सुर्वाता कथेत तुळशी विवाहाचे चित्रण कसे केले आहे?

  • by

तुळशी विवाह हा सण भगवान शालिग्राम (विष्णू) आणि लक्ष्मी यांच्यात तुळशी (तुळस) वनस्पतीच्या रूपात प्रेमाचे स्मरण करणारा उत्सव आहे. अशा प्रकारे तुळशी विवाह हे तुळशीचे रोप, लग्न आणि एक पवित्र दगड (शालिग्राम) यावर केंद्रित आहे. या सणामागे एक पौराणिक कथा आहे आणि पाळल्या जाणार्‍या चालीरीती आजही भाविक पाळतात. परंतु हे सुर्वातेचे एक उल्लेखनीय चित्र देखील प्रदान करते,  कारण विवाह, पवित्र दगड आणि एक       उभी वनस्पती या सुर्वाता कथेच्या प्रमुख प्रतिमा आहेत. आम्ही ते खाली येथे पाहतो.

 तुळशी विवाह संबंधी पौराणिक कथा

तुळशीविवाह मंदिरात तुळशीच्या रोपाने भर दिला

देवी भागवत पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण और शिव पुराणात तुळशी विवाहाशी संबंधित पौराणिक स्त्रोत उपलब्ध आहेत. या पुराणांमध्ये तुळशी विवाहाशी संबंधित अनेक घटनांच्या एका श्रृंखलेचे वर्णन केले आहे. वृंदा (किंवा ब्रिंदा) नावाच्या लक्ष्मीच्या स्त्री अवताराने असुर राजा जालंधर याच्याशी लग्न केले. विष्णूचा भक्त असल्याने, विष्णूने राजा जालंधरला युद्धात अजिंक्य होण्याचे वरदान दिले. अशा प्रकारे देव त्याच्याशी आणि राजाशी लढाया हरत राहिले आणि राजा जालंधर गर्विष्ठ झाला.

पवित्र शालिग्राम दगड हे अमोनाइटचे जीवाश्म आहेत जे विष्णूचे मानवेतर चित्रण म्हणून वापरले जातात

 त्यामुळे राजा जालंधरने आपली अजिंक्य गुणवत्ता गमावावी अशी विष्णूची इच्छा होती, परंतु ब्रह्मदेवाने विष्णूला सांगितले की असे करण्यासाठी, त्याला वृंदाबरोबर जालंधरची शुद्धता मोडावी लागेल. म्हणून जेव्हा जालंधर युद्धात निघून गेला तेव्हा विष्णूने त्याचे रूप धारण केले आणि वृंदाला फसवून त्याच्याबरोबर तिचे पावित्र्य गमावले. अशाप्रकारे जालंधराने शिवासोबतच्या युद्धात आपले अजिंक्य गुण (आणि त्याचे डोके) गमावले. फसवणुकीची माहिती मिळाल्यावर, वृंदाने विष्णूला शालिग्राम बनण्याचा शाप दिला, म्हणजे एक पवित्र काळा दगड ज्यावर विष्णूचे प्रतीक म्हणून जीवाश्म कवचांच्या खुणा आढळतात. यानंतर वृंदाने समुद्रात उडी घेतली आणि तुळशीचे रोप झाले. अशा प्रकारे तिच्या पुढच्या जन्मी वृंदाने (तुळशीच्या रूपात) विष्णूशी (शाळीग्राम म्हणून) लग्न केले. म्हणूनच दरवर्षी प्रबोधिनी एकादशीला भक्त तुळशीचा विवाह शाळीग्रामशी करतात

गंडकी नदीवरील विश्वातील मोठा शालिग्राम दगड  फोटो सौजन्य प्रजीना खातीवाड़ा

 

वृंदा विष्णूला शाप देत असल्याचे चित्रण करणारी पारंपारिक कला

   तुळशी विवाह सोहळा

तुळशी विवाह मंदिर तुळशीचे रोप आणि शालिग्राम दगड विवाहाचे चित्रण करते

लग्नाशी घनिष्ठ संबंध असल्यामुळे, तुळशी विवाह नेपाळ आणि भारतामध्ये लग्नाच्या हंगामाचे शुभारंभ करतो. भक्त प्रबोधिनी एकादशी आणि कार्तिक पौर्णिमा – कार्तिक महिन्याची पौर्णिमा (सामान्यतः पश्चिम दिनदर्शिकेमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान येते) तुळशी विवाह विधी पूर्ण करतात. तुळशीला विष्णुप्रिया या नावाने देखील ओळखले जाते, ज्याचा अर्थ भगवान विष्णूची सर्वात प्रिय आहे. प्रत्येक हिंदू घराण्यात तीचा आदर आहे, परिणामी ती सर्व वनस्पतींमध्ये सर्वात पवित्र वनस्पती बनली आहे. तुळशीचे रोप आपल्या घरी ठेवणे आणि त्याची पूजा करणे हे भाविक खूप शुभ मानतात. तुळशी विवाह उत्सवात, तुळशीच्या रोपाचा भगवान विष्णूशी विधीपूर्वक विवाह केला जातो. प्रत्येक समाजाच्या चालीरीतींनुसार पूजेची पद्धत प्रदेशानुसार वेगळी असू शकते.

तुळशी विवाह आणि सुवार्ता विवाह

तुळशी विवाहाची पौराणिक कथा आणि रीतिरिवाज अनेकांना माहीत असले तरी,  सुर्वाता कथेतील त्याच्या प्रतीकाबद्दल कमी माहिती आहे. सुवार्तेचे स्पष्टीकरण देण्यासाठी बायबलमधील सर्वात स्पष्ट चित्र  विवाहाचे आहे.  हे लग्न शक्य झाले कारण वर, नासरेथच्या येशूने आपली वधू विकत घेण्यासाठी हुंडा किंवा किंमत दिली.  ही वधू संस्कृति, शिक्षा, भाषा, जात, सर्व लोंक यांचा समावेश करते जे या जगातील पतन आणि क्षय टाळण्यासाठी लग्नाचे प्रस्ताव स्वीकारतात. येशूचे सर्वोच्च बलिदान – वधस्तंभावर सर्वांसाठी मरण – आणि   मृत्युतुन पुनरुत्थानाने  हुंड्याची किंमत मोजली, आगामी विवाहासबंधी येथे  सखोल स्पष्टीकरण खाली वाचा.

एक रोपटे म्हणून

परंतु त्याच्या जन्माच्या शेकडो वर्षांपूर्वी त्याच्या मृत्यूची आणि पुनरुत्थानाची भविष्यवाणी करण्यात आली होती, जेव्हा प्राचीन इब्री वेदांच्या ऋषींनी किंवा संदेष्ट्यांनी  त्याचे आगमन एक मेलेल्या खोडातून नम्रपणे उगवलेल्या धुमाऱ्याप्रमाणे निघणाऱ्या रोपट्याच्या रूपात केले आहे. हे अंकुरलेले रोप अजिंक्य असेल आणि मोठे झाड होईल.

आणि एक दगड म्हणून

ऐतिहासिक समयरेषामध्ये ऋषि दावीद आणि अन्य इब्री ऋषि (संदेष्टे)

प्राचीन ऋषींनी वापरलेले आणखी एक चित्र म्हणजे कठीण दगडाचे. ज्यासाठी दावीद ऋषींनी फार पूर्वी लिहिले होते…

22 बांधणार्‍यांनी नापसंत केलेला दगड कोनशिला झाला आहे.

23 ही परमेश्वराची करणी आहे; ती आमच्या दृष्टीने अद्भुत आहे.

24 परमेश्वराने नेमलेला दिवस हाच आहे. ह्यात आपण उल्लास व आनंद करू.

25 हे परमेश्वरा, आम्ही तुला विनवतो की, आमचे तारण कर. हे परमेश्वरा, आम्ही तुला विनवतो की, आमचा उत्कर्ष कर.

स्तोत्रसंहीता 118:22-25

आलेल्या या माणसाची तुलना दगडाशी करण्यात आली. हा दगड टाकून दिला जाईल पण तरीही तो कोनशिला बनेल (वचन 22). हे सर्व प्रभु देवाच्या योजनेनुसार केले पाहिजे (वचन 23-24).

नावात…

हा दगड कोण असेल? पुढील वचन ‘प्रभू, आम्हाला वाचव’ असे म्हणते. मूळ इब्रीमध्ये येशूच्या नावाचा शाब्दिक अर्थ ‘वाचवणे’ किंवा ‘तारण करणे’ असा होतो, म्हणून हिंदी भाषेत असे लिहिले आहे की आम्हाला वाचव.  आपल्या कोणत्याही भाषेत याचे अचूक भाषांतर ‘प्रभू, येशू’ असे केले जाऊ शकते. आम्हाला ‘येशू’ चा अर्थ समजत नसल्यामुळे आणि आम्ही ते फक्त एक योग्य संज्ञा किंवा नाव म्हणून पाहतो, आम्हाला त्याचा संबंध सहजासहजी दिसत नाही. येशूचे भविष्यसूचक नाव खाली येथे पुर्ण स्पष्ट केले आहे. तर हे स्तोत्र कसे समाप्त होते पाहा,

26 परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित असो. परमेश्वराच्या घरातून आम्ही तुम्हांला आशीर्वाद देतो.

27 परमेश्वर देव आहे, त्याने आपल्याला प्रकाश दिला आहे. उत्सवाचा यज्ञपशू वेदीच्या शिंगांना दोर्‍यांनी बांधा.

28 तू माझा देव आहेस; मी तुझे उपकारस्मरण करीन; हे माझ्या देवा, मी तुझी थोरवी गाईन.

29 परमेश्वराचे उपकारस्मरण करा; कारण तो चांगला आहे. कारण त्याची दया सनातन आहे.

 स्तोत्रसंहीता 118:26-29

ज्या दिवशी आता झावळ्याचा रविवार म्हणून ओळखले जाते जेव्हा त्याने पवित्र शहरात प्रवेश केला त्या दिवशी येशू ‘प्रभूच्या नावाने’ आला.  तेथे त्याला जसे यज्ञ ‘वेदीच्या शिंगाला’ बांधले जातात तसे त्याला बांधले गेले. हे देवाच्या आपल्यावरील प्रेमाचे सनातन प्रदर्शन होते, एक प्रेम जे सदैव टिकते.

ज्योतिष, दुर्गा पूजा आणि रामायण यासह अनेक सांस्कृतिक चिन्हे सुर्वातेची कथा दर्शवतात, परंतु तुळश विवाह, लग्नाशी संबंधित आहे, ज्याचे आपण कौतुक केले पाहिजे.

जेव्हा आपण तुळशी विवाहाचे हे साम्य आणि समांतरता पाहतो, विशेषत: विवाहसोहळ्यांमध्ये, वनस्पती आणि दगडांमध्ये, तेव्हा आपण दोन्ही सणाचा आनंद घेऊ शकतो आणि आपण करत असलेल्या विधी आणि पूजांपेक्षा अधिक खोल असलेल्या प्रतीकात्मक अर्थाकडे पाहू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *