Skip to content

येशूने आश्रमांचा कसा स्वीकार केला

  • by

धार्मिक जीवन चार आस्रमांत (आश्रम) विभागले जाते. आस्रम/आश्रम व्यक्तीच्या जीवनाच्या अवस्थांसाठी ध्येय, अंशदान आणि कार्यकलाप आहेत. आश्रम धर्म, नावाच्या अवस्थांत जीवनाचे हे विभाजन चार क्रमिक अवस्थांतून जाणाऱ्या शरीराशी, मनाशी आणि भावनांशी अनुरूप आहे. हे हजारो वर्षांपूर्वी तयार करण्यात आले होते आणि धर्म शास्त्र, म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शास्त्रांत त्यविषयी सविस्तर लिहिण्यात आले होते, त्यात हे अधोरेखित करण्यात आले होते की तरुणपणापासून, प्रौढावस्थेपर्यंत, वाढत्या वयापर्यंत आणि वृद्धावस्थेपर्यंत पुढे जात असतांना आमच्या कर्तव्यांत बदल होत असतो.

परात्पर परमेश्वराचा अवतार म्हणून, येशूने, त्याच्या जन्मानंतर लवकरच आश्रम धर्माची सुरूवात केली. त्याने हे कसे केले हे शिकण्यासारखे आहे कारण आपल्या आश्रमांसाठी योग्यप्रकारे जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असतांना तो आम्हास अनुसरण करण्यासाठी उदाहरण देतो. आपण ब्रम्हचर्यापासून सुरूवात करतो, जेथे आपणास उपनयन आणि विद्यारंभ सारखे टप्पे आढळून येतात.

ब्रम्हाचार्य म्हणून येशू

विद्यार्थी आश्रम, ब्रम्हचर्य, आधी येते. या काळात विद्यार्थी अध्ययन प्राप्तीसाठी व पुढील आश्रमांसाठी आवश्यक भविष्यातील सेवेकरिता व शिक्षणाकरिता ब्रम्हचर्याचे पालन करतो. येशूने आजच्या उपनयनासारख्या, एका हिबू दीक्षा समारोहाद्वारे ब्रम्हचर्यात प्रवेश केला, जरी ते काहीसे भिन्न होते. शुभवर्तमान त्याच्या उपनयनाची अशाप्रकारे नोंद करते.

येशूचे उपनयन

पुढे मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे त्यांचे शुद्धीकरणाचे दिवस भरल्यावरते त्याला वर यरुशलेमेस घेऊन आले. ते अशासाठी की, त्याचे प्रभूला समर्पण करावे;

23 (म्हणजे प्रत्येक प्रथम जन्मलेला नर प्रभूसाठी पवित्र म्हटला जावा,’ असे जे प्रभूच्या नियमशास्त्रात लिहिले आहे त्याप्रमाणे करावे,)

24आणि प्रभूच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे होल्यांचा जोडा किंवा पारव्यांची दोन पिलेह्यांचा यज्ञ करावा.

25तेव्हा पाहा, शिमोन नावाचा कोणीएक मनुष्य यरुशलेमेत होता; तो नीतिमान व भक्तिमान मनुष्य असून इस्राएलाच्या सांत्वनाची वाट पाहत होता व त्याच्यावर पवित्र आत्मा होता.

26प्रभूच्या ख्रिस्ताला पाहण्याअगोदर तुला मरण येणार नाही, असे पवित्र आत्म्याने त्याला प्रकट केले होते.

27त्याला आत्म्याने मंदिरात आणले आणि नियमशास्त्राच्या विधीप्रमाणे करण्याकरता आईबाप येशूला आत घेऊन आले,

28तेव्हा त्याने त्याला आपल्या हातांत घेऊन देवाचा धन्यवाद करीत म्हटले :

29“हे प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ देत आहेस;

30 कारण माझ्या डोळ्यांनीतुझे तारण पाहिले आहे.’

31 तेतू सर्व राष्ट्रांसमक्षसिद्ध केले आहेस.

32 ते परराष्ट्रीयांना प्रकटीकरण होण्यासाठी उजेड तुझ्याइस्राएललोकांचेवैभवअसे आहे.”

33त्याच्याविषयी जे हे सांगण्यात आले त्यावरून त्याचा बाप व त्याची आई ह्यांना आश्‍चर्य वाटले.

34शिमोनाने त्यांना आशीर्वाद दिला व त्याची आई मरीया हिला म्हटले,

पाहा, इस्राएलात अनेकांचे पडणे व पुन्हा उठणे

होण्यासाठी व ज्याच्याविरुद्ध लोक बोलतील

असे एक चिन्ह होण्यासाठी ह्याला नेमले आहे;

35ह्यासाठी की, पुष्कळ लोकांच्या अंतःकरणातील विचार उघडकीस यावेत; (आणि तुझ्या

स्वतःच्याही जिवातून तलवार भोसकून जाईल.)

36हन्ना नावाची एक संदेष्ट्री होती, ती आशेराच्या वंशातील फनूएलाची मुलगी होती; ती फार वयोवृद्ध झाली होती व कौमार्यकाल संपल्यापासून ती नवर्‍याजवळ सात वर्षे राहिली होती.

37आता ती चौर्‍याऐंशी वर्षांची विधवा असून मंदिर सोडून न जाता उपास व प्रार्थना करून रात्रंदिवस सेवा करत असे.

38तिने त्याच वेळी जवळ येऊन देवाचे आभार मानले आणि जे यरुशलेमेच्या मुक्ततेची वाट पाहत होते त्या सर्वांना ती त्याच्याविषयी सांगू लागली.

येशूचे बाळपण

39नंतर प्रभूच्या नियमशास्त्राप्रमाणे सर्वकाही पुरे केल्यावर ते गालीलात आपले गाव नासरेथ येथे परत गेले.

40तो बालक वाढत वाढत आत्म्यात बलवान होत गेला व ज्ञानाने पूर्ण होत गेला; आणि त्याच्यावर देवाची कृपा होती.

लूक 2:22-40

आजच्या काही उपनयन समारोहांत मंदिरात बकऱ्याचे अर्पण केले जाते. असे हिब्रू उपनयन समारोहांत सुद्धा सामान्य होते. पण मोशेच्या नियमशास्त्रात गरीब कुटूंबांस बकऱ्याऐवजी कबुतराचे अर्पण करण्याची परवानगी होती. आपण पाहतो की येशू गरीब घराण्यात लहानाचा मोठा झाला कारण त्याचे आईवडील बकरा अर्पण करू शकत नव्हते, त्याऐवजी त्यांनी कबुतरे अर्पण केली.

पवित्र ऋषी, शिमोनाने, ही भविष्यवाणी केली की येशू ‘सर्व राष्ट्रांसाठी’ ‘तारण’ व ‘प्रकटीकरण’ ठरेल, याचा अर्थ सर्व भाषासमूह. म्हणून येशू हे ‘प्रकटीकरण’ आहे जो तुमच्यासाठी व माझ्यासाठी ‘तारण’ घेऊन येतो कारण आपण जगातील भाषागटांपैकी एका गटात मोडतो. नंतर आपण पाहतो  की येशू हे कसे करतो.

पण ही भूमिका पूर्ण करण्यासाठी येशूला ज्ञान व अक्षरांची दीक्षा घेणे जरूरी होते. त्याच्या जीवनात या विद्यारंभाची दीक्षा घडून आली हे नक्की सांगितलेले नाही. पण त्याचे कुटूंब ज्ञानास मूल्यवान समजत असे व ज्ञान, अक्षर व शिक्षणावर महत्व देत असे. कारण 12-वर्षाचा मुलगा म्हणून त्याच्या ज्ञानावस्थेत ओझरती नजर आपणास दिसून येते. येथे त्याविषयी नोंद करण्यात आली आहे :

41 प्रत्येक वर्षी त्याचे आईवडील वल्हांडण सणासाठी यरुशलेमाला जात.
42 जेव्हा तो बारा वर्षांचा झाला तेव्हा ते नेहमीप्रमाणे सणासाठी वर गेले.
43 सण संपल्यावर ते घरी परतत असता, येशू (मुलगा) मात्र यरुशलेमातच राहिला, पण त्याच्या आईवडिलांना हे माहीत नव्हते.
44 कुठल्या तरी प्रवाश्यांच्या घोळक्याबोरबर तो येत असावा असा विचार करुन पुढे एक दिवसाचा प्रवास केला. मग ते त्याला त्यांच्या नातेवाईकांमध्ये व मित्रांमध्ये शोधू लागले.
45 जेव्हा तो त्यानां सापडला नाही तेव्हा त्याला शोधण्यासाठी यरुशलेमास परत गेले.
46 असे घडले की, तीन दिवसांनंतर तो त्यांना मंदिरात सापडला, तो गुरुजनांच्यामध्ये बसून त्यांचे ऐकत होता व त्यांना प्रश्न विचारीत होता.
47 ज्यांनी त्याचे बोलणे ऐकले ते सर्व त्याच्या समजबुद्धीमुळे आणि उत्तरांमुळे चकित झाले.
48 जेव्हा त्याच्या आईवडिलांनी त्याला पाहिले तेव्हा ते चकित झाले. त्याच्यी आई त्याला म्हणाली, “मुला, तू आमच्याबरोबर असे का केले? तुला शोधत असताना तुझे वडील व मी अतिशय काळजीत होतो.”
49 मग येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही माझा शोध का केलात? माझ्या पित्याचे कार्य जेथे आहे, तेथे मी असावे हे तुम्हांला माहीत नव्हते काय?”
50 परंतु त्याने हे जे उत्तर दिले ते त्यांना समजले नाही.
51 मग तो त्यांच्याबरोबर नासरेथास गेला. आणि तो त्यांच्या आज्ञेत राहिला. त्याची आई या सर्व गोष्टी अंत:करणात ठेवीत होती

.लूक 2:41-51

हिब्रू वेदांची परिपूर्णता

नंतरच्या सेवेसाठी तयारी म्हणून, येशूच्या बालपणाचे व वाढत्या जीवनाचे पूर्वचित्र यशया ऋषीने पाहिले होते ज्याने लिहिले :

https://en.satyavedapusthakan.net/wp-content/uploads/sites/3/2017/10/isaiah-sign-of-the-branch-timeline--1024x576.jpg

ऐतिहासिक समयरेखेत यशया आणि इतर हिबू ऋषी (संदेष्टे)

1 तथापि आता ज्या भूमीत विपत्ती आहे तेथे हा अंधकार राहणार नाही. त्याने मागील काळात जबुलून प्रांत व नफताली प्रांत ह्यांची अप्रतिष्ठा केली तरी पुढील काळात समुद्रतीरीचा प्रदेश, यार्देनेच्या पलीकडील प्रांत, विदेशी लोकांचे मंडळ (गालील) ह्यांची तो प्रतिष्ठा करील.

6 कारण आमच्यासाठी बाळ जन्मला आहे, आम्हांला पुत्र दिला आहे; त्याच्या खांद्यांवर सत्ता राहील; त्याला “अद्भुत, मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती” म्हणतील.

यशया 9:1,6

येशूचे स्नान

ब्रम्हचर्याची पूर्णता बहुधा स्नान किंवा समवर्तनाद्वारे साजरी केली जाते. याचे चिन्ह म्हणजे गुरूजनांच्या व पाहुण्यांच्या उपस्थितीत विधियुक्त स्नान. येशूने बापतिस्मा करणारा योहान याच्याद्वारे समवर्तन साजर केले, जो बापतिस्मा नावाच्या विधिच्या रूपात लोकांना नदीत स्नान देत असे. मार्कच्या शुभवर्तमानाची (चार बायबल शुभवर्तमानांपैकी एक) सुरूवात येशूच्या स्नानाने होते:

वाचा पुत्रयेशू ख्रिस्त याच्या शुभवर्तमानाची सुरूवात.
2 यशया संदेष्ट्याच्या पुस्तकात असे लिहिले आहे:“ऐका! मी माझ्या दूताला तुझ्याकडे पाठवीत आहे तो तुझ्यासाठी मार्ग तयार करील. मलाखी 3:1
3 तेथे रानात एक व्यक्ति ओरडून सांगत होती: ‘प्रभूसाठी मार्ग तयार करा, त्याच्यासाठी वाटा सरळ करा.”‘ यशया 40 : 3
4 मग बाप्तिस्मा करणारा योहान आला व रानात लोकांचे बाप्तिस्मे करू लागला. लोकांना त्याने सांगीतले की, जर त्यांना त्यांची अंत:करणे बदलायची असतील तर त्यांनी पश्चात्तापाचा बाप्तिस्मा घ्यायला पाहिजे. मग त्यांच्या पापांची क्षमा केली जाईल.
5 यहूदीया व यरूशलेम येथील सर्व लोक योहानाकडे आले, त्यांनी आपली पापे कबूल केल्यावर त्याने त्यांचा यार्देन नदीत बाप्तिस्मा केला.
6 योहान उंटाच्या केसांपासून केलेली वस्त्रे वापरीत असे. त्याच्या कंबरेला कातड्याचा पट्टा होता आणि तो टोळ व रानमध खात असे.
7 योहानाने लोकांना हा संदेश दिला: “माझ्यापेक्षाही महान असा कोणी एक येत आहे, तो माझ्यानंतर येत आहे. मी त्याच्या वहाणांचा बंद सोडण्याच्यादेखील पात्रतेचा नाही.
8 मी तुमचा पाण्याने बाप्तिस्मा करतो पण तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करील.”
9 त्यावेळी येशू गालीलातील नासरेथहून जेथे योहान होता त्या ठिकाणी आला. यार्देन नदीत योहानाने येशूचा बाप्तिस्मा केला.
10 येशू पाण्यातून वर येत असता त्याने आकाश उघडलेले पाहिले. आणि पवित्र आत्मा त्याच्यावर कबुतरासारखा

आला.मार्क 1:1-10

गृहस्थ म्हणून येशू

सामान्यतः ब्रम्हचर्याश्रमानंतर गृहस्थ, किंवा कुलपति, आस्रम येतो, जरी काही वैरागी वृत्तीचे लोक गृहस्थाश्रम टाळतात आणि सरळ सन्यासावस्थेत (परित्याग) प्रवेश करतात. येशूने दोन्हींचे पालन केले नाही. आपल्या अद्वितीय ध्येयामुळे त्याने गृहस्थ अवस्था पुढे नंतर लांबणीवर टाकली. नंतर गृहस्थाश्रमात तो वधू आणि मुलांचा स्वीकार करील, पण भिन्न स्वरूपाच्या. भौतिक विवाह आणि मुले त्याच्या गूढ विवाहाचे आणि कुटूंबाचे प्रतीक आहेत. बायबल त्याच्या वधूविषयी स्पष्ट करते :

आपण आनंद’ व ‘उल्लास करू’ व त्याचा गौरव करू; कारण कोकर्‍याचे लग्न निघाले आहे, आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजवले आहे,

प्रकटीकरण 19:7

अब्राहाम आणि मोशे सोबत येशूला ‘कोंकरा’ म्हटले गेले. हा कोंकरा वधूशी लग्न करील, पण जेव्हा त्याने ब्रम्हचर्य पूर्ण केले तेव्हा ती तयार नव्हती. खरे म्हणजे, त्याच्या जीवनाचे ध्येय तिला तयार करणे होते. येशूने गृहस्थ लांबणीवर टाकल्यामुळे काहींचा असा अनुमान आहे की तो लग्नाच्या विरुद्ध होता. पण सन्यासनात ज्या पहिल्या कार्यात तो सहभागी झाला तो लग्न समारोह होता.

वानप्रस्थ म्हणून येशू

मुलांस जन्म देण्यासाठी त्याला आधी :

कारण ज्याच्यासाठी सर्वकाही आहे, ज्याच्या द्वारे सर्वकाही आहे, त्याने पुष्कळ पुत्रांना गौरवात आणताना त्यांच्या तारणाचा जो उत्पादक त्याला दु:खसहनाच्या द्वारे परिपूर्ण करावे हे त्याला उचित होते.

इब्री 2:10

‘त्यांच्या तारणाचा उत्पादक’ येशूचा उल्लेख करते, आणि मुलांच्या आधी त्याला प्रथम ‘दुःखातून’ जावे लागले. म्हणून, बापतिस्म्याच्या स्नानानंतर तो सरळ वानप्रस्थास (वनवासी) गेला जेथे तो अरण्यात परीक्षेस तोंड देत होता, ज्याचे वर्णन येथे करण्यात आले आहे.

संन्यासी म्हणून येशू

अरण्यात वानप्रस्थानंतर लगेच, येशूने सर्व भौतिक बंद तोडले आणि भटका शिक्षक म्हणून आपल्या जीवनाची सुरूवात केली. येशूचा सन्यासाश्रम सुप्रसिद्ध आहे. त्याच्या सन्यासाचे शुभवर्तमान असे वर्णन करते : 

23 येशू गालील प्रांतात सगळीकडे गेला, येशूने सभास्थानात जाऊन शिकविले व स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता सांगितली. येशूने लोकांचे सर्व रोग व दुखणी बरी केली.

मत्तय 4:23

या समयी तो बहुधा एका गावातून दुसऱ्या गावास प्रवास करीत असे, स्वतःच्या हिब्रू/यहूदी लोकांव्यतिरिक्त सुद्धा. त्याने आपल्या सन्यासी जीवनाचे वर्णन असे केले:

घेतल्या, त्याने आमचे रोग वाहिले.” यशया 53:4
18 आपल्या भोवती खूप लोक आहेत हे येशूने पाहिले तेव्हा त्याने त्यांना सरोवराच्या पलीकडे जाण्याची आज्ञा केली.
19 मग एक नियमशास्त्राचा शिक्षक त्याच्याकडे आला आणि म्हणाला, ‘गरुजी, आपण जेथे जाल तेथे मी आपल्या मागे येईन.”
20 येशू त्याला म्हणाला, “कोल्ह्यांना राहायला बिळे आणि आकाशातील पाखरांना घरटी आहेत. परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके सुद्धा टेकावयास जागा नाही.”

मत्तय 8:18-20

त्याला, मनुष्याच्या पुत्राला, राहावयास जागा नव्हती, आणि त्याचे अनुसरण करणाऱ्यानी सुद्धा हीच अपेक्षा केली पाहिजे. शुभवर्तमान हे सुद्धा समजाविते की त्याला असन्यासावस्थेत आर्थिक मदत कशी मिळत असे :

नंतर असे झाले की, येशू सर्व गावांतून आणि खेड्यामधून उपदेश करीत व देवाच्या राज्यासंबंधीची सुवार्ता सांगत जात होता. आणि बारा प्रेषित त्याच्याबरोबर होते.
2 ज्यांच्यामधून भुते काढली होती व ज्यांना आजारतून बरे केले होते अशा काही स्त्रियाही त्याच्याबरोबर होत्या: मरीया जिला मग्दालिया म्हणत, तिच्यातून सात भुते बाहेर पडली होती.
3 हेरोदाच्या घराचा कारभारी खुजा याची पत्नी योहान्ना, सूसान्ना आणि इतर अनेक स्त्रिया होत्या, या स्त्रिया त्यांच्याकडे जे होते, म्हणजे त्यांच्या उत्पन्नातून येशू व त्याच्या शिष्यांना देत असत.
4 जेव्हा मोठा जनसमुदाय जमत असे व प्रत्येक गावातून लोक त्याच्याकडे येत असत, तेव्हा येशू बोधकथांचा उपयोग करुन बोलत असे:
5 “एक शेतकरी आपले बी पेरायला गेला. तो पेरत असताना काही बी रस्त्यावर पडले व ते तुडविले गेले. आकाशातील पक्ष्यांनी ते खाऊन टाकले.
6 काही बी खडकाळ जमिनीवर पडले आणि उगवल्यावर वाळून गेले कारण त्यात ओलावा नव्हता.
7 काही बी काटेरी झुडुपात पडले. काटेरी झुडुपे त्याच्याबरोबर वाढली व त्याची वाढ खुंटविली.
8 काही बी चांगल्या जमिनीवर पडले. ते उगवले, वाढले व जे पेरले होते त्यापेक्षा शंभर पट पीक जास्त आल.” या बोधकथा सांगत असता तो मोठ्याने म्हणाला,“ज्याला ऐकण्यास कान आहेत, त्याने ऐकावे!”
9 त्याच्या शिष्यांनी या बोधकथेचा अर्थ काय असे विचारले.
10 म्हणून तो म्हणाला, “तुम्हांला देवाच्या राज्याची रहस्ये जाणून घेण्याचा अधिकार दिलेला आहे. पण इतरांच्यासाठी ते बोधकथेमध्ये दिले आहे.“यासाठी की, जरी ते पाहत असले, तरी त्यांना दिसू नये आणि ऐकत असले तरी त्यांना समजू नये.’ यशया 6:9
11 “बोधकथेचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे. बी हे देवाचा संदेश आहे.
12 आणि जे बी वाटेवर पडले ते जे ऐकतात त्याचे दर्शक आहेत. नंतर सैतान येतो आणि त्यांच्या हृदयातील बी घेऊन जातो, यासाठी की त्यांनी विश्वास ठेवू नये व त्यांचे तारण होऊ नये.
13 जे बी खडकावर पडते ते असे आहे की, ते ऐकतात आणि आनंदाने संदेश ग्रहण करतात. पण त्यांना मूळ नसते. ते काही वेळ विश्वास ठेवतात पण परीक्षेच्या वेळी देवापासून दूर

जातात.लूक 8:1-13

सन्याशाचे विशिष्ट चिन्ह हे असते की तो केवळ एक काठी घेऊन भटकत असो. आपले अनुसरण करण्यास आपल्या शिष्यांस मार्गदर्शन करीत असतांना त्याने त्यांस हेच शिकविले. त्याचे निर्देश हे होते :

6 नंतर येशू शिक्षण देत जवळपासच्या गावोगावी फिरला.
7 त्याने बारा शिष्यांना आपणांकडे बोलावून घेतले व त्यांना जोडीजोडीने पाठविले आणि त्याने त्यांना अशुद्ध आत्म्यावर अधिकार दिला.
8 त्याने त्यांना आज्ञा दिल्या की, “काठीशिवाय प्रवासासाठी त्यांनी काही घेऊ नये. भाकर पिशवी किंवा कमरकशात पैसे काही घेऊ नका.
9 त्यांनी वहाणा घालाव्यात पण जास्तीचा अंगरखा नको.
10 तो त्यांना म्हणाला, “ज्या कुठल्याही घरात तुम्ही जाल तेथे तुम्ही ते शहर सोडेपर्यंत

राहा.मार्क 6:6-10

येशूचा सन्यासाश्रम इतिहासाचा परिवर्तन बिंदू होता. या काळात तो गुरू बनला ज्याच्या शिकवणींनी जगास, अनेक सामर्थ्यशाली लोकांस (महात्मा गांधीसारख्या) प्रभावित केले आणि तुम्हाला, मला व सर्व लोकांना स्पष्टता देत अंतर्ज्ञान दिले.  त्याच्या सन्यासाश्रमादरम्यान जे मार्गदर्शन, शिक्षण आणि जीवनाचे दान त्याने दिले त्याविषयी आपण नंतर शिकू,  पण प्रथम आपण य शिकवण पाहू या (ज्याने स्नान दिले).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *