दिवस 3: येशू वाळविणारा शाप बोलतो

  • by

दुर्वास शकुंतलाला शाप देतो

आम्ही संपूर्ण पौराणिक कथांमध्ये शापाबद्दल (श्राप) वाचतो आणि ऐकतो. कदाचित सर्वात प्रसिद्ध प्राचीन नाटककार कालिदास (400 इ.स.) याच्या अभिज्ञानसकुंतलम (शकुंतलाची ओळख) या नाटकातून येतो जे अद्याप नियमितपणे सादर केले जाते. त्यात राजा दुष्यंत रानात शकुंतला नावाच्या एका सुंदर स्त्रीच्या प्रेमात पडतो. दुष्यंत त्वरित तिच्याशी लग्न करतो पण त्याला कामानिमित्ताने लवकरच राजधानीत परत जायचे असते आणि तो तिला आपली अंगठी देऊन तिला सोडून जातो. प्रेमात पडलेली शकुंतला तिच्या नवीन नवऱ्याबद्दल दिवास्वप्न पाहत असते.

ती दिवास्वप्नात मग्न असतांना एक शक्तिशाली ऋषी, दुर्वास तिच्या जवळून गेला आणि तिचे लक्ष नसल्याने आणि त्याचे योग्य अभिवादन न केल्यामुळे, तो तिच्यावर रागावला. म्हणून त्याने तिला शाप दिला की ती ज्याच्याबद्दल दिवास्वप्न पाहत होती तो तिला ओळखणार नाही. त्यानंतर त्याने तिचा शाप कमी केला जेणेकरून जर तिने त्या व्यक्तीने तिला दिलेली भेट परत केली तर त्याला तिची आठवण येईल. अशाप्रकारे या आशेवर शकुंतलाने अंगठी घालून राजधानीकडे कूच केली की राजा दुष्यंत तिला ओळखेल. पण प्रवासात तिने ती अंगठी हारवली म्हणून राजाने ती आल्यावर तिला ओळखले नाही.

भृगु विष्णूला शाप देतो

मत्स्य पुराण देव-असुर यांच्यात सुरू असलेल्या चिरकालीन युद्धाविषयी सांगतात, ज्यात देव सदैव विजयी होतात. अपमानित होऊन, असुरांचा गुरु शुक्राचार्य असुरांना अजिंक्य करण्यासाठी मृतसंजीवनी स्तोत्र किंवा मंत्र मागण्यासाठी शिवकडे गेले, आणि म्हणून त्याच्या असुरांनी त्याच्या वडिलांच्या (भृगु) आश्रमात आश्रय घेतला. पण शुक्राचार्य गेल्यावर देवांनी पुन्हा असुरांवर हल्ला केला. तथापि, असुरांनी भृगुच्या पत्नीची मदत मिळविली, जिने इंद्रला गतिहीन केले. त्यानंतर इंद्राने भगवान विष्णूला तिच्यापासून मुक्त करण्याची विनंती केली. विष्णूने त्याच्या सुदर्शन चक्राने तिचे डोके कापून टाकले. भृगु ऋषीने आपल्या पत्नीचे काय झाले ते पाहिले, तेव्हा त्याने विष्णुला शाप दिला की तो ऐहिक जीवनातील वेदना सहन करीत पृथ्वीवर वारंवार जन्म घेईल. म्हणून, विष्णूला अनेक वेळा अवतार घ्यावा लागला.

भृगु विष्णूला शाप देण्यासाठी येतो

कथांमध्ये शाप भितीदायक असतात, परंतु तसे खरोखर घडले की नाही असा प्रश्न उपस्थित करतात. दुर्वासाचा शकुंतला दिलेला शाप किंवा भृगुचा विष्णूला दिलेला शाप जर खरोखरच घडले आहेत असे जर आपल्याला माहित झाले तर ते खरोखर गंभीर ठरेल.

पवित्र सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी येशूने असा शाप व्यक्त केला. प्रथम आम्ही आठवड्याचे पुनरावलोकन करतो.

येशूचा वाढता संघर्ष

रविवारी करण्यात आलेल्या भविष्यवाणीनुसार येशू यरूशलेमात दाखल झाला आणि त्यानंतर त्याने सोमवारी मंदिर बंद केले, तेव्हा यहूदी नेत्यांनी त्याला जिवे मारण्याची योजना आखली. पण ते इतके सरळ होणार नाही.

जेव्हा येशूने निसान 10 रोजी मंदिरात प्रवेश केला तेव्हा देवाने येशूला वल्हांडणाचे कोकरू म्हणून निवडले होते. निवडलेल्या वल्हांडणाच्या कोंकराचे काय करावे याविषयी इब्री वेदांत नियम घालून देण्यात आले होते.

हा नर मेंढरांतला किंवा शेरडांतला, तुम्हांला वाटेल तो घ्यावा; 6 ह्या महिन्याच्या चौदाव्या दिवसापर्यंत तो राखून ठेवावा.

निर्गम 12:5ब-6अ 5

ज्याप्रमाणे लोक आपल्या वल्हांडणाच्या कोंकरयांची काळजी घेत त्याचप्रमाणे, देवाने आपल्या वल्हांडणाच्या कोंकराची काळजी घेतली आणि येशूचे शत्रू त्याला पकडू (अद्याप) शकले नाहीत. म्हणून शुभवर्तमानात येशूने पुढच्या दिवशी, मंगळवारी, त्या आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी काय केले याची नोंद आहे.

येशू अंजिराच्या झाडाला शाप देतो

नंतर तो त्यांना सोडून (सोमवार दिवस 2, निसान 10) नगराबाहेर बेथानीस गेला व तेथे वस्तीस राहिला. 18 मग सकाळी (मंगलवार निसान 11, दिवस3)  तो परत नगरास येत असता त्याला भूक लागली. 19 आणि वाटेवर अंजिराचे एक झाड होते ते पाहून तो त्याच्याजवळ गेला; पण पानांशिवाय त्याला त्यावर काही मिळाले नाही. मग त्याने त्याला म्हटले, “ह्यापुढे तुला कधीही फळ न येवो.” आणि ते अंजिराचे झाड ताबडतोब वाळून गेले.

मत्ती 21:17-19 17

येशूने अंजीराच्या झाडाला शाप दिला.

येशू अंजिराच्या झाडाला शाप देतो

होशे पुढे अंजिराच्या झाडाचा उपयोग करून चित्र मांडण्यासाठी आणि नंतर इस्त्राएलला शाप देण्यासाठी करतो:

त्याने हे का केले?

याचा अर्थ काय?

अंजीराच्या झाडाचा अर्थ

आधीचे संदेष्टे हे आम्हाला समजावून सांगतात. इब्री वेदांनी इस्राएलवरील न्यायाचे चित्र मांडण्यासाठी अंजीर वृक्षाचा कसा उपयोग केला ते येथे पहा:

होशेय पुढे अंजिराच्या झाडाचा उपयोग करून चित्र मांडण्यासाठी आणि नंतर इस्त्राएलला शाप देण्यासाठी करतो :

10 वाळवंटातील ताज्या द्राक्षांप्रमाणे त्यावेळी इस्राएल होता. तुमचे पूर्वज मोसमातील अंजिराच्या पहिल्या बहराप्रमाणे मला दिसले. पण मग ते बाल-पौरा कडे आले आणि ते बदलले. ते कुजल्यासारखे झाले ते ज्यांच्यावर प्रेम करीत त्या भयंकर गोष्टीसारखे (दैवतांसारखे)

झाले.होशेय 9:10

16 एफ्राईमला शिक्षा होईल. त्यांचे मूल मरत आहे. ते नि:संतान होतील. ते बालकांना कदाचित् जन्म देतील, पण त्यांच्या पोटी जन्मलेल्या अमूल्य बालकांना मी ठार मारीन.
17 ते लोक माझ्या परमेश्वराचे ऐकणार नाहीत. म्हणून तोही त्यांचे ऐकणार नाही. आणि ते बेघर होऊन राष्ट्रांतून भटकतील

.होशेय 9:16-17 (एफ्राईम = इस्त्राएल)

ख्रि. पू.  586 मध्ये यरूशलेमच्या विनाशाने याची आणि मोशेच्या शापांची परिपूर्णता झाली (इतिहास पहा). जेव्हा येशूने अंजिराच्या झाडाला शाप दिला, तेव्हा तो सांकेतिकरित्या यरूशलेमाच्या आणखी एका येत असलेल्या विनाशाची व यहूदी लोकांस देशातून घालवून देण्याची घोषणा करीत होता. त्याने त्यांना पुन्हा बंदिवासाचा शाप दिला.

अंजिराच्या झाडाला शाप दिल्यावर, येशूने पुन्हा मंदिरात प्रवेश केला व तेथे शिकवीत आणि वादविवाद करीत असे. शुभवर्तमानात अशा प्रकारे त्याची नोंद आहे.

शाप अधिकार जमवितो

आपणास इतिहासावरून कळून येते की यरूशलेम व तेथील मंदिराचा हा नाश आणि यहूद्यांची संपूर्ण जगात हद्दपारी सन 70 मध्ये झाली. यापैकी काही बंदिवासात गेलेले भारतात आले.

सन 70 मध्ये मंदिर नष्ट झाल्याने इस्राएलचा ऱ्हास  घडून आला आणि ते हजारो वर्षांसाठी वाळून गेले.

सन 70 मध्ये रोमद्वारे यरूशलेम मंदिराचा नाश. संरक्षित रोमन शिल्पांमध्ये त्यांना मंदिर लुटतांना आणि मेनोरा घेतांना (मोठे, 7-मेणबत्तींचा दिवा) दाखविले आहे

हा शाप केवळ शुभवर्तमानाच्या कथेच्या पृष्ठांवर नाही. तो इतिहासात घडला आहे हे आपण सत्यापित करू शकतो, त्याचा परिणाम भारताच्या इतिहासावर घडून आला आहे. येशूने उच्चारिलेला हा ऱ्हास घडवून आणणारा अर्थात वाळविणारा शाप खरोखरच शक्तिशाली होता. त्याच्या काळातील लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि स्वतःवर नाश ओढवून घेतला.

मंदिराच्या नाशाची चिन्हे आजही दिसून येतात 

शाप कालबाह्य होईल.

हा शाप कसा येईल आणि तो किती काळ टिकेल हे येशूने नंतर स्पष्ट केले.

ते (यहूदी) तलवारीच्या धारेने पडतील, त्यांना बंदिवान करून सर्व राष्ट्रांमध्ये नेतील, आणि परराष्ट्रीयांची सद्दी संपेल तोपर्यंत ‘परराष्ट्रीय यरुशलेमेस पायांखाली तुडवतील.

लूक 21:24

त्याने शिकविले की हा शाप फक्त (बंदिवास आणि यरूशलेमावर गैरयहूदी लोकांचे नियंत्रण) “परराष्ट्रीयांची सद्दी संपेल तोपर्यंत” चालेल, त्याने असे भाकित केले की त्याचा शाप संपुष्टात येईल. याचा खुलासा त्याने पुढे 4थ्या दिवशी केला.

शाप दूर झाला

मोठ्या प्रमाणावर यहूद्यांची ऐतिहासिक समयरेखा – त्यांच्या दोन कालावधीचा बंदिवास दर्शविते

ही समयरेखा येथे तपशीलांसह यहूदी लोकांचा इतिहास दर्शविते. आमच्या आधुनिक काळात, ही समयरेखा दर्शविते की बंदिवास संपला आहे. 1948 मध्ये, संयुक्त राष्ट्राच्या घोषणेवरून, इस्राएलच्या आधुनिक राज्याची स्थापना झाली. 1967 च्या सहा दिवसांच्या युद्धामध्ये त्यांनी आताची इस्राएलची राजधानी असलेले यरूशलेम शहर पुन्हा मिळविले. आपण बातम्यांच्या अहवालांवरून ‘परराष्ट्रीयांची सद्दी’ संपत असलेली पाहतो.

यहूदी आता मंदिराच्या ठिकाणी पुन्हा प्रार्थना करतात

येशूच्या शापाची सुरूवात आणि समाप्ती, ज्याचे उच्चारण येशूने अंजिराच्या झाडाला प्रतिकात्मकरित्या केले आणि नंतर त्याच्या श्रोत्यांना समजावून सांगितले, ते केवळ शुभवर्तमानाच्या पानांवर राहिले नाही. या घटना पडताळण्याजोग्या आहेत आणि आज बातम्यांचे ठळक मुद्दे बनवित आहेत (उदा. यूएसएने आपले दूतावास यरूशलेम येथे हलविले आहे). येशूने निसर्गावर प्रगल्भपणे शिक्षण दिले, निसर्गावर ‘ओम’चे उच्चारण केले, आणि आता आपण पाहतो की त्याचा शाप हजारो वर्षांपासून राष्ट्रांवर त्याचा प्रभाव पाडत आहे . आम्ही आमच्या संकटात त्याकडे दुर्लक्ष करतो.

दिवसाचा सारांश 3

अद्ययावत तालिकेमध्ये, 3 ऱ्या दिवशी मंगळवारी, अंजिराच्या झाडाला शाप देताना येशूला दाखविले आहे सोबतचही काळजी घेतली आहे की देवाच्या निवडलेल्या कोकऱ्याच्या रूपाने त्याने असे केले. 4 थ्या दिवशी तो त्याच्या परत येण्याचे वर्णन करतो. कल्किन जो अनेक चुका सुधारण्यासाठी येत आहे.

दिवस 3 : येशूने अंजीर वृक्षाला शाप दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *