मानवजात पुढे कशी वाढली – मनुच्या (किंवा नोहा) वृत्तांतावरून धडे

मागे आपण मोक्षाच्या अभिवचनाविषयी पाहिले जे मानव इतिहासाचा अगदी प्रारंभी देण्यात आले होते. आम्ही हे देखील पाहिले की आमच्यात असे काही आहे ज्याचा कल भ्रष्टतेकडे आहे, जो आमच्या कृतींमध्ये दिसून येतो ज्याद्वारे ठराविक नैतिक आचरणाचे लक्ष्य चुकते, आणि आमच्या व्यक्तिमत्वाच्या स्वाभावात खोलवर दिसून येते. आमचे मूळ प्रतिरूप जे देवाने (प्रजापति) घडविले होते पार बिघडून गेले आहे. जरी आम्ही अनेक विधि, स्नान आणि प्रार्थना, हे सर्वकाही पूर्ण करीत असतो, तरीही आमची भ्रष्ट दशा आम्हास प्रवृत्त करते की आम्हास अंतःप्रेरणेने शुद्धीकरणाची गरज भासते जे आम्हास योग्यप्रकारे संपादन करता येत नाही. आम्ही बरेचदा परिपूर्ण सचोटीचे जीवन जगण्याचा ‘कठीण’ संघर्ष करीत त्यास लढा देण्याच्या संतत प्रयत्नास कंटाळून जातो.

जर कुठल्याही नैतिक संयमावाचून ही भ्रष्टता वाढत गेली तर सर्वकाही लवकरच क्षय प्राप्त करील. मानव इतिहासाच्या अगदी आरंभी असेच घडले. बायबलच्या (वेद पुस्तकम्) सुरूवातीच्या प्रकरणात आम्हास सांगण्यात आले आहे की हे कसे घडले. हेच वर्णन शतपथ ब्राम्हण यात समांतर आढळून येते ज्यात सविस्तर सांगण्यात आले आहे की कशाप्रकारे आज मानवजातीच्या पूर्वज – ज्यास मनु म्हटले जाते – जलप्रलयाच्या एका मोठ्या दंडापासून वाचला जो मानवाच्या भ्रष्टतेमुळे आला होता, आणि एका मोठ्या नावेत आश्रय घेतल्यामुळे तो बचावला. बायबल (वेद पुस्तकम्) आणि संस्कृत वेद दोन्ही आम्हास सांगतात की आज जी मानवजात जिवंत आहे ती त्याचाच वंश आहे.

प्राचीन मनुज्यावरून आम्हाला इंग्रजी शब्दमॅनमिळतो

इंग्रजी शब्द ‘मॅन’ प्रारंभिक जर्मन भाषेतून येतो. रोमन इतिहासकार, टॅसिटस जो येशू ख्रिस्ताच्या (येशूसत्संग) काळाच्या जवळपास जगत होता, त्याने जर्मन लोकांच्या इतिहासाचे पुस्तक लिहिलेले आहे ज्याला जर्मेनिया म्हणतात. या पुस्तकात तो म्हणतो

त्यांच्या जुन्या पोवाड्यांत (जे त्यांचा इतिहास आहेत) ते ट्यूस्टो, पृथ्वीमधून उद्भवलेल्या देवाची, आणि त्याचा पुत्र मन्नुस याची, राष्ट्रांचा पिता आणि संस्थापक म्हणून प्रशंसा करतात. त्यांच्या मते मन्नुसचे तीन पुत्र आहेत, ज्यांच्या नावाने अनेक लोक ओळखले जातात

सिटस. जर्मेनिया प्रकरण 2, सन 100 मध्ये लिखित

विद्वान आम्हास सांगतात की हा प्राचीन जर्मनिक शब्द मन्नुस प्रोटो-इंडो-यूरोपियन “मनुह” (तुलना करा संस्कृत मनू, अवेस्तानमनु-,) पासून येतो. म्हणून, इंग्रजी शब्द ‘मॅन’ मनुपासून आहे ज्यास बायबल (वेद पुस्तकम्) आणि शतपथ ब्राम्हण दोन्ही आमचा पूर्वज सांगतात! आपण शतपथ ब्राम्हण मधून सारांश घेऊन ह्या व्यक्तीचे अवलोकन करू या. या वृत्तांत दिलेल्या वर्णनांत थोडेफार वेगळे पक्ष आहेत, म्हणून मी सामान्य मुद्द्यांचे वर्णन करू इच्छितो.

संस्कृत वेदात मनुचा वृत्तांत 

वेदांत मनु एक नीतिमान पुरुष होता, जो सत्याच्या मार्गावर चालत होता. मनु अत्यंत प्रामाणिक होता, म्हणून त्याला आरंभी सत्यव्रत (“सत्याची शपथ असलेला”) म्हटले जात असे.

शतपथ ब्राम्हणानुसार (येथे शतपथ ब्राम्हण वाचण्यासाठी क्लिक करा), एका अवताराने मनुला येणार्‍या जलप्रलयाविषयी सावध केले. नदीत हात धूत असतांना हा अवतार आरंभी शाफारीच्या (लहान मासा) रूपात प्रगट झाला. ह्या लहान माशाने मनुला विनंती केली की त्याने त्यास वाचवावे, आणि कळवळा येऊन, त्याने त्याला पाण्याच्या भांड्यात ठेविले. तो मोठा मोठा होत गेला, शेवटी मनुने त्याला एका मोठ्या मडक्यात ठेविले, आणि मग त्याला विहिरीत टाकले. जेव्हा सतत वाढत असलेल्या ह्या माशासाठी विहीर पुरेशी होईना, तेव्हा मनुने त्याला तळ्यात (हौद) टाकले, ज्याची उंची पृष्ठभागावर आणि जमीनीवर दोन योजन (25 किलोमीटर) उंच आणि इतकीच लांब होती, आणि त्याची रूंदी एक योजन (13 किलोमीटर) इतकी होती. मासा जसजसा आणखी वाढत गेला तेव्हा मनुस त्याला नदीत टाकावे लागले, आणि जेव्हा नदी पुरेसी होईना तेव्हा त्याने त्यास समुद्रात टाकले, ज्यानंतर त्याने महासागराचा मोठा विस्तार जवळजवळ व्यापून टाकला.

त्यानंतर त्या अवताराने मनूला सर्व-विनाशक जलप्रलयाविषयी सांगितले जो लवकरच येणार होता. म्हणून मनूने एक मोठे तारू उभारले ज्यात त्याने आपल्या कुटूंबास ठेविले, वेगवेगळया प्रकारच्या बीया आणि पृथ्वी पुन्हा वसविण्यासाठी प्राण्यांस ठेविले, कारण जलप्रलय ओसरल्यानंतर सागर आणि समुद्र मागे सरतील आणि जगावर पुन्हा लोकांची आणि प्राण्यांची वस्ती व्हावी अशी गरज भासेल. जलप्रलयादरम्यान मनूने तारवास माशाच्या शींगास बांधले हा सुद्धा एक अवतार होता. त्याचे तारू जलप्रलयानंतर एका पर्वतशिखरावर येऊन थांबले. नंतर तो पर्वतावरून उतरला आणि त्याने त्याच्या मुक्तीसाठी बलिदान व यज्ञार्पण केले. आज पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे त्याजपासून उद्भवली आहेत.

बायबलमध्ये (वेद पुस्तकम्) नोहाचा वृत्तांत 

बायबलमधील (वेद पुस्तकम्) वृत्तांत त्याच घटनेचे वर्णन करतो, पण या वृत्तांतात मनूस ‘नोहा’ म्हटलेले आहे. बायबलमध्ये नोहा आणि जागतीक जलप्रलयाचा सविस्तर वृत्तांत वाचण्यासाठी येथे क्लिक करा. संस्कृत वेद आणि बायबलसोबतच, या घटनेच्या आठवणी वेगवेगळ्या संस्कृतीच्या, धर्माच्या आणि इतिहासाच्या वृत्तांतात सुरक्षित करून ठेविण्यात आल्या आहेत. जग गाळयुक्त खडकाने व्यापलेले आहे, जे पुरादरम्यान घडून आले म्हणून आपल्याकडे ह्या जलप्रलयाचा भौतिक पुरावा तसेच मानववंशशास्त्रीय पुरावा आहे. पण ह्या वर्णनात आपण ज्याकडे लक्ष दिले पाहिजे असा कोणता धडा आज आपणासाठी आहे?

चुकणे विरुद्ध दया प्राप्त करणे

जेव्हा आम्ही विचारतो की देव भ्रष्टतेचा (पाप) न्याय करतो का, आणि विशेषेकरून आमच्या स्वतःच्या पापाचा न्याय होईल किंवा नाही, तेव्हा बरेचदा उत्तर अशाप्रकारचे असते, “मला न्यायाची फारशी काळजी वाटत नाही कारण देव इतका कृपाळू आणि दयाळू आहे की तो माझा खरोखर न्याय करील का असे मला वाटत नाही.” नोहाच्या (अथवा मनू) ह्या वृत्तांताने आम्हास पुन्हा विचार करावयास लावावा. त्या न्यायदंडाच्या वेळी संपूर्ण जगाचा (नोहा आणि त्याच्या कुटूंबास सोडून) नाश झाला. तेव्हा त्याची दया कोठे होती? ती तारवात पुरविण्यात आली होती.

देवाने आपल्या दयेस स्मरून, एक तारू दिले जे कोणासाठीही उपलब्ध होते. त्या तारवात कोणीही प्रवेश केला असता आणि दया प्राप्त केली असती व येणार्‍या जलप्रलयापासून संरक्षण मिळविले असते. समस्या ही होती की येणार्‍या जलप्रलयाप्रत जवळजवळ सर्व लोकांनी अविश्वासाचे प्रत्युत्तर दिले. त्यांनी नोहाची थट्टा केली आणि हा विश्वास ठेविला नाही की येणारा न्याय खरोखरच होणार आहे. म्हणून जलप्रलयात त्यांचा नाश झाला. तरीही त्यांना गरज ही होती की त्यांनी तारवात प्रवेश करावयास हवा होता आणि ते न्यायदंडापासून सुटले असते.

त्यावेळी जे लोक जिवंत होते त्यांनी शक्यतः हा विचार केला असेल की उंच टेकडीवर चढून, अथवा तराफा उभारून ते जलप्रलयापासून वाचू शकतात. पण त्यांनी न्यायदंडाचा आकार आणि सामर्थ्य यांस पूर्णपणे कमी लेखिले. त्या न्यायासाठी ‘उत्तम कल्पना’ पुरेशा ठरणार नव्हत्या; त्यांस असे काही तरी हवे होते जे त्यांस आणखी चांगल्याप्रकारे झाकू शकत होते – तारू. तारू उभारले जात असतांना ते सर्व पाहत होते व हे स्पष्ट होते की ते येणार्‍या न्यायदंडाचे तसेच उपलब्ध दयेचे प्रतीक होते. आणि नोहाच्या (मनू) उदाहरणाकडे लक्ष देता ते आज आमच्याशी देखील त्याचप्रकारे बोलत आहे, हे दाखवत आहे की देवाने स्थापन केलेल्या तरतूदीद्वारे दया प्राप्त केली जाते, आमच्या स्वतःच्या उत्तम कल्पनांद्वारे नव्हे.

तर नोहाला दया का प्राप्त झाली? आपण पाहिले असेल की देव ह्या वाक्यप्रयोगाची अनेकदा पुनरावृत्ती करतो

तेव्हा नोहाने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सर्व काही केले.

मला असे आढळून येते की जे मला समजते, अथवा जे मला आवडते, अथवा ज्याच्याशी मी सहमत होतो ते करण्याची मी प्रवृत्ती बाळगतो. मला खात्री आहे की येणार्‍या जलप्रलयाच्या ताकीदीविषयी व जमीनीवर असे मोठे तारू उभारण्याच्या आज्ञेविषयी नोहाच्या मनात अनेक प्रश्न असतील. मला खात्री आहे की त्याने तर्क केला असेल कारण तो चांगला व सत्याचा पाठपुरावा करणारा व्यक्ती असल्यामुळे कदाचित हे तारू बांधण्याकडे लक्ष देण्याची त्याला गरज भासली नसावी. पण जी आज्ञा त्याला देण्यात आली ते ‘सर्व काही त्याने केले – फक्त ते नाही जे त्याला समजले, अथवा जे त्याला सोयीस्कर वाटले, आणि ते सुद्धा नाही जे त्याला अर्थपूर्ण वाटले. हे उत्तम उदाहरण आहे जे आम्ही अनुसरण करावयास हवे.

तारणाचे द्वार

बायबल आम्हाला हे सुद्धा सांगते की नोहा, त्याचे कुटूंब आणि प्राण्यांनी तारवात प्रवेश केल्यानंतर

मग परमेश्वराने त्याला आत बंद केले.

उत्पत्ती 7:16

तारवात प्रवेश करण्याच्या एकमेव दारावर देवाचे नियंत्रण व व्यवस्थापन होते – नोहाचे नाही. जेव्हा न्यायदंड आला आणि पाणी वाढू लागले, तेव्हा लोकांनी बाहेरून तारवावर कितीही ठोकले तरीही नोहा दार उघडण्यासाठी हालू शकला नाही. देवाने त्या एकमेव दारावर नियंत्रण केले. पण त्याचवेळी जे आत होते ते ह्या विश्वासात विसावू शकत होते की देवाचे दारावर नियंत्रण असल्यामुळे कुठलाही वारा किंवा लाट त्यास उघडू शकणार नाही. देवाच्या जपणूकीच्या व दयेच्या दारात ते सुरक्षित होते.

परमेश्वर न बदलणारा आहे म्हणून हे आम्हास आजही लागू पडते. बायबल हा इशारा देते की दुसरा न्याय येणार आहे – आणि हा अग्नीने असेल – पण नोहाचे चिन्ह आम्हास हे आश्वासन देते की ह्या न्यायासोबतच तो दया सुद्धा देतो. आपण एकच दार असलेल्या तारवाच्या शोधात असले पाहिजे जो आमची गरज पुरवील आणि आम्हावर दया करील.

पुन्हा बलिदान

बायबल आम्हास सांगते की नोहाने :

नंतर नोहाने परमेश्वरासाठी वेदी बांधली आणि, सर्व शुद्ध पशु व सर्व शुद्ध पक्षी, यांतले काही घेऊन त्या वेदीवर त्यांचे होमार्पण केले.

उत्पत्ती 8:20

हे पुरुषसुक्ताच्या बलिदानाच्या पद्धतीस अनुरूप आहे. जणू काही नोहाला (किंवा मनूला) माहीत होते की पुरुषाचे बलिदान केले जाईल म्हणून परमेश्वर असे करील हा विश्वास दर्शवीत त्याने या येणार्‍या बलिदानाचे चित्र म्हणून पशू बलिदान अर्पण केले. वस्तुतः बायबल म्हणते की या बलिदानानंतरच देवाने ‘नोहा व त्याच्या मुलांना आशीर्वाद’ दिला (उत्पत्ती 1) आणि त्याने ‘नोहाशी एक करार केला’ (उत्पत्ती 9) की तो सर्व लोकांस पुन्हा कधीही जलप्रलयाद्वारे दंड देणार नाही. म्हणूनच असे दिसून येते की नोहाद्वारे पशुचे बलिदान त्याच्या उपासनेत महत्वाचे होते.

पुनर्जन्मनियमशास्त्राद्वारे किंवा

वेदिक परंपरेत, मनू हा मनुस्मृतीचे स्रोत आहे जो व्यक्तीच्या जीवनातील वर्णाविषयी/जातीविषयी सल्ला देतो अथवा ते ठरवितो. यजुर्वेद म्हणतो की जन्माच्या वेळी, सर्व मानव शूद्र किंवा सेवक जन्माला येतात, परंतु या बंधनातून सुटण्यासाठी आपल्याला दुसर्‍या किंवा नव्या जन्माची गरज आहे. मनुस्मृती विवादास्पद आहे आणि त्यात स्मृतीबद्दल वेगवेगळे दृष्टिकोन व्यक्त केलेले आहेत. या सर्व तपशीलांचे विश्लेषण करणे आमच्या व्याप्तीच्या पलीकडे आहे. तथापि, आपण शोधण्यासारखे काय आहे, ते म्हणजे बायबलमध्ये नोहा/मनुच्या वंशात जन्मलेल्या सेमिटिक लोकांना सुद्धा शुद्धीकरण आणि शुद्धता प्राप्त करण्यासाठी दोन मार्ग मिळाले. एक मार्ग नियमशास्त्राद्वारे होता ज्यात शुद्धिकरण, विधियुक्त प्रक्षालन आणि बलिदानांचा समावेश होता – याचे मनुस्मृतीशी बरेच साम्य आहे. आणि दुसरा मार्ग अत्यंत रहस्यमय होता, आणि त्यात पुनर्जन्म प्राप्त करण्यापूर्वी मृत्यूचा समातेश होता. येशूने याविषयी देखील शिकविले आहे. त्याने त्याच्या काळातील एक सुशिक्षित विद्वानास सांगितले की

येशू त्याला म्हणाला, “मी तुम्हाला खचित सांगतो, नव्याने जन्मल्यावाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही.

योहान 3:3

याविषयी पुढे आपण नंतरच्या लेखांत पाहणार आहोत. पण पुढे आपण हे पाहणार आहोत की बायबल आणि संस्कृत वेदांमध्ये इतके साम्य का.