हिंदू वर्षाचा शेवटचा पौर्णिमा होळी दर्शवितो. अनेक जण होळीचा आनंद लुटतात, पण अगदी काही जणांना हा सण दुसर्या प्राचीन उत्सवाच्या समांतर असल्याचे माहीत आहे – वल्हांडणाचा सण.
वल्हांडणाचा सण सुद्धा वसुत ऋतुत पौर्णिमेच्या दिवशी येतो. इब्री कॅलेंडरमध्ये चंद्राच्या चक्रांशी सौर वर्षाचा वेगळ्याप्रकारे मेळ केला गेलेला आहे, कधीकधी तो त्याच पौर्णिमेला येतो किंवा काही वेळा पुढील पौर्णिमेस येतोे. 2021 मध्ये, वल्हांडण आणि होळी हे रविवार, 28 मार्च रोजी सुरू येतील. पण 2022 मध्ये होळी 18 मार्चपासून सुरू होईल आणि तर वल्हांडणाचा सण पुढील पौर्णिमेस येईल. तथापि, ती होळीची संध्याकाळ आहे, किंवा. होलिका दहन, जो वल्हांडणाच्या समानतेत प्रारंभ होते.
होलिका दहन
होळी सुरू होण्याच्या आदल्या रात्री लोक होलिका दहन (छोटी होळी किंवा कामूडू चिता) करतात. होलिका दहन प्रह्लादाच्या पुण्याईसे आणि राक्षसी होलिकाचे दहन स्मरण करते. या कथेची सुरूवात राक्षस राजा हिरण्यकश्यप आणि त्याचा मुलगा प्रह्लाद यांच्यापासून होते. हिरण्यकश्यपूने संपूर्ण पृथ्वीवर जिंकली होती. त्याला इतका गर्व झाला की त्याने आपल्या राज्यातील प्रत्येकाला केवळ त्याची उपासना करण्याची आज्ञा केली. परंतु हे पाहून तो अत्यंत निराश झाला की त्याचाच मुलगा प्रल्हाद याने तसे करण्यास नकार दिला.
आपल्या मुलाच्या उघड विश्वासघातामुळे संतापलेल्या हिरण्यकश्यपूने प्रल्हादला ठार मारण्याची शिक्षा दिली आणि त्याला ठार मारण्याचे अनेक प्रयत्न केले, पण सर्व प्रयत्न अयशस्वी झाले. विषारी सर्पाच्या चावण्यानेे, हत्तींनी पायदळी तुडवण्यापर्यंत, प्रह्लादला कधीच काही इजा झाली नाही.
शेवटी हिरण्यकश्यपू आपली राक्षसी बहीण होलिकाकडे वळला. तिच्याकडे एक झगा होता ज्यामुळे तिला आगीपासून संरक्षण लाभले होते. हिरण्यकश्यपूने होलिकाला प्रह्लादास जाळून ठार मारण्यास सांगितले. होलिका एका चितेवर बसली आणि मैत्रीचे नाटक करून तरुण प्रल्हादला तिने आपल्या मांडीवर बांधले. मग पटकन विश्वासघाताने तिने आपल्या सेवकांना चितेस आग लावण्याचा आदेश दिला. तथापि, होलिकाचा पोशाख तिच्यावरून फडफडून निघाला व प्रह्लादवरजाऊन पडला. ज्वालांनी प्रल्हादला पेटवले नाही, तर होलिका तिच्या दुष्ट योजनेमुळे ठार झाली. अशा प्रकारे होलिका दहन हे नाव होलिकाच्या जळण्यामुळे पडले.
यहूदा : होलिकासारख्या विश्वासघाताद्वारे नियंत्रित
बायबलमध्ये सैतानाला राज्य करणारा आत्मा राक्षस म्हणून चित्रित केले आहे. हिरण्यकश्यपूप्रमाणे सैतानाने सर्वांनी त्याची उपासना करावी असा कट रचला आहे, येशूने सुद्धा. जेव्हा तो अयशस्वी झाला तेव्हा त्याने येशूला ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि लोकांनी त्याची आज्ञा पाळावी म्हणून त्यांस उकसविले. प्रह्लादवर हल्ला करण्यासाठी हिरण्यकश्यपूने होलिकामार्फत काम केले, येशू त्याच्या आगमनाविषयी शिकवल्यानंतर 5व्या दिवशी लगेच सैतानाने येशूला जिवे मारण्यासाठी यहूदाचा वापर केला. हे वर्णन येथे आहे:
1 बेखमीर भाकरीचा सण, ज्याला वल्हांडण म्हणतात, तो जवळ आला होता.
2 तेव्हा मुख्य याजक व शास्त्री हे त्याचा घात कसा करावा ह्याविषयी विचार करत होते; कारण त्यांना लोकांची भीती वाटत होती.
3 तेव्हा बारा प्रेषितांपैकी एक जो यहूदा, ज्याला इस्कर्योत म्हणत, त्याच्यात सैतान शिरला;
4 तो मुख्य याजक व सरदार ह्यांच्याकडे निघून गेला आणि त्यांच्या हाती त्याला कसे धरून द्यावे ह्याविषयी त्याने त्यांच्याशी बोलणे केले.
5 तेव्हा त्यांना आनंद झाला व त्यांनी त्याला पैसा देण्याचा करार केला.
6 त्याला तो मान्य झाला आणि गर्दी नसेल तेव्हा त्यांच्या हाती त्याला धरून देण्याची तो संधी शोधू लागला.
लूक 22:1-6
येशूचा विश्वासघात करण्यासाठी यहूदामध्ये ‘प्रवेश’ करण्यासाठी सैतानाने त्यांच्या संघर्षाचा फायदा उठविला. यामुळे आपल्याला आश्चर्य वाटता कामा नये. शुभवर्तमानात सैतानाचे असे वर्णन केले आहे:
7 मग स्वर्गात युद्ध सुरू झाले; ‘मीखाएल’ व त्याचे दूत अजगराबरोबर ‘युद्ध करण्यास’ निघाले, आणि त्यांच्याबरोबर अजगर व त्याचे दूत लढले;
8 तरी त्यांचे काही चालले नाही, आणि स्वर्गात त्यांचे ठिकाणही उरले नाही.
9 मग तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला, म्हणजे सर्व जगाला ठकवणारा, जो दियाबल1 व सैतान म्हटलेला आहे तो जुनाट ‘साप’ खाली पृथ्वीवर टाकण्यात आला व त्याच्याबरोबर त्याच्या दूतांना टाकण्यात आले.
प्रकटीकरण 12:7-9
बायबल सैतानाची तुलना एका शक्तिशाली अजगराशी करते ज्याने संपूर्ण जगाला चुकीच्या मार्गाने नेले, हिरण्यकश्यपूसारखा बलवान राक्षस. मानवाच्या इतिहासाच्या सुरुवातीला भाकीत केलेल्या संघर्षाचा उल्लेख करून, त्याची एका सर्पाशीही तुलना केली जाते. प्राचीन सर्प म्हणून तो आता प्रहार करण्याच्या तयारीत होता. हिरण्यकश्यपूने होलिकाद्वारे कार्य केले, तसेच सैतानाने यहूदाला येशूचा नाश करण्यासाठी हाताळले. शुभवर्तमानात लिहिले आहे :
तेव्हापासून यहूदाने येशूला त्याच्या स्वाधीन करण्याची संधी
शोधली.मत्तय 26:16
दुसर््या दिवशी, सहावा दिवस, वल्हांडण सण होता. यहूदाच्या माध्यमाने सैतान कसा वार करेल? यहूदाचे काय होईल? आपण पुढे पाहू.
दिवस 5 सारांश
समयरेखा दाखविते की या आठवड्याच्या 5 व्या दिवशी मोठा राक्षस अजगर, सैतान हा आपला शत्रू येशूवर हल्ला करण्यास कसा तयार झाला.