पुराण, रामायण, आणि महाभारत या ग्रंथांत असे वर्णन आहे की आठ चिरंजीवी लोक युगाच्या समाप्तीपर्यंत जिवंत राहतील अशी ख्याती आहे. जर या पुराणकथा ऐतिहासिक आहेत तर हे चिरंजीवी आज पृथ्वीवर जगत आहेत, आणि हजारों वर्षे जगत राहतील.
हे चिरंजीवी आहेत:
- त्रेता युगाच्या शेवटी जन्मलेल्या महाभारताची रचना करणारे वेद व्यास.
- रामायणात वर्णन केल्याप्रमाणे ब्रह्मचारींपैकी एक हनुमानाने रामाची सेवा केली.
- परशुराम, याजक-योद्धा आणि विष्णूचा सहावा अवतार, सर्व युद्धात कुशल.
- रामला शरण गेलेला रावणाचा भाऊ विभीषण. रावणाला मारल्यानंतर रामाने विभीषणास लंकेचा राजा म्हणून मुकुट घातला त्याला दीर्घायुष्याचा वर मिळाला होता की तो महायुगाच्या शेवटापर्यंत जिवंत राहील.
- कुरुक्षेत्र युद्धात एकट्याने वाचलेले अश्वत्थामा, आणि कृपा अजूनही जिवंत आहेत. अश्वत्थामाने काही लोकांना बेकायदेशीरपणे मारले म्हणून कृष्णाने त्याला पृथ्वीवर भटकण्याचा व असाध्य फोडांनी त्याचे शरीर झाकलेले असेल असा शाप दिला.
- महाबली, (राजा बाली चक्रवर्ती) केरळच्या आसपास कुठेतरी राक्षस-राजा होता. तो इतका शक्तिशाली होता की देवांना त्याची भिती वाटत असे. तर विष्णूचा ठेंगणा अवतार वामनाने त्यालाफसवून त्याला पाताळात पाठविले.
- महाभारतात राजकुमारांचा गुरु कृपा हा कुरुक्षेत्र युद्धात वाचलेल्या तीन कौरवांपैकी एक होता. असा अद्भुत गुरू असल्याने कृष्णाने त्यांना अमरत्व दिले आणि तो आजही जिवंत आहे.
- महाभारतात उल्लेखिलेला मार्कंडेय हा एक प्राचीन ऋषी आहे, ज्याला शिवाने त्याच्यावरील भक्तीमुळे अमरत्वाचा वर दिलाण्
चिरंजीव ऐतिहासिक आहेत?
प्रेरणादाक म्हणून जरी त्यांचा आदर केला जात असला तरीही इतिहासामध्ये चिरंजीवांची स्वीकृती असमर्थित आहे. कोणत्याही इतिहासकाराने त्यांच्याबरोबर प्रत्यक्षदर्शी भेट घेतल्याचे नोंदविले नाही. पौराणिक कथांमध्ये उल्लेखिलेली कोणतीही ठिकाणे भौगोलिकदृष्ट्या आढळलेली नाहीत. महाभारत, रामायण आणि पुराणांसारखे लेखी स्रोत ऐतिहासिकदृष्ट्या सत्यापित करणे अवघड आहेत. उदाहरणार्थ, विद्वानांचे मूल्यांकन आहे की रामायण इ.स.पू. 5 व्या शतकात लिहिले गेले होते. परंतु मांडणी 870000 वर्षांपूर्वीच्या त्रेता युगात आहे, जो या घटनांस क्वचितच प्रत्यक्षदर्शी स्त्रोत ठरवितो. त्याचप्रमाणे महाभारतही ई. स. पू. 3 रे शतक आणि ईस्वी 3 रे शतक या दरम्यान रचले गेले होते, पण त्यात शक्यतः ई. स. पू. 8-9 व्या शतकातील घटनांचे वर्णन आहे. लेखकांनी वर्णन केलेल्या घटना त्यांनी पाहिल्या नव्हत्या कारण त्या शेकडो वर्षांपूर्वी घडल्या होत्या.
येशूच्या पुनरुत्थानाची ऐतिहासिकदृष्ट्या तपासणी केली गेली.
येशूच्या पुनरुत्थानाच्या आणि नवीन जीवनाच्या बायबलच्या दाव्याबद्दल काय? येशूचे पुनरुत्थान हे चिरंजीवींप्रमाणे पौराणिक आहे की ते ऐतिहासिक आहे?
याचा थेट परिणाम आपल्यावर होत असल्याने याची तपासणी करण्यासारखे आहे. आपण कितीही पैसा, शिक्षण, आरोग्य आणि इतर उद्दिष्टे साध्य केली तरी आपण मरणार आहोत. जर येशूने मृत्यूला पराभूत केले असेल तर आपल्याला जवळ असलेल्या मृत्यूस तोंड देत असतांना हे आशा देते. त्याच्या पुनरुत्थानाचे समर्थन करणारी काही ऐतिहासिक माहिती येथे आपण पाहतो.
येशूची ऐतिहासिक पार्श्वभूमी
येशू अस्तित्वात होता आणि इतिहासाच्या मार्गात बदल घडवून आणणारा सार्वजनिक मृत्यू मरण पावला हे निश्चित आहे. जगीक इतिहासामध्ये येशूविषयी आणि त्याच्या दिवसातील जगावरील त्याच्या प्रभावाचे अनेक उल्लेख नोंदवले गेले आहेत. त्यापैकी दोन पाहू या.
टॅसिटस
रोमन सम्राट नीरोने 1 ल्या शतकातील ख्रिस्ती लोकांना (ईस्वी सन 65 मध्ये) कसे मारले याची नोंद करीत असतांना रोमन राज्यपाल-इतिहासकार टॅसिटस याने येशूचा एक उल्लेखनीय संदर्भ लिहिला. टॅसिटसने जे लिहिले ते येथे आहे.
‘सामान्यतः ख्रिस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकांस ‘नीरोने अतोनात यातनांसह शिक्षा दिली, ज्यांचा त्यांच्या विशाल संख्येमुळे द्वेष केला जात असे. या नावाचा संस्थापक ख्रिस्त याचा टाइबेरियसच्या कारकिर्दीतील यहूदियाचा राज्यपाल पंतय पिलात याने वध केला; परंतु काही काळासाठी दडपलेली धोकादायक अंधश्रद्धा पुन्हा केवळ यहूदियात नव्हे, जेथे हा उपद्रव उद्भवला होता, तर रोमच्या नगरातही पसरली.’टॅसिटस.
बखर 15. 44. 112 ईस्वी सन्
टॅसिटस या गोष्टींची पुष्टी करतो:
1. येशू अस्तित्वात होता,
2. पंतय पिलाताने त्याला मरणदंड दिला
3. यहूदिया/यरूशलेम
4. सन 65 पर्यंत येशूवरील विश्वास इतक्या प्रबळतेने भूमध्यक्षेत्र ओलांडून रोमपर्यंत पसरला होता की रोमचा सम्राट नीरो याला वाटले की त्याला त्याचा नायनाट करावा लागेल.
हे लक्षात घ्या की टॅसिटस या चळवळीचा विचार प्रतिकूल साक्षीदार म्हणून करीत असल्याने असे बोलत आहे कारण त्याला येशूने सुरू केलेली चळवळ ‘दुष्ट अंधश्रद्धा’ वाटते. तो याला विरोध करतो, पण त्याचे ऐतिहासिकत्व नाकारत नाही.
जोसेफस
पहिल्या शतकातील यहूदी लष्करी नेता/इतिहासकार जोसेफस याने पहिल्या शतकात लेखन केले व यहूदी इतिहासाच्या सुरुवातीपासूनच त्याच्या काळापर्यंत सारांश दिला. असे करीत असतांना त्याने येशूची वेळ आणि कारकीर्द याविषयी खालील शब्दांत मांडले:
‘यावेळी एक बुद्धिमान इसम होता…येशू…चांगले आणि…सद्गुणी. आणि यहूदी तसेच इतर देशातील अनेक लोक येशूचे शिष्य झाले. पिलाताने त्याला वधस्तंभावर खिळून मारण्याची शिक्षा दिली. आणि जे त्याचे शिष्य झाले होते त्यांनी त्याचे शिष्यत्व सोडले नाही. त्यांनी सांगितले की त्याच्या वधस्तंभारोहणाच्या तीन दिवसानंतर त्याने त्यांस दर्शन दिले आणि हे की तो जिवंत होता.
जोसेफस. 90 इ.स. पुरातन वस्तू 18.33
जोसेफस याची पुष्टी करतो की:
1. येशू अस्तित्वात होता,
2. तो एक धार्मिक शिक्षक होता,
3. त्याच्या शिष्यांनी जाहीरपणे येशूच्या पुनरुत्थानाची घोषणा केली.
या ऐतिहासिक झलकांवरून हे दिसून येते की ख्रिस्ताचा मृत्यू ही एक सुप्रसिद्ध घटना होती आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्या पुनरुत्थानाचा मुद्दा ग्रीक-रोमन जगावर ठसवून टाकला.
बायबलमधील ऐतिहासिक पार्श्वभूमी
इतिहासकार लूक पुढे समजावितो की प्राचीन जगामध्ये हा विश्वास कसा वाढला. बायबलच्या प्रेषितांच्या कृत्यांच्या पुस्तकातील त्याचा उतारा येथे आहे:
त्र व योहान लोकांशी बोलत असताना, काही लोक त्यांच्याकडे आले. त्यातील काही यहूदी याजक, मंदिराचे रक्षण करणाऱ्या शिपायांचा कप्तान व काही सदूकी लोक होते.
प्रेषितांचीकृत्ये 4:1-17 ईस्वीसन 63
2 ते चिडले होते. कारण दोन प्रेषित लोकांना शिकवीत होते. पेत्र व योहान लोकांना शिकवीत होते की, येशूच्या सामर्थ्याने मेलेली माणसे पुन्हा उठतील.
3 यहूदी पुढाऱ्यानी व नियमास्त्र शिक्षकांनी पेत्र व योहानाला धरले व तुरुंगात टाकले. अगोदरच रात्र झाली होती, म्हणून त्यांनी पेत्र व योहान यांना दुसऱ्या दिवसापर्यंत तुरुंगात ठेवले.
4 परंतु पेत्र व योहान यांचा संदेश ऐकणाऱ्या पुष्कळ लोकांनी, त्यांनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवला. विश्वासणाऱ्यांच्या गटामध्ये सुमारे पाच हजार लोक होते.
5 दुसऱ्या दिवशी यहूदी लोकांचे पुढारी, वडीलजन, व नियमशास्त्र शिकविणारे शिक्षक यरुशलेममध्ये एकत्र जमले.
6 हन्ना (प्रमख याजक), केफा, योहान आणि अलेक्यांद्र हे तेथे होते. तसेच प्रमुख याजकाच्या घरातील प्रत्येक जण हजर होता.
7 त्यांनी पेत्र व योहान यांना सर्वांसमोर उभे राहण्यास सांगितले, यहूदी पुढाऱ्यांनी पुष्कळ वेळ त्यांना विचारले. “या लंगड्या माणसाला तुम्ही कसे बरे केले? कोणत्या शक्तीचा उपयोग तुम्ही केला? कोणाच्या अधिकाराने हे तुम्ही केले?”
8 मग पेत्र पवित्र आत्म्याने भरला गेला. तो त्यांना म्हणाला, “अहो पुढाऱ्यांनो आणि वडीलधारी लोकांनो;
9 या लंगड्या माणासाच्या बाबतीत जी चांगली गोष्ट झाली त्याबद्दल तुम्ही आम्हांला प्रश्न विचारीत आहात काय? तुम्ही आम्हांला विचारीत आहात का की याला कोणी बरे केले?
10 तुम्ही सर्वांनी आणि यहूदी लोकांनी समजून घ्यावे अशी आमची इच्छा आहे, ती ही की, नासरेथच्या येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याने हा मनुष्य बरा झाला! तुम्ही येशूला वधस्तंभावर खिळले. देवाने त्याला मरणातून उठविले. हा मनुष्य लंगडा होता, पण आता तो चांगला झाला आहे. आणि येशूच्या सामर्थ्यामुळे तुमच्यासमोर उभा राहू शकत आहे!
11 ‘तुम्ही बांधणारांनी जो दगड नापसंत केला, जो पुढे कोनशिल झाला तोच हा येशू होय.’
12 येशू हा एकमेव आहे जो लोकांना तारु शकेल. त्याचे नाव हेच सामर्थ्य फक्त जगामध्ये आहे जे लोकांना तारण्यासाठी दिले आहे, आमचे तारण येशूद्वारे झालेच पाहिजे!”
13 यहूदी लोकांना समजले की, पेत्र व योहान यांचे खास प्रशिक्षण किंवा शिक्षण झालेले नाही. पण पुढाऱ्यांनी हे सुद्धा पाहिले की, पेत्र व योहान बोलायला घाबरत नव्हते. म्हणून पुढारी आश्चर्यचकित झाले. मग त्यांना उमगले की, पेत्र व योहान येशूबरोबर होते.
14 त्यांनी पाहिले की, तो लंगडा मनुष्य तेथे दोन प्रेषितांसह उभा आहे. त्यांनी पाहिले की, तो मनुष्य बरा झालेला आहे. म्हणून ते प्रेषितांविरुद्ध काही बोलू शकत नव्हते.
15 यहूदी पुढारी त्यांना म्हणाले की, त्यांनी सभा सोडून जावे. मग पुढारी काय करायला हवे याविषयी एकमेकांमध्ये विचारविनिमय करु लागले.
16 ते म्हणाले, “या मनुष्यांचे आपण काय करावे? यरुशलेममधील प्रत्येक व्यक्ति हे जाणतो की, त्यांनी एक महान चमत्कार केला आहे, हे स्पष्ट आहे. आपण असे म्हणू शकत नाही की ते खरे नाही.
17 परंतु आपण त्यांना त्या माणसाविषेयी (येशूविषयी) सांगण्यास (प्रतिबंध करु) घाबरुन सोडू. मग ही समस्या लोकांमध्ये पसरणार नाही.”
अधिकाऱ्याचा आणखी विरोध
17 प्रमुख याजक आणि त्याचे सर्व मित्र (सदूकी नावाचा एक गट) यांना फार हेवा वाट लागला.
प्रेषितांचीकृत्ये 5:17-41
18 त्यांनी प्रेषितांना धरले आणि तुरुंगात टाकले.
19 पण रात्रीच्या वेळी देवाच्या दूताने तुरुंगाचा दरवाजा उघडला. देवदूताने प्रेषितांना बाहेर आणले आणि म्हणाला,
20 “जा आणि मंदिरात उभे राहा. येशू रिव्रस्तामधील जे नवीन जीवन आहे त्याविषयी लोकांना सांगा.”
21 जेव्हा प्रेषितांनी हे ऐकले, त्यांनी ती आज्ञा पाळली आणि मंदिरात गेले. ती पहाटेची वेळ होती, आणि तेथे लोकांना शिक्षण देऊ लागले, प्रमुख याजक व त्याचे मित्र सभास्थानात आले. त्यांनी यहूदी पुढाऱ्यांची सभा आणि सर्व वडीलजन, जे यहूदी लोकांचे नेते होते यांची एकत्र सभा बोलाविली. मग प्रेषितांना तेथे घेऊन येण्यासाठी काही जणांना तुरुंगात पाठविले.
22 जेव्हा शिपाई तुरुंगामध्ये त्यांना पाहावयास गेले, तेव्हा त्यांना आतमध्ये प्रेषित आढळले नाहीत. म्हणून त्यांनी परत जाऊन यहूदी पुढाऱ्यांना त्याविषयी सांगितले.
23 शिपाई म्हणाले, “तुरुंगाची दारे बंद केलेली व त्यांसा कुलुप लावलेले होते. तसेच पहारेकरीही दारावर पहारा देत आहेत. परंतु आम्ही जेव्हा दार उघडले, तेव्हा आतमध्ये कोणीच आढळले नाही!”
24 मंदिराच्या पहारेकऱ्यांच्या सरदाराने आणि प्रमुख याजकाने हे शब्द ऐकले. ते गोंधळात पडले, व यानंतर काय होईल याबद्दल बुचकळ्यात पडले.
25 नंतर कोणी एक आला आणि म्हणाला, “ज्या लोकांना तुम्ही तुरुंगात टाकले ते तर मंदिरात उभे राहून लोकांना शिक्षण देत आहेत!”
26 तेव्हा कप्तान व त्याचे लोक बाहेर गेले व प्रेषितांना पुन्हा घेऊन आले. त्यावेळी त्यांनी बळाचा वापर केला नाही, कारण त्यांना लोकांचे भय वाटले व असे वाटले की लोक कदाचित त्यांना दगडमार करतील.
27 त्यांनी प्रेषितांना आणून सभेपुढे उभे केले. प्रमुख याजकाने प्रेषितांना प्रश्न विचारले.
28 तो म्हणाला, “आम्ही तुम्हांला (येशू) या मनुष्याच्या नावाने शिक्षण देऊ नका म्हणून ताकीद दिली होती. आणि तरीही तुम्ही तुमच्या शिकवणुकीचा प्रसार सर्व यरुशलेमभर केलात. आणि या मनुष्याच्या (येशूच्या) मरणाचा दोष आमच्यावर ठेवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करीत आहात.”
29 पेत्र व इतर प्रेषितांनी उत्तर दिले, “आम्हांला देवाची आज्ञा पाळलीच पाहिजे, तुमची नाही!
30 तुम्ही येशूला मारले. तुम्ही त्याला वधस्तंभावर खिळले. परंतु त्याच देवाने, जो आमच्या वाडवडिलांचा (पूर्वजांचा) देव होता, त्याने येशूला मरणातून उठविले!
31 देवाने त्याला उठविले व आपल्या उजवीकडे बसाविले. देवाने येशूला राजपुत्र व उद्धारकर्ता म्हणून उजवीकडे बसविले. देवाने हे यासाठी केले की, यहूदी लोकांनी त्यांची ह्रदये व जीविते बदलावीत. ह्या गोष्टी घडताना आम्ही पाहिल्या.
32 पवित्र आत्मासुद्धा हे खरे आहे हे दर्शवितो. जे लोक देवाची आज्ञा पाळतात त्या सर्वांना त्याने पवित्र आत्मा दिलेला आहे.”
33 जेव्हा यहूदी सभेच्या पुढाऱ्यांनी हे शब्द ऐकले, तेव्हा ते खूप रागावले. त्यांनी प्रेषितांना जिवे मारण्यासंबधी विचार सुरु केला.
34 सभेमध्ये गमलीएल नावाचा एक परुशी उभा राहिला. नियमशास्त्राचा तो शिक्षक होता. आणि सर्व लोक त्याला मान देत असत, त्याने लोकांना सांगितले की, काही वेळासाठी प्रेषितांना बाहेर पाठवा.
35 नंतर तो त्यांना म्हणाला, “इस्राएलच्या लोकांनो, या लोकांना जे काही करण्याचा विचार तुम्ही करीत आहात त्याबद्दल सावधगिरी बाळगा.
36 काही काळापूर्वी थुदासचा जन्म झाला. आपण कोणी थोर असल्याचा दावा त्याने केला. सुमारे चारशे जण त्याला जाऊन मिळाले, पण त्याला ठार मारण्यात आले त्याचवेळी त्याचे अनुयायीही पांगले, ते काहीच करु शकले नाहीत.
37 नंतर, गालीलातून यहूदा नावाचा माणूस आला. ती वेळ जनगणनेची होती. त्यानेही काही अनुयायांचे नेतृत्व केले. त्यालासुद्धा मारण्यात आले. व त्याचे सर्व अनुयायी पांगले व पळून गेले.
38 म्हणून आता मी तुम्हांला सांगतो: या लोकांपासून दूर राहा. त्यांना एकटे सोडा. जर त्यांच्या योजना मनुष्यांच्या असतील तर ते अपयशी ठरतील.
39 पण जर हे देवापासून असतील तर तुम्ही त्यांना रोखू शकणार नाही. उलट तुम्ही देवाविरुद्ध लढत आहात असे होईल!”यहूदी लोकांनी गमलीएलचा सल्ला मानला.
40 त्यांनी पेषितांना पुन्हा बोलाविले, त्यांना फटके मारले. आणि येशूच्या नावाने पुन्हा त्यांनी काही बोलू नये असा आदेश दिला. आणि त्यांनी प्रेषितांना सोडून दिले.
41 प्रेषित सभा सोडून गेले. येशूच्या नावासाठी आपण निंदानालस्ती सहन करण्याच्या योग्यतेचे ठरलो यामुळे ते आंनदी झाले.
हा नवीन विश्वास रोखण्यासाठी यहूदी नेते कोणत्या सीमेपर्यंत गेले ते पहा. हे प्रारंभिक वादविवाद यरूशलेमात झाले, त्याच शहरात, जेथे काही आठवड्यांपूर्वीच त्यांनी येशूला जाहीरपणे मारले होते.
या ऐतिहासिक माहितीवरून आपण पऱ्यायांचे मूल्यमापन करून पुनरुत्थानाचे परीक्षण करू शकतो, काय अर्थ प्राप्त होतो ते पाहून तपासू शकतो.
येशूचे शरीर आणि थडगे
मृत ख्रिस्ताच्या थडग्याविषयी दोनच पर्याय अस्तित्वात आहेत. एकतर त्या ईस्टर रविवारी सकाळी थडगे रिकामे होते किंवा त्यात त्याचा मृतदेह आहे. इतर कोणतेही पर्याय नाहीत.
पुनरुत्थानास विरोध असलेल्या यहूदी नेत्यांनी संदेशास एखाद्या देहाद्वारे त्याचे खंडन केले नाही
थडगे जेथे येशूचा मृतदेह होता मंदिरापासून दूर नव्हते जेथे येशूचे शिष्य गर्दीत ओरडत होते की तो मेलेल्यातून उठला आहे. यहूदी नेत्यांना थडग्यात मृतदेह दाखवून त्यांच्या पुनरुत्थानाच्या संदेशास असत्य ठरविणे सोपे झाले असते. इतिहास दर्शवितो की पुनरुत्थानाचा संदेश (जो थडग्यात अजूनही शरीर आहे असे म्हणून सिद्ध केलेला नाही) स्वतः थडग्याजवळ सुरू झाला जिथे पुरावा प्रत्येकासाठी उपलब्ध होता. यहूदी नेत्यांनी मृतदेह दाखवून त्यांच्या संदेशाचे खंडन केले नाही कारण दाखविण्यासाठी थडग्यात शरीर नव्हते.
यरूशलेमेमध्ये पुनरुत्थानाच्या संदेशावर हजारो लोकांनी विश्वास केला
यावेळी यरूशलेमेमध्ये येशूच्या शारीरिक पुनरुत्थानावर विश्वास ठेवण्यासाठी हजारो लोकांनी तारण प्राप्त केले. जर आपण पेत्राचे व्याख्यान ऐकणाऱ्यापैकी एक असता, आणि असा विचार केला असता की, त्याचा संदेश खरा आहे काय, तर आपण किमान जेवणाची सुट्टी घेऊन थडग्याजवळ जाऊन तेथे मृतदेह आहे काय याचा शोध घेतला नसता काय? येशूचा मृतदेह थडग्यात असता तर कोणीही प्रेषितांच्या संदेशावर विश्वास ठेवला नसता. परंतु यरूशलेमापासून सुरूवात करून त्यांनी हजारो अनुयायी मिळविल्याची इतिहासाची नोंद आहे. यरूशलेमात त्याचे शरीर असतांना हे अशक्य झाले असते. येशूचे शरीर थडग्यात असते तर हास्यप्रद ठरले असते. ह्याला काही अर्थ नाही.
शिष्यांनी शरीर चोरून नेले का?
तर शरीरावर काय झाले? सर्वात गंभीर स्पष्टीकरण असे आहे की शिष्यांनी कबरेतूून शरीर चोरून नेले, ते कोठेतरी लपवले आणि त्यानंतर ते इतरांना दिशाभूल करण्यास सक्षम झाले.
असे समजा की त्यांनी हे यशस्वीरित्या केले आणि नंतर त्यांनी त्यांच्या फसवेगिरीवर आधारित धार्मिक श्रद्धा सुरू केली. पण प्रेषितांची कृत्ये आणि जोसेफस या दोहोंच्या वर्णनाकडे नजर टाकल्यास लक्षात येते की हा वाद होता “प्रेषित लोकांना शिक्षण देऊन, येशूच्या द्वारे मेलेल्यांतून पुन्हा उठणे आहे असे प्रसिद्धपणे सांगत होते.”
हाच विषय त्यांच्या लेखनात सर्वत्र आहे. दुसरा प्रेषित पौल ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे महत्त्व कसे देतो यावर लक्ष द्या :
3 कारण मलासुद्धा पहिल्यांदा जे मिळाले ते मी तुमच्या स्वाधीन केले: ते हे की ख्रिस्त आमच्या पापांसाठी मरण पावला, हे जे वचनात लिहिले आहे.
1 करिंथ15:3-19 इ.स. 57
4 व त्याला पुरण्यात आले. व तिसऱ्या दिवशी त्याला उठविण्यात आले.
5 व तो पेत्राला दिसला, नंतर बारा प्रेषितांना,
6 नंतर तो एकाच वेळी पाचशे हून अधिक बांधवांना दिसला. त्यांच्यापैकी बहुसंख्य अजूनही जिवंत आहेत, तर काही मेले आहेत.
7 नंतर तो याकोबाला दिसला, मग पुन्हा तो सर्व प्रेषितांना दिसला.
8 आणि शेवटी मी जो अवेळी जन्मलो, त्या मलासुद्धा तो दिसला.
9 कारण प्रेषितांमध्ये मी कनिष्ठ आहे, मी प्रेषित म्हणून घेण्याच्यासुद्धा योग्यतेचा नाही, कारण देवाच्या मंडळीचा मी छळ केला.
10 पण देवाच्या दयेने मी जो आहे तो मी (प्रेषित) आहे. आणि त्याची माझ्यावरची कृपा व्यर्थ गेली नाही, उलट त्या सर्वांपेक्षा अधिक काम मी केले आहे, करणारा मी नव्हतो, तर देवाची दया जी माझ्याबरोबर होती, ती करीत होती.
11 म्हणून, जरी मी तुम्हांला उपदेश केला किंवा त्यांनी उपदेश केला, तरी आम्ही सर्व हाच उपदेश करु, आणि तुम्ही यावरच विश्वास ठेवला.
12 पण जर आम्ही ख्रिस्त मेलेल्यांतून उठविला गेला आहे अशी सुवार्ता गाजवितो, तर मृतांचे पुनरुत्थान नाही असे तुमच्यातील काहीजण म्हणतात हे कसे?
13 जर मृतांचे पुनरुत्थान नाही, तर ख्रिस्त मरणातून उठविला गेला नाही,
14 आणि जर ख्रिस्त मरणातून उठविला गेला नाही तर आमचा संदेश व्यर्थ आहे आणि तुमचा विश्वासही व्यर्थ आहे.
15 आणि आम्हीसुद्धा देवाविषयीचे खोटे साक्षीदार ठरु कारण आम्ही देवासमोर शपथपूर्वक साक्ष दिली आहे की, ख्रिस्ताला मेलेल्यांतून त्याने उठविले, पण जसे ते म्हणतात त्याप्रमाणे जर देवाने ख्रिस्ताला उठविले नाही, तर मेलेले मरणातून उठविले जात नाहीत.
16 आणि जर मृतांना उठविले जात नाही, तर ख्रिस्ताला मरणातून उठविण्यात आले नाही.
17 आणि जर ख्रिस्त मरणातून उठविला गेला नाही, तर तुमचा विश्वास व्यर्थ आहे; तुम्ही अजूनसुद्धा पापातच आहात;
18 होय, आणि जे ख्रिस्तात मेलेले आहेत, त्यांचा नाश झाला आहे.
19 जर ख्रिस्तावर असलेली आमची आशा ही, फक्त या पृथ्वीवरील जीवनासाठीच असली, तर सर्व मनुष्यात आम्ही दयनीय असे आहोत.
30 आम्हीसुद्धा प्रत्येक घटकेला धोक्याला का तोंड देतो?
1 करिंथ15:30-32
31 बंधूजनहो, मी शपथपूर्वक सांगतो की, ख्रिस्त येशूमध्ये माझा तुमच्याविषयी अभिमान आहे, मी दररोज मरतो
32 इफिसात मी रानटी प्राण्याबरोबर लढलो, तर मी काय मिळविले? जर मेलेले उठविले जात नाहीत तर “आपण खाऊ पिऊ, कारण आपण उद्या मरुन जाऊ!”
जे खोटे आहे असे आपणास माहीत आहे त्यासाठी कोणी का मरेल?
स्पष्टपणे, शिष्यांनी ख्रिस्ताच्या पुनरुत्थानास त्यांच्या संदेशाच्या केन्द्रस्थानी ठेवले. हे खरोखर खोटे होते असे समजा – की या शिष्यांनी त्यांच्या संदेशातील प्रति–पुराव्यांनी त्यांचे असत्य उघडीस आणू नये म्हणून खरोखरच येशूचे शरीर चोरी केले होते. त्यानंतर त्यांनी जगाला यशस्वीरित्या मूर्ख बनविले असेल, परंतु जे ते स्वतः उपदेश करीत होते, लिहित होते आणि जबरदस्त उलथापालथ करतात ते खोटे आहे हे त्यांना स्वतःला माहीत असते. तरीही त्यांनी या मोहिमेसाठी त्यांचे जीवन (अक्षरशः) दिले. ते हे का करतील – जर त्यांना हे माहित होते की ते खोटे आहे?
लोक काही कारणास्तव आपला प्राण देतात कारण ज्या कारणास्तव ते लढा देतात त्या कारणावर त्यांचा विश्वास असतो किंवा कारण त्यांना त्या कारणापासून काही फायद्याची अपेक्षा असते. जर शिष्यांनी शरीर चोरले असते आणि ते लपवून ठेवले असते तर पुनरुत्थान खरे नाही हे सर्व लोकांना समजले नसते. त्यांच्या संदेशाचा प्रसार करण्यासाठी शिष्यांनी काय किंमत दिली हे त्यांच्या स्वतःच्या शब्दांमधून विचार करा. स्वतःस विचारा की जे खोटे आहे असे आपण जाणता त्यासाठी आपण अशी वैयक्तिक किंमत मोजाल का:
8 आम्हांवर चारी दिशांनी संकटे येतात, पण आम्ही अजून चिरडले गेलो नाही, गोंधळलेलो आहोत, पण निराश झालो नाही.
2 करिंथ 4:8-9
9 छळ झालेले असे आहोत पण टाकून दिलेले असे आम्ही नाही, खाली पडलेलो असलो तरी आमचा नाश झालेला नाही.
4 उलट सर्व प्रकारच्या परिस्थितीत आम्ही देवाचे सेवक होतो हे आम्ही दाखवून दिले. मग आम्हांला त्रास सोसावा लागो, नाहीतर अडचणी येवोत, छळ होवो नाहीतर वेदना होवोत. छळात, आणि दु:खात
2 करिंथ 6:4-5
5 फटके खाण्यात, तुंरुगवासात आणि दंग्यात, कठोर श्रमात, जागून काढलेल्या रात्रीत, भुकेले असताना,
24 पाच वेळेला यहूंद्याकडून मला एकोणचाळीस फटके बसले.
,2 करिंथ 11:24-27
25 तीन वेळा काठीने मारण्यात आले, एकदा मला दगडमार करण्यात आला, तीन वेळा माझे जहाज फुटले, खुल्या समुद्रात मी एक रात्र व एक दिवास घालविला.
26 मी सातत्याने फिरत होतो, नदीच्या प्रवासात धोका होता. लुटारुंकडून धोका होता. माझ्या स्वत:च्या देशबांधवांकडून धोका होता. विदेशी लोकांकडून, शहरांमध्ये धोका होता. डोंगराळ प्रदेशात धोका होता. समुद्रात धोका होता, खोठ्या बंधूंकडून धोका होता.
27 मी कष्ट केले आणि घाम गाळला, व पुष्कळ वेळा जागरण केले. मला भूक माहीत आहे. तहान माहीत आहे. पुष्कळ वेळा मी अन्नाशिवाय राहिलो, थंडीत व उघडा असा मी राहिलो
प्रेषितांचे अतूट धैर्य
जर आपण त्यांच्या आयुष्यभर अढळ वीरतेचा विचार केला तर त्यांनी स्वतःच्या संदेशावर मनापासून विश्वास ठेवला नाही ते आणखी अविश्वसनीय वाटते. परंतु जर त्यांनी त्यांवर विश्वास ठेवला असेल तर त्यांनी ख्रिस्ताचे शरीर चोरून व लपवून टाकले नाही. दारिद्र्य, मारहाण, कारावास, कठोर विरोध आणि शेवटी मृत्यूदंड (योहानास वगळता इतर सर्व प्रेषितांना शेवटी त्यांच्या संदेशाकरिता फाशी दिली गेली) या गोष्टींनी त्यांच्या हेतूंचा आढावा घेण्यासाठी दररोज संधी उपलब्ध करून दिल्या. परंतु येशूला जिवंत झालेले पाहिले आहे असा दावा करणाऱ्या प्रेषितांपैकी कोणीही आपले शब्द पुन्हा परत घेतले नाही. त्यांनी सर्व विरोधांस अतुलनीय धैऱ्याने तोंड दिले.
बागेतील थडगे: सुमारे 130 वर्षांपूर्वी ढिगाऱ्यातून उघडून काढलेली कबर येशूचे थडगे असणे शक्य आहे
शिष्यांचे अतूट धैर्य आणि वैमनस्यपूर्ण अधिका ऱ्यांचे मौन यामुळे वास्तविक इतिहासात येशू जिवंत झाला ही एक शक्तिशाली घटना ठरते. त्याच्या पुनरुत्थानावर आपण भरवसा ठेवू शकतो.