प्राचीन राशीची आपली मकर रासी

  • by

प्राचीन राशीचक्रातील तुमची मकर राशी

मकरराशीला, मकर म्हणून देखील ओळखले जाते, हे पाचवे राशीचक्र आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात आज नातेसबंध, आरोग्य आणि संपत्ती यांच्या यशाच्या निर्णयाचे मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून तुमची कुंडली तयार करण्यासाठी मकर राशिचक्राचा वापर केला जातो.

पण त्याचा मूळ उपयोग काय होता?

मकरराशी, किंवा मकर, ही बकऱ्याचा पुढचा भाग एका मत्स्याच्या शेपटीशी जोडून तयार झालेली प्रतिमा बनते. बकरा-मत्स्य कोठून आले?

सुरुवातीपासूनच याचा अर्थ काय होता?

सावध व्हा! याचे उत्तर दिल्यास अनपेक्षित मार्गाने तुमची ज्योतिष्य उघडले जाईल-  तुम्ही वेगळ्या प्रवासाला जाल, तेव्हा तुम्ही तुमची कुंडली तपासण्याचे ठरवाल…

कन्या राशीपासून धनु राशीपर्यंत आम्ही पाहिले की पहिल्या चार नक्षत्रांनी एक महान मोक्ष देणाऱ्या व्यक्तीबद्दल आणि त्याच्या शत्रूशी होणाऱ्या त्याच्या संघर्षाविषयी ज्योतिषीय श्रेणी तयार केली आहे. आम्ही येथे  सर्वात प्राचीन राशिचक्र कथेचा आधार सादर केला आहे.

मकरराशी या सुटका करणाऱ्याच्या कार्यावर लक्ष केंद्रित करणार्‍या दुसर्‍या श्रेणीची ओळख करुन देते, कारण त्याचा आपल्यावर परिणाम होतो. या श्रेणीमध्ये आपल्या शत्रूवर, सुटका करणाऱ्याच्या विजयाद्वारे – आम्हाला प्राप्त होणाऱ्या आशीर्वादाचा परीणाम दिसतो. ह्या श्रेणीची बकऱ्यासह सुरुवात होते आणि मेंढा (मेष) व मध्यभागी दोन चिन्हे असलेल्या मत्स्यासह समाप्ती होते (कुंभ व मीन).बकऱ्याचा पुढचा भाग मत्स्याच्या शेपटीशी जोडल्याने, त्यातून मकर राशीचे प्रतीक तयार होते हे कीती योग्य आहे.

प्राचीन राशिचक्रात, मकर राशी सर्व लोकांसाठी होती कारण तीने भाकीत केलेले फायदे प्रत्येकासाठी उपलब्ध आहेत. म्हणून जरी आपण आधुनिक कुंडलीच्या दृष्टीने मकरराशीत नाही, तरीही मकर राशीच्या तार्‍यांमध्ये अंतर्भूत असलेली प्राचीन ज्योतिष्य कथा समजण्यासारखी आहे.

ज्योतिषशास्त्रातील मकर राशीचे नक्षत्र

रेषांनी जोडलेले मकर रास तयार करणारे तारे येथे आहेत. या प्रतिमेत बकरा-मत्स्य यासारखे काही दिसत आहे काय? या तार्‍यांपासून बकरा आणि मासा या प्राण्याच्या मिश्रणाची कल्पना कोणाला करता येईल का?

मकर राशीतील ताऱ्यांचे नक्षत्र

बकरा आणि मासे हे अगदी दूरून देखील निसर्गाशी संबंधित नाहीत.  परंतु हे चिन्ह जेवढे आपल्याला मानवी इतिहासाबद्दल माहित आहे तेवढे पाठीमागे नेते.

इजिप्तच्या डेंडेरा मंदिरात एक राशीचक्र आहे, साधारण २००० वर्ष जुनी बकरा-मत्स्य यांच्या प्रतिमेची, लाल रंगाने गोल केलेले मकर राशि आहे.

डेंडेरा राशिचक्र व लाल रंगाने गोल केलेली मकरराशी

याचा अर्थ असा की बकरा-मत्स्य याची कल्पना मकरराशीतील मत्स्याच्या ताऱ्यांकडे पाहण्याने नाही, तर त्याच्या प्रथम आलेली आहे. मग पहिल्या ज्योतिषांनी स्मरण राहण्यास मदत व्हावे म्हणून आवर्ती चिन्हाच्या रुपात मकर राशिची प्रतिमा तयार करण्यासाठी ताऱ्यांवर ही कल्पना बनवली. याद्वारे पूर्वीचे लोक आपल्या लेकरांना बकरा-मत्स्य यांची प्रतिमा दाखवू शकत असे आणि त्या प्रतिमांशी संबंधीत कथा सांगू शकत असे.  आम्ही येथे पाहिल्यानुसार राशिचक्राचा हा मूळ ज्योतिषीय हेतू होता. 

पण पूर्वजांसाठी याचा अर्थ काय होता?

मकरराशितील बकरा

मकरराशीतील प्रतिमेमध्ये बकऱ्याने आपले डोके खाली वाकवून, आपला उजवा पाय शरीराच्या खाली गुंडाळला आहे आणि त्यामुळे तो डाव्या बाजूने उठू शकत नसल्याचे दिसते.  असे दिसते की बकरा मरत आहे.  परंतु माशांची शेपटी लवचिक, वाकलेली, जोमदार आणि त्यामध्ये जीवन परिपूर्ण आहे.

मकर राशीतील बकरा मरत आहेत पण मत्स्याची शेपटी जिवंत आहे

मानवी इतिहासाच्या सुरुवातीपासूनच बोकड (आणि मेंढा) यांचा देवाला यज्ञ करणे हा एक स्वीकार्य मार्ग होता. बायबल आपल्याला सांगते की आदाम / मनु याचा मुलगा हाबेल याने आपल्या कळपातील कोकऱ्याचे अर्पण केले. अब्राहामाने एक कोकरू (नर बोकड किंवा मेंढा) अर्पिले आणि कैलाशाप्रमाणे पर्वत पवित्र केले. मोशेने इस्त्राएली लोकांना वल्हांडणाचे कोकरु अर्पिण्यास सांगितले , जे कालीएवढ्या शक्तीशाली मृत्यूचा प्रतिकार करते. आपल्याला  तुळ राशिच्या तराजूतून सोडविण्यास दुसऱ्याच्या खंडणीची आवश्यकता आहे हे शिकवण्यासाठी ही चिन्हे होती. येशूने, आपल्या वधस्तंभावरील बलिदानात, आपल्यासाठी स्वेच्छेने यज्ञ म्हणून स्वत:स दिले.

प्राचिन काळातील लोकांनी मृत्युमुळे वाकलेल्या मकरराशितील बकऱ्याचा उपयोग अभिवचनाचा सुटका करणारा, यज्ञ होण्यास येत आहे याची आठवण करण्यासाठी केला आहे. 

मकर राशितील मासा

परंतू मकरराशितील मत्स्याच्या शेपटीचा काय अर्थ आहे? स्पष्ट करण्यासाठी आम्ही आणखी एक प्राचीन संस्कृती पाहू शकतो – चीनी.  चीनी नविन वर्षाचा उत्सव जानेवारी/ फेब्रुवारी या महीण्यामध्ये असतो (साधारण मकर राशिच्या वेळेत) ही परंपरा हजारो वर्षांपूर्वीची आहे.  हा उत्सव सजावट करून साजरा केला जातो ज्यामध्ये चीनी लोक आपल्या घरांच्या दरवाज्यांवर सजावट करतात. येथे त्याचे काही चित्र आहेत.

चिनी नविन वर्षाचे कार्ड
चीनी नवीन वर्षाची सजावट
चीनी नविन वर्ष – मासे

आपल्याला लक्षात येईल की सर्वत्र सजावटीचे मासे आहेत. ते त्यांच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छांमध्ये माशांचा वापर करत असे कारण, प्राचीन काळापासून, मासे जीवन, विपुलता आणि भरपूरी यास चिन्हांकित करतात.

त्याच प्रकारे, प्राचिन राशिचक्रामध्ये, मासे हे जिवंत लोकांच्या- समुदायाच्या- भरभराटीचे प्रतिनिधित्व करतात, ज्यांनी स्वत:साठी बलिदानाचा स्विकार केला आहे.

त्याच्या बलिदानापर्यंत पोहचणाऱ्या पुष्कळांविषयी शिकवताना येशूने माशांसमान प्रतिमांचा उपयोग केला.  त्याने शिकविले

४७.आणखी, स्वर्गाचे राज्य समुद्रात टाकलेल्या एखाद्या जाळ्यात सर्व प्रकारचे जीव एकत्र सापडतात त्यासारखे आहे;

४८.ते भरल्यावर माणसांनी ते किनार्‍याकडे ओढले आणि बसून जे चांगले ते भांड्यांत जमा केले, वाईट ते फेकून दिले.

मत्तय १३: ४७-४८

जेव्हा येशूने शिष्यांना  त्यांच्या भविष्यातील कार्याविषयी सांगितले, तेव्हा तो म्हणाला

१८.नंतर गालील समुद्राजवळून येशू चालला असताना त्याने पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया ह्या दोघा भावांना समुद्रात पाग टाकताना पाहिले; कारण ते मासे धरणारे होते.

१९त्याने त्यांना म्हटले, “माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हांला माणसे धरणारे करीन.”

मत्तय ४:१८-१९

दोन्ही वेळा माशांची प्रतिमा लोकांच्या समुदायाचे प्रतिनिधित्व करते जे त्यांना देण्यात आलेले येशुच्या भक्तीचे दान स्वीकारतील. मग आपणही का नाही?

मकर राशिफल

‘राशिफल’ हे नाव ग्रीक ‘होरो’ (तास) या शब्दापासून  आले आहे आणि याचा अर्थ विशेष तासाला चिन्हांकित करणे असा आहे. मकरराशी किंवा मकर या भविष्यसूचक लिखाणाला ‘होरो’ स्पष्टपणे चिन्हांकित करते. मकरराशी द्विगुणी असल्यामुळे (बोकड आणि मासा), मकर होरो देखिल द्विगुणी आहे: यज्ञ करण्याची वेळ व माणसांची वेळ. येशूने यातल्या पहिल्या होरोंना चिन्हांकित केले.

१८. नंतर गालील समुद्राजवळून येशू चालला असताना त्याने पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया ह्या दोघा भावांना समुद्रात पाग टाकताना पाहिले; कारण ते मासे धरणारे होते.

१९. त्याने त्यांना म्हटले, “माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हांला माणसे धरणारे करीन.”

२०.त्याप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटले, “हा प्याला माझ्या ‘रक्तात’ नवा ‘करार’ आहे. ते रक्त तुमच्यासाठी ओतले जात आहे.

लूक २२:१४-१६, २०

मकर बकरीचा हा ‘तास’ आहे.  वल्हांडण सणाच्या  १५०० वर्षापूर्वी, जेव्हा बलिदानाचे रक्त मृत्युचा दुत निघून जावा म्हणून दारांवर लावले जात असे, तेव्हा त्या प्रसंगाने या तासाचे पूर्वचित्रण केले होते.  त्याच तासात येशूने अशाप्रकारे माझे रक्त देखील त्यांच्यासाठी… आणि आपल्यासाठी सांडले जाईल हे सांगत वल्हांडण सणाच्या यज्ञाचा अर्थ सांगितला. आपल्याला जीवन मिळावे म्हणून त्याला मृत्यु सहन करावा लागेल, मोशेच्या वल्हांडण सणाप्रमाणे… मकर राशीतील बकऱ्याप्रमाणे. लोकांना जीवनासह– हा तास पुढील घटकाकडे नेतो.

१४.नंतर ‘मी पाहिले, तेव्हा’ पांढरा मेघ व त्या ‘मेघावर’ बसलेला ‘मनुष्याच्या पुत्रासारखा’ कोणीएक ‘दृष्टीस पडला;’ त्याच्या मस्तकावर सोन्याचा मुकुट व त्याच्या हातात तीक्ष्ण धारेचा विळा होता.

१५.तेव्हा आणखी एक देवदूत मंदिरातून निघून, जो मेघावर बसलेला होता त्याला उच्च वाणीने म्हणाला, “तू आपला ‘विळा चालवून’ कापणी कर; कारण ‘कापणीची वेळ आली आहे;’ पृथ्वीचे पीक पिकून गेले आहे.”

१६.तेव्हा मेघावर बसलेल्या पुरुषाने आपला विळा पृथ्वीवर चालवला; आणि पृथ्वीची कापणी झाली.

प्रकटीकरण १४: १४-१६

भविष्यसूचक लिखाण म्हणते की अशी वेळ येईल जेव्हा मकर राशीतील बलिदानामध्ये सामील झालेले लोक या काळाच्या शेवटी स्वर्गातील कापणीमध्ये भाग घेतील. येशूने सांगितलेल्या जाळ्यातील माशाच्या दाखल्यामधील हाच तो तास आहे. बकरी आणि माशाचे हे दोन होरो संतुलन राखून एकमेकांना पूर्ण करतात.  या दोन तासाने प्राचीन ज्योतिषी जन्मकुंडलीमध्ये मकर राशीला चिन्हांकित केले गेले.

आपल्या मकर राशीचे वाचन

तुम्ही आणि मी मकर राशीचे वाचन आज या कुंडलीप्रमाणे लागू करू शकता.

मकर राशी मध्ये सांगितले आहे की डोळ्याने दिसते त्यापेक्षा जीवनात आणखी बरेच काही आहे.  जर आपण विश्व चालवित असाल तर कदाचित त्यातील सर्व वैशिष्ट्ये सरळ आणि स्पष्ट असतील.  परंतु  या वस्तुस्थितीला आपण स्वीकारण्याची गरज की तुम्ही किंवा मी याचे मालक नाही आहोत.  जसे ग्रहांच्या हालचालीवर नियंत्रित करणारे भौतिक कायदे आहेत, तसेच आध्यात्मिक नियम आहेत जे आपल्याला नियंत्रित करतात.  लढण्याऐवजी किंवा त्याभोवती फिरण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्या वास्तवाचा स्वीकार करणे अधिक चांगले आहे.  अन्यथा आपल्याला कळेल की या नियमांविरुध्द वागणे हे शारीरिक नियमांविरुध्द जाण्यासारखेच वेदनादायक आहे. निश्चितपणे आपण मूलभूत आध्यात्मिक होरोंच्या विसंगत होऊ इच्छित नाही.

या आध्यात्मिक नियमांशी समन्वय साधण्यासाठी कदाचित एक चांगले ठिकाण म्हणजे सर्व काही समजून घेण्याऐवजी फक्त आभार आणि कृतज्ञता व्यक्त करणे होय.  तरीही, जर कोणीतरी आपल्यासाठी स्वत: चे रक्त सांडण्यासाठी अशा प्रकारे आपल्यास शोधत असेल तर – “धन्यवाद” असे म्हणण्याचा प्रयत्न का करु नये? आभारी असणे ही एक खासियत आहे जी कोणत्याही नात्यातील प्रश्नांना सहज करते.  आणि आपण कधीही आणि कोणत्याही वेळी सरळ मनापासून धन्यवाद देऊ शकता. कदाचित तेव्हाच आपल्या सर्व जीवनाचा अर्थ जाणून घेण्यासाठी सर्व कोड्यात पाडणारे तुकडे एकत्र येण्यास सुरवात करतील. धैर्यवान व्हा, एक नवीन दिशा घ्या आणि मकर राशीला ‘धन्यवाद’ म्हणा.

पुढील राशिचक्र आणि मकर राशीतील  सखोलता

मकर राशीतील बकरा आपल्याला मृत्यूचे यज्ञ म्हणून चित्रित केलेले दिसते.  मकर राशीतील मत्स्यामध्ये आपण पुष्कळ लोक पाहिले ज्यांच्यासाठी यज्ञ आपले जीवन देते. ते पाण्यात राहतात म्हणून, मकर राशीतील मत्स्य आपल्याला प्राचीन राशीचक्राच्या कथेतील पुढील कुंडलीसाठी देखील तयार करते – कुंभ  – जिवंत पाण्याचे नद्या आणणारा माणूस.

येथे प्राचीन ज्योतिषा जोतिष्यांबद्दलचा आधार जाणून घ्या.  कन्या  राशीसह झालेली त्याची सुरुवात वाचा.

मकर राशीच्या लेखी कथेत सखोल जाण्यासाठी हे पाहा:

पुस्तक म्हणून राशिचक्र अध्यायांचे पीडीएफ डाउनलोड करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *