जिवंत पाणी: गंगा येथील तीर्थाच्या भिंगामधून

जर एखाद्यास परमेश्वरास भेटण्याची आशा असेल तर प्रभावी तीर्थ आवश्यक आहे. तीर्थ (संस्कृत तीर्थ) म्हणजे “ओलांडण्याचे स्थान, घाट” आणि पवित्र स्थान असलेल्या कोणत्याही स्थानाचा, मजकूराचा किंवा व्यक्तीचा उल्लेख करते. तीर्थ हा एकमेकांस स्पर्ष करणार्या जगातील एक पवित्र जंक्शन आहे. वैदिक ग्रंथांमध्ये, तीर्थ (किंवा क्षेत्र, गोपीठा आणि महालय) एखाद्या पवित्र व्यक्तीचा, किंवा पवित्र ग्रंथाचा उल्लेख करते, ज्यामुळे अस्तित्वाच्या एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत संक्रमण होऊ शकते.

तीर्थयात्रा म्हणजे तीर्थाशी संबंधित प्रवास

आपल्या अंतःकरणात चैतन्य आणण्यासाठी आणि शुद्ध करण्यासाठी आपण तीर्थयात्रेस जातो, आणि प्रवासामध्ये आत्मिक गुणवत्ता आहे, हा असा विषय आहे ज्याविषयी आणि वैदिक ग्रंथात ठामपणे सांगितले ते ठामपणे सांगतात की तीर्थयात्रा पापांपासून सुटका देऊ शकते. तीर्थयात्रा अंतर्गत ध्यान प्रवासापासून ते प्रख्यात मंदिरांपर्यंत शारीरिकदृष्ट्या प्रवास करणे किंवा सर्वात महत्वाचे तीर्थस्थळ, म्हणजे गंगेसारख्या नद्यांमध्ये स्नान करणे असू शकते. पाणी हे भारतीय परंपरेतील सर्वात पवित्र प्रतीक आहे, विशेषतः गंगेचे पाणी. गंगा नदीची देवी गंगा माता म्हणून पूजली जाते.

तीर्थ म्हणून गंगेचे पाणी

गंगा संपूर्ण लांबीसह पवित्र आहे. गंगा देवीच्या शक्तीतील दैनंदिन विधी, पुराणकथन, उपासनापद्धती आणि आणि तिचे जिवंत पाणी यावर विश्वास आजही भक्तीचे केंद्रबिंदू आहेत. अनेक मृत्यूविधींमध्ये गंगेचे पाणी आवश्यक असते. गंगा अशा प्रकारे जिवंत आणि मृत यांच्यात तीर्थ आहे. स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या तीन जगांत गंगेचे प्रवाह असल्याचे म्हटले जाते, जिचा उल्लेख ज्याला त्रिलोक-पथ-गमिनी असे म्हणतात. अशाप्रकारे ती गंगेच्या त्रिशली (“तीन ठिकाणी”) येथे आहे जेथे सामान्यतः श्राद्ध  आणि विसर्जन केले जाते. अनेकांची इच्छा असते की त्यांची राख गंगा नदीत घालावी.

This image has an empty alt attribute; its file name is ganges-among-the-mountains.jpg

पर्वतामधील गंगा नदी

गंगेची पौराणिक कथा

असे म्हटले जाते की शिव, गंगाधर किंवा ”गंगेचा वाहक“ गंगेचा सोबती आहे. वैदिक ग्रंथांमध्ये गंगेच्या खाली येण्यात शिवाची भूमिका असल्याचे सांगितले आहे. जेव्हा गंगा पृथ्वीवर आली, तेव्हा शिवाने तिला आपल्या डोक्यावर धारण करण्याचे वचन दिले जेणेकरून तिच्या पडण्याने पृथ्वीचा नाश होणार नाही. जेव्हा गंगा शिवाच्या डोक्यावर पडली, तेव्हा शिवाच्या केसांनी तिची गळती तोडली आणि गंगेला सात प्रवाहात मोडले, प्रत्येक भारताच्या वेगवेगळ्या भागात वाहते. म्हणूनच, जर कोणी गंगा नदीची यात्रा करू शकले नाहीत, तर या इतर पवित्र प्रवाहांची यात्रा करू शकतात: यंगुना, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू आणि कावेरी.

गंगेचे पृथ्वीवर उतरणे सतत मानले जाते, पृथ्वीला स्पर्श करण्यापूर्वी गंगेची प्रत्येक लाट शिवाच्या डोक्याला स्पर्श करते. गंगा हा शिवाच्या शक्तीचे किंवा उर्जेचे द्रव रूप आहे. एक द्रव शक्ती असल्याने, गंगा हा भगवंताचा अवतार आहे, ईश्वराचे दिव्य अवतरण, सर्वांसाठी मुक्तपणे वाहणे. तिच्या पृथ्वीवर उतरल्यानंतर, गंगा शिवाचे वाहन बनली, आपल्या हातात कुंभ (विपुलतेचे पुष्पपात्र) धरून ती आपले वाहन (वाहन) मगर यावर (मकर) विराजलेली असल्याचे चित्रण केले गेले आहे.

गंगा दशहरा

दरवर्षी पुराणकथा साजरे करण्यासाठी गंगा दशहरा हा सण गंगेला समर्पित केला जातो. हा उत्सव मे आणि जून महिन्यात दहा दिवस चालतो, आणि ज्येष्ठ महिन्याच्या दहाव्या दिवशी समाप्त होतो. या दिवशी, स्वर्गातून पृथ्वीपर्यंत गंगेच्या उतरण्याचा (अवतरण) उत्सव साजरा केला जातो. त्या दिवशी गंगेच्या पाण्यात किंवा इतर पवित्र प्रवाहांत त्वरित डुबकी घेतल्यास दहा पाप (दशहरा) किंवा पापांच्या दहा जीवनकाळांपासून मुक्ती मिळते.

येशू: तीर्थ तुम्हाला जिवंत पाणी देऊ इच्छितो

स्वतःचे वर्णन करण्यासाठी येशूने यासारख्याच संकल्पनांचा उपयोग केला. त्याने घोषित केले की तोजिवंत पाणीआहे जोसार्वकालिक जीवनदेतो. हे त्याने पापात अडकलेल्या एका स्त्रीला म्हटले आणि अशाच परिस्थितीत असलेल्या आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. वस्तुतः, तो म्हणत होता की तो एक तीर्थ आहे आणि आपण करू शकतो अशी सर्वात महत्वाची तीर्थयात्रा त्याच्याकडे येणे आहे. या स्त्रीला असे आढळले की फक्त दहाच नव्हेत तर, तिची सर्व पापे एकदाची शुद्ध झाली आहेत. आपण शुद्धीकरण शक्तीसाठी गंगाजल मिळविण्यासाठी आपण दूरवर प्रवास करत असाल, तर येशू देऊ करीत असलेलेजिवंत पाणीसमजून घ्या. या पाण्यासाठी तुम्हाला शारीरिक प्रवास करावा लागणार नाही, परंतु स्त्रीला दिसून आल्याप्रमाणे, त्याचे पाणी तुम्हाला शुद्ध करण्यापूर्वी, तुम्हाला आंतरिक सुधातेमध्ये आत्मसाक्षात्काराचा प्रवास करावा लागेल.

शुभवर्तमानात या भेटीची नोंद आहे :

येशू एका शोमरोनी स्त्रीशी बोलतो

रुश्यांनी हे ऐकले की, येशू योहानापेक्षा अधिक लोकांना बाप्तिस्मा देऊन शिष्य करुन घेत आहे.
2 (परंतु खरे पहता, येशू स्वत: बाप्तिस्मा देत नसे, तर न्याचे शिष्य त्याच्या वतीने लोकांना बाप्तिस्मा देत असत.) परुश्यांनी आपणांविषयी ऐकले आहे हे येशूला समजले.
3 म्हणून येशू यहूदीयातून निघून परत गालील प्रांतात गेला.
4 गालीलाकडे जाताना येशूला शोमरोन प्रांतातून जोवे लागले.
5 शोमरोनातील सूखार नावाच्या गावात येशू आला. याकोबाने आपला मुलगा योसेफ याला दिलेल्या शेताजवळ हे गाव आहे.
6 याकोबाची विहीर तेथे होती. लांबच्या प्रवासामुळे येशू थकला होता. म्हणून येशू विहीरीजवळ बसला. ती दुपारची वेळ होती.
7 तव्हा पाणी नेण्यासाठी एक शोमरोनीस्त्री त्या विहीरीवर आली. येशू तिला म्हणाला. “मला प्यावयास पाणी दे.’
8 हे घडले तेव्हा येशूचे शिष्य अन्न विकत घेण्यासाठी गावात गेले होते.
9 ती शोमरोनी स्त्री म्हणाली, “तुम्ही यहूदी आहात आणि मी तर एक शोमरोनी स्त्री आहे. तुम्ही माझ्या हातून पाणी प्यावयास मागता याचे मला मोठे आश्चर्य वाटते.” (यहूदी लोकांचे शोमरोनी लोकांशी सलोख्याचे संबंध नव्हते.)
10 येशूने उत्तर दिले, “देव काय दान देतो याविषयी तुला माहीत नाही आणि तुझ्या हातून पाणि मागणारा कोण हे देखील तुला माहीत नाही. तुला जर या गोष्टी माहीत असत्या तर तूच माझ्याकडे मागितले असतेस. आणि मी तुला जिवंत पाणी दिले असते.”
11 ती म्हणाली, “महाराज, जिवंत पाणी तुम्हांला कोठून मिळणार? विहीर तर फार खोल आहे. आणि पाणी काढण्यासाठी तुमच्याजवळ पोहरा वगैरे काही नाही.
12 आमचा पिता (पूर्वज) याकोब याच्यापेक्षाही तुम्ही मोठे आहात काय? याकोबानेच ही विहीर आम्हांला दिली. ते स्वत: या विहीरीचे पाणी पीत असत, शिवाय त्यांची मुले व गुरेढोरे याच विहीरीचे पाणी पीत असत.”
13 येशू म्हणाला, “जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल.
14 परंतु मी जे पाणी देतो ते पाणी जो पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. मी दिलेले पाणी त्याच्या अंतर्यामी जिवंत पाण्याच्या झऱ्यासारखे होईल. त्या पाण्यामुळे त्याला अनंतकाळचे जीवन मिळेल.”
15 ती स्त्री येशूला म्हणाली, महाराज, “ते पाणी मला द्या, म्हणजे मला पुन्हा तहान लागणार नाही. आणि पाणी आणण्यासाठी मला इकडे परत यावे लागणार नाही.”
16 येशूने तिला सांगितले. “जा, तुझ्या पतीला घेऊन इकडे ये!”
17 ती स्त्री म्हणाली, “मला पती नाही.” येशू तिला म्हणाला, “हे तू बरोबर सांगिलेस की, तुला नवरा नाही.
18 खरे तर तुझे पाच पती झाले, आणि आता तू ज्याच्याबरोबर राहतेस तो तुझा पती नाही. तेव्हा तू मला सत्यच सांगितलेस.”
19 ती स्त्री म्हणाली, “महाराज, मला आता कळले की, तुम्ही एक संदेष्टा आहात.
20 आमचे वाडवडील या डोंगरावर उपासना करीत. परंतु तुम्ही यहूदी लोक म्हणता की, यरुशलेम हीच ती जागा आहे जेथे लोकांनी उपासना केली पाहीजे.”
21 येशू म्हणाला, “बाई, माझ्यावर विश्वास ठेव! अशी वेळ येत आहे की, आपल्या पित्याची (देवाची) उपासना करण्यासाठी यरुशलेमला अगर या डोंगरावर जाण्याची गरज पडणार नाही.
22 जे तुम्हांला समजत नाही त्याची तुम्ही शोमरोनी उपासना करता. आम्ही यहूदी लोक कशाची उपासना करतो हे आम्हांला चांगले कळते, कारण यहूदी लोकांकडूनच तारण येते.
23 असा काळ येत आहे की, खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपालना करतील. तशी वेळ आता आलेली आहे. आणि तशाच प्रकारचे उपासक पित्याला पाहिजेत.
24 देव आत्मा आहे. म्हणून त्याच्या उपासकांनी आत्म्याने व खरेपणाने त्याची उपासना केली पाहिजे.”
25 ती स्त्री म्हणाली, “मशीहा येणार आहे हे मला माहीत आहे. मशीहा येईल तेव्हा तो आम्हांला प्रत्थेक गोष्ट समाजावून सांगेल.”
26 .येशू म्हणाला, “ती व्यक्ति तुझ्याशी आता बोलत आहे. मीच तो मशीहा आहे.”
27 तेवढ्यात येशूचे शिष्य गावातून परत आले. येशू एका बाईशी बोलत आहे हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. परंतु “तुम्हांला काय पाहिजे?” अगर “तुम्ही तिच्याशी का बोलत आहात?” असे त्यांच्यापैकी एकानेही विचारले नाही.
28 मग ती स्त्री आपली पाण्याची घागर तशीच विहिरीवर सोडून परत गावात गेली. तिने गावांतील लोकांना सांगितले,
29 एका मनुष्याने मी आतापर्थेत जे काही केलेले आहे ते सर्व सांगितले. त्याला भेटायला चला. कदाचित तो ख्रिस्त असेल.
30 मग लोक गावातून बाहेर पडले आणि येशूला भेटायला आले.
31 ती स्त्री गावात होती तेव्हा येशूचे शिष्य त्याला विनवणी करु लागले, “गुरुजी, दोन घास खाऊन घ्या!”
32 परंतु येशूने उत्तर दिले. “माझ्याजवळ खावयाला जे अन्न आहे त्याविषयी तुम्हांला काहीच माहिती नाही.”
33 म्हणून शिष्य एकमेकांना विचारु लागले, “येशूला कोणीतरी अगोदरच काही खावयास आणून दिले काय?”
34 येशू म्हणाला, “ज्याने मला पाठवीले त्याच्या ईच्छेप्रमाणे करणे हेच माझे अन्न! त्याने मला दिलेले काम पूर्ण करणे हेच माझे अन्न होय.
35 जेव्हा तुम्ही पेरणी करता तेव्हा तुम्ही नेहमी म्हणता, ‘पीक गोळा करायला अजून चार महिने आहेत.’ परंतु मी तुम्हांला सांगतो, तुम्ही तुमचे डोळे उघडा. लोकांकडे पाहा. पीक तयार असलेल्या शेतांसारखेच ते आहेत.
36 आताही पीक कापणाऱ्या मजुराला मजुरी दिली जात आहे, तो अनंतकाळासाठी पीक गोळा करीत आहे. म्हणून आता पेरणी करणारा कापणी करणारासह आनंदी आहे.
37 ‘एक पेरणी करतो तर दुसरा कापणी’ असे जे आपण म्हणतो ते किती खरे आहे.
38 ज्या पीकासाठी तुम्ही मेहनत केली नाही, त्याची कापणी करण्यासाठी मी तुम्हांस पाठविले. दुसऱ्या लोकांनी काम केले आणि त्यांनी केलेल्या श्रमाचा फायदा तुम्हांस मिळतो.”
39 त्या गावातील पुष्कळ शोमरोनी लोकांनी येशूवर विश्वास ठेवला. त्या स्त्रीने येशूविषयी जे सांगितले त्यावरुन त्यांनी विश्वास ठेवला. तिने त्यांना सांगितले होते, “मी केलेली प्रत्येक गोष्ट त्याने मला सांगितली.”
40 शोमरोनी लोक येशूकडे आले. त्यांनी येशूला त्यांच्याबरोबर राहण्याची विनंती केली. म्हणून येशू तेथे दोने दिवास राहिला.
41 आणखी पुष्कळ लोकांनी येशूच्या शिक्षणामुळे विश्वास ठेवला.
42 ते लोक त्या स्त्रीला म्हणाले, “पहिल्यांदा तू जे आम्हांला सांगितलेस त्यामुळे आम्ही येशूवर विश्वास ठेवला. परंतु आता आम्ही स्वत:च त्याचे बोलणे ऐकले त्यामुळे विश्वास ठेवतो. आता आम्हांला कळले की, खरोखर हाच मनुष्य जगाचे तारण करील.”

योहान 4:1-42

येशूने दोन कारणास्तव पाणी मागितले. प्रथम, त्याला तहान लागली होती. पण त्याला (ऋषी असल्यामुळे) माहीत होते की ती देखील पूर्णपणे वेगळ्याप्रकारे तहानलेली होती. तिला आयुष्यात समाधानाची तहान लागली होती. तिला वाटले की पुरुषांशी अवैध संबंध ठेवून ही तहान भागू शकेल. त्यामुळे तिचे अनेक पती झाले होते आणि येशूबरोबर बोलत असताना ती तिचा नवरा नसलेल्या माणसाबरोबर राहत होती. तिचे शेजारी तिला अनैतिक म्हणून पाहत. सकाळीच्या शीतलवेळी विहिरीजवळ जाताना गावातील इतर स्त्रियांना ती सोबत नको असल्यामुळे कदाचित दुपारच्या वेळी ती पाणी घेण्यासाठी एकटीच गेली होती. या बाईचा अनेक पुरुषांषी संबंध आला होता आणि याने तिला गावातील इतर स्त्रियांपासून दूर केले.

येशूने तहानेचा विषय वापरला ज्यामुळे तिला हे समजले की तिच्या पापाचे मूळ तिच्या आयुष्यातील एक गंभीर तहान आहे – एक तहान, ज्याला विझविणे आवश्यक आहे. तो तिला (आणि आम्हाला) असे जाहीर करीत होता की केवळ तोच आमच्या अंतःकरणाची तहान भागवू शकतो जी सहज आपल्यास पापात पाडते.

विश्वास ठेवणे – सत्यात कबूल करणे

पण या ‘जिवंत पाण्याच्या’ देऊ करण्याने स्त्रीला पेचात पाडले. जेव्हा येशूने तिला आपल्या पतीस घेऊन येण्यास सांगितले तेव्हा तो तिला हेतूपुरस्सर तिचे पाप ओळखण्यास आणि कबूल करण्यास – त्याचा स्वीकार करण्यास प्रेरित करीत होता. आम्ही हे सर्वस्वी टाळतो! कुणालाही दिसणार नाहीत, या आशेने आम्ही आपली पापे लपविणे पसंत करतो. किंवा आपण आपल्या पापाचे निमित्त सांगत, तर्कवितर्क करतो. परंतु जर आपल्याला ‘‘सार्वकालिक जीवन’ देणारी देवाची वास्तविकता अनुभवण्याची इच्छा असेल तर आपण प्रामाणिक असले पाहिजे आणि आपले पाप कबूल केले पाहिजे, कारण शुभवर्तमानात असे अभिवचन दिले आहे :

8 जर आम्ही असे म्हणतो की, आमच्यामध्ये कोणतेही पाप नाही, तर आम्ही स्वत:ला फसवीत आहोत. आणिआमच्यामध्ये सत्य नाही.

9 जर आम्ही आमची पापे कबूल करतो, तर आमच्या पापांपासून आम्हांला क्षमा करण्यास देवविश्वासू व न्यायी आहे. आणि आमच्या सर्व अनीतीपासून तो आम्हाला शुद्ध करतो.

1 योहान 1:8-9

या कारणास्तव, जेव्हा येशू शोमरोनी स्त्रीला म्हणाला की

24 देव आत्मा आहे. म्हणून त्याच्या उपासकांनी आत्म्याने व खरेपणाने त्याची उपासना केली पाहिजे.”

योहान 4:24

त्याच्या म्हणण्याचा अर्थ ‘सत्य’ म्हणजे स्वतःबद्दल सत्य असणे, आपली चूक लपविण्याचा किंवा सबब सांगण्याचा प्रयत्न न करणे. अद्भुत बातमी अशी आहे की देव ‘शोधतो’ आणि अशा प्रामाणिकपणाने आलेल्या उपासकांना तो परत फिरवित नाही – मग ते कितीही अपवित्र झाले का असेनात.

पण आपले पाप कबूल करणे तिला खूप अवघड होते. लपविण्याचा सोयीस्कर मार्ग हा आहे की आपल्या पापापासून धार्मिक वादाकडे तो विषय बदलणे. जगात नेहमीच अनेक धार्मिक वाद आहेत. त्या दिवसांत शोमरोनी लोक आणि यहूदी यांच्यात योग्य उपासना स्थळाविषयी धार्मिक वाद होता. यहूदी लोक असे सांगत की यरुशलेमेमध्ये उपासना केली पाहिजे आणि शोमरोनी लोक असे मानत की उपासना दुसऱ्या डोंगरावर केली जावी. या धार्मिक वादाकडे वळून ती आपल्या संभाषणाचा विषय तिच्या पापापासून दूर नेण्याची अपेक्षा करीत होती. आता ती आपल्या धर्मामागे आपले पाप लपवू शकत होती.

किती सहज आणि स्वाभाविकरित्या आम्ही देखील असे करतो – विशेषेकरून जर आपण धार्मिक असलो तर. मग आपण इतर लोक कसे चुकीच्या मार्गावर आहेत किंवा आपले कसे बरोबर आहोत याचा निर्णय घेऊ शकतो – सोबतच आपल्या पापाची कबुली देण्याच्या आपल्या गरजेकडे दुर्लक्ष करतो.

येशूने तिच्याशी हा वाद घातला नाही. त्याने हे आवर्जून सांगितले ते उपासना स्थळ नाही, परंतु उपासनेत स्वतःविषयी तिची प्रामाणिकता महत्त्वाची होती. ती परमेश्वराच्या सान्निध्यात कोठेही येऊ शकत असे (कारण तो आत्मा आहे), परंतु हे ‘जिवंत पाणी’ मिळण्यापूर्वी तिला प्रामाणिक आत्म-साक्षात्कार आवश्यक होता.

आपण सर्वांनी घेतला पाहिजे असा निर्णय

म्हणून तिला एक महत्त्वाचा निर्णय घ्यायचा होता. ती एखाद्या धार्मिक वादाच्या मागे लपून राहू शकत होती किंवा कदाचित त्याला सोडून जाऊ शकत होती. पण शेवटी तिने तिचे पाप कबूल करण्याची – स्वीकार करण्याची – निवड केली इतके की इतरांना हे सांगण्यासाठी ती परत गावी गेली की कसे या ऋषीने तिला कसे ओळखले आणि तिने काय केले ते त्याला माहीत होते. ते तिने आता लपवून ठेवले नाही. असे करीत असतांना ती ‘विश्वासणारी’ झाली. यापूर्वी तिने पूजा आणि धार्मिक विधी पूर्ण केले होते, परंतु आता ती – आणि तिच्या गावातले – ‘विश्वासणारे’ झाले.

आस्तिक होणे म्हणजे मानसिकरित्या फक्त योग्य शिक्षणाशी सहमत होणे नाही – जरी हे महत्वाचे असले तरीही. याचा संबंध हा .विश्वास ठेवण्याशी आहे की दया करण्याच्या त्याच्या अभिवचनावर  ठेवला जाऊ शकतो, आणि म्हणून आपण यापुढे पाप लपवू नये. बऱ्याच काळापूर्वी अब्राहामाने आमच्यासाठी हा आदर्श मांडला होता – त्याने एका अभिवचनावर विश्वास ठेवला होता.

आपण सबब सांगता किंवा आपले पाप लपविता काय? आपण हे भक्तिपूर्ण धार्मिक प्रथेने किंवा धार्मिक वादाने लपवून ठेवता का? किंवा आपण आपले पाप कबूल करता का? आपल्या निर्माणकर्त्यासमोर येऊन दोषभावना उत्पन्न करणाऱ्या आणि लज्जास्पद पापांची प्रामाणिकपणे कबुली का देत नाही? मग आनंद करा की तो तुमच्या उपासनेचा ‘शोध घेतो’ आणि तुम्हाला सर्व प्रकारच्या अनीतीपासून ’शुद्ध करेल’.

प्रामाणिकपणे आपली गरज ओळखून घेतल्यामुळे ती ‘मशीहा’ ख्रिस्ताला म्हणून समजू शकली आणि येशू तेथे दोन दिवस राहिल्यानंतर ते त्याला ‘जगाचा तारणारा’ म्हणून  समजू शकले. कदाचित आम्हाला अद्याप हे पूर्णपणे समजले नाही. परंतु त्यांचे पाप व त्यांची गरज कबूल करण्याद्वारे हे समजण्यासाठी स्वामी योहानाने लोकांना तयार केले होते, आपण कसे हरवलेल्या दशेत आहोत हे ओळखण्यासाठी व त्याच्याकडून मिळणारे जिवंत पाणी पिण्यासाठी हे आपणास तयार करेल.

देवाचे राज्य? कमळ, शंख आणि जोडीदार माशामध्ये गुणाचे चित्रण

कमळ हे दक्षिण आशियाचे प्रतीकात्मक फूल आहे. कमळाचे फूल हे प्राचीन इतिहासातील प्रमुख प्रतीक होते, ते आजही तसेच आहे. कमळाच्या रोपाच्या पानांमध्ये एक अद्वितीय रचना आहे जी त्यास स्वतः-स्वच्छ करण्याची क्षमता देते, ज्यामुळे चिखलाने न मळता फुले वर येतात. या नैसर्गिक गुणामुळे, चिखलातून बाहेर येणारे, घाणीचा स्पर्श न झालेले असे प्रतिकात्मक संदर्भ तयार झाले आहेत. ऋग्वेद प्रथम रूपकात (ऋग्वेद 5, 68. 7-9) कमळाचा उल्लेख केला आहे जेथे मुलाच्या सुरक्षित जन्माच्या इच्छेचे वर्णन केले आहे.

जेव्हा विष्णू ठेंगणा वामन होता, तेव्हा त्याची पत्नी लक्ष्मी समुद्रमंथनात कमळातून पद्मा किंवा कमला म्हणून प्रगट झाली, दोन्हीचा अर्थ “कमळ” आहे. लक्ष्मीचे कमळाशी जवळचे आहे आणि ती स्वतः फुलांमध्ये वास करते.

शंख हा विधी आणि धार्मिक महत्त्वाचा शंख आहे. शंख हे विशाल समुद्री गोगलगायचे एक कवच आहे परंतु पौराणिक कथेमध्ये शंख हा विष्णूचे प्रतीक आहे आणि बहुतेकदा कर्णा म्हणून त्याचा उपयोग केला जातो.

कमळ आणि शंख ही शिकवण्याची आठ अष्टमंगल (शुभ चिन्हे) साधने आहेत. ते चिरंतन गुण किंवा गुणांसाठी चित्रे किंवा चिन्हे म्हणून काम करतात. असंख्य ग्रंथ गुण या संकल्पनेवर चर्चा करतात, जन्मजात नैसर्गिक शक्ती ज्या एकत्रितपणे बदलतात आणि जगात बदल घडवून आणीत असतात. सांख्य विचारामध्ये तीन गुण आहेत: सत्व (चांगुलपणा, विधायक, कर्णमधुर), राजस (उत्कट, सक्रिय, गोंधळलेले) आणि तामस (अंधकार, विध्वंसक, अराजक). न्याय आणि वैशेशिका विचारसरणी अधिक गुणांस मुभा देते. गुण म्हणून देवाच्या राज्याबद्दल काय?

https://en.satyavedapusthakan.net/wp-content/uploads/sites/3/2020/07/gunas_diagram.jpg

सांख्य विचारातील सत्व, राजस, तामस गुण यांचे वर्णन करणारे कमळपुष्प

येशू देवाच्या राज्याकडे एक कार्यकारी क्षमता, गुण म्हणून पाहिले, कारण ते जगात जैविक बदल घडवून आणत आहे आणि जगावर विजय मिळवीत आहे. त्याने शिकवले की आम्हाला देवाच्या राज्यात आमंत्रित केले आहे, पण असे करण्यासाठी द्विज देखील आवश्यक आहे. त्यानंतर त्याने आपल्याला देवाच्या राज्याचे गुण समजण्यास मदत व्हावी यासाठी आपल्या शिकवणीची साधने म्हणून वनस्पती, शंख आणि जोडीदार मासे (अष्टमंगल चिन्हे) यांचा उपयोग करून देवाच्या राज्याचे स्वरूप किंवा गुण या विषयावर अनेक गोष्टी (दाखला म्हटल्या जाणाऱ्या) सांगितल्या. राज्याचे त्याचे दृष्टांत येथे आहेत.

च दिवशी येशू घराबाहेर पडून सरोवराच्या काठी जाऊन बसला.
2 पुष्कळ लोक त्याच्याभोवती जमले, म्हणून येशू नावेत जाऊन बसला व सर्व लोकसमुदाय किनाऱ्यावर उभा राहिला.
3 तेव्हा त्याने त्यांना गोष्टीरूपाने बोध केला. तो म्हणाला, एक शेतकरी बी पेरायला निघाला.
4 तो पेरीत असता काही बी रस्त्यावर पडले, पक्षी आले व त्यांनी ते खाऊन टाकले.
5 काही बी खडकाळ जमिनीवर पडले. तेथे पुरेशी माती नव्हती. तेथे बी फार झपाट्याने वाढले. पण जमीन खोलवर नव्हती,
6 म्हणून जेव्हा सूर्य उगवाला तेव्हा रोपटे वाळून गेले. कारण त्याला खोलवर मुळे नव्हती.
7 काही बी काटेरी झुडपावर पडले. काटेरी झुडूप वाढले आणि त्याने रोपाची वाढ खुंटविली.
8 काही बी चांगल्या जमिनीवर पडले, ते रोप वाढले व त्याला धान्य आले. आणि कोठे शंभरपट, कोठे साठपट. कोठे तीसपट असे त्याने पीक दिले.
9 ज्याला ऐकायला कान

आहेत तो ऐको.मत्तय 13:1-9
https://en.satyavedapusthakan.net/wp-content/uploads/sites/3/2020/07/Lotus-seeds.jpg

कमळांच्या बियांमध्ये एक जीवनशक्ती असते ज्यामुळे त्या अंकुरतात

या दृष्टांताचा अर्थ काय? आम्हास अंदाज लावण्याची गरज नाही, कारण ज्यांनी विचारले त्यांना त्याने तो अर्थ सांगितला

18 पेरणाऱ्याच्या बोधकथेचा अर्थ काय हे समजून घ्या,
19 कोणी राज्याची गोष्ट ऐकतो पण ती त्याला समजत नाही, तेव्हा तो दुष्ट (सैतान) येतो व त्याच्या अंत:करणात पेरलेले ते घेतो, वाटेवर पेरलेला तो हाच आहे.

मत्तय 13:18-19
https://en.satyavedapusthakan.net/wp-content/uploads/sites/3/2020/07/lotus-path2.jpg

परंतु हे बीज तुडविलेल्या मार्गावर अंकुरित होऊ शकत नाहीत

20 खडकाळ जागेवर पेरलेला तो असा आहे की, तो वचन ऐकतो व लगेच आनंदाने स्वीकारतो.
21 तरी त्याच्यामध्ये मूळ नसल्याने तो थोडा काळच टिकतो आणि वचनामुळे संकट आले किंवा कोणी छळ केला, व त्रास झाला म्हणजे तो लगेच अडखळतो.

मत्तय 13:20-21
https://en.satyavedapusthakan.net/wp-content/uploads/sites/3/2020/07/lotus-thinsoil.jpg

सूर्याची उष्णता बीजातील जीवन नष्ट करू शकते

22 आणि काटेरी झाडांमध्ये पेरलेला असा आहे की, तो वचन ऐकतो पण जगिक गोष्टीविषयीचा ओढा, संपत्तीचा मोह ही वचनाला वाढू देत नाहीत आणि तो निष्फळ होतो.

मत्तय 13:22
https://en.satyavedapusthakan.net/wp-content/uploads/sites/3/2020/07/lotus-with-weeds.jpg

इतर वनस्पती कमळाच्या फुलांच्या वाढीस अडथळा आणू शकतात

23 गल्या जमिनीवर पेरलेला असा आहे की, तो वचन ऐकतो, ते समजतो व तो निश्चितपणे पीक देतो. कोणी शंभरपट, कोणी साठपट, कोणी तीसपट असे पीक देतो.”

मत्तय 13:23
https://en.satyavedapusthakan.net/wp-content/uploads/sites/3/2020/07/74116318-landscape-of-lotus-flower-field-with-palm-forest-background.jpg

सुपीक मातीमध्ये कमळाचे रोप वाढेल आणि सौंदर्यात गुणाकार होईल

देवाच्या राज्याच्या संदेशास चार प्रतिसाद आहेत. पहिल्याकडे काहीच ‘समज’ नसतो आणि म्हणून तो दुष्ट संदेश त्यांच्या हृदयातून काढून घेतो. उर्वरित तीन प्रतिसाद प्रारंभी खूप सकारात्मक असतात आणि ते आनंदाने संदेश प्राप्त करतात. परंतु हा संदेश आपल्या हृदयात कठीण समयातही वाढावयास हवा. याच्या आपल्या जीवनांवर परिणामावाचून मानसिक स्वीकृति अपुरी आहे. म्हणून यापैकी दोन प्रतिसाद, त्यांनी सुरुवातीला जरी हा संदेश ग्रहण केला असला तरी, त्यांनी त्याची आपल्या हृदयात वाढ होऊ दिली नाही. ‘वचन ऐकतो आणि समजून घेतो’ असे फक्त चैथे अंतःकरण देव शोधत असलेल्या मार्गाने खरोखर प्राप्त होईल.

येशूने हा दृष्टांत शिकवला म्हणून आपण स्वतःला असे विचारू : ‘मी यापैकी कोणती माती आहे?’ 

निदणांचा दृष्टांत दाखला

या  दृष्टांताचे स्पष्टीकरण दिल्यानंतर येशूने निंदणाचा उपयोग करून शिकविले.

24 नंतर येशूने त्यांना दुसरी बोधकथा सांगुतली. तो म्हणाला, “स्वर्गाचे राज्य हा एखाद्या मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरण्यासारखे आहे.
25 पण लोक झोपेत असता त्या मनुष्याचा शत्रू आला व गव्हामध्ये निदण पेरून गेला.
26 पण जेव्हा रोपे वाढली व दाणे आले तेव्हा निदणही दिसू लागले.
27 मग त्या माणसाचे नोकर त्याच्याकडे आले व म्हणाले, मालक आपण आपल्या शेतात चांगले बी पेरले ना?मग त्यात निदण कोठून आले?
28 तो त्यांना म्हणाला, कोणीतरी शत्रूने हे केले आहे. त्याच्या नोकरांनी विचारले, आम्ही जाऊन ते उपटून टाकावे अशी आपली इच्छा आहे काय?
29 पण तो मनुष्य म्हणाला, नको तुम्ही निदण जमा करीत असताना त्याबरोबर कदाचित गहूही उपटाल.
30 कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या. मग कापणीच्या वेळेस मी कापणाऱ्यास सांगेन की पहिल्याने निदण जमा करा व जाळण्यासाठी त्याच्या पेंढ्या बांधा. पण गहू माझ्या गोदामात साठवा.”‘

मत्तय 13:24-30
https://en.satyavedapusthakan.net/wp-content/uploads/sites/3/2020/07/wheat-tares.jpg

निंदण आणि गहू: पिकण्यापूर्वी गहू निंदण एकसारखे दिसतात

येथे तो हा दृष्टांत स्पष्ट करतो

36 मग येशू लोकांना सोडून घरात गेला. त्याच्याकडे त्याचे शिष्य आले आणि म्हणाले, “शेतातील निदणाची बोधकथा आम्हांला नीट समजावून सांगा.”
37 येशूने उत्तर दिले, “शेतामध्ये चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे.
38 आणि शेत हे जग आहे. चांगले बी हे देवाच्या राज्यातील मुले आहेत आणि निदण हे दुष्टाचे (सैतानाचे) मुलगे आहेत.
39 हे निदण पेरणारा शत्रू हा सैतान आहे आणि कापणी या काळाची समाप्ति आहे व कापणी करणारे देवदूत आहेत.
40 “म्हणून जसे निदण गोळा करून अग्नीत टाकतात त्याप्रमाणे या काळाच्या शेवटी होईल.
41 मनुष्याचा पुत्र आपल्या दूतांना पाठवील आणि ते त्याच्या राज्यातून अडखळण करणाऱ्या सर्व गोष्टी आणि अन्याय करणारे यांना बाजूला काढतील.
42 आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील. तेथे रडणे व दात खाणे चालेल.
43 तेव्हा नीतिमान लोक आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील. ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐका.

मत्तय 13:36-43

मोहरीच्या दाण्याचा खमीराचा दृष्टांत

येशूने इतर सामान्य रोपांच्या उदाहरणांसह काही अगदी लहान दृष्टांतही शिकविले.

31 मग येशूने त्यांना आणखी एक बोधकथा सांगितली. तो म्हाणाला, “स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे, तो एका माणसाने घेऊन आपल्या शेतात पेरला.
32 मोहरीचा दाणा सर्व दाण्यांहून लहान आहे. पण तो त्याचे झाड मात्र खूप मोठे येते. इतके की, आकाशातील पाखरे येऊन त्याच्या फांद्यांवर राहतात.”
33 मग येशूने लोकांना आणखी एक दाखला सांगितला, “स्वर्गाचे राज्य खमिरासारखे आहे. ते एका स्त्रीने घेतले व तीन मापे पिठामध्ये ठेवले तेव्हा ते सर्व पीठ फुगले.”

मत्तय 13:31-33
https://en.satyavedapusthakan.net/wp-content/uploads/sites/3/2020/07/mustard_seed.jpg

मोहरीचे बीज लहान असते

मोहरीची झाडे समृद्ध आणि मोठी होतातhttps://en.satyavedapusthakan.net/wp-content/uploads/sites/3/2020/07/mustard-field-on-sunny-day.jpg

देवाचा राज्याची सुरूवात या जगात लहान आणि नगण्य अशी होईल परंतु संपूर्ण जगात पीठात काम करणाऱ्या खमीरासारखे आणि मोठ्या रोपात वाढणाऱ्या लहान बियांसारखे वाढत जाईल. हे बळजबरीने, किंवा एकाच वेळी होत नाही, त्याची वाढ अदृश्य आहे परंतु सर्वत्र आणि न थांबणारी आहे.

लपविलेली ठेव आणि मूल्यवान मोत्याचा दृष्टांत

44 “स्वर्गाचे राज्य हे जणू काय शेतामध्ये लपवून ठेवलेल्या ठेवीसारखे आहे. एके दिवशी एका मनुष्याला ती ठेव सापडली. त्यामुळे त्या मनुष्याला खूप आनंद झाला. तो ती गुप्त ठेव पुन्हा त्याचा शेतात लपवून ठेवतो व आपले सर्व काही विकून ते शेत विकत घेतो.
45 “आणखी, स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्याचा शोध घेणाऱ्या व्यापाऱ्यासारखे आहे,
46 एक दिवस त्याला एक अत्यंत सुंदर मोती सापडतो. तेव्हा तो जाऊन आपले सर्वकाही विकतो आणि ते मोती विकत घेतो.

मत्तय 13:44-46
https://en.satyavedapusthakan.net/wp-content/uploads/sites/3/2020/07/conches.jpg

शंखांमध्ये मौल्यवान खजिना असू शकतो परंतु हे मोल बाहेरून दिसत नसते 

https://en.satyavedapusthakan.net/wp-content/uploads/sites/3/2020/07/conch-and-pearl.jpg

काही शंखांच्या आत गुलाबी मोती असतातमोठ्या मोलासह ते लपलेले असतातhttps://en.satyavedapusthakan.net/wp-content/uploads/sites/3/2020/07/conch-pearl-ring.jpg

गुलाबी मोती खूप मौल्यवान असतात

हे दृष्टांत देवाच्या राज्याच्या मूल्यावर केंद्रित आहेत. शेतात लपलेल्या खजिन्याचा किंवा ठेवीचा विचार करा. लपून बसल्यामुळे, शेतातून जाणाऱ्या प्रत्येकाला हे वाटते की या शेताचे मोल कमी आहे आणि म्हणून ते त्यात रस घेत नाहीत. परंतु एखाद्याला समजते की तेथे एक खजिना आहे, ज्यामुळे हे शेत खूप मोलाचे आहे – ते इतके मौल्यवान आहे की ते विकत घेण्यासाठी आणि खजिना मिळविण्यासाठी सर्वकाही विकले तरी चालेल.  देवाच्या राज्याचे देखील असेच आहे – या मोलाकडे बहुतेकांचे लक्ष नसते, परंतु थोडके जण जे त्याचे मोल पाहतात त्यांना मोठे मूल्य मिळते.

जाळाचा दृष्टांत

47 “तसेच, स्वर्गाचे राज्य पाण्यात टाकलेल्या जाळ्यासारखे आहे. जाळ्यात सर्व प्रकारचे मासे सापडतात.
48 ते भरल्यावर माणसांनी ते ओढून किनाऱ्यावर आणले व बसून जे चांगले ते भांड्यात भरले व जे वाईट ते फेकून दिले.
49 या काळाच्या शेवटी असेच होईल. देवदूत येतील आणि वाईटांना नितीमान लोकांतून वेगळे करतील.
50 वाईट लोकांना अग्नीत फेकून देण्यात येईल. तेथे रडणे व दात खाणे

चालेल.मत्तय 13:47-50
https://en.satyavedapusthakan.net/wp-content/uploads/sites/3/2020/07/sorting-fish-goa.jpg

देवाचे राज्य गोव्यातील मासेकरूंप्रमाणे लोकांस निवडून काढील

येशूने आणखी दुसऱ्या अष्टमंगलचा उपयोग केला – देवाच्या राज्याबद्दल शिकवण्यासाठी माशाची जोडी. देवाचे राज्य लोकांना मासे वेगळे करणार्या मासेकरूंसारखे दोन गटात विभाजित करेल. हे न्यायाच्या दिवशी होईल.

देवाचे राज्य पीठातील खमीरासमान, रहस्यमयरित्या वाढते; बहुतेकांपासून लपवून ठेवलेल्या मोठ्या मूल्यासह; आणि लोकांमध्ये विविध प्रतिसादांना उत्तेजन देत आहे. हे लोकांना जे समजतात ते व जे समजणार नाहीत अषा गटांत वेगळे करील. हे दाखले शिकवल्यानंतर येशूने आपल्या श्रोत्यांना हा प्रश्न विचारला.

51 येशूने शिष्यांना विचारले, “तुम्हांला या सर्व गोष्टी समजल्या काय?” तेव्हा ते म्हणाले, “होय.”

मत्तय 13:51

तुमचे काय? जर देवाच्या राज्यास जगामध्ये फिरणारे गुण म्हणून समजले गेले तर जोवर ते आपल्याद्वारेही कार्य करीत नाही तोवर ते आपल्यासाठी फायद्याचे नाही. पण कसे?

गंगा तीर्थासारख्या जिवंत पाण्याच्या त्याच्या दृष्टान्तात येशू स्पष्ट करतो.

येशू शिकवितो प्राण आम्हास द्विजापर्यंत आणतो

द्विज (द्विज) म्हणजे ‘दोनदा जन्म’ किंवा ‘पुन्हा जन्म’. हे एखाद्या व्यक्तीचा प्रथम जन्म शारीरिकदृष्ट्या होतो आणि नंतर तो दुसऱ्यांदा आत्मिकरित्या जन्माला येतो या कल्पनेवर आधारित आहे. हा आत्मिक जन्म परंपरागतरित्या पवित्र धागा (यज्ञोपवीत, उपवित्त किंवा जनेऊ) घालताना उपनयन सोहळ्यादरम्यान घडण्याचे प्रतीक आहे. तथापि, बौद्धायन गृह्यसूत्रा सारख्या प्राचीन वैदिक (इ.स.पू.1000-600) ग्रंथांमध्ये उपनयनवर चर्चा झाली असली तरी द्विजांचा उल्लेख प्राचीन ग्रंथात नाही. विकिपीडिया सांगते

याविषयीचा वाढता उल्लेख मध्य काळापासून तो 1ल्या-सहस्राब्दीच्या उत्तरार्धापर्यंच्या धर्मशास्त्रांच्या मूलग्रंथांत आढळून येतो.द्विज या शब्दाची उपस्थिति या गोष्टीचे चिन्ह आहे की मूळपाठ शक्यतः भारताच्या मध्ययुगीन काळातील मूलग्रंथ आहे.

म्हणून, आज द्विज ही एक ज्ञात् संकल्पना आहे, तथापि, सापेक्षदृष्ट्या नवीन आहे. द्विज कोठून आला?

येशू आणि थोमाद्वारे द्विज

द्विजावर जर कोणत्याही व्यक्तीद्वारे दिलेली शिकवण जर सर्वात आधी नमूद करण्यात आली असेल तर ती येशूद्वारे मिळते. योहानकृत शुभवर्तमान (ईस्वी सन् 50-100 मध्ये लिखित) द्विजासंबंधी येशूद्वारे करण्यात आलेली चर्चा लिहिते. असे असू शकते की ईस्वी सन 52 मध्ये येशूच्या जीवनाचा व शिकवणीचा प्रत्यक्षदर्शी साक्ष म्हणून मलबारच्या समुद्रतटावर आणि मग चेन्नई येथे भारतात प्रथम आलेला एक शिष्य थोमा हा द्विजाची कल्पना घेऊन आला आणि त्याने भारतीय विचारआचारात या कल्पनेचा परिचय घडवून दिला. येशूच्या शिकवणींसोबत भारतात थोमाचे आगमन भारतीय ग्रंथांतील द्विजाच्या उद्भवाशी सामंजस्य राखते.

येशू आणि प्राणाद्वारे द्विज

येशूने द्विजाचा संबंध उपनयनाशी नव्हे तर प्राणाशी (प्राण), दुसऱ्या प्राचीन संकल्पनेशी जोडला. प्राण श्वास, आत्मा, वायु किंवा जीवनशक्तीस दर्शवितो. प्राणाचा सर्वात प्रारंभिक उल्लेख 3,000 वर्षे जुन्या चान्दोग्योपनिषदात आढळतो. पण इतर अनेक उपनिषदही या संकल्पनेचा उपयोग करतात ज्यात कथा, मुण्डक आणि प्रश्नोपनिषद यांचा समावेश आहे विविध ग्रंथ पर्यायी उत्तर देतात, पण प्राण आमच्या सर्व योगिक तंत्रांस अधोरेखित करतो जो आमच्या श्वास /श्वसनावर प्रभुत्व करतो, ज्यात प्राणायाम आणि आयुर्वेद यांचा समावेश आहे.   प्राणांचे आयुरास (वारा) प्राग, अपना, उना, समना आणि व्यना म्हणून कधीकधी वर्गीकरण केले जाते.

द्विजाची ओळख करून देत असलेल्या येशूचे हे संभाषण येथे आहे. (अधोरेखित शब्द द्विज किंवा द्वितीय जन्म संदर्भ चिन्हांकित करतात, तर ठळक अक्षरे प्राण, किंवा वारा, आत्मा या शब्दांस अधोरेखित करतात)

1 परूश्यांपैकी निकदेम नावाचा एक मनुष्य होता; तो यहूद्यांचा एक अधिकारी होता. 2 तो रात्रीचा येशूकडे येऊन त्याला म्हणाला, “गुरूजी, आपण देवापासून आलेले शिक्षक आहात, हे आम्हांला ठाऊक आहे; कारण ही जी चिन्हे आपण करता ती देव बरोबर असल्यावाचून कोणालाही करता येत नाहीत.” 3 येशू त्याला म्हणाला, “मी तुम्हांला खचीत सांगतो, नव्याने जन्मल्यावाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही.” 4 निकदेम त्याला म्हणाला, “म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्म घेऊ शकेल? त्याला मातेच्या उदरात दुसर्‍यांदा जाणे व जन्म घेणे शक्य होईल काय?” 5 येशूने उत्तर दिले की, “मी तुम्हांला खचीत सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्यावाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. 6 देहापासून जन्मलेले देह आहेत आणि आत्म्यापासून जन्मलेले आत्मा आहेत. 7 ‘तुम्हांला नव्याने जन्मले पाहिजे’ असे मी तुम्हांला सांगितले म्हणून आश्‍चर्य मानू नका. 8 वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता, तरी तो कोठून येतो व कोठे जातो हे तुम्हांला कळत नाही; जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला आहे त्याचे असेच आहे.” 9 निकदेम त्याला म्हणाला, “ह्या गोष्टी कशा होऊ शकतील?” 10 येशूने त्याला उत्तर दिले, “तुम्ही इस्राएलाचे गुरू असूनही तुम्हांला ह्या गोष्टी समजत नाहीत काय? 11 मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो की, जे आम्हांला ठाऊक आहे ते आम्ही सांगतो, आणि आम्ही पाहिले आहे त्याविषयी साक्ष देतो; पण तुम्ही आमची साक्ष मानत नाही. 12 मी पृथ्वीवरील गोष्टी तुम्हांला सांगितल्या असता तुम्ही विश्वास धरत नाही तर स्वर्गातल्या गोष्टी तुम्हांला सांगितल्यास विश्वास कसा धराल? 13 स्वर्गातून उतरलेला [व स्वर्गात असलेला] जो मनुष्याचा पुत्र त्याच्यावाचून कोणीही स्वर्गात चढून गेला नाही. 14 जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला होता तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे; 15 ह्यासाठी की, जो कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याच्या ठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. 16 देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. 17 देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे, तर त्याच्या द्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले. 18 जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्याय-निवाड्याचा प्रसंग येत नाही. जो विश्वास ठेवत नाही त्याचा न्यायनिवाडा होऊन चुकला आहे; कारण त्याने देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही. 19 निवाडा हाच आहे की, जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली; कारण त्यांची कृत्ये दुष्ट होती. 20 कारण जो कोणी वाईट कृत्ये करतो तो प्रकाशाचा द्वेष करतो आणि आपली कृत्ये उघडकीस येऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही. 21 परंतु जो सत्य आचरतो तो प्रकाशाकडे येतो ह्यासाठी की, आपली कृत्ये देवाच्या ठायी केलेली आहेत हे उघड व्हावे.”

योहान 3:1-21

या संभाषणात अनेक संकल्पना उपस्थित केल्या गेल्या. प्रथम, येशूने या दुसऱ्या जन्माच्या आवश्यकतेची पुष्टी केली (‘तुझा नव्याने जन्म झाला पाहिजे). परंतु या जन्मामध्ये कोणतेही मानवी अभिकर्ता नाहीत. पहिला जन्म, ‘देहापासून जन्मलेले देह’ आणि ‘पाण्यापासून जन्म’ घेणे मानवी अभिकर्त्याद्वारे आले आणि मानवी नियंत्रणाखाली आहे. परंतु दुसऱ्या जन्मामध्ये (द्विज) तीन दैवी अभिकर्त्यांचा समावेश आहे: देव, मनुष्याचा पुत्र आणि आत्मा (प्राण). आपण हे जाणून घेऊ या

देव

येशू म्हणाला की, “देवाने जगावर एवढी मोठी प्रीति केली…” याचा अर्थ असा की देव सर्व लोकांवर प्रेम करतो… जगात राहणाऱ्या प्रत्येकावर… कोणालाही वगळलेले नाही. आम्ही कदाचित या प्रेमाच्या व्याप्तीवर चिंतन करण्यासाठी वेळ घालवू शकतो, परंतु याचा अर्थ देव आपणावर प्रीति करतो हे आपण प्रथम समजून घ्यावे अशी येशूची इच्छा आहे. देव आपणावर खूप प्रेम करतो, आपली स्थिती, वर्ण, धर्म, भाषा, वय, लिंग, संपत्ती, शिक्षण काहीही असो … इतरत्र सांगितल्याप्रमाणे:

38 कारण माझी खात्री आहे की, मरण किंवा जीवन, देवदूत, अधिकारी आत्मे हल्लीच्या किंवा भविष्यकाळात,
39 येशूचे सामर्थ्य, उंच किंवा खाली, जगात निर्माण केलेली कुठलीही गोष्ट आपणांस देवाचे प्रेम जे ख्रिस्तामध्ये आढळते त्यापासून वेगळे करु शकणार नाही.

रोम 8:38-39

देवाचे आपणावरील (आणि माझ्यावरील) प्रेम दुसऱ्या जन्माची गरज दूर करीत नाही (“नव्याने जन्मल्यावाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही”). त्याऐवजी, आपणावरील देवाच्या प्रेमामुळे त्याने त्यास कार्य करावयास प्रवृत्त केले

“कारण देवाने जगावर एवढी प्रीति की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला…

आम्हाला दुसऱ्या दैवी अभिकर्त्याजवळ आणणे…

मनुष्याचा पुत्र

 ‘मनुष्याचा पुत्र’ हा स्वतः येशूचा संदर्भ आहे. या शब्दाचा अर्थ काय आहे ते आपण नंतर पाहू. येथे तो असे म्हणत आहे की पुत्रास देवाने पाठविले आहे. मग तो उंचविले जाण्याबद्दल विशिष्ट विधान देतो.

14 “मोशेने अरण्यात असताना सापाल उंच केले.मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे.

योहान 3:14

हा मोशेच्या काळातील सुमारे 1500 वर्षांपूर्वीच्या इब्री वेदांमधील वृत्तान्ताचा उल्लेख आहे जो येथे देण्यात आला आहे :

पितळेचा सर्प

4 लोकांनी होर पर्वत सोडला व तांबड्या समुद्राकडे जाण्यासाठी त्यांनी अदोमला पाठविले. पण लोक वाटेतच अधीर झाले; 5 ते म्हणाले, “तू आम्हाला रानात मरण्यासाठी मिसर देशातून बाहेर का आणलेस? भाकरी नाही! पाणी नाही! आणि हे दीन भोजन आम्हाला तिरस्कार आहे! ”

6 तेव्हा परमेश्वराने त्यांच्यात विषारी साप पाठविले. त्यांनी लोकांना चावले आणि बरेच इस्राएल लोक मरण पावले. 7 लोक मोशेकडे आले आणि म्हणाले, “आम्ही तुमच्याविरुद्ध आणि परमेश्वराविरुद्ध बोललो तेव्हा आम्ही पाप केले. परमेश्वर आमच्यातून साप काढून घेईल अशी प्रार्थना करा. ” म्हणून मोशेने लोकांसाठी प्रार्थना केली.

परमेश्वर मोशेला म्हणाला, “साप बनवून तिच्या खांबावर ठेव. ज्याला चावले आहे तो त्याकडे बघून जगू शकेल. ” 9 तेव्हा मोशेने एक पितळेचा साप बनवला व तो खांबावर ठेवला. नंतर जेव्हा कोणाला साप चावला आणि त्यानी पितळेच्या सापाकडे पाहिले तेव्हा ते जिवंत राहिले.

गणना 21:4-9  

या गोष्टीचा उपयोग करून येशूने दैवी अभिकर्त्यामधील आपली भूमिका स्पष्ट केली. सर्पांनी चावलेल्या लोकांचे काय झाले असते याचा विचार करा.

जेव्हा विषारी साप चावतो तेव्हा विषाचा शरीरात प्रवेश होतो. सामान्य उपचार म्हणजे विष बाहेर चोखण्याचा प्रयत्न करणे, चावलेल्या अवयवाला घट्ट बांधून घेणे आहे म्हणजे रक्त वाहणार नाही आणि चावण्यादारे विष पसरणार नाही; आणि हालचाल कमी करा जेणेकरून हृदयाची कमी झालेली गती वेगाने शरीरात विष पसरवू देणार नाही.

जेव्हा सर्पाने इस्राएली लोकांना संक्रमित केले तेव्हा त्यांना सांगण्यात आले की बरे होण्यासाठी त्यांनी खांबावर लटकविलेल्या पितळेच्या सर्पाकडे पहावे. आपण कल्पना करू शकता की जवळच उंचविलेल्या पितळेच्या सर्पाकडे पाहण्यासाठी कोणीतरी बिछान्यातून उठतो, आणि मग बरा होतो. परंतु इस्राएली लोकांच्या छावणीत सुमारे 3 दशलक्ष लोक होते ( लष्करी वयातील 600,000 पुरुषांपेक्षा अधिक लोकांची गणना करण्यात आलीे) – एका मोठ्या आधुनिक शहराचा आकार. सर्पाद्वारे चावलेल्यांनी अनेक किलोमीटर दूर असून, पितळेच्या सर्पाच्या खांबाच्या आवाक्यापलीकडे असण्याची जास्त शक्यता होती. म्हणून ज्यांना सर्पाने चावले होते त्यांना एक निवड करावयाची होती.  ते जखमेवर घट्ट बंधन घालून विषाचा प्रवाह आणि प्रभाव रोखण्यासाठी विश्रांती घेण्यासारखी मानक खबरदारी घेऊ शकत होते. किंवा त्यांना खांबावरील पितळेच्या सर्पाकडे पाहण्यासाठी, मोशेने घोषित केलेल्या उपायांवर विश्वास ठेवला पाहिजे आणि त्यासाठी अनेक किलोमीटर चालत जाणे, ज्याद्वारे रक्ताचा प्रवाह वाढून विषाचा प्रसार झाला असता. ही मोशेच्या शब्दावरील विश्वास किंवा विश्वासाची कमतरता असेल जी प्रत्येक व्यक्तीचा मार्ग निश्चित करणार होती.

येशू स्पष्ट करीत होता की, त्याला वधस्तंभावर उंचविण्याद्वारे आपल्याला पाप आणि मृत्यूच्या गुलामगिरीतून मुक्त करण्याचे सामर्थ्य त्याला मिळाले, अगदी त्याचप्रमाणे जसे पितळेच्या सर्पाने विषबाधेद्वारे मरणाच्या सामर्थ्यापासून इस्राएली लोकांना मुक्त केले. तथापि, ज्याप्रमाणे इस्राएली लोकांना पितळेच्या सर्पावर उपाय म्हणून विश्वास ठेवण्याची व खांबाकडे पाहण्याची गरज होती, त्याचप्रमाणे आम्हाला देखील भरवश्याच्या किंवा विश्वासाच्या डोळ्यांनी येशूकडे पाहण्याची गरज आहे. त्यासाठी तिसऱ्या दैवी अभिकर्त्यास कार्य करणे आवश्यक आहे.

आत्माप्राण

आत्म्याविषयी येशूच्या विधानाचा विचार करा

वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता, तरी तो कोठून येतो व कोठे जातो हे तुम्हांला कळत नाही; जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला आहे त्याचे असेच आहे.”

योहान 3:8

‘वायू’ साठी वापरण्यात येणारा हा तोच ग्रीक शब्द (pneuma ) आहे जो ‘आत्म्यासाठी’ सुद्धा उपयोग होतो. देवाचा आत्मा वाऱ्यासारखा आहे. कोणत्याही मानवाने कधीही वाऱ्यास प्रत्यक्षपणे पाहिलेले नाही. आपण त्यास पाहू शकत नाही. पण वारा आपल्या सभोवताल सर्वत्र आहे. वाऱ्याचे निरीक्षण करता येते. आपण वस्तूंवरील त्याच्या प्रभावावरून त्याचे निरीक्षण करू शकता. जसजसा वारा वाहतो तसतसे पाने सरसरतात, केस उडतात, झेंडा फडफडतो, आणि वस्तू हालू लागतात. आपण वाऱ्यावर नियंत्रित करू शकत नाही आणि त्याला दिशा दाखवू शकत नाही. वारा वाटेल तेथे वाहतोे. वाऱ्याच्या शक्तीने आम्हाला आमच्या जहाजांत पुढे न्यावे म्हणून आपण शीड उचलू शकतो. उचललेले आणि कामी लावलेले शीड वाऱ्यास पुढे लोटते, त्याद्वारे आम्हास ऊर्जा पुरविते. त्या उंच शीडावाचून वाऱ्याची हालचाल आणि ऊर्जा, जरी आमच्या सभोवताल असली तरीही, आम्हास त्याद्वारे लाभ मिळत नाही.

हे आत्म्याबरोबर सुद्धा आहे. आत्मा आमच्या नियंत्रणाबाहेर ज्या ठिकाणी तो इच्छितो तेथे जातो. परंतु जसजसा आत्मा कार्य करतो आपण त्यास आपल्यावर प्रभाव पाडण्याची, त्याची जीवनशक्ती आपल्यापर्यंत पोहोचवू शकण्याची, आपण हलविण्याची परवानगी देऊ शकता. वधस्तंभावर उंचविलेला मनुष्याचा पुत्र, उंचविलेला पितळेचा सर्प, किंवा वाऱ्यात उंचविलेले शीड आहे.  आपला विश्वास ठेवतो तेव्हा आम्हास जीवन देण्याची संधी आत्म्यास लाभते. मग आपला नवा जन्म होतो – हा दुसऱ्यांदा आत्म्याने. मग आपण आत्म्याचे – प्राण जीवन प्राप्त करतो. आत्म्याचा प्राण आम्हास सामर्थ्य देतो की आपण आतून द्विज बनावे, केवळबाह्य प्रतीक म्हणून नव्हे, जसे उपनयनाचे आहे.

द्विजवरून

यास सारांश रूपात योहानाच्या शुभवर्तमानात अशाप्रकारे एकत्र मांडले आहे:

12 काही लोकांनी त्याला आपले मानले. त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना त्याने देवाची मुले होण्याचा हक्क दिला.
13 ही मुले लहान बालके जन्मतात तशी जन्मली नाहीत. त्यांचा जन्म आईवडिलांच्या इच्छेने किंवा योजनेमुळे झाला नाही, तर त्यांचा जन्म देवाकडून झाला.

योहान 1:12-13

मूल होण्यासाठी जन्माची आवश्यकता असते, म्हणून ‘देवाची मुले’ होण्यासाठी दुसऱ्या जन्माचे वर्णन करणे होय – द्विज. उपनयनसारख्या विविध कर्मकांडांद्वारे द्विजचे प्रतीक दर्शविले जाऊ शकते परंतु खरा आंतरिक दुसरा जन्म ‘मानवी निर्णयाने’ ठरविला जात नाही. विधी, जसा आहे तसाच, जन्माचे वर्णन करू शकतो, या जन्माची आवश्यकता आपल्याला आठवण करून देऊ शकतो, परंतु तो त्यास घडवून आणू शकत नाही. जेव्हा आपण ‘त्याला ग्रहण करतो’ आणि ‘त्याच्या नावावर विश्वास ठेवतो’ तेव्हा हे केवळ देवाचे अंतर्गत कार्य ठरते.

प्रकाश आणि अंधार

नौकाविज्ञानाचे भौतिकशास्त्र समजण्यापूर्वी, लोकांनी शतकानुशतके शीडाचा वापर करून वाऱ्याच्या शक्तीचा उपयोग केला. त्याचप्रमाणे, आपल्या बुद्धीने जरी आपणास हे पूर्णपणे समजले नसले तरीसुद्धा आपण दुसऱ्या जन्मासाठी आत्म्यास कामी लावू शकतो. समजूतदारपणाची कमतरता आपल्यात अडथळा आणेल असे नाही. त्याऐवजी येशूने हे शिकवले की आपले अंधकाराचे प्रेम (आपली वाईट कृत्ये) आपल्याला सत्याच्या प्रकाशात येण्यापासून रोखते.

19 ज्य वस्तुस्थितीच्या आधारे लोकांचा न्याय केला जातो ती ही जगामध्ये प्रकाश आला परंतु लोकांना प्रकाश नको होता. त्यांना अंधार पाहिजे होता. कारण लोक वाईट कृत्ये करीत होते.

योहान 3:19

आपल्या बौद्धिक समजाऐवजी आपला नैतिक प्रतिसाद आपला दुसरा जन्म रोखतो. त्याऐवजी  आम्हाला प्रकाशात येण्यास सांगण्यात आले आहे.

21 परंतु जो सत्य मार्गाने चालतो तो प्रकाशाकडे वळतो. आणि त्याने केलेली कामे देवाकडून झाली होती हे तो प्रकाश दाखवून देईल.

योहान 3:21

त्याचे दृष्टांत आपल्याला प्रकाशात येण्याविषयी पुढे कसे शिकवितात हे आपण पाहतो.

येशू आंतरिक शुद्धतेवर शिकवितो.

विधीयुक्तरित्या शुद्ध असणे किती महत्वाचे आहे? शुद्धता राखणे आणि अशुद्धता टाळणे? आपल्यापैकी बरेच जण अशुद्धतेची विविध रूपे टाळण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी कठोर परिश्रम करतात, जसे चोयाचुयी लोकांचे परस्पर स्पर्ष करणे ज्याद्वारे अशुद्धता एकापासून दुसर्याकडे जाते. बरेच जण अशुद्ध भोजन देखील टाळतात, अशुद्धतेचे दुसरे स्वरूप ज्यात आपण खात असलेल्या अन्नात अशुद्धता उत्पन्न होते ज्याचे कारण ते अन्न तयार करणार्याची अशुद्धता.

धर्माद्वारे शुद्धतेचे पालन

जेव्हा आपण त्यावर चिंतन करता, तेव्हा आम्ही नियमांचे योग्यरित्या पालन करण्यासाठी बरेच प्रयत्न करू शकतो. मुलाच्या जन्मानंतर, आईने सुतकाच्या निर्धारित नियमांचे पालन केले पाहिजे, ज्यामध्ये दीर्घ कालावधीसाठी सामाजिक अंतर समाविष्ट आहे. काही परंपरांत जन्मानंतर जच्चा किंवा प्रसूता (नवीन आई) एका महिन्यापेक्षा जास्त काळ अशुद्ध मानली जाते. केवळ स्नान आणि मालिश यासारख्या शुद्धीकरण प्रक्रियेद्वारे (सोर), आईला पुन्हा शुद्ध समजले जाईल. जन्माव्यतिरिक्त, महिलेची मासिक पाळी सामान्यतः तिला अशुद्ध ठरवीत असल्याचे पाहिले जाते म्हणून तिने विधी शुद्धीकरणाद्वारे पुन्हा शुद्धता प्राप्त करावी.

लग्नापूर्वी किंवा अग्नी अर्पणापूर्वी (होम अथवा यज्ञ) राखण्यासाठी अनेक जण विधियुक्त मुक्त शुद्धीकरण पूर्ण करतात ज्यास पुण्यहावचनम म्हटले जाते, ज्यात मंत्र उच्चारण केले जाते आणि लोकांवर पाणी शिंपडले जाते.

आम्ही खात असलेले अन्न असो, वा वस्तू किंवा आम्ही स्पष्ट करीत असलेले लोक असो, आमची शारीरिक कामे, आपण अनेकप्रकारे अशुद्ध ठरू शकतो. म्हणून अनेक जण शुद्धता राखण्यासाठी कठोर परिश्रम करतात म्हणून जीवनात शुद्धता राखून योग्यप्रकारे पुढे जाण्यासाठी – सम्स्कार (किंवा संस्कार) म्हणून ओळखल्या जाणारे विधिसंस्कार  देण्यात आले होते..

गौतम धर्म सूत्र

गौतम धर्मसूत्र हे सर्वात प्राचीन संस्कृतधर्मसूत्रांपैकी एक आहे. यात 40 बाह्य संस्कार आहेत (जसे प्रसवानंतर विधियुक्त शुद्धीकरण) पण शुद्धता राखण्यासाठी आपण आठ आंतरिक संस्कारांचे सुद्धा पालन केले पाहिजे. ते आहेत :

सर्व प्राणिमात्रांबद्दल कळवळा, धैर्य, ईष्र्या न करणे, शुद्धता, शांतचित्तता, सकारात्मक स्वभाव बाळगणे, उदारता, आणि मनस्वीतेचा अभाव.

 सर्व प्राण्यांबद्दल करुणा, धैर्य, हेव्याचा अभाव, शुद्धता, शांतता, सकारात्मक स्वभाव, औदार्य आणि स्वभाव नसणे.

गौतम धर्म-सूत्र 8:23

शुद्धता आणि अशुद्धता याविषयी येशूचे विचार

आपण पाहिले की कशाप्रकारे येशूच्या शब्दांत अधिकारवाणीने शिकविण्याचे, रोग्यांस बरे करण्याचे आणि निसर्गास आज्ञा देण्याचे सामथ्र्य होते. आम्हास आपल्या आंतरिक शुद्धतेविषयी विचार करण्यास प्रेंरित करण्यासाठी येशू बोलला, केवळ बाह्य शुद्धतेविषयी नाही, . जरी आपण इतर लोकांची केवळ बाह्य शुद्धता पाहू शकतो, तरीही परमेश्वरासाठी हे वेगळे आहे – तो आंतरिक शुद्धता सुद्धा पाहतो. जेव्हा इस्राएलच्या राजांपैकी एकाने बाह्य शुद्धता राखली, पण अंतःकरणाची शुद्धता राखली नाही, तेव्हा त्याच्या गुरुने त्याला हा संदेश दिला जो बायबलमध्ये नमूद करण्यात आला आहे :

9 अखिल पृथ्वीवर कोणाची आपल्यावर श्रध्दा आहे याचा शोध परमेश्वराची नजर सतत घेत असते व अशांना तो आपले पाठबळ देतो. पण आसा, तू मात्र मूर्खपणा केला आहेस. तेव्हा यापुढे तुला लढायांना तोंड द्यावे लागेल.

2 इतिहास 16:9 अ

आंतरिक शुद्धतेचा संबंध आमच्या ‘अंतकरणाशी’ आहे – ‘तुम्ही’ जो विचार करतो, अनुभव करतो, ठरवितो, आधीन होतो किंवा आज्ञा मोडतो, आणि जिभेवर नियंत्रण राखतो. केवळ आंतरिक शुद्धतेद्वारे आमचे संस्कार प्रभावी ठरतील. म्हणून येशूने बाह्य शुद्धीकरणाशी त्याची तुलना करण्याद्वारे आपल्या शिकवणीत या गोष्टीवर भर दिला. येथे शुभवर्तमानात आंतरिक शुद्धतेविषयीच्या त्याच्या शिकवणीविषयी नोंद करण्यात आली आहे :

37 जेव्हा येशूने आपले बोलणे संपविले तेव्हा एका परुश्याने त्याला आपलल्याबरोबर जेवायला बोलाविले. तो आत गेला आणि आपल्या जागी रेलून बसला.
38 परंतु त्याने जेवणापूर्वी हात धुतले नाहीत हे पाहून परुश्याला फार आश्चर्य वाटले.
39 तेव्हा प्रभु त्याला म्हणाला, “तुम्ही परुशी प्याला व ताट बाहेरुन स्वच्छ करता पण तुम्ही आतून अधाशीपणाने व फसवणुकीच्या दुष्टतेने भरले आहात.
40 तुम्ही मूर्ख लोक! ज्याने बाहेरील बाजू बनवली तो आतली बाजू बनवणार नाही का?
41 पण जे आतमध्ये आहे, ते गरीबांना द्या. आणि नंतर सर्व काही तुमच्यासाठी स्वच्छ होईल.
42 परुश्यांनो तुम्हाला धिश्चार असो कारण तुम्ही पश्चात्ताप करता व पुदिन्याचा व प्रत्येक वनस्पतीचा दशांश देता. परंतु तुम्ही न्याय आणि देवाविषयीचे प्रेम याकडे दुर्लक्ष करता. तुम्ही या गोष्टी प्रथम काराव्यात व मुख्य गोष्टींकडे दुर्लक्ष करु नये.
43 परुश्यांनो तुमचा धिक्कार असो, कारण तुम्हांला सभास्थानातील महत्त्वाच्या जागी बसणे आणि बाजारात नमस्कार घेणे आवडते.
44 तुमचा धिश्चार असो कारण तुम्ही खुणा न केलेल्या कबरांसारखे आहात, अशा कबरांवर लोक नकळत पाय देऊन चालतात.”

लूक 11:37 44

52 “नियमशास्त्राच्या शिक्षकांनो तुमचा धिक्कार असो. कारण तुम्ही ज्ञानाची किल्ली काढून घेतली आहे. तुम्ही स्वत:ही आत गेला नाहीत आणि जे आत जाण्याचा प्रयत्न करत होते, त्यांनाही जाऊ दिले नाही.”

लूक 11:52

(स्वामी अथवा पंडितांसमान, ‘परूशी’सुद्धा यहूदी शिक्षक होते. परमेश्वरास ‘दशमांश’ देण्याचा येशू उल्लेख करतो. हे धार्मिक देणगी देणे होते.)

यहूदी नियमशास्त्रात मृतदेहास स्पर्श केल्याने व्यक्ती अशुद्ध होत असे. येशूने म्हटले की ते ‘चिन्ह न लावलेल्या कबरांवरून’ चालतात त्याच्या बोलण्याचा अर्थ हा होता की त्यांच्या नकळत ते अशुद्ध ठरतात कारण ते शुद्ध आंतरिक शुद्धतेकडे दुर्लक्ष करीत होते. आंतरिक शुद्धतेकडे दुर्लक्ष केल्याने आपण तसेच अशुद्ध ठरतो जसे मृतदेह हाताळल्याने.

धार्मिकदृष्ट्या शुद्ध व्यक्तीस अंतकरण अशुद्ध करते

खालील शिकवणीत, येशू यशया संदेष्ट्याचे उद्धरण देतो जो ई. स. पू 750 मध्ये जगत होता.

https://en.satyavedapusthakan.net/wp-content/uploads/sites/3/2017/10/isaiah-sign-of-the-branch-timeline--1024x576.jpg

ऐतिहासिक समयरेखेत यशया ऋषी आणि इतर हिब्रू ऋषी (संदेष्टे)

व्हा यरूशलेमाहून काही परूशी व नियमशास्त्राचे शिक्षक येशूकडे आले व म्हणाले,
2 “तुमचे शिष्य पूर्वजांनी घालून दिलेले नियम का पाळत नाहीत? कारण तुमचे शिष्य जेवणापूर्वी हात धूत नाहीत.
3 येशूने उत्तर दिले, “आणि तुम्ही तुमच्या परंपरा चालविण्यासाठी देवाची आज्ञा का मोडता?
4 कारण देवाने सांगितले आहे की, तुझ्या आईवडिलांचा मान राखआणि जो कोणी आपल्या आईवडिलांबद्दल वाईट बोलतो, त्याला जिवे मारावे.
5 पण तुम्ही म्हणता, जो कोणी पित्याला किंवा आईला म्हणेल की, तुला जे काही दिल्याने तुझा जो फायदा झाला असता, ते मी देवाला अर्पण केले आहे
6 ते देवाचे नियम मोडीत आहेत. आपल्या वडिलांचा व आईचा सन्मान करू नये. याप्रकारे तुम्ही आपल्या अशा परंपरेने देवाचे वचन रद्द केले आहे.
7 अहो ढोंग्यानो, तुम्हांविषयी यशया संदेष्ट्यांने योग्य सांगितले आहे. तो म्हणतो.
8 हे लोक, ओठांनी माझा सन्मान करतात पण त्यांचे ह्रदय माझ्यापासून दूर आहे.
9 आणि ते माणसाचे नियम आपली धर्मतत्त्वे म्हणून शिकवितात आणि व्यर्थच माझी उपासना करतात.”‘ यशया 29:13
10 तेव्हा लोकांना जवळ बोलावून त्याने म्हटले, ऐका व समजून घ्या.
11 जे तोंडाद्वारे आत जाते ते माणसाला अशुद्ध करीत नाही, पण जे तोंडातून बाहेर निघते तेच माणसाला अशुद्ध करते.”
12 नंतर शिष्य जवळ येऊन त्याला म्हणाले, परूश्यांनी जेव्हा हे ऐकले तेव्हा ते रागावले हे आपणांला कळते काय?
13 पण त्याने उत्तर देऊन म्हटले, प्रत्येक रोपटे जे माझ्या स्वर्गातील पित्याने लावले नाही ते उपटले जाईल.
14 त्यांना जाऊ द्या. ते आंधळे वाटाडे आहेत. जर एका आंधळ्याने दुसऱ्या आंधळ्याला वाट दाखवण्याचा प्रयत्न केला तर दोघेही खड्ड्यात पडतील.”
15 पेत्र म्हणाला, “आमच्यासाठी या बोधकथचे स्पष्टीकरण करा.”
16 “तुम्ही अजूनही बुद्धिमंदच आहेत काय?” येशूने त्यांना विचारले.
17 “जे काही तोंडात जाते ते सर्व पोटात जाते व मग बाहेर टाकले जाते. हे तुम्हांला अजून समजत नाही काय?
18 परंतु ज्या गोष्टी तोंडातून बाहेर निघतात त्या अंत:करणातून येतात व त्याच माणसाला डागाळतात.
19 कारण वाईट विचार, खून, व्यभिचार, जारकर्मे, खोट्या साक्षी, निंदा ही अंत:करणातून बाहेर निघतात.
20 माणसाला डागाळणाऱ्या याच गोष्टी आहेत न धुतलेल्या हाताने खाण्याने माणसाला विटाळ होत नाही.”

मत्तय 15:1.20

 आमच्या अंतकरणातून जे बाहेर पडते ते आम्हास अशुद्ध करते. अशुद्ध विचारांची येशूची यादी गौतम धर्मसूत्रात नमूद करण्यात आलेल्या शुद्ध विचारांच्या यादीच्या अगदी विपरीत आहे. अशाप्रकारे ते एकच गोष्ट शिकवितात.

23 परूश्यांनो, नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दु:खी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात! तुमचे जे काही आहे त्याचा दशांश तुम्ही देवाला देता- पुदिना, शेप, जिरे यांचा देखील दंशाश देता. पण नियमशास्त्राच्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे- न्यायाने वागणे, दया दाखविणे व प्रामाणिकपणे वागणे हे तुम्ही पाळत नाही. या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत व तसेच इतरही केल्या पाहिजेत.
24 तुम्ही आंधळे वाटाडे आहात. जो पाण्याने भरलेल्या प्याल्यातून माशी बाजूला करतो व उंटासह पाणी पिऊन टाकतो त्याच्यासारखे तुम्ही चष्टी तुमह् तु्ापण
25 निमअहो परूश्यांनो, नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दु:खी व्हाल, तुम्ही ढोंगी आहात! तुम्ही आपल्या ताटवाट्या बाहेरून घासता पुसता पण लोकांना फसवून कमावलेला फायदा आणि असंयम यानी त्या आतून भरल्या आहेत.
26 अहो परुश्यांनो, तुम्ही आंधळे आहात! अगोदर तुमची वाटी आतून घासा व धुवा म्हणजे ती बाहेरून देखील खरोखर साफ होईल.
27 अहो परुश्यांनो नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दु:खी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात! रंगसफेदी केलेल्या कबरांसारखे तुम्ही आहात. त्या वरून चांगल्या दिसतात पण आतून मेलेल्या माणसांच्या हाडांनी भरल्या आहेत.
28 तुमचेही तसेच आहे. लोक तुमच्याकडे पाहतात आणि तुम्ही चांगले आहात असे त्यांना वाटते. पण तुम्ही आतून ढोंग व दुष्टपणा यांनी भरला

आहात.मत्तय 23:23-28

ज्या प्याल्याने आपणास प्यावयाचे असेल तो केवळ बाहेरुनच नव्हे, तर आतून सुद्धा स्वच्छ असावा असे आपणास वाटते. या दाखल्यात आपण प्याले आहोत. आपण सुद्धा आतून शुद्ध असावे असे देवास वाटते, केवळ बाहेरून नव्हे.

आपण सर्वांनी जे पाहिले आहे ते येशू सांगत आहे. बाह्य शुद्धतेचे अनुसरण करणे धार्मिक लोकांमध्ये अत्यंत सामान्य गोष्ट असेल, पण अनेक जण अद्याप आतून लोभी आणि विलासी स्वभावाचे आहेत – ते लोक सुद्धा जे धार्मिकरित्या महत्त्वपूर्ण आहेत. आंतरिक शुद्धता प्राप्त करणे जरुरी आहे – पण ते फार कठीण आहे.

येशूने गौतमधर्मसूत्रासमानच शिकवण दिली, आठ आंतरिक संस्कारांची यादी दिल्यानंतर जे सांगते :

ज्या इसमाने चाळीस संस्कारांपैकी काही केले असतील पण त्याच्यात दुसरीकडे हे आठ सद्गुण नसतील त्याचे ब्रम्हाशी मिलन होणार नाही.

ज्या इसमाने चाळीस संस्कारांपैकी केवळ काही केले असतील पण त्याच्यात दुसरीकडे हे आठ सद्गुण असतील, त्याचे ब्रम्हाशी निश्चितच मिलन होईल

गौतमधर्म-सूत्र 8:24-25

म्हणून प्रश्न उठतो. आपणास स्वर्गाच्या राज्यात प्रवेश मिळावा म्हणून – ब्रह्माशी मिलन आपण आपल्या अंतकरणाचे शुद्धीकरण कसे करतो? द्विजाविषयी शिकण्यासाठी आपण शुभवर्तमानाचा अभ्यास सुरू ठेवू.

स्वर्गलोक : अनेकांस आमंत्रण आहे…

येशू, येशू सत्संगने, स्वर्गातील नागरिकांनी एकमेकांशी कसे वागावे हे दाखवले. ज्याला त्याने ‘स्वर्गाचे राज्य’ म्हणून संबोधिले त्याची पूर्वकल्पना घडवून देण्यासाठी त्याने लोकांचे आजार सुद्धा बरे केले आणि दुरात्म्यांस काढले. त्याच्या राज्याचे स्वरूप दाखविण्यासाठी त्याने बोलून निसर्गास आज्ञा दिली.

या राज्याची ओळख करून देण्यासाठी आपण विविध शब्दांचा उपयोग करतो. बहुधा सर्वात सामान्य म्हणजे स्वर्ग किंवा स्वर्गलोक. इतर शब्द आहेत वैकुंठ, देवलोक, ब्रह्मलोक, सत्यलोक, कैलास, ब्रह्मपूर, सत्य बेगेचा, वैकुंठलोक, विष्णुलोक, परमम पदम, नित्य विभूती, तिरुप्परमपादम किंवा वैकुंठ सागर. विविध देवांसोबतच्या असलेल्या संबंधावर जोर देऊन वेगवेगळया परंपरा वेगवेगळे शब्द वापरतात, परंतु हे फरक मूलभूत नाहीत. मूलभूत हे आहे की स्वर्ग हे एक आनंददायक आणि शांततामय ठिकाण आहे, जे येथील जीवनाशी परिचित असलेल्या दुःखापासून आणि अज्ञानापासून मुक्त आहे आणि जेथे देवाशी नातेसंबंध साकार केला जातो. बायबलमध्ये स्वर्गातील मूलभूत गोष्टींचा सारांश असा आहे :

4 तो त्यांच्या डोळ्यांतील अश्रु पूसून टाकील. आणि येथून पुढे मरण असणार नाही. शोक करणे, रडणे आणि अथवादु:खसहन् करणे राहणार नाही. कारण सर्व जुन्या गोष्टी नाहीशा झालेल्या आहेत.”

प्रकटीकरण 21:4

स्वतः येशूने देखील स्वर्गासाठी वेगवेगळ्या शब्दांचा उपयोग केला. तो नेहमी स्वर्गापूर्वी ‘राज्य’ (‘लोका’ पेक्षा ‘राज्या’स अधिक जवळ) या शब्दाचा उपयोग करीत असे. त्याने स्वर्गाच्या राज्यासोबत ‘सुखलोक’ आणि ‘देवाचे राज्य’ या शब्दांचा सुद्धा एकाच वेळी उपयोग केला. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, स्वर्गाच्या आमच्या समजात सुधार करण्यासाठी त्याने सामान्य, दैनंदिन जीवनाच्या गोष्टींचा देखील उपयोग केला. स्वर्गाविषयी समजावण्यासाठी त्याने एका अद्वितीय उदाहरणाचा उपयोग केला अर्थात मोठ्या मेजवानीचे किंवा समारंभाचे उदाहरण दिले. त्याच्या गोष्टीत तो ‘आम्ही देवाचे अतिथी म्हणजे पाहुणे आहोत’ यापेक्षा ‘देव अतिथी आहे’ (अतिथी देवो भव) या सुप्रसिद्ध वाक्यप्रचाराची उजळणी करतो.

स्वर्गाच्या मोठ्या मेजवानीची गोष्ट

स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करण्याचे निमंत्रण किती विस्तृत आहे हे समजावण्यासाठी येशूने मोठ्या मेजवानीचा दाखला शिकविला.पण ही गोष्ट आपल्या अपेक्षेनुसार घडत नाही. शुभवर्तमान सांगते :

15 आता जेव्हा मेजाभोवती बसलेल्यांपैकी एकाने हे ऐकले, तेव्हा तो येशूला म्हणाला, “देवाच्या राज्यात जेवतो, तो प्रत्येक जण धन्य!”
16 मग येशू त्याला म्हणाला, “एक मनुष्य एका मोठ्या मेजवानीची तयारी करीत होता. त्याने पुष्कळ लोकांना आमंत्रण दिले.
17 भोजनाच्या वेळी ज्यांना आमंत्रण दिले होते त्यांना “या, कारण सर्व तयार आहे’ हे सांगण्यासाठी नोकराला पाठविले.
18 ते सर्वजण सबब सांगू लागले. पाहिला त्याला म्हणाला, “मी शेत विकत घेतले आहे आणि मला जाऊन ते पाहिले पाहिजे. कृपा करुन मला क्षमा कर.’
19 दुसरा म्हणाला, “मी बैलाच्या पाच जोड्या विकत घेतल्या आहोत व त्या कशा आहेत हे बघण्यासाठी मी चाललो आहे, कृपा करुन मला क्षमा कर.’
20 आणखी तिसरा म्हणाला, “मी लग्न केले आहे, व त्यामुळे मी येऊ शकणार नाही.’
21 म्हणून जेव्हा तो नोकर परत आला, तेव्हा त्याने आपल्या मालकाला या गोष्टी सांगितल्या. मग घराचा मालक रागावला आणि नोकराला म्हणाला, “लवकर बाहेर रस्त्यावर आणि नगारातल्या गल्ल्यांमध्ये जा व गरीब, आंधळे, असहाय्य, लंगडे यांना घेऊन इकडे ये!’
22 नोकर म्हणाला, “आपल्या आज्ञेप्रमाणे केले आहे. आणि तरीही जागा आहे.’
23 मालक नोकराला म्हणाला, “रस्त्यावर जा, कुंपणाजवळ जा आणि तेथे असलेल्या लोकांना आग्रहाने आत येण्यास सांग म्हणजे माझे घर भरुन जाईल.
24 कारण मी तुम्हांस सांगतो की, त्या आमंत्रित केलेल्या कोणालाही माझ्या मेजवानीतली चव पाहायला मिळणार नाही.”

‘लूक 14:15-24

या गोष्टीत – अनेकदा – आमच्या अन्य समजुती उलट-सुलट होतात. सर्वप्रथम, आपण असे मानू शकतो की देव लोकांना स्वर्गात (मेजवानी) आमंत्रण देत नाही कारण तो फक्त योग्य लोकांस आमंत्रण देतो, हे चुकीचे आहे. मेजवानीचे आमंत्रण अनेक, अनेक लोकांस जाते. स्वामीची (देव) इच्छा आहे की मेजवानीचे ठिकाण पूर्णपणे भरून जावे.

पण येथे एक अनपेक्षित वळण लाभते! आमंत्रित लोकांपैकी खरोखर फारच कमी लोक येऊ इच्छितात. त्यांना यावे लागू नये म्हणून त्याऐवजी ते सबबी सांगू लागतात! आणि विचार करा की या सबबी किती अनुचित आहेत. आधी पारख केल्यावाचून कोण बैल विकत घेईल? आधीच पहिल्यांदा निरीक्षण केल्यावाचून कोण शेत विकत घेईल? नाही, या सबबींनी आमंत्रित अतिथींच्या अंतःकरणाचे खरे हेतू प्रगट झाले – इतर गोष्टींची आवड असल्यामुळे त्यांना स्वर्गाची आवड नव्हती.

आपण असा विचार करणार की इतके कमी लोक मेजवानीस येणार म्हणून कदाचित स्वामी निराश होईल, इतक्यातच गोष्टीस दुसरे वळण लाभते. ‘असंभाव्य’ लोक, ज्यांना आपण आमच्या उत्सवात आमंत्रण देणार नाही, जे लोक रस्त्यात “रस्त्यात आणि गल्ल्यांत” आणि “दूरच्या मार्गांवर आणि बोळांत” राहणारे, “दरिद्री, व्यंग आंधळे व लंगडे” – जे बहुधा अशा गोष्टींपासून दूर राहतात – त्यांना मेजवानीचे आमंत्रण मिळते. या मेजवानीचे आमंत्रण बरेच पुढे जाते, आणि त्यात आणखी लोकांना समाविष्ट करण्यात येते ज्याची तुम्ही व मी कल्पनाच करू शकत नाही. स्वामीला त्याच्या मेजवानीत लोक हवे आहेत आणि तो अशा लोकांना आमंत्रण देतो ज्यांना आम्ही आमच्या स्वतःच्या घरात आमंत्रण देणार नाही.

आणि हे लोक येतात! त्यांना त्यांच्या प्रेमापासून विचलित करणाऱ्या इतर आवडी नाहीत जसे शेत अथवा बैल म्हणून ते मेजवानीस येतात. स्वर्ग भरून जातो आणि स्वामींची इच्छा पूर्ण होते!

आम्ही हा प्रश्न विचारावा म्हणून येशूने ही गोष्ट सांगितली : “मला स्वर्गाचे आमंत्रण मिळाले तर मी ते स्वीकार करणार का?” किंवा दुसऱ्या कुठल्यातरी आवडीमुळे किंवा पसंतीमुळे तुम्हाला सबब सांगण्यास प्रेरणा मिळेल आणि तुम्ही आमंत्रणास नाकार देणार? सत्य हे आहे की तुम्हाला स्वर्गाच्या मेजवानीस आमंत्रण देण्यात आले आहे, पण वास्तविकता ही आहे की आमच्यापैकी बहुतांशी लोक कुठल्या ना कुठल्या कारणास्तव या आमंत्रणाचा नाकार करतील. आम्ही कधीही सरळपणे ‘नाही’ म्हणणार नाही तर आपला नकार लपविण्यासाठी आम्ही सबबी सांगू. अंतःकरणाच्या गाभाऱ्यात आमच्याजवळ ‘प्रेमाचे’ इतर विषय असतात जे आमच्या नाकाराच्या मुळाशी असतात. या गोष्टीत नाकाराचे मूळ इतर गोष्टींबद्दल प्रेम होते. ज्यांना प्रथम आमंत्रण देण्यात आले होते त्यांनी स्वर्ग आणि देवापेक्षा या जगाच्या टाकाऊ गोष्टींवर अधिक प्रेम केले. (‘शेत’, ‘बैल’ आणि ‘लग्न’ याद्वारे प्रतीक रूपात दाखविण्यात आले आहे).

अन्यायी आचार्याची गोष्ट

आमच्यापैकी काही जण स्वर्गापेक्षा या जगातील गोष्टींना अधिक महत्व देतात आणि म्हणून आपण या आमंत्रणास नाकार देऊ. आमच्यापैकी इतर जण आपल्या स्वतःच्या नीतिमत्वावर प्रेम किंवा विश्वास करतात. एका आदरणीय पुढाऱ्याचे उदाहरण देऊन येशूने दुसऱ्या गोष्टीत याविषयी सुद्धा शिकविले :

9 अशा लोकांना जे स्वत:नीतिमान असल्याचा अभिमान बाळगत होते व इतरांना कमी लेखत होते, अशा लोकांसाठी येशूने ही गोष्ट सांगितली.
10 ʇदोघे जण प्रार्थना करावयास वर मंदिरात गेले. एक परुशी होता व दुसरा जकातदार होता.
11 परुशी उभा राहिला व त्याने अशी प्रार्थना केली, “हे देवा, मी तुझे उपकार मानतो कारण, इतर लोकांसारखा म्हणजे चोर, फसविणारा, व्यभिचारी व या जकातदारासरखा मी नाही.
12 उलट मी आठवड्यातून दोनदा उपास करतो, व माझ्या सर्व उत्पन्राचा दहावा भाग देतो.’
13 “परंतु जकातदार दूर अंतरावर उभा राहिला व आपले डोळे स्वर्गाकडे वर न उचलता आपली छाती बडवीत म्हणाला, “हे देवा, मज पापी माणसावर दया कर!’
14 मी तुम्हांला सांगतो हा मनुष्य, त्या दुसऱ्याया माणसापेक्षा नितीमान ठरुन घरी गेला. कारण जो कोणी स्वत:ला उंच करतो त्याला नीच केले जाईल आणि जो कोणी स्वत:ला नीच करतो त्याला उंच केले जाईल.”

लूका 18:9-14

येथे एक परुशी (आचार्यासारखा धार्मिक पुढारी) जो त्याच्या धार्मिक प्रयत्नात आणि गुणात सिद्ध दिसत होता. त्याचे उपवास आणि पूजा सिद्ध होते आणि गरजेपेक्षा जास्त सुद्धा. पण या आचार्याने आपला भरवंसा त्याच्या स्वतःच्या गुणवत्तेवर ठेवला होता. श्री अब्राहामाने असे केले नव्हते जेव्हा त्याने फार पूर्वी देवाच्या अभिवचनात नम्रपणे केवळ विश्वास ठेवण्याद्वारे नीतिमत्व प्राप्त केले. खरे म्हणजे कर घेणाऱ्याने (त्या संस्कृतीतील अनैतिक व्यवसाय) नम्रपणे दयेची याचना केली, आणि हा विश्वास धरला की जेव्हा तोनीतिमान ठरून’ – देवासोबत योग्य स्थानघरी गेला तेव्हा त्याला दयादान देण्यात आले, तर परूशी (आचार्य), ज्याच्याविषयी आम्हाला वाटले की त्याने पुरेसे गुण कमाविले आहेत, त्याची पापे अद्याप त्याच्याविरुद्ध गणली गेली आहेत

म्हणून येशू तुम्हाला व मला विचारतो की आम्हाला खरोखर स्वर्गाच्या राज्याची इच्छा आहे काय, किंवा इतर अनेक गोष्टींच्या आवडींपैकी ही एक आवड आहे. तो आम्हास हे देखील विचारतो की आमचा विश्वास कोणत्या गोष्टीवर आहे – आमची गुणवत्ता किंवा देवाची दया आणि प्रीति.

हे अत्यंत महत्वाचे आहे की आम्ही प्रामाणिकपणे स्वतःस हे प्रश्न विचारावेत कारण अन्यथा आम्हाला त्याची पुढील शिकवण समजणार नाही – की आम्हाला आंतरिक शुद्धतेची गरज आहे.

देहामध्ये ओम – सामर्थी वचनाद्वारे दाखविलेला

ध्वनी हे पूर्णपणे भिन्न माध्यम आहे ज्याद्वारे पवित्र प्रतिमा किंवा ठिकाणांपेक्षा परम सत्यास (ब्राह्मण) समजले जाते. ध्वनि म्हणजे मुख्यत्वेकरून लहरींद्वारे प्रसारित केलेली माहिती आहे. ध्वनीद्वारे वाहून आणलेली माहिती सुंदर संगीत, निर्देशांचा संच, किंवा कोणी पाठवू इच्छित असलेला संदेश असू शकतो.

ओमचे प्रतीक. प्रणवमधील तीन भाग आणि क्रमांक 3 लक्षात घ्या.

जेव्हा कोणी आवाज किंवा ध्वनिद्वारे संदेश देतो, तेव्हा त्यात काहीतरी दैवीय असते, किंवा दैवीयचा एक भाग प्रतिबिंबित होतो.  प्रणव म्हणून उल्लेखिल्या जाणाऱ्या पवित्र ध्वनी आणि प्रतीक ओम (ऑम) द्वारे हे टिपले जाते. ओम (किंवा ऑम) एक पवित्र जप आणि त्रिकोणीय प्रतीक दोन्ही आहे. ओमचा अर्थ आणि गुणार्थ हे विविध परंपरेतील विचारसरणीनुसार भिन्न आहेत. प्राचीन हस्तलिखिते, मंदिरे, मठ आणि संपूर्ण भारतातील आत्मिक सम्मेलनांत त्रिकोणी प्रणव संकेत प्रचलित आहे. प्रणव मंत्र अंतिम सत्य (ब्राह्मण) अधिक चांगल्याप्रकारे समजून घेण्यासाठी आहे. . ओम म्हणजे अकसरा किंवा एकक्षराच्या बरोबरीचे आहे  – एक अविनाशी वास्तविकता किंवा सत्य.

त्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण आहे की वेद पुस्तकांत (बायबल) सृष्टीची नोंद तीन भागी अभिकर्त्याच्या बोलण्याद्वारे होते. देव ‘बोलला’ (संस्कृत व्याहृति (व्याहृती)) आणि सर्व प्रकारच्या लहरींच्या माध्यमातून प्रसारित होणारी माहिती प्रसारित केली गेली .लोकामुळे आज व्याहृतीच्या जटिल विश्वामध्ये वस्तुमान आणि उर्जा यांची नियमबद्ध रचना घडून आली. हे घडले कारण ‘देवाचा आत्मा’ वस्तुमात्रावर तरंगत होता किंवा कंपन करीत होता. कंपन दोन्ही प्रकारची शक्ती आहे अर्थात उर्जा आणि ध्वनीचे सार देखील त्यात आहे. हिब्रू वेद वर्णन करतात की कशाप्रकारे तिहेरी : देव, देवाचा शब्द, आणि देवाचा आत्मा, यांनी त्याच्या उच्चाराची (व्याहृति) घोषणा केली, परिणामी आपण आता पाहत असलेले विश्व निर्माण झाले. येथे त्याची नोंद आहे.

हिब्रू वेद : त्रिएक उत्पन्नकर्ता उत्पत्ति करतो

वाने आकाश व पृथ्वी निर्माण केली.
2 सुरुवातीला पृथ्वी पूर्णपणे रिकामी होती; पृथ्वीवर काहीही नव्हते. अंधाराने जलाशय झाकलेले होते; आणि देवाचा आत्मा पाण्यावर पाखर घालीत होता
3 नंतर देव बोलला, “प्रकाश होवो” आणि प्रकाश चमकू लागला.
4 देवाने प्रकाश पाहिला आणि त्याला कळले की तो चांगला आहे. नंतर देवाने अंधारापासून प्रकाश वेगळा केला.
5 देवाने प्रकाशाला “दिवस” व अंधाराला “रात्र” अशी नावे दिली.संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली. हा झाला पहिला दिवस.
6 नंतर देव बोलला, “जलांस दुभागण्याकरिता जलांच्या मध्यभागी अंतराळ होवो.”
7 तेव्हा देवाने अंतराळ केले आणि अंतराळावरच्या व खालच्या जलांस वेगळे केले.
8 देवाने अंतराळास “आकाश” असे नांव दिले.संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली. हा झाला दुसरा दिवस.
9 नंतर देव बोलला, “अंतराळाखालील पाणी एकत्र गोळा होवो व कोरडी जमीन दिसून येवो.” आणि तसे घडले,
10 देवाने कोरड्या जमिनीस “भूमि” आणि एकत्र झालेल्या जलसंचयास “समुद्र” अशी नावे दिली. आणि देवाने पाहिले की हे चांगले आहे.
11 मग देव बोलला, “गवत, बीज देणाऱ्या वनस्पती आणि फळे देणाऱ्या वनस्पती पृथ्वीवर वाढोत. फळझाडे बिया असलेली फळे तयार करतील आणि प्रत्येक वनस्पती आपल्या जातीच्याच बिया तयार करील अशा वनस्पती पृथ्वीवर वाढोत.” आणि तसे झाले.
12 गवत, आपापल्या जातीचे बीज देणाऱ्या वनस्पती आणि आपापल्या जातीची फळे देणारी व त्या फळातच आपापल्या जातीचे बीज असणारी फळ झाडे भूमीने उपजविली. देवाने पाहिले की हे चांगले आहे.
13 संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली. हा झाला तिसरा दिवस.
14 मग देव बोलला “दिवस व रात्र ही वेगळी करण्यासाठी आकाशात ज्योति होवोत व त्या विशेष चिन्हे, आणि विशेष मेळावे, ऋतू, दिवस, आणि वर्षे दाखविणाऱ्या होवोत.
15 पृथ्वीला प्रकाश देण्यासाठी आकाशात त्या ज्योति होवोत.” आणि तसे झाले.
16 देवाने दोन मोठ्या ज्योति निर्माण केल्या. दिवसावर सत्ता चालविण्यासाठी मोठी ज्योति सूर्य आणि रात्रीवर सत्ता चालविण्यासाठी लहान ज्योति, चंद्र, आणि त्याने तारेही निर्माण केले.
17 देवाने त्या ज्योति पृथ्वीवर प्रकाश पाडण्यासाठी आणि दिवसावर व रात्रीवर सत्ता चालविण्यासाठी आकाशात ठेवल्या. त्या ज्योतींनी प्रकाश व अंधार वेगळे केले. आणि देवाने पाहिले की हे चांगले आहे.
18
19 संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली. हा झाला चौधा दिवस.
20 मग देव बोलला, “जलामध्ये जीवजंतूचे थवेच्या थवे उत्पन्न होवोत. आणि पृथ्वीवर आकाशात पक्षी उडोबागडोत” –
21 समुद्रातील प्रचंड जलचर म्हणजे पाण्यात फिरणारे व अनेक जातीचे व प्रकारचे जलप्राणी देवाने उत्पन्न केले. तसेच आकाशात उडणारे निरनिराळड्या जातीचे पक्षीही देवाने उत्पन्न केले आणि देवाने पाहिले की हे चांगले आहे.
22 देवाने त्यांना आशीर्वाद दिला, “फलद्रूप व्हा, वाढा, समुद्रातील पाणी व्यापून व भरुन टाका आणि पक्षी बहुगुणित होवोत व पृथ्वी व्यापून टाकोत.”
23 संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली हा होता पाचवा दिवस.
24 मग देव बोलला, “निरनिराळया जातीचे पशू, मोठे प्राणी वेगवेगळड्या जातीचे सरपटणारे व रांगणारे लहान प्राणी असे जीवधारी प्राणी पृथ्वीवर उत्पन्न होवोत. ते आपापल्या जातीचे अनेक प्राणी निर्माण करोत.” आणि तसे सर्व झाले.
25 असे देवाने वनपशू, पाळीव जनावरे, सरपटत जाणारे लहान प्राणी व वेगवेगळया जातीचे जीवधारी प्राणी निर्माण केले. आणि देवाने पाहिले की हे चांगले

आहे.उत्पत्ति 1:1-25

त्यानंतर हिब्रू वेद सांगतात की देवाने मानवजातीला ‘देवाच्या प्रतिरूपात’ उत्पन्न केले जेणेकरून आपणास निर्माणकर्त्यास प्रतिबिंबित करता यावे. पण आपले प्रतिबिंब इतके मर्यादित आहे की आपण बोलण्याने निसर्गाला आज्ञा देऊ शकत नाही. पण येशूने हे केले. आम्ही पाहतो की शुभवर्तमानाची पुस्तके या घटना कशा नोंदवितात

येशू निसर्गाशी बोलतो

येशूला ‘शब्दाद्वारे’ शिकवण्याचा आणि रोग बरे करण्याचा अधिकार होता. शुभवर्तमानात हे लिहिले आहे की त्याने हे सामर्थ्य कसे दाखविले की त्याचे शिष्य ‘भीती व आश्चर्य’ यांनी भारावून गेले होते.

22 त्या दिवसात एकदा असे झाले की, येशू त्याच्या शिष्यांसह नावेत बसला. आणि तो त्यांना म्हणाला, “आपण सरोवराच्या पलीकडाच्या बाजूला जाऊ या.”
23 आणि ते निघाले. ते जात असता येशू झोपी गेला. सरोवरावर तुफान वादळी वारे सुरु झाले व नावेत पाणी जाऊ लागले. ते अतिधोकादायक स्थितीत सापडले.
24 म्हणून त्यांनी त्याला उठविले, ते त्याला म्हणाले, “गुरुजी, गुरुजी, आपण बुडत आहोत!”मग तो उठला. त्याने वारा व लाटा यांना दटाविले. ते थांबले. व सर्वत्र शांतता पसरली.
25 येशू त्यांना म्हणाला, “तुमचा विश्वास कोठे आहे?” पण ते भयचकित आणि विस्मित झाले व एकमेकांना म्हणाले, “हा आहे तरी कोण? कारण तो वारा आणि लाटा यांनाही आज्ञा करतो आणि ते त्याचे ऐकतात?”

लूक 8:22-25

येशूच्या शब्दाने वारा आणि लाटा यांनासुद्धा आज्ञा केली! शिष्य भयभीत झाले यात आश्चर्यच नाही. दुसऱ्या प्रसंगी त्याने हजारों लोकांसमवेत असेच सामर्थ्य दाखविले. यावेळी त्याने वारा आणि लहरी यांना आज्ञा दिली नाही – तर अन्नास दिली.

तर येशू गालील (किंवा तिबिर्या) सरोवराच्या पलीकडे गेला.
2 तेव्हा पुष्कळ लोक येशूच्या मागे गेले. कारण येशूने अनेक आजारी लोकांना बरे केले. व निरनिराळ्या मार्गांनी आपले जे सामर्थ्य दाखविले ते लोकांनी पाहिले. म्हणून ते त्याच्यामागे गेले.
3 मग येशू टेकडीच्या वर चढून गेला. तो आपल्या शिष्यांसह तेथे बसला.
4 त्याच सुमारास यहूदी लाकांचा वल्हांडण सण जवळ आला होता.
5 येशूने नजर वर करुन पाहिले तो लाकांचा मोठा समुदाय आपणांकडे येताना त्याला दिसला. येशू फिलिप्पाला म्हणाला, “आपण या लोकांना पुरेशा भाकरी कोठून विकत आणाव्या बरे?”
6 (फिलिप्पची परीक्षा पाहण्यासाठी येशूने त्याला हा प्रश्न विचारला, कारण आपण काय करायचे याचा विचार येशूने अगोदरच करुन ठेवला होता.)
7 फिलिप्पने उत्तर दिले, “येथील प्रत्येकाला थोडी थोडी भाकर दिली तरी या सर्वांना पुरेशा भाकर विकत घेण्यासाठी आपणा सर्वांना महिनाभर काम करावे लागेल.”
8 आंद्रिया नावाचा दुसरा एक शिष्य तेथे होता. आंद्रिया हा शिमोन पेत्राचा भाऊ होता.
9 आंद्रिया म्हणाला, “येथे असलेल्या एका लहान मुलाजवळ जवाच्या पाच भाकरी आणि दोन लहान मासे आहेत. परंतु इतक्या लोकांना त्या पुरणार नाहीत.”
10 येशू म्हणाला, “लोकांना खाली बसण्यास सांगा.” ती बरीच गवताळ अशी जागा होती. तेथे खाली बसलेले सुमारे पाच हजार पुरुष होते.
11 मग येशूने त्या भाकरी हातात घेतल्या; येशूने भाकरीबद्दल देवाचे उपकार मानले आणि त्या तेथे बसलेल्या लोकांना दिल्या. मासे घेऊन त्याने तसेच केले. येशूने लोकांना पाहिजे तितके खाऊ दिले.
12 सर्व लोकांना खाण्यासाठी भरपूर होते. जेवण झाल्यावर येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, “लोकांनी खाऊन उरलेले भाकरींचे व माशांचे तुकडे गोळा करा. काहीही वाया जाऊ देऊ नका.”
13 म्हणून शिष्यांनी उरलेले तुकडे जमा केले. लोकांनी जेवायाला सुरुवात केली, तेव्हा जवाच्या फत्त पाच भाकरी तेथे होत्या. शिष्यांनी उरलेल्या तुकडचांच्या बारा टोपल्या भरल्या.
14 येशूने केलेला हा चमत्कार लोकांनी पाहिला, तेव्हा ते म्हणाले, “जगात येणारा संदेष्टा तो खरोखर हाच असला पाहिजे.”
15 आपण राजा बनावे असे लोकांला वाटते हे येशूला माहीत होते. येशूला आपला राजा करावे असा बेत लोकांनी केला. तेव्हा येशू तेथून निघून एकटाच डोंगराळ भागात

गेला.योहान 6:1-15

जेव्हा त्यांनी पाहिले की, येशू केवळ उपकार मानून अन्न वाढवू शकतो तेव्हा त्यांना कळून आले की तो अद्वितीय आहे. तो वागीशा (वागीशा, संस्कृतमध्ये वाणीचा प्रभु) होता. पण याचा अर्थ काय होता? नंतर येशूने आपल्या शब्दांचे सामर्थ्य किंवा प्राण स्पष्ट करून समजाविले.

 63 शरीराद्दरे मनुष्याला जीवन मिळत नाही. परंतु आत्म्याकडून ते जीवन मिळते. मी तुम्हांला सांगितलेल्या गोष्टी आत्म्याविषयी आहेत, म्हणूनच या गोष्टीपासून जीवन मिळते.

योहान 6:63

आणि

57 पित्याने मला पाठविले. तो जिवंत आहे आणि पित्यामुळे मीही जगतो. म्हणून जो कोणी मला खातो तो माझ्यामुळे जिवंत राहील.

योहान 6:57

येशू असा दावा करीत होता की त्याने देहात मूर्तिमंत सृष्टीच्या त्रिएक उत्पन्नकर्त्यास (पिता, शब्द, आत्मा) देहधारण केले होते ज्याने आपल्या बोलण्याद्वारे विश्वास अस्तित्वात आणले होते. तो मानवी रूपात जिवंत ओम होता. जिवंत देहातील तो पवित्र त्रि-भाग किंवा त्रिएक प्रतीक होता. त्याने वारा, लहरी आणि द्रव्य यावर आपले सामर्थ्य बोलून प्राण (प्राण) किंवा जीवन-शक्ती जिवंत प्रणव असल्याचे दाखवून दिले.

ते कसे असू शकते? याचा अर्थ काय?

समजण्यासाठी अंतःकरणे

येशूच्या शिष्यांना हे समजण्यास फार कठीण गेले. 5000 लोकांना खावयास दिल्यानंतर शुभवर्तमानात हे लगेच नोंदवले गेले आहे :

45 नंतर येशूने लगेच शिष्यांना नावेत बसविले आणि पलीकडे असलेल्या बेथसैदा येथे त्याच्यापुढे जाण्यास सांगतिले. तोपर्यंत त्याने लोकांना निरोप देऊन घरी पाठवले.
46 त्यांना निरोप दिल्यावर तो प्रार्थना करण्यास डोंगरावर गेला.
47 संध्याकाळ झाली तेव्हा नाव सरोवराच्या मध्यभागी होती आणि जमिनीवर येशू एकटाच होता.
48 मग त्याने त्यांना वल्ही मारणे अवघड जात आहे असे पाहिले. कारण वारा त्यांच्या विरुद्धचा होता. पहाटे तीन ते सहाच्या दरम्यान येशू नावेकडे गेला. येशू पाण्यावरून चालत होता व तो त्यांना ओलांडून पुढे जाऊ लागला.
49 जेव्हा त्यांनी त्याला सरोवरावरून पाण्यावरून चालताना पाहिले तेव्हा त्यांना ते भूत आहे असे वाटले व ते ओरडले.
50 कारण त्या सर्वांनी त्याला पाहिले व ते घाबरून गेले. तो लगेच त्यांना म्हणाला, “धीर धरा, भीऊ नका, मी आहे,”
51 नंतर तो त्यांच्याकडे नावेत गेला तेव्हा वारा शांत झाला. ते अतिशय आश्चर्यचकित झाले.
52 कारण त्यांना भाकरीच्या संदर्भातील चमत्कार समजलाच नव्हता आणि त्यांची मने कठीण झाली होती.
53 त्यांनी सरोवर ओलांडल्यावर ते गनेसरेतच्या किनाऱ्याला आले व नाव (होड़ी) बांधून टाकली.
54 ते नावेतुन उतरले, तेव्हा लोकांनी येशूला ओळखले.
55 लोक हे सागण्यासाठी इतर सर्व लोकांकडे पळाले आणि आजाऱ्यांना खाटेवर घालून जेथे तो आहे असे ऐकले तेथे घेऊन जाऊ लागले.
56 खेड्यात, गावात किंवा शेतात आणि, जेथे बाजाराच्या जागी कोठे तो गेला तेथे लोकांनी आपल्या आजारी माणसांना आणून ठेवले. त्यांनी त्याला फक्त त्याच्या झग्याच्या काठाला स्पर्श करू देण्याची विनंति केली. ज्यांनी त्याला स्वर्श केला ते बरे

झाले.मार्क 6:45-56

असे म्हटले आहे की शिष्यांना ‘उमगले नव्हते’. न समजण्याचे कारण ते बुद्धिमान नव्हते असे नाही; याचे कारण त्यांनी काय घडले ते पाहिले नाही हे नव्हते; कारण ते वाईट शिष्य होते असे नाही; त्यांनी देवावर विश्वास ठेवला नाही यामुळे देखील ते नव्हते. असे म्हटले आहे की त्यांचेअंतःकरण कठीण झाले. आपल्या स्वतःच्या कठोर अंतःकरणामुळे आपल्याला आत्मिक सत्य समजणे कठीण जाते.

त्याच्या काळातल्या लोकांत येशूविषयी इतके मतभेद होते याचे हे मूलभूत कारण आहे. वैदिक परंपरेनुसार आपण असे म्हणू शकतो की तो प्रणव किंवा ओम असल्याचा दावा करीत होता, अक्षर ज्याने आपल्या बोलण्याने जग अस्तित्वात आणले, आणि नंतर मनुष्य – क्सर अर्थात क्षर म्हणजे नाशमान बनला. बौद्धिकदृष्ट्या समजून घेण्यापेक्षा आपल्या अंतःकरणातून हट्टीपणा दूर करण्याची गरज आहे.

म्हणूनच योहानाचे तयारीचे काम महत्त्वपूर्ण होते. त्याने लोकांस पाप लपविण्याऐवजी त्यांच्या पापांची कबुली देऊन पश्चात्ताप करण्यास सांगितले. जर येशूच्या शिष्यांची अंतःकरणे कठोर होती ज्यासाठी पश्चात्ताप करण्याची आणि पापांची कबुली देण्याची गरज होती, तर आपण आणि मी असे करणे किती जरूरी आहे!

काय करावे?

अतःकरण नम्र करण्यासाठी समज प्राप्त करण्यासाठी मंत्र

मला ही हिब्रू वेदांमध्ये मंत्र म्हणून दिलेली कबुली देणारी प्रार्थना करणे सहायक असल्याचे आढळले आहे. कदाचित हे ध्यान करणे किंवा जप करणे तसेच ओम आपल्या अंतःकरणातही कार्य करील.

वा, माझ्यावर दया कर, तुझ्या अतिशय प्रेमळ दयाळूपणाने आणि तुझ्या कृपेने माझी पापे पुसून टाक.
2 देव माझे अपराधीपण खरवडून घालवून टाक. माझी पापे धुऊन टाक, मला पुन्हा स्वच्छ कर.
3 मी पाप केले हे मला माहीत आहे. ती पापे मला नेहमी दिसतात.
4 तू ज्या गोष्टी चुकीच्या आहेत असे सांगतोस त्याच मी केल्या. देवा मी तुझ्याविरुध्द पाप केले. मी त्या पापांची कबुली देतो म्हणजे लोकांना कळेल की मी चुकलो आणि तू बरोबर होतास. तुझे निर्णय योग्य आहेत.
5 मी पापातच जन्मलो आणि पापातच माझ्या आईने माझा गर्भ धारण केला.
6 देवा, मी खरोखरच प्रामणिक व्हावे असे वाटत असेल तर शहाणपण माझ्या आत खोलवर ठेव.
7 मला शुध्द करण्यासाठी तू एजोब वनस्पती वापर आणि विधी कर. मला आंघोळ घाल म्हणजे मी बफर्पोक्षा शुभ्र होईन.
8 मला सुखी कर, पुन्हा आनंदी कसे व्हायचे ते मला सांग. तू जी हाडे चिरडून टाकलीस ती पुन्हा आनंदी होऊ दे.
9 माझ्या पापांकडे बघू नकोस, ती पुसून टाक.
10 देवा माझ्यात पवित्र ह्दय निर्माण कर. माझा आत्मा पुन्हा बलशाली कर.
11 मला दूर लोटू नकोस आणि तुझा पवित्र आत्मा माझ्यातून काढून घेऊ नकोस.
12 मी तुझ्या मदतीमुळे आनंदी झालो, मला पुन्हा तुझा आनंद दे, माझा आत्मा सबळ कर आणि तुझ्या आज्ञा पाळणारा

कर.स्तोत्र 51:1-4,10-12

जिवंत शब्द म्हणून, येशू हा देवाचा “ओम” आहे याचा अर्थ काय आहे, हे समजण्यासाठी आम्हाला या पश्चात्तापाची गरज आहे.

तो का आला? आपण पुढे पाहू.

येशू बरे करतो – त्याचे राज्य प्रकट करतो

राजस्थानच्या, मेहंदीपूरजवळील, बालाजी मंदिराची ख्याति आहे की तेथे दुरात्मे, भुते, प्रेत किंवा पिशाच्च यांनी पीड़ित लोकांना बरे केले जाते जे लोकांना त्रास देतात. हनुमानजी (बाल स्वरूपात भगवान हनुमान) यांना बालाजी, किंवा बालजी असेही म्हणतात. त्याचे बालाजी मंदिर किंवा मंदिर, दुरात्म्यांनी पीडित लोकांसाठी, तीर्थ किंवा तीर्थस्थान आहे. दररोज, हजारो यात्रेकरू, भक्त आणि आत्मिकरित्या गांजलेले लोक तीर्थ यात्रा करून अशा सर्व आत्मिक पछाडण्यापासून बरे होण्याच्या आशेने मंदिरास भेट देतात. या बालाजी किंवा हनुमान जी मंदिरात भूतग्रस्त आणि भुताटकी, समाधी आणि भूते काढणे सर्वसामान्य आहे आणि अशाप्रकारे मेहंदीपूर बालाजी तीर्थस्थान आहे जे दुरात्म्यांपासून सामर्थ्यपूर्ण मुक्तता देऊ शकते असे मानले जाते.

अनेकप्रकारच्या वेगवेगळ्या आख्यायिका आहेत परंतु त्या म्हणतात की हनुमानाने त्या ठिकाणी प्रतिमेत स्वतःला प्रकट केले आहे, म्हणून हनुमानजीच्या स्मरणार्थ तेथे मंदिर बांधले गेले. असे वृत्त आहे की श्रीमेहंदीपूर बालाजी मंदिर येथे लोक समाधी अवस्थेत, संमोहन अवस्थेत असतात आणि सुटकेच्या प्रतीक्षेत त्यांना भिंतींना बांधून ठेवण्यात येते. बालाजीचे दिवस म्हणजे मंगळवार आणि शनिवार त्या दिवशी भाविक जास्त संख्येने येतात. आरती, किंवा पूजेच्या वेळी, भूतग्रस्तांचा आक्रोश ऐकू येतो, आणि लोक आग पेटवितात आणि त्यांना समाधी अवस्थेत वाटेल तसे नाचताना पाहता येते.

वेद पुस्तकांमध्ये भुते आणि दुरात्मे

खरोखर संपूर्ण इतिहास काळात दुरात्म्यांनी लोकांना त्रास दिला आहे. का? ते कोठून येतात?

वेद पुस्तक (बायबल) स्पष्ट करते की सैतान, ज्याने अरण्यात येशूची परीक्षा घेतली होती, अनेक पतीत दूतांचा पुढारी आहे. पहिल्या मानवांनी सर्पाचे ऐकले, तेव्हापासून या दुरात्म्यांनी लोकांस गांजले आहे व त्यांना नियंत्रित केले आहे. जेव्हा पहिल्या मानवांनी सर्पाचे ऐकले, तेव्हा सत्य युग संपुष्टात आले आणि आम्ही त्याला आमच्यावर ताबा ठेवण्याचा आणि आम्हास गांजण्याचा अधिकार दिला.

येशू आणि देवाचे राज्य

येशूने देवाच्या राज्याविषयी अधिकारवाणीने शिकविले. त्याच्याजवळ तो अधिकार होता हे दाखविण्यासाठी त्याने लोकांस गांजणारी दुरात्मे, पिशाच्चे  व भूते काढली.

येशू भूतग्रस्तास बरे करतो

येशूने भूत-पिशाच्चांचा अनेकदा सामना केला. जरी शिक्षक म्हणून तो सुप्रसिद्ध असला, तरीही त्याने दुरात्म्यांनी पीडित असलेल्या लोकांना बरे केल्याची शुभवर्तमानात नोंद आहे. येथे अशा या पहिल्या आरोग्यदानाविषयी लिहिलेले आहे :

21 येशू व त्याचे शिष्य कफर्णहूमास गेले. लगेच येणाऱ्या शब्बाथ दिवशी येशू सभास्थानात गेला आणि लोकांना त्याने शिकविले.
22 त्याच्या शिकवणुकीने ते चकित झाले, कारण येशू नियमशास्त्राच्या शिक्षकांप्रमाणे शिकवीत नव्हता, तर त्याला अधिकार असल्यासारखा शिकवीत होता.
23 त्यांच्या सभास्थानात एक भूतबाधा झालेला मनुष्य होता, तो एकदम मोठ्याने ओरडला,
24 आणि म्हणाला, “नासरेथच्या येशू, तुला आमच्याकडून काय पाहिजे? तू आमचा नाश करावयास आला आहेस काय? तू कोण आहेस हे मला माहीत आहे, देवाचा पवित्र असा तू आहेस.”
25 परंतु येशूने त्याला अधिकारवाणीने म्हटले, “शांत राहा व याच्यातून नीघ.”
26 नंतर अशुद्ध आत्म्याने त्याला पिळले व तो मोठ्याने ओरडून त्याच्यातून बाहेर गेला.
27 आणि लोक आश्चर्यचकित झाले, व एकमेकांस विचारू लागले, “येथे काय चालले आहे? हा मनुष्य कही तरी नवीन शिकवीत आहे. आणि तो अधिकाराने शिकवीत आहे. तो दुष्ट आत्म्यांना आज्ञा करतो आणि ते त्याचे ऐकातात!
28 मग येशूविषयीची बातमी ताबडतोब गालीलाच्या सर्व प्रदेशात पसरली.

मार्क 1:21-28

शुभवर्तमान नंतर एका आरोग्यदानाचे वर्णन करते जेथे लोकांनी भूतग्रस्त माणसास साखळदंडांनी बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला, जसे मेहंदीपुर बालाजी मंदिरात करतात, पण हे साखळदंड त्याला बांधून ठेवू शकले नाहीत. शुभवर्तमान त्याचे अशाप्रकारे वर्णन करते

ग ते सरोवराच्या पलीकडच्या बाजूच्या गरसेकरांच्या देशात आले आणि तो नावेतून उतरला तेव्हा
2 लगेच एक दुष्ट आत्मा लागलेला मनुष्य स्मशानातून निघून त्याच्याकडे आला.
3 हा मनुष्य कबरेमध्ये राहत असे. आणि कोणीही त्याला साखळदंडानी सुद्धा बांधून ठेवू शकत नव्हते.
4 कारण पुष्कळदा त्याच्या पायात बेड्या घालून साखळ्यांनी बांधलेले असतानाही त्याने साखळ्या तोडल्या आणि बेड्यांचे तुकडे केले. कोणीही त्याला काबूत आणू शकत नव्हते.
5 तो रात्रंदिवस कबरांतून आणि डोंगरातून मोठ्याने ओरडत असे आणि दगडांनी स्वत:स ठेचून घेत असे.
6 त्याने य़ेशूला दुरून पाहिले तेव्हा तो येशूकडे धावत आला आणि त्याच्यापुढे पडून त्याने त्याला नमन केले.
7 व तो मोठ्याने ओरडून काय पाहिजे? मी तुला देवाची शपथ घालून विनवितो की, मला छळू नकोस.”
8 (कारण येशू त्याला म्हणत होता, “अरे अशुद्ध आत्म्या, या माणसातून नीघ.ʈ)
9 मग येशूने त्याला विचारले, “तुझे नाव काय?”तो मनुष्य येशूला म्हणाला, “माझे नाव सैन्यआहे, कारण आम्ही पुष्कळ आहोत.”
10 त्यांना या हद्दीतून घालवू नये म्हणून. तो मनुष्य येशूला पुन्हा पुन्हा विनवीत होता.
11 तेथे डोंगराच्या कडेला डूकारांचा एक मोठा कळप चरत होता.
12 मग त्या दुष्ट आत्म्याने येशूला विनंति केली आणि म्हणाला, “आम्हांला त्या डुकरांत पाठव म्हणजे आम्ही त्यांच्यात शिरू.”
13 मग त्याने त्यांना तसे करण्यास परवानगी दिली. मग दुष्ट आत्मे त्या मनुष्यातून बाहेर आले आणि त्या डुकरांत शिरले. मग तो दोन हजारांचा कळप टेकडीवरून पळत खाली जाऊन सरोवरात पडला व बुडून मेला.
14 त्या कळापाची राखण करणारे लोक दूर पळून गेले व त्यांनी ही बातमी गावात व शेतात सांगितली, तेव्हा काय झाले हे पाहण्यास लोक तेथे आले.
15 ते येशूकडे आले आणि त्यांनी त्या भूतग्रस्ताला तेथे बसलेले पाहिले. त्याने कपडे घातले होते. तो शुद्धीवर आलेला व ज्याला सैन्य नावाच्या भुतांनी पछाडले होते तो तोच होता हे पाहिले तेव्हा त्यांना भीति वाटली.
16 काही लोक तेथे होते व त्यांनी येशूने काय केले हे पाहिले होते, त्यांनी ज्या मनुष्यात दुष्ट आत्मा होता त्याच्या बाबतीत काय घडले हे इतरांना सांगितले.
17 मग लोक त्याला आमचा प्रांत सोडून जा असे विनवू लागले.
18 येशू नावेतून जात असता पूर्वी भूतग्रस्त असलेल्या मनुष्याने त्याला आपणाबरोबर येऊ द्यावे अशी विनंति केली.
19 पण येशूने त्याला येऊ दिले नाही. तो त्यास म्हणाला, “आपल्या घरी तुझ्या लोकांकडे जा आणि प्रभुने तुझ्यासाठी जे केले ते सर्व सांग. प्रभूने तुझ्यावर कशी दया केली तेही सांग.”
20 मग तो निघाला आणि येशूने त्याच्यासाठी जे काही केले याविषयी दकापलिस येथील लोकांना सागू लागला, तेव्हा सर्व लोकांना आश्चर्च

वाटले.मार्क 5:1-20

मानवदेहात देवाचा पुत्र म्हणून, येशूने रोग्यांस बरे करीत देशभर प्रवास केला, ते जेथे राहत असत तेथे तो गेला. भूतप्रेतांपासून त्यांच्यावर होणाऱ्या त्रासाशी तो परिचित झाला, आपल्या मुखातून निघणाऱ्या वचनाच्या अधिकाराने मात्र त्याने त्यांस बरे केले

येशू रोग्यांस  बरे करतो

मार्च 17,  2020 रोजी, कोरोनाव्हायरसच्या उद्रेकामुळे मेहंदीपुर बालाजी मंदिर अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले. दुरात्म्यांपासून बरे करण्यासाठी सुप्रसिद्ध असले तरीही, मेहंदीपुर बालाजीचे भक्त या नवीन संसर्गजन्य रोगास बळी पडू शकतात. येशूने, परंतु, लोकांस केवळ दुरात्म्यांपासून सोडविले नाही, तर संसर्गजन्य रोगांपासून सुद्धा बरे केले. अशा एका आरोग्यदानाविषयी अशाप्रकारे लिहिण्यात आले आहे :

41 येशूला त्याची दया आली. मग त्याने हात लांब केला आणि त्याला स्पर्श केला व त्याला म्हणाला, “मला तुला बरे करावयाचे आहे. तुझा कुष्टरोग बरा होवो.”
42 आणि लगेच त्याचे कुष्ठ गेले व तो शूद्ध झाला.
43 येशूने त्याला सक्त ताकीद दिली व लगेच जाण्यास सांगितले. येशू त्याला म्हणाला,
44 “पाहा, याविषयी कोणाला काहीही सांगू नकोस, परंतु जा आणि स्वत:ला याजकाला दाखव. व स्वत:च्या शुद्धीकरणासाठी मोशेच्या आज्ञेप्रमाणे अर्पण कर. हे यासाठी कर की, तू शुद्ध झाला आहेस याची त्या सवांर्ना साक्ष पटावी.
45 परंतु तो मनुष्य गेला व त्याने मोकळेपणाने सांगण्यास सुरुवात केली व ही बातमी पसरविली. याचा परिणाम असा झाला की, येशूला उघडपणे शहरात जाता येईना. म्हणून तो एकांतवासात राहिला. आणि चोहोबाजूंनी लोक त्याच्याकडे

आले.मार्क 1:40-45

बरे करणारा म्हणून येशूचा नावलौकिक इतका वाढत गेला की लोकांची गर्दी त्याच्याभोवती जमा होऊ लागली, जसे ते बालाजी मंदिर येथे करतात (ते उघडे असताना).

31 नंतर तो गालीलातील कफर्णहूम गावी गेला. तो त्यांना शब्बाथ दिवशी शिक्षण देत असे.
32 ते त्याच्या शिकवणीने आश्चर्यचकित झाले, कारण तो अधिकारवाणीने शिकवीत असे.
33 सभास्थानात एक मनुष्या होता, त्याच्यात अशुद्ध आत्मा होता.
34 तो मोठ्याने ओरडून म्हणाला, “हे नासरेथच्या येशू, तुला आमच्याकडून काय पाहिजे? तू आमचा नाश करावयास आला आहेस काय? तू कोण आहेस हे मला माहीत आहे: देवाचा पवित्र तोच तू आहेस.”
35 येशूने त्याला दटावले आणि म्हटले, “शांत राहा आणि त्याच्यातून नीघ!” तेव्हा त्या अशुद्ध आत्म्याने त्या मनुष्याला जमिनीवर खाली ढकलले व त्या माणसाला काहीही इजा न करता तो बाहेर आला.
36 सर्व जण आश्चर्यचकित झाले व एकमेकांशी बोलू लागले, “हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? अधिकाराने आणि सामर्थ्याने तो अशुद्ध आत्म्यांना आज्ञा करतो व ते बाहेर येतात.”
37 अशा प्रकारे त्या भागात त्याच्याविषयी सगळीकडे ही बातमी पसरली.
38 येशू सभास्थानातून निघून शिमोनाच्या घरी गेला. शिमोनाची सासू अति तापाने आजारी होती. त्यांनी येशूला तिला बरे करण्याविषयी विनवि

ले.लूका 4:38-41

येशू आंधळे, लंगडे, बहिरे लोक बरे करतो

आजच्या प्रमाणेच येशूच्या काळात यात्रेकरू शुद्ध होण्याच्या व आरोग्यप्राप्तीच्या आशेने पवित्र तीर्थक्षेत्रात पूजा करीत. आपण या अनेक आरोग्यप्राप्तीच्या नोंदींपैकी दोनचे अवलोकन करू या :

तर एका यहुदी सणासाठी येशू यरुशलेमला गेला.
2 यरुशलेमात एक तळे आहेत. त्या तव्व्याला लागून पाच पडव्या आहेत. (होत्या) यहूदिभाषेत।त्या तव्वयाला बेथेझाथाम्हणत. हे तळे मेंढरे नावाच्या वेशीजवळ आहे.
3 तव्व्यालगतच्या पडव्यामध्ये अनेक रोगी पडून असत. त्यात काही आंधळे, लंगडे व काही पांगळे होते.
4 कारण की देवदूत वेळोवेळी तव्व्यात उतरुन पाणी हालवीत असे आणि पाणी हालविल्यानंतर प्रथम जो त्यात जाई त्याला कोणताही रोग असेला तरी तो बरी होत असे.
5 तेथे अडतीस वर्षे आजारी असलेला एक रोगी पडून होता.
6 येशूने त्याला तेथे पडलेला पाहिले, तो मनुष्य तेथे बराच काळ पडून असावा हे येशूने ओळखले. म्हणून येशूने त्या मनुष्याला विचारले. “तुला बरे व्हावयाला पाहिजे का?”
7 त्या आजारी मनुष्याने उत्तर दिले, “महाराज, पाणी हालते तेव्हा त्यात घेऊन जाण्यासाठी माझ्याजवळ कोणीच व्यक्ति नाही. सर्वांत अगोदर पाण्यात उतरण्यासाठी मी निघालो की, माझ्या अगोदर दुसराच रोगी पाण्यात उतरतो.”
8 मग येशू म्हणाला, “उठून उभा राहा! आपली खाट उचल आणि चालू लाग.”
9 तेव्हा तो रोगी ताबडतोब बरा झाला, तो आपली खाट उचलून चालू लागला. हे सर्व ज्या दिवशी घडले तो शब्बाथाचा दिवस होता.
10 म्हणून बऱ्या झालेल्या त्या मनुष्याला यहुदी म्हणाले, “आज शब्बाथाचा दिवस आहे. शब्बाथाच्या दिवशी तू आपली खाट उचलून नेणे आपल्या नियमशास्त्राच्या विरुद्ध आहे.”
11 परंतु तो मनुष्य म्हणाला, “ज्याने मला बरे केले, त्यानेच मला सांगितले की, तू आपली खाट उचल आणि चालू लाग.”
12 यहुदी लोकांनी त्या मनुष्याला विचारले. “तुला आपली खाट उचलून चालायला कोणी सांगितले?”
13 परंतु तो कोण होता हे त्या बऱ्या झालेल्या माणसाला माहीत नव्हते त्या ठिकाणी बरेच लोक होते, आणि येशू तेथून निघून गेला होता.
14 त्यानंतर तो मनुष्य येशूला मंदिरात भेटला. तेव्हा येशू त्याला म्हणाला, “पाहा, आता तू बरा झाला आहेस. पण पाप करण्याचे सोडून दे. नाही तर तुझे अधिक वाईट होईल!”
15 नंतर तो मनुष्य तेथून निघाला आणि त्या यहूदी लोकांकडे परत गेला. त्याने त्यांना सांगितले की, ज्याने त्याला बरे केले तो येशू

आहे.योहान 5:1-15

27 तेव्हा येशू तेथून जात असता दोन आंधळे त्याच्यामागे ओरडत चालले. म्हणू लागले, “दाविदाच्या पुत्रा, आम्हांवर दया करा.”
28 येशू आत गेला तेव्हा ते आंधळेही आत गेले. त्याने त्यांना विचारले. “मी तुम्हांला दृष्टि देऊ शकेन असा तुमचा विश्वास आहे का?”“होय, प्रभु,” त्यांनी उत्तर दिले.
29 मग त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला आणि म्हणाला, “तुमच्या विश्वासाप्रमाणे तुमच्या बाबतीत घडो.”
30 आणि त्यांना पुन्हा दृष्टि आलि. येशूने त्यांना सक्त ताकीद दिली, “पाहा, हे कोणाला कळू देऊ नका.”
31 परंतु ते बाहेर गेले आणि त्यांनी त्या प्रदेशात सगळीकडे ही बातमी पसरविलि.
32 मग ते दोघे निघून जात असताना लोकांनी एका भूतबाधा झालेल्या माणसाला येशूकडे आणले.
33 जेव्हा येशूने त्यामधून भूत काढून टाकले तेव्हा पूर्वी मुका असलेला तो मनुष्य बोलू लागला. लोकांना ह्याचे आश्चर्य वाटले व ते म्हणाले, “इस्राएलमध्ये याआधी असे कधीही झालेले पाहण्यात आले नाही.”

मत्तय 9:27-33

येशू मेलेल्यांस जिवंत करतो

शुभवर्तमान अशा प्रसंगांची देखील नोंद करते जेथे येशूने मेलेल्या लोकांस सुद्धा परत जिवंत केले. येथे एक वर्णन आहे.

21 नंतर येशू नावेत बसून परत सरोवरापलीडके गेल्यावर, मोठा समुदाय त्याच्या भोवती जमला. तो सरोवराजवळ होता.
22 याईर नावाचा यहूद्यांच्या सभास्थानाचा एक अधिकारी तेथे आला. याईराने येशूला पाहिले तेव्हा तो त्याच्या पाया पडला.
23 आणि आग्रहाने विनंति करून त्याला म्हणाला, “माझी लहान मुलगी मरावरायस टेकली आहे. मी विनंती करतो की आपण येऊन तिला बरे वाटावे म्हणून तिच्यावर हात ठेवावा.”
24 मग येशू त्याच्याबरोबर गेला. लोकांचा मोठा समुदाय येशूच्या मागे चालत होता व ते त्याच्याभोवती गर्दी करीत होते.
25 त्या लोकांमध्ये एक स्त्री होती. ती बारा वर्षांपासून रक्तस्रावाने पीडलेले होती.
26 बऱ्याच वैद्यांकडून इलाज करून घेऊनसुद्धा तिने बराच त्रास सहन केला होता. तिच्याकडे होते नव्हते ते सर्व तिने उपचारासाठी खर्च केले होते. पण ती बरी न होता. तिचा आजार वाढला होता.
27 त्या स्त्रीने येशूविषयी ऐकले तेव्हा ती गर्दीत त्याच्यामागे आली व त्याच्या झग्याला तिने स्पर्श केला.
28 कारण ती म्हणत होती, ‘जर मी त्याच्या कपड्यांना शिवले तरी बरी होईन.”
29 जेव्हा तिने त्याच्या झग्याला स्पर्श केला, तेव्हा तिचा रक्तस्राव थांबला. व आपल्या त्रासातून आपण मुक्त झालो आहोत असे तिला जाणवले.
30 येशूला ताबडतोब जाणीव झाली की, आपल्या शरीरातून शक्ती गेली आहे. तो गर्दीत वळून म्हणाला, “माझ्या कपड्यांना कोणी स्पर्श केला?”
31 शिष्य येशूला म्हणाले, “लोक तुमच्याभोवती गर्दी करीत आहेत हे तुम्ही पाहता, आणि तरीही विचारता, मला कोणी स्पर्श केला?”
32 परंतु हे कोणी केले हे पाहण्यासाठी तो सभोवार बघतच राहिला.
33 त्या स्त्रीला ती बरी झाली आहे हे माहीत होते म्हणून ती आली आणि येशूच्या पाया पडली. ती स्त्री भीतिने थरथर कांपत कोती. तिने य़ेशूला सर्व काही सांगितले.
34 येशू त्या स्त्रीला म्हणाला, “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे, शांतिने जा आणि त्रासापासून मुक्त राहा.
35 तो हे बोलत असता सभास्थानातील अधिकाऱ्याच्या घरून काही माणसे निरोप घेऊन आली. ती म्हाणाली, “तुमची मुलगी मेली आहे. गुरुजींना का त्रास देता?”
36 येशूने त्यांचे बोलणे ऐकले आणि तो यहूद्यांच्या सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, “भिऊ नको, फक्त विश्वास धर.”
37 येशूने फक्त पेत्र, याकोब आणि याकोबाचा भाऊ योहान यांनाच आपल्याबरोबर येऊ दिले.
38 ते त्या अधिकाऱ्याच्या घरी आले. त्याने लोकांने मोठ्याने आकांत करताना व रडताना पाहिले.
39 तो आत गेला आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही लोक रडून असा गोंधळ का करीत आहात? ही मुलगी मेलेली नाही. ती झोपली आहे.”
40 ते सर्व त्याला हसले. त्याने सर्व लोकांना बाहेर घालवून दिले व मुलीचे आईवडील व जे त्याच्याबरोबर होते त्यांना घेऊन जेथे मुलगी होती तेथे आत गेला.
41 त्याने मुलीचा हात धरला आणि म्हणाला, “तलीथा कूम” म्हणजे (लहान मुली मी तुला सांगतो, ऊठ.”)
42 ती लहान मुलगी लगेच उठली आणि सभोवती फिरू लागली (ती बारा वर्षाची होती.) ते फार आश्चर्यचकित झाले.
43 नंतर त्याने त्यांना सक्त ताकीद दिली की हे कोणाला कळता कामा नये. त्याने तिला खाण्यास देण्याविषयी

सांगितले.मार्क 5:21-43

येशूच्या आरोग्यदानाचा इतका प्रभाव पडला आहे की ज्या देशांत त्याचे नाव मोठ्या प्रमाणात ज्ञात आहे त्या देशांत इतके कमी दुरात्मे आहेत की बहुतांशी लोकांत दुरात्म्यांच्या अस्तित्वाविषयी शंका आहे कारण अनेक पिढ्यांपासून त्यांचे प्रकटीकरण दुर्लभ झाले आहे.

स्वर्गाच्या राज्याचा पूर्वानुभव

येशूने दुरात्म्यांस काढले, रोग्यांस बरे केले आणि मेलेल्यांस जिवंत केले, केवळ लोकांची मदत करण्यासाठी नाही तर त्या राज्याचे स्वरूप दाखविण्यासाठी ज्याविषयी त्याने शिकविले होते. त्या येणाऱ्या राज्यात

4 तो त्यांच्या डोळ्यांतील अश्रु पूसून टाकील. आणि येथून पुढे मरण असणार नाही. शोक करणे, रडणे आणि अथवादु:खसहन् करणे राहणार नाही. कारण सर्व जुन्या गोष्टी नाहीशा झालेल्या आहेत.”

प्रकटीकरण 21:4

आरोग्यप्राप्ती या राज्याचा पूर्वानुभव होता, यासाठी की आम्हालाही पाहता यावे की ‘जुन्या गोष्टींवर’ विजय कसा दिसेल.

आपण या ‘नवीन जगात’ राहू इच्छिणार काय?

येशू निसर्गास आज्ञा देण्याद्वारे त्याच्या राज्याचे प्रदर्शन सुरू ठेवतो – स्वतःस देहधारी ओम म्हणून दाखवितो.

गुरु म्हणून येशू : अधिकारवाणीने अहिंसेच्या शिकवणीने महात्मा गांधींस ज्ञानप्राप्ती

संस्कृतमध्ये, गुरु (गुरु) म्हणजेगु’ (अंधकार) आणिरु’ (प्रकाश). गुरू यासाठी शिकवितो की ऱ्या ज्ञानाच्या किंवा बुद्धीच्या प्रकाशाने अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा. येशू अशा प्रबुद्ध शिकवणीसाठी ओळखला जातो जो अंधकारामध्ये राहणाऱ्या लोकांना ज्ञान देणारा म्हणून त्याला गुरु किंवा आचार्य मानले पाहिजे. ऋषी यशयाने येणाऱ्याबद्दल भविष्यवाणी केली होती. ..पू. 700मध्ये त्याने इब्री वेदांमध्ये असे भाकीत केले होते की :

र्वी लोकांनी जबुलून व नफताली या प्रांताना महत्व दिले नाही पण पुढील काळात देव त्या भूमीला श्रेष्ठ बनवील समुद्राजवळील भूमी, यार्देन नदीच्या पलीकडचा प्रदेश व यहुदी सोडून दुसरे जे लोक राहतात तो गालील प्रदेश म्हणजे ही भूमी होय.
2 आता तेथील लोक अधोलोका सारख्या अंधकारात दिवस कंठीत आहेत पण ते तेजस्वी प्रकाश पाहतील. पाताळासारख्या अंधकारमय प्रदेशात सध्या ते लोक राहत आहेत पण त्यांना “तेजस्वी प्रकाश”

दिसेल.यशया 9:1b-2
https://en.satyavedapusthakan.net/wp-content/uploads/sites/3/2017/10/isaiah-sign-of-the-branch-timeline--1024x576.jpg

ऐतिहासिक समयरेखेत ऋषी यशया, दावीद आणि इतर हिब्रू ऋषी (संदेष्ट्ये)

हा ‘प्रकाश’ काय होता जो अंधकारात असलेल्या गालीलातील लोकांना प्राप्त होणार होता? यशयाने पुढे म्हटले:

6 असामान्य बालकाच्या जन्माच्यावेळी ह्या गोष्टी घडतील. देव आम्हाला पुत्र देईल. हा पुत्र लोकांच्या नेतृत्वाची जबाबदारी घेईल. त्याचे नाव असेल “अदभुत सल्लागार, सामर्थ्यशाली देव, चिरंजीव पिता, शांतीचा राजपुत्र.” 

यशया 9:6

यशयाने आधीच भाकीत केले होते की येणारा कुमारिकेद्वारे जन्म घेईल. त्याने पुढे हे स्पष्ट केले की त्याला ‘समर्थ देव’ म्हटले जाईल, आणि तो अद्भुत मंत्री व शांतीचा अधिपती होईल. गालील समुद्रतटावर शिकवीत असलेला शांतीचा हा गुरु त्याच्या शिकवणीमुळे महात्मा गांधीवरील त्याच्या प्रभावाद्वारे दूर भारतात सुद्धा अनुभवला जाणार होता.

महात्मा गांधी आणि येशूचे डोंगरावरील प्रवचन

https://en.satyavedapusthakan.net/wp-content/uploads/sites/3/2020/05/gandhi-law-student-image-e1588933813421-206x300.jpg

कायद्याचा विद्यार्थी म्हणून गांधी

येशूच्या जन्माच्या 1900 वर्षानंतर,  इंग्लंडमध्ये भारतातून आलेल्या कायद्याचा अभ्यास करणाऱ्या एका तरुण विद्याथ्र्यास ज्याला आता महात्मा गांधी (किंवा मोहनदास करमचंद गांधी) म्हटले जात असे एक बायबल देण्यात आले. जेव्हा त्यांनी डोंगरावरील प्रवचन म्हणून ओळखली जाणारी येशूची शिकवण वाचली त्याविषयी ते म्हणतात :

 “…डोंगरावरील प्रवचन सरळ माझ्या अंतःकरणात गेले.”

एम. के. गांधी, एक आत्मकथा किंवा सत्याच्या माझ्या प्रयोगाची

गाथा. 1927 पृ.63

 ‘दुसरा गाल पुढे करण्याच्या’ येशूच्या शिकवणीने अहिंसेच्या (दुखापत न करणे आणि खून न करणे) जुन्या कल्पनेसंबंधी येशूला अंतर्दृष्टी दिली. हा विचार एका सुविख्यात वाक्यप्रचारात व्यक्त होतो ‘अहिंसा परमो धर्म’ (अहिंसा हा सर्वोच्च नैतिक सद्गुण आहे). गांधींनी नंतर या शिकवणीचा उपयोग सत्यद्ग्रह अथवा सत्याग्रहाच्या राजनैतिक बळात केला. ब्रिटिश राज्यकर्त्यांसोबत त्यांचा हा अहिंसक असहकार्याचा उपयोग होता. अनेक दशकांच्या सत्याग्रहाचा परिणाम म्हणून भारतास ग्रेट ब्रिटेनपासून स्वातंत्र्य मिळाले. गांधींच्या सत्याग्रहाने भारतास फार शांतीपूर्वक ब्रिटेनपासून स्वातंत्र्य मिळविण्यात मदत केली. येशूच्या शिकवणीचा या सर्व गोष्टींवर पगडा पडला.

येशूचे डोंगरावरील प्रवचन

तर येशूच्या डोंगरावरील प्रवचनाचा हेतू काय होता ज्याने महात्मा गांधींस इतके प्रभावित केले? हे येशूचे शुभवर्तमानातील सर्वात लांबलचक प्रवचन आहे. येशूचे डोंगरावरील संपूर्ण प्रवचन येथे आहे तर खाली आपण काही महत्त्वाच्या गोष्टी रेखांकित करू.

21 “तुम्ही ऐकले असले की, फार पूर्वी आपल्या लोकांना असे सांगण्यात आले होते की, ‘खून करू नका व जो कोणी खून करतो तो न्यायदंडास पात्र ठरेल.’
22 पण मी तुम्हांस सागतो की, जर एखादा आपल्या भावावर रागावला असेल तर तो न्यायदंडास पात्र ठरेल. पुन्हा जो आपल्या भावाला, अरे वेड्या, असे म्हणेल तो न्यायसभेच्या दंडास पात्र ठरेल. आणि जो त्याला मूर्ख म्हणेल तो नरकातील अग्नीच्या शिक्षेस पात्र ठरेल.
23 “म्हणून तू आपले दान अर्पण करण्यासाठी वेदीजवळ आणले असता जर तुझ्या भावाच्या मनात तुझ्याविरुद्ध काही आहे असे तुला तेथे आठवले,
24 तर देवाला देण्यासाठी आणलेले दान तेथेच वेदीपुढे ठेव. प्रथम जाऊन आपल्या भावाबरोबर समेट कर आणि नंतर येऊन आपले दान दे.
25 वाटेत तुझा वादी तुझ्याबरोबर आहे तोच त्याच्याशी लगेच सलोखा कर नाहीतर कदाचित वादी तुला न्यायाधीशाकडे नेईल व न्यायाधीश अधिकाऱ्याकडे नेईल आणि अधिकारी तुला तरुंगात टाकील.
26 मी तुला खरे सांगतो तू शेवटचा पैसा देईपर्यंत तुझी सुटका मुळीच होणार नाही.
27 “व्यभिचार करू नको’असे पूर्वी सांगितल्याचे तुम्ही ऐकले आहे,
28 परंतु मी तुम्हांस सांगतो की, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे वाकड्या नजरेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे.
29 जर तुझा उजवा डोळा तुला पाप करायला प्रवृत्त करतो तर तो काढून टाक व फेकून दे, संपूर्ण शरीर नरकात जाण्यापेक्षा शरीराचा एखादा अवयव गमावलेला बरा.
30 जर तुझा उजवा हात तुला पापास प्रवृत्त करतो, तर तो तोडून फेकून दे, कारण संपूर्ण शरीर नरकात जाण्यापेक्षा शरीराचा एक अवयव गमावलेला बरा.
31 “‘जर एखादा मनुष्य आपल्या पत्नीला घटस्फोट देतो तर त्याने तिला घटस्फोटाची लेखी सूचना द्यावी.’असे सांगितल्याचे तुम्ही जाणता.
32 पण मी तुम्हांला सांगतो की, जो कोणी आपल्या पत्नीला व्यभिचाराच्या कारणाशिवाय इतर कारणामुळे टाकून देतो, तो तिला व्यभिचार करण्यास प्रवृत्त करतो आणि जो कोणी अशा घटस्फोटीत स्त्रीशी विवाह करतो तो व्यभिचार करतो.शपथ घेण्याविषयी येशूची शिकवन
33 “जेव्हा तू शपथ घेतोस तेव्हा ती तोडू नको. जी शपथ देवाला वाहिली आहे ती खरी कर,असे सांगितल्याचे तुम्ही ऐकले आहे.
34 परंतु मी तुम्हाला सांगतो की, शपथ वाहूच नका, आकाशाची शपथ वाहू नका कारण ते देवाचे आसन आहे.
35 पृथ्वीचीही शपथ वाहू नका कारण ती त्याच्या पायाचे आसन आहे; आणि यरूशलेमाचीही शपथ वाहू नका, कारण त्या नगरीचा राजा देव आहे.
36 आपल्या मस्तकाचीही शपथ वाहू नका, कारण त्याचा एखादा केसही पांढरा किंवा काळा होणे तुमच्या हाती नाही.
37 म्हणून तुमचे बोलणे ‘होय’ तर होय किंवा ‘नाही’ एवढेच असावे. त्यापेक्षा जास्त जर असेल तर ते सैतानापासून आहे.
38 “तुम्ही ऐकले आहे की असे सांगितले होते, ‘डोळ्याबद्दल डोळा आणि दाताबद्दल दात.’
39 पण मी तुम्हांला सांगतो, जो दुष्ट आहे त्याला अडवू नका, जर कोणी तुमच्या उजव्या गालावर तुम्हांला मारील त्याच्यासमोर दुसराही गाल पुढे करा.
40 आणि जो कोणी फिर्याद करून तुमचा अंगरखा घेऊ पाहतो त्याला तुमचा झगाही द्या.
41 जर कोणी तुम्हांला सक्तीने त्याच्याबरोबर कांही अंतर घेऊन जाऊ इच्छितो तर त्याच्याबरोबर त्याच्या दुप्पट अंतर जा.
42 जो तुमच्याजवळ मागतो त्याला द्या आणि जो तुमच्याकडून उसने घेऊ इच्छितो त्याला नकार देऊ नका.
43 “असे सांगिलते होते की, ‘आपल्या शोजाऱ्यावर प्रेम करा अणि आपल्या शत्रूचा द्वेष करा,असे तुम्ही ऐकले आहे.
44 पण मी तुम्हांला सांगतो, तुमच्या शत्रूवर प्रेम करा. तुमचे जे वाईट करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.
45 जर तुम्ही असे कराल, तर तुम्ही तुमच्या स्वर्गातील पित्याचे खरे पुत्र व्हाल. तुमचा पिता चांगल्यावर आणि वाईटावर अशा दोघांवरही सूर्य उगवितो. चांगल्यावरही आणि वाईटावरही पाऊस पाडतो.
46 कारण जे तुमच्यावर प्रीति करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीति करीत असाल तर तुम्हांला प्रतिफळ मिळणार नाही. जकातदारही असेच करतात.
47 आणि जर तुम्ही तुमच्या मित्रांशी चांगले वागत असाल तर तुम्ही इतरांपेक्षा फार चांगले आहात असे समजू नका. देवाला न मानणारे लोकही असेच करतात.
48 म्हणून जसा तुमचा स्वर्गातील पिता परिपूर्ण आहे तसे तुम्हीही परिपूर्ण

व्हा.मत्तय 5:21-48

 येशूने या स्वरूपाचा उपयोग करून शिकविले :

“असे प्राचीन लोकांना सांगितले होते…मी तर तुम्हास सांगतो…”.

 या वाक्यात तो प्रथम मोशेच्या नियमशास्त्रातून उद्धरण घेतो, नंतर आपल्या आज्ञेचा व्याप हेतू, विचार आणि शब्दांप्रत नेतो. मोशेद्वारे देण्यात आलेल्या कठोर आज्ञा घेऊन येशूने शिकविले आणि त्यांचे पालन करावयास त्यास आणखी कठीण केले!

येशूच्या डोंगरावरील प्रवचनाचा नम्र अधिकार

अद्भुत हे आहे ज्याप्रकारे त्याने नियमशास्त्रातील आज्ञांचा विस्तार केला, त्याने आपल्या स्वतःच्या अधिकाराच्या आधारे असे केले. वाद न घालता व धमकी न देता तो फक्त म्हणाला, ‘मी तर तुम्हास सांगतो…’ आणि त्यासोबतच त्याने या आज्ञेचा विस्तार केला. त्याने असे नम्रपणे पण अधिकाराने केले. त्याच्या शिकवण्याची ही अद्वितीय शैली होती. शुभवर्तमानात सांगितल्याप्रमाणे जेव्हा त्याने हे प्रवचन संपविले.

27 मग जोराचा पाऊस आला आणि पूर आला. जोराचा वारा सुटला. वादळवाऱ्यात ते घर सापडले आणि कोसळून पडले.”
28 जेव्हा ह्या बोधकथा सांगण्याचे येशूने संपविले तेव्हा लोकांचा समुदाय त्याच्या शिकवण्याने थक्क झाला.
29 कारण येशू त्यांना त्यांच्या धर्मशिक्षकांप्रमाणे नव्हे, तर अधिकारवाणीने शिकवीत

होता.मत्तय 7:27-29

येशूने गुरू म्हणून अधिकारवाणीने शिकविले, अनेक संदेष्टे संदेशवाहक होते जे देवाचा संदेश देत पण येथे सगळे काही वेगळे होते. येशू असे का करू शकला? ख्रिस्त म्हणून किंवा मसीहा म्हणून त्याला मोठा अधिकार होता. हिब्रू वेदातील स्तोत्र 2, जेथे ‘ख्रिस्त’ ही पदवी सर्वप्रथम घोषित करण्यात आली त्यात ख्रिस्ताशी परमेश्वर अशाप्रकारे बोलत असल्याचे वर्णन करण्यात आले आहे :

8 जर तू विचारले तर मी तुला राष्ट्रे देईन या पृथ्वीवरची सगळी माणसे तुझी

होतील.स्तोत्र 2:8

ख्रिस्ताला जगाच्या शेवटापर्यंत ‘राष्ट्रांवर’ अधिकार देण्यात आला होता. म्हणूनच ख्रिस्त या नात्याने, येशूला कशाप्रकारे शिकवण्याचा अधिकार होता जसा तो शिकवत असे, आणि त्याची शिकवण प्रत्येकापर्यंत पोहोचवावी याचा.

खरे म्हणजे, मोशेने देखील अशा एका येणाऱ्या संदेष्ट्याविषयी लिहिले होते (ई. स. पू. 1500) जो त्याच्या शिकवणीत अद्वितीय असणार होता. मोशेसोबत बोलताना, परमेश्वराने अभिवचन दिले

 18 मी यांच्यामधूनच तुझ्यासारखा एक संदेष्टा उभा करीन. माझी वचने त्याच्या मुखाने ऐकवीन. माझ्या आज्ञेप्रमाणे तो लोकांशी बोलेल.
19 हा संदेष्टा माझ्या वतीने बोलेल. तेव्हा जो कोणी ते ऐकणार नाही त्याला मी शासन करीन.’

अनुवाद 18:18-19
https://en.satyavedapusthakan.net/wp-content/uploads/sites/3/2020/05/abraham-Moses-to-jesus-timeline-1024x576.jpg

मोशेने इस्राएली लोकांचे मार्गदर्शन केले आणि येशूच्या सुमारे पंधराशे वर्षांपूर्वी नियमशास्त्र प्राप्त केले.

त्याच्या शिकवणीत जसे त्याने शिकविले, त्याप्रमाणे ख्रिस्त या नात्याने येशू आपला अधिकार गाजवत होता आणि आपल्या मुखात देवाचे वचन राखून येणाऱ्या संदेष्टयाविषयी मोशेची भविष्यवाणी पूर्ण करीत होता. शांती आणि अहिंसेची शिकवण देत असताना त्याने प्रकाशाच्या मदतीने अंधकाराला दूर करण्याविषयी वर दिलेली यशयाची भविष्यवाणी देखील पूर्ण केली. त्याने असे शिकविले जणू काही त्याला, केवळ गांधींचा गुरु होण्याचाच नव्हे, तर तुमचा माझा गुरु होण्याचादेखील हक्क आहे.

तुम्ही आणि मी आणि डोंगरावरील प्रवचन

आपण त्याचे अनुसरण कसे करावे हे पाहण्यासाठी आपण हे डोंगरावरील प्रवचन वाचले तर आपण कदाचित गोंधळात पडाल. आपली अंतःकरणे आणि आपला हेतू उघडकीस आणणाऱ्या अशा प्रकारच्या या आज्ञा कोणीही कसे जगू शकेल? या प्रवचनाबाबत येशूचा हेतू काय होता? आपण त्याच्या शेवटच्या वाक्यातून पाहू शकतो.

48 म्हणून जसा तुमचा स्वर्गातील पिता परिपूर्ण आहे तसे तुम्हीही परिपूर्ण

व्हा.मत्तय 5:48

ही आज्ञा आहे, सूचना नाही. त्याची मागणी अशी आहे की आपण परिपूर्ण असावे!

का?

येशू डोंगरावरील प्रवचन कसे सुरू करतो त्यातच तो याविषयी उत्तर देतो. तो त्याच्या शिकवणीच्या शेवटच्या ध्येयाचा संदर्भ देऊन सुरुवात करतो.

3 “जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे

आहे.मत्तय 5:3

डोंगरावरील प्रवचन म्हणजे ‘स्वर्गाच्या राज्याची’ अंतर्दृष्टी देण्यासाठी होय. स्वर्गाचे राज्य हा हिब्रू वेदांमधील एक महत्वाचा विषय आहे, जसे संस्कृत वेदांमध्ये आहे. येशू आपल्या आरोग्यदानाच्या चमत्कारांद्वारे त्या राज्याचे स्वरूप कसे प्रगट करतो हे पाहत असतांना, आपण स्वर्गाच्या राज्याच्या किंवा वैकुंठलोकाच्या स्वरूपाची  तपासणी करतो.

सैतानाने येशूची परीक्षा केली – जुनाट असूर सैतान

हिंदू पौराणिक कथांत त्या समयांचे वर्णन आहे जेव्हा कृष्ण शत्रू असुरांशी लढला आणि त्यांस पराभूत केले, विशेषेकरून असुर राक्षस ज्यांनी कृष्णाला सर्पाच्या रूपात धमकावले होते. भगवद्पुराणात (श्रीमद्भागवत) एक गोष्ट सांगण्यात आली आहे ज्यात कामसूचा मित्र अघासुर जो कृष्णाच्या जन्मापासूनच कृष्णाला जिवे मारण्याचा प्रयत्न करीत होता, त्याने इतक्या मोठ्या सर्पाचे रूप धारण केले होते की त्याने तोंड उघडले तेव्हा ते एका गुहेसारखे होते. अघासुर हा पुतना (जिचे विष कृष्णाने बाळ असतांना प्राशन करून तिला ठार मारले होते) आणि बकासुर (ज्याची चोच तोडून कृष्णाने त्याला ठार मारले होते) यांचा भाऊ होता आणि म्हणून तो सूड घेऊ पाहत होता. अघासुराने तोंड उघडले आणि गोपी गुराखी मुले जंगलातील एक गुहा समजून त्यात गेली. कृष्णासुद्धा आत गेला, पण अघासुर आहे हे समजून त्याने आपले शरीर इतके फुगवले की अघासुर गुदमरून मेला. दुसऱ्या प्रसंगी, श्री कृष्णा  या लोकप्रिय कार्यक्रमात दाखविल्याप्रमाणे, कृष्णाने शक्तिशाली असुर सर्प कालियानागाचा नदीत त्याच्याशी लढा देत असतांना त्याच्या डोक्यावर नृत्य करुन पराभव केला.

पौराणिक कथेत वृत्राचे, असुरांचा पुढारी व सामर्थ्यवान सर्प/अजगर याचे सुद्धा वर्णन आले आहे. श्रग्वेदात स्पष्ट केलेले आहे की इन्द्र देवास एका मोठ्या लढ्यात वृत्र राक्षसाला तोंड द्यावे लागले आणि त्याने मेघगर्जनेने (वज्रायुध) त्याला ठार केले ज्याने वृत्राचा जबडा फोडला. भगवद्पुराणातील आवृत्ती स्पष्ट करते की वृत्र इतका मोठा साप/अजगर होता की त्याने सर्व काही व्यापून टाकले होते, अगदी ग्रह आणि तारे यांना धोक्यात आणले होते, ज्यामुळे प्रत्येकजण त्याला घाबरत असे. देवांसोबत झालेल्या युद्धात वृत्र वर्चस्वी ठरला.इन्द्र त्याला बळाने पराभूत करू शकला नाही, परंतु त्याला दधीचि  ऋषीची हाडे मागण्याचा सल्ला देण्यात आला. दधीचिने वज्रयुद्ध बनविण्यासाठी आपली हाडे देऊ केली ज्यामुळे इंद्राने शेवटी त्या मोठ्या सर्पास वृत्रास  पराभूत करून मारून टाकले.

हिब्रू वेदातील सैतान : सुंदर आत्मा घातक सर्प बनला

हिब्रू वेदांमध्ये अशीही नोंद आहे की एक सामर्थ्यवान आत्मा आहे ज्याने स्वतःला परात्पर परमेश्वराचा शत्रू (सैतान म्हणजे शत्रू) म्हणून उभे केले आहे. हिब्रू वेदांनी त्याचे वर्णन सुंदर आणि बुद्धिमान म्हणून केले आहे, ज्याला आरंभी देव म्हणून निर्माण करण्यात आले होते. हे वर्णन दिले गेले आहे :

12 “मानवपुत्रा, सोरच्या राजाविषयीचे पुढील शोकगीत गा. त्याला सांग ‘परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो“‘तू एक आदर्श माणूस होतास. तू ज्ञानी होतास. तू अतिशय देखणा होतास.
13 तू एदेनमध्ये राहात होतास. एदेन हा देवाचा बाग आहे. तुझ्याजवळ माणके, पुष्कराज, हिरे, लसणा, गोमेद, सूर्यंकांत मणी, नीलमणी, वैदूर्य पाच अशी सर्व प्रकारची मोल्यवान रत्ने होती, आणि ती सर्व सोन्याच्या कोंदणात बसविलेली होती. ज्या दिवशी तुला निर्माण केले त्याच दिवशी तुला हे सौदंर्य देण्यात आले. देवाने तुला सामर्थ्यशाली केले.
14 तू एक अभिषिक्त करुब होतास तुझे पंख माझ्या सिंहासनावर पसरत. मी तुला देवाच्या पवित्र पर्वतावर ठेवी. तू रत्नांतून हिंडत होतास आणि अग्नीप्रमाणे तळपत होतास.
15 मी तुला निर्मिले, तेव्हा तू सज्जन व प्रामाणिक होतास. पण नंतर तू दुष्ट झा

लास.यहेज्केल 28:12ब-15.

या शक्तिशाली देवामध्ये दुष्टता का आढळली? हिब्रू वेद स्पष्ट करतात :

17 तुझ्या सौंदर्यांने तुला गर्विष्ठ बनविले. तुझ्या वैभवाने तुझ्या ज्ञानाचा नाश केला. म्हणून मी तुला खाली जमिनीवर लोटले. आता इतर राजे तुझ्याकडे डोळे विस्फारुन

पाहतात.यहेज्केल 28:17

या देवाचे पतन पुढे वर्णन करण्यात आले आहे :

12 तू प्रभात ताऱ्याप्रमाणे होतास, पण आता तू आकाशातून खाली पडला आहेस. पूर्वी सर्व राष्ट्रे तुझ्यापुढे नेहमीच वाकत होती, पण आता तू संपला आहेस.
13 तू नेहमीच स्वत:ला सांगायचास, “मी परात्पर देवासारखा होईन. मी आकाशात उंच जाईन. देवाच्या तांरागणाच्यावर उच्चस्थानी मी माझे सिंहासन स्थापन करीन. मी पवित्र साफोन डोंगरवरच्या देवसभेत बसून देवांना भेटीन.
14 मी मेघांवर आरोहण करून वेदीवर जाईन. मी परात्पर देवासारखा होईन.”

यशया 14:12-14

सैतान आता

या सामर्थ्यवान आत्म्याला आता सैतान (म्हणजे दोष लावणारा) किंवा डेविल  म्हटले जाते परंतु पूर्वी त्याला लूसिफर म्हटलेले होते – ‘प्रभातपुत्र’. हिब्रू वेद म्हणतात की तो आत्मा, दुष्ट असुर आहे, परंतु अघासुर आणि वृत्राप्रमाणे सर्पाचे किंवा अजगराचे रूप धारणारा म्हणून त्याचे वर्णन आहे. अशाप्रकारे त्याला पृथ्वीवर टाकण्यात आले :

7 मग स्वर्गात एक युद्ध झाले. मीखाएलआणि त्याचे दूत त्या प्रचंड सापाविरुद्ध लढले. साप व त्याचे दूत हे सुद्धात्यांच्याशी लढले.
8 पण साप तितका बलवान नव्हता. प्रचंड साप व त्याच्या दूतांना स्वर्गातील त्यांचे स्थान गमवावेलागले.
9 सापला आकाशातून खाली फेकण्यात आले. तो प्रचंड साप, सैतान म्हटलेला तोच तो जुनाट साप होय. तो संपूर्णजगाला चकवतो. त्या सापाला त्याच्या दूतांसह पृथ्वीवर टाकण्यात

आले.प्रकटीकरण 12:7-9

सैतान आता मुख्य असूर आहे जो ‘संपूर्ण जगास बहकवितो’. खरे म्हणजे, त्यानेच, सैतानाच्या रूपात, प्रथम मानवांस पापात पाडले. याद्वारे सत्य युगाचा, सुखलोकातील सत्याच्या युगाचा अंत झाला. 

सैतानाने आपली मूळ बुद्धिमत्ता आणि सौंदर्य गमावले नाही, ज्यामुळे तो अधिकच घातक ठरतो कारण तो आपल्या देखाव्यामागे आपली फसवणूक अधिक लपवू शकतो. बायबलमध्ये तो कसा कार्य करतो याचे वर्णन करण्यात आले आहे :

14 आणि यात आश्चर्य नाही, कारण सैतानदेखील प्रकाशाच्या दूताचे रुप धारण करतो.

2 करिंथ 11:14

येशू सैतानाशी युद्ध करतो

या शत्रूलाच येशूला तोंड द्यावे लागले. योहानाद्वारे बाप्तिस्मा घेतल्यानंतर लगेच तो रानात गेला, त्याने वानप्रस्थश्रमाचा स्वीकार केला.  नाश करून तो जंगलात मागे हटला. पण असे त्याने निवृत्तीची सुरुवात करण्यासाठी नव्हे, तर लढाईत शत्रूला तोंड देण्यासाठी केले. ही लढाई कृष्ण आणि अघासुरात किंवा इंद्र आणि वृत्र यांच्यात वर्णन केलेली शारीरिक लढाई नव्हती, तर ही परीक्षेची लढाई होती. शुभवर्तमानात असे लिहिले आहे :

शू पवित्र आत्म्याने पूर्ण भरुन यार्देन नदीहून परतला. मग आत्म्याने त्याला अरण्यात नेले.
2 तेथे सैतानाने त्याला चाळीस दिवस मोहात टाकले. त्या दिवसांत येशूने काहीही खाल्ले नाही. जेव्हा ती वेळ संपली, तेव्हा येशूला भूक लागली.
3 सैतान त्याला म्हणाला, “जर तू देवाचा पुत्र आहेस, तर या दगडांची भाकर करुन दाखव.”
4 येशून त्याला उत्तर दिले, “असे लिहिले आहे:“मनुष्य फक्त भाकरीनेच जगेल असे नाही.”‘ अनुवाद 8:3
5 मग सैतान त्याला वर घेऊन गेला. आणि एका क्षणात जगातील सर्व राज्ये त्याला दाखविली.
6 सैतान त्याला म्हणाला, “मी तुला या सर्व राज्याचे अधिकार व गौरव देईन कारण ते मला दिलेले आहे. आणि मी माझ्या मर्जीनुसार ते देऊ शकतो.
7 जर तू माझी उपसना करशील, तर हे सर्व तुझे होईल.”
8 येशूने उत्तर दिले, पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे:“तू प्रभु तुझा देव याचीच उपासना केली पाहिजे, आणि फक्त त्याचीच सेवा केली पाहिजे.”‘ अनुवाद 6:13
9 नंतर त्याने त्याला यरुशलेमाला नेले. आणि मंदिराच्या उंच टोकावर त्याला उभे केले. आणि तो म्हणाला, “जर तू देवाचा पुत्र आहेस तर येथून खाली उडी मार!
10 असे लिहिले आहे:“तो मुझे संरक्षण करण्याची देवादूतांना आज्ञा करील.’ स्तोत्र. 91;11आणि असेही लिहीले आहे:
11 “ते तुला आपल्या हातावर उचलून धरतील, त्यामुळे तुझा पाय दगडावर आपटणार नाही.”‘ स्तोत्र. 91:12
12 येशून उत्तर दिले. “पवित्र शास्त्रत असेही म्हटले आहे,“तु प्रभु, तुझा देव याची परीक्षा पाहू नकोस.”‘ अनुवाद 6:16
13 म्हणून सैतानाने प्रत्येक प्रकारे भुरळ घालण्याचे संपविल्यावर, योग्य वेळ येईपर्यंत तो येशूला सोडून गेला

.लूक 4:1-13

त्यांचा संघर्ष मानवी इतिहासाच्या सुरूवातीसच आरंभ झाला होता. येशूच्या जन्माच्या वेळी बाळाची हत्या करण्याच्या प्रयत्नातून त्याचे नवीनीकरण करण्यात आले. या युद्धाच्या फेरीत येशू विजयी झाला, त्याने सैतानाला शारीरिकरित्या पराभूत केले म्हणून नव्हे तर सैतानाने त्याच्यासमोर ठेवलेल्या सर्व परीक्षांचा त्याने प्रतिकार केला म्हणून. या दोघांमधील लढाई पुढच्या काही महिन्यांत सुरू राहणार होती, ज्याचा शेवट सर्प ‘त्याच्या टाचेस दंश करणार होता’ आणि येशू ‘त्याचे डोके ठेचणार होता’. पण त्याआधी, येशू अंधःकाराचे निवारण करण्यासाठी, शिकवण्यासाठी गुरुची भूमिका, धारण करणार होता.

येशूजो आम्हास समजतो

येशूचा मोहाचा व परीक्षेचा काळ आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. बायबल येशूविषयी सांगते की:

18 कारण ज्याअर्थी त्याला स्वत:ला परीक्षेला व दु:खसहनाला तोंड द्यावे लागले, त्याअर्थी ज्यांना आता परीक्षेला तोंड द्यावे लागत आहे त्यांना मदत करण्यास तो समर्थ

आहे.इब्री 2:18

आणि

15 कारण आपल्याला लाभलेला माहन याजक असा नाही, जो आपल्या अशक्तपणाबद्दल सहानुभूति दर्शविण्यास असमर्थ आहे. पण आपल्याला असा याजक लाभला आहे की, जो आमच्यासारखाच सर्व प्रकारच्या मोहाच्या अनुभवातून गेला. तरीही तो पूर्णपणे निष्पाप राहिला.
16 म्हणून आपण त्याच्या कृपेच्या सिंहासनाजवळ ठाम निर्धाराने जाऊ या. यासाठी की, आमच्या गरजेच्या वेळी साहाय्य मिळावे म्हणून आम्हाला दया व कृपा प्राप्त व्हावी.

इब्री 4:15-16

इब्री दुर्गा पूजा, योम किप्पुरच्या वेळी, मुख्य याजक अथवा पुरोहित बलिदान आणत असे यासाठी की इस्राएली लोकांना क्षमा मिळावी. आता येशू एक याजक बनला आहे जो आपल्याबद्दल सहानुभूती दर्शवू शकतो आणि आम्हास समजून घेऊ शकतो – आमच्या परीक्षांमध्ये तो आमची मदत करतो, अगदी तशीच कारण त्याची सुद्धा परीक्षा झाली – तरीही त्याने पाप केले नाही. आपण परात्पर देवासमोर आत्मविश्वास बाळगू शकतो कारण मुख्य याजक येशूने आपल्या सर्वात कठीण परीक्षांना तोंड दिले. तो असा आहे जो आपल्याला समजतो आणि आमच्या स्वतःच्या परीक्षांत आणि पापांत आमची मदत करू शकतो. प्रश्न असा आहे: आपण त्याला करू देणार काय?

स्वामी योहान : प्रायश्चित आणि आत्माभिषेक शिकवत आहेत

आपण कृष्णाच्या जन्माद्वारे येशूच्या (येशू सत्संग) जन्माची तपासणी केली. पौराणिक कथांनुसार कृष्णाला मोठा भाऊ बळराम (बलराम) होता. नंदा हे कृष्णाचे पालक -वडील होते आणि त्यांनी बलरामालासुद्धा कृष्णाचा मोठा भाऊ म्हणून पालन-पोषण केले होते. या महाकाव्यात कृष्णा आणि बलराम यांनी भावांच्या बालपणाच्या अनेक कथा सांगितल्या आहेत आणि त्यांनी युद्धात एकत्र मिळून अनेक असुरांना पराभूत केले होते. कृष्णा आणि बलराम यांनी आपले समान लक्ष्य साध्य करण्यासाठी भागीदारी केली – वाईटाचा पराभव करणे.

येशू आणि योहान, जसे कृष्ण आणि बलराम

कृष्णाप्रमाणेच येशूचा जवळचा नातेवाईक होता, योहान, ज्याच्याबरोबर तो आपल्या कार्याचा वाटेकरी होता.येशू आणि योहान यांचे त्यांच्या आईकडून नाते होते आणि योहानाचा जन्म येशूच्या फक्त 3 महिन्यांपूर्वी झाला होता. शुभवर्तमानात येशूच्या शिकवणीची व आरोग्यदानाची सेवेची नोंद प्रथम योहानाला प्रकाशात आणून करण्यात आली आहेण् जर आपण प्रथम योहानाची शिकवण ऐकली नाही तर आपल्या येशूच्या कार्य समजणार नाही. सुवार्तेचे प्रारंभिक बिंदू म्हणून योहानाने पश्चात्ताप (प्रायश्चित) आणि शुद्धीकरण (आत्माभिषेक) शिकवण्याचा प्रयत्न केला.

बापतिस्मा करणारा योहान : आम्हास तयार करण्यासाठी येणाऱ्या स्वामीविषयी भाकित

शुभवर्तमानात त्याला बरेचदा ‘बापतिस्मा करणारा योहान’ म्हटले जाते कारण त्याने पश्चात्तापाचे (प्रायश्चित) चिन्ह म्हणून शुद्धीवर जोर दिला, योहानाच्या येण्यापूर्वी शेकडो वर्षांआधी प्राचीन हिब्रू वेदांमध्ये त्याच्याबद्दल भविष्यवाणी केली गेली होती.

3 ऐका! कोणीतरी ओरडत आहे, “परमेश्वरासाठी वाळवंटातून मार्ग काढा. आमच्या देवासाठी वाळवंटात सपाट रस्ता तयार करा.
4 प्रत्येक दरी भरून काढा. प्रत्येक डोंगर आणि टेकडी सपाट करा. वेडेवाकडे रस्ते सरळ करा. खडकाळ जमीन गुळगुळीत करा.
5 मग देवाची प्रभा फाकेल आणि सर्व लोक एकत्रितपणे परमेश्वराचे तेज पाहतील. हो! स्वत: परमेश्वराने हे सर्व सांगितले आहे.”

यशया 40:3-5

यशयाने असे भाकीत केले होते की कोणीतरी परमेश्वरासाठी ‘अरण्यात’ ‘मार्ग तयार करण्यासाठी’ येईल. तो अडथळे दूर करील जेणेकरून ‘परमेश्वराचा गौरव प्रकट व्हावा’

https://en.satyavedapusthakan.net/wp-content/uploads/sites/3/2017/10/isaiah-sign-of-the-branch-timeline--1024x576.jpg

ऐतिहासिक समयेरेखेत यशया आणि इतर हिब्रू ऋषी (संदेष्टे). येशूच्या आधी मलाखी शेवटचा होता

मलाखीने यशयाच्या 3०० वर्षांनंतर हिब्रू वेदाचे (जुना करार) शेवटचे पुस्तक लिहिले. यशयाने या येणाऱ्या तयारी करणाऱ्याबद्दल जे काही सांगितले होते त्यावर मलाखीने सविस्तरपणे सांगितले. त्याने भविष्यवाणी केली :

र्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, “पाहा! मी माझा दूत पाठवीत आहे. तो माझ्यासाठी मार्ग तयार करील. अनपेक्षितपणे तुम्ही ज्याचा शोध करत आहात तो प्रभु त्याच्या मंदिरात येईल तुम्हांला हव्या असलेल्या नव्या कराराचा तो दूत आहे तो खरोखरीच येत आहे.”

मलाखी 3:1

मीखाने भविष्यवाणी केली की तयारी करणाऱ्या ‘दूताच्याआगमनानंतर लगेच, देव स्वतः त्याच्या मंदिरात प्रकट होईलहा देवाचा अवतार, येशूचा उल्लेख होता, जो योहानानंतर लगेच येणार होता.

योहान स्वामी

शुभवर्तमानात योहानाविषयी नोंद करण्यात आली आहे:

80 अशा रीतीने तिचा मुलगा मोठा होत गेला आणि आत्म्यात सामर्थ्यशाली झाला. इस्राएल लोकांना प्रगट होण्याच्या दिवसापर्यंत तो अरण्यात राहिला.

लूक 1:80

तो अरण्यात राहत असतांना

4 योहानाचे कपडे उंटाच्या केसांपासून बनविलेले होते. कातड्याचा कमरपट्टा त्याच्या कमरे भोवती होता. अन्न म्हणून योहान टोळ आणि रानमध खात

असे.मत्तय 3:4

बलरामास मोठे शारीरिक बळ होते. योहानाच्या मोठ्या मानसिक आणि आत्मिक सामर्थ््याने लहानपणापासूनच त्याला वनप्रस्थ (वनवासी) आश्रमाकडे नेले. त्याच्या प्रखर स्वभावाने त्याला वानप्रस्थ म्हणून कपडे घालण्यास व अन्न प्राशन करण्यास प्रवृत्त केले, हे जरी निवृत्तीसाठी नसले तरीही त्याच्या कार्यासाठी तयारी करण्यासाठी होते.  त्याच्या अरण्यातील जीवनामुळे त्याला स्वतःला जाणून घेण्यात, मोहांचा प्रतिकार कसा करावा हे समजून घेण्यात मदत केली. आपण अवतार नाही, किंवा मंदिरातील पुजारीही नाही हे त्याने ठामपणे स्पष्ट केले. त्याच्या आत्मबुद्धीमुळेच सर्वांनी त्याला एक महान शिक्षक म्हणून स्वीकार केले. स्वामी (स्वामी) हा शब्द संस्कृत भाषेतून येतो ज्याचा अर्थ आहे ‘जो स्वतःला जाणतो किंवा ज्याने स्वतःवर प्रभुत्व केले आहे’, त्यामुळे योहानाला स्वामी मानणे योग्य आहे. 

स्वामी योहानइतिहासात दृढपणे मांडलेला

शुभवर्तमान सांगते

बिर्य कैसराच्या कारकीर्दीच्या पंधराव्या वर्षी, जेव्हा पंतय पिलात यहूदीयाचा राज्यपाल होता, आणि हेरोद गालीलचा अधिकारी असताना, आणि त्याचा भाऊ फिलिप्प हा इतुरीया व त्राखोनीती या देशांचा अधिकारी होता व लूसनिय हा अबिलेनेचा अधिकारी होता.
2 हनन्या व केफा हे मुख्य याजक होते, तेव्हा वाळवंटात देवाचे वचन जखऱ्याचा पुत्र योहान याच्याकडे

आले.लूक 3:1-2

येथून योहानाचे कार्य सुरू होते आणि हे त्याला अनेक नामांकित ऐतिहासिक लोकांच्या बरोबरीने आणून ठेवते. तत्कालीन राज्यकर्त्यांचा विस्तृत संदर्भ पहा. याद्वारे आम्हाला शुभवर्तमानातील वर्णनाच्या अचूकतेचे ऐतिहासिकदृष्ट्या परीक्षण करण्यास संधी मिळते.  असे केल्यामुळे आम्हाला आढळून येते की टायबेरियस सीझर, पोंटियस पिलात, हेरोद, फिलिप, लायझानियास, हन्ना आणि कैफा हे सर्व लोकांचा परिचय जगिक रोमन आणि यहूदी इतिहासकारांद्वारे झाला आहे. वेगवेगळ्या राज्यकर्त्यांना दिलेल्या विविध पदव्या (उदा. पोंटियस पिलातासाठी ‘राज्यपाल’, हेरोदसाठी ‘टेट्रार्क’ ’इत्यादी) ऐतिहासिकदृष्ट्या बरोबर आणि अचूक म्हणून सत्यापित केल्या गेल्या आहेत. यावरून हे वर्णन विश्वसनीयरित्या नमूद करण्यात आले होते हे आम्ही मूल्यांकन करू शकतो.

टायबेरियस सीझर सन 14 मध्ये रोमन सिंहासनावर आला. त्याच्या कारकिर्दीच्या 15 व्या वर्षाचा अर्थ असा आहे की योहानाने आपल्या कार्याची सुरुवात सन 29 मध्ये केली.

स्वामी योहानाचा संदेशपश्चात्ताप करा आणि आपली पापे कबूल करा

योहानाचा संदेश काय होता? त्याच्या जीवनशैलीप्रमाणेच, त्याचा संदेशही सोपा पण सामर्थ्यशाली होता. शुभवर्तमान  म्हणते :

दिवसांत बाप्तिस्मा करणारा योहान आला आणि यहूदीयाच्या वैराण प्रदेशात उपदेश करू लागला; तो म्हणाला,
2 “तुमची अंत:करणे व जीवने वाईटपणाकडून चांगुलपणामध्ये बदला कारण स्वर्गाचे राज्य जवळ येत आह्रे”

मत्तय 3:1-2

त्याचा संदेश प्रथम एखाद्या तथ्याची घोषणा होती – स्वर्गाचे राज्य ‘जवळ’ आले होते. परंतु लोक जोवर ‘पश्चात्ताप’ करीत नाहीत तोवर ते या राज्यासाठी तयार होणार नाहीत. खरे तर, त्यांनी ‘पश्चात्ताप’ न केल्यास ते राज्यास मुकतील. पश्चात्ताप म्हणजे “आपले मन बदलणे; पुनर्विचार करणे; वेगळा विचार करणे” एका अर्थाने ते प्रायस्चिता (प्रायश्चित) सारखे आहे. पण त्यांनी कशाबद्दल वेगळा विचार करावयाचा होता? योहानाच्या संदेशाला मिळालेले प्रतिसाद पाहून आपण पाहू शकतो. त्याच्या संदेशाला लोकांनी उत्तर दिले :

6 आपण केलेली पापे लोक त्याला सांगत होते आणि योहान त्यांना यार्देन नदीत बाप्तिस्मादेत

होता.मत्तय 3:6

आपली नैसर्गिक प्रवृत्ती म्हणजे आपली पापे लपवून ठेवणे आणि आपण चूक केली नसल्याचे ढोंग करणे. आपल्या पापांची कबुली देणे आणि पश्चात्ताप करणे आपल्यासाठी जवळजवळ अशक्य आहे कारण ते आपले अपराध आणि लज्जा प्रगट करते. योहानाने प्रचार केला की लोकांना स्वतःला देवाच्या राज्यासाठी स्वतःला तयार करण्यासाठी पश्चात्ताप (प्रायश्चित) करण्याची गरज आहे.

या पश्चात्तापाचे चिन्ह म्हणून त्यांना योहानाद्वारे नदीत बाप्तिस्मा घेणे अगत्याचे होते. बाप्तिस्मा म्हणजे पाण्याने धुणे किंवा विधियुक्त प्रक्षालन. त्यानंतर लोक स्वतःस शुद्ध ठेवण्यासाठी कप आणि भांडी यांचासुद्धा ‘बाप्तिस्मा’ (प्रक्षालन) करीत. पुजाऱ्याद्वारे अभिषेकासाठी व उत्सवासाठी मुर्तींस अभिषेकात (अभिषेक) विधीपूर्वक स्नान केले जाते हे आमच्या परिचयाचे आहे, इनाभिषेक मानवांना ‘देवाच्या प्रतिरूपात’ निर्माण करण्यात आले होते आणि म्हणून योहानाचे विधीवत नदीत स्नान करणे अभिषेकासारखे होते जे स्वर्गातील राज्यासाठी देवाच्या पश्चात्ताप करणाऱ्या प्रतिरूपास प्रतीकात्मकरित्या तयार करते. आज बाप्तिस्मा हा सामान्यतया ख्रिस्ती प्रथा मानला जातो, परंतु येथे त्याचा उपयोग देवाच्या राज्याच्या तयारीसाठी शुद्धीकरण सूचित करणारा व्यापक स्वरूपाचा असा होता.

प्रायश्चिताचे फळ

अनेक लोक बाप्तिस्मा घेण्यासाठी योहानाकडे आले, परंतु सर्वांनी प्रामाणिकपणे त्यांच्या पापांचा स्वीकार केला नाही व कबुली दिली नाही. शुभवर्तमान म्हणते:

7 योहान जेथे लोकांना बाप्तिस्मा देत होता तेथे अनेक परूशीआणि सदूकीआले. जेव्हा योहानाने त्यांना पाहिले तेव्हा तो त्यांना म्हणाला, “अहो, सापाच्या पिल्लांनो, देवाचा जो राग ओढवणार आहे त्याच्यापासून दूर पळण्याचे तुम्हांला कोणी सुचविले?
8 म्हणून पश्चात्तापास योग्य अशी फळे द्या.
9 अणि ‘अब्राहाम माझा पिता आहे.’ अशी फुशारकी तुम्हांला मारता येईल असे समजू नका; मी तुम्हांस सांगतो की, देव अब्राहामासाठी या दगडापासून मुले निर्माण करू शकतो.
10 झाडे तोडण्यासाठी कुऱ्हाड तयार आहे. चांगले फळ न देणारे प्रत्येक झाड कापून अग्नीत टाकले जाई

ल.मत्तय 3:7-10

परूशी व सदूकी मोशेच्या नियमशास्त्राचे शिक्षक होते, आणि नियमशास्त्राचे सर्व नियम पाळण्यासाठी फार प्रयत्न करीत असत. प्रत्येकाचा असा विचार होता की या पुढाऱ्यास, त्यांच्या धार्मिक शिक्षणामुळे आणि गुणवत्तेमुळेच देवाने मान्यता दिली. परंतु योहानाने त्यांना ‘सापाची पिल्ले’ म्हटले आणि त्यांच्या आगामी न्यायाबद्दल त्यांना चेतावणी दिली.

का?

‘पश्चात्तापास योग्य असे फळ न देण्याद्वारे’ हे सिद्ध झाले की त्यांनी खरोखर पश्चात्ताप केला नव्हता. त्यांनी त्यांच्या पापांची कबुली दिली नव्हती परंतु त्यांचे पाप लपविण्यासाठी ते त्यांच्या धार्मिक विधींचा वापर करीत होते. त्यांचा धार्मिक वारसा, जरी चांगला असला तरी, त्यांस पश्चात्तप्त करण्याऐवजी त्यांना अहंकारी बनवीत होता.

पश्चात्तापाचे फळ

पापांची कबुली आणि पश्चात्तापासोबत वेगळ्याप्रकारे जगण्याची अपेक्षा आली. लोकांनी या चर्चेत योहानाला त्यांचे पश्चात्ताप कसे दाखवावे हे विचारले :

10 जमावाने त्याला विचारले, “मग आता आम्ही काय करावे?”
11 त्याने उत्तर दिले, “ज्याच्याकडे दोन सदरे असतील त्याने ज्याच्याकडे काहीच नाही त्याला ते वाटून द्यावे. ज्याच्याकडे अन्न आहे त्यानेही तसेच करावे.”
12 काही जकातदारही बाप्तिस्मा करुन घ्यावयास आले होते. ते म्हणाले, “गुरुजी, आम्ही काय करावे?”
13 तो त्यांना म्हणाला, “गरजेपेक्षा जास्त जमा करु नका.” हेच तुम्हांला सांगितले आहे.
14 काही शिपायांनीसुद्धा त्याला विचारले, “आणि आम्ही काय करावे?”योहान त्यांना म्हणाला, “कोणाकडून बळजबरीने पैसे घेऊ नका, कोणावरही खोटा आरोप करु नका. आणि तुम्हांला मिळणाऱ्या पगारात समाधानी राहा.”

लूक 3:10-14

योहान ख्रिस्त होता का?

त्याच्या संदेशाच्या बळामुळे, अनेकांच्या मनात हा विचार होता की योहान हा मशीहा आहे काय, जो देवाचा अवतार म्हणून येईल असे प्राचीन काळापासून वचन देण्यात आले होते. शुभवर्तमानात ही चर्चा नमूद करण्यात आली आहे :

15 लोक मशीहाची अपेक्षा करीत होते. आणि ते सर्व त्यांच्या मनामध्ये योहानाबद्दल आश्चर्य करीत होते व असा विचार करीत होते की, “कदाचित तो ख्रिस्त असण्याची शक्यता आहे.”
16 त्या सर्वांना योहानाने उत्तर दिले; तो म्हणाला. “मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, पण एकजण जो माझ्यापेक्षाही सामर्थ्यशाली आहे तो येत आहे. त्याच्या वहाणांचे बंद सोडण्यासही मी पात्र नाही. तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने व अग्नीने करील.
17 त्याचे खळे स्वच्छ करण्यासाठी व त्याच्या कोठारात गहू साठविण्यासाठी त्याच्या हातात त्याचे सूप आहे पण भुसा तो न विझविता येणाऱ्या अग्नीने जाळून टाकील.”
18 योहानाने इतर पुष्कळ उत्तेजन देणाऱ्या शब्दांनी त्यांना बोध करुन सुवार्ता सांगित

ली.लूक 3:15-18

योहानाने त्यांना सांगितले की मशीहा (ख्रिस्त) लवकरच येत आहे, म्हणजे येशू.

स्वामी योहानाचे कार्य आणि आम्ही

देवाच्या राज्यासाठी लोकांना तयार करून योहानाने येशूबरोबर भागीदारी केली, कारण वाईटाविरुद्धच्या त्यांच्या माहिमेत बलराम कृष्णाबरोबर सहभागी झाला होता. योहानाने त्यांना आणखी नियम देऊन तयार केले नाही, उलट त्यांच्या आंतरिक पश्चातापाने त्यांना तयार केले होते हे दर्शविण्यासाठी त्याने त्यांच्या पापांबद्दल पश्चात्ताप करण्यासाठी (प्रायश्चित) करण्यासाठी आणि नदीत विधिवत स्नान (आत्माभिषेक) करण्यासाठी बोलाविले होते.

कठोर वैराग्याचे नियम पाळून असे करणे अधिक कठीण आहे कारण यामुळे आपली लज्जा व अपराधाचा पर्दाफाश होतो. तत्कालीन धार्मिक पुढारी पश्चात्ताप करू शकले नाहीत. त्याऐवजी त्यांनी त्यांची पापे लपविण्यासाठी धर्माचा वापर केला. या निवडीमुळे येशू आला तेव्हा देवाचे राज्य समजण्याची त्यांची तयारी नव्हती. योहानाची ताकीद आजही तितकीच प्रसंगोचित आहे. आम्ही पापापासून पश्चात्ताप करावा अशी त्याची मागणी आहे. आम्ही करू काय?

सैतानाद्वारे येशूची परीक्षा होते त्याद्वारे आपण त्याच्या व्यक्तित्वाचा शोध चालू ठेवू.