प्राचीन राशीचा आपला कर्क रासी

  • by

खेकडा कर्क राशीची सामान्य प्रतिमा तयार करतो, खेकडा हा शब्द लॅटीन शब्दातून आला आहे. आजच्या आधुनिक ज्योतिष कुंडलीच्या प्राचीन राशीचक्रातील वाचनात कर्क राशीसाठी आपण प्रेम, चांगले भाग्य, आरोग्य  आणि आपल्या कुंडलीद्वारे आपल्या व्यक्तिमत्त्वाबद्दल अंतर्दृष्टी मिळविण्यास राशीफलाच्या सल्ल्याचे अनुसरण करता.

पण प्राचीन लोकांनी अशाप्रकारे कर्क राशीचे वाचन केले का?

मुळात याचा अर्थ काय होता?

सावध व्हा! याचे उत्तर दिल्यास अनपेक्षित मार्गाने तुमची ज्योतिष्य उघडले जाईल-  तुम्ही वेगळ्या प्रवासाला जाल, तेव्हा तुम्ही तुमच्या राशीफलाच्या चिन्हांना तपासण्याचे ठरवाल…

आम्ही प्राचीन ज्योतिष्यचा शोध लावला, आणि कन्या राशीपासून मिथून राशीपर्यंत  प्राचीन कुंडलीची तपासणी केल्यावर, आपण कर्क रास ज्या राशीस कर्का असे म्हणतात, त्यापासून पुढे जात आहेत. 

कर्क राशीच्या नक्षत्राचे ज्योतिष्य

कर्क राशीच्या नक्षत्रातील हे चित्र पाहा. तार्‍यांमध्ये खेकड्यासारखे काहीतरी दिसत आहे का?

कर्क राशीच्या नक्षत्रांचे चित्र. आपण एक खेकडा पाहू शकता?

जर आपण  तार्‍यांना ओळींत कर्क राशीत जोडले तरी एक खेकडा ‘दिसणे’ कठीण आहे.  ते आपल्याला उलट असलेल्या Y प्रमाणे दिसते.

रेषांनी जोडलेल्या तार्‍यांचे कर्क नक्षत्र

येथे उत्तर गोलार्धात कर्क असल्याचे दर्शविणार्‍या राशीचक्राच्या नॅशनल जिओग्राफिक पोस्टरचे चित्र आहे.

कर्क राशीला वर्तुळ केलेला नॅशनल जिओग्राफिकचा ताऱ्यांचा तक्ता

यावरुण लोकांनी प्रथम एक खेकडा म्हणून विचार कसा केला? परंतु मानवी इतिहासाबद्दल जेवढे आपल्याला माहीत आहे तेवढे कर्क राशी  मागे जाते.

इतर राशी नक्षत्रांप्रमाणेच कर्क राशीची प्रतिमादेखील नक्षत्रामध्येच स्पष्ट दिसत नाही.मात्र, खेकड्याची प्रतिमा प्रथम आली.  प्रथम ज्योतिष्यांनी नंतर ज्योतिष्य शास्त्राच्या माध्यमातून ताऱ्यांवर ती प्रतिमा  आच्छादित केलीप्राचीन लोक त्यांच्या मुलांना खेकड्याचे नक्षत्र दर्शवू शकत होते आणि त्यास त्यासंबंधित कथा सांगू शकत होते.

का? प्राचीन लोकांसाठी याचा काय अर्थ होता?

राशीचक्रातील कर्क राशी

कर्क राशीच्या काही सामान्य ज्योतिष प्रतिमा

खेकड्याची कर्क जोतिष्य प्रतिमा
खेकडा आणि कर्क 69 चिन्ह नाही, तर गोड्यापाण्यातील खेकड्याची कर्क राशिचक्रातील प्रतिमा

२००० वर्षापेक्षा जास्त जुना, कर्क राशीची प्रतिमा लाल रंगात वर्तुळ केलेली, इजिप्तच्या डेंडेरा मंदिरात एक राशीचक्र आहे.

कर्क राशीला वर्तुळ केलेली डेंडेराची प्राचीन इजिप्शियन राशिचक्र

रेखाटनाने ‘खेकड्याच्या’ प्रतिमेला खुणपट्टी केली असली तरी ती प्रत्यक्षात एका प्रकारच्या कीड्याप्रमाणे दिसते. सुमारे ४००० वर्षांपूर्वीच्या प्राचीन इजिप्शियन नोंदींमध्ये कर्क राशीचे स्कार्बॅयस (स्कॅरब) कीडा, त्यांचे अमरत्वाचे पवित्र प्रतीक म्हणून वर्णन केले गेले होते.

प्राचीन इजिप्तमध्ये स्कॅरब पुनर्जन्म किंवा पुनरुत्पादनाचे प्रतीक होते. एक स्कॅरब कीडा किंवा स्कॅरब कीडा डोक्यावर असणारा मनुष्य, सामान्यत: उगवत्या सूर्याचा इजिप्शियन देवता खेपरी, यास चित्रण करतो.

कीडा मस्तकावर असलेला, खेपरी, एक प्राचीन इजिप्शियन देवता.[1] [१] न्यू किंगडम टॉम्ब चित्रावर आधारित

प्राचीन कथेतील कर्क राशी

आम्ही पाहिले की बायबल सांगते की निर्माणकर्ता देवाने आपली कथा प्रकट करण्यासाठी नक्षत्र तयार केले. कन्या राशीपासून राशीचक्राचे चिन्हे आम्हाला ही कहाणी दर्शवित आहेत.

कर्क राशीने कथा आणखी वाढविली.  जरी आपण आधुनिक कुंडलीच्या दृष्टीने कर्क राशीत नाही, तरी कर्क राशीचे ज्योतिष्य कथा जाणून घेण्यासारखी आहे.

कर्क राशीचा मूळ अर्थ

प्राचीन इजिप्शियन लोक त्या राशीचक्रातील कथेच्या खूप जवळ आले होते, म्हणूनच आधुनिक ज्योतिष्य  कर्क राशीच्या प्राचिन राशीचक्राचा अर्थ समजून घेण्याची गुरुकिल्ली आहे. खेपेरा आणि प्राचीन इजिप्शियन लोकांच्या स्कॅरब कीड्याविषयी इजिप्तचे तज्ज्ञ सर वॉलेस बज यांनी हे लिहिले आहे

खेपेरा हे एक प्राचीन देव होते, आणि स्वतःमध्ये जीवनाचे जंतू समाविष्ट असलेल्या वस्तूचे प्रकार एका नवीन अस्तित्वाकडे वळत आहे; अशा प्रकारे त्याने मृत शरीराचे प्रतिनिधित्व केले ज्यामधून आध्यात्मिक शरीर उठणार होते. डोक्यासाठी बीटल असलेल्या माणसाच्या रूपात त्याचे चित्रण केले गेले आहे आणि ही कीटक त्याचे चिन्ह बनले आहे कारण ते स्वत: जन्मलेले आणि स्वत: ची निर्मिती होते.सर डब्लू.

ए. बज. इजिप्शियन धर्म पी ९९

स्कॅरब कीडा: पुनरुत्थानाचे प्राचिन चिन्ह

प्रौढ कीड्यामध्ये रुपांतर होण्यापूर्वी स्कॅरब कीडा अनेक जीवनाच्या टप्प्यातून जातो. अंडीपासून उबवल्यानंतर, स्कॅरबचे अळीत रुपांतर होते ज्याला भुंगा असे देखिल म्हणतात. ते भुंगे शेण, बुरशी, मुळे किंवा कुजलेले मांसासारखे विघटनशील पदार्थ खायला घालून आपले जीवन जमिनीत घालवतात.

एक अळी म्हणून रेंगाळल्यानंतर,  तो स्वतःला एका कोशात सामावून घेतो. या काळात सर्व क्रिया थांबतात. या काळात ते कुठलेही अन्न खात नाही आणि त्याचे सर्व इंद्रिये कार्य करत नाही. जीवनाची सर्व कार्ये बंद होतात आणि स्कॅरब कोशामध्ये निष्क्रिय पडलेले असते. येथे ती अळी स्वत:चे शरीर घोळते आणि पुन्हा एकत्रित करून, ती रुपांतराच्या क्रियेतून जाते. ठरलेल्या वेळी प्रौढ स्कॅरब कोशातून बाहेर पडतो. त्याचे प्रौढ कीड्याचे स्वरुप केवळ जमीनीतच रेंगाळत असलेल्या अळीसारख्या शरीरासारखे नसते. आता कीडा बाहेर पडतो, उडायला लागतो आणि  वाऱ्याच्या आणि सूर्यप्रकाशाच्या झोतात स्वार होतो.

प्राचीन इजिप्शियन लोकांनी स्कॅरब कीड्याची पूजा केली कारण हे पहिल्या मानवांना पुनरुत्थानाचे अभिवचन होते.

कर्क – पुनरुत्थानाच्या शरीराचे प्रतीक

कर्क राशी हे सांगते की आपले जीवन देखील अशाच पद्धतीचे अनुसरण करते. आता आपण पृथ्वीवर राहतो, कष्टाचे व त्रासाचे दास आहोत,  पृथ्वीवर जन्मलेले आणि घाणीने भरलेल्या अळीप्रमाणे, अंधाराने आणि संशयाने भरलेले – , तरी आपल्यात बीज असणारी आणि अंतिम वैभव प्राप्त होण्याची शक्यता आहे.

मग आपले पार्थिव जीवन मृत्यूमध्ये संपुष्टात येते आणि मम्मीसारख्या अवस्थेत जाते ज्यामध्ये आपला आतील व्यक्ती मरणात  झोपी गेला आहे आणि आपले शरीर कबरेच्या वैभवातून पुनरुत्थानाच्या हाकेची वाट पाहात आहे. कर्क राशीचा हा प्राचीन अर्थ आणि प्रतीक होते – जेव्हा मुक्तीदात्याची हाक येते  तेव्हा ती शरीराच्या पुनरुत्थानास कारणीभूत ठरते. जसा स्कॅरब कीडा आपल्या निष्क्रियतेतून बाहेर पडला तसाच मृत व्यक्ती उठविला जाईल.

२.भूमीतील मातीत निजलेल्यांचा मोठा समुदाय उठेल; कित्येक सर्वकाळचे जीवन मिळवण्यास आणि कित्येक अप्रतिष्ठा व सर्वकाळचा धिक्कार मिळवण्यास उठतील.

३.जे सुज्ञ असतील ते अंतराळाच्या प्रकाशासारखे झळकतील; पुष्कळ लोकांना नीतिमत्तेकडे वळवणारे लोक युगानुयुग तार्‍यांप्रमाणे चमकतील.

दानीएल १२:२-३

जेव्हा ख्रिस्त आपल्या पुनरुत्थानाच्या मार्गावर

चालण्यासाठी आपल्याला बोलवितो तेव्हा असे होईल.

२०.तरीपण ख्रिस्त मेलेल्यांतून उठवला गेला आहेच; तो महानिद्रा घेणार्‍यांतले प्रथमफळ असा आहे.

२१.कारण मनुष्याच्या द्वारे मरण आले, म्हणून मनुष्याच्या द्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थानही आले आहे.

२२.कारण जसे आदामामध्ये सर्व मरतात तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील;

२३.पण प्रत्येक आपापल्या क्रमाप्रमाणे, प्रथमफळ ख्रिस्त; मग जे ख्रिस्ताचे ते त्याच्या आगमनकाळी.

२४.नंतर शेवट होईल, तेव्हा सर्व आधिपत्य, सर्व अधिकार व सामर्थ्य ही नष्ट केल्यावर तो देवपित्याला राज्य सोपवून देईल.

२५.कारण आपल्या ‘पायांखाली सर्व शत्रू ठेवीपर्यंत’ त्याला राज्य केले पाहिजे.

२६.जो शेवटला शत्रू नाहीसा केला जाईल तो मृत्यू होय.

२७.कारण “त्याने सर्व अंकित करून त्याच्या पायांखाली ठेवले.” परंतु “सर्व अंकित केले आहे” असे जेव्हा म्हटले तेव्हा, ज्याने त्याला सर्व अंकित करून दिले त्याचा समावेश होत नाही हे उघड आहे.

२८.त्याच्या अंकित सर्वकाही झाले असे जेव्हा होईल तेव्हा, ज्याने सर्व त्याच्या अंकित करून दिले त्याच्या अंकित स्वतः पुत्रही होईल; अशा हेतूने की, देव सर्वांना सर्वकाही व्हावा.1

१ करिंथकरांस पत्र १५ २०-२८

एक नवीन पुनरुत्थानाचे वैभव

जसा प्रौढ स्कॅरब वेगळ्याच तत्वाचा असतो, ज्यातून बदललेल्या अळीच्या अवस्थेत असणाऱ्या कीड्याचे बहीर्वेशन काढल्याने त्याचे वैशिष्ट्ये आणि क्षमता अकल्पनीय असतात, तसेच आपले पुनरुत्थानाचे शरीर आज असलेल्या आपल्या शरीरापेक्षा वेगळे असेल.

२०.आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे; तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत;

२१.ज्या सामर्थ्याने तो सर्वकाही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे त्या सामर्थ्याने तो तुमचेआमचे नीचावस्थेतील शरीर स्वत:च्या गौरवावस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करील.

फिलिप्पैकरांस पत्र ३:२०-२१

३५. आता कोणी म्हणेल, “मेलेले कसे उठवले जातात व ते कोणत्या प्रकारच्या शरीराने येतात?”

३६. हे निर्बुद्ध मनुष्या, जे तू स्वतः पेरतोस ते मेले नाही तर ते जिवंत केले जात नाही;

३७. आणि तू पेरतोस ते पुढे आकारित होणारे अंग पेरत नाहीस, तर नुसता दाणा, तो गव्हाचा किंवा दुसर्‍या कशाचा असेल;

३८.पण देव त्याला आपल्या संकल्पाप्रमाणे अंग देतो. तो बीजातल्या प्रत्येकाला त्याचे अंग देतो.

३९.सर्व देह सारखेच नाहीत; तर माणसांचा देह निराळा, पशूंचा देह निराळा, पक्ष्यांचा देह निराळा व माशांचा देह निराळा.

४०.तशीच स्वर्गीय शरीरे व पार्थिव शरीरे आहेत; पण स्वर्गीयांचे तेज एक आणि पार्थिवांचे एक.

४१.सूर्याचे तेज निराळे, चंद्राचे तेज निराळे, तार्‍यांचे तेज निराळे; कारण तार्‍यातार्‍यांच्या तेजांत भेद आहे.

४२. तसे मेलेल्यांचे पुनरुत्थान आहे. जे विनाशीपणात पेरले जाते, ते अविनाशीपणात उठवले जाते;

४३.जे अपमानात पेरले जाते, ते गौरवात उठवले जाते, जे अशक्तपणात पेरले जाते, ते सामर्थ्यात उठवले जाते;

४४.प्राणमय1 शरीर असे पेरले जाते, आध्यात्मिक शरीर असे उठवले जाते. जर प्राणमय शरीर असेल तर आध्यात्मिक शरीरही आहे.

४५.त्याप्रमाणे असा शास्त्रलेख आहे की, “पहिला मनुष्य आदाम जिवंत प्राणी असा झाला;” शेवटला आदाम जिवंत करणारा आत्मा असा झाला.

४६.तथापि जे आध्यात्मिक ते प्रथम नाही; प्राणमय ते प्रथम, मग जे आध्यात्मिक ते.

४७.पहिला मनुष्य भूमीतून म्हणजे मातीचा आहे, दुसरा मनुष्य [प्रभू] स्वर्गातून आहे.

४८.तो जसा मातीचा होता तसे जे मातीचे तेही आहेत, आणि तो स्वर्गातला जसा आहे तसेच जे स्वर्गातले तेही आहेत.

४९.आणि जो मातीचा त्याचे प्रतिरूप जसे आपण धारण केले तसे जो स्वर्गातला त्याचेही प्रतिरूप धारण करू.

राजाच्या आगमणासमयी

१ करिंथकरांस पत्र १५: ३५-४९

असे त्याच्या परत येण्याने होईल.

१३.बंधुजनहो, झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही अजाण नसावे अशी आमची इच्छा आहे, ह्यासाठी की, ज्यांना आशाच नाही अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये.

१४.कारण येशू मरण पावला व पुन्हा उठला असा जर आपला विश्वास आहे तर त्याप्रमाणे येशूच्या द्वारे जे झोपी गेले आहेत त्यांना देव त्याच्याबरोबर आणील.

१५.प्रभूच्या वचनावरून आम्ही हे तुम्हांला सांगतो की, प्रभूचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत असे उरू ते आपण झोपी गेलेल्यांच्या आघाडीस जाणारच नाही.

१६.कारण आज्ञाध्वनी, आद्यदिव्यदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल; आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील.

१७.नंतर जिवंत उरलेले आपण त्यांच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघांरूढ असे अंतराळात घेतले जाऊ, आणि तसेच सदासर्वदा प्रभूजवळ राहू.

१८.म्हणून ह्या वचनांनी एकमेकांचे सांत्वन करा.

१ थेस्सलनीकरांस ४: १३-१८

कर्क राशीचे राशिफल

‘राशिफल’ हे नाव ग्रीक ‘होरो’ (तास) या शब्दापासून  आले आहे आणि त्याचा अर्थ विशेष तासाला किंवा समयाला चिन्हांकित (स्कोपस) करते.  येशूने कर्क राशीचा तास (होरो) खालीलप्रमाणे चिन्हांकित केला आहे.

२४.मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही, तो मरणातून जीवनात पार गेला आहे.

२५.मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो की, मेलेले लोक देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील व जे ऐकतील ते जिवंत होतील, अशी वेळ येत आहे, किंबहुना आता आलीच आहे.

२६.कारण पित्याच्या ठायी जसे स्वतःचे जीवन आहे तसे पुत्राच्या ठायीही स्वत:चे जीवन असावे असे त्याने त्याला दिले;

योहान ५:२४-२६

अशी विशिष्ट वेळ येत आहे ज्याने बोलण्याने जगाला अस्तित्वात आणले तो पुन्हा बोलणार आहे. जे ऐकतात ते मेलेल्यांतून उठतील.कर्क हे या ताऱ्यांमध्ये पूर्वजांनी वाचलेल्या पुनरुत्थानाच्या घटकाचे प्रतीक होते. मेलेल्यांतून पुन्हा उठेल.

आपले कर्क राशीचे वाचन

आपण आज कर्क राशीफल खालीलप्रमाणे लागू करू शकता.

कर्क राशी तुम्हाला पुनरुत्थानाच्या दिवसाची अपेक्षा करत राहण्यास सांगत आहे. जे म्हणतात की पुनरुत्थान नाही असे म्हणणाऱ्यांना तुम्हास मूर्ख बनवू देऊ नका. जर आपण खाणे, पिणे आणि इथे आता चांगला वेळ घालवण्यासाठी जगत असाल तर तुम्ही फसविले जाल. जर आपण संपूर्ण जग मिळविले आणि प्रेमी, आनंद आणि उत्साहाने भरले आणि आपण आपला आत्मा गमावला तर आपल्याला काय लाभ?

म्हणून ठाम उभे रहा.कोणासही तुम्हाला डगमगू देऊ नका. आपले डोळे दिसणाऱ्या नाही, तर न दिसणाऱ्या गोष्टींवर केंद्रीत करा. जे डोळ्यांनी दिसते ते क्षणभंगुर आहे, परंतु जे डोळ्यांनी दिसत नाही ते  सार्वकालिक आहे. न पाहीलेल्या जगात झोपेत असलेला समुदाय तुम्हाबरोबर आपणास बोलावण्याच्या हाकेची वाट पाहत आहे. न दिसणाऱ्या गोष्टींना पाहण्यासाठी  अडथळा आणणारी प्रत्येक गोष्ट फेकून द्या आणि सहजतेने गुंतवणारे पाप सोडून द्या. मग विश्वासाचा उत्पन्न करता आणि पुरक जिवंत कोकरा याच्याकडे डोळे लावत आपल्यासाठी सिध्द केलेल्या शर्यतीत दृढ धैर्याने धावा. त्याच्या समोर आनंद असता. त्याने वधस्तंभावरील मरण सहण केले, लज्जास्पद वागणूक सहण करून देवाच्या सिंहासनाच्या उजवीकडे बसला. ज्याने पाप्यांनी केलेल्या अशा विरोधाचा सामना केला त्याचा विचार करा, जेणेकरुण तुम्ही हताश होऊ नये आणि तुमची मने खचू नये.

पुढील राशिचक्राची कथा आणि कर्क राशीची सखोलता

पुनरुत्थानाद्वारे देव आपली सुटका करून घेईल हे सूचित करण्यासाठी तारणाकर्त्याने कर्क राशी बराच काळ पूर्वी स्थित केली होती. राशिचक्रातील कथा सिंह राशीद्वारे समाप्त झाली

येथे प्राचीन ज्योतिष्य ज्योतिषाचा आधार जाणून घ्या. कन्या राशीद्वारे झालेल्या त्याच्या सुरुवातीचे वाचन करा.

परंतु कर्क राशीशी संबंधित पुढील लेख देखील वाचा

पुस्तक म्हणून राशिचक्र अध्यायांचे पीडीएफ डाउनलोड करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *