पुनरुत्थान प्रथम फळ: आपणासाठी जीवन

  • by

आपण हिंदू दिनदर्शिकेच्या शेवटच्या पौर्णिमेस होळी साजरी करतो. त्याच्या चान्द्र-सौर उत्पत्तीसह, होळी साधारणतः मार्च महिन्यात येते, वसंत ऋतूच्या आगमनाचा आनंदोत्सव म्हणून. अनेक जण होळी साजरी करीत असले तरीही, प्रथम फळाचे साम्य फार कमी लोकांच्या लक्षात येते, आणि नंतरचा उत्सव त्यातून म्हणजे प्रथम फळावरून साजरा केला जातो,  ईस्टर. हे उत्सव वसंत ऋतूत पौर्णिमेच्या दिवशी येतात मी बरेचदा एकाच वेळी येतात.

 होळीचा उत्सव

लोक वसंत ऋतूत, प्रेमाचा सण किंवा रंगोत्सवाचा आनंदोत्सव म्हणून होळी साजरी करतात. त्याचा सर्वात प्रमुख हेतू वसंत ऋतूच्या सुरूवातीस कापणीचा विधी म्हणून साजरा करणे होय. पारंपारिक साहित्यांनी वसंत ऋतूतील विपूल हंगामाचा उत्सव म्हणून होळीचा परिचय दिला आहे.

होळी वाईटावर चांगुलपणाचा विजयाचा उत्सव साजरा करते. होलिका दहनानंतर ( किंवा रंग वाली होळी, धुलेटी, धूलवंडी, किंवा फागवा),  होळी दुसर्या दिवशी सुरू असते.

एकमेकांना रंगांनी गंध घालून लोक होळी साजरी करतात. ते एकमेकांना भिजवण्यासाठी आणि रंगविण्यासाठी वॉटर गन आणि पाण्याने भरलेल्या फुग्यांचा वापर करतात. हे पाण्याच्या लढाईसारखे आहे, परंतु रंगीत पाण्याने. कोणीही वाजवी खेळात भाग घेऊ शकतात, मित्र किंवा परका, श्रीमंत किंवा गरीब, माणूस किंवा स्त्री, मुले किंवा वडील. रंगाची उधळपट्टी खुल्या रस्त्यावर, उद्याने, मंदिरे आणि इमारतींच्या बाहेर केली जाते. गटागटांनी लोक ठिकठिकाणी गात व नाचत ड्रम आणि वाद्ये वाजवत जातात. मित्र आणि शत्रू एकमेकांवर रंगीत पावडर टाकण्यासाठी एकत्र येतात, हसतात, गप्पा मारतात, नंतर होळीचे गोड पदार्थ, खाऊ आणि पेय वाटून खातात. पहाटे उशीरापर्यंत, प्रत्येक जण रंगांच्या कॅनव्हाससारखा दिसत असतो, म्हणूनच याला “रंगांचा उत्सव” असे नाव आहे.

होळीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या सामाजिक भूमिके उलटाव आहे. एक शौचालय सफाई कर्मचारी ब्राह्मण माणसाला रंग मारू शकतो आणि हा सर्व उत्सवाच्या भूमिकेचा भाग आहे. पालक आणि मुले, भावंड, शेजारी आणि भिन्न जातीचे लोक यांच्यामधील प्रेम आणि आदर यांची पारंपारिक अभिव्यक्ती या सर्व गोष्टी उलट केल्या जातात.

होळी पौराणिक कथा

होळीमागे अनेक पौराणिक कथा आहेत. होलिका दहनपासून पुढे चालू असलेल्या कथेत राजा हिरण्यकश्यपूच्या भविष्याविषयी सांगितलेले आहे, त्याला खास शक्तीं लाभल्या होत्या ज्यांनी त्याने प्रल्हादाला ठार मारण्याची योजना आखली होती. त्याला मारणे शक्य नव्हते: मनुष्य किंवा प्राणी, घराच्या आत किंवा घराबाहेर, दिवसा किंवा रात्री, प्रक्षेपणास्त्राद्वारे किंवा हातांनी तयार केलेल्या शस्त्रांनी, आणि जमीनवर, पाण्यात किंवा हवेत त्याला मारता येण्यासारखे नव्हते. प्रल्हादाला जाळून मारण्याचा होलिकाचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर संध्याकाळी (दिवस किंवा रात्र नाही) नरसिंहाच्या रूपात, अर्ध मानव आणि अर्ध सिंहाच्या म्हणजेू, नरसिंहाच्या रूपात (मनुष्य नाही किंवा प्राणी नाही), विष्णू हिरण्यकश्यपूला दारावर (घराच्या आत किंवा बाहेरही नाही) घेऊन गेला. त्याने त्याला आपल्या मांडीवर (जमीनीवर, पाण्यावर किंवा हवेत नाही) ठेवले आणि नंतर सिंहाची नखे घुसवून कापून टाकलेे (हाताने किंवा प्रक्षेपणास्त्रांनी नाही). या कथेत होळी वाईटावर चांगुलपणाचा विजय साजरा करते.

त्याचप्रमाणे, प्रथम फळ एक विजय साजरा करतो, परंतु एका दुष्ट राजावर नव्हे, तर स्वतः मृत्यूवर. शुभवर्तमानात स्पष्ट केले आहे की प्रथम फळ, ज्याला आता ईस्टर रविवार म्हणून ओळखले जाते, हे तुम्हाला व मला नवीन जीवन कसे देते हे स्पष्ट करते.

प्राचीन इब्री वेद उत्सव

आपण गेल्या आठवड्यात येशूच्या दैनिक घटना पाहिल्या. वल्हांडण सण म्हणजे पवित्र यहूदी सणाच्या दिवशी त्याला क्रूसावर खिळण्यात आले, आठवड्याच्या सातव्या दिवशी, शब्बाथ दिवशी त्याने मरणात विसावा घेतला. देवाने या पवित्र दिवसांची फार पूर्वी इब्री वेदांमध्ये स्थापना केली होती. त्या सूचना येथे वाचावयास मिळतात:

रमेश्वर मोशेला म्हणाला,
2 “इस्राएल लोकांना असे सांग. परमेश्वराने नेमलेल सण, पवित्र मेळे भरवण्यासाठी म्हणून तुम्ही जाहीर करावे; ते माझे नेमलेले पवित्र सण असे.
3 “सहा दिवस कामकाज करावे, परंतु सातवा दिवस, विसाव्याचा शब्बाथ दिवस व पवित्र मेळ्याचा दिवस होय; ह्या दिवशी तुम्ही कसलेही काम करु नये; तुमच्या सर्व घराघरात हा परमेश्वराचा शब्बाथ असावा.
4 “परमेश्वराने ठरविलेले सणाचे दिवस तुम्ही पवित्र मेळ्याचे दिवस म्हणून जाहीर करावे; ते हे,
5 पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी संध्याकाळापासून परमेश्वराचा वल्हांडण सण

आहेलेवीय 23:1-5

येशूला क्रूसावर खिळणे व येशूचा विसावा या दोन्ही गोष्टी 1500 वर्षांपूर्वी ठरलेल्या या अगदी दोन पवित्र सणांच्या दिवशी घडल्या हा कुतूहलाचा विषय नाही काय?

का? याचा अर्थ काय?

येशूचे क्रूसावर खिळले जाणे वल्हांडण सणाच्या दिवशी (6व्या दिवशी) झाले आणि त्याचा विसावा शब्बाथ दिवशी (7व्या दिवशी) झाला.

प्राचीन इब्री वेद उत्सवाची ही वेळ चालू आहे. वल्हांडण आणि शब्बाथानंतरचा उत्सव म्हणजे ‘प्रथम फळ’. इब्री वेदांनी त्यासाठी निर्देश दिले.

इब्री प्रथम फळाचा उत्सव

9 मग अहरोनाचे मुलगे त्याच्याकडे रक्त घेऊन गेले, तेव्हा त्याने आपले बोट त्यात बुडवून ते वेदीच्या शिंगांना लावले आणि ते वेदीच्या पायथ्याशी ओतले. 10 पापार्पणाची चरबी, गुरदे व काळजावरील पडदा ह्यांचा त्याने वेदीवर होम केला. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्याने हे केले. 11 मांस व कातडे त्याने छावणीबाहेर नेऊन अग्नीत जाळून टाकले.

लेवीय 23:9-11

14 तुम्ही आपल्या देवाला हे सर्व अर्पण आणाल, त्या दिवसापर्यंत नव्या पिकाची भाकर, किंवा हुरडा किंवा हिरव्या धान्याची भाकर खाऊ नये; तुम्ही जेथे कोठे राहाल तेथे तुमच्याकरिता हा नियम पिढ्यान्पिढ्या कायमचा चालू राहील.

लेवीय 23:14

वल्हांडणाच्या ‘शब्बाथ नंतरचा दिवस’ हा तिसरा पवित्र सण होता, पहिले फळ. दरवर्षी या दिवशी मुख्य याजक पवित्र मंदिरात प्रवेश करीत असे आणि परमेश्वराला पहिल्या वसंत ऋतूतील पीक अर्पण करीत असे. होळीप्रमाणेच, हिवाळ्यानंतर हे नवीन जीवनाच्या सुरूवातीचे चिन्ह होते, भरघोस पिकाची आशा करीत लोक समाधानाने जेवण करीत.

 हा अगदी शब्बाथानंतरचा दिवस होता जेव्हा येशूने मरणात विश्रांती घेतली, नवीन आठवड्याच्या रविवारी म्हणजेच निसान 16च्या दिवशी. नवीन जीवनाचे ‘पहिले फळ’ अर्पण म्हणून वाहण्यासाठी जेव्हा मुख्य याजक मंदिरात जाई तेव्हा जे काही घडत असे त्याविषयी शुभवर्तमानात लिहिलेले आहे.

येशू मेलेल्यांतून उठला

ठवड्याच्या पहिल्या दिवशी त्या स्त्रिया अगदी पहाटेस कबरेकडे आल्या, आणि त्यांनी स्वत: तयार केलेले मसाले आणले.
2 त्यांना दगड कबरेवरुन लोटलेला आढळला.
3 त्या आत गेल्या, परंतु त्यांना प्रभु येशूचे शरीर सापडले नाही.
4 यामुळे त्या अवाक्‌ झाल्या असतानाच, अचानक लखलखीत कपडे घातलेले दोन पुरुष त्यांच्या बाजूला उभे राहिले.
5 अतिशय भयभीत होऊन त्यांनी आपले चेहरे जमिनीकडे वळविले. ते दोन पुरुष त्यांना म्हणाले, “जो जिवंत आहे त्याचा शोध तुम्ही मेलेल्यांमध्ये का करता?
6 तो येथे नाही; तो उठला आहे! तो गलीलात असताना त्याने तुम्हांला काय सांगितले याची आठवण करा.
7 तो असे म्हणाला की, मनुष्याच्या पुत्राला धरुन पापी लोकांच्या हाती द्यावे, त्याला वधस्तंभावर खिळावे आणि तिसऱ्या दिवशी त्याने उठावे.
8 नंतर स्त्रियांना येशूच्या शब्दाची आठवण झाली.
9 त्या कबरेपासून परतल्या आणि त्यांनी या सर्व गोष्टींचे वर्तमान अकरा प्रेषितांना व इतर सर्वांना सांगितले.
10 त्या स्त्रिया मरीया मग्दालिया, योहान्न, आणि याकोबाची आई मरीया ह्या होत्या. त्या आणि इतर स्त्रियांसुद्धा ज्या त्यांच्याबरोबर होत्या, प्रेषितांना या गोष्टी सांगत होत्या.
11 पण प्रेषितांना त्यांचे सांगणे मूर्खपणाचे वाटले. आणि त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही.
12 पण पेत्र उठला आणि कबरेकडे पळाला. त्याने खाली वाकून पाहिले पण त्याला तागाच्या गुंडाळण्याच्या वस्त्राशिवाय काही आढळले नाही. जे घडले त्याविषयी तो स्वत:शीच आश्चर्य करीत दूर गेला.
13 त्याचा दिवशी त्याच्यातील दोघे शिष्य यरुशलेमापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या अम्माऊस नावाच्या गावाला चालले होते.
14 ते एकमेकांशी या घडलेल्या सर्व गोष्टीविषयी बोलत होते.
15 ते बोलत असताना आणि या गोष्टींची चर्चा करीत असताना येशू स्वत: आला आणि त्यांच्याबरोबर चालू लागला.
16 पण त्यांचे डोळे त्याला ओळखण्यापासून बंद करण्यात आले होते.
17 येशू त्यांना म्हणाला, “चालत असताना तुम्ही एकमेकांबरोबर बोलत आहात त्या गोष्टी कोणत्या आहेत?”चालता चालता ते थांबले. ते अतिशय दु:खी दिसले.
18 त्यांच्यातील एकजण ज्याचे नाव क्लयपा होते, तो त्याला म्हणला, “ह्या दिवसांमध्ये घडलेल्या गोष्टी माहीत नसलेले असे यरुशलेमात राहणारे तुम्ही एकटेच आहात काय?”
19 येशू त्यांना म्हणाला, “तुमच्या मते कोणत्या गोष्टी?” ते त्याला म्हणाले, “नासरेथकर येशूविषयीच्या सर्व गोष्टी. हाच तो मनुष्य जो आपल्या कृत्यांनी आणि शब्दांनी देवासमोर आणि मनुष्यांसमोर एक महान संदेष्टा झाला.
20 आणि आम्ही चर्चा करीत होतो की, कसे आमच्या प्रमुख याजकांनी आणि अधिकाऱ्यांनी त्याला मरणदंड भोगण्यासाठी स्वाधीन केले. आणि त्यांनी त्याला वधस्तंभी खिळले.
21 आम्ही अशी आशा केली होती की, तोच एक आहे जो इस्राएलाची मुक्तता करील. आणि या सगळ्याशिवाय हे सर्व घडून गेलेल्या गोष्टीला आज तीन दिवस झालेत.
22 आणि आमच्या परिवारातील काही स्त्रियांनी आम्हांला थश्च केले आहे: आज अगदी पहाटे त्या कबरेकडे गेल्या, परंतु त्यांना त्याचे शरीर सापडले नाही.
23 त्यांनी येऊन आम्हांला सांगितले की, त्यांना देवदूतांचा दृष्टात घडला आणि देवदूतांनी सांगितले की, तो जिवंत आहे.
24 तेव्हा आमच्यातील काही कबरेकडे गेले, आणि स्त्रियांनी जसे सांगितले होते, तसेच त्यांना आढळले, पण त्यांनी त्याला पाहिले नाही.”
25 मग येशू त्यांना म्हणाला, “संदेष्ट्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवण्यास तुम्ही अति मूर्ख आणि मंद आहात.
26 ख्रिस्तासाठी या सर्व गोष्टी सहन करणे आणि त्याच्या गौरवात जाणे आवश्यक नव्हते काय?”
27 आणि म्हणून त्याने मोशेपासून सुरुवात करुन आणि सर्व संदेष्ट्यापर्यंत सांगून, पवित्र शास्त्रात त्याच्याविषयी काय लिहिले आहे ते सर्व त्याने त्यांना स्पष्ट करुन सांगितले.
28 ज्या खेड्याकडे ते जात होते, त्याच्याजवळ ते आले आणि येशूने असा बहाणा केला की, जणू काय तो पुढे जाणार आहे.
29 परंतु जास्त आग्रह करुन ते म्हणाले, “आमच्या बरोबर राहा. कारण जवळजवळ संध्याकाळ झालीच आहे. आणि दिवसही जवळजवळ मावळला आहे.” मग तो त्यांच्याबरोबर राहावयास आत गेला.
30 जेव्हा तो त्यांच्याबोरबर जेवायला मेजासभोवती बसला, त्याने भाकर घेतली आणि उपकार मानले. नंतर त्याने ती मोडली व ती त्यांना तो देऊ लागला.
31 तेव्हा त्यांचे डोळे उघडले आणि त्यांनी त्याला ओळखले. पण तो त्यांच्यातून अदुश्य झाला.
32 मग ते एकमेकांना म्हणू लागले, “तो वाटेवर आपणाशी बोलत असताना व पवित्र शास्त्र आपल्याला स्पष्ट करुन सांगत असताना आपली अंत:करणे आतल्या आत उकळत नव्हती काय?”
33 मग ते लगेच उठले, व यरुशलेमेस परत गेले. तेव्हा त्यांना अकरा प्रेषित व त्यांच्याबरोबर असलेले इतर एकत्र जमलेले आढळले.
34 प्रेषित आणि इतरजण म्हणाले, “खरोखर प्रभु उठला आहे! आणि शिमोनाला दिसला आहे.”
35 नंतर त्या दोन शिष्यांनी वाटेत काय घडले ते त्याला सांगितले आणि तो भाकर मोडत असताना त्यांनी त्याला कसे ओळखले ते सांगितले.
36 ते या गोष्टी त्यांना सांगत असतानाच येशू त्यांच्यामध्ये उभा राहिला आणि त्यांस म्हणाला, “तुम्हांस शांति असो.”
37 ते दचकले आणि भयभीत झाले. त्यांना असे वाटले की, ते भूत पाहत आहेत.
38 तो त्यांना म्हणाला, “तुम्ही असे अस्वस्थ का झालात? तुमच्या मनात शंका का निर्माण झाल्या?
39 माझे हात व पाय पाहा. तुम्हाला मी दिसतो तोच मी आहे. मला स्पर्श करा आणि पाहा की, मला आहे तसे हाडमांस भुताला नसते.
40 असे बोलून त्याने त्यांस आपले हातपाय दाखवले. तरीही त्यांच्या आनंदामुळे त्यांना ते खरे वाटेना.
41 ते आश्चर्यचकित झाले तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “येथे तुमच्याजवळ खाण्यासाठी काय आहे?”
42 खरे त्यांनी त्याला भाजलेला माशाचा तुकडा दिला.
43 त्याने तो घेतला व त्यांच्यासमोर खाल्ला.
44 तो त्यांना म्हणाला, “ह्याच त्या गोष्टी ज्या मी तुम्हांबरोबर असताना सांगितल्या होत्या की, मोशेचे नियमशास्त्र, भविष्यवादी आणि स्तोत्रे ह्यात माझ्याविषयी जे सांगितले आहे ते सर्व पूर्ण झालेच पाहिजे.”
45 नंतर पवित्र शास्त्र समजण्यासाठी त्याने त्यांची मने उघडली.
46 मग तो त्यांना म्हणाला, “असे लिहिले आहे की, ख्रिस्ताने दु:ख भोगावे आणि मेलेल्यांतून तिसऱ्या दिवशी उठावे.
47 आणि यरुशलेमापासून सुरुवात करुन सर्व राष्ट्रांस माझ्या पित्याने जे वचन दिले आहे ते पाठवीन. पापक्षमेसाठी पश्चात्तापाची घोषणा करावी.
48 या गोष्टींचे तुम्ही साक्षी आहात.

लूक 24:1-48

येशूचा प्रथम फळांचा विजय

येशू “प्रथम फळाच्या” पवित्र दिवशी मृत्यूवर विजयी झाला, हे महत्कृत्य त्याच्या शत्रूंना आणि त्याच्या शिष्यांनाही अशक्य वाटले होते. ज्याप्रमाणे होळी वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करते, त्याचप्रमाणे येशूचा या दिवशी मिळविलेला विजय हा एक चांगला विजय होता.

54 जेव्हा हे विनाशी शरीर अविनाशीपण धारण करील व हे मर्त्य शरीर अमरत्व धारण करील, तेव्हा पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे होईल.“विजयात मरण गिळले गेले आहे.”यशया 25:8
55 “अरे मरणा तुझा विजय कोठे आहे? मरण, तुझी नांगी कोठे आहे?”
56 मरणाची नांगी पाप आहे आणि पापाचे सामर्थ्य नियमाशास्त्रापासून येते.

1 करिंथ 15:54-56

आम्ही भूमिकांत बदल करण्याद्वारे होळी साजरी करीत असतो, या ‘प्रथम फळांनी’ सर्वात मोठी भूमिका उलटी घडवून आणली. पूर्वी मृत्यूला मानवजातीवर पूर्ण सत्ता होती. आता येशूने मरणावर सत्ता मिळविली आहे. त्याने ती सत्ता उलटून पाडली. नरसिंहाला हिरण्यकश्यपूच्या शक्तिविरुद्ध जागा मिळाली, पापावाचून मरण्याद्वारे, येशूला वरकरणी अजेय अशा मृत्यूला पराभूत करण्यास वाव मिळाला.

तुमच्या माझ्यासाठी विजय

पण हा फक्त येशूसाठी विजय नव्हता. हा तुमच्यासाठी आणि माझ्यासाठीही विजय आहे, ज्याची प्रथम फळांच्या वेळेनुसार हमी दिलेली आहे. बायबल स्पष्ट करते:

20 परंतु आता प्रत्यक्षात ख्रिस्त मरणातून उठविला गेला आहे. जे मेलेले आहेत त्यांच्यातील तो प्रथम फळ आहे.
21 कारण ज्याअर्थी मनुष्याद्वारे मरण आले त्याप्रमणे मृतांचे पुनरुत्थानसुद्धा मनुष्याद्वारेच आले.
22 कारण जसे आदामाद्वारे सर्व मरण पावतात तसेच सर्वजण ख्रिस्ताद्वारे जिवंत केले जातील.
23 पण प्रत्येक जण त्याच्या क्रमानुसार, ख्रिस्त जो प्रथम फळ आहे, आणि मग ख्रिस्त येण्याच्या वेळी त्याचे असलेले,
24 मग शेवट येईल प्रत्येक अधिपती, प्रत्येक सत्ता, व प्रत्येक सामर्थ्य जेव्हा ख्रिस्त नाहीसे करील, तेव्हा ख्रिस्त देवपित्याला राज्य देईल.
25 कारण देवाने ख्रिस्ताचे शत्रू ख्रिस्ताच्या पायाखाली ठेवीपर्यंत ख्रिस्ताने राज्य केले पाहिजे.
26 शेवटचा शत्रू असल्यासारखा मृत्यूचा नाश केला पाहिजे.

1 करिंथ 15:20-26

येशूने प्रथम फळांच्या दिवशी मरणातून जिवंत झाला म्हणून आपण जाणू शकतो की तो आपल्याला मृत्यूपासून पुनरुत्थानामध्ये भाग घेण्यासाठी आमंत्रित करतो. जसे प्रथम फळ नवीन वसंत ऋतूच्या जीवनाचे अर्पण होते ज्यात नंतर मोठ्या हंगामाची अपेक्षा होती, त्याचप्रमाणे येशू ‘प्रथम फळांच्या’ दिवशी मरणातून उठल्याने ‘जे त्याचे आहेत’ त्या सर्वांसाठी नंतरच्या पुनरुत्थानाची अपेक्षा धरतो.

वसंताचे बीज

किंवा असा विचार करा. 1ल्या दिवशी येशूने स्वतःला ‘बीज’ म्हटले. जसे होळी वसंत ऋतूमध्ये बियांपासून नवीन जीवनाच्या अंकुरणाचा उत्सव साजरा करते, तसेच होळी येशूच्या नव्या जीवनाकडेही लक्ष वेधते, ‘बीज’ जे वसंत ऋतूमध्ये पुन्हा जिवंत झाले.

दुसरा मनू

बायबल मनूच्या संकल्पनेचा उपयोग करून येशूच्या पुनरुत्थानाचे स्पष्टीकरण करते. अगदी प्राचीन वेदांत, मनू सर्व मानवजातीचा पूर्वज होता. आपण सर्व त्याची मुले आहोत. पुराणांनी नंतर प्रत्येक कल्प किंवा युगासाठी (या कल्पात श्रद्धादेव मनु हे मन्वंतर आहे) एक नवीन मनूस समाविष्ट केले. इब्री वेद समजाविते की आदाम हा मनू होता, ज्याच्यापासून सर्व मानवजातीत मृत्यू पसरला कारण त्याच्याद्वारे तो त्याच्या मुलांस मिळाला.

पण येशू पुढचा मनू आहे. मृत्यूवर विजय मिळवून त्याने एका नवीन कल्पाचे उद्घाटन केले. त्याची मुले या नात्याने येशूप्रमाणे पुनरुत्थानाद्वारे आपण मृत्यूवरही विजयात सहभागी होऊ. तोे प्रथम पुनरुत्थित झाला आणि नंतर आमचे पुनरुत्थान होईल. तो आपल्याला नवीन जीवनातील त्याच्या पहिल्या फळांचे अनुसरण करण्याचे आमंत्रण देतो.

ईस्टर : त्या रविवारच्या पुनरुत्थानांचा उत्सव साजरा करणे

इस्टर आणि होळी हे दोन्ही रंगांनी साजरे केले जातात

आज, आपण अनेकदा येशूच्या पुनरुत्थानांस ईस्टर म्हणतो, आणि ईस्टरचा रविवार तो जिवंत झाल्याचा रविवार म्हणून साजरा करतो. अनेक जण नवीन जीवनाच्या प्रतिकांस रंगवून, जसे घर, ईस्टर साजरा करतात. जसे आपण रंगांनी होळी साजरी करतो, तसेच ईस्टरही साजरा केला जातो. जशी होळी नवीन सुरुवात साजरी करते, तसेच ईस्टर देखील करतो. ईस्टर साजरा करण्याची विशिष्ट पद्धत महत्वाची नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रथम फळांची पूर्तता म्हणून येशूचे पुनरुत्थान आणि त्याचे फायदे प्राप्त करणे महत्वाचे आहे.

आपण आठवड्याच्या समयरेखेत हे पाहतो :

 येशू प्रथम फळांच्या दिवशी मरणातून उठतो – तुम्हाला व मला देऊ केलेले मृत्यूपासून नवीन जीवन.

उत्तम शुक्रवारचेउत्तर दिले

हे ‘उत्तम शुक्रवार’ ‘चांगला’ का आहे या आमच्या प्रश्नाचे उत्तर देते.

9 देवाच्या कृपेने प्रत्येकाकरता मरणाचा अनुभव घ्यावा म्हणून ज्याला ‘देवदूतांपेक्षा काही काळापुरते कमी केले होते,’ तो येशू मरण सोसल्यामुळे ‘गौरव व थोरवी ह्यांनी मुकुटमंडित केलेला’ असा आपण पाहतो.

इब्री 2:9

जेव्हा येशूने ‘मृत्यूची चव घेतली’, तेव्हा त्याने तुमच्यासाठी, माझ्यासाठी आणि ‘प्रत्येकासाठी’ असे केले. उत्तम शुक्रवार हा ‘चांगला’ आहे कारण तो आमच्यासाठी चांगला होता.

येशूच्या पुनरुत्थानावर विचार

येशूने त्याचे पुनरुत्थान सिद्ध करण्यासाठी, अनेक दिवस स्वतःला मृत्यूपासून जिवंत असल्याचे दाखविले, जे येथे लिहिलेले आहे. परंतु त्याच्या शिष्यांना त्याचे प्रथम दर्शन:

त्यांना वायफळ बडबड वाटली

लूक 24:10

येशूला असे करावे लागले :

27 आणि म्हणून त्याने मोशेपासून सुरुवात करुन आणि सर्व संदेष्ट्यापर्यंत सांगून, पवित्र शास्त्रात त्याच्याविषयी काय लिहिले आहे ते सर्व त्याने त्यांना स्पष्ट करुन सांगितले.

लूक 24:27

नंतर पुन्हा आणखी:

44 तो त्यांना म्हणाला, “ह्याच त्या गोष्टी ज्या मी तुम्हांबरोबर असताना सांगितल्या होत्या की, मोशेचे नियमशास्त्र, भविष्यवादी आणि स्तोत्रे ह्यात माझ्याविषयी जे सांगितले आहे ते सर्व पूर्ण झालेच पाहिजे.”

लूक 24:44

आपल्याला खरोखर सार्वकालिक जीवन देण्याची देवाची योजना आहे हे आपण कसे सांगू शकतो? फक्त देवालाच भविष्य माहित आहे. ऋषीमुनींनी शेकडो वर्षांपूर्वी चिन्हे व भविष्यवाण्या लिहिल्यात, जेणेकरून येशूने ते पूर्ण केले की नाही हे आम्ही सत्यापित करू शकतो…

4 हे मी यासाठी लिहित आहे की, जे काही तुम्हांला शिकविण्यात आले ते खरे आहे, हे तुम्हांला समजावे.

लूक 1:4

येशूचा मृत्यू आणि पुनरुत्थान याबद्दल माहिती व्हावी म्हणून आपण शोधू या :

  1. इब्री वेद उत्पत्तिपासून नृत्य म्हणून दुःख सप्ताह दर्शवित आहेत
  2. पुनरुत्थानाचा पुरावा ऐतिहासिक दृष्टीकोनातून.
  3. पुनरुत्थान जीवनाची ही भेट कशी मिळवायची.
  4. भक्तीमार्फत येशूला समजून घ्या
  5. रामायणाच्या भिंगातून शुभवर्तमान.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *