येशू, जीवन मुक्त, मृत लोकांच्या पवित्र नगरात प्रवास करतो

  • by

बनारस सात पवित्र नगरांपैकी सर्वात पवित्र आहे (सप्तपुरी). दरवर्षी दहा लाखाहून अधिक लोक तीर्थयात्रेसाठी, जीवन मुक्त म्हणून येतात, त्याच्या स्थानामुळे, (जेथे वरुणा आणि अस्सी नद्या गंगेस जाऊन मिळतात), आणि पौराणिक कथेत व इतिहासातील त्याच्या महत्त्वामुळे. बनारस, वाराणसी, अविमुक्त किंवा काशी (“प्रकाशाचे नगर”) म्हणूनही हे नगर ओळखले जाते, बनारस हे ते ठिकाण आहे जेथे शिवाला पापांची क्षमा मिळाली.

वाराणसीतील मणिकर्णिका घाट येथे मृतांचा अंत्यसंस्कार करण्यात येत असे.

काशी खंडानुसार (मुख्य तीर्थस्थळांसाठी ‘प्रवास मार्गदर्शक’ पुराण) शिवने, भैरवाच्या रूपात, आणि ब्रह्माशी तीव्र वाद घालून, ब्रह्माचे डोके त्याच्या धडापासूून वेगळे केले. या भयंकर अपराधामुळे, तुटलेले डोके त्याच्या हाताला चिकटून राहिले – अपराधबोध त्याच्यापासून जाईना. शिव/भैरवाने स्वतःला दोषमुक्त करण्यासाठी (आणि जुळलेले डोके दूर करण्यासाठी) अनेक ठिकाणी प्रवास केला पण जेव्हा तो बनारसला आला तेव्हा त्याच्या कापलेले डोके त्याच्या हातून निसटले. म्हणूनच, बनारस इतर तीर्थांपेक्षा अधिक महत्वाचे ठरावे अशी शिवने इच्छा केली आणि आज बनारस येथे त्याला वाहिलेली अनेक मंदिरे आणि लिंग आहेत.

बनारस: मृत्यूचे पवित्र नगर

कला भैरव हे शिवाच्या भयानक गुणांचे प्रदर्शन आहे, आणि कलाचा (संस्कृत: काल) अर्थ म्हणजे एकतर ‘मृत्यू’ किंवा ‘काळा’ असू शकतो. यामुळे भैरव बनारसमधील मृत्यूचा रक्षक ठरतो. यम, मृत्यूचा दुसरा देव वाराणसीत प्रवेश करू शकत नाही. अशा प्रकारे भैरव दंड देण्याची आणि आत्म्यांना एकत्रित करण्याची भूमिका पार पाडतो. असे म्हणतात की वाराणसीत मरण पावलेल्यांना भैरवाचा (भैरवी यातना) सामना करावा लागेल.

म्हणून बनारस हे मरणासाठी आणि अंत्यसंस्कारासाठी एक शुभ स्थान आहे कारण तेथे मृत्यूचा विषय मजबूत आहे, आणि तेथे मृत्यू आणि संसारापासून मुक्त होण्याची वाढती आशा आहे. बरेच लोक त्यांच्या आसन्न मरणाची अपेक्षेने वाराणसीत येऊन, धर्मशाळेत त्याची वाट पाहात असतात. या अर्थाने वाराणसी हे जीवनाच्या तीर्थक्षेत्रातील अंतिम गंतव्यस्थान आहे. मणिकर्णिका आणि हरिश्चंद्र हे बनारस येथील दोन प्रमुख समाधी घाट आहेत. मणिकर्णिका या दोघांपैकी अधिक प्रसिद्ध आहे, ज्याला मृत्यूचे अभयारण्य म्हणून ओळखले जाते, ते नदीच्या काठावर आहे जेथे स्मशानभूमीत सतत अग्नी जळत असतो. कोणत्याही दिवशी बनारसच्या घाटावर 30000 भाविक गंगास्नान करू शकतात.

त्यानुसार, बनारसमध्ये मरण्यासाठी संपूर्ण भारतातून येणारे लोक गर्दी करतात, यासाठी की त्यांच्या मृत्यूच्या वेळी त्यांना पुनर्जन्माचे चक्र कसे मोडावे आणि अशा प्रकारे मोक्षाची प्राप्ती कशी करावी याबद्दल शिवाद्वारे शिकवले जावे. थोडक्यात, बनारस हे मृतांचे पवित्र नगर आहे. पण असे आणखी एक नगर आहे आणि ते तितकेच पवित्र, आणि तितकेच प्राचीन आहे…

यरूशलेम: मृत्यूचे पवित्र नगर

यरूशलेम हे मृत्यूचे आणखी एक पवित्र नगर आहे ज्याविषयी जाणून घेणे अगत्याचे आहे. तेथे दफन केले जाणे शुभ मानले जाते कारण असे समजले जाते की तेथे पुरले गेलेले लोक मरणातून पुनरुत्थान प्राप्त करणाऱ्यांत सर्वप्रथम असतील, आणि त्यांच्यावर असलेल्या मृत्यूच्या बंधनातून सुटका प्राप्त करतील. परिणामी, हजारों वर्षांपासून यहूदी लोक या येणाऱ्या मुक्तीची अपेक्षा धरीत तेथे पुरले जाण्याचा प्रयत्न करतात.

मॉडर्न जेरूसलेममधील थडगे; मृत्यूपासून मुक्त होण्याची आशा आहे

या पवित्र नगरातच येशू आला, आता ज्याला झावळ्याचा रविवार म्हणतात त्या दिवशी. त्याने ज्या पद्धतीने हे केले, आणि त्याची वेळ त्याला जीवनमुक्त असल्याचे दाखवीत होती (जिवंत असतानाही मृत्यूपासून मुक्त झालेला). परंतु तो केवळ स्वतःसाठी जीवनमुक्त नव्हता, तर आपल्यासाठी आणि माझ्यासाठी जीवनमुक्त होण्याचा त्याचा हेतू होता. लाजराला जिवंत केल्यानंतर, मेलेल्यांच्या पवित्र नगरात आल्यावर त्याने हे कसे केले हे आपण शिकतो. शुभवर्तमान सांगतेः

येशू यरुशलेमात राजा म्हणून येतो

12 दुसऱ्या दिवशी सणास आलेले पुष्कळ लोक येशू यरुशलेमेस येत आहे असे ऐकून

13 खजुरीच्या झावळ्या घेऊन त्याच्या भेटीस बाहेर निघाले आणि गजर करत म्हणाले,

“होसान्ना! प्रभूच्या नावाने येणारा’

इस्राएलाचा राजा ‘धन्यवादित असो!’

14 येशूला लहान गाढव मिळाल्यावर त्याच्यावर तो बसला.

15 “हे सीयोनेच्या कन्ये, भिऊ नकोस;

पाहा, तुझा राजा गाढवीच्या शिंगरावर बसून येतो!”

ह्या शास्त्रलेखाप्रमाणे हे घडले.

16 प्रथम ह्या गोष्टी त्याच्या शिष्यांना समजल्या नव्हत्या; परंतु येशूचा गौरव झाल्यावर त्यांना आठवण झाली की, त्याच्याविषयी ह्या गोष्टी लिहिलेल्या असून त्याप्रमाणे लोकांनी त्याला केले.

17 त्याने लाजराला कबरेतून बोलावून मेलेल्यांतून उठवले, त्या वेळेस जो लोकसमुदाय त्याच्याबरोबर होता त्याने त्याबद्दल साक्ष दिली.

18 त्याने हे चिन्ह केले होते असे त्यांनी ऐकले म्हणूनही लोक त्याला भेटण्यास गेले.

19 मग परूशी एकमेकांना म्हणाले, “तुमचे काही चालत नाही हे लक्षात आणा; पाहा, जग त्याच्यामागे चालले आहे.”

योहान 12:12-19

काय घडले हे पूर्णपणे समजून घेण्यासाठी आम्हास इब्री वेदांनी प्राचीन इब्री राजांच्या प्रथांबद्दल काय सांगितले होते ते समजून घेणे आवश्यक आहे.

दाविदाचाअश्वमेधयज्ञ विधी

पूर्वज राजा दावीद (१००० ख्रिस्तपूर्व) याच्यापासून सुरुवात करून इब्री राजे वर्षातून एकदा आपल्या शाही घोड्यावर बसून पवित्र यरूशलेम नगरात मिरवणुक घेऊन येत असत. प्राचीन वैदिक अश्वमेध/अस्वमेध यज्ञातील घोड्याच्या बलिदानापेक्षा स्वरूप आणि कार्यपद्धती वेगळी असली तरीही त्यांचा हेतू एकच होता – आपल्या प्रजेला व इतर राज्यकर्त्यांना त्यांचे साम्राज्य सार्वभौमत्व सिद्ध करणे. जखऱ्या

जखऱ्याने केलेल्या भविष्यवाणीनुसारवेगळाप्रवेश

येणाऱ्या राजाच्या नावाची भविष्यवाणी करणाऱ्या जखऱ्याने ही भविष्यवाणी देखील केली होती, की येणारा राजा यरूशलेमेत प्रवेश करील, पण राजाप्रमाणे स्वारी न करता तो गाढवावर बसून येईल. वेगवेगळया इब्री ऋषींनी या अत्यंत विलक्षण घटनेचे वेगवेगळे  पैलूं आधीच पाहिले.

वरील शुभवर्तमानात उद्धृत झालेल्या जखऱ्याच्या भविष्यवाणीचा भाग अधोरेखित केला आहे. जखऱ्याची संपूर्ण भविष्यवाणी अशी होती:

सियोनच्या राजाचे आगमन

9 सीयोनकन्ये, जोराने आनंदाचा गजर कर; यरुशलेमकन्ये, गजर कर; पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे; तो न्यायी व यशस्वी आहे; तो लीन आहे; गाढवावर, गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे.

10 एफ्राइमातले रथ, यरुशलेमेतले घोडे मी नष्ट करीन; युद्धधनुष्य तोडून टाकण्यात येईल, तो राष्ट्रांबरोबर शांतीच्या गोष्टी बोलेल; त्याचे आधिपत्य प्रत्येक समुद्रावर व फरात नदापासून ते पृथ्वीच्या दिगंतापर्यंत चालेल.

11 तुझ्याविषयी म्हणशील तर तुझ्याबरोबर केलेल्या कराराच्या रक्तसिंचनामुळे मी तुझ्या बंदिवानांना निर्जल गर्तेतून मुक्त करीन.

जखऱ्या 9:9-11

जखऱ्याने भविष्यवाणी केली की येणारा राजा  इतर राजांपेक्षा वेगळा असेल. तो ‘रथ’, ‘लढाईचे घोडे’ आणि ‘लढाऊ धनुष्याचा’ उपयोग करून राजा होणार नाही. खरेतर हा राजा ही शस्त्रे काढून टाकील आणि त्याऐवजी ‘राष्ट्रांना शांतीची घोषणा’ करील. तथापि, या राजाला अद्याप शत्रूचा पराभव करावा लागेल – सर्वात मोठा शत्रू.

जेव्हा या राजाला कोणत्या गोष्टीचा सामना करावयाचा होता हे आपल्याला समजते तेव्हा हे स्पष्ट होते. सामान्यतः एखाद्या राजाचा शत्रू हा विरोधी राष्ट्र किंवा दुसरे सैन्य, किंवा त्याच्या लोकांकडून किंवा त्याच्याविरूद्ध असलेल्या लोकांकडून बंडखोरी असते. पण संदेष्टा जखऱ्याने लिहिले की “गाढवावर” प्रकट झालेला राजा केले की निर्जल गर्तेतून मुक्त करीन (व.11) ‘गर्त’ ही कबरेचा किंवा मृत्यूचा उल्लेख करण्याची इब्री पद्धत होती. हा येणारा राजा जे बंदिवान होते त्यांस सोडविणार होता, हुकूमशहांस नव्हे, भ्रष्ट राजकारणी लोकांस नव्हे, दुष्ट राजे, किंवा तुरूंगात अडकलेल्यांना नव्हे तर मृत्यूच्या ‘बंदिवासात’ असलेल्यांना सोडवणार होता.

लोकांना मृत्यूपासून वाचवण्याविषयी बोलणे म्हणजे एखाद्यास वाचविणे व मृत्यूला उशीर करणे होय. आम्ही, उदाहरणार्थ, एखाद्या बुडणार्याला वाचवू शकतो किंवा एखाद्याचे प्राण वाचवण्यासाठी औषध पुरवू शकतो. यामुळे केवळ मृत्यू पुढे ढकलला जातो कारण ‘वाचलेला’ व्यक्ती नंतर मरणारच. पण जखऱ्या लोकांना ‘मृत्यूपासून’ वाचवण्याविषयी भविष्यवाणी करीत नव्हता, तर मृत्यद्वारे बंधनांत टाकलेल्यांना सोडविण्याविषयी बोलत होता – जे आधीच मेले होते त्यांस. जखऱ्याने ज्याच्याविषयी भविष्यवाणी केली होती व जो गाढवावर स्वार होऊन येत होता, तो राजा – कैदांना मुक्त करतांना मृत्यूला तोंड देणार होता व स्वतः मृत्यूचा पराभव करणार होता. 

झावळ्याच्या रविवारी येशूच्या भविष्यवाणीची पूर्णता

येशूने आज ज्यास झावळ्याच्या रविवार म्हणतात त्या दिवशी यरुशलेमात प्रवेश करून जखऱ्याच्या भविष्यवाणीसोबत राजसी इब्री  ‘अश्वमेध’ यज्ञाच्या मिरवणुकीचे विलीनीकरण केले. युद्धाच्या घोडाऐवजी तो गाढवावर स्वार झाला. लोकांनी दाविदासाठी जसे केले होते तसेच त्यांनी येशूसाठी सुद्धा त्यांच्या पवित्र गीतामधून (स्तोत्र) तेच गीत गायले :

25  हे परमेश्वरा, आम्ही तुला विनवतो की, आमचे तारण कर. हे परमेश्वरा, आम्ही तुला विनवतो की, आमचा उत्कर्ष कर.

26 परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित असो. परमेश्वराच्या घरातून आम्ही तुम्हांला आशीर्वाद देतो.

27 परमेश्वर देव आहे, त्याने आपल्याला प्रकाश दिला आहे. उत्सवाचा यज्ञपशू वेदीच्या शिंगांना दोर्‍यांनी बांधा.

28 तू माझा देव आहेस; मी तुझे उपकारस्मरण करीन; हे माझ्या देवा, मी तुझी थोरवी गाईन.

स्तोत्र 118:25-27

लोकांनी हे प्राचीन गीत त्याच्यासाठी गायले कारण त्यांना माहीत होते की येशूने लाजराला जिवंत केले होते आणि यरूशलेमात त्याच्या आगमनाची त्यांना अपेक्षा होती. ते जयजयकार करू लागले, ‘होसन्ना’ ज्याचा अर्थ आहे ‘तारण कर’ अगदी तसेच जसे  स्तोत्र 118:25 मध्ये फार पूर्वी लिहिलेले होते. येशू त्यांना कशापासून वाचवणार होता? संदेष्टा जखऱ्याने आधीच आम्हास सांगितले होते – स्वतः मृत्यूपासून. गाढवावर स्वार होऊन पवित्र नगरात प्रवेश करण्याद्वारे येशूचे स्वतःला हा राजा घोषित केले हे किती योग्य आहे!

येशू दुःखाने रडतो

झावळ्याच्या रविवारी जेव्हा येशूने यरूशलेमेत प्रवेश केला (याला विजयी प्रवेश देखील म्हणतात) तेव्हा धार्मिक पुढाऱ्यांनी त्याचा विरोध केला. त्यांच्या विरोधकांना येशूच्या प्रतिसादाबद्दल शुभवर्तमान लिहिते.

41 मग तो शहराजवळ आल्यावर त्याच्याकडे पाहून त्याकरता रडत रडत म्हणाला,

42 “जर तू, निदान आज शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर किती बरे झाले असते! परंतु आता त्या तुझ्या दृष्टीपासून गुप्त ठेवण्यात आल्या आहेत.

43 कारण पुढे तुला असे दिवस येणार आहेत की त्यांत तुझे शत्रू तुझ्याभोवती मेढेकोट उभारतील व तुला वेढतील, तुझा चहूकडून कोंडमारा करतील,

44 तुला व ‘तुझ्या मुलाबाळांना धुळीस मिळवतील’ आणि तुझ्यामध्ये चिर्‍यावर चिरा राहू देणार नाहीत; कारण तुझ्यावर कृपादृष्टी केल्याचा समय तू ओळखला नाहीस.

लूक 19:41-44

येशू म्हणाला की पुढाऱ्यांनी ‘या दिवशी’ देवाच्या आगमनाची वेळ ओळखावयास हवी होती.

त्याचा अर्थ काय? त्यांचे काय चुकले?

त्यांच्या वेदांमध्ये 537 वर्षांपूर्वी दानीएलने भाकीत केलेल्या ‘सातचे’ कोडे त्यांच्या लक्षात आले नाही. सातच्या या भाकिताने पाचशे वर्षांपूर्वीच त्या दिवशी राजाच्या आगमनाची भविष्यवाणी केली होती.

दानीएलचे सात त्याच्या येण्याच्या दिवसाचे भविष्य वर्तवितात

झावळ्याचा रविवार शुभ होता कारण जखऱ्याची भविष्यवाणी (मृत्यूला पराभूत करण्यासाठी राजा गाढवावर स्वारी करून येत असल्याबद्दल) आणि दानीएलची भविष्यवाणी त्याच दिवशी आणि त्याच नगरात – यरूशलेमात, मृतांच्या पवित्र नगरात एक झाली.

आमच्यासाठी राष्ट्रांत

बनारस मृताच्या पवित्र नगराची तीर्थयात्रा आहे कारण ते मंगल स्थान आहे. भैरवाच्या कथेत वरती सांगितल्याप्रमाणे त्याच ठिकाणी तीर्थयात्रेकरू आले की त्यांना आशीर्वाद मिळेल. म्हणूनच त्याचे दुसरे नाव काशी, प्रकाशाचे नगर आहे.

आमचा जीवनमुक्त म्हणून सर्वकाही वेगळे होणार होते कारण त्याच्यानुसार, यरूशलेमेतील मृत्यूवरील त्याचा विजय यरूशलेमाबाहेर सर्व राष्ट्रांत जाणार होता.

का?

कारण त्याने स्वतःला जगाचा प्रकाश’ म्हणून घोषित केले, ज्याचा विजय यरूशलेमेतून संपूर्ण  राष्ट्रांपर्यंत जाईल – तुम्ही आणि मी जेथे जेथे जाऊ तेथे. येशूच्या विजयाचा आशीर्वाद मिळावा म्हणून आम्हाला यरुशलेमास यात्रा करून जाण्याची गरज नाही. आम्ही पाहतो की त्या आठवड्यातील घटना कशाप्रकारे मृत्यूबरोबरच्या युद्धाकडे प्रवृत्त झाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *