Skip to content

येणारा ख्रिस्तः ‘सातच्या’ चक्रात

  • by

पवित्र सात

सात ही एक पवित्र संख्या जी नियमितपणे पवित्रशी संबंधित आहे. सात पवित्र नद्या : गंगा, गोदावरी, यमुना, सिंधू, सरस्वती, कावेरी आणि नर्मदा अशा आहेत याचा विचार करा.

तेथे सात पवित्र शहरे (सप्तपुरी) अशी सात पवित्र स्थाने आहेत. सात तीर्थ स्थळे पुढीलप्रमाणे आहेत :

1. अयोध्या (अयोध्या पुरी),

2. मथुरा (मधुरा पुरी),

3. हरिद्वार (माया पुरी),

4. वाराणसी (काशी पुरी),

5. कांचीपुरम (कांची पुरी),

6. उज्जैन (अवंतिका पुरी),

7. द्वारका (द्वारका पुरी)

विश्वशास्त्रात विश्वामध्ये सात वरील आणि सात खालील लोक आहेत. विकिपीडियानुसार

…14 जग आहेत, सात वरील आहेत. (व्याहृतिस) आणि सात खालचे (पाताल ), अर्थात् भूः, भुवः, स्वः, महः जनः, तपः आणि सत्यम् वर आणि सात खालचे अर्थात् अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल आणि पाताल…

चक्राचे विद्यार्थी नियमितपणे आपल्या शरीरातील सात चक्र क्षेत्रांचा उल्लेख  करतात

1मूलाधार 2.स्वाधिष्ठान 3. मणिपुर  4. अनाहत 5. विशुद्धि 6. आज्ञा 6. सहस्रार

हिब्रू वेदांमध्ये पवित्र ‘सात’

नद्या, तीर्थ, व्याहृतिस, पातळ आणि चक्र ‘सात’ द्वारे पूर्ण केले जातात, त्यामुळे यात आश्चर्य नाही की हिब्रू वेदांमध्ये ख्रिस्ताच्या आगमनाच्या भविष्यवाणीसाठीही सात वापरले गेले होते. खरे तर, प्राचीन ऋषींनी त्याच्या आगमनाविषयी सांगण्यासाठी सात आठवड्यांच्या सात  चक्रांचा वापर केला. आम्ही या ‘सात आठवड्यांच्या’ सात चक्रांचा उलगडा करतो, परंतु प्रथम या प्राचीन हिब्रू संदेष्ट्यांचा थोडासा आढावा घेऊ या.

शेकडो वर्षांनी एकमेकांपासून विभक्त झाले असले तरीही, मानवी समन्वय साधणे अशक्य झाले, तरीसुद्धा त्यांच्या भविष्यवाण्या येणाऱ्या ख्रिस्तावर आधारित होत्या. यशयाने हा विषय सुरू करण्यासाठी शाखेच्या चिन्हाचा वापर केला. जखर्याने भविष्यवाणी केली की या शाखेचे नाव यहोशवा (मराठीत येशू) ठेवले जाईल. होय, येशूच्या जगण्याआधी 500 वर्षांपूर्वी ख्रिस्ताच्या नावाचे भाकित करण्यात आले होते.

संदेष्टा दानीएल – सातच्या संख्येत

आता दानीएलविषयी. तो बॅबिलोनच्या बंदिवासात राहिला, बॅबिलोनियन आणि पर्शियन शासनांचा एक प्रभावीशाली अधिकारी – आणि एक हिब्रू संदेष्टा.

दानीएल हिब्रू वेदांच्या इतर संदेष्ट्यांसमवेत समयरेखेत दर्शविलेला

या पुस्तकात, दानीएलला खालील संदेश प्राप्त झाला :

21 असे प्रार्थनेचे शब्द मी बोलत असता जो पुरुष गब्रीएल, दृष्टान्ताच्या आरंभी मी अगदी व्याकूळ असता माझ्या दृष्टीस पडला होता, तो संध्याकाळच्या यज्ञसमयी माझ्यासमीप आला.

22 त्याने माझ्याशी संभाषण करून मला समज दिली. तो म्हणाला, “हे दानिएला, मी तुला बुद्धी देऊन चतुर करण्यासाठी आलो आहे.

23 तुझ्या प्रार्थनांना आरंभ होताच आज्ञा झाली, ती तुला सांगण्यास मी आलो आहे; कारण तू परमप्रिय आहेस; तर ह्या गोष्टींचा विचार कर व हा दृष्टान्त समजून घे.

24 आज्ञाभंगाची समाप्ती व्हावी, पातकांचा अंत करावा, अधर्माबद्दल प्रायश्‍चित्त करावे, सनातन नीतिमत्ता उदयास आणावी, दृष्टान्त व संदेश मुद्रित करावेत आणि जो परमपवित्र त्याला अभिषेक करावा, हे घडून येण्यासाठी तुझे लोक व तुझे पवित्र नगर ह्यासंबंधाने सत्तर सप्तके ठरली आहेत.

25 हे कळून येऊ दे व समजून घे की यरुशलेमेचा जीर्णोद्धार करण्याची आज्ञा झाल्यापासून अभिषिक्त,1 अधिपती असा जो तो येईपर्यंत सात सप्तकांचा अवकाश आहे व बासष्ट सप्तके लोटल्यावर1 धामधुमीचा काळ असताही नगर, रस्ते व खंदक ह्यांसह बांधतील.

26 बासष्ट सप्तके संपल्यावर ^अभिषिक्ताचा वध होईल, व त्याला काही उरणार नाही*; आणि जो अधिपती येईल त्याचे लोक नगर व पवित्रस्थान उद्ध्वस्त करतील; त्याचा अंत पुराने होईल; युद्ध अंतापर्यंत चालेल; सर्वकाही उजाड होण्याचे ठरले आहे.

दानीएल 9:21-26अ

ही भविष्यवाणी “अभिषिक्त व्यक्ती” (= ख्रिस्त = मशीहा) याविषयी आहे की तो केव्हा येईल. त्याची सुरुवात ‘यरूशलेमच्या जीर्णोद्धाराच्या व पुनर्बांधणीच्या’ फर्मानापासून होईल. जरी दानीएलला हा संदेश देण्यात आला होता आणि त्याने हा संदेश लिहिला होता (ख्रि.पू.  537) तरीही तो या मोजणीची सुरुवात पाहण्यास जगला नाही.

यरूशलेमच्या जीर्णोद्वाराचा आदेश

पण नहेम्याने, दानीएलच्या शंभर वर्षांनंतर, ही मोजणी सुरू होताना पाहिले. तो आपल्या पुस्तकात लिहितो की

1 अर्तहशश्त राजाच्या कारकिर्दीच्या विसाव्या वर्षी नीसान महिन्यात राजापुढे द्राक्षारस ठेवलेला होता तो मी उचलून राजाला दिला. ह्यापूर्वी मी कधीही त्याच्यासमोर खिन्न दिसलो नव्हतो.

2 राजा मला म्हणाला, “तू आजारी नसून तुझे तोंड का उतरले आहे? तुझ्या मनाला काहीतरी खेद होत असला पाहिजे.” तेव्हा मी फार भ्यालो.

3 मी राजाला म्हणालो, “महाराज चिरायू होवोत; माझ्या वाडवडिलांच्या कबरा जेथे आहेत ते नगर उजाड पडले आहे, त्याच्या वेशी अग्नीने जळून गेल्या आहेत, तर माझे तोंड का उतरणार नाही?”

4 राजाने मला विचारले, “तुझी विनंती काय आहे?” तेव्हा मी स्वर्गीच्या देवाची प्रार्थना केली, 

5 आणि राजाला म्हटले, “महाराजांची मर्जी असली आणि आपण आपल्या दासावर प्रसन्न असलात तर यहूदा देशात, माझ्या पूर्वजांच्या कबरा असलेल्या नगरास मला पाठवा म्हणजे मी ते बांधीन.”

6 राजाजवळ राणी बसली असता तो मला म्हणाला, “तुझ्या प्रवासास किती दिवस लागतील व तू केव्हा परत येशील?” नंतर मला पाठवण्याचे राजाच्या मर्जीस आले व मी मुदत ठरवून त्याला कळवली.

नहेम्या 2:1-6

11 मी यरुशलेमेस जाऊन पोहचल्यावर तेथे तीन दिवस होतो.

नहेम्या 2:11

यात लिहिले आहे की दानीएलने भविष्यवाणी केलेल्या “यरुशलेमचा जीर्णोद्धार व पुनर्बांधणी करा” या आदेशाद्वारे उलटी गणना सुरू होईल. पर्शियन सम्राट अर्तक्षयर्ष ज्याने आपल्या कारकिर्दीची सुरूवात ख्रि. पू. 465 मध्ये केली म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे, त्याच्या राज्याच्या 20 व्या वर्षी हे घडले. अशाप्रकारे हे 20 वे वर्ष म्हणजे ख्रि. पू. 444 मध्ये हा हुकूम बजावण्यात आला. दानीएलच्या जवळजवळ शंभर वर्षांनंतर, पर्शियन सम्राटाने त्याचे फर्मान काढले, याद्वारे ख्रिस्ताच्या येण्याची गिनती सुरू झाली.

रहस्यमय सात

दानीएलच्या भविष्यवाणीने असे सूचित केले की “सात ’ ‘आठवडे’ आणि बासष्ट ‘आठवडे;’’ यानंतर ख्रिस्त प्रकट होईल.

‘सात’ म्हणजे काय?

मोशेच्या नियमशास्त्रात सात वर्षांचे चक्र होते. मातीची पुन्हा भर व्हावी दर 7 व्या वर्षी जमीनीस शेती न करता विश्रांती द्यावी लागत असे. तर ‘सात’ हे 7 वर्षांचे चक्र आहे. हे लक्षात घेता आम्ही पाहतो की ही गणना दोन भागात येते. पहिला भाग होता ‘सात आठवडे’ किंवा सात 7-वर्षांचा कालावधी. हा 7*7=49  वर्षे यरुशलेमेच्या पुनर्बांधणीसाठी लागलेला काळ होता. यानंतर बासष्ट वर्ष येतात, अशाप्रकारे एकूण मोजणी 7*7+62*7 = 483  वर्षे होती. हुकुमापासून ख्रिस्त प्रकट होईपर्यंत 483 वर्षे असतील.

360-दिवसांचे वर्ष

आम्हाला एका लहान कॅलेंडरचे समायोजन करावे लागेल. जसे अनेक प्राचीनांनी केले, संदेष्ट्यांनी 360 दिवसांचे वर्ष वापरले. दिनदर्शिकेमध्ये ‘वर्षाची’ लांबी ठरविण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. पाश्चात्य दिनदिर्शका (सौर क्रांतीवर आधारित)) 365.24 दिवसांची आहे, मुस्लिम दिनदर्शिकेत 354 दिवस आहेत (चंद्राच्या चक्रांवर आधारित आहे). दानीएलने ज्या दिनदिर्शकेचा वापर केला ती 360 दिवसांच्या अर्धी होती. तसेच ‘360-दिवसांच्या’ वर्षानुसार 483 सौर वर्ष 483*360/365.24 = 476  सौर वर्षे आहेत.

निश्चित वर्षी ख्रिस्ताच्या आगमनाचे भाकित

हे आता आपण मोजू शकतो की ख्रिस्त येईल अशी भविष्यवाणी केव्हा करण्यात आली होती. आपण ‘खिस्तपूर्व’ पासून ‘ईस्वी’ सनाच्या युगात 1 ‘खिस्तपूर्व’ पासून 1 ‘ईस्वी’ सनात सरळ 1ल्या वर्षात जातो (कोणतेही ‘शून्य’ वर्ष नाही). गणना येथे आहे.

सुरूवातीचे वर्ष444 ख्रिस्त पूर्व (अर्तक्षयर्ष चे 20वे वर्ष)
कालावधी476 सौर वर्ष
आधुनिक दिनदिर्शकेत अपेक्षित आगमन(-444 + 476 + 1) (‘+1’ कारण 0 ईस्वी सन् नाही) = 33
अपेक्षित वर्ष33 ईस्वी सन्
ख्रिस्ताच्या आगमनासाठी आधुनिक दिनदर्शिकेची गणना

नासरेथचा येशू गाढवावर बसून यरुशलेमेस आला जो प्रसिद्ध झावळ्याचा रविवार ठरला. या दिवशी त्याने स्वतःस घोषित केले आणि त्यांचा ख्रिस्त म्हणून त्याने यरुशलेमात प्रवेश केला. हे वर्ष ईस्वी सन 33 होते – भाकित केल्याप्रमाणे.

संदेष्टा दानीएल आणि नहेम्या, यांच्यात शंभर वर्षांचे अंतर असल्यामुळे ते एकमेकांना ओळखू शकत नव्हते, भविष्यवाण्या प्राप्त करण्यासाठी देवाने त्यांचे संयोजन केले व अशाप्रकारे ख्रिस्त प्रकट होईल त्या समयाची गणना सुरू झाली. दानीएलने त्याचे ‘सातचे’ दर्शन प्राप्त केले त्याच्या 537 वर्षानंतर, येशूने ख्रिस्त म्हणून यरुशलेमात प्रवेश केला. ख्रिस्ताच्या नावाविषयी जखऱ्याने केलेल्या भविष्यवाणीसोबतच, या संदेष्ट्यांनीसुद्धा आश्चर्यकारक भाकीत लिहिले जेणेकरून सर्वांना देवाच्या योजनेचे प्रकटीकरण पाहता यावे.

या ‘दिवशी’ आगमन होईल अशी भविष्यवाणी करण्यात आली

प्रवेशाच्या वर्षाची भविष्यवाणी, ती घडण्यापूर्वी शेकडो वर्षांपूर्वी, आश्चर्यचकित करते. परंतु त्यांनी ते आज घडेल असे देखील भविष्य वर्तविले होते.

ख्रिस्ताच्या प्रकट होण्यापूर्वी दानीएलने 360 दिवसांचे वर्ष वापरून 483 वर्षांची भविष्यवाणी केली होती. त्यानुसार, दिवसांची संख्या आहे :

483 वर्ष * 360 दिवस/वर्ष = 173880 दिवस

365.2422 दिवस/वर्षांसमवेत आधुनिक आंतर्राष्ट्रीय दिनदर्शिकेच्या दृष्टीने या 25 अतिरिक्त दिवसांसह 476 वर्षे आहे. (173880/365.24219879 = 476 उरलेले 25)

राजा अर्तक्षयर्षने यरूशलेमाच्या जीर्णोद्धाराची आज्ञा दिली :

विसाव्या वर्षी निसान महिन्यात…

नहेम्या 2:1

निसान 1 निश्चित आहे कारण या दिवशी यहूदी आणि पर्शियन नववर्ष सुरू झाले, ज्यामुळे राजाला उत्सव साजरा करताना नहेम्याशी बोलण्याचे निमित्त मिळाले. ते चांद्रमासाचा उपयोग करीत असल्यामुळे निसान 1 अमावस्या देखील चिन्हांकित करेल. आधुनिक खगोलशास्त्राच्या सहाय्याने आपल्याला माहीत आहे की निसान 1, 444 ख्रि. पू. अमावस्या कधी घडली. खगोलशास्त्रीय गणनेनुसार पर्शियन सम्राट अर्तक्षयर्षच्या 20 व्या वर्षाच्या निसान 1 चा चंद्रकोर चंद्राची आधुनिक काळच्या दिनदर्शिकेत 4 मार्च 444ख्रि. पू. रोजी रात्री 10 वाजताची वेळ दाखवितो. [1]

झावळ्याच्या रविवारी

या तारखेत दानीएलच्या भविष्यवाणी केलेल्या समयाच्या 476 वर्षांची जोडणी केल्याने आम्ही वर वर्णन केल्याप्रमाणे 4 मार्च, 33 ईस्वी सन् तारखेप्रत पोहोचतो. दानीएलच्या भविष्यवाणीच्या समयाचे उर्वरित  25 दिवस 4 मार्च 33 ईस्वी सनात जोडल्यास आपल्याला मार्च 29, 33 ईस्वी सन् प्राप्त होता. मार्च 29, 33 ईस्वी सन, रविवार होता – झावळ्याचा रविवारतोच दिवस ज्या दिवशी आपण ख्रिस्त असल्याचा दावा करीत येशूने गाढवावर स्वार होऊन यरुशलेमात प्रवेश केला.2

प्रारंभफर्मान काढण्यात आलेमार्च 4, 444 ख्रिस्त पूर्व
सौर वर्षें जोडावी (-444+ 476 +1) मार्च 4, 33 ईस्वी सन्
उरलेल्यासातआठवड्यांचे 25 दिवस जोडावेमार्च 4 + 25 = मार्च 29, 33 ईस्वी सन्
मार्च 29, 33 ईस्वी सन्झावळ्याच्या रविवारी येशूचा यरूशलेमात प्रवेश
29 मार्च, 33 रोजी यरूशलेमात प्रवेश करून, एका गाढवावर स्वार होऊन, येशूने जखऱ्या आणि दानीएलाची भविष्यवाणी – त्याच दिवशी पूर्ण केली.
डॅनियल्सचे ‘सेव्हन्स’ सायकल पाम रविवारीच्या दिवसापर्यंत पूर्ण झाली

दानीएलच्या ‘सात’ चक्रांची परिपूर्ती झावळ्याच्या रविवारी झाली

दानीएलने ख्रिस्ताच्या प्रकटीकरणाच्या 173880 दिवसांपूर्वी भविष्यवाणी केली होती; नहेम्याने ती वेळ सुरू केली. २9, मार्च, ईस्वी सन 33 रोजी ती वेळ समाप्त झाली जेव्हा येशूने झावळ्याच्या रविवारी यरुशलेमात प्रवेश केला, अशाप्रकारे सर्व ‘सात’ आठवडे पूर्ण झाले.

नंतर त्याच दिवशी, येशू दुसरेसात म्हणजे सृष्टीच्या आठवड्याप्रमाणे आपल्या कृतीं घडवू लागला. अशाप्रकारे त्याने आपला शत्रू मृत्यूयाच्याशी लढाईप्रत नेणार्या घटनांस चालना दिली.

……………….

[1] डॉ. हेरोल्ड डब्ल्यू. हॉर्नर,ख्रिस्ताच्या जीवनाचे ऐतिहासिक. 1977. पृ. 176.

2 येणारा शुक्रवार वल्हांडणाचा होता, आणि वल्हांडण नेहमी निसान 14 ला असे. ईस्वी सन् 33मध्ये निसान 14 एप्रिल 3 होता. शुक्रवार एप्रिल 3 पूर्वी 5 दिवस आधी असल्यामुळे, झावळ्याचा रविवार मार्च 29 होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *