करण्यात आलेली चर्चा लिहिते. असे असू शकते की ईस्वी सन 52 मध्ये येशूच्या जीवनाचा व शिकवणीचा प्रत्यक्षदर्शी साक्ष म्हणून मलबारच्या समुद्रतटावर आणि मग चेन्नई येथे भारतात प्रथम आलेला एक शिष्य थोमा हा द्विजाची कल्पना घेऊन आला आणि त्याने भारतीय विचारआचारात या कल्पनेचा परिचय घडवून दिला. येशूच्या शिकवणींसोबत भारतात थोमाचे आगमन भारतीय ग्रंथांतील द्विजाच्या उद्भवाशी सामंजस्य राखते.

येशू आणि प्राणाद्वारे द्विज

येशूने द्विजाचा संबंध उपनयनाशी नव्हे तर प्राणाशी (प्राण), दुसऱ्या प्राचीन संकल्पनेशी जोडला. प्राण श्वास, आत्मा, वायु किंवा जीवनशक्तीस दर्शवितो. प्राणाचा सर्वात प्रारंभिक उल्लेख 3,000 वर्षे जुन्या चान्दोग्योपनिषदात आढळतो. पण इतर अनेक उपनिषदही या संकल्पनेचा उपयोग करतात ज्यात कथा, मुण्डक आणि प्रश्नोपनिषद यांचा समावेश आहे विविध ग्रंथ पर्यायी उत्तर देतात, पण प्राण आमच्या सर्व योगिक तंत्रांस अधोरेखित करतो जो आमच्या श्वास /श्वसनावर प्रभुत्व करतो, ज्यात प्राणायाम आणि आयुर्वेद यांचा समावेश आहे.   प्राणांचे आयुरास (वारा) प्राग, अपना, उना, समना आणि व्यना म्हणून कधीकधी वर्गीकरण केले जाते.

द्विजाची ओळख करून देत असलेल्या येशूचे हे संभाषण येथे आहे. (अधोरेखित शब्द द्विज किंवा द्वितीय जन्म संदर्भ चिन्हांकित करतात, तर ठळक अक्षरे प्राण, किंवा वारा, आत्मा या शब्दांस अधोरेखित करतात)

1 परूश्यांपैकी निकदेम नावाचा एक मनुष्य होता; तो यहूद्यांचा एक अधिकारी होता. 2 तो रात्रीचा येशूकडे येऊन त्याला म्हणाला, “गुरूजी, आपण देवापासून आलेले शिक्षक आहात, हे आम्हांला ठाऊक आहे; कारण ही जी चिन्हे आपण करता ती देव बरोबर असल्यावाचून कोणालाही करता येत नाहीत.” 3 येशू त्याला म्हणाला, “मी तुम्हांला खचीत सांगतो, नव्याने जन्मल्यावाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही.” 4 निकदेम त्याला म्हणाला, “म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्म घेऊ शकेल? त्याला मातेच्या उदरात दुसर्‍यांदा जाणे व जन्म घेणे शक्य होईल काय?” 5 येशूने उत्तर दिले की, “मी तुम्हांला खचीत सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्यावाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. 6 देहापासून जन्मलेले देह आहेत आणि आत्म्यापासून जन्मलेले आत्मा आहेत. 7 ‘तुम्हांला नव्याने जन्मले पाहिजे’ असे मी तुम्हांला सांगितले म्हणून आश्‍चर्य मानू नका. 8 वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता, तरी तो कोठून येतो व कोठे जातो हे तुम्हांला कळत नाही; जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला आहे त्याचे असेच आहे.” 9 निकदेम त्याला म्हणाला, “ह्या गोष्टी कशा होऊ शकतील?” 10 येशूने त्याला उत्तर दिले, “तुम्ही इस्राएलाचे गुरू असूनही तुम्हांला ह्या गोष्टी समजत नाहीत काय? 11 मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो की, जे आम्हांला ठाऊक आहे ते आम्ही सांगतो, आणि आम्ही पाहिले आहे त्याविषयी साक्ष देतो; पण तुम्ही आमची साक्ष मानत नाही. 12 मी पृथ्वीवरील गोष्टी तुम्हांला सांगितल्या असता तुम्ही विश्वास धरत नाही तर स्वर्गातल्या गोष्टी तुम्हांला सांगितल्यास विश्वास कसा धराल? 13 स्वर्गातून उतरलेला [व स्वर्गात असलेला] जो मनुष्याचा पुत्र त्याच्यावाचून कोणीही स्वर्गात चढून गेला नाही. 14 जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला होता तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे; 15 ह्यासाठी की, जो कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याच्या ठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. 16 देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. 17 देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे, तर त्याच्या द्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले. 18 जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्याय-निवाड्याचा प्रसंग येत नाही. जो विश्वास ठेवत नाही त्याचा न्यायनिवाडा होऊन चुकला आहे; कारण त्याने देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही. 19 निवाडा हाच आहे की, जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली; कारण त्यांची कृत्ये दुष्ट होती. 20 कारण जो कोणी वाईट कृत्ये करतो तो प्रकाशाचा द्वेष करतो आणि आपली कृत्ये उघडकीस येऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही. 21 परंतु जो सत्य आचरतो तो प्रकाशाकडे येतो ह्यासाठी की, आपली कृत्ये देवाच्या ठायी केलेली आहेत हे उघड व्हावे.”

योहान 3:1-21

या संभाषणात अनेक संकल्पना उपस्थित केल्या गेल्या. प्रथम, येशूने या दुसऱ्या जन्माच्या आवश्यकतेची पुष्टी केली (‘तुझा नव्याने जन्म झाला पाहिजे). परंतु या जन्मामध्ये कोणतेही मानवी अभिकर्ता नाहीत. पहिला जन्म, ‘देहापासून जन्मलेले देह’ आणि ‘पाण्यापासून जन्म’ घेणे मानवी अभिकर्त्याद्वारे आले आणि मानवी नियंत्रणाखाली आहे. परंतु दुसऱ्या जन्मामध्ये (द्विज) तीन दैवी अभिकर्त्यांचा समावेश आहे: देव, मनुष्याचा पुत्र आणि आत्मा (प्राण). आपण हे जाणून घेऊ या

देव

येशू म्हणाला की, “देवाने जगावर एवढी मोठी प्रीति केली…” याचा अर्थ असा की देव सर्व लोकांवर प्रेम करतो… जगात राहणाऱ्या प्रत्येकावर… कोणालाही वगळलेले नाही. आम्ही कदाचित या प्रेमाच्या व्याप्तीवर चिंतन करण्यासाठी वेळ घालवू शकतो, परंतु याचा अर्थ देव आपणावर प्रीति करतो हे आपण प्रथम समजून घ्यावे अशी येशूची इच्छा आहे. देव आपणावर खूप प्रेम करतो, आपली स्थिती, वर्ण, धर्म, भाषा, वय, लिंग, संपत्ती, शिक्षण काहीही असो … इतरत्र सांगितल्याप्रमाणे:

38 कारण माझी खात्री आहे की, मरण किंवा जीवन, देवदूत, अधिकारी आत्मे हल्लीच्या किंवा भविष्यकाळात,
39 येशूचे सामर्थ्य, उंच किंवा खाली, जगात निर्माण केलेली कुठलीही गोष्ट आपणांस देवाचे प्रेम जे ख्रिस्तामध्ये आढळते त्यापासून वेगळे करु शकणार नाही.

रोम 8:38-39

देवाचे आपणावरील (आणि माझ्यावरील) प्रेम दुसऱ्या जन्माची गरज दूर करीत नाही (“नव्याने जन्मल्यावाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही”). त्याऐवजी, आपणावरील देवाच्या प्रेमामुळे त्याने त्यास कार्य करावयास प्रवृत्त केले

“कारण देवाने जगावर एवढी प्रीति की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला…

आम्हाला दुसऱ्या दैवी अभिकर्त्याजवळ आणणे…

मनुष्याचा पुत्र

 ‘मनुष्याचा पुत्र’ हा स्वतः येशूचा संदर्भ आहे. या शब्दाचा अर्थ काय आहे ते आपण नंतर पाहू. येथे तो असे म्हणत आहे की पुत्रास देवाने पाठविले आहे. मग तो उंचविले जाण्याबद्दल विशिष्ट विधान देतो.

14 “मोशेने अरण्यात असताना सापाल उंच केले.मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे.

योहान 3:14

हा मोशेच्या काळातील सुमारे 1500 वर्षांपूर्वीच्या इब्री वेदांमधील वृत्तान्ताचा उल्लेख आहे जो येथे देण्यात आला आहे :

पितळेचा सर्प

4 लोकांनी होर पर्वत सोडला व तांबड्या समुद्राकडे जाण्यासाठी त्यांनी अदोमला पाठविले. पण लोक वाटेतच अधीर झाले; 5 ते म्हणाले, “तू आम्हाला रानात मरण्यासाठी मिसर देशातून बाहेर का आणलेस? भाकरी नाही! पाणी नाही! आणि हे दीन भोजन आम्हाला तिरस्कार आहे! ”

6 तेव्हा परमेश्वराने त्यांच्यात विषारी साप पाठविले. त्यांनी लोकांना चावले आणि बरेच इस्राएल लोक मरण पावले. 7 लोक मोशेकडे आले आणि म्हणाले, “आम्ही तुमच्याविरुद्ध आणि परमेश्वराविरुद्ध बोललो तेव्हा आम्ही पाप केले. परमेश्वर आमच्यातून साप काढून घेईल अशी प्रार्थना करा. ” म्हणून मोशेने लोकांसाठी प्रार्थना केली.

परमेश्वर मोशेला म्हणाला, “साप बनवून तिच्या खांबावर ठेव. ज्याला चावले आहे तो त्याकडे बघून जगू शकेल. ” 9 तेव्हा मोशेने एक पितळेचा साप बनवला व तो खांबावर ठेवला. नंतर जेव्हा कोणाला साप चावला आणि त्यानी पितळेच्या सापाकडे पाहिले तेव्हा ते जिवंत राहिले.

गणना 21:4-9  

या गोष्टीचा उपयोग करून येशूने दैवी अभिकर्त्यामधील आपली भूमिका स्पष्ट केली. सर्पांनी चावलेल्या लोकांचे काय झाले असते याचा विचार करा.

जेव्हा विषारी साप चावतो तेव्हा विषाचा शरीरात प्रवेश होतो. सामान्य उपचार म्हणजे विष बाहेर चोखण्याचा प्रयत्न करणे, चावलेल्या अवयवाला घट्ट बांधून घेणे आहे म्हणजे रक्त वाहणार नाही आणि चावण्यादारे विष पसरणार नाही; आणि हालचाल कमी करा जेणेकरून हृदयाची कमी झालेली गती वेगाने शरीरात विष पसरवू देणार नाही.

जेव्हा सर्पाने इस्राएली लोकांना संक्रमित केले तेव्हा त्यांना सांगण्यात आले की बरे होण्यासाठी त्यांनी खांबावर लटकविलेल्या पितळेच्या सर्पाकडे पहावे. आपण कल्पना करू शकता की जवळच उंचविलेल्या पितळेच्या सर्पाकडे पाहण्यासाठी कोणीतरी बिछान्यातून उठतो, आणि मग बरा होतो. परंतु इस्राएली लोकांच्या छावणीत सुमारे 3 दशलक्ष लोक होते ( लष्करी वयातील 600,000 पुरुषांपेक्षा अधिक लोकांची गणना करण्यात आलीे) – एका मोठ्या आधुनिक शहराचा आकार. सर्पाद्वारे चावलेल्यांनी अनेक किलोमीटर दूर असून, पितळेच्या सर्पाच्या खांबाच्या आवाक्यापलीकडे असण्याची जास्त शक्यता होती. म्हणून ज्यांना सर्पाने चावले होते त्यांना एक निवड करावयाची होती.  ते जखमेवर घट्ट बंधन घालून विषाचा प्रवाह आणि प्रभाव रोखण्यासाठी विश्रांती घेण्यासारखी मानक खबरदारी घेऊ शकत होते. किंवा त्यांना खांबावरील पितळेच्या सर्पाकडे पाहण्यासाठी, मोशेने घोषित केलेल्या उपायांवर विश्वास ठेवला पाहिजे आणि त्यासाठी अनेक किलोमीटर चालत जाणे, ज्याद्वारे रक्ताचा प्रवाह वाढून विषाचा प्रसार झाला असता. ही मोशेच्या शब्दावरील विश्वास किंवा विश्वासाची कमतरता असेल जी प्रत्येक व्यक्तीचा मार्ग निश्चित करणार होती.

येशू स्पष्ट करीत होता की, त्याला वधस्तंभावर उंचविण्याद्वारे आपल्याला पाप आणि मृत्यूच्या गुलामगिरीतून मुक्त करण्याचे सामर्थ्य त्याला मिळाले, अगदी त्याचप्रमाणे जसे पितळेच्या सर्पाने विषबाधेद्वारे मरणाच्या सामर्थ्यापासून इस्राएली लोकांना मुक्त केले. तथापि, ज्याप्रमाणे इस्राएली लोकांना पितळेच्या सर्पावर उपाय म्हणून विश्वास ठेवण्याची व खांबाकडे पाहण्याची गरज होती, त्याचप्रमाणे आम्हाला देखील भरवश्याच्या किंवा विश्वासाच्या डोळ्यांनी येशूकडे पाहण्याची गरज आहे. त्यासाठी तिसऱ्या दैवी अभिकर्त्यास कार्य करणे आवश्यक आहे.

आत्माप्राण

आत्म्याविषयी येशूच्या विधानाचा विचार करा

वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता, तरी तो कोठून येतो व कोठे जातो हे तुम्हांला कळत नाही; जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला आहे त्याचे असेच आहे.”

योहान 3:8

‘वायू’ साठी वापरण्यात येणारा हा तोच ग्रीक शब्द (pneuma ) आहे जो ‘आत्म्यासाठी’ सुद्धा उपयोग होतो. देवाचा आत्मा वाऱ्यासारखा आहे. कोणत्याही मानवाने कधीही वाऱ्यास प्रत्यक्षपणे पाहिलेले नाही. आपण त्यास पाहू शकत नाही. पण वारा आपल्या सभोवताल सर्वत्र आहे. वाऱ्याचे निरीक्षण करता येते. आपण वस्तूंवरील त्याच्या प्रभावावरून त्याचे निरीक्षण करू शकता. जसजसा वारा वाहतो तसतसे पाने सरसरतात, केस उडतात, झेंडा फडफडतो, आणि वस्तू हालू लागतात. आपण वाऱ्यावर नियंत्रित करू शकत नाही आणि त्याला दिशा दाखवू शकत नाही. वारा वाटेल तेथे वाहतोे. वाऱ्याच्या शक्तीने आम्हाला आमच्या जहाजांत पुढे न्यावे म्हणून आपण शीड उचलू शकतो. उचललेले आणि कामी लावलेले शीड वाऱ्यास पुढे लोटते, त्याद्वारे आम्हास ऊर्जा पुरविते. त्या उंच शीडावाचून वाऱ्याची हालचाल आणि ऊर्जा, जरी आमच्या सभोवताल असली तरीही, आम्हास त्याद्वारे लाभ मिळत नाही.

हे आत्म्याबरोबर सुद्धा आहे. आत्मा आमच्या नियंत्रणाबाहेर ज्या ठिकाणी तो इच्छितो तेथे जातो. परंतु जसजसा आत्मा कार्य करतो आपण त्यास आपल्यावर प्रभाव पाडण्याची, त्याची जीवनशक्ती आपल्यापर्यंत पोहोचवू शकण्याची, आपण हलविण्याची परवानगी देऊ शकता. वधस्तंभावर उंचविलेला मनुष्याचा पुत्र, उंचविलेला पितळेचा सर्प, किंवा वाऱ्यात उंचविलेले शीड आहे.  आपला विश्वास ठेवतो तेव्हा आम्हास जीवन देण्याची संधी आत्म्यास लाभते. मग आपला नवा जन्म होतो – हा दुसऱ्यांदा आत्म्याने. मग आपण आत्म्याचे – प्राण जीवन प्राप्त करतो. आत्म्याचा प्राण आम्हास सामर्थ्य देतो की आपण आतून द्विज बनावे, केवळबाह्य प्रतीक म्हणून नव्हे, जसे उपनयनाचे आहे.

द्विजवरून

यास सारांश रूपात योहानाच्या शुभवर्तमानात अशाप्रकारे एकत्र मांडले आहे:

12 काही लोकांनी त्याला आपले मानले. त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना त्याने देवाची मुले होण्याचा हक्क दिला.
13 ही मुले लहान बालके जन्मतात तशी जन्मली नाहीत. त्यांचा जन्म आईवडिलांच्या इच्छेने किंवा योजनेमुळे झाला नाही, तर त्यांचा जन्म देवाकडून झाला.

योहान 1:12-13

मूल होण्यासाठी जन्माची आवश्यकता असते, म्हणून ‘देवाची मुले’ होण्यासाठी दुसऱ्या जन्माचे वर्णन करणे होय – द्विज. उपनयनसारख्या विविध कर्मकांडांद्वारे द्विजचे प्रतीक दर्शविले जाऊ शकते परंतु खरा आंतरिक दुसरा जन्म ‘मानवी निर्णयाने’ ठरविला जात नाही. विधी, जसा आहे तसाच, जन्माचे वर्णन करू शकतो, या जन्माची आवश्यकता आपल्याला आठवण करून देऊ शकतो, परंतु तो त्यास घडवून आणू शकत नाही. जेव्हा आपण ‘त्याला ग्रहण करतो’ आणि ‘त्याच्या नावावर विश्वास ठेवतो’ तेव्हा हे केवळ देवाचे अंतर्गत कार्य ठरते.

प्रकाश आणि अंधार

नौकाविज्ञानाचे भौतिकशास्त्र समजण्यापूर्वी, लोकांनी शतकानुशतके शीडाचा वापर करून वाऱ्याच्या शक्तीचा उपयोग केला. त्याचप्रमाणे, आपल्या बुद्धीने जरी आपणास हे पूर्णपणे समजले नसले तरीसुद्धा आपण दुसऱ्या जन्मासाठी आत्म्यास कामी लावू शकतो. समजूतदारपणाची कमतरता आपल्यात अडथळा आणेल असे नाही. त्याऐवजी येशूने हे शिकवले की आपले अंधकाराचे प्रेम (आपली वाईट कृत्ये) आपल्याला सत्याच्या प्रकाशात येण्यापासून रोखते.

19 ज्य वस्तुस्थितीच्या आधारे लोकांचा न्याय केला जातो ती ही जगामध्ये प्रकाश आला परंतु लोकांना प्रकाश नको होता. त्यांना अंधार पाहिजे होता. कारण लोक वाईट कृत्ये करीत होते.

योहान 3:19

आपल्या बौद्धिक समजाऐवजी आपला नैतिक प्रतिसाद आपला दुसरा जन्म रोखतो. त्याऐवजी  आम्हाला प्रकाशात येण्यास सांगण्यात आले आहे.

21 परंतु जो सत्य मार्गाने चालतो तो प्रकाशाकडे वळतो. आणि त्याने केलेली कामे देवाकडून झाली होती हे तो प्रकाश दाखवून देईल.

योहान 3:21

त्याचे दृष्टांत आपल्याला प्रकाशात येण्याविषयी पुढे कसे शिकवितात हे आपण पाहतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *