Skip to content

प्राचीन राशीची आपली मीन रासी

  • by

मीन, किंवा मीनराशी, प्राचीन राशिचक्राच्या कथेचा सातवा अध्याय आहे, या राशीचक्रातील घटकाचा एक भाग आहे, जो आपल्याला येणाऱ्याच्या विजयाने होणारा परिणामास प्रकट करतो. मीन राशी लांब पट्टीने बांधलेल्या दोन माशांची प्रतिमा बनवते. आजच्या आधुनिक ज्योतिष कुंडलीच्या प्राचीन राशीचक्रातील वाचनात मीन राशीसाठी आपण प्रेम, चांगले भाग्य, आरोग्य  आणि आपल्या कुंडलीद्वारे आपल्या व्यक्तिमत्त्वाबद्दल अंतर्दृष्टी मिळविण्यास राशीफलाच्या सल्ल्याचे अनुसरण करता.

परंतू प्राचीन लोकांसाठी याचा अर्थ काय होता?

लांब बंधाने जोडलेल्या दोन माशांची प्रतिमा कोठून आली?

सावध व्हा! याचे उत्तर दिल्यास अनपेक्षित मार्गाने तुमची ज्योतिष्य उघडले जाईल-  तुम्ही वेगळ्या प्रवासाला जाल, तेव्हा तुम्ही तुमच्या राशीफलाच्या चिन्हांना तपासण्याचे ठरवाल…

आम्ही प्राचीन ज्योतिष्यचा शोध लावला, आणि कन्या राशीपासून कुंभ राशीपर्यंत प्राचीन कुंडलीची तपासणी करून, मीन राशीसह चालू ठेवतो. ताऱ्यांच्या या प्राचीन ज्योतिषात प्रत्येक अध्याय सर्व लोकांसाठी होता. तर जरी आपण आधुनिक कुंडलीच्या अर्थाने मीन राशीमध्ये नाही तरी मीन राशीच्या तार्‍यांमधील प्राचीन कथा जाणून घेणे योग्य आहे.

ताऱ्यांमधील मीन नक्षत्र

मीन राशी किंवा मीन बनवणारे तारे येथे आहेत. या चित्रामध्ये लांब बंधाने एकत्र बांधलेल्या दोन माशांसारखे काहीतरी तुम्ही बघू शकता का?

मीन राशी तयार केलेल्या तार्‍यांचे चित्र

अगदी  ताऱ्यांना ‘मीन’राशीमध्ये  रेषांनी जोडले तरीही मासे स्पष्ट दिसत नाहीत. सुरुवातीच्या ज्योतिष्यांनी या तार्‍यांपासून तयार होणाऱ्या दोन माशांच्या कसा विचार केला?

रेषांनी जोडलेल्या ताऱ्यांचे मीन नक्षत्र

परंतु हे चिन्ह आपल्याला माहीत असलेल्या मानवी इतिहासापर्यंत मागे जाते. दोन मीन राशीच्या माशांना लाल रंगात वर्तुळ केलेले, इजिप्तच्या देंडेरा मंदिरात राशिचक्र आहे, २००० वर्षापेक्षा अधिक जुने. रेखाटनामध्ये तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे बंधाने त्यांना एकत्रित बांधले आहे.

मीन नक्षत्र रेषांनी जोडलेल्या तार्‍यांसह
वर्तुळ केलेल्या मीन राशीसह देंडेराचे इजिप्त येथील प्राचीन राशिचक्र

खाली दिलेली मीन राशींची एक पारंपारिक प्रतिमा आहे जी ज्योतिषशास्त्राने पाठीमागील आपल्या माहितीनुसार वापरली आहे.

ज्योतिष मीन प्रतिमा

दोन माश्यांचा अर्थ काय आहे?

आणि बंधाने त्यांच्या दोन शेपटींना बांधले आहे?

तुमच्यासाठी व माझ्यासाठी याचे काय महत्व आहे?

मीन राशीचा मुळ अर्थ

मकर राशीमध्ये दर्शविले आहे की मरत असलेल्या बकऱ्याच्या शेपटीपासून माशीला जीवन प्राप्त झाले. कुंभ राशीमध्ये दर्शविले आहे की मास्याकडे पाणी ओतल्या जात आहे–मीन ऑस्ट्रिनस. मासे जिवंत पाणी प्राप्त करणाऱ्या असंख्य लोकांचे प्रतिनिधित्व करीत होते. श्री अब्राहाम यांनी जेव्हा देवाने त्याला अभिवचन दिले तेव्हा पुर्वकल्पना केली.  

३.तुझे जे अभीष्ट चिंतितील त्यांचे मी अभीष्ट करीन; तुझे जे अनिष्ट चिंतितील त्यांचे मी अनिष्ट करीन; तुझ्या द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील.”

 उत्पत्ती १२:३

१८.तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादीत होतील.”

उत्पत्ती २२:१८

जो येणार त्याच्याद्वारे सुटका झालेल्या लोकसमूह दोन गटांमध्ये विभक्त झाले

६.तो परमेश्वर म्हणतो; “याकोबाच्या वंशाचा उद्धार करावा, इस्राएलाच्या राखून ठेवलेल्या लोकांना परत आणावे म्हणून तू माझा सेवक व्हावे ह्यात काही मोठेसे नाही; तर माझ्याकडून होणारे तारण तू दिगंतापर्यंत न्यावे म्हणून मी तुला राष्ट्रांचा प्रकाश असा नेमतो.”

यशया ४९: ६

यशयाने ‘याकोबाच्या वंशाच्या’(म्हणजे यहुदी लोक) तसेच ‘विदेशी लोकांबद्दल लिहिले. हे मीन राशीतले दोन मासे आहेत. जेव्हा येशूने आपल्या शिष्यांना बोलाविले तेव्हा त्याने त्यांना सांगितले

१९.त्याने त्यांना म्हटले, “माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हांला माणसे धरणारे करीन.”

मत्तय ४:१९

येशूच्या पहिल्या अनुयायींनी आपण त्याचे आहेत हे दाखविण्यासाठी माशांच्या चिन्हांचा वापर केला प्राचीन थडंग्याचे चित्र.

प्राचीन थडग्यावर ग्रीक अक्षरे असलेले माशाचे चिन्ह
प्राचीन रोमी थडग्यांवरील माशांचे चिन्ह
खडकात कोरलेले दोन मासे

मीन राशीतील हे दोन मासे, याकोबाचे गोत्र आणि येशूच्या मागे चालणारी इतर राष्ट्रे यांना त्याने समान जीवन दिले आहे हे दर्शवितात. बंध देखील दोन्ही मासे समान रीतीने घट्ट धरतो.

बंध – निघून जाणारे बंधन

मीन राशीतील नक्षत्र दोन्ही माशांना एकत्र जोडते. बंधाने दोन माशांना पकडून ठेवले आहे. पण आम्हाला मेष राशीतील मेंढ्याचे खूर बंधाच्या दिशेने येताना दिसते. हे त्या दिवसाबद्दल बोलते जेव्हा मेषाद्वारे मासे बंधनातून मुक्त होतील.

राशीचक्रातील मीन राशीबरोबर मेष राशी. मेषाचे खूर बंध तोडण्यासाठी येत आह

आज येशूच्या सर्व अनुयायांचा हा अनुभव आहे. बायबल दुःख, क्षय आणि मृत्यू आपल्या या आजच्या बंधनाचे वर्णन करते. परंतु अजूनही आशेने या बंधनातून मुक्त होण्याच्या दिवसाकडे आशेने पाहत आहे (बंध म्हणून मीन राशीमध्ये दिलेले आहे).

१८.कारण आपल्यासाठी1 जो गौरव प्रकट होणार आहे त्याच्यापुढे सांप्रत काळाची दुःखे काहीच नाहीत असे मी मानतो.

१९.कारण सृष्टी देवाच्या पुत्रांच्या प्रकट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठेने करत आहे.

२०.कारण सृष्टी व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यात आली ती आपखुशीने नव्हे, तर ती स्वाधीन करणार्‍यामुळे.

२१.सृष्टीही स्वतः नश्वरतेच्या दास्यातून मुक्त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवयुक्त मुक्तता मिळावी ह्या आशेने वाट पाहते.

२२.कारण आपल्याला ठाऊक आहे की सबंध सृष्टी आजपर्यंत कण्हत आहे व वेदना भोगत आहे.

२३.इतकेच केवळ नव्हे, तर ज्या आपल्याला आत्मा हे प्रथमफळ मिळाले आहे ते आपणही स्वतः दत्तकपणाची म्हणजे आपल्या शरीराच्या मुक्तीची वाट पाहत असता आपल्या ठायी कण्हत आहोत.

२४.कारण आपण अशी आशा धरून तरलो; जी आशा दृश्य झाली आहे ती आशाच नव्हे. जे दृश्य झाले आहे त्याची आशा कोण धरील?

२५.पण जे अदृश्य त्याची जर आपण आशा धरली तर धीराने आपण त्याची प्रतीक्षा करत असतो.

रोमकरांस ८: १८-२५

आम्ही मृत्यूपासून आमची शरीरे सोडवण्याची वाट पाहत आहोत. जसे ते पुढे स्पष्ट केले आहे

५०.बंधुजनहो, मी असे म्हणतो की, मांस व रक्त ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही आणि विनाशीपणाला अविनाशीपणाचे वतन मिळत नाही.

५१.पाहा, मी तुम्हांला एक रहस्य सांगतो; आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही, तरी आपण सर्व जण बदलून जाऊ;

५२.क्षणात, निमिषात, शेवटला कर्णा वाजेल तेव्हा. कारण कर्णा वाजेल, मेलेले ते अविनाशी असे उठवले जातील, आणि आपण बदलून जाऊ.

५३.कारण हे जे विनाशी त्याने अविनाशीपण परिधान करावे, आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करावे हे आवश्यक आहे.

५४.हे जे विनाशी त्याने अविनाशीपण परिधान केले, आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान केले, असे जेव्हा होईल तेव्हा

“मरण विजयात गिळले गेले आहे”

असा जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण होईल.

५५.“अरे मरणा, तुझा विजय कोठे?

अरे मरणा, तुझी नांगी कोठे?”

५६.मरणाची नांगी पाप, आणि पापाचे बळ नियमशास्त्र आहे;

५७.परंतु जो देव आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला जय देतो त्याची स्तुती असो.

१ करिंथकरांस १५: ५०-५७

मीन राशीतील माशांच्या भोवतालचा बंध आपली सध्याची परिस्थिती दर्शवितो. परंतु आम्हाला मुक्त करण्यासाठी आम्ही मेषच्या येण्याची वाट पाहत आहोत. मीन राशीत असलेल्या सर्वांना बंधनातून मृत्युपर्यंत हे स्वातंत्र्य प्राप्त होईल . मीन राशीच्या चिन्हाने असे जाहीर केले की येशूच्या विजयामुळे आम्हाला केवळ जीवंत पाणी , मिळणार नाही तर सध्याचे असलेले क्षय पावण्याचे बंधन, त्रास आणि मृत्यू यापासून मिळणाऱ्या सुटकेचा दिवसही येत आहे.

मीन राशीफल

राशीफल हा शब्द ग्रीक शब्द ‘होरो’ (तास) यापासून आला आहे आणि भविष्यसूचक लिखाण यास विशिष्ट तास म्हणून चिन्हांकित करते, आपण मासे पाण्यात जीवंत आहेत, तरीही बंधाने बांधलेले आहेत हे मीन होरो वाचनाला चिन्हांकित करते. खरे जीवन परंतु पूर्ण स्वातंत्र्याच्या प्रतीक्षेत.

२.ते तुम्हांला सभाबहिष्कृत करतील, इतकेच काय पण तुमचा जीव घेणार्‍या प्रत्येकाला आपण देवाला सेवा सादर करत आहोत असे वाटेल, अशी वेळ येत आहे.

३.त्यांनी पित्याला व मलाही ओळखले नसल्यामुळे ते असे करतील.

४.मी तुम्हांला ह्या गोष्टी अशासाठी सांगून ठेवल्या आहेत की, त्या घडण्याची वेळ आली म्हणजे त्या मी तुम्हांला सांगितल्या होत्या ह्याची तुम्हांला आठवण व्हावी. ह्या गोष्टी मी प्रारंभापासून तुम्हांला सांगितल्या नाहीत; कारण मी तुमच्याबरोबर होतो.

योहान १६:२-४

११.जेव्हा तुम्हांला सभा, सरकार व अधिकारी ह्यांच्यासमोर नेतील, तेव्हा कसे व काय उत्तर द्यावे किंवा काय बोलावे ह्यांविषयी काळजी करू नका;

१२.कारण तुम्ही काय बोलावे ते पवित्र आत्मा त्याच घटकेस तुम्हांला शिकवील.”

लुक १२:११-१२

आम्ही कुंभ राशीच्या तासात राहतो आणि मीन राशीच्या देखील तासात राहतो. कुंभने माशांना जीवन देण्यासाठी पाणी (देवाचा आत्मा) आणले. परंतु आम्ही केवळ राशिचक्रातील कथेच्या मध्यभागी आहोत अंतिम धनु विजय भविष्यात अजूनही होणे आहे. येशूने पूर्वसूचना दिल्याप्रमाणे आपण या घटकेमध्ये आता त्रास, संकटे, छळ आणि शारीरिक मृत्यूचा सामना करतो. माशांना बांधलेला बंध खरा आहे. परंतु आम्ही अद्याप बंधनाने तात्पुरते बांधलेले असताना देखील जीवंत पाण्याची चव घेतो. अगदी मृत्यूच्या वेळीसुद्धा-पवित्र आत्मा आपल्यामध्ये राहतो, शिकवितो आणि मार्गदर्शन करतो. मीन राशीच्या  समयाचे स्वागत आहे.

आपले मीन राशीचे वाचन

तुम्ही आणि मी आज मीन कुंडली वाचन खालीलप्रमाणे लागू करू शकतो.

मीन राशी घोषित करते की राज्यात प्रवेश करण्यासाठी आपल्याला बर्‍याच त्रासातून जाणे आवश्यक आहे. खरं तर त्या राज्याकडे तुमच्या प्रवासाची काही वैशिष्ट्ये त्रास, संकटे, दु: ख आणि मृत्यू हे देखील आहेत. यामुळे खचून जावू नका. हे खरोखर आपल्या फायद्याचे आहे कारण यामुळे आपल्यामध्ये तीन वैशिष्ट्ये विकसित होऊ शकतात: विश्वास, आशा आणि प्रेम. जर आपण खचलो नाही तर-  मीन राशीतील बंध तुमच्यामध्ये असे करू शकतात. जरी बाह्यतः आपण व्यर्थ घालवत असाल तरी अंतःकरणाने दिवसेंदिवस आपले नूतनीकरण होत आहे. जरी बाह्यतः आपण वाया घालवत असाल तरी अंतःकरणाने दिवसेंदिवस आपले नूतनीकरण होत आहे. कारण तुमच्यामध्ये आत्म्याचे प्रथम फळ आहेत.  म्हणूनच जेव्हा तुम्ही आपल्या शरीराच्या सुटकेसाठी आतुरतेने वाट पाहत असता तसतसे समजून घ्या की जर राजा आणि त्याच्या राज्याशी सुसंगत असेल तर या वास्तविक समस्या आपल्या चांगल्यासाठी कार्य करीत आहेत.

स्वत: ला या सत्याकडे जाताना राखून ठेवा: त्याच्या महान दयेने राजाने आपल्याला जिवंत आशेच्या रूपात जिवंत येशूच्या पुनरुत्थानाद्वारे आणि मृतांमधून पुनरुत्थान करून, ज्याचा कधीही नाश होणार नाही, ते नष्ट होणार नाही किंवा कोमेजणार नाही असा वारसा म्हणून नवीन जन्म दिला आहे. हा वारसा आपल्यासाठी स्वर्गात ठेवला आहे, जे शेवटच्या काळात प्रगट होण्यास तयार आहेत आणि तारण येईपर्यंत विश्वासाच्या द्वारे देवाच्या सामर्थ्याने तुमचे रक्षण केले आहे. या सर्व बाबतीत तुम्ही खूप आनंदात आहात, परंतु आता थोड्या काळासाठी तुम्हाला सर्व प्रकारच्या परीक्षांत दु:ख सोसावे लागेल. यामुळे सोन्यापेक्षा जास्त किंमतीचे –  आपल्या विश्वासाचे सत्य सिद्ध केले आहे , जे आगीतून शुद्ध झाले असले तरी नष्ट होते. ज्यामुळे येणाऱ्या राजाची  प्रशंसा, गौरव आणि सन्मान होतो.

पुढील राशिचक्राची कथा आणि मीन राशीची सखोलता

मेष राशीमध्ये आम्ही पाहतो की ही सुटका कशी उघडण्यात आली. येथे प्राचिन जोतिष्य ज्योतिषाचा आधार जाणून घ्या. कन्या राशीमध्ये याच्या सुरुवातीचे वाचन करा.

      मीन राशी संबंधित पुढील लेख देखील वाचा:

पुस्तक म्हणून राशिचक्र अध्यायांचे पीडीएफ डाउनलोड करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *