Skip to content

प्राचीन राशीचा आपला लिओ रासी

  • by

लियो हा सिंहासाठी लॅटीन शब्द आहे. आधुनिक ज्योतिष कुंडलीच्या प्राचीन राशीचक्रातील वाचनात सिंह राशीसाठी आपण प्रेम, चांगले भाग्य, आरोग्य  आणि आपल्या कुंडलीद्वारे आपल्या व्यक्तिमत्त्वाबद्दल अंतर्दृष्टी मिळविण्यास राशीफलाच्या सल्ल्याचे अनुसरण करता.

पण प्राचीन लोकांनी अशाप्रकारे सिंह राशीचे वाचन केले का?

मुळात याचा अर्थ काय होता?

सावध व्हा! याचे उत्तर दिल्यास अनपेक्षित मार्गाने तुमची ज्योतिष्य उघडले जाईल-  तुम्ही वेगळ्या प्रवासाला जाल, तेव्हा तुम्ही तुमच्या राशीफलाच्या चिन्हांना तपासण्याचे ठरवाल…

आम्ही प्राचीन ज्योतिष्यचा शोध लावला, कन्या राशीपासून ते कर्क राशीपर्यंत प्राचिन कुंडलीची तपासणी केल्यावर, आपण त्याचा समारोप सिंह किंवा सिम्हा या राशीने करतो. 

सिंह राशीच्या नक्षत्राचे ज्योतिष्य

सिंह तयार करणाऱ्या  ताऱ्यांच्या नक्षत्रातील हे चित्र पाहा.  ताऱ्यांमध्ये सिंहासारखे काहीतरी दिसत आहे का?

सिंह राशीच्या नक्षत्राचे चित्र. आपण सिंहाला पाहू शकता?

जर आपण  तार्‍यांना ओळींत कर्क राशीत जोडले तरी एक सिंह ‘दिसणे’ कठीण आहे.

रेषांनी जोडलेल्या ताऱ्यांचे सिंह नक्षत्र आणि त्यांची नावे

येथे उत्तर गोलार्धात सिंह असल्याचे दर्शविणार्‍या राशीचक्राच्या नॅशनल जिओग्राफिकने सादर केलेले चित्र.

सिंह राशीला वर्तुळ केलेला नॅशनल जिओग्राफिकचा ताऱ्यांचा तक्ता

यावरून लोकांनी प्रथम सिंहाची प्रतिमा  कशी घेतली? परंतु मानवी इतिहासाबद्दल जेवढे आपल्याला माहीत आहे तेवढे सिंह राशी  मागे जाते..

इतर सर्व राशी नक्षत्रांप्रमाणेच या नक्षत्रातही सिंहाची प्रतिमा स्पष्ट दिसत नाही. मात्र सिंहाची कल्पना प्रथम आली.  प्रथम ज्योतिष्यांनी चिन्ह म्हणून ज्योतिषशास्त्राद्वारे ताऱ्यांवर याची प्रतिमा रेखाटली.  त्यामुळे  प्राचीन लोक त्यांच्या मुलांना सिंहाचे नक्षत्र दर्शवू शकत होते आणि त्यास त्यासंबंधित कथा सांगू शकत होते. 

का? पूर्वजांसाठी याचा काय अर्थ होता?

राशिचक्राच्या नक्षत्रातील सिंह

सिंह राशीच्या काही सामान्य ज्योतिष्य प्रतिमा आहेत.

ताऱ्यांमधील सिंह
सिंह झडप घालण्यास तयार आहे

लाल वर्तुळातील सिंहाचे इजिप्तच्या देंडेरा मंदिर राशिचक्रामध्ये निरीक्षण करा.

इजिप्तच्या प्राचीन देंडेरा राशिचक्रातील सिंह

प्राचीन कथेतील सिंह राशी 

आम्ही पाहतो की बायबलमधील प्राचीन पुस्तकांमध्ये असे म्हटले आहे की निर्माणकर्त्याने नक्षत्र बनवले. त्याने १२ नक्षत्रांद्वारे आपली कथा सांगण्यासाठी राशिचक्रांची रचना केली. अशाप्रकारे प्रथम मनुष्याने त्यांना आपल्या वंशजांना या योजनेबद्दल सुचित करण्यास शिकविले.

सिंह राशीद्वारे कथेचा समारोप झाला.  तर जरी आपण आधुनिक कुंडलीच्या अर्थाने सिंह राशीत ‘नाही’, तरी सिंह राशीची प्राचीन ज्योतिष्य कथा जाणून घेण्यासारखी आहे.

सिंह राशीचा प्राचीन अर्थ

जुन्या करारात, याकोबाने यहूदा वंशाबद्द्ल ही भविष्यवाणी केली.

९.यहूदा सिंहाचा छावा आहे; माझ्या पुत्रा, तू शिकार करून डोंगरात गेला आहेस; तो सिंहासारखा, सिंहिणीसारखा दबा धरून बसला आहे, त्याला कोण छेडणार?

१०.यहूदाकडचे राजवेत्र ज्याचे आहे तो येईपर्यंत1 ते त्याच्याकडून जाणार नाही, राजदंड त्याच्या पायांमधून ढळणार नाही; राष्ट्रे त्यांची आज्ञांकित होतील.

उत्पत्ती ४९:९-१०

याकोबाने घोषित केले की एक शासक येईल, ज्याला ‘तो’ सिंहाच्या रुपात चित्रित केल्या जाईल. त्याच्या राज्यात ‘राष्ट्रांचा’  समावेश होईल आणि तो इस्त्राएलाच्या यहुदा वंशातून येईल.  ख्रिस्त म्हणून अभिषिक्त झालेला येशु, यहुदा वंशातून आला. परंतु त्याने राज्यकर्त्याचा ‘राजदंड’ निवडला नाही. जेव्हा तो येईल आणि सिंहाप्रमाणे राज्य करेल, त्या त्याच्या आगमनासाठी त्याने गोष्टी राखून ठेवल्या. सुरुवातीपासूनच अशाप्रकारे सिंहाला चित्रित केले आहे.

भविष्यात सिंह राशीचा खुलासा

हे येणाऱ्या गोष्टीकडे लक्ष देऊन सिंह पवित्र गुंडाळी उघडत असल्याचे वर्णन केले आहे.

देवाच्या कोकर्‍याचा साक्षात्कार

१.‘जो राजासनावर बसलेला होता’ त्याच्या उजव्या हातात ‘पाठपोट लिहिलेली’ व सात शिक्के ‘मारून बंद केलेली पुस्तकाची एक गुंडाळी’ मी पाहिली;

२.आणि “गुंडाळीवरचे शिक्के फोडून ती उघडण्यास कोण योग्य आहे?” असे मोठ्याने पुकारणारा एक बलवान देवदूत मी पाहिला.

३.तेव्हा स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पृथ्वीखाली कोणीही ती गुंडाळी उघडण्यास किंवा तिच्यात पाहण्यास समर्थ नव्हता.

४.ही गुंडाळी उघडण्यास किंवा तिच्यात पाहण्यास योग्य असा कोणी आढळला नाही म्हणून मला फार रडू आले.

५.तेव्हा वडीलमंडळापैकी एक जण मला म्हणाला, “रडू नकोस; पाहा, ‘यहूदा’ वंशाचा ‘सिंह’, दाविदाचा ‘अंकुर’ ह्याने जय मिळवला; म्हणून तो तिचे सात शिक्के फोडून ती उघडण्यास योग्य ठरला आहे.”

प्रकटीकरण ५: १-५

आपल्या पहिल्या येण्याने सिंहाने आपल्या शत्रूवर विजय मिळविला  आणि म्हणूनच आता तो शेवटच्या दिवशी ती मोहर उघडू शकेल. सिंहाने त्याचा शत्रू हायड्रा सर्प याला तुडवत, हे प्राचिन राशीचक्रात नोंद केलेले आपण पाहतो.

प्राचीन देंडेरा येथे सिंह लियो सर्पाला पायदळी तुडवत आहे
मध्ययुगीन चित्रामध्ये हायड्रावर सिंह झडप घालत आहे
नक्षत्रांचे रेखाटन. सिंह सर्पाचे डोके पकडणार आहे

राशिचक्राच्या कथेचा निष्कर्ष

सर्पाशी सिंहाने केलेल्या संघर्षामागील हेतू फक्त त्याला पराभूत करण्याचा नव्हता, तर राज्य करण्याचा होता. या शब्दांद्वारे लिखाणाने सिंहाच्या  शासणाचे चित्रण केले.

नवे आकाश व नवी पृथ्वी

१.नंतर मी ‘नवे आकाश व नवी पृथ्वी’ ही पाहिली; पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नाही.

२.तेव्हा मी ‘पवित्र नगरी, नवी यरुशलेम’, देवापासून स्वर्गातून उतरताना पाहिली. ती नवर्‍यासाठी ‘शृंगारलेल्या नवरीप्रमाणे’ सजवलेली होती.

३.आणि मी राजासनातून आलेली मोठी वाणी ऐकली, ती अशी : “‘पाहा,’ देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे, त्यांच्याबरोबर ‘देव आपली वस्ती करील; ते त्याचे लोक होतील, आणि’ देव स्वतः ‘त्याच्याबरोबर राहील.’

४.‘तो’ त्यांच्या डोळ्यांचे ‘सर्व अश्रू पुसून टाकील;’ ह्यापुढे मरण नाही; ‘शोक, रडणे’ व कष्ट हे नाहीत; कारण ‘पहिल्या गोष्टी’ होऊन गेल्या.”

५.तेव्हा ‘राजासनावर बसलेला’ म्हणाला, “‘पाहा, मी’ सर्व गोष्टी ‘नवीन करतो.”’ तो म्हणाला, “लिही; कारण ही वचने विश्वसनीय व सत्य आहेत.”

६.तो मला म्हणाला, “झाले! मी अल्फा व ओमेगा, म्हणजे प्रारंभ व शेवट आहे. मी ‘तान्हेल्याला जीवनाच्या’ झर्‍याचे ‘पाणी फुकट’ देईन.

७.जो कोणी विजय मिळवतो त्याला ह्या गोष्टी वारशाने मिळतील; ‘मी त्याचा देव होईन, आणि तो माझा पुत्र होईल.’

प्रकटीकरण २१:१-७

२२.त्यात मंदिर माझ्या पाहण्यात आले नाही; कारण सर्वसमर्थ प्रभू देव व कोकरा हेच तिचे मंदिर होते.

२३.नगरीला ‘सूर्यचंद्राच्या प्रकाशाची’ आवश्यकता नाही; कारण ‘देवाच्या तेजाने’ ती ‘प्रकाशित केली आहे;’ आणि हाच कोकरा तिचा दीप आहे.

२४.‘राष्ट्रे’1 तिच्या ‘प्रकाशाने चालतील आणि पृथ्वीवरील राजे’ आपले ‘वैभव’ व सन्मान तिच्यात आणतात.

२५.तिच्या ‘वेशी दिवसा बंद होणारच नाहीत; रात्र’ तर तेथे नाहीच.

२६.‘राष्ट्राचे वैभव’ व प्रतिष्ठा तिच्यात आणतील;

२७.‘तिच्यात कोणत्याही निषिद्ध गोष्टी’ आणि अमंगळपणा व असत्य आचरणारा इसम ह्यांचा ‘प्रवेश होणारच नाही’ तर कोकर्‍याच्या ‘जीवनाच्या पुस्तकात लिहिलेल्या लोकांचा’ मात्र होईल.

प्रकटीकरण २१:२२-२७

राशिचक्रातील चिन्हे पूर्ण झाली आहेत

या दृष्टांतात, आम्ही प्राचीन राशीचक्राच्या कथेची पूर्तता आणि पूर्णता पाहतो. आम्ही वधू आणि तिचा वर यास पाहतो; देव आणि त्याची मुले –  मिथून मधील दुहेरी बाजूची प्रतिमा.  कुंभ राशीमध्ये अभिवचन दिलेली – पाण्याची नदी आम्ही पाहतो. मीन राशीच्या आसपासच्या पट्ट्यात चित्रित केलेला – मृत्युचा जुना क्रम –  आता पुन्हा राहीला नाही. मेष राशीत चित्रित केलेला– कोकरा तेथे आहे, आणि त्याच्या बरोबर राहणारे –पुनरुत्थित लोक – कर्क राशीमध्ये चित्रित केले गेले आहेत. ‘अशुद्ध कधीच प्रवेश करणार नाही’ कारण तुळ राशीचे  राशिचे तराजू संतुलित झाले आहेत. आम्ही तेथे सर्व राष्ट्रांचे राजांना, राजांचा राजा आणि प्रभुंचा प्रभु, ख्रिस्त यांच्या अधिपत्याखाली राज्य करीत असल्याचे पाहिले , ज्याने कन्या राशीचे बीच म्हणून आरंभ केला आणि आता शेवटी सिंह म्हणून प्रगट होईल.

राशिचक्र कथेमध्ये खंडणी आवश्यक आहे

पण सिंह अगदी सुरुवातीला सर्प सैतानाचा नाश का करु शकला नाही? सर्व राशीचक्रातील अध्यायांतून का जातात? जेव्हा येशूला त्याचा शत्रू  वृश्चिकाचा  सामना करावा लागला, तेव्हा त्या घटकेला त्याबरोबर त्याने चिन्हांकित केले

३१.आता ह्या जगाचा न्याय होतो, आता ह्या जगाचा अधिकारी बाहेर टाकला जाईल;

योहान १२:३१

या जगाचा अधिपती सैतान आपल्याला मानवी ढाल म्हणून वापरत होता. शक्तिशाली सैन्य दलाशी सामना झाल्यावर दहशतवादी सहसा नागरिकांच्या मागे लपून बसतात. दहशतवाद्यांना बाहेर काढताना सामान्य नागरिक त्याच्या द्वारे मारले जातील यामुळे पोलिसांना कोंडी निर्माण होते. जेव्हा सैतान आदामाला मोहात पाडण्यात यशस्वी झाला तेव्हा त्याने स्वतःसाठी मानवी कवच ​​तयार केले. सैतानाला हे ठाऊक होते की निर्माता पूर्णपणे न्यायी आहे आणि जर त्याने त्या पापाची शिक्षा केली तर त्याचा न्याय योग्य असेल तर त्याने सर्व पापाचा न्याय केला पाहिजे. जर देवाने सैतानाचा नाश केला तर सैतान (ज्याचा अर्थ दोष देणारा) आपल्या स्वतःच्या पापाचा दोष आपल्यावर देखील लावील आणि आपणही त्याच्याबरोबर नाश  केले जावू. हे दुसर्‍या मार्गाने पाहीले तर, आमच्या आज्ञाभंगाने आम्हाला सैतानाच्या कायदेशीर नियंत्रणामध्ये आणले असे दिसते. जर देवाने त्याला नष्ट केले तर त्याने आपला नाश देखील केलाच पाहिजे कारण सैतानाने आपल्याला देवाच्या नियमांचे उल्लंघन करताना पकडले आहे.

म्हणूनच सैतानाच्या मागणीवर आपल्याला खंडणीची गरज होती, जेणेकरून त्याला दिलेली कोणतीही शिक्षा आपल्यावरही आली पाहिजे. आपल्याला पापापासून मुक्त करण्यासाठी कोणाचीतरी गरज होती. शुभवर्तमान त्याचे या प्रकारे स्पष्टीकरण करते:

१.तुम्ही आपले अपराध व आपली पातके ह्यांमुळे मृत झालेले होता;

२.त्या पातकांमध्ये तुम्ही पूर्वी चालत होता, अर्थात ह्या जगाच्या रहाटीप्रमाणे अंतरिक्षातील राज्याचा अधिपती म्हणजे आज्ञा मोडणार्‍या लोकांत आता कार्य करणार्‍या आत्म्याचा अधिपती ह्याच्या धोरणाप्रमाणे चालत होता.

३.त्या लोकांत आपणही सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनांना अनुरूप असे वागलो, आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छांप्रमाणे करत होतो व स्वभावतः इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो.

इफिस २:१-३

वधस्तंभावरील खंडणीची प्राप्ती

मकर राशीत चित्रित केलेल्या त्याच्या बलिदानात येशूने हा क्रोध स्वतःवर घेतला. त्याने खंडणी भरली म्हणून आपण मुक्त होऊ शकलो.

४.तरी देव दयासंपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे,

५.ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले, (कृपेने तुमचे तारण झालेले आहे);

६.आणि ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्याचबरोबर उठवले व त्याच्याचबरोबर स्वर्गात2 बसवले;

७.ह्यासाठी की, ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्या तुमच्या-आमच्यावरील ममतेच्या द्वारे येणार्‍या युगात त्याने आपल्या कृपेची अपार समृद्धी दाखवावी.

८.कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे;

९.कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही.

इफिस २: ४-९

देवाची इच्छा नाही की लोकांचा न्याय करावा. त्याच्या शत्रू सैतान याच्यासाठी त्याने तो ठरविला आहे (सैतान म्हणजे ‘शत्रू).  परंतु जर त्याने त्याच्या बंडखोरीमुळे सैतानाचा नाश केला तर मग इतरांनाही दोषी ठरवून त्याने तसे केले पाहिजे.

४१.मग डावीकडच्यांनाही तो म्हणेल, ‘अहो शापग्रस्तहो, माझ्यापुढून निघा आणि सैतान व त्याचे दूत ह्यांच्यासाठी जो सार्वकालिक अग्नी सिद्ध केला आहे त्यात जा.

मत्तय २५:४१

म्हणूनच येशूने वधस्तंभावर मोठा विजय मिळविला. सैतानाने आपल्यावर जो कायदेशीर अधिकार केला त्यापासून त्याने आपल्याला मुक्त केले. तो आता आपल्यावरही प्रहार न करता सैतानाला मारू शकतो. परंतु सैतानाच्या साम्राज्यातून आपण या सुटकेची निवड केली पाहिजे. सिंह सध्या सर्पावर वार करण्यापासून रोखत आहे जेणेकरून लोक त्या न्यायापासून सुटू शकतील.

९.कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करतो; कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्‍चात्ताप करावा अशी आहे.

२ पेत्र ३:९

म्हणूनच आज आपण स्वतःला धनु राशीत चित्रित केलेल्या सैतानाविरुध्द अंतिम संघर्षाची प्रतिक्षा करत असलेले, आणि  वृषभ राशीत चित्रत केल्याप्रमाणे अंतिम न्यायाची वाट पाहात असलेले असे आम्ही स्वत:ला पाहतो.

१०.तरी रात्री चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल; त्या दिवशी आकाश मोठा नाद करत नाहीसे होईल, सृष्टितत्त्वे तप्त होऊन लयास जातील, आणि पृथ्वी व तिच्यावरील गोष्टी उघडकीस येतील.1

२ पेत्र ३: १०

सिंह राशीचे राशिफल

राशीफल हा शब्द ग्रीक शब्द ‘होरो’ (तास) यापासून आला आहे आणि म्हणून याचा अर्थ विशिष्ट तास (स्कॉपस) चिन्हांकित करतो. हे लिखाण सिंह राशीच्या तासाला (होरो) खालील पध्दतीने चिन्हांकित करते.

११.समय ओळखून हे करा, कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे; कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता आपल्या जवळ आले आहे.

रोमकरांस पत्र १३:११

हे घोषित करते की आम्ही जळत असलेल्या इमारतीत झोपलेल्या लोकांसारखे आहोत.आपल्याला ! या तासाला (होरो) जागे होण्याची गरज आहे.

का?

कारण जेव्हा गर्जना करणारा सिंह येईल तेव्हा तो त्या प्राचीन सर्पावर आणि त्याच्या कायदेशीर सत्ता असलेल्या सर्वांचा नाश करील. विनाश आपल्या मुखाकडे एकटक पाहत आहे.

आपले सिंह राशीचे वाचन

आपण या प्रकारे सिंह राशिफल वाचन लागू करू शकता

सिंह राशी आपल्याला सांगतो की होय, असे काही लोक आहेत जे चेष्टा करतात आणि स्वत: च्या वाईट वासनांच्या मागे लागतात. ते म्हणतात, त्याने  ‘येण्याचे’  अभिवचन दिले आहे तो कोठे आहे? जेव्हा आमचे पूर्वज मेले तेव्हापासून सृष्टीच्या काळापासून सर्व काही तसेच चालू आहे. परंतु ते मुद्दाम विसरतात की देव या जगाच्या प्रत्येक गोष्टीचा न्याय करेल आणि त्यांचा नाश करील.

जर अशाप्रकारे सर्व काही नष्ट झाले तर, आपण कोणत्या प्रकारचे लोक असले पाहिजे?

आपण देवाच्या दिवसाची वाट पाहत आहात आणि तो लवकर  येण्याआधी आपण पवित्र आणि धार्मिक जीवन जगले पाहिजे. त्या दिवशी आगीने आकाशाचा नाश होईल आणि उष्णतेमध्ये घटक वितळतील. परंतु त्याच्या अभिवचनाचे पालन केल्याने आपल्याला नवीन स्वर्ग आणि नवीन पृथ्वीची प्रतीक्षा करण्याची आवश्यकता आहे, जिथे धार्मिक लोक  वास करतील. म्हणूनच आपण याकडे पहात असल्यामुळे दागविरहीत, दोषरहित असण्याचा व त्याच्याशी शांतीने राहण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा की आपल्या प्रभूच्या संयम म्हणजे आपल्यासाठी आणि आपल्या आसपासच्या लोकांचे तारण होणे आहे. तुम्हाला अगोदरच इशारा देण्यात आला आहे म्हणून तुम्ही सावध राहा यासाठी की तुम्ही नियमशास्त्राच्या विरुध्द जाऊ नये व आपल्या सुरक्षित स्थरावरून पडून पतन पाऊ नये.

येथे प्राचिन जोतिष्य ज्योतिषाचा आधार जाणून घ्या. कन्या राशीपासून  त्याच्या आरंभाचे वाचन करा..

सिंह राशीतील सखोलता

पण सिंह राशीच्या लिखित कथेत अधिक सखोल जाण्यासाठी:

पुस्तक म्हणून राशिचक्र अध्यायांचे पीडीएफ डाउनलोड करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *