जेव्हा कोणी रचलेली सर्व महान महाकाव्ये आणि प्रेमकथांचा आपण विचार करतो तेव्हा रामायण नक्कीच या यादीच्या शीर्षस्थानी येते. या महाकाव्याचे अनेक उदात्त पैलू आहेत :
- राम आणि सीता यांच्यातील प्रेम,
- सिंहासनासाठी लढा देण्याऐवजी वनवासाची निवड करण्यात रामाची नम्रता,
- रामाचा चांगुलपणा विरुद्ध रावणाची दुष्टता
- रावणाच्या कैदेत असताना सीतेची शुद्धता,
- तिला सोडविण्यात रामाचे शौर्य.
लांब रस्ता ज्याचा परिणाम वाईटावर चांगल्याचा विजय आहे, त्याच्या नायकाचे चरित्र समोर आणून रामायणास एक शाश्वत महाकाव्य बनविले आहे. म्हणूनच समाज दरवर्षी रामलीला करतात, विशेषतः विजयादशमी (दसेरा, दसरा किंवा दशेन) उत्सवात, बहुतेकदा रामचरितमानस सारख्या रामायणातून निघालेल्या साहित्यावर आधारित.
आपण रामायणा‘त’ असू शकत नाही
रामायणाची मुख्य उणीव म्हणजे आपण केवळ नाटक वाचू, ऐकू किंवा पाहू शकतो. काही लोक रामलीलेत भाग घेऊ शकतात, परंतु रामलीला ही खरी कहाणी नाही. अयोध्येच्या राज्यामध्ये आपण राजा दशरथच्या रामायण जगात खरोखर प्रवेश केला असता आणि रामाबरोबर त्याच्या साहसांवर जाऊ शकलो असतो तर किती बरे झाले असते?
ज्या महाकाव्या‘त’ प्रवेश करण्यासाठी आम्हाला आमंत्रित करण्यात आले आहे
जरी ते आपल्यासाठी उपलब्ध नसले तरी रामायणाच्या पातळीवर आणखी एक महाकाव्य आहे ज्यात आपल्याला प्रवेश करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या महाकाव्याची रामायणात इतकी समानता आहे की हे वास्तविक-जीवन महाकाव्य समजण्यासाठी आपण रामायणाचा साचा म्हणून उपयोग करू शकतो. हे महाकाव्य प्राचीन इब्री वेद घडविते, ज्याला बरेचदा बायबल म्हणून ओळखले जाते. परंतु हे महाकाव्य आपण ज्या जगात जगतो त्यात घडते, ज्यामुळे आम्हाला त्याच्या नाटकात प्रवेश मिळू शकेल. हे आमच्यासाठी कदाचित नवीन असू शकते, परंतु रामायणाच्या भिंगातून नजर टाकून, आपण त्याची कथा आणि त्यामध्ये आपण काय भूमिका घेतो हे समजू शकतो.
इब्री वेद : रामायणासारखे एक प्रेम महाकाव्य
जरी अनेक उप-कथानके असली, तरी रामायणातील मुख्य भाग नायक राम आणि नायिका सीता यांची प्रेमकथा आहे. त्याचप्रकारे, जरी इब्री वेदांमध्ये अनेक उप-कथानके असलेले एक मोठे महाकाव्य आहे, तरी बायबलचा मुख्य भाग येशू (नायक) आणि या जगातील लोक जे त्याची वधू बनतात, यांच्यातील प्रेमकथा आहे, जशी सीता रामाची वधू बनली आहे. जशी रामायणात सीतेची महत्वपूर्ण भूमिका होती, तशीच आपल्यालाही बायबलमधील कथेत महत्वाचा वाटा आहे.
प्रारंभ : प्रेम गमावले
पण आपण प्रारंभी सुरुवात करू या. बायबलमध्ये असे म्हटले आहे की, स्वतः पृथ्वीमधून परमेश्वराने मनुष्य घडविला, त्याचप्रमाणे बहुतेक रामायण ग्रंथांमध्ये सीता पृथ्वीमधून वर आली. परमेश्वराने असे केले कारण त्याचे मनुष्यावर प्रेम होते, त्याला त्याच्याशी नाते स्थापन करण्याची इच्छा होती. प्राचीन इब्री वेदांमध्ये लोकांसाठी देव आपल्या इच्छेचे वर्णन कसे करतो हे लक्षात घ्या
तिच्या भूमीत मी तिचे पुष्कळ बीज [a] पेरीन.
होशेय 2:23
लो-रूमाहावर मी दया करीन.
लो-अम्मीला मी ‘माझे लोक’ म्हणीन.
मग ते मला, ‘तू माझा परमेश्वर’ मानतील.”
खलनायकाद्वारे नायिका कैदेत
तथापि, देवाने या नात्यासाठी मानवजातीची निर्मिती केली असली तरी, एका खलनायकाने हे नाते नष्ट केले. जसे रावणाने सीतेचे अपहरण केले आणि तिला लंकेच्या राज्यात कैद केले, तसेच देवाचा शत्रू सैतान, ज्याला अनेकदा आसुरासारखे सर्प म्हणून चित्रित केले गेले, त्याने मानवजातीला कैद केले. बायबलमध्ये याच्या नियंत्रणाधीन असलेल्या आपल्या परिस्थितीचे या शब्दांत वर्णन केले आहे.
पूर्वी तुम्ही आपले अपराध आणि पातके यांमुळे आध्यात्मिक रीतीने मेला होता. 2 ज्यामध्ये तुम्ही पूर्वी जगत होता, जगातील दुष्ट मार्गाचे अनुकरण करीत होता, आणि आपल्याला न दिसणारे आध्यात्मिक सामर्थ्य ज्याच्याकडे आहे त्या सताधीशाचे अनुकरण करीत होता. जे देवाच्या आज्ञा पाळीत नाहीत त्यांच्या जीवनामध्ये हाच आत्मा कार्य करीत आहे. 3 एके काळी आम्हीसुद्धा त्यांच्यामध्ये आमच्या मानवी देहाच्या दुष्ट इच्छांचे समाधान करीत होतो आणि आमच्या मानवी मनाच्या दुष्ट वासनांची पूर्तंता करीत होतो. तसेच जगातील इतरांप्रमाणेच आम्ही त्याच्या क्रोधाची मुले झालो होतो.
इफिस 2:1-3
येणाऱ्या संघर्षाचे वर्धन
जेव्हा रावणाने सीतेला आपल्या राज्यात पकडून नेले, तेव्हा रामाने त्याला चेतावणी दिली की तो तिला सोडवील आणि त्याचा नाश करील. त्याच प्रकारे, जेव्हा सैतानाने पाप आणि मृत्यू यांच्यात आपले पतन घडवून आणले, तेव्हा मानवाच्या इतिहासाच्या सुरूवातीस, सैतानाने चेतावणी दिली की, तो स्त्रीच्या वंशाद्वारे त्याचा नाश कसा करेल – हे कोडे म्हणजे या दोघा शत्रूंमध्ये मध्ययुगीन संघर्षाचा केंद्र बनले.
प्राचीन काळात या संततीच्या याद्वारे आगमनाची पुष्टी देवाने केली :
रामायणाने त्याचप्रकारे याद्वारे रावण आणि राम यांच्यातील शेवटच्या शक्तीपरीक्षेचे आयोजन केले :
- अशक्य गर्भधारण (दशरथाच्या बायका दैवी हस्तक्षेपाशिवाय गर्भधारण करू शकल्या नाहीत),
- मुलाचा त्याग करणे (दशरथास रामाला जंगलात वनवासासाठी पाठवावे लागले),
- लोकांची सुटका (राक्षस सुबाहूने जंगलातील मुनिंचा, विशेषकरून विश्वामित्राचा छळ केला, रामाने त्याचा नाश केला)
- राजघराण्याची स्थापना (राम शेवटी राजा म्हणून राज्य करण्यास सक्षम झाला).
नायक त्याच्या प्रेमाची सुटका करण्यासाठी येतो
शुभवर्तमान येशूला ती संतती म्हणून प्रगट करते जी कुमारिकेद्वारे येईल असे अभिवचन देण्यात आले होते. रावणाने कैद केलेल्या सीतेला वाचवण्यासाठी जसा राम आला, तसा मृत्यू आणि पापाच्या सापळ्यात अडकलेल्यांना वाचवण्यासाठी येशू पृथ्वीवर आला. जरी, रामाप्रमाणेच, तो राजघराण्यातून होता, तरी त्याने स्वेच्छेने आपले विशेषाधिकार आणि सत्ता यांचा त्याग केला. बायबल याचे असे वर्णन करते
5 ख्रिस्त येशूच्या ठायी जे विचार होते तसेच तुमचेही असू द्या.
6 जरी तो देवाच्या स्वरुपाचा होता,
फिलिप्पै. 2:5ब -8
तरी देवासारखे असणे हे संपत्ती राखून ठेवण्यासारखे मानले नाही.
7 उलट त्याने सर्व काही सोडून दोल,
आणि त्याने गुलामाचे स्वरुप धारण केले आणि मनुष्याचे रुप धारण केले
व तो आपल्या दिसण्यात मनुष्यासारखा झाला.
8 त्याने स्वतःला नम्र केले.
आणि मरेपर्यंत तो आज्ञाधारक राहिला.
होय, वधस्तंभावरच्या मरणापर्यंत तो नम्र झाला.
पराभवातून विजय
या बाबतीत रामायण आणि बायबलमधील महाकाव्य यांच्यात मोठा फरक आहे. रामायणात रामने रावणाला आपल्या बलशक्तीने पराभूत केले. त्याने त्याला युद्धामध्ये ठार केले.
येशूसाठी विजयाचा मार्ग वेगळा होता; हा मार्ग पराभवातून गेला. आधीच भविष्यवाणी केल्यानुसार येशू शारीरिक लढाई जिंकण्याऐवजी शारीरिक मृत्यू मरण पावला. त्याने हे केले कारण आमची कैद ही स्वतः मृत्यूच आहे, म्हणून त्याला मृत्यूला पराभूत करण्याची गरज होती. त्याने मरणातून उठण्याद्वारे असे केले, जे आपण ऐतिहासिकदृष्ट्या परीक्षण करू शकतो. आमच्यासाठी मरणाने, त्याने आमच्या वतीने अक्षरशः स्वतःला दिले. जसे बायबल येशूविषयी सांगते
14 त्याने स्वतःला आमच्यासाठी दिले यासाठी की सर्व दुष्टतेपासून त्याने खंडणी भरून आम्हांस सोडवावे व चांगली कृत्ये करण्यासाठी आवेशी असलेले असे जे केवळ आपले लोक त्यांना स्वतःसाठी शुद्ध
करावे.तीत 2:14
प्रियकराचे आमंत्रण …
रामायणात, रावणाचा पराभव केल्यावर राम आणि सीता पुन्हा एकत्र आले. बायबलमधील महाकाव्यात, आता येशूने मृत्यूला पराभूत केले आहे, त्याचप्रमाणे येशू तुम्हाला आणि मला त्याचे बनण्याचे, भक्तीद्वारे उत्तर देण्याचे आमंत्रण देतो ही निवड करणारे त्याची वधू आहेत
25 पतींनो, ज्याप्रमाणे ख्रिस्त मंडळीवर प्रीति करतो, तशी तुम्ही आपल्या पत्नीवर प्रीति करा. त्याने तिच्यासाठी स्वतःला दिले, 26 यासाठी की, त्याने तिला देवाच्या वचनरुपी पाण्याने धुऊन निर्मळ करावे. 27 यासाठी की, तो मंडळीला स्वतःसाठी गौरवी वधू म्हणून सादर करील, तिला कोणताही डाग नसेल. किंवा सुरकुती किंवा कोणत्याही प्रकारची अपूर्णता नसेल तर ती पवित्र व निर्दोष असेल.
इफिसकर 5:25-27
32 हे गुढ सत्य फार महत्त्वाचे आहे आणि मी हे सांगत आहे की ते ख्रिस्त व मंडळीला लागू पडते.
इफिसकर 5:32
…सुंदर आणि शुद्ध होण्यासाठी
रामायणात, रामाने सीतेवर प्रेम केले कारण ती सुंदर होती. तिचे चरित्र सुद्धा शुद्ध होते. या जगात बायबलचे महाकाव्य उलगडते, जे शुद्ध नाहीत त्या आम्हासोबत. परंतु येशू अजूनही त्यांच्यावर प्रेम करतो जे त्याच्या पाचारणास उत्तर देतात, ते सुंदर आणि शुद्ध आहेत म्हणून नव्हे तर त्यांना सुंदर आणि शुद्ध बनवण्यासाठी, खालील चारित्र्याने परिपूर्ण.
22 पण आत्मा या गोष्टी निर्माण करतो: प्रीति, आनंद, शांति, सहनशीलता, दयाळूपणा, चांगुलपणा, विश्वास, 23 सौम्यता व आत्मसंयमन. अशा गोष्टीविरुद्ध नियमशास्त्र
नाही.गलती 5:22-23
…अग्नीपरीक्षेनंतर
रावणाच्या पराभवानंतर लगेच सीता आणि राम पुन्हा एकत्र आले असले तरी सीतेच्या पूण्याबद्दल प्रश्न करण्यात आले. रावणाच्या नियंत्रणाखाली असताना काहींनी तिच्यावर अपवित्रतेचा आरोप केला. म्हणून सीतेला तिचे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी अग्निपरीक्षेतून (अग्नि परीक्षा) जावे लागले.बायबलमधील महाकाव्यात, पाप आणि मृत्यूवर विजय मिळविल्यानंतर, येशू त्याच्या प्रेमिकेसाठी तयारी करण्याकरिता स्वर्गात गेला, जिच्यासाठी तो परत येईल. त्याच्यापासून विभक्त असताना, आपल्यालासुद्धा कसोटींना किंवा परीक्षांना सामोरे जावे लागते ज्याची तुलना बायबलने अग्नीशी आहे; आपली निरागसता सिद्ध करण्यासाठी नव्हे तर त्याच्या शुद्ध प्रेमाला दूषित करणार्या गोष्टीपासून स्वतःला शुद्ध करण्यासाठी. बायबल या कल्पनाचित्रांचा उपयोग करते
3 आमच्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या पित्याची, देवाची स्तुति असो! त्याच्या महान दयेमुळे त्याने आमचा नवा जन्म होऊ दिला, आणि येशूला मेलेल्यातून उठविण्याने जिवंत व नवीन आशा दिली. 4 आणि ज्याचा कधी नाश होत नाही, ज्याच्यावर काही दोष नाही, व जे कधी झिजत नाही असे वतन स्वर्गात आपल्यासाठी राखून ठेवले आहे.
5 आणि शेवटच्या काळात प्रगट करण्यात येणारे तारण तुम्हाला मिळावे म्हणून विश्वासाच्या द्वारे, देवाच्या सामर्थ्याने तुमचे रक्षण केले आहे. 6 वेगवेगळ्या प्रकारच्या पिडांनी काही काळापर्यंत तुम्ही दु:खी होणे जरी जरुरीचे असले, तरी यामुळे आनंद करीत आहा. 7 नाशवंत सोने शुध्द करण्याकरिता अग्नित टाकले जाते. त्याहून अधिक मौल्यवान अशा तुमच्या विश्वासाची कसोटी व्हावी, आणि येशू ख्रिस्ताच्या परत येण्याच्या वेळी तो खरा ठरावा आणि तुम्हाला स्तुति, गौरव व सन्मान मिळावा याची आवश्यकता आहे.
8 जरी तुम्ही येशूला पाहिले नाही, तरी तुम्ही त्याच्यावर प्रीति करता. जरी आता तुम्ही त्याच्याकडे पाहू शकत नसला तरी तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता आणि तुम्ही व्यक्त करता येणार नाही, अशा गौरवी आनंदाने भरला आहात. 9 तुमच्या विश्वासाचे ध्येय जे तुमच्या आत्म्याचे तारण ते तुम्हाला प्राप्त होत आहे.
1 पेत्र 1:3-9
…एका मोठ्या विवाहासाठी
बायबल घोषित करते की येशू पुन्हा त्याच्या प्रेमिकेसाठी परत येईल आणि असे केल्यावर तो तिला त्याची वधू बनवेल. म्हणूनच, सर्व महान महाकाव्यांप्रमाणेच बायबलचा शेवट विवाहाने होतो. येशूने जी किंमत दिली तिने या लग्नाचा मार्ग मोकळा झाला आहे. ते लग्न लाक्षणिक नसून वास्तविक आहे, आणि त्याचे लग्नाचे आमंत्रण स्वीकारणार्यांस तो ‘ख्रिस्ताची वधू’ म्हणतो. जसे म्हटले आहे :
आपण उल्हास करु व आनंदात राहू!
हेप्रकटीकरण 19:7
आणि त्याचे गौरव करु
कारण कोकऱ्याचे लग्न जवळ आले आहे.
आणि त्याच्या वधूने स्वतःला नटवून तयार केले आ
जे येशूच्या मुक्ततेचा प्रस्ताव स्वीकार करतात ते त्याची ‘वधू’ ठरतात. ह्या स्वर्गीय लग्नाचा तो आपल्या सर्वांना प्रस्ताव देतो. आपण आणि मी त्याच्या लग्नात यावे या आमंत्रणासह बायबलचा शेवट होतो.
17 आत्मा आणि नवरी असे म्हणतात की, “ये!” आणि जो कोणी हे ऐकतो, तो असे म्हणो की, “ये!” आणि जो तहानेला आहे, तो येवो, ज्या कोणाला पाहिजे, तो फुकट दिले जाणारे जीवनी पाणी घेवो
.प्रकटीकरण 22:17
महाकाव्यात प्रवेश करा : प्रतिसाद देऊन
येशूमध्ये आपल्याला देण्यात आलेले नाते समजण्यासाठी रामायणातील सीता आणि राम यांच्यातील नात्याचा भिग म्हणून उपयोग केला गेला आहे. हे आपल्यावर प्रेम करणाऱ्या देवाचे स्वर्गीय प्रणय आहे. जो कोणी त्याच्या लग्नाचा प्रस्ताव स्वीकार करील त्याच्याशी तो त्याची वधू म्हणून लग्न करेल. कोणत्याही विवाहाच्या प्रस्तावासारखे हा प्रस्ताव स्वीकारायचा की नाही, याविषयी आपली सक्रिय भूमिका असते. हा प्रस्ताव स्वीकारताना आपण त्या चिरंतन महाकाव्यामध्ये प्रवेश कराल जे रामायण महाकाव्याच्या भव्यतेपेक्षा श्रेष्ठ आहे.