सैतानाने येशूची परीक्षा केली – जुनाट असूर सैतान

  • by

हिंदू पौराणिक कथांत त्या समयांचे वर्णन आहे जेव्हा कृष्ण शत्रू असुरांशी लढला आणि त्यांस पराभूत केले, विशेषेकरून असुर राक्षस ज्यांनी कृष्णाला सर्पाच्या रूपात धमकावले होते. भगवद्पुराणात (श्रीमद्भागवत) एक गोष्ट सांगण्यात आली आहे ज्यात कामसूचा मित्र अघासुर जो कृष्णाच्या जन्मापासूनच कृष्णाला जिवे मारण्याचा प्रयत्न करीत होता, त्याने इतक्या मोठ्या सर्पाचे रूप धारण केले होते की त्याने तोंड उघडले तेव्हा ते एका गुहेसारखे होते. अघासुर हा पुतना (जिचे विष कृष्णाने बाळ असतांना प्राशन करून तिला ठार मारले होते) आणि बकासुर (ज्याची चोच तोडून कृष्णाने त्याला ठार मारले होते) यांचा भाऊ होता आणि म्हणून तो सूड घेऊ पाहत होता. अघासुराने तोंड उघडले आणि गोपी गुराखी मुले जंगलातील एक गुहा समजून त्यात गेली. कृष्णासुद्धा आत गेला, पण अघासुर आहे हे समजून त्याने आपले शरीर इतके फुगवले की अघासुर गुदमरून मेला. दुसऱ्या प्रसंगी, श्री कृष्णा  या लोकप्रिय कार्यक्रमात दाखविल्याप्रमाणे, कृष्णाने शक्तिशाली असुर सर्प कालियानागाचा नदीत त्याच्याशी लढा देत असतांना त्याच्या डोक्यावर नृत्य करुन पराभव केला.

पौराणिक कथेत वृत्राचे, असुरांचा पुढारी व सामर्थ्यवान सर्प/अजगर याचे सुद्धा वर्णन आले आहे. श्रग्वेदात स्पष्ट केलेले आहे की इन्द्र देवास एका मोठ्या लढ्यात वृत्र राक्षसाला तोंड द्यावे लागले आणि त्याने मेघगर्जनेने (वज्रायुध) त्याला ठार केले ज्याने वृत्राचा जबडा फोडला. भगवद्पुराणातील आवृत्ती स्पष्ट करते की वृत्र इतका मोठा साप/अजगर होता की त्याने सर्व काही व्यापून टाकले होते, अगदी ग्रह आणि तारे यांना धोक्यात आणले होते, ज्यामुळे प्रत्येकजण त्याला घाबरत असे. देवांसोबत झालेल्या युद्धात वृत्र वर्चस्वी ठरला.इन्द्र त्याला बळाने पराभूत करू शकला नाही, परंतु त्याला दधीचि  ऋषीची हाडे मागण्याचा सल्ला देण्यात आला. दधीचिने वज्रयुद्ध बनविण्यासाठी आपली हाडे देऊ केली ज्यामुळे इंद्राने शेवटी त्या मोठ्या सर्पास वृत्रास  पराभूत करून मारून टाकले.

हिब्रू वेदातील सैतान : सुंदर आत्मा घातक सर्प बनला

हिब्रू वेदांमध्ये अशीही नोंद आहे की एक सामर्थ्यवान आत्मा आहे ज्याने स्वतःला परात्पर परमेश्वराचा शत्रू (सैतान म्हणजे शत्रू) म्हणून उभे केले आहे. हिब्रू वेदांनी त्याचे वर्णन सुंदर आणि बुद्धिमान म्हणून केले आहे, ज्याला आरंभी देव म्हणून निर्माण करण्यात आले होते. हे वर्णन दिले गेले आहे :

12 “मानवपुत्रा, सोरच्या राजाविषयीचे पुढील शोकगीत गा. त्याला सांग ‘परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो“‘तू एक आदर्श माणूस होतास. तू ज्ञानी होतास. तू अतिशय देखणा होतास.
13 तू एदेनमध्ये राहात होतास. एदेन हा देवाचा बाग आहे. तुझ्याजवळ माणके, पुष्कराज, हिरे, लसणा, गोमेद, सूर्यंकांत मणी, नीलमणी, वैदूर्य पाच अशी सर्व प्रकारची मोल्यवान रत्ने होती, आणि ती सर्व सोन्याच्या कोंदणात बसविलेली होती. ज्या दिवशी तुला निर्माण केले त्याच दिवशी तुला हे सौदंर्य देण्यात आले. देवाने तुला सामर्थ्यशाली केले.
14 तू एक अभिषिक्त करुब होतास तुझे पंख माझ्या सिंहासनावर पसरत. मी तुला देवाच्या पवित्र पर्वतावर ठेवी. तू रत्नांतून हिंडत होतास आणि अग्नीप्रमाणे तळपत होतास.
15 मी तुला निर्मिले, तेव्हा तू सज्जन व प्रामाणिक होतास. पण नंतर तू दुष्ट झा

लास.यहेज्केल 28:12ब-15.

या शक्तिशाली देवामध्ये दुष्टता का आढळली? हिब्रू वेद स्पष्ट करतात :

17 तुझ्या सौंदर्यांने तुला गर्विष्ठ बनविले. तुझ्या वैभवाने तुझ्या ज्ञानाचा नाश केला. म्हणून मी तुला खाली जमिनीवर लोटले. आता इतर राजे तुझ्याकडे डोळे विस्फारुन

पाहतात.यहेज्केल 28:17

या देवाचे पतन पुढे वर्णन करण्यात आले आहे :

12 तू प्रभात ताऱ्याप्रमाणे होतास, पण आता तू आकाशातून खाली पडला आहेस. पूर्वी सर्व राष्ट्रे तुझ्यापुढे नेहमीच वाकत होती, पण आता तू संपला आहेस.
13 तू नेहमीच स्वत:ला सांगायचास, “मी परात्पर देवासारखा होईन. मी आकाशात उंच जाईन. देवाच्या तांरागणाच्यावर उच्चस्थानी मी माझे सिंहासन स्थापन करीन. मी पवित्र साफोन डोंगरवरच्या देवसभेत बसून देवांना भेटीन.
14 मी मेघांवर आरोहण करून वेदीवर जाईन. मी परात्पर देवासारखा होईन.”

यशया 14:12-14

सैतान आता

या सामर्थ्यवान आत्म्याला आता सैतान (म्हणजे दोष लावणारा) किंवा डेविल  म्हटले जाते परंतु पूर्वी त्याला लूसिफर म्हटलेले होते – ‘प्रभातपुत्र’. हिब्रू वेद म्हणतात की तो आत्मा, दुष्ट असुर आहे, परंतु अघासुर आणि वृत्राप्रमाणे सर्पाचे किंवा अजगराचे रूप धारणारा म्हणून त्याचे वर्णन आहे. अशाप्रकारे त्याला पृथ्वीवर टाकण्यात आले :

7 मग स्वर्गात एक युद्ध झाले. मीखाएलआणि त्याचे दूत त्या प्रचंड सापाविरुद्ध लढले. साप व त्याचे दूत हे सुद्धात्यांच्याशी लढले.
8 पण साप तितका बलवान नव्हता. प्रचंड साप व त्याच्या दूतांना स्वर्गातील त्यांचे स्थान गमवावेलागले.
9 सापला आकाशातून खाली फेकण्यात आले. तो प्रचंड साप, सैतान म्हटलेला तोच तो जुनाट साप होय. तो संपूर्णजगाला चकवतो. त्या सापाला त्याच्या दूतांसह पृथ्वीवर टाकण्यात

आले.प्रकटीकरण 12:7-9

सैतान आता मुख्य असूर आहे जो ‘संपूर्ण जगास बहकवितो’. खरे म्हणजे, त्यानेच, सैतानाच्या रूपात, प्रथम मानवांस पापात पाडले. याद्वारे सत्य युगाचा, सुखलोकातील सत्याच्या युगाचा अंत झाला. 

सैतानाने आपली मूळ बुद्धिमत्ता आणि सौंदर्य गमावले नाही, ज्यामुळे तो अधिकच घातक ठरतो कारण तो आपल्या देखाव्यामागे आपली फसवणूक अधिक लपवू शकतो. बायबलमध्ये तो कसा कार्य करतो याचे वर्णन करण्यात आले आहे :

14 आणि यात आश्चर्य नाही, कारण सैतानदेखील प्रकाशाच्या दूताचे रुप धारण करतो.

2 करिंथ 11:14

येशू सैतानाशी युद्ध करतो

या शत्रूलाच येशूला तोंड द्यावे लागले. योहानाद्वारे बाप्तिस्मा घेतल्यानंतर लगेच तो रानात गेला, त्याने वानप्रस्थश्रमाचा स्वीकार केला.  नाश करून तो जंगलात मागे हटला. पण असे त्याने निवृत्तीची सुरुवात करण्यासाठी नव्हे, तर लढाईत शत्रूला तोंड देण्यासाठी केले. ही लढाई कृष्ण आणि अघासुरात किंवा इंद्र आणि वृत्र यांच्यात वर्णन केलेली शारीरिक लढाई नव्हती, तर ही परीक्षेची लढाई होती. शुभवर्तमानात असे लिहिले आहे :

शू पवित्र आत्म्याने पूर्ण भरुन यार्देन नदीहून परतला. मग आत्म्याने त्याला अरण्यात नेले.
2 तेथे सैतानाने त्याला चाळीस दिवस मोहात टाकले. त्या दिवसांत येशूने काहीही खाल्ले नाही. जेव्हा ती वेळ संपली, तेव्हा येशूला भूक लागली.
3 सैतान त्याला म्हणाला, “जर तू देवाचा पुत्र आहेस, तर या दगडांची भाकर करुन दाखव.”
4 येशून त्याला उत्तर दिले, “असे लिहिले आहे:“मनुष्य फक्त भाकरीनेच जगेल असे नाही.”‘ अनुवाद 8:3
5 मग सैतान त्याला वर घेऊन गेला. आणि एका क्षणात जगातील सर्व राज्ये त्याला दाखविली.
6 सैतान त्याला म्हणाला, “मी तुला या सर्व राज्याचे अधिकार व गौरव देईन कारण ते मला दिलेले आहे. आणि मी माझ्या मर्जीनुसार ते देऊ शकतो.
7 जर तू माझी उपसना करशील, तर हे सर्व तुझे होईल.”
8 येशूने उत्तर दिले, पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे:“तू प्रभु तुझा देव याचीच उपासना केली पाहिजे, आणि फक्त त्याचीच सेवा केली पाहिजे.”‘ अनुवाद 6:13
9 नंतर त्याने त्याला यरुशलेमाला नेले. आणि मंदिराच्या उंच टोकावर त्याला उभे केले. आणि तो म्हणाला, “जर तू देवाचा पुत्र आहेस तर येथून खाली उडी मार!
10 असे लिहिले आहे:“तो मुझे संरक्षण करण्याची देवादूतांना आज्ञा करील.’ स्तोत्र. 91;11आणि असेही लिहीले आहे:
11 “ते तुला आपल्या हातावर उचलून धरतील, त्यामुळे तुझा पाय दगडावर आपटणार नाही.”‘ स्तोत्र. 91:12
12 येशून उत्तर दिले. “पवित्र शास्त्रत असेही म्हटले आहे,“तु प्रभु, तुझा देव याची परीक्षा पाहू नकोस.”‘ अनुवाद 6:16
13 म्हणून सैतानाने प्रत्येक प्रकारे भुरळ घालण्याचे संपविल्यावर, योग्य वेळ येईपर्यंत तो येशूला सोडून गेला

.लूक 4:1-13

त्यांचा संघर्ष मानवी इतिहासाच्या सुरूवातीसच आरंभ झाला होता. येशूच्या जन्माच्या वेळी बाळाची हत्या करण्याच्या प्रयत्नातून त्याचे नवीनीकरण करण्यात आले. या युद्धाच्या फेरीत येशू विजयी झाला, त्याने सैतानाला शारीरिकरित्या पराभूत केले म्हणून नव्हे तर सैतानाने त्याच्यासमोर ठेवलेल्या सर्व परीक्षांचा त्याने प्रतिकार केला म्हणून. या दोघांमधील लढाई पुढच्या काही महिन्यांत सुरू राहणार होती, ज्याचा शेवट सर्प ‘त्याच्या टाचेस दंश करणार होता’ आणि येशू ‘त्याचे डोके ठेचणार होता’. पण त्याआधी, येशू अंधःकाराचे निवारण करण्यासाठी, शिकवण्यासाठी गुरुची भूमिका, धारण करणार होता.

येशूजो आम्हास समजतो

येशूचा मोहाचा व परीक्षेचा काळ आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. बायबल येशूविषयी सांगते की:

18 कारण ज्याअर्थी त्याला स्वत:ला परीक्षेला व दु:खसहनाला तोंड द्यावे लागले, त्याअर्थी ज्यांना आता परीक्षेला तोंड द्यावे लागत आहे त्यांना मदत करण्यास तो समर्थ

आहे.इब्री 2:18

आणि

15 कारण आपल्याला लाभलेला माहन याजक असा नाही, जो आपल्या अशक्तपणाबद्दल सहानुभूति दर्शविण्यास असमर्थ आहे. पण आपल्याला असा याजक लाभला आहे की, जो आमच्यासारखाच सर्व प्रकारच्या मोहाच्या अनुभवातून गेला. तरीही तो पूर्णपणे निष्पाप राहिला.
16 म्हणून आपण त्याच्या कृपेच्या सिंहासनाजवळ ठाम निर्धाराने जाऊ या. यासाठी की, आमच्या गरजेच्या वेळी साहाय्य मिळावे म्हणून आम्हाला दया व कृपा प्राप्त व्हावी.

इब्री 4:15-16

इब्री दुर्गा पूजा, योम किप्पुरच्या वेळी, मुख्य याजक अथवा पुरोहित बलिदान आणत असे यासाठी की इस्राएली लोकांना क्षमा मिळावी. आता येशू एक याजक बनला आहे जो आपल्याबद्दल सहानुभूती दर्शवू शकतो आणि आम्हास समजून घेऊ शकतो – आमच्या परीक्षांमध्ये तो आमची मदत करतो, अगदी तशीच कारण त्याची सुद्धा परीक्षा झाली – तरीही त्याने पाप केले नाही. आपण परात्पर देवासमोर आत्मविश्वास बाळगू शकतो कारण मुख्य याजक येशूने आपल्या सर्वात कठीण परीक्षांना तोंड दिले. तो असा आहे जो आपल्याला समजतो आणि आमच्या स्वतःच्या परीक्षांत आणि पापांत आमची मदत करू शकतो. प्रश्न असा आहे: आपण त्याला करू देणार काय?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *