Skip to content

देवाचे विश्वव्यापी नृत्य – उत्पत्ती ते क्रूसापर्यंत लय

  • by

नृत्य म्हणजे काय? नाटकी नृत्यात तालबद्ध हालचालींचा समावेश असतो, जे प्रेक्षकांनी पाहावयाचे असते आणि त्यात एक कथा सांगितली जाते. नर्तक त्यांच्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांचा वापर करून, इतर नर्तकांशी त्यांच्या हालचालींचे समन्वय साधतात, जेणेकरून त्यांच्या हालचालींनी दृश्य सौंदर्य निर्माण केले जाते आणि पुनरावृत्तीच्या वेळेत लय वाढविला जातो ज्यास, मीटर म्हणतात.

नृत्यावरील उत्कृष्ट रचना नाट्यशास्त्र शिकवते की करमणूक हा फक्त नृत्याचा परिणाम असावा परंतु त्याचे प्राथमिक ध्येय नाही. संगीत आणि नृत्य करण्याचे ध्येय म्हणजे रस म्हणजे प्रेक्षकांना सखोल वास्तवात घेऊन जाणे, जिथे विस्मित होऊन ते आत्मिक आणि नैतिक प्रश्नांवर विचार करतात.

शिवाच्या तांडवाचा नटराज

शिवाचाउजवापायराक्षसासतुडवतांना

तर दिव्य नृत्य कसे दिसते? तांडव (तांडवम, तांडव नाट्यम किंवा नदांता) हा देवतांच्या नृत्याशी संबंधित आहे. आनंद तांडव आनंदाचे नृत्य करतो तर रुद्र तांडव रागाचे नृत्य करतो. नटराज दैवी नृत्याचे प्रतिनिधित्व करतात, ज्यात शिवास नृत्याचे दैवत म्हणून दाखविले जाते, त्याच्या परिचित मुद्रामध्ये (हात पाय यांची स्थिती). त्याचा उजवा पाय अपस्मार किंवा मुयालका या राक्षसाला पायदळी तुडवित आहे. तथापि, बोट जमिनीवर उंच उठलेल्या डाव्या पायाकडे इशारा करते.

शिवनृत्याची शास्त्रीय नटराजाची प्रतिमा

तो याकडे इशारा का करतो?

कारण तो उंचावलेला पाय, गुरुत्वाकर्षणाचा प्रतिकार करणे मुक्तीचे, मोक्षाचे प्रतीक आहे. जसे उन्माई उलाखम  स्पष्ट करते:

उत्पत्ती ड्रमपासून उद्भवते; आशेच्या हातातून संरक्षण पुढे येते; अग्निपासून नाश येतो ज्याच्यावर रोपण केलेल्या पायातून मुयलाहान वाईटाचा नाश करण्यास पुढे सरकतो; उंचावर ठेवलेला पाय मुक्ती देतो…”

कृष्ण राक्षससर्प कालियाच्या डोक्यावर नाचतो

कालिया सर्पावर कृष्ण नाचत आहे

दुसरे कलात्मक दिव्य नृत्य म्हणजे कृष्णाचे कालियावरील नृत्य. पौराणिक कथेनुसार, कालिया यमुना नदीत राहात होते आणि लोकांस घाबरवून सोडीत असे आणि त्याने आपले विष देशभर पसरविले होते.

कृष्णाने कालिया नदीत उडी घेऊन त्याला पकडले. तेव्हा कालिया कृष्णाला डसला, त्याने कृष्णाला आपल्या विळखात गुंडाळले, प्रेक्षक चिंतातुर झाले होते. कृष्णाने असे होऊ दिले, पण लोकांची चिंता पाहून त्यांना धीर देण्याचे ठरवले. अशाप्रकारे, कृष्णाने सर्पाच्या फणावर उडी मारली आणि त्याचे “अराभती” म्हटले जाणारे प्रसिद्ध नृत्य सुरू केले, जे प्रभूची लीला (दैवी नाटक) चे प्रतीक आहे. तालामध्ये, कृष्णाने कालियाच्या प्रत्येक उठत्या फणावर नृत्य करीत त्याला पराभूत केले.

क्रूस सर्पाच्या डोक्यावर तालबद्ध नृत्य

शुभवर्तमान घोषित करते की येशूला क्रूसावर खिळणे आणि पुनरुत्थान हे देखील सर्पाचा पराभव करणारे त्याचे नृत्य होते. हे आनंद तांडव आणि रुद्र तांडव दोन्ही होते, या नृत्याने परमेश्वराच्या मनात आनंद आणि संताप दोन्हींचा उदय झाला. आपण हे मानव इतिहासाच्या सुरुवातीस पाहतो, जेव्हा आदाम, पहिला मनु सर्पाला बळी पडला. देवाने (तपशील येथे) सर्पास म्हटले होते

15 तू व स्त्री, यांस मी एकमेकांचे शत्रु करीन. तुझी संतती आणि तिची संतती एकमेकाचे शत्रू होतील तिच्या संततीच्या पायाची तू टाच फोडशील पण तो तुझे डोके

ठेचीलउत्पत्ति 3:15
स्त्रीचे बीज सर्पाचे डोके ठेचील

म्हणून या नाटकात सर्प आणि स्त्रीचे बीज किंवा संतती यांच्यामधील संघर्षाचे भाकीत केले गेले. हे बीज येशू होता आणि त्यांचा संघर्ष क्रूसावर कळसास पाहोचला. जसे कृष्णाने कालियाला त्याच्यावर वार करण्याची परवानगी दिली होती, त्याचप्रमाणे शेवटच्या विजयाचा विश्वास बाळगून येशूने सर्पाला त्याच्यावर वार करण्याची परवानगी दिली. ज्याप्रमाणे शिवाने मोक्षाकडे लक्ष वेधत अपस्माराला पायदळी तुडविले, त्याचप्रमाणे येशूने सर्पाला पायदळी तुडवून जीवनाचा मार्ग तयार केला. बायबलमध्ये त्याचा विजय आणि जीवनाच्या आपल्या मार्गाचे असे वर्णन केले आहे :

13 कारण ज्या गोष्टी तुम्ही वाचता किंवा मान्य करता, त्याशिवाय दुसऱ्या गोष्टी आम्ही तुम्हांस लिहित नाही. आणि शेवटपर्यंत तुम्ही नीट जाणून घ्याल अशी आशा धरतो.

14 आणि त्याप्रमाणे तुम्ही आम्हांस काही अंशी जाणता की प्रभु येशूच्या दिवशी जसे आम्ही तुमच्याविषयी अभिमान बाळगतो तसे तुम्हीही आमच्याविषयी अभिमान बाळगता.

15 मला याविषयीची खात्री असल्याने तुम्हांला पहिल्याने भेटण्याची योजना केली, यासाठी की तुम्हांला फायदा व्हावा.

कलस्सै 2:13-15

उत्पत्तीच्या माध्यमातून येशूच्या शेवटच्या आठवड्यात दिसून आलेल्या ‘सात’ आणि ‘तीन’ च्या तालबद्ध नृत्यात त्यांचा संघर्ष प्रकट झाला.

देवाचे पूर्वज्ञान ज्ञान इब्री वेदांच्या आरंभापासून प्रकट झाले

सर्व पवित्र पुस्तकांपैकी (संस्कृत आणि इब्री वेद, शुभवर्तमान) केवळ दोन आठवडे आहेत ज्यात आठवड्यातील प्रत्येक दिवसाच्या घटना सांगितलेल्या आहेत. इब्री वेदांच्या सुरूवातीस नोंदवलेल्या अशा पहिल्या आठवड्यात, देवाने सर्व काही कसे घडविले याची नोंद आहे.

दररोजच्या घटनांसह नोंदलेला दुसरा आठवडा म्हणजे येशूचा शेवटचा आठवडा. दुसÚया कोणत्याही साधू, ऋषी, किंवा संदेष्ट्याच्या एका पूर्ण आठवड्यात दररोजच्या क्रियाकलापांचे वर्णन केलेले नाही. इब्री वेदातील उत्पत्तीचे वर्णन येथे दिले गेले आहे. आम्ही गेल्या आठवड्यात येशूच्या रोजच्या घटना पाहिल्या  आणि ही सारणी या दोन आठवड्यांतील प्रत्येक दिवसास आजूबाजूला मांडते. शुभ संख्या ‘सात’, जी आठवडा घडविते, अशाप्रकारे बेस मीटर किंवा वेळ आहे ज्यावर निर्मात्याने त्याची लय आधारित केली आहे.

आठवड्याचे दिवसउत्पत्तीचा आठवडायेशूचा शेवटचा आठवडा
दिवस 1सर्वत्र अंधार वेढलेला असतांना देव म्हणतो, प्रकाश होवो आणि अंधारात प्रकाश झालायेशू म्हणतो, “मी जगात प्रकाश म्हणून आलो आहे…” अंधारात प्रकाश आहे
दिवस 2देव पृथ्वीला स्वर्गातून वेगळे करतोयेशू प्रार्थनेचे ठिकाण म्हणून मंदिर शुद्ध करून जे पृथ्वीचे त्यास जे स्वर्गाचे त्यापासून वेगळे करतो
दिवस 3देव बोलतो म्हणून जमीन समुद्रातून बाहेर येते.येशू डोंगर उपटून समुद्रात टाकणाऱ्या विश्वासाविषयी बोलतो.
 देव पुन्हा बोलतो, जमीन वनस्पती उपजवो  आणि वनस्पती अंकुरित होते.येशू शापाचे उच्चारण करतो आणि झाड सुकते.
दिवस 4देव बोलतो, आकाशाचे ज्योती उदय होऊ दे  आणि सूर्य, चंद्र आणि तारे प्रकट होतात व आकाशास प्रकाशित करतात.येशू त्याच्या परत येण्याच्या चिन्हाविषयी बोलतो – सूर्य, चंद्र आणि तारे अंधकारमय होतील.
दिवस 5देव उडणारे प्राणी उत्पन्न करतो, ज्यात डायनासोर सरपटणारे प्राणी किंवा अजगर.सैतान, मोठा अजगर, ख्रिस्तावर वार करण्यास प्रवृत्त होतो
दिवस 6उडणारे प्राणी तयार करतो.वल्हांडणाच्या कोकरांची मंदिरात कत्तल केली जाते.
 देव बोलतो आणि भूमीवरील प्राणी सजीव होतात. “मग येशूने मोठ्याने आरोळी मारून प्राण सोडला.” (मार्क 15:37)
 परमेश्वर देवाने आदामाच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला. आदाम श्वास घेऊ लागला.येशू मुक्तपणे बागेत प्रवेश करतो
 देव आदामाला बागेत ठेवतोयेशूला झाडाला खिळले जाते आणि तो शापित ठरतो (गलती 3:13) आपल्याबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडवले; “जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे” असा शास्त्रलेख आहे;
 आदामाला चेतावणी देण्यात येते की त्याने जीवनाच्या वृक्षापासून दूर राहावे, अन्यथा त्याच्यावर शाप येईल.वल्हांडण सणाच्या यज्ञपशूंचे बलिदान पुरेसे नव्हते. एका व्यक्तीची गरज होती. (इब्री 10:4-5) कारण बैलांचे बकर्यांचे रक्त पापे दूर करण्यास असमर्थ आहे. म्हणून तो जगात येतेवेळेस म्हणाला, “यज्ञ अन्नार्पणे ह्यांची तुला इच्छा नव्हती, तू माझ्यासाठी शरीर तयार केलेस;    
 आदामस योग्य असा कोणताही प्राणी आढळला नाही. आणखी एक व्यक्ती आवश्यक होती.येशू मृत्यूच्या झोपेत प्रवेश करतो
 देव आदामाला गाढ झोप देतो  येशूच्या कुशीत जखम करण्यात आली. त्याच्या बलिदानातून येशू त्याच्या वधूस जिंकतो, जे त्याचे आहेत. (प्रकटीकरण 21:9) नंतर शेवटल्या ‘सात पीडांनी’ भरलेल्या सात वाट्या ज्यांनी हाती घेतल्या होत्या अशा सात देवदूतांपैकी एक देवदूत येऊन माझ्याबरोबर बोलला; तो म्हणाला, “ये, नवरी म्हणजे कोकर्‍याची स्त्री मी तुला दाखवतो.”
दिवस 7देव आदामाची बाजू जखमी करतो ज्याने तो आदामाची वधू घडवितो.येशू मृत्यूमध्ये विसावा घेतो
उत्पत्तीच्या आठवड्यासोबत लयबद्ध येशूचा शेवटचा आठवडा

आदामाचा दिवस 6 येशूबरोबर नृत्य

या दोन आठवड्यांच्या प्रत्येक दिवसाच्या घटना लयबद्ध सममिती देऊन एकमेकांशी जुळतात. या 7-दिवसांच्या चक्रांच्या शेवटी, नवीन जीवनाची प्रथम फळे फुटण्यास तयार होतात आणि नवीन सृष्टीचीवाढ करतात. तर, आदाम आणि येशू एकत्र नाचत आहेत, एकत्रित नाटक करीत आहेत.

बायबल आदामाबद्दल असे म्हणते की

…आदाम तर जो येणार होता त्याचे प्रतिरूप आहे.

रोम 5:14

आणि

21 कारण ज्याअर्थी मनुष्याद्वारे मरण आले त्याप्रमणे मृतांचे पुनरुत्थानसुद्धा मनुष्याद्वारेच आले.
22 कारण जसे आदामाद्वारे सर्व मरण पावतात तसेच सर्वजण ख्रिस्ताद्वारे जिवंत केले जातील

.1 करिंथ 15:21-22

या दोन आठवड्यांची तुलना करून आपण पाहतो की आदामाने येशूसोबत एका नमून्याचे नाट्य मांडून रास केला. जगाची निर्मिती करण्यासाठी देवाला सहा दिवसांची गरज होती का? तो एकाच आज्ञेने सर्व काही बनवू शकत नव्हता? मग त्याने आपल्या अनुक्रमाने का निर्मिती केली? देव थकत नसतो तर मग सातव्या दिवशी त्याने विश्रांती का घेतली? त्याने सर्व काही वेळेनुसार आणि क्रमाने केले यासाठी की त्याने येशूच्या शेवटच्या आठवड्याची उत्पत्तीच्या आठवड्यात अपेक्षा करण्यात आली होती.

हे विशेषतः सहाव्या दिवसाविषयी खरे आहे. आम्ही वापरलेल्या शब्दांमध्ये थेट सममिती पाहतो. उदाहरणार्थ, ‘येशू मरण पावला’ असे म्हणण्याऐवजी शुभवर्तमान म्हणते की त्याने ‘प्राण सोडला’, आदामाच्या थेट विपरीत नमूना, जो ‘जीवधारी प्राणी’ झाला. काळाच्या सुरुवातीपासूनचा हा नमूना वेळ आणि जग यांचे पूर्वज्ञान दर्शवितो. थोडक्यात, हे दैवीय नृत्य आहे.

‘तीन’ च्या वृत्तामध्ये नाचत आहे

तीन ही संख्या शुभ मानली जाते कारण त्रियाद्वारे रत्म प्रकट होते, लयबद्ध क्रम आणि नियमितपणा जी स्वतः सृष्टीचे रक्षण करते. रत्म हे संपूर्ण सृष्टीला व्यापणारे अंतर्निहित कंपन आहे. म्हणूनच, तो वेळ आणि प्रसंगांची क्रमवार प्रगती म्हणून स्वतःस अनेकप्रकारे प्रकट करतो.

तेव्हा ही आश्चर्यकारक गोष्ट नाही की सृष्टीच्या पहिल्या तीन दिवसांमध्ये आणि येशूच्या मृत्यूच्या तीन दिवसांच्या दरम्यान तोच वेळ आढळतो. ही सारणी या पद्धतीवर प्रकाश टाकते.

 उत्पत्तिचा आठवडायेशूचे मरणांतील दिवस
दिवस 1 आणि उत्तम शुक्रवारदिवस अंधारात सुरू होतो. देव म्हणतो, प्रकाश होवोआणि अंधारात प्रकाश झाला.दिवसाची सुरुवात अंधाराने वेढलेल्या प्रकाशाने (येशू) होते. त्याच्या मृत्यूने प्रकाश विझला आहे आणि ग्रहणात जग अंधकारमय होते.
दिवस 2 आणि शब्बाथचा विसावादिवसाची सुरुवात अंधाराने वेढलेल्या प्रकाशाने (येशू) होते. त्याच्या मृत्यूने प्रकाश विझला आहे आणि ग्रहणात जग अंधकारमय होते.त्याचे शरीर विश्रांती घेत असतांना, येशूचा आत्मा पृथ्वीच्या आतील मृत बंदिवानांस सोडवून वर स्वर्गात नेतो.
दिवस 3 आणि पुनरुत्थानाची प्रथम फळेदेव बोलतो, बीज देणारी वनस्पतिउपजवो आणि वनस्पती जीवन अंकुरित होते.मेलेले बियाणे नवीन जीवनास अंकुरित करते, जे ग्रहण करतील त्या अशा सर्वांसाठी उपलब्ध आहे.
ज्याप्रकारे नर्तक आपले शरीर वेगवेगळ्या वेळेच्या चक्रात हलवतात, त्याचप्रकारे परमेश्वर मुख्य वृत्तामध्ये (सात दिवसांनी) आणि लहान वृत्तामध्ये (तीन दिवसात) नृत्य करतो तशीच देव मोठ्या मीटरमध्ये  आणि एक लहान मीटरमध्ये नाचतो.

त्यानंतरच्या मुद्रा

येशूच्या आगमनाचे वर्णन करणाऱ्या विशिष्ट घटना आणि सण याची इब्री वेदांनी नोंद केली आहे. देवाने हे दिले म्हणून आम्हाला कळले की हे देवाचे नाटक आहे, माणसाचे नाही. येशूच्या जगण्यापूर्वी शेकडो वर्षांआधी नोंदविलेल्या या महान चिन्हेच्या दुव्यांसह खाली दिलेली सारणी काहींचा सारांश मांडते.

इब्री वेदहे येशूच्या आगमनावर कसा प्रकाश टाकते
आदामाचे चिन्हदेवाने सर्पाचा सामना केला आणि सर्पाचे डोके चिरडण्यासाठी बीज येईल अशी घोषणा केली.
नोहा मोठ्या जलप्रलयातून बचावतोयेशूच्या येणाऱ्या बलिदानाकडे लक्ष वेधणारे बलिदान दिले जातात.
अब्राहामाच्या बलिदानाची खूणअब्राहामाच्या बलिदानाचे स्थान त्याच डोंगरावर होते जेथे हजारो वर्षांनंतर येशूला बलिदान करण्यात येणार होते. शेवटच्या क्षणी कोकराने ऐवजदाराची जागा घेतली म्हणून मुलगा जगला, आपण जिवंत राहावे म्हणून येशू  ‘देवाचा कोकरा’ स्वतःचे बलिदान कसे देईल हे दर्शवितो.
वल्हांडण सणाचे चिन्हएका विशिष्ट दिवशी कोकर्ांचे अर्पण करावयाचे होते – वल्हांडण सण. ज्यांनी आज्ञा पाळली ते मृत्यूपासून वाचले, पण ज्यांनी आज्ञा मोडली त्यांचा मृत्यू झाला. शेकडो वर्षांनंतर अगदी याच दिवशी येशूचे बलिदान देण्यात आले – वल्हांडण सणाच्या दिवशी,
याॅम किप्पूरबळीच्या बकर्याचे बलिदान देणारा वार्षिक उत्सव – येशूच्या बलिदानास सूचित करणे
 ‘राज’ प्रमाणे: ‘ख्रिस्त’ म्हणजे काय?त्याच्या येण्याच्या अभिवचनाने ‘ख्रिस्त’ या उपाधीचे उद्घाटन झाले
जसे कुरुक्षेत्राच्या युद्धात ‘ख्रिस्त’ लढाईसाठी सज्ज होऊन राजा दावीदापासून येणार होता
शाखेचे चिन्ह ‘ख्रिस्त’ मृत बुंधापासून शाखेसमान अंकुरित होणार होता
येणाऱ्या शाखेचे नावया अंकुरणाऱ्या ‘शाखेचे’ नाव त्याच्या जगण्यापूर्वी 500 वर्षांपूर्वी देण्यात आले होते.
सर्वांसाठी दुःख सोसणारा सेवकही व्यक्ती सर्व मानवजातीची सेवा कशी करते याचे वर्णन करणारी देववाणी किंवा भविष्यवाणी
पवित्र सातमध्ये येणेतो कधी येईल हे सांगणारी भविष्यवाणी, सातच्या चक्रात दिलेली.
जन्माचे भाकित करण्यात आलेत्याचा कुमारिकेद्वारे जन्म आणि जन्मस्थान त्याच्या जन्माच्या खूप आधी प्रकट झाले
नृत्यातील मुद्रेसारखे येशूकडे संकेत करणारे सण आणि भविष्यवाण्या

नृत्यात, पाय आणि धड यांच्या मुख्य हालचाली आहेत, परंतु हात आणि बोटे देखील या हालचालींवर भर देण्यासाठी लावण्यपूर्णरित्या वापरली जातात. आपण या हातांच्या आणि बोटांच्या स्थितीस मुद्रा असे म्हणतो. हे प्रवचन आणि उत्सव दैवी नृत्याच्या मुद्रेसारखे असतात. कलात्मक दृष्ट्या, ते येशूच्या व्यक्तित्वाच्या आणि कार्याच्या तपशिलाकडे निर्देश करतात. नाट्य शास्त्रात नृत्याविषयी सांगितल्याप्रमाणे, देव आपल्याला मनोरंजनाच्या पलीकडे रसाप्रत लयबद्धतेने आमंत्रित करण्यासाठी पुढे वाढला आहे.

आमचे आमंत्रण

देव आपल्याला त्याच्या नृत्यात सामील होण्यासाठी आमंत्रित करतो. आपण आपला प्रतिसाद भक्तीच्या दृष्टीने समजू शकतो.

राम आणि सीता यांच्यातील गंभीर प्रेमाप्रमाणे त्याच्या प्रेमात प्रवेश करण्यासाठी तो आम्हाला आमंत्रित करतो.

येशूने देऊ केलेल्या सार्वकालिक जीवनाची भेट कशी मिळवायची ते येथे समजू या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *