संस्कृतमध्ये, गुरु (गुरु) म्हणजे ‘गु’ (अंधकार) आणि ‘रु’ (प्रकाश). गुरू यासाठी शिकवितो की खऱ्या ज्ञानाच्या किंवा बुद्धीच्या प्रकाशाने अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा. येशू अशा प्रबुद्ध शिकवणीसाठी ओळखला जातो जो अंधकारामध्ये राहणाऱ्या लोकांना ज्ञान देणारा म्हणून त्याला गुरु किंवा आचार्य मानले पाहिजे. ऋषी यशयाने येणाऱ्याबद्दल भविष्यवाणी केली होती. इ.स.पू. 700मध्ये त्याने इब्री वेदांमध्ये असे भाकीत केले होते की :
र्वी लोकांनी जबुलून व नफताली या प्रांताना महत्व दिले नाही पण पुढील काळात देव त्या भूमीला श्रेष्ठ बनवील समुद्राजवळील भूमी, यार्देन नदीच्या पलीकडचा प्रदेश व यहुदी सोडून दुसरे जे लोक राहतात तो गालील प्रदेश म्हणजे ही भूमी होय.
दिसेल.यशया 9:1b-2
2 आता तेथील लोक अधोलोका सारख्या अंधकारात दिवस कंठीत आहेत पण ते तेजस्वी प्रकाश पाहतील. पाताळासारख्या अंधकारमय प्रदेशात सध्या ते लोक राहत आहेत पण त्यांना “तेजस्वी प्रकाश”
‘प्रकाश’ काय होता जो अंधकारात असलेल्या गालीलातील लोकांना प्राप्त होणार होता? यशयाने पुढे म्हटले:
6 असामान्य बालकाच्या जन्माच्यावेळी ह्या गोष्टी घडतील. देव आम्हाला पुत्र देईल. हा पुत्र लोकांच्या नेतृत्वाची जबाबदारी घेईल. त्याचे नाव असेल “अदभुत सल्लागार, सामर्थ्यशाली देव, चिरंजीव पिता, शांतीचा राजपुत्र.”
यशया 9:6
यशयाने आधीच भाकीत केले होते की येणारा कुमारिकेद्वारे जन्म घेईल. त्याने पुढे हे स्पष्ट केले की त्याला ‘समर्थ देव’ म्हटले जाईल, आणि तो अद्भुत मंत्री व शांतीचा अधिपती होईल. गालील समुद्रतटावर शिकवीत असलेला शांतीचा हा गुरु त्याच्या शिकवणीमुळे महात्मा गांधीवरील त्याच्या प्रभावाद्वारे दूर भारतात सुद्धा अनुभवला जाणार होता.
महात्मा गांधी आणि येशूचे डोंगरावरील प्रवचन
येशूच्या जन्माच्या 1900 वर्षानंतर, इंग्लंडमध्ये भारतातून आलेल्या कायद्याचा अभ्यास करणाऱ्या एका तरुण विद्याथ्र्यास ज्याला आता महात्मा गांधी (किंवा मोहनदास करमचंद गांधी) म्हटले जात असे एक बायबल देण्यात आले. जेव्हा त्यांनी डोंगरावरील प्रवचन म्हणून ओळखली जाणारी येशूची शिकवण वाचली त्याविषयी ते म्हणतात :
“…डोंगरावरील प्रवचन सरळ माझ्या अंतःकरणात गेले.”
एम. के. गांधी, एक आत्मकथा किंवा सत्याच्या माझ्या प्रयोगाची
गाथा. 1927 पृ.63
‘दुसरा गाल पुढे करण्याच्या’ येशूच्या शिकवणीने अहिंसेच्या (दुखापत न करणे आणि खून न करणे) जुन्या कल्पनेसंबंधी येशूला अंतर्दृष्टी दिली. हा विचार एका सुविख्यात वाक्यप्रचारात व्यक्त होतो ‘अहिंसा परमो धर्म’ (अहिंसा हा सर्वोच्च नैतिक सद्गुण आहे). गांधींनी नंतर या शिकवणीचा उपयोग सत्यद्ग्रह अथवा सत्याग्रहाच्या राजनैतिक बळात केला. ब्रिटिश राज्यकर्त्यांसोबत त्यांचा हा अहिंसक असहकार्याचा उपयोग होता. अनेक दशकांच्या सत्याग्रहाचा परिणाम म्हणून भारतास ग्रेट ब्रिटेनपासून स्वातंत्र्य मिळाले. गांधींच्या सत्याग्रहाने भारतास फार शांतीपूर्वक ब्रिटेनपासून स्वातंत्र्य मिळविण्यात मदत केली. येशूच्या शिकवणीचा या सर्व गोष्टींवर पगडा पडला.
येशूचे डोंगरावरील प्रवचन
तर येशूच्या डोंगरावरील प्रवचनाचा हेतू काय होता ज्याने महात्मा गांधींस इतके प्रभावित केले? हे येशूचे शुभवर्तमानातील सर्वात लांबलचक प्रवचन आहे. येशूचे डोंगरावरील संपूर्ण प्रवचन येथे आहे तर खाली आपण काही महत्त्वाच्या गोष्टी रेखांकित करू.
21 “तुम्ही ऐकले असले की, फार पूर्वी आपल्या लोकांना असे सांगण्यात आले होते की, ‘खून करू नका व जो कोणी खून करतो तो न्यायदंडास पात्र ठरेल.’
व्हा.मत्तय 5:21-48
22 पण मी तुम्हांस सागतो की, जर एखादा आपल्या भावावर रागावला असेल तर तो न्यायदंडास पात्र ठरेल. पुन्हा जो आपल्या भावाला, अरे वेड्या, असे म्हणेल तो न्यायसभेच्या दंडास पात्र ठरेल. आणि जो त्याला मूर्ख म्हणेल तो नरकातील अग्नीच्या शिक्षेस पात्र ठरेल.
23 “म्हणून तू आपले दान अर्पण करण्यासाठी वेदीजवळ आणले असता जर तुझ्या भावाच्या मनात तुझ्याविरुद्ध काही आहे असे तुला तेथे आठवले,
24 तर देवाला देण्यासाठी आणलेले दान तेथेच वेदीपुढे ठेव. प्रथम जाऊन आपल्या भावाबरोबर समेट कर आणि नंतर येऊन आपले दान दे.
25 वाटेत तुझा वादी तुझ्याबरोबर आहे तोच त्याच्याशी लगेच सलोखा कर नाहीतर कदाचित वादी तुला न्यायाधीशाकडे नेईल व न्यायाधीश अधिकाऱ्याकडे नेईल आणि अधिकारी तुला तरुंगात टाकील.
26 मी तुला खरे सांगतो तू शेवटचा पैसा देईपर्यंत तुझी सुटका मुळीच होणार नाही.
27 “व्यभिचार करू नको’असे पूर्वी सांगितल्याचे तुम्ही ऐकले आहे,
28 परंतु मी तुम्हांस सांगतो की, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे वाकड्या नजरेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे.
29 जर तुझा उजवा डोळा तुला पाप करायला प्रवृत्त करतो तर तो काढून टाक व फेकून दे, संपूर्ण शरीर नरकात जाण्यापेक्षा शरीराचा एखादा अवयव गमावलेला बरा.
30 जर तुझा उजवा हात तुला पापास प्रवृत्त करतो, तर तो तोडून फेकून दे, कारण संपूर्ण शरीर नरकात जाण्यापेक्षा शरीराचा एक अवयव गमावलेला बरा.
31 “‘जर एखादा मनुष्य आपल्या पत्नीला घटस्फोट देतो तर त्याने तिला घटस्फोटाची लेखी सूचना द्यावी.’असे सांगितल्याचे तुम्ही जाणता.
32 पण मी तुम्हांला सांगतो की, जो कोणी आपल्या पत्नीला व्यभिचाराच्या कारणाशिवाय इतर कारणामुळे टाकून देतो, तो तिला व्यभिचार करण्यास प्रवृत्त करतो आणि जो कोणी अशा घटस्फोटीत स्त्रीशी विवाह करतो तो व्यभिचार करतो.शपथ घेण्याविषयी येशूची शिकवन
33 “जेव्हा तू शपथ घेतोस तेव्हा ती तोडू नको. जी शपथ देवाला वाहिली आहे ती खरी कर,असे सांगितल्याचे तुम्ही ऐकले आहे.
34 परंतु मी तुम्हाला सांगतो की, शपथ वाहूच नका, आकाशाची शपथ वाहू नका कारण ते देवाचे आसन आहे.
35 पृथ्वीचीही शपथ वाहू नका कारण ती त्याच्या पायाचे आसन आहे; आणि यरूशलेमाचीही शपथ वाहू नका, कारण त्या नगरीचा राजा देव आहे.
36 आपल्या मस्तकाचीही शपथ वाहू नका, कारण त्याचा एखादा केसही पांढरा किंवा काळा होणे तुमच्या हाती नाही.
37 म्हणून तुमचे बोलणे ‘होय’ तर होय किंवा ‘नाही’ एवढेच असावे. त्यापेक्षा जास्त जर असेल तर ते सैतानापासून आहे.
38 “तुम्ही ऐकले आहे की असे सांगितले होते, ‘डोळ्याबद्दल डोळा आणि दाताबद्दल दात.’
39 पण मी तुम्हांला सांगतो, जो दुष्ट आहे त्याला अडवू नका, जर कोणी तुमच्या उजव्या गालावर तुम्हांला मारील त्याच्यासमोर दुसराही गाल पुढे करा.
40 आणि जो कोणी फिर्याद करून तुमचा अंगरखा घेऊ पाहतो त्याला तुमचा झगाही द्या.
41 जर कोणी तुम्हांला सक्तीने त्याच्याबरोबर कांही अंतर घेऊन जाऊ इच्छितो तर त्याच्याबरोबर त्याच्या दुप्पट अंतर जा.
42 जो तुमच्याजवळ मागतो त्याला द्या आणि जो तुमच्याकडून उसने घेऊ इच्छितो त्याला नकार देऊ नका.
43 “असे सांगिलते होते की, ‘आपल्या शोजाऱ्यावर प्रेम करा अणि आपल्या शत्रूचा द्वेष करा,असे तुम्ही ऐकले आहे.
44 पण मी तुम्हांला सांगतो, तुमच्या शत्रूवर प्रेम करा. तुमचे जे वाईट करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.
45 जर तुम्ही असे कराल, तर तुम्ही तुमच्या स्वर्गातील पित्याचे खरे पुत्र व्हाल. तुमचा पिता चांगल्यावर आणि वाईटावर अशा दोघांवरही सूर्य उगवितो. चांगल्यावरही आणि वाईटावरही पाऊस पाडतो.
46 कारण जे तुमच्यावर प्रीति करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीति करीत असाल तर तुम्हांला प्रतिफळ मिळणार नाही. जकातदारही असेच करतात.
47 आणि जर तुम्ही तुमच्या मित्रांशी चांगले वागत असाल तर तुम्ही इतरांपेक्षा फार चांगले आहात असे समजू नका. देवाला न मानणारे लोकही असेच करतात.
48 म्हणून जसा तुमचा स्वर्गातील पिता परिपूर्ण आहे तसे तुम्हीही परिपूर्ण
येशूने या स्वरूपाचा उपयोग करून शिकविले :
“असे प्राचीन लोकांना सांगितले होते…मी तर तुम्हास सांगतो…”.
या वाक्यात तो प्रथम मोशेच्या नियमशास्त्रातून उद्धरण घेतो, नंतर आपल्या आज्ञेचा व्याप हेतू, विचार आणि शब्दांप्रत नेतो. मोशेद्वारे देण्यात आलेल्या कठोर आज्ञा घेऊन येशूने शिकविले आणि त्यांचे पालन करावयास त्यास आणखी कठीण केले!
येशूच्या डोंगरावरील प्रवचनाचा नम्र अधिकार
अद्भुत हे आहे ज्याप्रकारे त्याने नियमशास्त्रातील आज्ञांचा विस्तार केला, त्याने आपल्या स्वतःच्या अधिकाराच्या आधारे असे केले. वाद न घालता व धमकी न देता तो फक्त म्हणाला, ‘मी तर तुम्हास सांगतो…’ आणि त्यासोबतच त्याने या आज्ञेचा विस्तार केला. त्याने असे नम्रपणे पण अधिकाराने केले. त्याच्या शिकवण्याची ही अद्वितीय शैली होती. शुभवर्तमानात सांगितल्याप्रमाणे जेव्हा त्याने हे प्रवचन संपविले.
27 मग जोराचा पाऊस आला आणि पूर आला. जोराचा वारा सुटला. वादळवाऱ्यात ते घर सापडले आणि कोसळून पडले.”
होता.मत्तय 7:27-29
28 जेव्हा ह्या बोधकथा सांगण्याचे येशूने संपविले तेव्हा लोकांचा समुदाय त्याच्या शिकवण्याने थक्क झाला.
29 कारण येशू त्यांना त्यांच्या धर्मशिक्षकांप्रमाणे नव्हे, तर अधिकारवाणीने शिकवीत
येशूने गुरू म्हणून अधिकारवाणीने शिकविले, अनेक संदेष्टे संदेशवाहक होते जे देवाचा संदेश देत पण येथे सगळे काही वेगळे होते. येशू असे का करू शकला? ‘ख्रिस्त’ म्हणून किंवा ‘मसीहा’ म्हणून त्याला मोठा अधिकार होता. हिब्रू वेदातील स्तोत्र 2, जेथे ‘ख्रिस्त’ ही पदवी सर्वप्रथम घोषित करण्यात आली त्यात ख्रिस्ताशी परमेश्वर अशाप्रकारे बोलत असल्याचे वर्णन करण्यात आले आहे :
8 जर तू विचारले तर मी तुला राष्ट्रे देईन या पृथ्वीवरची सगळी माणसे तुझी
होतील.स्तोत्र 2:8
ख्रिस्ताला जगाच्या शेवटापर्यंत ‘राष्ट्रांवर’ अधिकार देण्यात आला होता. म्हणूनच ख्रिस्त या नात्याने, येशूला कशाप्रकारे शिकवण्याचा अधिकार होता जसा तो शिकवत असे, आणि त्याची शिकवण प्रत्येकापर्यंत पोहोचवावी याचा.
खरे म्हणजे, मोशेने देखील अशा एका येणाऱ्या संदेष्ट्याविषयी लिहिले होते (ई. स. पू. 1500) जो त्याच्या शिकवणीत अद्वितीय असणार होता. मोशेसोबत बोलताना, परमेश्वराने अभिवचन दिले
18 मी यांच्यामधूनच तुझ्यासारखा एक संदेष्टा उभा करीन. माझी वचने त्याच्या मुखाने ऐकवीन. माझ्या आज्ञेप्रमाणे तो लोकांशी बोलेल.
अनुवाद 18:18-19
19 हा संदेष्टा माझ्या वतीने बोलेल. तेव्हा जो कोणी ते ऐकणार नाही त्याला मी शासन करीन.’
त्याच्या शिकवणीत जसे त्याने शिकविले, त्याप्रमाणे ख्रिस्त या नात्याने येशू आपला अधिकार गाजवत होता आणि आपल्या मुखात देवाचे वचन राखून येणाऱ्या संदेष्टयाविषयी मोशेची भविष्यवाणी पूर्ण करीत होता. शांती आणि अहिंसेची शिकवण देत असताना त्याने प्रकाशाच्या मदतीने अंधकाराला दूर करण्याविषयी वर दिलेली यशयाची भविष्यवाणी देखील पूर्ण केली. त्याने असे शिकविले जणू काही त्याला, केवळ गांधींचा गुरु होण्याचाच नव्हे, तर तुमचा व माझा गुरु होण्याचादेखील हक्क आहे.
तुम्ही आणि मी आणि डोंगरावरील प्रवचन
आपण त्याचे अनुसरण कसे करावे हे पाहण्यासाठी आपण हे डोंगरावरील प्रवचन वाचले तर आपण कदाचित गोंधळात पडाल. आपली अंतःकरणे आणि आपला हेतू उघडकीस आणणाऱ्या अशा प्रकारच्या या आज्ञा कोणीही कसे जगू शकेल? या प्रवचनाबाबत येशूचा हेतू काय होता? आपण त्याच्या शेवटच्या वाक्यातून पाहू शकतो.
48 म्हणून जसा तुमचा स्वर्गातील पिता परिपूर्ण आहे तसे तुम्हीही परिपूर्ण
व्हा.मत्तय 5:48
ही आज्ञा आहे, सूचना नाही. त्याची मागणी अशी आहे की आपण परिपूर्ण असावे!
का?
येशू डोंगरावरील प्रवचन कसे सुरू करतो त्यातच तो याविषयी उत्तर देतो. तो त्याच्या शिकवणीच्या शेवटच्या ध्येयाचा संदर्भ देऊन सुरुवात करतो.
3 “जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे
आहे.मत्तय 5:3
डोंगरावरील प्रवचन म्हणजे ‘स्वर्गाच्या राज्याची’ अंतर्दृष्टी देण्यासाठी होय. स्वर्गाचे राज्य हा हिब्रू वेदांमधील एक महत्वाचा विषय आहे, जसे संस्कृत वेदांमध्ये आहे. येशू आपल्या आरोग्यदानाच्या चमत्कारांद्वारे त्या राज्याचे स्वरूप कसे प्रगट करतो हे पाहत असतांना, आपण स्वर्गाच्या राज्याच्या किंवा वैकुंठलोकाच्या स्वरूपाची तपासणी करतो.