ज्योतिषशास्त्राचा इतिहास आपल्या प्राचिन उत्पत्तीकडे परत नेऊन आधुनिक कुंडली कशी अस्तित्वात आली याचा आम्ही शोध घेतला. आता आम्ही राशीचक्रातील पहीली रास कन्या राशी हीचा शोध घेतो. कन्या नक्षत्राला कन्या म्हणून देखील ओळखले जाते, जेव्हा आपण ताऱ्यांच्या नक्षत्राला पाहतो तेव्हाच आपल्याला एक विरोधाभास पाहावयास मिळतो.
कन्या राशी / कन्या हा एक तरुण कुमारिकेचे ताऱ्यांनी तयार झालेले एक नक्षत्र आहे. येथे कन्या राशीला तयार करणाऱ्या तार्यांचे चित्र आहे. लक्षात घ्या की ताऱ्यांमध्ये कन्या राशीला ( कुमारी स्त्री) ‘पाहणे’ अशक्य आहे. तारे स्वतःच नैसर्गिकरित्या त्या महिलेची प्रतिमा तयार करीत नाहीत.
जरी आपण या विकिपीडियामधील प्रतिमेप्रमाणे कन्या नक्षत्रातील तारे एक ओळीने जोडले , तरी या ताऱ्यांमध्ये असलेल्या स्त्रीला ‘पाहणे’ कठीण आहे, कुमारी स्त्रीला सोडून द्या.
परंतु जेव्हा पासून याची नोंद घेतली गेलेली आहे तेव्हापासून हे चिन्ह होते. कन्या राशी पुष्कळदा संपूर्ण तपशीलाने दर्शविली जाते, परंतु त्याची तपशील नक्षत्रातूनच येत नाही.
चित्रा तारा कन्या राशीतील रहस्य सखोल बनवितो
खालील चित्र, इ.स. पू. १ मधील, १२ राशी समाविष्ट असलेले, इजिप्त येथील देंडेरा मंदिरातील राशिचक्राला दर्शविते . कन्या राशी लाल रंगात वर्तुळ केलेली आहे, तर उजवीकडील रेखाटन राशिचक्रातील प्रतिमा अधिक स्पष्टपणे दर्शवितो. कन्या राशीतील स्त्रीने धान्याचे बी धरलेले आपण पाहतो. हे धान्य चित्रा नक्षत्र आहे, जो कन्या नक्षत्रातील सर्वात चमकदार तारा आहे.
रेषांनी जोडलेल्या कन्या राशीतील ताऱ्यांसह, रात्रीच्या समयाचे आकाशातील चित्रामधील चित्रा नक्षत्र
वेदिक राशीफलामध्ये चित्रा ताऱ्याचा विशेष दर्जा आहे. नक्षत्र (ज्योतिर्मय. “तारे”) किंवा चंद्राच्या वाड्या हे चंद्र स्थानकांचे भारतीय रूप आहेत. त्यांची सहसा संख्या २७ असते परंतु कधीकधी २८ देखील असते आणि त्यांची नावे प्रत्येक क्षेत्रातील सर्वात प्रमुख नक्षत्रांशी संबंधित असतात. आधुनिक परंपरेनुसार ते चित्रा ताऱ्यापासून अगदी विरुद्ध दिलेले ग्रहणविषयक बिंदूपासून सुरू होते (संस्कृत: चित्र)
चित्रा नक्षत्र हे इतके महत्वाचे का आहे? चित्रा नक्षत्र हे धान्याचे एक बीज आहे हे एखाद्यास कसे कळेल (कधीकधी मक्याचा दाणा) ? ज्याप्रमाणे कन्या राशीच्या नक्षत्रामध्ये कुमारी स्त्री स्पष्ट दिसत नाही, त्याचप्रमाणे ते देखिल नक्षत्रामध्ये स्पष्ट दिसत नाही. हा कन्या राशीचा विरोधाभास आहे: ही प्रतिमा नक्षत्रातच जन्मजात नाही किंवा त्यापासून अस्तित्वात आली नाही.
कन्या राशी एक कल्पना म्हणून कन्या नक्षत्रापुर्वी आहे
याचा अर्थ असा की कन्या – धान्याचे बीज धरूण असलेली कुमारी स्त्री – ती ताऱ्यांमध्ये दिसली म्हणून तील तयार केले गेले नाही. मात्र, धान्याच्या बी धरून असलेली कुमारिकेचा आधीपासून विचार केला गेला होता आणि नंतर नक्षत्रात त्या विचारास नक्षत्रामध्ये रेखाटण्यात आले. मग बी हातात धरूण असलेली कन्या कोठून आली? प्रथम कोणी कुमारीकडेचा मनात विचार केला आणि नंतर तिला व तिच्या बीजाला कन्या राशी म्हणून ताऱ्यांमध्ये स्थित केले?
आम्ही पाहीले की सर्वात प्राचीन लिखाणांनी निर्माणकर्त्याची कथा लक्षात राहण्यासाठी देव आणि आदाम / मनुचे सध्याचे मुले यास श्रेय दिले. कन्या राशीचे चिन्ह इब्री आणि संस्कृत वेदांमध्ये या कथाची सुरुवात झाली त्यास तंतोतंत जुळते.
आरंभापासून कन्या राशीची कथा
सत्य युगाच्या राज्यात, जेव्हा आदाम / मनुने आज्ञा मोडली आणि देवाने सर्पाचा सामना केला तेव्हा (सैतान) त्याने त्याला अभिवचन दिले की:
१५.आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती ह्यांच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन; ती तुझे डोके फोडील, व तू तिची टाच फोडशील.”
उत्पत्ती ३:१५
पात्र आणि त्यांचे संबंध स्वर्गात भाकीत केले गेले. संतती असलेले स्त्री हा कन्या राशीचा मूळ अर्थ आहे. हे अभिवचन स्मरण्यासाठी पूर्वजांनी कन्या नक्षत्राचा वापर केला
पुरुषाशी तिच्या संबंध नसणार याचा उल्लेख करत- स्त्रीपासून “संतती” (शब्दशः “बीज”) येईल- हे अभिवचन देवाने दिले – आणि अशा प्रकारे ती एक कुमारीका आहे. या कुमारिकेचे बीज सर्पाचे ‘डोके’ ठेचेल. कुमारिकेपासून जन्म घेतलेल्या एकाच व्यक्तीचा दावा अस्तित्त्वात आहे, आणि तो व्यक्ती म्हणजे नासरेथकर येशू. कुमारिकेपासून जन्म घेणाऱ्या बीजाची घोषणा सुरुवातीलाच करण्यात आली होती आणि संस्कृत वेदामध्ये पुरूस म्हणून त्यांची आठवण करण्यात आली होती. त्या पहिल्या मनुच्या सध्याच्या मुलांनी, निर्माणकर्त्याचे अभिवचन लक्षात ठेवण्यासाठी, तिच्या बीजासह (चित्रा तारा) कन्या राशी तयार केली आणि नक्षत्रात तिची प्रतिमा स्थित केली जेणेकरून त्यांचे वंशज हे अभिवचन लक्षात ठेवतील.
प्राचीन कन्या राशि
राशीफल = होरो (तास) + स्कोपस (निरीक्षणाचे चिन्ह म्हणून) आपण कन्या आणि तिच्या बीजासह असे करू शकतो. येशू म्हणाला तेव्हा त्याने स्वतःच कन्या + चित्रा नक्षत्राच्या ‘तासाला’ चिन्हांकित केले:
२३.येशूने त्यांना म्हटले, “मनुष्याच्या पुत्राचा गौरव होण्याची वेळ आली आहे.
२४.मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो, आणि मेला तर पुष्कळ पीक देतो.
योहान १२:२३-२४
येशूने स्वतःला ते बीज असल्याचे सांगितले म्हणजे – चित्रा तारा – जो आपल्यासाठी एक महान विजय मिळवेल म्हणजे – ‘अनेक बीज’. कुमारीचे हे ‘बीज’ विशिष्ट वेळेमध्ये आले’ = ‘होरो’ होते. तो असेच कोणत्याही वेळेत आला नव्हता तर ‘ तासात’ आला. त्याने हे सांगितले म्हणून आम्ही त्या घटकाला चिन्हांकित करू आणि त्याने तयार केलेल्या राशीफलाचे वाचन करून कथेचे अनुसरण करू.
आपले कन्या राशीचे वाचन
यावर आधारित राशीफल वाचन येथे आहे:
येशूने घोषित केलेला ‘तास’ चुकवू नये याची खबरदारी घ्या कारण आपण बिन महत्त्वाच्या गोष्टींचा पाठलाग करण्यात दररोज खूप व्यस्त आहात. त्यामुळे, बरेच जण ‘अनेक बीज’ होण्यापासुन चुकतील . जीवन रहस्यमय गोष्टींनी परिपूर्ण आहे, जीवन रहस्यमय गोष्टींनी परिपूर्ण आहे, परंतु सार्वकालिक जीवनाची आणि खरी संपत्तीची गुरुकिल्ली म्हणजे स्वत: साठी ‘अनेक बीजाचे’ रहस्य उलगडणे हे होय. आपल्याला समजावे म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी दररोज निर्माण कर्त्याला मागा. ज्याप्रमाणे त्याने कन्या राशीच्या ताऱ्यांमध्ये तसेच त्याच्या लेखी नोंदीमध्ये चिन्ह स्थित केले म्हणून, जर तुम्ही त्यासाठी मागता, ठोकता आणि शोधता तर तो तुम्हाला त्यासंबंधीची अंतर्दृष्टी देईल. एका प्रकारे, यासाठी अनुरुप असलेले कन्या राशीतील वैशिष्ट्ये म्हणजे कुतूहलता आणि उत्तरे शोधण्यासाठी उत्सुकता ही आहेत. जर हे गुणधर्म आपणास चिन्हांकित करतात तर मग कन्या राशीविषयी अधिक अंतर्दृष्टी शोधून त्यास कृतीत आणा.
पुढील राशिचक्राची कथा आणि कन्या राशीची सखोलता
तुळ राशीच्या कुंडलीने प्राचिन राशिचक्रातील कथा सुरु ठेवा. या मूळ राशीचक्रातील कथेचा आधार समजण्यासाठी प्राचिन ज्योतिष्य पाहा
लेखांद्वारे कन्या राशीमध्ये अधिक सखोल जाण्यासाठी पाहा: